कोसला २.०

पुण्यात शिकायला आल्यावर होणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाठीमागे लागणार व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेवेलपमेंट नावाच प्रकरण. कुठल्याही ब्राम्हण मध्यमवर्गीय घरातून आलेल्या पोराप्रमाणे माझया पण आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये शाखेवर जाणार्‍या, गर्व से कहो हं हिंदू है वाल्या, आय टि त करीयर करून फॉरिन ला जायची आकांक्षा बाळगणार्‍या आणि जगातील कुठल्याही सर्व चांगल्या गोष्टींबद्दल अपराध गंड बाळगणार्‍या मुलांचा भरणा होता. मी एकंदरच या सगळ्यांनमध्ये मिसफिट होतो.
हिंदू असण्याची लाज जरी नसली तरी अभिमान त्याहून पण नव्हता. आय टि मध्ये जायची इच्छा आणि कुवत पण गैरहजर होति. सगळ्यात महत्वाच म्हणजे कुठलाही अपराधीकभाव नाही आयुष्याबद्दल.आजूबाजूला हा असा सावळा गोंधळ असताना एकटे एकटे वाटणे ही नेहमीचीच गोष्ट. आपण इतरांपासून वेगळे आहोत अशी मनाची समजूत काढण्याचा यशस्वी प्रयत्न मी सुरूवातीला केला. नंतर त्यातला फोलपणा लक्षात आल्यावर तो पण मार्ग खुंटला. अशा मनस्थतीत असताना मला 'तो' भेटला. 'त्याने ' माझे स्वतहचाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी आश्वासक मदत केली. मुखया म्हणजे 'ऑर्डिनरी' असण्यात काहीही गैर नाही असा दिलासा दिला.

गरवारे कॉलेज मध्ये आर्ट्स ला अड्मिशन घेतल्यावर लवकरच लेक्चर्स आणि लेकाचे प्राध्यापक कुणातच राम नाही हे माझया लक्षात आले . सोबत असणार्‍या इतराना पर्सनॅलिटी लवकर डेवेलप करण्याची घाई असल्याने ते चांगलेचुंगले कपडे घालून कॉलेज ला जात. मी कॉमर्स च्या टुकार पोरांसोबत हॉस्टेलच्या बाहेरच्या बाकवर बसून पोरि बघत असे. अशाच एका रम्य सकाळी अच्युत माझा हात ओढून पुगलीया सरांच्या लेक्चर ला घेऊन गेला. राहुल पुगलीया म्हणजे अफाट माणूस. पोरांमध्ये पॉप्युलर वगैरे वगैरे. अतिशय ओघवती शैली आणि भाषेवरील कमांड ही पुगलीया स्रांची खासियत.मध्येच क्लास चालू असताना त्यानी प्रश्न विचारला , " इथे बसलेल्यापैकी कोसला कोणी वाचली आहे?" एकदोघानि हात वर केले. "बस एवढेच?" पुंगलीया म्हणाले," कॉलेज ला जाणार्‍या प्रत्येकाने कोसला वाचणे महत्वाचे आहे." मग उरलेला तासभर कोसला आखयान चालू होते.कोसला शी पर्यायाने पांडुरंग सांगवीकर शी झालेला हा माझा पहिला हेल्लो.पण हे काही अखेरच नाही.

प्रत्यक्षात कोसला वाचायला मुहूर्त लागला तेव्हा आयुष्यात काही बर चालू नव्हते. बहुदा १८ वा जॉब सोडून मी घरी बसलो होतो. नुकताच एका प्रेमप्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या सामन्यत्वाची जाणीव नुकतीच जाणवायला लागली होती.
लो एम इज क्राइम कॉंप्लेक्स मधूनबाहेर पडण्याची धडपड चालू होती. कुठलेही पुस्तक वाचताना किंवा चित्रपट पाहाताना त्यातल्या मुख्य व्यक्तिरेखेशी स्वताहाला आइडेंटिफाइ करण हा मला वाटत कुठल्याही मनुष्यप्राण्याचा स्थायिभाव असावा. मी पण असाच पांडुरंग सांगवीकर शी रिलेट झालो. त्याने असे काही गारुड केले की मी स्वताहला त्याच्याशी खूप आइडेंटिफाइ करायला लागलो. गावात असताना शाळेत शिकत असताना कुणाच्यातरी अनामिक दहशतिखाली गेलेले बालपण, पुण्याला शिक्षणासाठी केलेल बहिर्गमन, तिथे व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी केलेले हास्यास्पद प्रयत्न, मग सगळ सोडून गावी येऊन एकदम खेडुत बनून राह्ण ह्या सगळ्या मधून मी पण गेलो असल्याने कोसला ही मला माझीच कहाणी वाटायला लागली. पण सगळ्यात महत्वाच म्हणजे कोसला आणि पांडुरंग ने मला घडवलेला आयुष्यातील निरंतन निरर्थकतेचा आणि आपण करत असलेल्या हजारो निरर्थक कृतींचा साक्षात्कार.

आतापर्यंत ज्या कोसला वाचलेल्याशी मी बोललो आहे त्या प्रत्येकाचा कोसलाचा अन्वयार्थ वेगळा आहे. कुणाला ती बहुजन समाजातल्या तरुणाची कथा वाटते, काहीना नेमाडेनची सेमी ऑटो बायोग्राफी तर काहीना चक्क सुहास शिरवालकर टाइप फन्नी कॉलेज स्टोरी वाटते. पण मला विचारल तर कोसला ही आयुष्याच्या निरर्थकतेची कहाणी.पुलनी त्यांच्या विख्यात प्रस्तावनेत म्हणल्याप्रमाणे कितीतरी अन्गानि ही कादमबरि हातात घेऊन खेळवावी. पण ही खरच आयुष्याच्या खानेसुमारीची कहाणी. पिढ्या न पिढ्या या निरर्थकतेच्या चक्रात झिजल्या. आपणही त्या चक्राचाच एक हिस्सा.

कोसला नंतर कमलेश वालावलकरच 'बाकी शून्या' वाचल. कोसलाचा प्रचंड प्रभाव असल्याने ते पण आवडल. माझया काही आवडत्या ब्लॉग पैकी एक म्हणजे अभिजीत बाठे चा ब्लॉग. त्यावर पण कोसला चा न पुसता येणारा ठसा. कोसला ने सगळाच प्रभावित केल. भावी आयुष्यातल्या आवडी निवडी पण. अजुन एक मजेशीर योगायोग म्हणजे कोसला मध्ये रमी जबलपुर ची असते आणि माझी बायको पण जबलपुर ची. आहे की नाही कमाल.

मला वाटत पांडुरंग सांगवीकर ही प्रवृत्ती आहे. आता पण फेस बुक वर गेलो की अनेक पांडुरंग सांगवीकर स्टेटस अपडेट करताना दिसतात. पांडुरंग आयुष्याच काय करायच हे ना उमजून पुढच आयुष्य खेडुत होऊन जगला, आम्ही या वैश्विक खेड्यात जगत् आहोत हाच फरक.

आता मी उदाहरणार्थ ३० वर्षाचा आहे. नौकरी, संसार, जबाबदार्या, समाज नावाच्या या जनावराशी रोज होणारा संघर्ष आणि मी 'सामान्य' आहे ही सालणारी भावना यानी मला पांडुरंग सांगवीकर च्या अजुन जवळ नेऊन सोडल आहे.ज्या अच्युत ने मला पुग्लीया च्या लेक्चर ला ओढत नेले होते तो आता आदिवासी पाड्यांवर काम करत आहे. पुग्लीया नि पण मध्यंतरी काही नंदुरबार च्या आदिवासी मूलाना स्वतःच्या घरी शिक्षण देण्यासाठी आणले. आणि मी? मीच तर आहे तो नेमाद्याचा शंभरातील ९९ मधला एक.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

>>काहीना चक्क सुहास शिरवालकर टाइप फन्नी कॉलेज स्टोरी वाटते.<<

'कोसला'त उत्तम विनोद आहे, पण हा कालविपर्यास मात्र रोचक आहे. शिरवळकरांची 'कॉलेज लाईफ'बद्दलची कादंबरी (नाव बहुधा 'दुनियादारी'; चूभूद्याघ्या) ही 'कोसला'नंतरची आहे आणि 'कोसला'वरून उघड प्रेरणा घेतलेली वाटते. 'बाकी शून्य'सुध्दा खूप नंतरची; त्याआधी शशांक ओक यांचं 'अमुकचे स्वातंत्र्य' (१९८७), किरण नगरकर यांचं 'सात सक्कं त्रेचाळीस' (१९७४) ही 'कोसला'च्या प्रभावाची आणखी काही उदाहरणं.

जाताजाता - जर तुम्ही आता तिशीतले संसारी वगैरे असाल तर मग नेमाड्यांच्या चांगदेव कादंबऱ्यादेखील ('बिढार', 'जरीला' आणि 'झूल') वाचा असं सुचवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मलाही चांगदेव पाटील जास्त जवळचा वाटला. कदाचित कधीच होस्टेलवर न राहिल्याचा परिणाम असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कोसला'बद्दल फार प्रेम नाही, पण हे लिखाण आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१

(या अधिक+१ ने बर्‍याच जणांचा रोष ओढवून घेत आले Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हम्म. शेरलॉकचं ते तसं. आता कोसला. आता कुणीतरी 'सचिनने आता निवृत्ती स्वीकारावी'टाईपचा धागा काढा. म्हंजे हॅट्ट्रिक होऊन जाईल. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सचिन बद्दल मी काही बोलत नाही, जाऊ दे. Wink
पण कोसला बद्दल तू बाणेदार पोझ घेणार असलीस तर (शरलॉकसाठी प्रायश्चित्त म्हणून) मी तुझ्या पाठीशी आहे.
अगदी आवडती कादंबरी. (आणि हो, मला हिंदू ही खूप आवडली होती)

ता कः काही अक्षरं फिक्या रंगात दिसण्यास काय करायला हवे? 'अक्षररंग' चे बटण दाबून ठराविक शब्दांसाठी (उदा. इथे "(शरलॉकसाठी प्रायश्चित्त म्हणून)") एखादा रंग निवडला तर जमत नाहीये.

संपादकः अक्षररंग वेगळे दिसायला हवे असल्यास प्रतिसाद देतेवेळी प्रतिसादाच्या खिडकीखाली असणार्या Input Format वर टिचकी मारून दिसणार्‍या पर्यायातील full Format हा पर्याय निवडावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बघू जमतं का - रंगीबेरंगी

वा. थँक्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं पण +१.
कोसला 'बरी' वाटली होती. 'बाकी शून्य' हा तर भोपळाच होता. त्याच्या बद्दलची योग्य मीमांसा मुसुंनी कुठेतरी केली होती. बाकी चांगदेव चतुष्ट्य हे ही एकच पुस्तक असते तर चालून गेले असते इतके रिपिटेटिव्ह आणि रटाळ आहे.
म्हणूनच मी घाबरून घरात असूनही अजून हिंदू वाचायला घेतली नाहीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

म्हणूनच मी घाबरून घरात असूनही अजून हिंदू वाचायला घेतली नाहीय.

खिक्.. इथे 'विशाल महिलांचा मेळावा' झाले वाटते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे होच की.. लिहिताना लक्षातच आले नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

>>> ....'बाकी शून्य' हा तर भोपळाच होता. त्याच्या बद्दलची ....मीमांसा ..... <

इथे : http://www.misalpav.com/comment/50830#comment-50830

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

निरर्थकतेबद्दलच बोलायचे तर प्रत्येक आयुष्यात एक 'कोसला' होऊन गेलेलाच असतो. कुणी तो पुस्तकात लिहितो तर कुणी मनात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो पण सांगवीकरप्रमाणे तो सर्वव्यापी आणि कायमचा असत नाही , नैका?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक शब्दात लिहिला तर प्रत्येकाचा अनुभव सर्वव्यापी ठरु शकेल. पण सर्वांना ते जमतंच असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा असहमत. म्हणजे अनुभव कितीही साधा का असेना, लिहिता आल्याशी मतलब, असा सूर दिसतो आहे. त्यात काही अंशी तथ्य असले तरी सरसकटपणे असे प्रत्येक वेळेस म्हणता येईल असे वाटत नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'प्रत्येक अनुभव' नव्हे, प्रत्येकाचा (केव्हा तरी आलेला निरर्थकतेचा) अनुभव असे म्हटले आहे.
'कोसला' अशा अनेक अनुभवांचा एक unique संग्रह म्हटला, तर इतरही एखादा अनुभव unique असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म मग ठीके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोसला २.०?
हं! इतकं सोप्पं असतं तर तुम्हाला बहुतेक 'कोसला २०००००...' हा नंबर घ्यावा लागला असता एव्हाना Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला खरं सांगु का?
कोसला म्हणजे एक दारु सारखी गोष्ट आहे असं वाटतं..
म्हणजे असं की पहिल्यांदा तुम्ही कधी चाखता त्यावर बरच काही असतं. पण तरीही प्रत्येक वेळेस फिरून असं वाटत राहतं की 'अरे गेल्या वेळेस तर थोडी वेगळीच चव होती की', काही नवीन भेटतं.
पेला तोच पण प्रत्येकासाठी आस्वाद वेगळा..
कोणाला उंदीर आणि पांडुरंगाचा प्रसंग लक्षात असतो तर कोणी त्या मनीला विसरू शकत नाही. बरेच जण सुरेशलापण आठवत असतील, तर कोणी डायरीची पाने.. अशी एक ना अनेक उदाहरणं..

कोणी कोणी दुधा-ताकाची चव शोधायला जातात, त्याना निराशा पदरी पडते इतकच.

शेवटी तुमचा आमचा पांडुरंग तो. जसा पहाल तसा दिसणार. दगड म्हनले तर दगड त्येला काय..

भरपूर लिहिता येईल कोसलाबद्दल, तुर्तास एवढच..
(बाकी कायम खंत राहील की कॉलेजात असताना वाचली नाही कधी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..