Skip to main content

आई, अशी कशी ही दिवाळी !

आई, अशी कशी ही दिवाळी
येते पटकन, सरते झटकन,
अभ्यासाला पुन्हा जुंपते
दहा दिवस का जाती चटकन !

फराळाच्या डब्यात मोठ्ठ्या
गोड गोड का तसेच उरते ?
चकली चिवडा चट्टामट्टा
पोटामध्ये भरकन जिरते !

भुईचक्र अन् टिकल्या आता
कंटाळा मज येइ उडवता -
धमाल दिसते मोठया हाती
बॉम्ब नि रॉकेट आवाज करता !

सुट्टी असते किती ग हट्टी
ठरल्या दिवशी येते जाते -
मित्रमंडळी गोळा होता
धमाल अमुची मनीं रहाते !

दिवाळी संपुन सुट्टी संपता
जुनाट दिसती नवीन कपडे...
आई, सांग ना दिवाळीस ग
बारा महिने थांब, तू इकडे !

.

विदेश Wed, 28/11/2012 - 22:38

ऋषिकेश,
पूर्णपणे सहमत आहे. बालगीत असल्याने जास्त खोलात गेलो नाही इतकच .
धन्यवाद.

विदेश Fri, 30/11/2012 - 08:56

ठेक्यात आणि ठसक्यात म्हणायला, मला तरी मात्रा चुकल्यामुळे काही अडचण आली नाही. परखड मतामुळे आनंद वाटला आणि वाढला, ऋषिकेश !