Catch 22

"हरन्याला पुलिस नी पकडुन नेलं ना बाप्पा.." कालू वरडत वरडतच येत व्हता.
"का म्हुन?" बाप्पाच्या चेहऱ्यावर माशीही उडाली नाही.
"ते काल नक्सलीनी मारलं व्हतं ना पुलिसले...हरन्या नक्सली हाये म्हनत व्हते"
"नक्सली? हरन्या? काय येडबीड लागले का बे पुलिसले?"
"कोनीतरी पायजे ना बाप्पा....रिकॉर्ड ले.. हरन्या वावरात गेला व्हता रात्री...धरला ना मग त्याले रस्त्यात...जंगल म्हुन वावराचा रस्ता हाये...तर तिथेच धरला पुलिसने..."
"साली आपली तर जिदंगानीच खराब हाये साली...तिथे नक्सली इथे पुलिस..."
"जाव दे...रोजचाच हाये..."
"हा.. एकदा आपल्याले बी पकडुन नेतील ना तोवर राह पहायची"
"सोड ते...मी उद्या तुमसर ले जाउन राहिलो...भाताच्या गिरणीकडे..."
"मी बी येतो ना बे मग...एका गाडीने जाउ..पैसा वाचेल ना बे.."

--------------------------------------------------------------

"साहेब...नक्सली हाये म्हनत व्हते...आमची सगळी गाडी लुटली साहेब...कालुवर वार बी केले..माझ्या डोक्यात दगड घातला....नशीब म्हणुन जित्ता राहिलो"
"नक्सली...?" इंस्पेक्टर
"म्हनत व्हते साहेब..पण नक्सली नसनार ते" कालु बोलला
"तुला काय माहिती बे? कोन नक्सली ते?"
"म्हंजे साहेब...."
"हवालदार ह्याला घ्या आत...आन ह्या बाप्याची जबानी नोंदवा की नक्सल्यांनी लुटले"
------------------------------------------------------------------------------------

"अरे कालु...तु बी इथे"
"आयला हरन्या काय झालं बे तुला...असा थोबडा काम्हुन झालाय.."
"लई मारला ना सायबाने....सालं नशीबच खराब...तुला काम्ह्नुन घातला इथे?"
"आयला लंबी कहानी हाये..."
-------------------------------------------------------

"चला...निघा इथुन...लवकर"
"मायबाप...उठायची शक्ती नाय हाय...लई मारलाय पुलिसने"
"उचला रे ह्यांना...आपलीच मानसं आहेत...."
"मायबाप तुम्ही चौकीवर हल्ला करुन आमाले घेवुन जाताय...पण पुलिस नंतर लय त्रास देईल...आमाले राहु द्या इथेच"
"चल बे...बघतो कोन हात लावतं तुमाले"
--------------------------------------------------------

"हे कुठे आनलं आमाले?"
"ही आपली चौकी हाये बे...डॉक्टर तपासा ह्यांना. आपलीच मानसं आहेत"
-------------------------------------------------------------------
"गोरिलाज..कोम्रेड्स...आज आपल्या फ़ौजेत हरन्या आनि कालु हे दोन कॉम्रेड्स आलेत"
"तुमचे उपकार सरकार..." कालु भावनाविवश हौन बोलला.
"उपकार वगैरे काही नाही कालु...आपण आपल्या बांधवांसाठी लढतोय."
"हो सरकार"
"सरकार नाही...कॉंम्रेडस....आपण सगळे बंधु आहोत."
"हो कामग्रेड"
"हा हा हा...असु दे असु दे"
-----------------------------------------------------------

"हरन्या, कालु...आज तुमचे ट्रेनिंग पुर्ण....पहिल्या कामगिरिवर जायचेय तुम्हाला"
"यस कॉम्रेड"
"तुमच्याच गावात...त्या गद्दार बाप्पाला संपवायचेय."
"काय?"
"हो..हीच परिक्षा आहे तुमची"
----------------------------------------------------

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

ऐसीअक्षरेवर मनःपूर्वक स्वागत!

आगमनालाच दमदार सुरवात केली आहेत. कथा आवडलीच शिवाय महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बोली भाषेतून इथे लेखन झाले पाहिजे ही माझी जुनी इच्छा काही अंशाने अधिक पूर्ण झाली याबद्दल आभारही मानले पाहिजेतच.
या कथेचे (किंवा शैलीचे) अजून वैशिष्ट्य म्हणजे केवळ 'संवाद' वापरून फुललेली कथा.
कथा करुण असली तरीही आवडलीच!

येत राहा .. लिहीत राहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वागत!
कथा आवडली!
लिहीत रहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ऐसी अक्षरे'वर स्वागत. निव्वळ संवादांतून आणि अगदी मोजक्या वाक्यांतून कथा फुलवली आहे, ते आवडलं.

अजून असंच लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0