खगोलशास्त्राविषयी

परवाच ऐसी अक्षरेवर खगोलशास्त्रज्ञ पॅट्रिक मूर यांचे निधन झाल्याची बातमी वाचली.पॅट्रिक मूर हे नक्की कोण होते हे मला ही माहिती वाचेपर्यंत माहित नव्हते आणि अजूनही नक्की त्यांनी काय कार्य केले याची मला माहिती नाही.त्यांना श्रध्दांजली. ती बातमी वाचून काही प्रश्न उभे राहिले आणि ते प्रश्न त्यांना श्रध्दांजली द्यायच्या धाग्यात उभे करणे मला प्रशस्त वाटले नाही म्हणून नवा धागा काढत आहे.

पुण्यात आयुकाचे केंद्र पुणे विद्यापीठाच्याच आवारात आहे.आयुकाच्या झकपक इमारतींपुढे गणित्/भौतिकशास्त्र इत्यादी विभागांच्या इमारती अगदी बापुडवाण्या वाटतात.तसेच जयंत नारळीकरांनी (विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू हिम-- त्यांनी लहान मुलांच्या मनात विज्ञानाची आवड निर्माण करायचे काम खूपच तळमळीने केले आहे. पण माझा हा मुद्दा केवळ खगोलशास्त्राविषयी आहे) नक्की कोणते संशोधन पेपर लिहिले हे मध्यंतरी बघितले होते.त्यात तार्यांचा जन्म कसा होतो, मृत्यू कसा होतो इत्यादी विषयांवर बरेच पेपर दिसले.

मला एक प्रश्न नेहमी पडतो.गणित्/भौतिकशास्त्र इत्यादी क्षेत्रे "शास्त्रे" म्हणून पुढे का आली? कारण त्यातील तत्वांचा वापर करून अनेक नवी दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी उपकरणे बनविता येतात आणि त्यांचा कमर्शिअल वापरही करता येतो.तेव्हा अशा क्षेत्रांसाठी पैसा खर्च करणे समजू शकतो.पण खगोलशास्त्रातील माहिती जरी कळली किंवा कळली नाही तरी त्याचा आपल्या आयुष्यात नक्की काय फरक पडतो?उदाहरणार्थ तारे जन्माला कसे येतात आणि त्यांचा मृत्यू कसा होतो, ५०० प्रकाशवर्ष असलेल्या आकाशगंगेत काहीबाही होत आहे/झाले आहे हे मला कळले काय किंवा कळले नाही काय त्याचा नक्की काय फरक पडेल? आणि आईनस्टाईनचे तत्व म्हणते की प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करता येणार नाही.म्हणजे ५०० प्रकाशवर्षे असलेल्या आकाशगंगेपर्यंत पोहोचायला किमान ५०० वर्षे लागावीत.म्हणजे ते कोणाही एका माणसाच्या जीवनकाळात शक्य होणार नाही.मग अशा प्रकारच्या संशोधनाचा नक्की उपयोग काय?

असे म्हणतात की चंद्रावर आणि मंगळावर अनेक खनिजे आहेत.भविष्यात त्यांचा उपयोग आपल्याला होऊ शकेल म्हणून चंद्र आणि मंगळाचा अभ्यास करणे उपयुक्त आहे हे समजू शकते. तसेच अवकाशात उपग्रह सोडून हवामान, दळणवळण इत्यादी क्षेत्रांसाठी उपयोग होतो ते करणे गरजेचे आहेच.माझा मुद्दा केवळ अमुक तारकासमुहांमध्ये तमुक होते, अमुक राशींमध्ये तमुक तारे आहेत इत्यादी गोष्टींविषयी आहे.

तेव्हा आपण नक्की कोणत्या गोष्टीसाठीच्या संशोधनासाठी जास्त पैसे खर्च करणे गरजेचे आहे? मेडिकल सायन्स/इंजिनिअरींगच्या की खगोलशास्त्राच्या?आयुकाच्या चकपक इमारती, त्या इमारतींपुढे मोठे लॉन, पुण्यात २००६-०७ मध्ये पाणीटंचाई असताना लोक टँकरचे पाणी पीत असताना तिथल्या लॉनसाठी भरमसाठ पाणी वापरणे हे निदान नारळीकरांसारख्याला तरी शोभणारे नव्हते असे मला वाटते.

तुमचे मत काय?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

ह्या लिखाणामुळे खगोलशास्त्रा विषयी अधिक माहिती मिळेल असे वाटते.

आयुकाच्या चकपक इमारती, त्या इमारतींपुढे मोठे लॉन, पुण्यात २००६-०७ मध्ये पाणीटंचाई असताना लोक टँकरचे पाणी पीत असताना तिथल्या लॉनसाठी भरमसाठ पाणी वापरणे हे निदान नारळीकरांसारख्याला तरी शोभणारे नव्हते असे मला वाटते.
तुमचे मत काय?

हे वाक्य लेखात नसते तरी चालले असते. रादर नसायलाच हवे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

अंतराळशास्त्र, खगोलशास्त्र वा अवकाशविज्ञान काही म्हणा. दूरच्या तार्‍यांच्या अभ्यासाचा उपयोग काय?
कोणत्याही विज्ञानाच्या शाखेचा उपयोग व्हावा म्हणून अभ्यास केला जावा असे मला नाही वाटत. गरज ही शोधांची जननी असली तरी सुद्धा.
खगोलशास्त्राचा उपयोग आज लगेच दृश्य नाही दिसणार. पण जेव्हा पृथ्वीवर एखादा लघुग्रह वा धूमकेतू आदळेल त्यावेळी कित्येक दिवस आधी याची माहिती याच शास्त्रामुळे मिळाल्यामुळे मानव व इतर प्रजाती वाचवण्यासाठी ठोस भूमिका भविष्यात घेता येईल.
आजचे तंत्रज्ञान तुलनेने प्रायोगिक अवस्थेत आहे. जेव्हा चंद्र व मंगळ या ग्रहांवर भविष्यात मानवांची वस्ती होईल त्यावेळी या शास्त्राच्या अभ्यासासाठी १००-१५० वर्षे झिजवलेल्या सर्व शास्त्रज्ञांच्या योगदानाची प्रकर्षाने आठवण होईल व त्यांची स्मारकेही कदाचित तेव्हा उभारली जातील. तेव्हा खर्चिक आहे म्हणून त्या शास्त्राचा अभ्यास न करणे हे थोडे प्रगतीसाठी मारकच होईल.
दुसरे असे की हबल टेलिस्कोप अंतराळात पाठवल्यापासून अवकाशाचा आजपर्यंत कधीही नव्हता तेवढा स्पष्ट व दूरवर वेध घेता येऊ लागला आहे. या निरिक्षणांचा उपयोग भविष्यात खचितच होणार आहे. कारण आपण जे विश्व पहातो आहोत ते लाईव्ह नाहिये.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे ५०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगेचे आजचे दृश्य प्रतिबिंब म्हणजे आपल्या आजच्या हिशोबाने ती ५०० वर्षांपूर्वीची आकाशगंगा दिसत असते.

विज्ञानाच्या अनेक शाखा प्रगती करत आहेत. नवे नवे तंत्रज्ञान उदयास येत आहे. अशा परिस्थितीत जैव तंत्रज्ञानाने उद्या माणसाचे आयुष्य १००० वर्षे ते २००० वर्षे लांबवण्यात यश मिळवले तर? मंगळ व चंद्र यांच्याहीपेक्षा मोठमोठ्या ट्रिपा भविष्यात मानव करु शकेल. त्यावेळी खगोलशास्त्राच्या आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासाचे महत्त्व काय असेल हे तुम्हीच सांगा Smile

राहिले अवांतरः

पुण्यात २००६-०७ मध्ये पाणीटंचाई असताना लोक टँकरचे पाणी पीत असताना तिथल्या लॉनसाठी भरमसाठ पाणी वापरणे हे निदान नारळीकरांसारख्याला तरी शोभणारे नव्हते असे मला वाटते.

यावर मला असे वाटते की हा प्रशासनिक भाग आहे. पुणे विद्यापीठाच्या परिसराचे नियोजन हा काही नारळीकरांसारख्या वैज्ञानिक धोरणांचे नेतृत्त्व करणार्‍या शास्त्रज्ञांचा विषय नसावा असे मला वाटते. कोणत्याही कार्यक्षेत्रात - खास करुन रिसर्च जेथे होतो तेथे - प्रसन्न वातावरण खूप मोठा परिणाम करते. त्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनाने टवटवीत व हिरवागार परिसर निर्माण करण्यासाठी जे काही केले त्यात त्रुटी असल्या तर त्यांच्या निदर्शनास आणून देता येतील. आणि त्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे असेल तर ते विद्यापीठाचे कुलगुरु नक्कीच उचलू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>गणित्/भौतिकशास्त्र इत्यादी क्षेत्रे "शास्त्रे" म्हणून पुढे का आली? कारण त्यातील तत्वांचा वापर करून अनेक नवी दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी उपकरणे बनविता येतात आणि त्यांचा कमर्शिअल वापरही करता येतो.<<

इथेच चुकलात. गणितातल्या पुष्कळशा संशोधनाचा दैनंदिन आयुष्यात अजिबात उपयोग नसतो. आणि तरीही गणिताला एक ज्ञानशाखा म्हणून मान्यता आहे. गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गाऊसच्या एका वक्तव्यानुसार तर गणित ही शास्त्रांची सम्राज्ञी आहे. विख्यात गणितज्ज्ञ हार्डी यानं लिहिलेलं 'अ मॅथेमॅटिशियन्स अपॉलॉजी' हे पुस्तक वाचावं अशी शिफारस करेन. त्याविषयीच्या विकीपानातलं हे उद्धृत पुस्तक लिहिण्यामागची हार्डीची प्रेरणा सांगतं -

at the start of the Second World War, Hardy, a committed pacifist, wanted to justify his belief that mathematics should be pursued for its own sake rather than for the sake of its applications. He wanted to write a book in which he would explain his mathematical philosophy to the next generation of mathematicians; that would defend mathematics by elaborating on the merits of pure mathematics solely, without having to resort to the attainments of applied mathematics in order to justify the overall importance of mathematics; and that would inspire the upcoming generations of pure mathematicians.

Hardy contends that if useful knowledge is defined as knowledge which is likely to contribute to the material comfort of mankind in the near future (if not right now), so that mere intellectual satisfaction is irrelevant, then the great bulk of higher mathematics is useless.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इथेच चुकलात. गणितातल्या पुष्कळशा संशोधनाचा दैनंदिन आयुष्यात अजिबात उपयोग नसतो.

१९०३ मध्ये पहिल्या विमानाचे उड्डाण झाले. १९०४ मध्ये लुडविग प्रॅण्टलची "बाऊंडरी लेयर थिअरी" आली. विमानाचे पहिले उड्डाण झाले तेव्हा बाऊंडरी लेअर थिअरी आली नव्हती. त्या थिअरीतून पुढे एरोस्पेस इंजिनिअरींगचा जन्म झाला. तेव्हा पहिले विमानाचे उड्डाण झाले ते अशा कोणत्याही थिअरीशिवाय झाले पण नंतर या थिअरीवर अभ्यास झाला तो आणि विमान शास्त्राचा विकास एकमेकांबरोबरच झाला.

१७-१८ व्या शतकात गणितात बेसेल फंक्शन, लॉगेर पॉलिनॉमिअल वगैरे शोधल्या गेल्या. आज सर्क्युलर को-ऑर्डिनेट सिस्टीममध्ये कोणतेही डिफरिंशिअल इक्वेशन सोडविताना बेसेल फंक्शन येतात. कदाचित सुरवातीच्या काळात अशा शाखा नुसत्या थिअरी म्हणून आल्या असतील.पण त्यांचा खरा विकास झाला कुठलेतरी कमर्शिअल अ‍ॅप्लिकेशन झाल्यावरच.

खगोलशास्त्रातील ५०० प्रकाशवर्षांवरील गोष्टींची माहिती होऊन नक्की असे काय आतापर्यंत झाले आहे (निदान थोडी प्रगती तरी) की त्यावर पैसे खर्च करावेत? त्यापेक्षा मेडिकल सायन्स/ इंजिनिअरींगवर पैसे खर्च करणे ही प्रायोरिटी असली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ इतकीच प्रायॉरिटी असेल तर त्याला प्रत्त्युत्तर म्हणून जे जे थॉम्सनचे एक वाक्य आठवते, मूळ माहिती नाही, नारळीकरांच्या पुस्तकात भाषांतरित स्वरूपातच वाचलेय.

"जर अश्मयुगात सर्कारी प्रयोगशाळा असत्या तर त्यांनी उत्तम दगडी कुर्‍हाडी बनवल्या असत्या, पण धातूंचा शोध मात्र कोणी लावला नसता."

खगोलशास्त्रातील ५०० प्रकाशवर्षांवरील गोष्टींची माहिती होऊन नक्की असे काय आतापर्यंत झाले आहे (निदान थोडी प्रगती तरी) की त्यावर पैसे खर्च करावेत? त्यापेक्षा मेडिकल सायन्स/ इंजिनिअरींगवर पैसे खर्च करणे ही प्रायोरिटी असली पाहिजे.

मी खगोलशास्त्री नाही, त्यामुळे स्पेसिफिक्स माहिती नाहीत. परंतु एकांगी अ‍ॅप्लिकेशनवर फोकस केला आणि थिअरीची कास सोडली तर त्याच्यासारखे दुर्दैव दुसरे नाही. थिअरीमुळे प्रॉब्लेमबद्दल बोलायची एक नवीन भाषा मिळते आणि त्या भाषेमुळे नवनवे प्रश्न मांडणे आणि त्यांची उत्तरे शोधणे हे काम बरेच सोपे होते आणि अ‍ॅप्लिकेशनला खूप मदत होते, उदा. नेव्हिअर-स्टोक्सची डिफरन्शिअल इक्वेशन्स ही फ्लुईड फ्लोची गणिते सोडवायला खूप उपयुक्त ठरतात. ती गणिते सोडवून बरेच मशीन कांपोनंट्स डिझाईन करायला खूप मदत होते, जे अदरवाईज करायला दिवसगत लागले असते ट्रायल अँड एरर वापरून.

तीच गोष्ट स्टॅटिस्टिक्सची. क्वालिटी कंट्रोलमध्ये कमीतकमी नंबर ऑफ ट्रायल्स वापरूनसुद्धा पूर्ण ट्रायल्स करून मिळेल तितके अचूक निष्कर्ष कसे काढावेत, ही अक्कल तागुचीच्या ऑर्थोगोनल अ‍ॅरे मेथडमुळेच आली. लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये, विम्याचे प्रीमियम किती ठरवावे, कॅश रिझर्व्ह किती असावा, एक्स्पेक्टेड लायबिलिटी किती असेल, इ. प्रश्नांची उत्तरे हुडकणे इनफॅक्ट प्रश्नाचे अचूक फॉर्म्युलेशन हे एखाद्या गणिती थिअरीमुळेच शक्य होते याबद्दल दुमत नसावे.

सारांश, थिअरीमुळे कुठल्याही सायन्स फील्डमध्ये एक शिस्त येते आणि प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशन कसे डिव्हेलप करावेत, याची आयडियादेखील. त्यामुळे थिअरीला हाड-हुड करणे हा मूर्खपणा होय. कोण जाणे कधी थिअरीतून एखादे भारी अ‍ॅप्लिकेशन निघेल-ते निघणे निव्वळ आपल्या बायासमुळे राहिले, अशी खंत बाळगण्यापेक्षा थिअरीचा अभ्यास करणे कधीही बरे.

आता खगोलशास्त्र विरुद्ध मेडिकल्/इंजिनिअरिंग बद्दल म्हणायचे झाले तर ही तुलना अप्रस्तुत आहे इतकेच सांगतो. खगोलशास्त्राचा 'दिवस' अजून आला नाही, इतकेच त्याचे उत्तर आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या जिज्ञासेला उत्तेजन देणे हे लाँग रनमध्ये कधीही श्रेयस्कर ठरते, असा अनुभव आहेच, त्यामुळे खगोलशास्त्रज्ञांना "पोसण्यात" मला तरी गैर काहीच दिसत नाही. (विलार्ड गिब्स सारख्याला येल विद्यापीठाने ७ वर्षे पगार दिला नव्हता-का तर म्हणे थर्मोडायनॅमिक्स हे "इर्रिलेव्हंट" आहे असा डिपार्टमेंटचा बायस.) ते कमीतकमी काहीतरी काम करताहेत! ते रोचक आणि काहीवेळेस प्रत्यक्षपणे उपयुक्तदेखील असते. तसे पाहिले तर मग मानव्य शास्त्रांची गरज तरी काय आहे??

मानवी जिज्ञासेची हजारो रूपे म्हणजेच निरनिराळी शास्त्रे. आपापल्या परीने सर्वच शास्त्रे मानवसमाजाच्या प्रगतीला हातभार लावतच असतात. मुळात प्रगती आणि उपयुक्तता म्हंजे काय? याची व्याख्या नीट केली पाहिजे. अथेन्समधील ग्रीक समाज आणि आत्ताचा समाज, तसेच हडप्पातील संस्कृती आणि सध्याची संस्कृती, यांत नेमके प्रगत कोण आहे? एके ठिकाणी सर्व सामाजिक मूल्ये होती, तर दुसर्‍या ठिकाणी अतिप्रगत भौतिक व्यवस्थासुद्धा होती. निसर्गापुढच्या हतबलतेचा निकष लावला, तरी आपला समाज सर्वशक्तिमान झालाय असे म्हणवत नाही. मग इतक्या वर्षांत नक्की काय साधले? या प्रश्नाचे सर्वांगीण उत्तर विचारात घेतले तर प्रगतीची व्यामिश्रता (येस! येस!!! वापरलाच हा शब्द एकदा!!) लक्षात येईल. एकदा ती लक्षात आली की असा एकांतिक फोकस करणे हे लाँग रनमध्ये घातक आहे हे कळायला हर्कत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी थिअरीचे महत्व कुठेही नाकारत नाही.कधी थिअरी आधी विकसित होते आणि त्याचे अ‍ॅप्लिकेशन मागाहून येते (फ्लुईड मेकॅनिक्समधील नेव्हिअर-स्टोक्स समीकरणे) तर कधी अ‍ॅप्लिकेशन आधी विकसित होते आणि त्याची थिअरी मागाहून येते (विमान हे अ‍ॅप्लिकेशन आणि बाऊंडरी लेअर थिअरी).पण एकदा थिअरी आणि अ‍ॅप्लिकेशन यांचा मेळ बसला की नंतरची वाटचाल ही बहुतांशी एकत्रच होते.उदाहरणार्थ विमान पहिल्यांदा आले आणि बाऊंडरी लेअर थिअरी वर्षभराने आली.पहिले विमान राईटने केले तेव्हा त्यांना ड्रॅग आणि लिफ्ट वगैरे तत्वे माहित होती असे वाटत नाही.पण त्याचबरोबर जशी थिअरी विकसित झाली त्याबरोबरच या तत्वांचा वापर करून पंखांचा आकार एरोफॉईल असावा, किती वेगाने गती दिल्यास योग्य ती लिफ्ट मिळेल इत्यादी नंतरची वाटचाल त्याला अनुसरूनच झाली.पुढे जशी इंजिने जास्त विकसित झाली त्याप्रमाणे अधिक लांब पल्ल्याची आणि अधिक वेगाने जाणारी विमाने आली.त्याप्रमाणे बाऊंडरी लेअर सेपरेशन होते आणि त्यातून अधिक टर्ब्युलन्स येऊन वेगळे प्रश्न उभे राहतील हे विंड टनेलमध्ये प्रयोग करून समजले.विमानांचा वेग जसा वाढला त्याप्रमाणे ही समस्या अधिक येऊ लागली.आज हवाईदलातील विमानांसाठीच्या डिझाईनमध्ये बाऊंडरी लेअर सेपरेशन साठी अत्यंत किचकट सॉफ्टवेअर आणि मॉडेल्स असतात.तेव्हा थिअरी आणि अ‍ॅप्लिकेशन हे बरेच एकत्र विकसित झाले असे म्हटले तरी चालेल.

खगोलशास्त्रात २२ लाख (५०० नव्हे) प्रकाशवर्ष दूर असलेल्या आकाशगंगेत नक्की काय चालू आहे ही थिअरी विकसित करायच्या मागे आताच का लागावे? सध्या आपली अंतराळयाने अवकाशात जातात ती एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त म्हणजे सेकंदाला ११.२ किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने. प्रकाशाचा वेग आहे ३ लाख किलोमीटर प्रतिसेकंद. त्याच्या अर्ध्या वेगाने गेले तरी त्या आकाशगंगेपर्यंत पोहोचायला ४४ लाख वर्षे लागतील!! विज्ञानातील प्रगतीमुळे माणूस ४४ लाख वर्षे जगायला लागणे शक्य आहे असे समजले तरी सध्याचे ८०-१०० हे जीवनमान ४४ लाखपर्यंत न्यायला हवे.तेव्हा कुठे या अभ्यासाचा उपयोग आहे.आताच असे विचार करणे म्हणजे काही सेकंदापूर्वी जन्मलेल्या मुलाने आपल्याला वयाच्या १०० व्या वर्षी काय करायचे आहे याचा विचार करण्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या परिच्छेदाशी सहमत.दुसर्‍या परिच्छेदात विशेष रोचक वाटलेली वाक्ये:

खगोलशास्त्रात २२ लाख (५०० नव्हे) प्रकाशवर्ष दूर असलेल्या आकाशगंगेत नक्की काय चालू आहे ही थिअरी विकसित करायच्या मागे आताच का लागावे?

आणि

विज्ञानातील प्रगतीमुळे माणूस ४४ लाख वर्षे जगायला लागणे शक्य आहे असे समजले तरी सध्याचे ८०-१०० हे जीवनमान ४४ लाखपर्यंत न्यायला हवे.तेव्हा कुठे या अभ्यासाचा उपयोग आहे.आताच असे विचार करणे म्हणजे काही सेकंदापूर्वी जन्मलेल्या मुलाने आपल्याला वयाच्या १०० व्या वर्षी काय करायचे आहे याचा विचार करण्यासारखे आहे.

तसे तर मग मानवी जीवनाचे अंतिम ध्येय काय वगैरे छापाचे इन्व्हेस्टिगेशन प्राचीनकाळी लोक करतच होते, त्यांना त्यातून काही रोचक तत्वप्रणाली मिळाल्या. त्यांचा वापर करायची संधी तेव्हाच मिळाली असे नाही, पण जेव्हा मिळाली तेव्हा थिअरी असल्याने इम्प्लिमेंटेशनमध्ये मदत झालीच. तुमचा साधारणपणे रोख हा फिजिकल तंत्रज्ञानाकडे दिसतो आहे. पण न्यूटनने कॅल्क्युलस शोधले तेव्हा तरी त्याचे प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशन काय होते? ग्रहतार्‍यांच्या गणिताला मान्यता होती हा भाग वेगळा, पण तांत्रिकदृष्ट्या पाहता न्यूटनच्या काळात कॅल्क्युलसची अ‍ॅप्लिकेशन्स जवळपास नव्हतीच असे म्हटले तरी चालेल. मग लोकांनी अ‍ॅस्ट्रॉनॉमीचा अभ्यास केला त्यात वेळ वाया गेला का?

तर बाय इट्सेल्फ त्याचा तेव्हा तादृश उपयोग नसूनही त्यांच्या अभ्यासासाठी जी टेक्निक्स विकसित झाली, त्यांचा इतर बायप्रॉडक्ट अ‍ॅप्लिकेशन्समध्ये खूप उपयोग झाला, उदा. अ‍ॅस्ट्रॉनॉमीमधील एका प्रॉब्लेममुळे गॉसने लिनिअर रिग्रेशनची मेथड शोधून काढली. तिचा पुढे इतर अगणित ठिकाणी इतका उपयोग झाला तेवेसांनल. अजून एक उदाहरण देतो.

नंबर थिअरीचा तादृश उपयोग काय आहे? (क्रिप्टोग्राफी आणि साऊंड डिफ्यूजर डिझाईनिंग सोडून) काहीच नाही म्हटले तरी चालेल. पण कुठल्याही कारणास्तव का असेना, लोकांनी त्यातले निव्वळ थिअरॉटिकल प्रॉब्लेम्स सोडवले. सोडवता सोडवता जी टेक्निक्स विकसित झाली, त्यांचा इतर प्रॅक्टिकल ठिकाणी खूप उपयोग झाला, उदा. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट अल्जेब्रा. त्यामुळे लोक निव्वळ सैद्धांतिक, वरवर पाहता यूसलेस प्रश्न सोडवत राहिले- निव्वळ सोडवण्याचा आनंद आणि असे कैतरी टूल्स मिळतील अशी आशा म्हणून. नंबर थिअरीच्या अध्ययनामुळे हे असे टूल्स मिळतात, हाच त्या अध्ययनाचा फायदा आहे. बाय इट्सेल्फ फायदा नसूदे, असा अप्रत्यक्ष फायदा आहे.

त्याप्रमाणेच, अभ्यासक्षेत्र हे तद्दन यूसलेस वाटणारे खगोलशास्त्र असले तरी हरकत नाही. याच्या अभ्यासातून एखादे गणिती/फिजिकल टूल विकसित होईल, ज्याचा अकल्पनाख्य ठिकाणी अतिशय अनपेक्षितपणे फायदा होऊ शकतो-बर्‍याचवेळेस झालाय आत्तापर्यंत. त्यामुळे निव्वळ खगोलशास्त्राचा काय फायदा, हा प्रश्न गैरलागू आहे. ज्याप्रमाणे कुरुंदकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे- कोट्यवधी व्यक्तींनी एका शिस्तीत चरखा फिरवून स्वातंत्र्य मिळणार नाही हे खरंय-पण इथे चरखा फिरवण्याचे महत्व नसून तसा नीट चरखा फिरवायास लागणार्‍या संघशक्तीचे आहे, ती संघशक्ती या ना त्या प्रकारे विकसित झाल्याशी मतलब-मग स्वातंत्र्य मिळणे अवघड नाही. तीच गोष्ट इथे-टूल्स मिळाल्याशी मतलब-मग ओरिजिनल मोटिव्हेशन काहीही असो.

आणि त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की वैज्ञानिक प्रगतीचा वेग जरी गेली काही शे वर्षे चढता राहिला असला तरी बरीच शास्त्रे विकसित होण्यासाठी शेकडो, हजारो वर्षे गेली आहेत. त्यामुळे शास्त्राच्या औटपुटला घाईघाईने तोलणे बरोबर नाही. पण अर्थात हे प्रॅक्टिकली शक्य होईलच असे नाही, याचीदेखील जाणीव आहे. विद्यापीठ आणि संशोधनसंस्था यांची बजेट्स मर्यादित असतात, त्यांना बॉसेसना उत्तर द्यावे लागते , हे मान्य करूनही मी म्हणेन की होता होईल तो कुठल्याही शास्त्राला असे उपयुक्ततावादाच्या निकषांवर तोलू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विज्ञानाचे मुख्य उद्दीष्ट हे 'युटिलिटि' नसून 'अज्ञान दूर करणे' पक्षी माहित नसलेल्या गोष्टी कमी करणे अर्थात 'ज्ञान मिळवणे' आहे. त्या ज्ञानातून तयार होणारी मानवोपयोगी उपकरणे वगैरे - म्हणजेच त्या विज्ञानाची युटिलिटि - हा परिणाम आहे, उद्देश नव्हे.
(युटिलिटिसाठी एखाद्या विज्ञानाचा अभ्यास करणं म्हणजे अपत्यप्राप्तीसाठी लग्न करण्यासारखं झालं. Wink

तेव्हा एखादे विज्ञान दैनंदिन जिवनात तितकेसे उपयुक्त नाही म्हणून त्यात रस असणार्‍यांनी ते शिकूच नये असे म्हणणे अन्यायकारक तर वाटतेच शिवाय 'विज्ञानाच्या' उद्दीष्टांशी फारकत घेणारे वाटते.

दुसरी दुय्यम गोष्ट तुम्ही ज्याचा उल्लेख करताय त्याला 'कॉस्मॉलॉजी' म्हणतात. त्याला स्वत: नारळीकर पूर्ण (डेव्हलप्ड) विज्ञान म्हणण्यास तयार नाहित (असे त्यांनी नुकतेच आमच्या हाफिसात झालेल्या भाषणात सांगितले). त्यात अधिक संशोधन करायचे - माणसाचे अज्ञान दूर करण्यासाठी- तर सद्य आर्थिक व्यवस्थेनुसार त्यात गुंतवणूक करणे गरजेचे वाटते. 'अ‍ॅस्ट्रोफिजिक्स' ही फिजिक्स चीच एक शाखा झाली. तुम्हाला एकूणच भौतिक शास्त्राचा अभ्यास करण्यास प्रत्यवाय नसल्याने 'अ‍ॅस्ट्रोफिजिक्स' चा भ्यास करणे आणु त्यात पैसे गुंतवणे यावरही आक्षेप नसेल असे समजतो.

असो. धाग्यावर पुढे तर्कशुद्ध चर्चा झाली तर भाग घेईनच, अन्यथा इत्यलम्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाच प्रश्न इतिहास, भाषाशास्त्र, आणि मानव्य शास्त्रांतील सर्वच ज्ञानशाखांबद्दल विचारला तर?????????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरील लेख वाचून असे म्हणावेसे वाटते की भारतीय लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. विज्ञानाची खरी आवड किती लोकांना असते? बरेचसे विद्यार्थी केवळ ,जास्त पगाराची नोकरी मिळेल या आशेने विज्ञान शाखेत प्रवेश घेतात. त्यांतसुद्धा कुठल्या लाईनमधे जास्त पैसे कमावता येतील हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर असते. खरी ज्ञानलालसा जोपासायला समाजात स्वास्थ्य पाहिजे. ते नष्ट होत चालले आहे. रेसमधे धावता धावता जे हाताला लागेल ते धरुन ठेवण्याचे वृत्ती वाढत आहे. आपली खरी आवड काय, याचा विचार करुन जर करियर केली तर त्या विषयात सहज निपुण होता येते.
खरा विज्ञानप्रेमी हा, कधी फायद्या-तोट्याचा विचारच करणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा समजून घेण्यासाठी:
खगोलशास्त्रावर थोडेसुद्धा पैसे खर्च करण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे की भरमसाठ पैसे खर्च करण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे?

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

क्वांटम मेकॅनिक्समध्ये रुदरफोर्ड, बोहर, क्यूरी, मॅक्स प्लँक यांनी जे काम केले तेव्हा त्यात कुठल्याही उपयुक्ततेचा (अणूची रचना जाणणे या कुतुहलाखेरीज) अंश नसणार. पण त्याच कामातून पुढे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे शाखा उदयास येऊन प्रगती झालेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>कदाचित सुरवातीच्या काळात अशा शाखा नुसत्या थिअरी म्हणून आल्या असतील.पण त्यांचा खरा विकास झाला कुठलेतरी कमर्शिअल अ‍ॅप्लिकेशन झाल्यावरच.<<

ह्यालाच आधार नाही. ज्याचं काहीही व्यावसायिक उपयोजन माहीत नाही अशा गोष्टींमागे धावण्याची प्रेरणा काही माणसांत असते. ह्यासाठीच हार्डीचं उदाहरण दिलं होतं. नंबर थियरीचं उपयोजन आहे अथवा नाही यानं हार्डीला काहीही फरक पडत नव्हता. किंबहुना ज्या क्षेत्रांना व्यवहाराचा स्पर्श नाही अशी गणितातली क्षेत्रं तो शुध्द मानत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वरच्या प्रतिसादांमधे मला म्हणायचं आहे त्यातल्या बर्‍याचशा गोष्टी आहेत, काही वेगळं वाटतं तेवढंच लिहीते.

१. मागणी तसा पुरवठा. मग मागणी कसलीही का असेना! आपल्या घरात टांगता येणार नाही, आपल्याला क्रेडीट मिळणार नाही तरीही फेसबुकावर सुंदर फोटोंना मागणी असते. तसा पुरवठा होतो. खगोलशास्त्राची मागणी आहे, पुरवठा करण्याचा यथाशक्ती प्रयत्न होतो. शांपू, क्रेडीट कार्ड्स, विविध दारूचे ब्रांड्स सर्वांच्या जशा जाहिराती बघतो आणि कधीकधी करमणूकही होते, तशाच खगोलशास्त्राच्या जाहिराती बघून लोकांची करमणूक होते. हे कार्यक्रम बघून प्राथमिक शाळांमधल्या मुलांना ब्लॅक होल म्हणजे काय ते समजून घ्यायचं असतं आणि अ‍ॅस्ट्रनॉमर किंवा अ‍ॅस्ट्रनॉट बनायचं असतं.
'आयुका'सारख्या संस्था या पुरवठादार असतात. त्यातही पॅट्रिक आणि इतर ब्रिटीश, अमेरिकन अभ्यासकांनी जसं काम केलं आहे ते करण्यात आपण कमी पडलो आहोत असं दिसतंय. नारळीकर एकटे (आणि नेहरू तारांगण, इतर हौशी लोकांच्या संस्थाही) कमी पडले. नाही तर "उपयोग काय?" असे प्रश्न पडले नसते. आयुकात एखाद्या शुक्रवारी किंवा आयुकाच्या समोरचा रस्ता ओलांडला तर 'एन.सी.आर.ए.' आहे, तिथे 'विज्ञान दिना'ला जाऊन पहा. लोकांना किती कुतूहल असतं ते दिसेल.
नाहीतर मोठमोठी मंदिरं आणि चर्चेसतरी का बांधतात? (सुंदर बांधकामाला माझा व्यक्तिशः विरोध नाही, मला आवडतातच.) देव काय तिथे मंदिरांत आणि चर्चमधे असतो का?

२. वेद, बायबल, इतर धर्मग्रंथ लिहीणार्‍यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास, आज सामान्य हौशी अभ्यासकाचा असतो तेवढाही नसेल. तरीही ते लोकं विश्व कसं आहे, कसं तयार झालं वगैरेंच्या गप्पा मारतात. एवढंच नाही लोकं त्या भूलथापांना बळी पडतात. या लोकांनी खोटंनाटं बोलून लोकांना फसवू नये म्हणून तरी खगोलशास्त्राच नाही तर विज्ञानाच्या सर्व शाखांमधे संशोधन होत राहिलं पाहिजे. होत राहिला पाहिजे. आपण कोण, काय, कसे या प्रश्नांची उत्तरं कोणत्यातरी दोन हजार वर्ष जुन्या ग्रंथात लिहीली आहेत म्हणून प्रमाण मानली जाऊ नयेत. अभ्यास करून ही उत्तरं आपण मिळवावीत, रिफाईन करत रहावीत.

सध्या आयुका गुरूत्वाकर्षणासंबंधी प्रयोगांमधे भाग घेते आहे. ग्रॅव्हीटॉन्स शोधणे हे या प्रयोगाचं एक काम आहे. सायफाय मालिका, चित्रपट बघणार्‍यांना ग्रॅव्हीटॉन्सचं महत्त्व वेगळं सांगण्याची आवश्यकता नसावी.

काही तपशीलातल्या सुधारणा:
चंद्र, मंगळावर यानं पाठवणं हा अभ्यास खगोलशास्त्र, खगोलभौतिकीत मोडत नाही. चंद्र आणि मंगळाचा अभ्यास खगोलशास्त्रांतर्गत होतो. यानं पाठवणं हे एरोनॉटीक्सच्या भागात येतं.
आपल्यापासून सर्वात जवळ असणारी दीर्घिका (galaxy) २२ लाख प्रकाशवर्ष लांब आहे, ५०० नाही. पण तारे कसे जन्माला येतात, मरतात याचा अभ्यास आपण आपल्या दीर्घिकेतच करू शकतो. आपल्यापासून ६५ प्रकाशवर्ष अंतरावर रोहिणी नावाचा तारा आहे आणि तो मृत्युपंथाला लागलेला आहे.
बहुदा २००६-०७ च्या सुमारास नारळीकर आयुकाचे डायरेक्टर नव्हते, ते तोपर्यंत सेवानिवृत्त झाले होते.

अशा संशोधनसंस्थांमधे नोकरी करा किंवा तिथे नोकरी करणार्‍यांना मित्र बनवा. मग दुष्काळी परिस्थितीत गवताला पाणी घालण्यावरून कोण तक्रारी करतं आणि कोण नाही याचेही तपशील समजतील. ती वेगळीच गंमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मागणी तसा पुरवठा. मग मागणी कसलीही का असेना!

ही मागणी कृत्रिमपणे वाढवलेली आहे असे वाटत नाही का? उद्या समजा सरकारने आदेश काढला की प्रत्येक सरकारी कार्यालयात दररोज सकाळी पूजा व्हावी तर भटजींची आणि अर्थातच वेदपाठशाळांची मागणी वाढेल.आणि मग अशा वेदपाठशाळा "मागणी तसा पुरवठा" हे कारण देतीलच की.पण या वेदपाठशाळांची (आणि २२ लाख प्रकाशवर्षे असलेल्या आकाशगंगेत काय चालते यावर पैसा खर्च करायची) मुळात गरज आहे का हा प्रश्न आहे.

हे कार्यक्रम बघून प्राथमिक शाळांमधल्या मुलांना ब्लॅक होल म्हणजे काय ते समजून घ्यायचं असतं आणि अ‍ॅस्ट्रनॉमर किंवा अ‍ॅस्ट्रनॉट बनायचं असतं.

लहानपणी मलाही पायलट नाहीतर रेल्वे इंजिन ड्रायव्हर व्हायचे होते.सगळीच लहान मुले अशी कोणती तरी स्वप्ने बघत असतात आणि मोठे झाल्यानंतर त्यांना परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर ही स्वप्ने विरतात.तेव्हा हे कार्यक्रम बघून नक्की कोणती कायमस्वरूपी इनसाईट या मुलांना मिळते?

वेद, बायबल, इतर धर्मग्रंथ लिहीणार्‍यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास, आज सामान्य हौशी अभ्यासकाचा असतो तेवढाही नसेल. तरीही ते लोकं विश्व कसं आहे, कसं तयार झालं वगैरेंच्या गप्पा मारतात.

याच्यासाठी नक्की खगोलशास्त्राचा अभ्यास करून काय वेगळा फरक पडेल?कोणत्याही शास्त्रात कोणतेही रिसर्च पेपर आले तरी ते पेपरमध्ये काहीतरी लिहिले म्हणून ते नक्कीच प्रमाण मानत नाहीत.असा शास्त्रीय दृष्टीकोन सर्वांमध्ये यायलाच हवा आणि तो गणित्/भौतिकशास्त्र/ इंजिनिअरींग आदी उपयोगी शास्त्रांचा अभ्यास करूनही येईलच की.२२ लाख प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगेत काय चालले आहे यावर वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा पवन-उर्जा/ सौर उर्जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल, जमीनीची उत्पादन क्षमता कशी वाढेल, पाणी कॉन्झर्व्ह करायचे वेगळे मार्ग शोधणे इत्यादींवर पैसा आणि वेळ खर्च करणे अधिक उपयुक्त नाही का?

सध्या इतकेच पुरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही मागणी कृत्रिमपणे वाढवलेली आहे असे वाटत नाही का?

नाही. फार फार मागे जायचं तर दिवस-रात्र कसे होतात, चंद्राच्या कला का दिसतात, भरती-ओहोटी का होते या सगळ्याचा अभ्यास सुरू झाला. ती खगोलशास्त्राच्या अभ्यासाची सुरूवात होती. दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात बघायचं तर नावाजलेले अनेक तत्त्ववेत्ते विश्व कसं आहे, काय आहे, का आहे याचा विचार करायचे. आपण कोण आहोत, कसे आहोत याचा विचार करताना विश्वाबद्दलही असेच प्रश्न पडतात. हा विचार/अभ्यास निरुपयोगी आहे असं वाटत असेल तर तिथे चर्चा करण्यात अर्थ नाही.
म्हणायचं तर 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' अशी जाहिरात करून अंड्यांची मागणी कृत्रिमरित्या वाढवली जाते किंवा रोखीने व्यवहार होतच होते की, "some things in your life are priceless, for everything else there is mastercard" असं म्हणून प्लास्टीक मनीची मागणी कृत्रिमरित्या वाढवली जाते; पोलिओ होऊन सगळ्यांचा जीव जात नाही, पण सक्तीने पाच वर्ष मुलांना एकच लस देऊन पोलिओच्या लशीची मागणी कृत्रिमरित्या वाढवली जाते असे आरोप होत नाहीत. मग संशोधनाची मागणी कृत्रिमरित्या वाढवलेली आहे असं का?

हे कार्यक्रम बघून नक्की कोणती कायमस्वरूपी इनसाईट या मुलांना मिळते?

अगदी सोपी उत्तरं द्यायची तर १. जगाच्या पसार्‍यात आपण अतिशय सूक्ष्म आणि क्षुद्र आहोत. २. माणसाला प्रश्न पडतात, ते इतरांना विचारावेत. उत्तरं माहित असतील तर मिळतात. माहित नसतील तर ती का माहित नाहीत, कुठे गाडी अडली आहे या विचारांतून संशोधन पुढे जातं. ३. देवाने विश्व वगैरे काही निर्माण केलेलं नाही. ते कसं निर्माण झालं याचा शोध माणसाने काही प्रमाणात लावला आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत.

कोणत्याही शास्त्रात कोणतेही रिसर्च पेपर आले तरी ते पेपरमध्ये काहीतरी लिहिले म्हणून ते नक्कीच प्रमाण मानत नाहीत.

हे मात्र माझ्या आकलनापलिकडचं आणि माहितीबाहेरचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे रेफरीड रीसर्च पेपर्समधे जे छापून येतं ते प्रमाण मानलं जातं. त्यावर शंकाही घेतल्या जातात. जेव्हा शंका असतात, तेव्हा त्या व्यक्त होतात, त्या शंका फिटवण्यासाठी त्यावर काम होतं आणि शंका योग्य होती का मूळ संशोधन योग्य होतं का दोन्हीपेक्षा तिसरंच काहीतरी उत्तर आहे याचा विचार होतो.
पण रीसर्च पेपर्समधे छापून येतं ते सगळं किंवा बरचसं बकवासच असतं आणि त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, प्रमाण मानत नाही असं म्हणण्यामागचं रॅशनेल मला समजलेलं नाही.

अन्न, पाणी, निवारा, ऊर्जा यांचे प्रश्न बिनमहत्त्वाचे असं कोणीही म्हणत नाही. हे प्रश्न सोडवले गेलेच पाहिजेत. माणसांचं आयुष्य पशूंच्या आयुष्यापेक्षा वेगळं असतं, पशूंसारखं दोन वेळचं खाणं आणि पुनरुत्पादनाची, पुढच्या पिढीच्या जगण्याची चिंता यात संपू नये. काही लोकांचे हे प्रश्न सुटलेले नाहीत म्हणून इतरांनी त्या प्रश्नांचा विचारच करू नये हे काय आहे? अनेकांना दोन वेळचं खायला मिळत नाही आणि तुम्ही पोटभर कसे काय जेवता, फोन, कंप्यूटर, इंटरनेट या चैनींवर पैसे कसे काय खर्च करता? अनेक मुलींना मर्जीविरोधात वेश्याव्यवसायात ओढलं जातं, अनेकींवर दिवसाढवळ्या बलात्कार होतात म्हणून इतरांनी लैंगिक सुखाचा आनंदच कसा घेता? या प्रश्नांची जी उत्तरं आहेत तीच उत्तरं शुद्ध विज्ञानाच्या संशोधनाबाबत दिली जातात.

अधिक माहिती:
तार्‍यांचा जन्म-मृत्यु यांचा अभ्यास शेजारच्या दीर्घिकेत बघून करण्याएवढ्या आपल्या दुर्बिणी मोठ्या नाहीत. इतर दीर्घिकांकडे बघून विश्वरचनाशास्त्राचा अभ्यास होतो, तार्‍यांच्या भौतिकशास्त्राचा अभ्यास आपल्या दीर्घिकेकडे बघूनच होतो. विश्वरचनाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तिथे यान पाठवण्याची काहीही गरज नाही. आत्ता जी यानं सौरमालेबाहेर गेलेली आहेत ती आपल्या दीर्घिकेतच रहातील (आणि बहुदा दीर्घिकेतच संपतील). त्यांच्याकडून जेवढी माहिती येणं अपेक्षित होतं, सौरमालेतल्या ग्रहांची छायाचित्रं, वर्णपट, सौरमालेच्या टोकाची रचना, बाऊंडरी इ. ती आलेली आहे. आता ती वहानं (पायोनियर, व्हॉयेजर) पृथ्वी किंवा सौरमालेची दूत म्हणून बाहेरच्या अवकाशात, आपल्या दीर्घिकेत गेलेली आहेत. परग्रहांवर काही जीवसृष्टी असेल तर तो आपल्याकडून केला गेलेला, आपल्या माहितीच्या पट्ट्या वगैरे असणारा पहिला संपर्क असेल. ही वहानं जवळच्या ज्या तार्‍यांभोवती जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता आहे (असं तेव्हा वाटत होतं) त्या दिशेला सोडलेली आहेत. हे सगळे तारे सूर्याचे शेजारी आहेत, आकाशगंगेच्या शेजारणींमधली कुटुंब नाहीत. या यानांना सौरमाला ओलांडण्यासाठीच २०-३०-४० वर्ष लागतात.

एकेकाळी अमेरिकेतून अटलांटिक ओलांडून युरोपमधे विमानाने पोहोचणं हे धाडसाचं काम होतं. अशी विमानं बनवणं हा वेडगळपणा समजला गेला होता. कोणीतरी हा वेडपटपणा केला तेव्हा त्याला न्यूयॉर्क-लंडन किंवा न्यूयॉर्क-पॅरिस हे अंतर साडेतीन तासांत पार करणारी काँकोर्ड विमानं येतील हे स्वप्नच वाटत असणार. भारतीय खगोलशास्त्रज्ञ खरंच स्वप्न दाखवण्यात कमी पडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे मात्र माझ्या आकलनापलिकडचं आणि माहितीबाहेरचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे रेफरीड रीसर्च पेपर्समधे जे छापून येतं ते प्रमाण मानलं जातं. त्यावर शंकाही घेतल्या जातात. जेव्हा शंका असतात, तेव्हा त्या व्यक्त होतात, त्या शंका फिटवण्यासाठी त्यावर काम होतं आणि शंका योग्य होती का मूळ संशोधन योग्य होतं का दोन्हीपेक्षा तिसरंच काहीतरी उत्तर आहे याचा विचार होतो.
पण रीसर्च पेपर्समधे छापून येतं ते सगळं किंवा बरचसं बकवासच असतं आणि त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, प्रमाण मानत नाही असं म्हणण्यामागचं रॅशनेल मला समजलेलं नाही.

रिसर्च पेपरमधले सगळे बकवास असते असे मला अजिबात म्हणायचे नाही.मी गणितात एम.एस.सी केले आहे आणि माझेही काही कॉन्फरन्स पेपर आहेत आणि एकूण प्रोसेस कशी असते हे मलाही माहित आहे. कार्बन नॅनोट्यूबच्या कायरॅलिटीप्रमाणे त्या मेटॅलिक्/नॉन मेटॅलिक असू शकतात.सुरवातीच्या काळात समजा कोणी कार्बन नॅनोट्यूब मेटॅलिक असतात असे काही कायरॅलिटीसाठी निरीक्षण नोंदवले तर ते युनिव्हरसल अनुमान होत नाही.कारण नक्की कोणत्या परिस्थितीत त्या मेटॅलिक/नॉन मेटॅलिक असतात हे पडताळून बघायला हवे.त्या अर्थी रिसर्च पेपरमध्ये काही लिहिले त्याला अशा प्रकारच्या पडताळणीला सामोरे जावेच लागते. त्या अर्थी रिसर्च पेपरमधले प्रमाण नाही असे म्हटले.

माझा शाळेतला एक मित्र आहे. त्याने हवामानशास्त्रात पी.एच.डी करून फ्लोरिडात हवामानखात्यात नोकरी धरली आहे.फ्लोरिडा हे राज्य वादळांना प्रोन असल्यामुळे तिथे हवामानखात्याला बरेच महत्व आहे.त्याचा ज्योतिषावर गाढा विश्वास आहे.एकदा मी त्याला त्याच्या पुणे भेटीदरम्यान विचारले तेव्हा त्याने एका राऊंड अबाऊट वे ने उत्तर दिले.२००५ मध्ये अमेरिकेत कॅट्रीना आणि रिटा या वादळांनी धुमाकूळ घातला होता.२००६ च्या मे महिन्यात (वादळांचा सिझन सुरू व्हायच्या आधी) एकाने २००६ मध्ये अशीच वादळे येणार असे काहीतरी गणिती मॉडेलवरून म्हटले होते आणि तो पेपर हवामान शास्त्रातील एका आघाडीच्या जर्नलमध्ये छापून आला होता.प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.यावर माझा मित्र म्हणाला की ते शेवटी एक मॉडेल होते आणि मॉडेल कितपत बरोबर आहे यावरून त्यावरून काढलेली अनुमाने कितपत बरोबर आहेत हे ठरेल.यावर माझ्या मित्राचे पुढचे वाक्य--"ज्योतिषही असे एक मॉडेलच आहे आणि असे मॉडेल फिट करणारा माणूस किती योग्य प्रकारे फिट करतो त्यावरून अनुमाने बरोबर आहेत की नाही हे ठरेल".मी म्हणून ज्योतिषावर विश्वास ठेवतो आहे असे नक्की नाही.पण समजा २००६ मध्ये जर असा पेपर बघून तो केवळ रिसर्च जर्नलमध्ये आला म्हणून प्रमाण मानला असता तर ते नक्कीच योग्य नाही.कशावरून त्या माणसाची गृहितके बरोबर आहेत/ कशावरून तो अ‍ॅप्रोच बरोबर आहे हा अ‍ॅनॅलिसिस व्हायला नको का?

एकेकाळी अमेरिकेतून अटलांटिक ओलांडून युरोपमधे विमानाने पोहोचणं हे धाडसाचं काम होतं. अशी विमानं बनवणं हा वेडगळपणा समजला गेला होता. कोणीतरी हा वेडपटपणा केला तेव्हा त्याला न्यूयॉर्क-लंडन किंवा न्यूयॉर्क-पॅरिस हे अंतर साडेतीन तासांत पार करणारी काँकोर्ड विमानं येतील हे स्वप्नच वाटत असणार.

हे उदाहरण तितकेसे योग्य नाही असे वाटते.त्यावेळी ही बोटी युरोप-अमेरिका प्रवास करणार्या बोटी होत्याच ना?म्हणजे अमेरिकेतून युरोपात जाणे अशक्यच आहे अशी परिस्थिती नव्हती.इथे आपण गोष्ट करत आहोत २२ लाख प्रकाशवर्षांची.आपली याने अजून १ प्रकाशवर्ष तरी दूर गेली आहेत का?मोठी स्वप्ने जरूर बघावीत आणी बघितलीच पाहिजेत. ज्या दिवशी मोठी स्वप्ने बघायचे बंद होईल त्या दिवशी तो समाज मृत्यूपंथाला लागला असे समजावे.पण अशी स्वप्ने बघताना एक समाज म्हणून स्टेपवाईज जाणे हे पण महत्वाचे नाही का?माणूस गुहेत असताना तो न्यू-यॉर्क ते लंडन साडेतीन तासात जायची गोष्ट करत नव्हता. गुहेतून बाहेर आल्यावर शेती, मग घरे, इतर प्रगती आणि मग असे अंतर साडे-तीन तासात पार करायची गोष्ट सुरू झाली.इथे आपण पुण्यापासून २२ किलोमीटर असलेल्या गावांमध्ये नीट पाणी देऊ शकलेलो नाही मग कशाला २२ लाख प्रकाशवर्षे दूर असलेल्या गोष्टींचा विचार करायचा (आताच)?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खगोलशास्त्राच्या प्रत्यक्ष उपयोजनाचे एक उदाहरण.

टायको ब्राहे हा हाडाचा अवकाश निरीक्षक होता. त्याची निरीक्षणे वापरून योहान केपलरने आपले ग्रहांचे गतिविषयक नियम मांडले. आपला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडण्यासाठी न्युटनला केपलरच्या नियमांचा भरपूरच उपयोग झाला. आता गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताशिवाय काय काय अडले असते हे वेगळे सांगायची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यूट्रॉन प्रयोगशाळेत शोधला जाण्याआधी सुब्रमण्यम चंद्रशेखरने अशा कणांचं अस्तित्व असेल असं सुचवलं होतं. तेव्हा त्याला वेड्यात काढलं. पण अशी शक्यता त्याने तार्‍यांच्या मृत्युचा अभ्यास करून नोंदवली. आणि अनेक दशकांनी याच संशोधनाबद्दल चंद्रशेखरना नोबेल पुरस्कार मिळाला.

सध्या रेडीओ खगोलशास्त्रज्ञ एक प्रचंड मोठा टेलिस्कोप बांधण्याचा विचार करत आहेत. त्यांच्यासमोर जी अनेक आव्हानं आहेत त्यातलं एक आहे डेटा प्रोसेसिंग स्पीडचं. इंटेलला हे काम देऊन ते इतर गोष्टींवर काम करत आहेत. एवढा डेटा-फ्लो, प्रोसेसिंगची डिमांड (निदान गेल्या दोन वर्षांपर्यंत) इतर कोणीही केलेली नव्हती. हे तंत्रज्ञान तयार होईल तेव्हा त्याचे अनेक उपयोग करणारे तयार होण्याची शक्यताच अधिक.
जसं पहिला सीसीडी कॅमेरा बनवणार्‍याला हा प्रकार निरुपयोगी वाटला होता. आता आपण एक छोटा , २-३ मेगापिक्सलचा का होईना, कॅमेरा खिसा/पर्समधे बाळगतो आणि मुबलक प्रमाणात वापरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

न्यूट्रॉन प्रयोगशाळेत शोधला जाण्याआधी सुब्रमण्यम चंद्रशेखरने अशा कणांचं अस्तित्व असेल असं सुचवलं होतं.

थोडी गफलत होत आहे का? माझ्या माहितीप्रमाणे न्यूट्रॉन १९३२ मध्येच चॅडविकने शोधला होता.तुम्ही म्हणता ती चंद्रशेखर लिमिट म्हणजेच श्वेतवामनमूर्ती तार्याच्या वस्तुमानाची अपर लिमिट आणि या लिमिटचा शोध लावला म्हणून त्यांची भरपूर थट्टा झाली होती.

ती लिमिट जी काही असेल ती असेल पण मला जेव्हा समाजातील ५०-६०% लहान मुलांची वजने कुपोषणामुळे पाहिजे त्या "लोअर लिमिट" पेक्षाही खाली असतील हे दिसते तेव्हा सरकारने तार्यांच्या वस्तुमानाकडे लक्ष देण्यापेक्षा एक पॉलिसी म्हणून या मुलांच्या वस्तुमानाकडे लक्ष द्यावे असे जरूर वाटते.आता यावर असा मुद्दा उभा केला जाईल की तसाच संरक्षणावरील खर्चही व्यर्थच आहे. पण संरक्षणावर खर्च केला नाही तर देश म्हणून आपले भवितव्यच धोक्यात येईल तसा कोणताही परिणाम २२ लाख प्रकाशवर्षे दूर असलेली एखादी गोष्ट माहित झाली नाही तरी होणार नाही हे नक्की.तेव्हा तार्यांची वजने कोणी तपासावीत्?ज्यांच्याकडे हे सगळे करायला पुरेसा पैसा आहे त्यांनी.भारतासारख्या देशाला हे पांढरे हत्ती परवडायचे कसे? यावर म्हणणारे म्हणतील की राजीव गांधींनी संगणक आणि फोन आणले तेव्हाही असेच म्हटले गेले होते.पण १९८० च्या दशकात जेव्हा संगणक आणि फोन आणले गेले तेव्हा इतर देशांमध्ये या गोष्टींची उपयुक्तता आधीच पडताळून बघितली गेली होती.आणि तिथे उपयोग झाला तसाच आपल्याकडेही व्हावा म्हणून राजीव गांधींनी फोन आणि संगणक आणले. तशी कोणतीही गोष्ट या २२ लाख प्रकाशवर्षे दूर असलेल्या गोष्टींची माहिती होऊन नजिकच्या काळात तरी होईल असे वाटत नाही. शास्त्राची प्रगती अशीच होते,या माहितीचा उपयोग करून भविष्यात काहीतरी अ‍ॅप्लिकेशन निर्माण होईल वगैरे म्हणणे ठिक आहे.पण जर आज सरकारी शाळांमध्ये ५ वी पास झालेल्या मुलांना जेमतेम ४ वाक्ये कशीबशी लिहिता येतात अशी परिस्थिती असेल (यात जराही अतिशयोक्ती नाही. विश्वास बसत नसल्यास जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जाऊन खात्री करावी अशी नम्र विनंती) तर प्रायोरिटी कशाला द्यायला हवी?हे शिक्षण/आरोग्यव्यवस्था इत्यादी सुधारायला की भविष्यात कधीतरी (नक्की कधी हे माहित नाही) काहीतरी (नक्की काय हे पण माहित नाही) उपयोग होईल अशा अनिश्चित गोष्टीला?

एक सुब्रमण्यम चंद्रशेखर झाले त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.पण अशा एका चंद्रशेखरच्या मागे दुर्बीणी घेऊन काहीतरी निरीक्षणे करत राहिले आणि "भविष्यात काहीतरी घडेल" या भावनेतून स्वतःला कृतार्थ समजणारे पण या निरीक्षणांचा समाजाला सध्या काहीही उपयोग नसलेले शेकडो/हजारो लोक असतील. अशा शेकडो/हजारो लोकांवर पैसा व्यर्थ खर्च केला जातो (ज्याप्रमाणे मंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर खर्च केला जातो) तोच पैसा जर योग्य प्रकारे शिक्षण आणि आरोग्यसेवा यावर आणि रिसर्चवरच करायचा असेल तर एनर्जी सिक्युरिटी,जमिनीची धारणक्षमता वाढवणे अशांवर खर्च केला तर त्याचे परिणाम लगेच दिसून येतील.

म्हणायचं तर 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' अशी जाहिरात करून अंड्यांची मागणी कृत्रिमरित्या वाढवली जाते

खाजगी कंपन्या नेहमीच अशी जाहिरात करून मागणी वाढवतात आणि स्वतःचे खिसे भरतात.माझा मुद्दा इथे सरकारविषयी आहे.आणि पोलिओ होऊन मुले मरत नाहीत पण त्यांना आयुष्यभर व्यंग येते म्हणजे कुठलेतरी नुकसान होतेच.तेव्हा पोलिओचे उदाहरण इथे लागू नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी स्वतः एका अत्यंत प्रॅक्टिकल अशा क्षेत्रात कामाला असल्यामुळे मला असे प्रश्न कोणी विचारत नाही आणि माझे क्षेत्र रेलेव्हन्ट कसे आहे याचे समर्थनही मला करावे लागत नाही Smile असो जोक्स अपार्ट एके काळी मलाही खगोलशास्त्राची आवड होती.पण नंतरच्या काळात या विषयाशी संपर्क तुटला या कारणाने म्हणा की अन्य कोणत्या कारणाने म्हणा ती आवड कमी झाली.बी-स्कूलमध्ये असताना स्ट्रॅटेजी हा एक महत्वाचा विषय आम्हाला होता.त्याचे मुख्य तत्व म्हणजे कोणतीही कंपनी सगळ्या गोष्टी करू शकत नाही तेव्हा नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात हे ठरवायला हवे.हेच तत्व प्रत्येक व्यक्तीलाही लागू पडते.आपण सगळ्या विषयांमधील ज्ञान घेऊ शकत नाही तेव्हा आपली आवड आणि नैसर्गिक कल (जो आपल्यालाच माहित असतो) लक्षात घेता आपल्याला नक्की काय करायचे आहे हे ठरवायला हवे.आपण जेव्हा एखादी गोष्ट करायचे ठरवतो तेव्हाच इतर कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे नाही हे पण आपोआप ठरविले जाते.तेव्हा माझ्यासाठी करायच्या गोष्टी म्हणजे अर्थशास्त्र आणि फायनान्स.आणि ज्या गोष्टींवर थोडे लक्ष केंद्रित करायचे अशा गोष्टी म्हणजे राजकारण आणि इतिहास.विरंगुळा म्हणून मधूनमधून गाणी ऐकणे हे पण आलेच.पण बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी नाहीत (किंवा मी त्या गोष्टींसाठी नाही).अर्थातच खगोलशास्त्र माझ्यासाठी नाही Smile असो.

खगोलशास्त्र माझ्यासाठी नसले तरी काही प्रश्न नक्कीच पडतात.वर चर्चेत आणि प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे एखादी गोष्ट आज केली जात आहे त्या गोष्टीचे परिणाम लगेच समोर दिसत नाहीत.(ही गोष्ट विशेषत्वाने खगोलशास्त्राला लागू पडेल).कदाचित ते आपल्या जीवनकाळात दिसणारही नाहीत.अशा परिस्थितीत measurable key deliverables नक्की कोणते? म्हणजेच एखाद्या माणसाने केलेल्या कामाचे मूल्यमापन कोणत्या मापदंडावर करावे?पेपर किती लिहिले हा? माझीच गोष्ट सांगायची तर मी एक नंबरचा बथ्थड पी.एच.डी विद्यार्थी होतो आणि पी.एच.डी मला झेपली नव्हती.त्या कालावधीत मी काहीतरी हातपाय मारून एक सुमार दर्जाचा पेपर पाडला होता.तो पेपर ज्या जर्नलकडे पाठवला होता त्यांनी नाकारला.मग माझ्या प्राध्यापकांनी सांगितले की आपण तोच पेपर आणखी एका जर्नलमध्ये छापून आणू कारण त्या जर्नलचे चीफ एडिटर म्हणजे माझ्या प्राध्यापकांचा मित्र होता.असे करून माझा पेपर छापून आलाही.हा प्रकार म्हणजे "you scratch my back and I will scratch yours" असा प्रकार झाला.असे प्रकार कितपत चालतात याची कल्पना नाही पण थोडे तरी चालत असावेत.आणि दुसरे म्हणजे नुसते पेपर छापणे हा मापदंड की त्या पेपरला किती सायटेशन आली आणि त्यातही उपयुक्त सायटेशन किती (म्हणजे त्या पेपरमध्ये लिहिलेल्या मुद्द्याचा वापर किती जणांना त्यांच्या रिसर्चमध्ये झाला) अशा प्रकारचे विश्लेषण केले जाते का? (माझ्या पेपरलाही आज ३ सायटेशन आहेत पण ती सायटेशन म्हणजे क्लिंटन एट ऑल नी अमुक अमुक मुद्द्यावर रिसर्च केला अशा स्वरूपाची आहेत.पण त्याला फारसा अर्थ नाही).

माझ्या मते असे मापदंड असणे खूप गरजेचे आहे.कारण अशा मापदंडातूनच एखादा मनुष्य चांगले/वाईट काम करत आहे का हे कळेल आणि मग चांगले काम करत असलेल्याला प्रोत्साहन आणि वाईट काम करत असलेल्याला काहीतरी समज इत्यादी देता येईल.अन्यथा व.पु.काळ्यांच्या 'स्टॅटिस्टिक मराठे' प्रमाणे ५०० वर्षांनी मानवजातीच्या इतिहासावर एखादा कोष लिहिला जाईल तेव्हा माझ्या कामाचा खरा उपयोग कळेल असे म्हणणारे लोक वाढतील!!प्रत्यक्षात ५०० वर्षांनी मी पण नसणार आणि समोरचाही नसणार.मग आज काहीही करा त्याचा जाब विचारावा तो नक्की कोणत्या मुद्द्यावर आणि असा जाब विचारता आला नाही तर काहीही करा काय फरक पडतो अशी मनोवृती वाढणार नाही का?

आणि दुसरे म्हणजे असे मापदंड नसतील आणि वरीष्ठांना खूष ठेवणे यापेक्षा वेगळे परिणाम समोर दिसत नसतील तर त्या कामात मोटिव्हेशन लेव्हल कशी टिकून राहते?वरीष्ठांना खूष ठेवणे हा कोणत्याही नोकरीचा भाग झालाच.पण त्या व्यतिरिक्त माझ्या कामात मी समजा एखादे लोन प्रपोजल क्लोज करायला हातभार लावला असेल तर तो प्रकल्प सुरू झाल्यावर मला दिसेल/ कधीतरी प्लॅन्ट व्हिजिट असते त्यात आमच्या बँकेने दिलेले पैसे योग्य पध्दतीने वापरले जात आहेत का वगैरे समजते.तेव्हा मी केलेल्या कामाचा काहीतरी परिणाम समोर दिसतो.तीच गोष्ट मी विकांताला शिकवायला जातो तिथली.विद्यार्थ्यांच्या बॉडी लॅन्ग्वेजवरून एखादी गोष्ट त्यांना समजली आहे की नाही हे लगेच कळते.पण इथे आपण जे काम करत आहोत त्याचा दृष्य परिणाम कोणत्याच प्रकारे समोर आला नाही तरी मोटिव्हेशन कसे टिकून राहते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

खगोलशास्त्र माझ्यासाठी नसले तरी काही प्रश्न नक्कीच पडतात.वर चर्चेत आणि प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे एखादी गोष्ट आज केली जात आहे त्या गोष्टीचे परिणाम लगेच समोर दिसत नाहीत.(ही गोष्ट विशेषत्वाने खगोलशास्त्राला लागू पडेल).कदाचित ते आपल्या जीवनकाळात दिसणारही नाहीत.अशा परिस्थितीत measurable key deliverables नक्की कोणते? म्हणजेच एखाद्या माणसाने केलेल्या कामाचे मूल्यमापन कोणत्या मापदंडावर करावे?

मेजरेबल की डिलिव्हरेबल्स म्हणजे नक्की काय काम केले आहे ते, त्याचा पुढे कोणी कसा वापर केला ते. आयदर बाय इट्सेल्फ अथवा त्याचा वापर करून जे पुढे येईल ते.पण हा प्रकारदेखील जरा ट्रिकी आणि असिम्प्टोटिक आहे.

आणि दुसरे म्हणजे असे मापदंड नसतील आणि वरीष्ठांना खूष ठेवणे यापेक्षा वेगळे परिणाम समोर दिसत नसतील तर त्या कामात मोटिव्हेशन लेव्हल कशी टिकून राहते?वरीष्ठांना खूष ठेवणे हा कोणत्याही नोकरीचा भाग झालाच.पण त्या व्यतिरिक्त माझ्या कामात मी समजा एखादे लोन प्रपोजल क्लोज करायला हातभार लावला असेल तर तो प्रकल्प सुरू झाल्यावर मला दिसेल/ कधीतरी प्लॅन्ट व्हिजिट असते त्यात आमच्या बँकेने दिलेले पैसे योग्य पध्दतीने वापरले जात आहेत का वगैरे समजते.तेव्हा मी केलेल्या कामाचा काहीतरी परिणाम समोर दिसतो.तीच गोष्ट मी विकांताला शिकवायला जातो तिथली.विद्यार्थ्यांच्या बॉडी लॅन्ग्वेजवरून एखादी गोष्ट त्यांना समजली आहे की नाही हे लगेच कळते.पण इथे आपण जे काम करत आहोत त्याचा दृष्य परिणाम कोणत्याच प्रकारे समोर आला नाही तरी मोटिव्हेशन कसे टिकून राहते?

मोटिव्हेशन टिकून राहते ते बर्‍याच अंशी निव्वळ प्रखर ज्ञानलालसेपायी असे मला तरी वाटते. रामानुजन, ग्रेगरी पेरेलमन, हार्डी, इ.इ. अनेक उदाहरणे देता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेजरेबल की डिलिव्हरेबल्स म्हणजे नक्की काय काम केले आहे ते, त्याचा पुढे कोणी कसा वापर केला ते. आयदर बाय इट्सेल्फ अथवा त्याचा वापर करून जे पुढे येईल ते.पण हा प्रकारदेखील जरा ट्रिकी आणि असिम्प्टोटिक आहे.

+१. रिसर्चमध्ये इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च असेल तर नक्की कोणत्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे हे माहित असते.तेव्हा हे उत्तर कितपत समाधानकारक पध्दतीने दिले यावरून संबंधित मनुष्य कसे काम करत आहे याविषयी काहीतरी समजू शकेल.पण जेव्हा "भविष्यात कधीतरी उभ्या राहू शकत असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर" म्हणून कोणी माहिती गोळा केली आहे त्याच्या कामाविषयीचे मापदंड कसे ठरवावेत?कारण अशी गोळा केलेली कोणतीही माहिती जोपर्यंत उपयोगी पडत नाही तोपर्यंत चांगली म्हणता येणार नाही आणि आता उपयोगी पडत नाही म्हणजे भविष्यात उपयोगी पडणारच नाही असेही नाही.तेव्हा हे क्षेत्र महत्वाचे आहे की नाही, इतर गंभीर समस्या असताना भारताने यावर पैसे खर्च करावे की नाही इत्यादी मुद्दे सध्या बाजूला ठेऊ या.पण ज्या काही संशोधनाच्या सुविधा दिल्या जात आहेत त्या योग्य आणि पात्र व्यक्तींनाच दिल्या गेल्या पाहिजेत याविषयी दुमत नसावे.प्रश्न हा की योग्य आणि पात्र व्यक्ती या क्षेत्रात कशा ओळखाव्यात?

मोटिव्हेशन टिकून राहते ते बर्‍याच अंशी निव्वळ प्रखर ज्ञानलालसेपायी असे मला तरी वाटते. रामानुजन, ग्रेगरी पेरेलमन, हार्डी, इ.इ. अनेक उदाहरणे देता येतील.

या क्षेत्रात काम करत असलेले बहुसंख्य लोक रामानुजम इत्यादींप्रमाणे मोटीव्हेटेड असतात का?मला कल्पना नाही. आणि तसे असेल तर त्यांच्याविषयी आदरच आहे.

मी इंजिनिअरींग कॉलेजात असताना तिथे बघितलेला प्रकार सांगतो.काही जुने शिक्षक वगळता नव्या पिढीतल्या शिक्षकांपैकी फारसे कोणी शिक्षकी पेशाची आवड म्हणून तिथे आले होते असे वाटत नाही.यातील बरेचसे शिक्षक म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नोकरी मिळाली नाही, आय.टी कंपन्यांच्या "ओपन हाऊस" मध्ये नोकरी मिळाली नाही,गेट-कॅट जमली नाही की मग आमच्याच कॉलेजात एम.ई करा आणि लागा शिक्षक म्हणून असे होते असे म्हटले तरी त्यात चुकीचे ठरू नये.निदान मी कॉलेजात असताना तरी विद्यार्थ्यांचा फिडबॅक वगैरे गोष्टींना आमच्या कॉलेजात थारा नव्हता.अगदी भंकस शिकविणारे शिक्षकही पुढच्या वर्षी परत येतच असत.तेव्हा बाकी काही जमले नाही आणि कॉलेजातल्या शिक्षकी पेशात काही अकाऊंटेबिलिटी नाही म्हणून अशी मंडळी शिक्षक बनली अशा हौशा गौशांचा भरणा कॉलेजात झाला तसाच आयुकासारख्या ठिकाणी होऊ नये ही इच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

पण ज्या काही संशोधनाच्या सुविधा दिल्या जात आहेत त्या योग्य आणि पात्र व्यक्तींनाच दिल्या गेल्या पाहिजेत याविषयी दुमत नसावे.प्रश्न हा की योग्य आणि पात्र व्यक्ती या क्षेत्रात कशा ओळखाव्यात?

सहमत. पण हा प्रश्न लै अवघड आहे, मला याचे सरळ उत्तर दिसत नै. वरच्या प्रतिसादात सांगितलेला निकष हा उपयोगी (काही अंशी) पडू शकेल असे वाटते फक्त Smile

मी इंजिनिअरींग कॉलेजात असताना तिथे बघितलेला प्रकार सांगतो.काही जुने शिक्षक वगळता नव्या पिढीतल्या शिक्षकांपैकी फारसे कोणी शिक्षकी पेशाची आवड म्हणून तिथे आले होते असे वाटत नाही.यातील बरेचसे शिक्षक म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नोकरी मिळाली नाही, आय.टी कंपन्यांच्या "ओपन हाऊस" मध्ये नोकरी मिळाली नाही,गेट-कॅट जमली नाही की मग आमच्याच कॉलेजात एम.ई करा आणि लागा शिक्षक म्हणून असे होते असे म्हटले तरी त्यात चुकीचे ठरू नये.निदान मी कॉलेजात असताना तरी विद्यार्थ्यांचा फिडबॅक वगैरे गोष्टींना आमच्या कॉलेजात थारा नव्हता.अगदी भंकस शिकविणारे शिक्षकही पुढच्या वर्षी परत येतच असत.तेव्हा बाकी काही जमले नाही आणि कॉलेजातल्या शिक्षकी पेशात काही अकाऊंटेबिलिटी नाही म्हणून अशी मंडळी शिक्षक बनली अशा हौशा गौशांचा भरणा कॉलेजात झाला तसाच आयुकासारख्या ठिकाणी होऊ नये ही इच्छा.

पूर्ण सहमत. कुडंट अग्री मोर अधोरेखित वाक्याशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चंद्रशेखर यांचा शोधः

चंद्रशेखरने त्याच्या सैद्धांतिक संशोधनातून असं दाखवून दिलं की तार्‍याच्या केंद्रात एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा (१.४४ X सूर्याचं वस्तुमान) अधिक वस्तुमान असेल तर त्याचा गाभा फक्त इलेक्ट्रॉनच्या डिजनरसी प्रेशर*मुळे स्थिर राहू शकत नाही. तारा श्वेत बटू या अवस्थेत स्थिर राहू शकत नाही. या परिस्थितीत गुरूत्वाकर्षण वरचढ ठरेल आणि तार्‍याची पडझड सुरू राहील. त्या काळात प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्र येऊन न्यूट्रॉन बनू शकतो हे माहित नव्हतं. त्या काळात न्यूट्रॉनच माहित नव्हता, त्यामुळे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे नाहीत तर इतर काही म्हणजे काय असेल, गुरूत्वाकर्षण कसं रोखलं जाणार असे प्रश्न होते. इलेक्ट्रॉन डिजनरसी प्रेशर नाही तर मग 'जड' तार्‍यांचं पुढे काय होतं याचं उत्तर चंद्रशेखरकडे नसल्यामुळे त्याची थट्टा उडवली गेली. न्यूट्रॉनचा शोध लागल्यानंतर, सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४४ पटीपेक्षा अधिक वस्तुमान असणार्‍या तार्‍यांचा मृत्यु न्यूट्रॉन तार्‍यात होत असेल ही शक्यता पुढे आली.
दुसर्‍या पद्धतीने विचार करता, इलेक्ट्रॉन अणूकेंद्रकापासून लांब राहू शकत नाहीत हे चंद्रशेखरने सिद्ध केलं होतंच. त्याने न्यूट्रॉन बनू शकतात असा उल्लेख त्याने प्रत्यक्षात केला नसावा, पण अशा प्रकारची काही प्रक्रिया होऊ शकते याची कल्पना त्याच्या मुख्य संशोधनातून येते.

शिक्षकी पेशात काही अकाऊंटेबिलिटी नाही म्हणून अशी मंडळी शिक्षक बनली अशा हौशा गौशांचा भरणा कॉलेजात झाला तसाच आयुकासारख्या ठिकाणी होऊ नये ही इच्छा.

आयुका आणि अशा इतर संस्थांमधे पीएच.डी. साठी जी प्रवेशपरीक्षा असते त्याची तयारी करणार्‍या लोकांना या बाबतीत विचारल्यास अधिक वस्तुनिष्ठ माहिती मिळू शकेल. भरणा होताना जे निकष ठरवले जातात त्यावर अनेकांचा आक्षेप असेल, पण हौशा-गवशांचा भरणा होतो असं आयुकाच्या समोर, रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असणार्‍या खगोलभौतिकी संस्थेत काम करणारेही म्हणणार नाहीत.

पुन्हा एकदा:
२२ लाख प्रकाशवर्ष दूर असणार्‍या दीर्घिकेत सोडाच, आकाशगंगेच्या उपदीर्घिकां**मधेही अवकाशयान (मानव, सजीव असणारं किंवा नसणारं) पाठवण्याबद्दल आज फिक्शनबाहेर कोणीही बोलत असेल तर ते मला माहित नाही. सजीव किंवा मानवांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधे पाठवण्याचे प्रयोग आजघडीला जोरात आहेत. हे ISS आपल्यापासून ~ ४२५ किमी एवढ्या अंतरावर आहे, अगदी सर्वात जवळच्या खगोलीय वस्तूच्या, चंद्राच्या, अंतराशी तुलना करता ISS हे सुद्धा जवळजवळ पृथ्वीवरच आहे असंही म्हणायला हरकत नाही. (हे प्रयोग का करता, त्यातून काय शिकता, या खर्चातून होणारा फायदा काय असे प्रश्न जरूर विचारावेत. फक्त करत नसणार्‍या प्रयोगांचं स्पष्टीकरण मागू नये ही विनंती.)

२२ लाख प्रकाशवर्ष अंतरावर असणार्‍या सर्वात जवळच्या देवयानी दीर्घिकेतले तारे काय वेगाने फिरतात आणि त्याच वेगाने का फिरतात यावर संशोधन करून कुपोषित बालकांचं पोषण आज होत नाही हे सांगण्यासाठी रॉकेट सायंटीस्ट असण्याची आवश्यकता नाही. तरीही अशा गोष्टींचा अभ्यास का करावा यासाठी बॅटमॅनचा वरचा हा प्रतिसाद आहे त्यात भर घालण्यासारखं माझ्याकडे नवीन काही नाही. या सम्यक उत्तरापलिकडे जाऊन तिथे २२ लाख प्रकाशवर्षांवर असणार्‍या दीर्घिकेतले तारे विशिष्ट वेगाने फिरतात, त्यांचं त्या दीर्घिकेतलं स्थान काय, या गोष्टींचा अभ्यास करून आपण काय शिकतो, त्याचा "उपयोग"काय अशी विशिष्ट उत्तरं सोप्या शब्दांत देण्याचा मी प्रयत्न करू शकते.

*याबद्दल कोणाला शंका असेल तर स्वतंत्र लिखाण करते आहे.
** उपग्रह असतात तशा उपदीर्घिका. आपल्या आकाशगंगेला अशा दोन मोठ्या उपदीर्घिका आहेत ज्या साध्या डोळ्यांनी दक्षिण गोलार्धातून दिसतात, छोटा आणि मोठा मॅजेलानिक ढग, Small and Large Magellanic Clouds.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशा गोष्टींचा अभ्यास का करावा यासाठी बॅटमॅनचा वरचा हा प्रतिसाद आहे त्यात भर घालण्यासारखं माझ्याकडे नवीन काही नाही.

मला वाटते की विज्ञानाचा उद्देश ज्ञान वाढविणे असा असला तरी नुसते ज्ञान वाढवून त्याचा उपयोग माणसाचे जीवनमान सुधारण्यासाठी झाला नाही तर त्याला काही अर्थ नाही.तेव्हा शेवटी माणसाला काहीतरी उपयोग होणे महत्वाचे.२२ लाख की कोटी प्रकाशवर्षे दूर काय चालले आहे अशा प्रकारचे ज्ञान मिळवून त्याचा उपयोग माणसाचे जीवनमान सुधारायला होईलच किंवा होणारच नाही हे आपल्याला सांगता येणार नाही.तेव्हा या बाबतीत अनिश्चितता आहे.

आज भारतातले बरेचसे (बहुसंख्य) प्रश्न हे शिक्षण, आरोग्य व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टी सुधारल्या की सुटू शकतील.या गोष्टी अधिक चांगल्या पध्दतीने करता येतील अशी नक्की कोणती इनसाईट या २२ लाख प्रकाशवर्षे दूर असलेल्या गोष्टींची माहितीमुळे आपल्याला मिळेल?तेव्हा माझा हे सगळे लिहायचा उद्देश हाच की आधी भारतातील सर्वांपर्यंत पाणी पोचवा, सर्वांना पोटभर खायला मिळविण्याइतके कमावता यायला हवे आणि अशा प्रकारचे रोजगार निर्माण करा, एकही मुलगा/मुलगी कुपोषित असता कामा नये, अजूनही टीबीसारख्या रोगांनी लोक मरतात, कोकणात विंचू चाऊनही लोक मरतात, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अगदी प्राथमिक आरोग्य सेवांचाही अभाव असतो, पाचवी पास झालेल्यांना चार वाक्ये धड लिहिता येत नाहीत ही सगळी परिस्थिती सुधारा.माणसाचे प्रश्न दोन प्रकारचे असतात- एक जीवनमानाशी संबंधित आणि दुसरे मानसिक.यातील मानसिक प्रश्न कधीच संपणार नाहीत.माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो सुखी असेलच असे नाही.पण माणूस श्रीमंत झाला तर निदान भुकेने मरणार नाही, त्याची मुले कुपोषित नसतील.तेव्हा पहिल्यांदा जीवनमानाशी संबंधित असलेले प्रश्न सोडवावे. भारतात ते प्रश्नही अजून सुटलेले नाहीत हे समोर दिसतच आहे.हे प्रश्न सोडवायला विज्ञानाची जी काही मदत होईल ती घ्यावी.आणि मग २२ लाख प्रकाशवर्षे काय चालू आहे याचा विचार करावा.

तेव्हा ही माहिती मिळवायची असेल तर जरूर मिळवा.भविष्यात त्याचा कदाचित उपयोग होईल हे मान्य.पण अधिक महत्वाचे प्रश्न समोर दिसत असताना आणि ते प्रश्न सोडवायचे सोडून असे पळत्याच्या पाठी लागून पैसे खर्च केले जातात हे बघून वाईट वाटते.ही माहिती मिळविणे गरजेचे आहे हे मान्य केले तरी भारतासारख्या देशाने आता या माहितीच्या मागे का लागावे यावर तुमचे म्हणणे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आधी भारतातील सर्वांपर्यंत पाणी पोचवा, सर्वांना पोटभर खायला मिळविण्याइतके कमावता यायला हवे आणि अशा प्रकारचे रोजगार निर्माण करा, एकही मुलगा/मुलगी कुपोषित असता कामा नये, अजूनही टीबीसारख्या रोगांनी लोक मरतात, कोकणात विंचू चाऊनही लोक मरतात, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अगदी प्राथमिक आरोग्य सेवांचाही अभाव असतो, पाचवी पास झालेल्यांना चार वाक्ये धड लिहिता येत नाहीत ही सगळी परिस्थिती सुधारा.

क्वांटम मेकॅनिक्सच्या निरुपयोगी* संशोधनातून इलेक्ट्रॉनिक्सचा उदय झाला आहे आणि त्यातून टीव्ही, संगणक, इंटरनेट, मोबाईल ही उपयुक्त उत्पादने निर्माण झाली आहेत.

* १९०५ ते १९३० दरम्यान प्रकाश हा कणरूपी आहे की तरंगरूपी हे जाणून काय उपयोग होता? अणुमध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन असतात की नाही हे जाणून काय फायदा होता?

भारतात या सगळ्या गोष्टी संशोधित व्हाव्यात की नाही हा प्रश्न वेगळा आहे. पण मग लता मंगेशकरांनी गाणी गाऊन तरी काय उपयोग आहे? आणि पु ल देशपांडे सुद्धा निरुपयोगीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भारतात या सगळ्या गोष्टी संशोधित व्हाव्यात की नाही हा प्रश्न वेगळा आहे. पण मग लता मंगेशकरांनी गाणी गाऊन तरी काय उपयोग आहे? आणि पु ल देशपांडे सुद्धा निरुपयोगीच.

भारतात आता या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायला नको हाच तर माझा मुद्दा आहे. लता मंगेशकर आणि पु.ल.देशपांडे यांच्यावर सरकारने किती पैसे खर्च केले? ते मोठे झाल्यानंतर त्यांना जितके अ‍ॅवॉर्ड मिळाले असतील तितकेच.पण इथे तर आयुकाच्या दुर्बीणी, इतर संशोधन व्यवस्था, झकपक इमारती इत्यादींवर कायमस्वरूपी खर्च होत आहे.सरकारला संशोधनावर पैसा खर्च करायचा आहे ही चांगली गोष्ट आहे.पण मग हाच पैसा हवामानासाठीचे उपग्रह, सौर उर्जा इत्यादींवर खर्च केला तर त्याचे परिणाम बरेच लवकर दिसतील हाच तर मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाच पैसा हवामानासाठीचे उपग्रह, सौर उर्जा इत्यादींवर खर्च केला तर त्याचे परिणाम बरेच लवकर दिसतील हाच तर मुद्दा आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर यांची मुलाखत लोकसत्तामधे काही महिन्यांपूर्वी आली होती, त्यातला हा काही भागः

तुम्हाला पावसात भिजल्याशिवाय पावसाचं योग्य निदान करता येणार नाही. आज आपल्याकडे जगातल्या कोणत्याही प्रगत देशाकडे जसं तंत्रज्ञान असायला हवं तसं तंत्रज्ञान आहे. आपल्याकडे स्वयंचलित रडार आहे, हवामानाचे अंदाज बांधण्यासाठी उपग्रह आहे पण आपण वापरतो ती मॉडेल्स बाहेरच्या लोकांनी बनवलेली आहेत. ज्यांना इथल्या पावसाशी घेणं देणं नाही अशांनी बनवलेली मॉडेल घेऊन इथल्या हवामानाच निदान कसं काय करता येणार? ज्यांना इथला हिमालयसुद्धा माहीत नाही त्यांच्याकडून आपण योग्य निदानाची अपेक्षा नक्कीच करू शकणार नाही. यातली आणखी एक खेदाची बाब अशी की आपली हुशार मुलं तिथे जाऊन ती मॉडेल्स बनवतात. पण ती इथे बसून तसं काम करायला तयार होत नाहीत. आपण त्यांना इथेच थांबवू शकलो तर गोष्टी खूपच बदलतील.

पावसाचा अंदाज व्यक्त करताना सगळ्यांचे हेतू हे शुद्ध असतातच असं नाही. अमेरिकेला भारतातल्या मान्सूनचं महत्व का वाटावं? भारतातल्या लोकांच्या भल्यासाठी नव्हे, तर जर इथला मान्सून खराब होणार हे आधीच कळलं तर ते त्यांच्या वस्तूंच्या किंमती वाढवून ठेवतील, धान्य उत्पादन करून ठेवतील. आज आपल्या बाजारपेठा इतक्या एकमेकांशी संबंधित आहेत की एकाची अर्थव्यवस्था गडगडली तर त्याचा परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. आपल्याकडे दुष्काळ पडला की तुलनेनं अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणार. हे सगळंच एकमेकांशी इतकं जवळचा संबंध असलेलं आणि त्यामुळेच गुंतागुंतीचं झालं आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आज आपल्या बाजारपेठा इतक्या एकमेकांशी संबंधित आहेत की एकाची अर्थव्यवस्था गडगडली तर त्याचा परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. आपल्याकडे दुष्काळ पडला की तुलनेनं अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणार.

हे फारसे पटले नाही.मला तर वाटते की भारताच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले तर त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचेही काही प्रमाणावर नुकसान होईल.असो. चर्चेचा विषय खगोलशास्त्र आहे त्यात मला अजिबात कळत नाही आणि कळून घ्यावे असे या क्षणी वाटतही नाही.तेव्हा यावर फारसे लिहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

तेव्हा ही माहिती मिळवायची असेल तर जरूर मिळवा.भविष्यात त्याचा कदाचित उपयोग होईल हे मान्य.पण अधिक महत्वाचे प्रश्न समोर दिसत असताना आणि ते प्रश्न सोडवायचे सोडून असे पळत्याच्या पाठी लागून पैसे खर्च केले जातात हे बघून वाईट वाटते.ही माहिती मिळविणे गरजेचे आहे हे मान्य केले तरी भारतासारख्या देशाने आता या माहितीच्या मागे का लागावे यावर तुमचे म्हणणे काय?

एखाद्याने त्याचे संशोधन कोणत्या क्षेत्रात करायचे या व्यक्तीस्वातंत्र्यावर ही गदा नाही का?
असे असेल तर आईनस्टाईन, बेल,वॅट वा तत्सम इतर शास्त्रज्ञांच्या संशोधनाने जी आपल्या दैनंदिन जीवनात क्रांती आणली ती झाली असती का?
तुम्ही जी अपेक्षा करता त्यातून भाभा, चंद्रशेखर, जयंत नारळीकर असे शास्त्रज्ञ निर्माण झाले असते का?
या सर्वांना आज नको अजून १०० वर्षांनी जन्माला या असे सांगण्यासारखे आहे हे.

तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काम प्राथमिकतेने व्हायला हवे यावर दुमत नाही. पण हा त्यावरचा उपाय आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक शास्त्राचा अभ्यास व्हायला हवा. तो अभ्यास झाला नसता तर खगोलशास्त्र , खगोल भौतिकी, क्वांटम मॅकॅनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स हे शास्त्रातील विविध प्रकार अस्तित्त्वात आले नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१.

आणि तसेही ज्या गोष्टींची उपयुक्तता समाजाला जास्त वाटते त्या गोष्टींसाठी प्राधान्याने खर्च केला जातोच, उदा. मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी किती काय काय चाल्लेलं असतं. आयुकासारख्या संस्थेने जणू या अत्यावश्यक संस्थांचे बजेट खाल्ल्यासारखा सूर अतिशय खटकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एखाद्याने त्याचे संशोधन कोणत्या क्षेत्रात करायचे या व्यक्तीस्वातंत्र्यावर ही गदा नाही का?

नाही हो वाटेल त्या क्षेत्रात संशोधन करा.पण सरकारची प्रायोरिटी काय असायला हवी हाच तर मुद्दा आहे.कोणाला पाहिजे असेल तर त्याने लोक दात कोरायला कोणत्या प्रकारची हत्यारे वापरतात, ती का वापरतात,या उपकरणांमध्ये त्यांना नक्की काय आढळते म्हणून ते ती उपकरणे वापरतात अशा गोष्टींवरही संशोधन करावे.पण सरकारने अशा गोष्टीवरील संशोधनासाठी पैसा खर्च करावा असे अजिबात नाही.

तुम्ही जी अपेक्षा करता त्यातून भाभा, चंद्रशेखर, जयंत नारळीकर असे शास्त्रज्ञ निर्माण झाले असते का?

होमी भाभांना नेहरूंनी पूर्ण सपोर्ट केला कारण अणु उर्जेतून वीज निर्माण करता येईल आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये अणु उर्जेचा उपयोग होईल हे नेहरूंनी ओळखले होते.उगीचच रिसर्चसाठी रिसर्च म्हणून तो भाभांनी केला नव्हता.चंद्रशेखर तर अमेरिकेतच होते.त्यांचा भारताला काय उपयोग होता?आणि नारळीकरांविषयी पूर्ण आदर ठेऊन (आणि लहान मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करायच्या त्यांच्या कामाला पूर्ण दाद देऊन) म्हणतो की तारे जन्माला कसे येतात्/मरतात कसे अशा पध्दतीचे संशोधन करून नक्की लोकांना काय फायदा झाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तारे जन्माला कसे येतात या प्रश्नाचा अभ्यास केवळ त्या जन्म मृत्यूच्या घटनेशी संबंधित नसतो. त्या अनुषंगाने मूलकणांच्या परस्पर-आंतरक्रिया वगैरेचाही अभ्यास होतो. त्याचा उपयोग प्लाझमा तंत्रज्ञान वगैरे विकसित करायला होऊ शकतो.

अवांतर: अनेक उपयुक्त शोध हे माणसे मारण्याच्या आणि हेरगिरी करण्याच्या "मानवतेच्या" दृष्टीने निरुपयोगी कामासाठी लागणार्‍या उपकरणांच्या निर्मितीतून लावले गेले आहेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बरं मग सरकारने यूसलेस संशोधनावर किती पैसे खर्च केले, आणि ते यूजफुल संशोधनासाठीच्या खर्चापेक्षा जास्त आहे का? ते सांगा. बिचार्‍या आयुकाला टेलिस्कोपवरून किती झोडपणार आहात? सांख्यिकी विदा घ्या आणि मग सांगा की सरकार गंडलेले आहे की कसे? नुस्ता आग्रह धरायला काय जाते, विदा आणा मग आपली चर्चा अधिक वस्तुस्थितीला धरून होईल. आयुका किंवा तत्सम संस्थांचे बजेट, त्यात सरकार किती देते, वैग्रे माहिती कळाल्यास किती पैसे खरोखरीच "वाया" जातात ते कळेल.

तथाकथित यूजफुल संशोधन असो किंवा अन्य गोष्टी असोत, त्यांसाठीच्या स्कीम्समध्ये भ्रष्टाचार इतका होतो, तो जर थांबवला तर गरिबांना अन्नवस्त्रनिवारा देऊनसुद्धा अशा १००* आयुका उभ्या करण्याइतपत पैसे उरतील.

* १०० म्हंजे अनेक या अर्थी. आधीच ढिस्क्लेमर लौन ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होमी भाभांना नेहरूंनी पूर्ण सपोर्ट केला कारण अणु उर्जेतून वीज निर्माण करता येईल आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये अणु उर्जेचा उपयोग होईल हे नेहरूंनी ओळखले होते.

होमी भाभांनी सुरू केलेल्या टी.आय.एफ.आर.मधे गणित, खगोलशास्त्र अशा अनेक विषयांत 'संशोधनासाठी संशोधन' होतं. अगदी याच भाभांच्या नावाने सुरू असणार्‍या बी.ए.आर.सी.मधेही! याच होमी भाभांनी शास्त्रज्ञांना अन्न, निवार्‍याची चिंता करायला लागू नये म्हणून प्रत्येक संशोधन संस्थेत सबसिडाईज्ड कॅण्टीन आणि रहाण्याची व्यवस्था केली; जी आजतागायत सुरू आहे. या सबसिड्यांना विरोध कोण करतं याचा अभ्यास केलात तर निष्कर्ष रोचक असतील. कुलाब्यात, समुद्राच्या शेजारी जागांच्या किंमती किती असतील? तिथेच टी.आय.एफ.आर.ची संशोधनाची इमारत आणि एक हाऊसिंग कॉलनीसुद्धा आहे.
आयुकाचा, मुख्यतः अध्यापनासाठी असणारा टिचभर (4 metre class, optical) टेलिस्कोप खुपत असेल तर GMRT हा 'मेड इन इंडिया' टेलिस्कोप किती मोठा आहे, त्याचा वर्षाचा खर्च किती, वगैरे आकडे पहा. तो ज्यांनी बांधला त्या गोविंद स्वरूपांना होमी भाभांनीच भारतात रेडीओ अस्ट्रानॉमी आणण्यासाठी उत्तेजन दिलं होतं.

तारे जन्माला कसे येतात्/मरतात कसे अशा पध्दतीचे संशोधन करून नक्की लोकांना काय फायदा झाला?

निदान काही मुलांना, लोकांना कुतूहल असतं. खगोलशास्त्रसंबंधित जाहीर कार्यक्रम असतात तिथे लोक असे प्रश्न विचारतात, त्यावरून हे कुतूहल सर्वसामान्यांना असतं असं लक्षात येतं. या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना दिली की त्यांना आनंद होतो. एखादी दुर्बिण बाहेरून मागवली आहे यापेक्षा दुसरी एखादी दुर्बिण भारतातच बनवलेली आहे, किंवा अनेक देश मिळून एक दुर्बिण बांधत आहेत आणि त्यात भारताचा वाटा ५% आहे असं सांगितलं की लोकांना आनंद होतो. काही लोकांना फक्तच पाचच टक्के का, असाही प्रश्न पडतो.
अनेक देश मिळून जेव्हा एखादा प्रकल्प सुरू करतात तेव्हा ज्या देशाने जेवढ्या प्रमाणात पैसे ओतलेले असतात त्या देशाला तेवढ्या प्रमाणात कंत्राटं मिळतात. दुर्बिण बनवायची म्हटली की हार्डवेअर आलंच, आरसे किंवा डिश, इलेक्ट्रिकल साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवर, अशा अनेक गोष्टी येतात. या गोष्टी बनवायच्या तर काही लोकांना नोकरी द्यावी लागते. याचा अर्थ दुर्बिण बांधली तर काही पैसा प्रत्यक्ष वस्तूमधे खर्च होतो, काही पैसा लोकांचे पगार देण्यात. लोकांच्या हातात पैसा आला की आजूबाजूच्या अर्थव्यवस्थेचं, पर्यायाने आजूबाजूच्या अल्प उत्पन्न गटातल्या लोकांचंही भलं कसं होतं हे वेगळं सांगायला हवं का?

भारतीय वैज्ञानिक संशोधनात कमी पडले का हा संशोधनाचा विषय होऊ शकतो, पण पॉप्युलरायझेशनमधे निश्चितच कमी पडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>सरकारला संशोधनावर पैसा खर्च करायचा आहे ही चांगली गोष्ट आहे.पण मग हाच पैसा हवामानासाठीचे उपग्रह, सौर उर्जा इत्यादींवर खर्च केला तर त्याचे परिणाम बरेच लवकर दिसतील हाच तर मुद्दा आहे.<<

मुळात सरकारचा संशोधनावरचा खर्च हा एकूण जीडीपीच्या ०.९% इतकाच असतो. त्यापैकी किती प्रमाणात कशावर केला जातो याविषयी माहिती असेल तर हा वाद घालण्यात अर्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुळात सरकारचा संशोधनावरचा खर्च हा एकूण जीडीपीच्या ०.९% इतकाच असतो.

झालं तर मग!!!! उरलेल्या ९९.१% टक्क्यांचा विनियोग नीट होतोय की नाही ते पहायचं सोडून या ०.९ टक्क्याला किती फोकस करणार? हे म्हंजे "पेनी-वाईज, बट पाऊंड-फूलिश" पैकी झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उरलेल्या ९९.१% टक्क्यांचा विनियोग नीट होतोय की नाही ते पहायचं सोडून या ०.९ टक्क्याला किती फोकस करणार? हे म्हंजे "पेनी-वाईज, बट पाऊंड-फूलिश" पैकी झालं.

लेखातले आकडे म्हणतात की २०००-०१ मध्ये भारताचा रिसर्चवरचा खर्च १६,२०० होता आणि तो ७ वर्षांनी म्हणजे २००७-०८ मध्ये ३७,८०० कोटी झाला आणि हा आकडा एकूण जीडीपीच्या ०.९% आहे.हे आकडे कन्सिस्टन्ट आहेत. कारण २००७ मध्ये भारताचे जीडीपी पहिल्यांदाच १ ट्रिलिअन डॉलर झाले.त्यावेळी डॉलरचा भाव साधारण ४० रूपयांच्या आसपास होता. म्हणजे भारताचे जीडीपी २००७ मध्ये ४० लाख रूपये झाले.त्याच्या ३७,८०० कोटी रूपये म्हणजे जीडीपीच्या साधारण ०.९% झाले.

जीडीपीचे चार भाग असतात.ते म्हणजे प्रायव्हेट कन्सम्प्शन,इन्व्हेस्टमेन्ट,गव्हर्नमेन्ट एक्स्पेंडिचर आणि नेट एक्स्पोर्ट हे आहेत.भारतात सरकारी खर्च हा जीडीपीच्या साधारण १३-१४% आहे.तसेच भारतात खाजगी कंपन्यांमध्ये फार्मा, वाहन कंपन्या आणि काही प्रमाणात आय.टी कंपन्या संशोधनावर पैसा खर्च करतात आणि संशोधनावर होत असलेल्या खर्चाचा बल्क सरकारी खर्च असतो.समजा तो ३७,८०० पैकी ६६% म्हणजे सुमारे २५,००० कोटी असेल.तसेच ४० लाख कोटी जीडीपीच्या १३-१४% म्हणजे साधारण ५.५ लाख कोटी इतके सरकारचा खर्च (बजेट) झाले (२०१२-१३ मध्ये सरकारचे बजेट सुमारे १०.५ लाख कोटी होते. गेल्या ५ वर्षातील इन्फ्लेशनचे आकडे आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर लक्षात घेता हे पण आकडे कन्सिस्टन्ट आहेत).तेव्हा सरकारी बजेटच्या (५.५ लाख कोटी) संशोधनावरील खर्च (२५,००० कोटी) म्हणजे जवळपास ५% झाला.आता हा आकडा बराच जास्त सिग्निफिकन्ट वाटायला लागतो.विशेषतः सरकारचा खर्च ५० वेगळ्या क्षेत्रांमध्ये होत असेल तर ५% म्हणजे तसा बराच मोठा आकडा म्हणायला हवा.तेव्हा नुसत्या जीडीपीच्या आकड्यावर विसंबून राहणे आणि त्यावरून अनुमाने बांधणे फसवे ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

दुसर्‍या परिच्छेदातलं गणित अजिबात समजलं नाही. अजून थोडं विस्ताराने लिहीता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संशोधनावरचा खर्च जीडीपीच्या किती टक्के आहे हा आकडा फारसा महत्त्वाचा नाही.
एकूण सरकारी खर्चापैकी किती खर्च संशोधनावर होतो हे महत्त्वाचे आणि मग तो बराच सिग्निफिकंट दिसतो असं क्लिंटन यांचं म्हणणं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आता समजलं.

संशोधनावरचा खर्च जीडीपीच्या किती टक्के आहे हा आकडा फारसा महत्त्वाचा नाही.

याचं कारण समजलं नाही.
संशोधनाचा उपयोग शेवटी संपूर्ण समाजाला होतो. म्हणून समाजाचं उत्पन्न आणि संशोधनावर होणारा खर्च अशी तुलना व्हावी.

मग अजून काही प्रश्न आहेत. समजा खगोलशास्त्र, शुद्ध गणित हे विषय 'निरूपयोगी' म्हणून सोडून दिले (किंवा दिले नाहीत) आणि नोकरशाहीवर होणारा एकूण खर्च कमी केला, (आधुनिकीकरण, एका सर्टीफिकेटच्या चार कॉप्या न मागणे, काही क्षेत्रांचं खासगीकरण इ. अनेक उपाय असू शकतील) तर एकंदर सरकारी खर्च कमी होईल. पण संशोधनावर होणारा खर्च (निव्वळ आकडा) कदाचित तेवढाच, कदाचित अधिक होईल. अशा परिस्थितीतही एकूण सरकारी खर्चाशी तुलना करता संशोधनावर होणारा खर्च वाढलेला दिसेल. त्यामुळे अशी तुलना कितपत उपयुक्त आहे हे समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संशोधनाचा उपयोग शेवटी संपूर्ण समाजाला होतो. म्हणून समाजाचं उत्पन्न आणि संशोधनावर होणारा खर्च अशी तुलना व्हावी.

श्री.हती/वटवाघूळ/सिंह्/बोका इत्यादींचे म्हणणे सरकारी खर्चाच्या संदर्भातले होते असे दिसते.म्हणून सफरचंद-सफरचंद अशी तुलना व्हावी म्हणून एकूण सरकारी खर्चाच्या ५% खर्च संशोधनात होतो असे या आकडेवारीवरून म्हटले.

संशोधनावर खर्च वाढावा, तिथे (आणि इतर कुठेही) खर्च योग्य प्रकारेच आणि योग्य व्यक्तींनाच संधी देऊन व्हावा हे जरूर वाटते.पण संशोधन, विज्ञान अशा गोष्टींमधले मला फारसे कळत नाही. तेव्हा नक्की कोणत्या क्षेत्रांमध्ये अधिक संशोधन व्हावे हे मला माहित नाही.

एक प्रश्न (खगोलशास्त्रासंबंधी): मी १९९७ पर्यंत ठाण्यात होतो.१४ वर्षांच्या खंडानंतर २०११ मध्ये मी मुंबईला परतलो. १९९७ पर्यंत आकाशात काही प्रमाणावर चांदण्या वगैरे दिसत असत.पण मी सध्या राहतो तिथे (चेंबूरमध्ये) चंद्र सोडून आकाशात काहीही दिसत नाही इतके प्रदूषण आहे.अशा वेळी आकाशात चांदण्या दिसल्याच नाहीत तर त्या विषयीचे कुतुहल लहान मुलांच्या मनात निर्माण कसे होणार?हे खगोलशास्त्राच्या विकासासाठी मारक आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

प्रदूषणामुळे आकाशातील बहुतेक ग्रहतारे दिसेनासे झाल्यावर पुढच्या पिढीत खगोलाबाबत कदाचित कुतूहल कमी होणे शक्य आहे.

विज्ञानाबाबततरी असे कदाचित होईल.

माझा एक आप्त मित्र फलज्योतिषाबाबतफार म्हणजे फारच रुची राखतो. मागे तीन ग्रह आणि चंद्र एका घरात होते, त्याबाबत तो उत्साहाने भरून गेला होता. गंमत म्हणजे प्रदूषित आकाशातही हे गोलक ठळकपणे आणि सुंदर दिसत होते. मी त्याला "वर बघ, किती सुंदर!" म्हटले, तर त्याबाबत तो खूपच उदासीन दिसला. परंतु "युरेनस कुठल्या घरात, आणि अँड्रोमेडा गॅलॅक्सीचे फलज्योतिष" वगैरे "आधुनिक संशोधन" तो चवीने वाचत असे.

प्राचीन काळापासून फलज्योतिषात रस असलेले राजेराजवाडे गणितज्योतिष्यांना नोकरी देत आणि निरीक्षणयंत्रे बांधून देत. तसे काहीतरी होऊ शकेल, कदाचित. परंतु आज राजेराजवाडे नव्हे तर लोक शहा आहेत. प्रश्न आहे प्रामाणिकपणाचा. फलज्योतिष हे मनाला दिलासा देणारे असले, तरी आमच्यावरील खर्च तुमच्या फलज्योतिष्यांना कपोलकल्पित रम्यकथा सांगण्याकरिता कच्चा माल पुरवतो, त्या कच्च्या मालापासून बनलेल्या सुरस कथांनी तुमचे मनोरंजन होते, आणि तुमच्या मनाला दिलासा मिळतो" असे म्हणणे वैज्ञानिकांना अप्रामाणिक वाटेल.

तरी "सामान्य जगाहून विलक्षण सौंदर्य" आणि "मानवजातीच्या भव्य कर्तृत्वाबाबत सामान्य जनांना वाटणारा अभिमान, त्यातून मिळणारा दिलासा" हे त्यामानाने प्रामाणिक उपयोग मानले जातात. पूर्वीच्या काळी आणि आजही सरकार नयनसुख आणि अभिमान जागवणार्‍या इमारती बांधते, त्यांचे प्रत्यक्ष उपयोग फारसे नसले तरी... तसेच काहीतरी खगोलशास्त्राचे होत आहे.

यू. एस.ची नासा संस्था "सुंदर चित्रे" आणि "नाट्यपूर्ण घटना" यांना लोकांत प्रसिद्ध करण्याचे धोरण राबवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता गणित समजलं. तरीही penny wise, pound foolish हा आक्षेप घेता येईल. या पाच टक्क्यांमुळे मूलभूत गरज पूर्ण करण्यात कितपत फरक पडेल असाही एक प्रश्न पडला.

आकाशात चांदण्या दिसल्याच नाहीत तर त्या विषयीचे कुतुहल लहान मुलांच्या मनात निर्माण कसे होणार?

होय, ही अडचण विशेषतः लहान वयाच्या मुलांसंदर्भात जाणवते.
मागच्या पिढीतले अनेक व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञ स्वच्छ आकाशातले तारे बघून या विषयाकडे वळल्याचं सांगतात. (कोणत्याही देशातल्या) शहरांमधून तारे दिसत नाहीत. हौशी अभ्यासक शहराबाहेर, पण फार लांब नाहीत, अशा ठिकाणी छोट्या दुर्बिणी वगैरे लावून 'स्टार पार्टीज' किंवा आकाशदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करतात त्याचा काही प्रमाणात फायदा होतो. हबल स्पेस टेलिस्कोप वापरून बनवलेले* फोटो नासाने उत्तमरित्या वापरले आहेत. साय-फाय कादंबर्‍या, मालिका, चित्रपट यांचा उपयोग होतो. जूल्स व्हर्नचे खूप फॅन विज्ञानक्षेत्रात सापडतात. टीव्हीवर बर्‍यापैकी प्रमाणात माहितीपट असतात त्यामुळेही मुलांचं कुतूहल जागृत होतं.

व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांपैकी किती लोकांना आपण अभ्यास करतो आहोत ती/त्या खगोलीय वस्तू आकाशाच्या कोणत्या भागात आहे हे सांगता येईल याबद्दल मला कुतूहल आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे फारतर १०% लोकांनाच हे माहित असेल.

*कॅमेर्‍यातून आलेले फोटो सुधारले जातात. शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी दुर्बिणीतून मिळालेल्या प्रतिमाही कॅलिब्रेट कराव्या लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आकाशात चांदण्या दिसल्याच नाहीत तर त्या विषयीचे कुतुहल लहान मुलांच्या मनात निर्माण कसे होणार?

होय असे होऊ शकते. जसे असामी असामीतल्या गिरगावातल्या शंकर्याने डुक्कर पाहिले नव्हते, आम्ही आयुष्यातील कित्येक वर्षे उखळ पाहिली नव्हती (उ उखळीचा मात्र शिकलो होतो), हल्लीच्या शहरी मुलांना गाय ही देवळाबाहेर उभे राहून चरण्यासाठी असते इतकेच ज्ञान असावे (इयत्ता दुसरीच्या परिक्षेत "दूध कोण देतं?" याला 'भैय्या' हे उत्तर ५५ पैकी किमान १० मुलांनी दिलेले स्वतः पाहिले आहे), त्यातच आकाशात फक्त सूर्य आणि चंद्र असतात असे वाटणे स्वाभाविक वाटते.

शंकर्‍याला डुक्कर पहायला पार्ल्यात जावे लागले, आम्हाला गावाला गेल्यावर उखळ पहायला मिळाले, हल्लीच्या मुलांना शहराबाहेरच्या गोठ्यात गाईचे दुध काढताना दाखवायला तसेच टेलिस्कोपमधून त्या अंधारत दडलेले विसश्व दाखवायला पालकांनाच विशेष प्रयत्न करावे लागतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओके, तुमच्या गणिताप्रमाणे ५% रक्कम संशोधनावर खर्च होते असे म्हणतो. तरी मूळ मुद्दा बदलतच नै. ही रक्कम मोठी आहे का? नक्कीच आहे. पण तरीही जीवनावश्यक गोष्टींवर खर्च करायला उरलेले ९५% आहेतच ना!! बिचार्‍या ५% वाल्यांना किती झोडपायचं? शिवाय, त्या ५% पैकी किती रक्कम ही खगोलशास्त्र वैग्रे "यूसलेस" गोष्टींतील संशोधनासाठी खर्च होते, तेही पाहिलं पाहिजे. तसे पाहिले तर "यूसलेस" रकमेचे पर्सेंटेज निम्म्यापेक्षा कमी येईल. मग परत ते पेनीवाईज वैग्रे चर्‍हाट आलंच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवांतरः बरेचसे 'उपयोगी' शोध हे शिकार आणि युद्धांतून लागले आहेत. तेव्हा उपयुक्त शोध लागावे यासाठी युद्ध करावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे काहितरी बाय-प्रॉडक्ट मिळेल म्हणून संशोधनाला प्रोत्साहन द्यावे असा मुद्दा नसून संशोधनासाठी संशोधनाचे तुम्हाला हवे असतील तर असे बाय-प्रॉडक्टदेखील आहेत असे सांगणे असा मुद्दा असावा. त्यामुळे तुलना फारशी लागू होत नाही असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खगोलशास्त्राच्या अभ्यासामुळे भौतिकशास्त्रीय गणित विकसित होते. ते गणित उद्योग-यंत्रांत वापरले जाते.

खगोलशास्त्रातील घटना या प्रचंड ऊर्जाव्ययाने घडत असतात. पृथ्वीवर केले जाऊ शकतील असे प्रयोग शतकानुशतके अधिक-अधिक मोठे होत असले, तरी शतकानुशतके खगोलशास्त्रीय निरीक्षणाची उपकरणेही सुधारत आहेत. कुठल्याही काळात पृथ्वीवरच्या प्रयोगांपेक्षा अवाढव्य घटना खगोलात घडत असताना निरीक्षता येतात. त्या निरीक्षणांची सोय लावणारे गणित शोधले जाऊ शकते. आणि गणितातून मिळणारे निष्कर्ष अधिक निरीक्षणांतून पडताळले जाऊ शकतात. अशा तर्‍हेने पृथ्वीवर प्रयोग रचण्याच्या पूर्वी विविध सैद्धांतिक चौकटींपैकी चूक-बरोबर हा निवाडा करता येतो.

दुर्बिणीने जितके दूर जाऊ, तितक्या अवाढव्य प्रमाणावरच्या घटना निरीक्षता येतात, आणि तितक्या अवाढव्य ऊर्जांच्या गणिताचा शोध/पडताळणी करता येते. गुरुत्वाकर्षण आणि परमाणु-प्रक्रियांबाबत खगोलशास्त्रीय निरीक्षणे ही भूतलीय प्रयोगशाळांतल्या निरीक्षणांच्या पुष्कळ आधी करता आली.

उदाहरणार्थ : जीपीएस उपग्रहांच्या संदेशांकरिता सापेक्षतावादाची गणिते लागू होतात. ही यंत्रे उपयोगी व्हावी तर गणितांतले प्रमाद अगदी कमी हवेत... दूरवरच्या खगोलशास्त्रीय निरीक्षणांची सोय लावता-लावता शतकापूर्वी तितपत सूक्ष्म गणित-सिद्धांत बनवता आला! प्रचंड वेगाने प्रवास करणारी पिंडे, आणि प्रचंड अंतरावरून येणारी प्रकाशकिरणे नाहीतर कुठे सापडली असती? अर्थात ही गणिते खगोलशास्त्राचा अभ्यास १९०० काळात न करता २००० साली उपग्रह सोडून, त्यांच्या अपयशी चालण्यावरून करता आलाच असता. पण तरी १९०० काळात "महागाच्या दुर्बिणी" आणि "खगोलशास्त्र्यांना दूरदूर प्रवास करण्याकरिता भत्ते" हे त्या मानाने स्वस्त पडले असे मला वाटते.

आता दशके-शतके दूर असलेले उपयोग पदरी पाडून घेण्याकरिता किती खर्च करावा? जे उपयोगच आपल्या जीवनकालानंतर उद्भवणार आहेत, ज्यांची कल्पनाही केली जाऊ शकत नाही, ज्याचा फायदा करून घेणार्‍या व्यक्ती अजून जन्मलेल्याच नाहीत, त्या उपयोगांचे भावी मिळकत-मूल्य आजच्या रोख खर्चाशी तुळताना कसे ठरवायचे? हे सर्व उत्तम प्रश्न आहेत.

पण खगोलशास्त्रातून विकसित झालेल्या भौकित-गणितांचा पुढे औद्योगिक उपयोग झाला हा इतिहास बर्‍यापैकी ज्ञात असावा, असे मला वाटायचे - ते स्पष्ट नाही, याबाबत आश्चर्य वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

वरच्या अनेकांच्या प्रतिसादांतून पुरेसे स्पष्ट न झालेले मर्म स्पष्ट झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छान धागा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लोक आईनस्टाईनला किती भितात! कोणी म्हणेना कि अंतर कितीका असेना, असाही शोध लागू शकतो कि ते चटकन कापता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तर्कशुद्ध मांडणी खोडून काढता येत नसल्याने भीत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोणत्याही दोन गोष्टींची तुलना करायला चालू केले (इथे - खगोलशास्त्रातले संशोधन आणि जल्/उर्जा इ संशोधन यांची आवश्यकता) हजारो मुद्दे निघतात, इतर हजारो घुसडता येतात. म्हणून समोर असलेल्या सर्वच बाबींचे सर्वांनी मिळून प्राधान्य कसे ठरवायचे आणि त्यावर स्रोत कसे खर्चायचे अशी चर्चा चालू केली होती, पण तो फार शॉर्टलिव्ह्ड धागा ठरला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याची कॉस्ट्-रेशो पद्धत लागू करत येइल वाटते.
नकळतपणे तीच लागूही होत असते.
अर्थशास्त्रतील जाण्कार प्रकाश टाकू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars