मी चालत गेलो...

मी चालत गेलो
माणसं भेटत गेली
कुणी दूर गेलं
कुणी जवळ आलं
संवाद होत गेले
मन जुळत गेले
मी चालत गेलो...

नाती गुंफत गेली
गाठी बांधल्या गेल्या
कैफात बुडत गेलो
जग हरवत गेलं
जगणं रमत गेलं
हर्ष दुणावत गेला
मी चालत गेलो...

मोह वाढत गेला
स्वार्थ कळत गेला
मन वळत गेलं
वाद होत गेले
कुणी रडत गेलं
कुणी हरत गेलं
मी चालत गेलो...

मन झुरत गेलं
प्रेम मरत गेलं
काही सुटत गेलं
काही उरत गेलं
दरी वाढत गेली
लळा पुसत गेला
मी चालत गेलो...

बंध विरत गेले
साथ झडत गेली
वर्तमान ढळत गेला
भविष्य चकवत गेलं
हृदय तुटत गेलं
दु:ख रडवत गेलं
मी चालत गेलो...

खांदा मिळत गेला
असावं पुसत गेली
काळ धावत गेला
जखमा भरत गेल्या
आयुष्य शिकवत गेलं
मला घडवत गेलं
मी चालत गेलो...

मी चालत गेलो
माणसं भेटत गेली...

- सुमित

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

चल अकेला, चल अकेला, चल अकेला
तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला

आशय चांगला आहे. पण काहीतरी मिसिंग आहे.
पहिल्या ओळीत, मी चालत गेलो ऐवजी मी चालत राहिलो ,जास्त चांगले वाटते.
प्रतिक्रिया आल्या नाहीत तरी लिहित रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...
हो, मलाही लिहून झल्यावर असं वाटलं की अजून कदाचित पुढे लिहायला हवं...
सुचलं की जरूर लिहीन...
पुनःश्च धन्यवाद...

- सुमित

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."