'प्रिय जीए' महोत्सव २०१२

मराठीतले श्रेष्ठ कथाकार जी.ए.कुलकर्णी यांचा ११ डिसेंबर २०१२ हा पंचवीसावा स्मृतीदिन. जीए कुटुंबियांतर्फे २००३ सालापासून या दिवशी 'प्रिय जीए' महोत्सव साजरा केला जातो. २००८ पासून या महोत्सवाअंतर्गत 'प्रिय जीए सन्मान' दिला जातो. तो अनुक्रमे सुनीता देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, ग्रेस, रा. चिं. ढेरे आणि आता या वर्षी महेश एलकुंचवार यांना देण्यात आला. त्याचबरोबर 'प्रिय जीए कथाकार पुरस्कार' मेघना पेठे, मोनिका गजेंद्रगडकर, नीरजा आणि आता या वर्षी मिलिंद बोकील यांना देण्यात आला.या वर्षी या कार्यक्रमाअंतर्गत http://www.gakulkarni.com या संकेतस्थळाचे उद्घाटन आणि जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर यांनी लिहिलेल्या पॉप्युलर प्रकाशनाच्या 'प्रिय बाबुआण्णा' या पुस्तकाचे आणि श्री. महेश आफळे या जीएप्रेमींनी काढलेल्या 'कस्तुरीगंध' या खास स्मरणग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. जीएंच्या निवडक पत्रांचे आणि साहित्याचे अभिवाचन गिरीश कुलकर्णी, ज्योती सुभाष आणि अमृता सुभाष यांनी केले तर महेश एलकुंचवारांच्या ललित लेखांवर आधारित 'मौनराग' चे चंद्रकांत कुलकर्णी आणि सचिन खेडेकर यांनी सादरीकरण केले. जीएंच्या आवाजातल्या 'निरोप' या ध्वनीफितीने या कार्यक्रमाची सांगता झाली. गिरीश कर्नाड यांची या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी असलेली अनपेक्षित उपस्थिती रसिकांना सुखावून गेली. कर्नाड आणि एलकुंचवार सुरेख बोलले. शिवमणीसारख्या एखाद्या तयार तालवादकाने एका वेळी दोनतीन तालवाद्ये लीलया वाजवावी तसे कर्नाड मराठी आणि इंग्रजीला (आणि कानडीलाही!) गोंजारत अगदी वसूल बोलले. एलकुंचवारांना वेळ कमी मिळाला (आणि आता वेळ कमी आहे, नाहीतर मी आणखी थोडेसे बोललो असतो असे ते म्हणाल्यावर श्रोत्यांतून 'बोला, बोला!' असे आवाज आले. कार्यक्रम पुण्यात असूनही!) पण ते अगदी मुद्देसूद आणि नेमके बोलले. मिलिंद बोकिलांचेही तसेच. रामदास भटकळ आणि श्रीनिवास कुलकर्णींचेही तेच. एकूण काय तर निव्वळ भाषण ऐकणे हेही किती सुखद, किती आनंददायी असू शकते हे या कार्यक्रमातील भाषणांतून कळाले. जीएंच्या कथांतील काही भागांचे, त्यांच्या काही पत्रांचे अभिवाचन आणि 'मौनराग' चे सादरीकरण हेही एकूण कार्यक्रमाच्या दर्जाला साजेसे असेच झाले. अभिवाचनातील काही भाग, एलकुंचवारांचे भाषण यांना वेळे अभावी थोडीशी कात्री लावावी लागली असे आयोजकांकडून कळाले तेंव्हा त्या आयोजकांइतकीच मलाही हळहळ वाटली.
मंगेश पाडगांवकरही या कार्यक्रमाला होते, इतकेच.
या कार्यक्रमाबरोबरच आपण इथेच थांबतो आहोत असे या कार्यक्रमाच्या आयोजक आणि या सगळ्या कल्पनेमागच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सूत्रधार असणार्‍या जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर यांनी या वेळी जाहीर केले. यापुढे जीए परिवारातर्फे असा कार्यक्रम होणार नाही ही तशी रुखरुख लावणारी गोष्ट, पण हेच या कार्यक्रमाचे यशही आहे असे मला वाटते. जीएंच्या आवडत्या गडकर्‍यांच्या शब्दांत 'जगण्यात मजा आहे तोवरच मरण्यात मजा आहे'.
'प्रिय बाबुआण्णा' हे पुस्तक त्याचे साहित्यिक मूल्य, भाषा वगैरेच्या पलीकडे जाऊन केवळ भावनेपोटी वाचणार्‍यांसाठी आहे. आपल्या दिवंगत भावाविषयीच्या एक भाऊ म्हणून आणि एक माणूस म्हणून असलेल्या आठवणी पैठणकरांनी अगदी साधेपणाने, माजघरात दुपारी चहा पिता पिता गप्पा माराव्या तशा सांगितल्या आहेत. त्या आठवणींना एक जुना, मराठी-कानडी वास आहे. वंशपरंपरेने चालत आलेला जुना मुकटा, आजोबांची गुरुचरित्राची पोथी, माईनमुळ्याचे लालभडक लोणचे, विरजण लावण्याचे लहानसे स्टीलचे भांडे, लख्ख घासलेले तांब्याचे घंगाळे, एका बाजूने झिजलेली रक्तचंदनाची बाहुली असल्या गोष्टींचे जे मूल्य असते तेच या पुस्तकाचे आहे. ज्यांना अशा गोष्टींमध्ये रस असतो त्यांच्या चार घटका असले काही वाचताना बर्‍या जातात. माझ्या तरी गेल्या.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

रोचक वृत्तांन्त.
आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वृत्तांत आवडला. जीएंबद्दलची कोणतीही गोष्ट म्हणजे जीए प्रेमीसाठी उत्सुकतेचा विषय असतो.
दिलेला वृत्तांत आवडलाच पण सोबत दिलेली जीएंची साईट पण प्रेक्षणीय. लवकरच साईट्वर अधिक माहिती उपलब्ध होईल असे दिसते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रावांमुळे कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. उत्तम वृत्तांत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

संकेतस्थळावरच्या भाषेच्या चुका आणि एकूण चकचकीत स्वरूप जीएंना न्याय देणारे वाटले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुलं, तें, सवाई असे कार्यक्रम (पक्षी जत्रा?) भरवणार्‍यांसाठी प्रायोजकांचे (उदा. पुलं - प्रायोजक रमणिकचंद पानवाला, घोषवाक्य - "इथे तमाखू खाऊन घे रे.." इ.) पेव फुटले असता पैठणकरांनी 'इथेच थांबतो आहोत' ही घोषणा करून (कदाचित सुखद) आश्चर्याचा धक्का दिला आहे.
जीएंच्या प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तीमत्वास साजेसा निर्णय आहे.
जीएंवरील संकेतस्थळ समाधानकारक वाटले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा अप्रतिम कार्यक्रम दोन्ही दिवशी बघता आला, रावसाहेबांचे आभार मानतो. आणि नंतरच्या गप्पाही चार समाधानाचे क्षण देउन गेले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

संजोपराव, या भाषणांच्या ध्वनिफिती ऐकायला मिळतील का?

(गिरिश कर्नाडांना तन्वीर पुरस्कार मिळाला, त्याहीवेळचं भाषण ऐकण्याची इच्छा आहे..)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

मिळवण्याचा प्रयत्न करतो. सर्व 'जीए महोत्सवां'च्या ध्वनीचित्रफिती मिळाल्या तर त्या बघणे/ऐकणे मलाही आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कृपया हे मिळवाच!! संचित आहे ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते