ब्रिटीश खगोलाभ्यासक पॅट्रीक मूर यांचे निधन

जगभरातल्या खगोलप्रेमींना आपल्या पुस्तकांमुळे माहित असणारा पॅट्रिक मूर याचे काल निधन झाले. पॅट्रिकने सौरमाला, आकाशनिरीक्षण आणि दुर्बिणींवर अनेक पुस्तकं लिहीली आहेत. या पुस्तकांमधून मला त्याची ओळख समजली तरी पॅट्रिकची ख्याती बीबीसीवरच्या 'The Sky at Night’ या कार्यक्रमामुळे होती. पन्नास वर्षांहून अधिक काळ हा कार्यक्रम टीव्हीवर सुरू आहे आणि याचा एक भाग वगळता बाकी सर्व भागांचं सूत्रसंचलन पॅट्रिकने केलं होतं. (तो एक भाग अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे पॅट्रिक करू शकला नाही.) ब्रिटीश खगोलाभ्यासकांच्या अनेक पिढ्यांना पॅट्रिकने निश्चितच प्रेरणा दिली. चौकस, शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या तोंडात 'द स्काय अ‍ॅट नाईट'चं नाव निश्चित येत असे. वयस्कर खगोलाभ्यासकांच्या खासगी गप्पांमधे पॅट्रिकच्या एका काचेच्या चष्म्याचा उल्लेख काही वेळा ऐकलेला आहे.

पॅट्रिकच्या मृत्युनंतर आलेल्या या काही बातम्या:
न्यू यॉर्क टाईम्स
त्याला भेटणार्‍या शेवटच्या लहानग्या फॅनची गार्डीयनमधली ही बातमी.

लहान मुलांमधे खगोलशास्त्रातल्या अनेक गोष्टींबद्दल कुतूहल जागं करण्याचं काम पॅट्रिकने निश्चितच केलं. मृत्युसमयी त्याचं वय ८९ होतं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला वाटते एक भिंगाचा चष्मा (monocle) वापरणारे ते जगातील शेवटचे गृहस्थ असणार!

(वरील धाग्यात मूर ह्यांचा एकेरी उल्लेख जरा खटकला. त्यांचे ८९ वय पाहता मराठी/भारतीय शिष्टाचारानुसार बहुवचनी आदरार्थी उल्लेख अधिक शोभला असता असे वाटते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पॅट्रीक मूर यांना मनापासून श्रद्धांजली. खगोलशास्त्रावरील अनेक क्लिष्ट बाबी सोप्या करुन विज्ञानातील या शाखेकडे विद्यार्थ्यांना आकृष्ट करणार्‍या मूर साहेबांचे हे काम वाखाणण्याजोगेच आहे.
त्यांच्या पुस्तकांच्या या यादीवर नजर टाकताच वाचकांना या व्यक्तीच्या कार्याचा आवाका किती होता हे कळेल

आवडीच्या विषयातल्या एका थोर व्यक्तीचे निधन झाल्याची हळहळ थोडी जास्तच असते. मूर साहेबांना श्रद्दांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेरे! श्रद्धांजली
एकाच दिवशी दोन दु:खद बातम्या! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पॅट्रिक मूर यांना आदरांजली.
( धाग्यातील पॅट्रिक यांचा एकेरी उल्लेख हा धागाकर्तीच्या खगोलप्रेमामुळे निर्माण झालेल्या पॅट्रिक यांच्या आदरासाठीच आहे असे वाटते. देव, आई, मित्र व राजा यांचा उल्लेख एकेरी करण्याची तशीही मुभा व्याकरणानेच दिली आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पॅट्रिक मूर यांना श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0