नव्या वर्षात मराठी वृत्तपत्रं

नवीन वर्ष सुरू झालं की अनेक वर्तमानपत्रांत नवीन सदरं चालू होतात. अशांपैकी रोचक काही आढळलं तर ते सांगण्यासाठी हा धागा.

'लोकसत्ता'नं नव्या वर्षात अनेक विषयांवरचं लिखाण द्यायला सुरुवात केलेली दिसते. त्यापैकी काही रोचक विषय आणि लेखक -
नितीन रिंढे यांचं साहित्यविषयक सदर शनिवारी प्रसिद्ध होईल. गेल्या शनिवारी विख्यात लेखक पेसोआवर त्यांनी लिहिलेला लेख इथे वाचता येईल.
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांत बोलल्या जाणाऱ्या बोलींची ओळख करून देणारं सदर. त्यातला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातल्या बोलीविषयीचा लेख इथे वाचता येईल.
राजधानी दिल्लीत नोकरी-व्यवसायानिमित्त राहणाऱ्या कर्तबगार महाराष्ट्रीय लोकांची ओळख करून देणारं सदर. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्याविषयीचा लेख इथे वाचता येईल.
'वैचारिक शिस्तीच्या अभावामुळे आणि घट्ट रुजलेल्या गैरसमजामुळे होणारी गल्लत, दुराग्रहामुळे किंवा प्रेरणादायक अतिशयोक्तीच्या भरात किंवा मुद्दाम दिशाभूल करण्यासाठी प्रश्नाचं चुकीचं निदान करण्याची गफलत आणि बहुतेकदा यामुळेच प्रमाणाबाहेर व विघातकरीत्या उसळणारा गहजब यांची चिकित्सा' दर शुक्रवारी करणारं राजीव साने यांचं नवं सदर. त्यातला पहिला लेख इथे वाचता येईल.
आजकालच्या कलाकृती कशा पाहायच्या यापेक्षा कशासाठी पाहायच्या, याचा शोध दृश्यकलेच्या अंगानं घेणारं अभिजीत ताम्हाणे यांचं नवं सदर. यातला पहिला लेख इथे वाचता येईल.
याशिवाय 'दिव्य मराठी' मध्ये विश्राम गुप्ते यांचा हा लेख वाचण्यात आला, पण ते सदर आहे की स्वतंत्र लेख त्याचा अंदाज लागला नाही.

'सकाळ'ची नवी सदरं अपेक्षेप्रमाणे कळाहीन वाटली. महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीत विशेष काही हाती लागलं नाही.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

ऐसी अक्षरेवर लिखाण करणार्‍या सदस्या सुवर्णमयी यांचं प्रहारमधे सुरू झालेलं नवं सदर :
http://epaper.prahaar.in/detail.php?cords=16%2C1416%2C1480%2C2278&id=sto...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रोचक सदरे आहेत सर्वच!!! मस्त धागा. सुवर्णमयी यांचेही अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'सकाळ'ची नवी सदरं अपेक्षेप्रमाणे कळाहीन वाटली. महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीत विशेष काही हाती लागलं नाही.
अगदी अगदी.
सुवर्णमयी यांचे अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

चांगली माहिती. सगळी सदरे चांगली आहेत. राजीव सान्यांचे सदर सर्वात जास्त रोचक वाटले (त्यांच्या ग्लोबल वॉर्मिंगविरुद्धच्या लेखात, 'पाण्यातला बर्फ वितळल्याने पाण्याची पातळी वाढत नाही म्हणून पृथ्वीवरचा बर्फ वितळत असला तरी समुद्राची पातळी वाढणार नाही' इत्यादी युक्तिवाद वाचलेले असल्यामुळे या सदराबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजपासून लोकसत्ता या वृत्तपत्रात दर सोमवारी 'कलाभान' नावाचं सदर सुरू होतंय त्याचा उल्लेखही लेखात आला आहे. त्यातील 'आधुनिक नव्हे, आजचं!' हा पहिला लेख आवडला. लेखातील मेंदीने रंगवलेले हात आणि त्यातून उलगडत जाणारम स्त्रीचं 'वस्तुकरण' ही मीमांसा ग्राह्य आहे.

या धाग्याच्या निमित्ताने विविध सदरांतील लेख, त्यांचे विषय आदींवर चर्चा इथे करता येईल असे वाटते. यावर चर्चा रंगल्यास चर्चा नव्या धाग्यात हलवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सगळी सदरे वाचली. कलाभान व्यतिरिक्त राजीव सानेंच्या सदराविषयी उत्सुकता आहे.
रिंढे यांचे साहित्यिकांवरचे सदरही वाचनीय असेल असा कयास आहे. पहिला भाग आवडला.

बोली भाषेच्या सदरातील पहिला लेख मात्र घाईने लिहिला किंवा/आणि तपशीलाची जंत्री देणारा वाटला. नवी माहिती मिळाली मात्र त्या भागाचा इतिहास, विविध भाषांचे संस्कार कसे आणि कधी झाले आणि एकूणच या बोलीच्या माहितीबरोबरच तेथील विद्यार्थांचे, स्थानिकांचे प्रमाण भाषेच्या संस्कारांमुळे झालेला दैनंदीन परिणाम यावर अधिक 'भाष्य'आवडलं असतं. घाई यासाठी की नियम लिहिताना (किंवा बनवतानाच) घाई केल्यासारखी वाटते. जर 'त' चा 'ट' होतो आणि ना चा 'ळा' होतो तर होताना चे होटाळा व्हायला हवे ते होताळा होते असे लिहिले आहे. (आधी बोलीला नियमांत बसवावे का हा वेगळा प्रश्न असला तरी) जर नियम बनवायचेच असतील तर ते अधिक अचुक /तपशीलवार असावेत असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखाबद्दल सहमत. पण बोलीभाषांची ओळख म्हंजे इन जण्रल निष्कर्षरहित तपशीलांचे भरताड असेच असते, कारण समजायला सोप्पे जाते. ह्यूरिस्टिक्स ही अशीच असतात-पूर्ण रिगरस नसतात. त्यात परत भाषा ही कधीही इतकी वॉटरटाईट नसते. असो.

बाकी, मराठीच्या बोलीभाषांबद्दल कुणी घाटगे यांनी अ सर्व्हे ऑफ मराठी डायलेक्ट्स नामक पुस्तक लिहिलेय असे ऐकून आहे. नेटवर पाहिले पाहिजे. बहुतेक हे घाटगे म्हंजे कोल्लापूरच्या राजाराम कॉलेजात अर्धमागधीचे प्रॉफ होते तेच असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटम्यान म्हणजे कहर माणूस आहे. ROFL

लेखाबद्दल सहमत. पण बोलीभाषांची ओळख म्हंजे इन जण्रल निष्कर्षरहित तपशीलांचे भरताड असेच असते, कारण समजायला सोप्पे जाते. ह्यूरिस्टिक्स ही अशीच असतात-पूर्ण रिगरस नसतात. त्यात परत भाषा ही कधीही इतकी वॉटरटाईट नसते. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

>>बोली भाषेच्या सदरातील पहिला लेख मात्र घाईने लिहिला किंवा/आणि तपशीलाची जंत्री देणारा वाटला.<<

त्या लेखातला स्वानुभवातून आलेला हा भाग मला महत्त्वाचा वाटला -

विद्यार्थी स्वत:च्या भाषेत चांगल्या प्रकारे व्यक्त होतात.
परीक्षेत प्रश्नांची उत्तरं लिहितानाही विद्यार्थी बोलीभाषेचाच वापर करीत होते. ती त्यांनी प्रमाणभाषेत लिहिणं अपेक्षित होतं. विद्यार्थ्यांची अडचण माझ्या लक्षात आली. त्यांच्या बोलीतल्या शब्दांना प्रमाणभाषेत कोणते शब्द आहेत, हेच त्यांना माहिती नव्हतं. तसंच प्रमाणभाषेतील शब्दांना बोलीभाषेत कोणते शब्द आहेत, तेही माहीत नव्हतं. विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी मी 'बोलीभाषा-प्रमाणभाषा' हा शब्दकोश तयार करण्याचं ठरवलं. आणि बोलीभाषेतील शब्द जमा करण्यास सुरुवात केली. त्यातून 'मायबोली' हा शब्दकोश तयार झाला. आता तो विद्यार्थी नियमितपणे वापरतात.

ह्यात उगीच प्रमाणभाषा कशी अन्याय करते वगैरेंविषयी गळे काढणं नाही, तर समोर दिसणाऱ्या समस्येला विधायक रीतीनं मार्ग शोधणं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत आहेच. हा भाग महत्त्वाचा मलाही वाटला. पण मग पुढे व्याकरणाचं पुस्तक असल्याप्रमाणे नियमांची जंत्री देणं पाणी घातल्यासारखं वाटलं (उदा दाखल एखाददोन नियम देणे वेगळे आणि हे इतके वेगळे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'ऐसी अक्षरे' वर पण काही लोकांनी 'सदरे' चालू केली आहेत. त्याचीही माहितगार लोकांनी दखल घ्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजीव साने यांच्या सदरातील क्वा: 'अमुक म्हणून पाहता' हा दुसरा लेखही वाचनीय आहे. सुरवतीच्या परिच्छेदात आपली भुमिका मांडून शेवटी दिलेल्या उदाहरणांतील काहि अत्यंत मार्मिक म्हणता यावीत.

याव्यतिरिक्त 'आज कालच्या नजरेतून' हे सतीश कामत यांचे सदर पर पंधरवड्याने प्रकाशित होणार आहे तर श्री. शरद जोशी यांचे शेतकर्यांचे प्रश्न मांडणारे 'राखेखालचे निखारे' हे सदर महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या बुधवारी असेल.

कलाभान मधील पुढील लेखन प्रकाशित झालं आहे. एकूणच 'चान चान चित्रे' आणि 'काही प्रयोग' यांचा आढावा घेतला आहे

नव्या वर्षी लोकसत्ताने तरी चांगले लेखन छापायला सुरवात केली आहे हे स्वागतार्ह आहे (मात्र दिवसेंदिवस अग्रलेखांचा (विशेषत: राष्ट्रीय राजकीय प्रश्नांवरील अग्रलेखांचा) दर्जा मात्र खालावतो आहे असेही नमुद करावेसे वाटते)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डॉ रविन थत्ते यांचे छोटे पण चांगले सदर लोकसत्ता मधे चालू झाले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कलाभानमध्ये पुढील भाग आला आहे तोही वाचनीय आहे. 'भारतीय चित्रकारितेचा प्रवास' पेक्षा भारतीय चित्रकारितेच्या प्रवासावर प्रश्न उठवत त्याची माहिती करून दिली आहे. शेवटी (अपेक्षेप्रमाणे)अवनींद्रनाथांची भारतमाता आणि 'खुरपंधारी स्त्री'- आदि दाविएरवाला यांच्यावर चिंतनपर लेखन आहे. एकूणात नेटका लेख (इथे वाचा)

गल्लत, गफलत आनि गहजब मधील राजीव सान्यांचा पुढील रोचक लेख इथे वाचता येईल. FDI वरील त्यांचे विश्लेषण नक्कीच चिंत्य आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राजीव सानेंचा निराशावाद : फक्त त्रागा करण्यापुरता हा लेख अपेक्षा पूर्ण करणारा आहे. गेली काही शतकं/दशकं/वर्ष देशाची (किंवा जगाचीच) अधोगतीच होते आहे अशा प्रकारचे विचार बिनबुडाचे का आहेत, आणि तरीही अनेकदा अनेकांच्या तोंडून असे विचार का व्यक्त होतात याचं विश्लेषण आहे.

'कलाभान'मधला गांधी कुणासारखे? हा अभिजीत ताम्हाणे यांचा लेख आवडला (गांधीजी मोठा माणूस होता, समजणं कठीण आहे, त्यांच्या हत्येमागचे सूत्रधार कोण या घिस्यापिट्या विषयांपेक्षा त्यांच्यासंदर्भात लिहीलेला हा लेखच फारच वेगळा आणि ताजा वाटला.) वेगवेगळ्या कलाकारांनी गांधीजींची चित्रं कशी काढली, त्यांचा इतिहास आणि या क्षेत्रातल्या 'दादा' लोकांनी गांधीजी कसे दाखवले याबद्दल हा लेख आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजचा कलाभानमधील हा लेख आपल्या चिंजंच्या बदलत्या मानवाकृतींच्या लेखमालिकेशी जवळीक साधणारा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!