प्रतिमासृष्टी : एक गोष्ट

काल घरी गेलो.
दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही.
काय झालंय तेच कळेना. म्हटलं जाऊन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालंय तरी काय?
तर तीही जागची गायब.
काहीच कळेना. अजब शांतता. माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना.
जे दिसताहेत ते बोलेनात. वैतागून खिडकीवर ओरडलो:-
" अरे, झालंय तरी काय इथे?काल पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे. मला जरा बरं वाटायचं आनंदी
जोडप्याकडे पाहून. ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणून मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणूनच लेका तुझा जन्म झाला)
काय, चाललंय तरी काय इथे?"

खिडकीने एक स्माइल दिली. (गूढ, गमतीशीर स्माइल. खिडकी खूश आहे का उदास तेही कळेना. )
मला आठवलं.....
मी इथे नवीन राहायला आलो होतो. घराला नुसतं एक दार होतं. आत रिकामी जागा होती. त्यालाच घर म्हणायचं.
म्हटलं ठीक आहे. दुसर्‍या दिवशी जाऊन घर लावायला घेतले. जाऊन नवीन मोठ्ठा आरसा आणला.
दारातून नेताना, दाराने जरा आवाज काढला. म्हटलं वा! दाराला हि काच पसंत आहे म्हणायची.
आणि असणारच. किंचित सावळी, पण फ्रेश दिसणारी, सदा तजेलदार असणारी अशी ती होती.
तिच्यात स्वतःला पाहून ते दार चकितच झाले!
आपल्या रुबाबाची, मजबुतीची आणि वेगळेपणाची हे सगळे अशी तारीफ का करतात हे त्याला समजले!
दार खूश झाले!आपल्या अस्तित्वाची जाणीव त्याला तिच्यामुळे झाली.
" एरवी इतरांनी आत बाहेर करण्यापुरता आपला काय तो वापर" असे समजणार्‍या दाराला तिच्यामुळे कळलं
" अरेच्च्या! आपण नुसते ह्यांनी हालवल्यावर हालण्यापुरते नाही आहोत!आपणही हलु शकतो, बाहेरुन
धूळ येत असेल तर अडवू शकतो.बाहेरच्या वाईट नजरा रोखून धरायचे सामर्थ्य ह्या घराचे स्वामी म्हणवितात
त्यांच्यातही नाही, पण आपल्यात आहे!"
दार रोज त्या आरशातील काचेत स्वतःचे रुपडे न्याहाळत असे, आपली, आयडेंटिटी पाहून त्याची छाती गर्वाने तट्ट् फुगून येई.

दाराने मग दिन रात वाईट नजरा येताच त्यांना अडवायला सुरुवात केली.
येणारी" सर्व प्रकारची धूळ" ते दार अडवू लागले.
दाराला स्वतःची जाणीव आणखी दृढ होऊ लागली.
दाराचे सगळीकडे नाव झाले. कौतुक झाले.

दाराने तसूभरही त्या काचेला धन्यवाद दिले नाहीत.
आणी वेड्या काचेनेही ते अपेक्षिले नाहीत! ती रोज त्याला त्याच्या रूपाची, अस्तित्वाची जाणीव करून देऊन तृप्त होई.
वेडी कुठली, तिच्यामुळे त्याला आपले रूप कळाले यात ती खूश होती, तिला तिचे रूप धड कळले नाही तरी!
बस झालं मग, दोघांची एकमेकांवर प्रीत जडली.
आणाभाका झाल्या. जीवाशी जीव जडले.

पण काही दिवसांनी काय झालं,
काच म्हणाली जरा बाजूच्या खोलीत जाऊन येते.
चार दिस र्‍हाउन येते. तेवढे दिवस तू आपला सांभाळ हां राज्जा.

पण दाराच्या कपाळावर पसरल्या आठ्या. डोळे झाले लाल.
" तू जाशील?अन् मग मी काय करू इथे?कुणाला दाखवू माझा रुबाब?माझा थाट?
ते काही नाही. तू आजन्म माझी आहेस. हितून तू जाणे मला मंजूर नाही."

" तुझी मंजुरी हवी कशाला?इथे आले ते तुझ्या मंजुरीने नाही. जाईन तीही माझ्या इच्छेने.
मी येताना तुझ्यामाझ्यासाठी एक मूठ घेऊन येईन. ती तुला बसवली ना, म्हणजे तू अजून देखणा होशील."

" काय, ?!मला, ह्या दाराला मूठ लावणार तू? बंधनात अडकवणार?फारच चेकाळली आहेस.
लक्षात ठेव, तू असशील काच, मी पण आहे बलदंड दार."

काच झाली अधीर, बाहेर च्या जगाच्या उत्सुकतेने ती झाली अनावर.
" मी निघतेय.." येवढंच म्हणाली आणि ताठ मानेने दाराबाहेर चालू लागली.

दार ही चिडलं, आपला" अधिकार" संपतो आहे दिसताच त्यानं अडवण्याचा प्रयत्न केला.
पण काच तरीही पुढंच जाऊ लागली.

" ही असली ठिसूळ, माझ्या पुढे जाते काय?" त्याचा पारा आणखीनच चढला.
त्याने जोरदार धडक दिली तिला. खाळ्कन् आवाज झाला. काच तुटली, फुटली, शत शत तुकडे होऊन पडली.
जखमी स्थितीतही चेहर्‍यावर तिच्या होतं हसू:-" मोडले मी, पण वाकले नाही!"

दार आपल्याचं आनंदात मश्गुल होते." कसा शिकवला धडा! अधिकार खतम तरवस्तूखतम.."
पण थोड्या वेळाने राग किंचित कमी झाला(संपला नाही. )
आणि ह्या विजयी अवस्थेत आपण दिसतो कशे हे पाहण्यासाठी त्याने पाहिले भिंतींवर.
काच असायची तिथे.

" अरेच्च्या! पण.. पण.. मी दिसत का नाहीये? हे काय झालंय?"
दाराला प्रश्न पडला आणी फक्त क्षण भरापूर्वी काय अघटित घडलंय हे त्याला उमगलं.
पण आता त्याला स्वतःला" तो स्वतःच" सापडेना!
त्याची आयडेंटिटीच हरवली.
आयडेंटिटीच नाही, तर सामर्थ्य ही गेले.
त्याला काहीच कळेना. तो ओक्साबोक्शी रडू लागला. फुटलेली काच जोडू लागला.
पण काच आता थोडीच रिकव्हर होणार होती?ती तर गेली निघून पार... पलीकडे...
त्या तिथल्या उंचावरच्या हसर्‍या सरोवराच्या नितळ स्वच्छ पाण्यात हंसांना त्यांचे रूप दाखवणारी
पाण्याची सप्तरंगी किनार ती बनून गेली होती.
त्याचे रडणे थांबले. पण आक्रोश नाही.तो दिङ मूढ होऊन बसला. तो कायमचाच!
तो काचेला तोडू शकत होता. पण काचच नसेल तर तो स्वतः तरी कोण होता?

--मनोबा

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

छान! कथा आवडली!
रुपके करायचीच म्हटली तर कुठेतरी रिलेट करता येतीलही पण त्याशिवायही आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अर्थपूर्ण रूपक. आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्याची दखल घेतलेल्या सर्वांना धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars