कॉकटेल लाउंज : ग्रे गूज मार्टीनी (Grey Goose Martini)

'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "ग्रे गूज मार्टीनी (Grey Goose Martini)"

पार्श्वभूमी:
क्लासिक मार्टीनीला दिलेला वोडकाचा ट्वीस्ट म्हणजे वोडका मार्टीनी किंवा वोडकाटीनी हे माहिती होते. पण ही ग्रे गूज मार्टीनी काय भानगड आहे?

ह्या भानगडीची मला ओळख झाली एका चित्रपटातून. माझ्या लाडक्या विल स्मीथचा, माझा एक लाडका चित्रपट 'हिच' (होय.. होय, तोच तो! गोविंदा आणि सल्लूचा पार्टनरची सिनेमा ज्यावरून 'इंस्पायर्ड' झाला तोच) त्या चित्रपटात हिच (विल स्मीथ) एका शुक्रवारच्या संध्याकाळी बारमधे गेला असताना त्याला एक आकर्षक तरुणी (इव्हा मेंडिस) दिसते. त्याला ती प्रथमदर्शनी आवडते. बारचा बार टेंडर तिच्याबद्दल माहिती देताना सांगतो की तिने 'ग्रे गूज मार्टीनी' ऑर्डर केलीय. त्यानंतरचा सीन निव्वळ लाजवाब आहे. पण आत्ता मुद्दा तो नाहीयेय. त्यावेळी ते 'ग्रे गूज मार्टीनी' ऐकल्यावर, च्यायला ही काय भानगड असा किडा डोक्यात वळवळला. शोध घेतल्यावर कळले की असे काही ट्रॅडिशनल कॉकटेल नाहीयेय. 'ग्रे गूज' ह्या विख्यात वोडका पासून बनवलेले चक्क वोडकाटीनी आहे. बहुदा ग्रे गूज वोडका बनविणार्‍या कंपनीने ब्रॅंड मार्केटिंगसाठी हिच चित्रपटाचा वापर केला असावा.

असो, हे कॉकटेल ह्या ग्रे गूज वोडका वर बेतलेले आहे. एकदम अफाट चवीची ही वोडका, बाटली डीप फ्रीझर मध्ये ठेवून थंड करायची आणि शॉट ग्लास मधून 'नीट' शॉट घेत गट्टम करायची घ्यायची. अफलातून फ्रूटी चव आहे, लाजवाब!

प्रकार वोडका मार्टीनी
साहित्य
ग्रे गूज वोडका 2 औस (60 मिली)
ड्राय व्हर्मूथ (मार्टीनी) 10 मिली
बर्फ
ग्रीन ऑलिव्ह सजावटीसाठी
टूथपिक ( न वापरलेली Wink )
ग्लास मार्टीनी (कॉकटेल)

कृती:

ह्या कॉकटेलचीची कृती अतिशय सोप्पी आहे. शेकर मध्ये बर्फ घालून त्यावर ग्रे गूज वोडका हळूवार ओतून घ्या. त्यात ड्राय व्हर्मूथ टाकून बार स्पूनने हळूवार स्टर करून घ्या. त्यानंतर चील्ड केलेल्या कॉकटेल ग्लासमध्ये ते मिश्रण ओतून त्यात ग्रीन ऑलिव्ह टूथ पिकला अडकवून ग्लासात सोडून द्या.

झक्कास आणि पोटंट ग्रे गूज मार्टीनी तयार आहे Smile

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

सोपी आहे. करून पाहेन.

चित्रपटान्तून लक्षात राहिलेली दोन पेये म्हणजे -
१. स्वीट वर्मूथ ऑन् द रॉक्स् विथ् अ ट्विस्ट् हे 'ग्राउण्डहॉग डे' या भन्नाट चित्रपटातील आणि
२. 'अ‍ॅबसिन्थ' हे 'अ‍ॅल्फी' या ज्यूड लॉ अभिनित चित्रपटातील. कुणाकडून तरी ऐकले होते की भारतात 'अ‍ॅबसिन्थ' हे पेय प्रतिबन्धित आहे.
या दोन पेयाम्बद्दल काही लिहीणार का ?
विशेषतः पहिल्या वर्मूथ मधला 'ट्विस्ट्' काय आहे ते कळलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा वाचून 'ग्राउण्डहॉग डे'च आठवला.

आत्ता कुठे तुझी मार्गरिटा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला होता, तर नेमकी रविवारी आमच्या (ख्रिश्चन) राज्यातली दारूची दुकानं बंद! येत्या शनिवारी मार्गारिटा बनवावी का मार्टीनी असा प्रश्न पडला ना आता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक सकाळी कर, एक संध्याकाळी. हाकानाका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रँड चा वापर कॉकटेल च्या नावात केलेले पटले नाही - त्यांनी सिनेमात केले असेल तसे marketing साठी, पण तुम्ही नुस्ती vodka martini म्हणले असते तर चालले असते.
ग्रे गूज दुसर्‍या vodka पेक्षा वेगळी असते का तांत्रिक द्रुष्ट्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच बाजारात ग्रे गूज़ वॉदका विकत घ्यायला गेलो. ७५० मिलि. ची बाटली चक्क यू.एस्.डॉ. ३७ ला !!
सध्या तरी परवडणारे नाही.. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असं कशात तरी काहीतरी घोळवायचं म्हणजे कल्पक काम आहे बुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars