एक होता नाडा.....एक अद्वैत

.
एकदा काय झालं; नाड्याची गाठ सुटेना. तशी सुटणं अवघड नव्हतं. कुठलही एक टोक मागं सरलं तर गाठ सुटण्यासारखी होती.
पण कुठल्याच टोकाला मागं जाणं मंजुर नव्हतं. त्यापेक्षा,मोकळं होण्यासाठी एकमेकाला ते खेचु लागले. पण झालं उलटच. ताण वाढला. गाठ आणखी पक्की झाली.
खेचुन काहिच होत नाही म्हाल्यावर ते एकमेकाला ढकलु लागले.
त्यानं गाठीचा पीळ आणखीनच वाढला. आता तर गाठ सुटायची काहिच चिन्ह दिसेनात.
सुटका करुन घेण्यासाठी त्या दोन्ही टोकांनी आता जोर वाढवला. प्रचंड ओढाताण सुरु झाली. आणि यातच...
यातच एक टोक तुटलं. गाठ एकदाची तुटली. दुसरं टोक खुश झालं .
"हुस्श्श सुटलो" म्हणुन त्यानं एक निश्वास टाकला. आणी विजयाचा अमप आनंद त्याच्या इवल्याश्या मनात मावेना.आणि एवढ्यात...
.
एवढ्यात एक जीवघेणी कळ त्याच्या पाठितुन गेली. जणु काही त्याचं शरीर कुणा अति शक्तिशाली ताकदीनं हिसका देउन तोडल्यासारखं त्याला वाटलं.जणू शरीरदुभंग व्हावा तसं झालं. कुणीतरी करवतीनं त्याच्या शरीर कापल्यासारखं त्याला झालं. मरणप्राय कळा सुरु झाल्या. तो आख्खा देह यातनामय, वेदनाविव्हल झाला.
आणि त्याच्या डोक्यात विचार गेला चमकुन :-
"अरेच्चा ..आपण कुठं वेगळे होतो. आपण दोघही त्या एकाच नाड्याची टोकं.
एक अखंड , संपुर्ण ; पण जणु निद्रिस्त्/भ्रमित/स्वप्नाभासी नाडा. त्यातच तर आपण सामावलोत. आपण ,म्हणजे हे टोक, सुरु तरी कुठं होतं आणि संपतं तरी कुठं? .....
आपलं खरं रूप नाडा. भ्रमित रुप टोकं; दोन वेगळी,स्वतंत्र टोकं. मूळ रूप अखंड,अभंग.स्वप्नवासी रुप खंडित.
कुठलही टोकं तुटलं तरी तुटणार आपणच होतो. आपलाच जीव कसनुसा करुन विजय आपणच साजरा करणार होतो.आपल्याला आपण वेगळे असल्याचा झाला निभ्रम. निव्वळ भ्रम. त्यातुनच आल्यात ह्या कळा. असह्य वेदना.
पण हे जाणवत असतानाच अति तीव्र वेदनेनं त्याला ग्लानी येउ लागली. तो बेहोश होउ लागला.
.......

इकडं तुटलेल्या नाड्यालाही दोन टोकं शिल्लक होतीच. एकमेकांना पाहुन बोल्तं झाली.
एकमेकांना वेगळं समजु लागली.
द्वित्वाचा भास पुनश्च जन्माला आला होता.
त्या नाड्याला (स्वतःला ती दोन टोकं समजुन)तो त्यांचाच जन्म वाटत होता.
.
अद्वैत सिद्धांत ह्याबद्दल कधीतरी काहीतरी वाचलं होतं. डोक्यात घोळत होतं.
ते असं कागदावर उतरलं.
.
--मनोबा

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

ह्म्म.. चालायचंच! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन टोकाच यकमेकात विसर्जन करायच हाय काय नाय काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

नाडा आणि लेंगा यांचं एकत्रित रूप म्हणजे अद्वैत ... आणि नाडा व लेंगा विभक्त झाल्यावर जी अवस्था होते ते द्वैत आणि तो गोंधळ होऊ नये म्हणून संत महात्मे अद्वैताचा आग्रह धरत असावेत अशी आमची आजवरची समजूत .. पण मनोबा .. आपण नाडा आणि अद्वैताचं केलेलं वर्णन केवळ अप्रतिम .. या विषयावरील उर्वरीत लेखन आपण "गाठी-महात्म्य " म्हणून लवकर प्रसिद्ध करा बुवा ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खेचाखेची टाळण्यासाठी इलॅस्टिक वापरा..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याची ही इलॅस्टिसिटी मर्यादितच. त्यानंतर ताणल्यास तेही तुटतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars