"देह्तराणे"

वस्त्रांमधल्या विन्यासाचा रंगबिरंगी होऊन धागा
तुजदेहाच्या भासाभवती चतुराईने लिंपून घ्यावे

केसांवरल्या जलबिंदूसम तीळ खुणेशी थांबून खाली
आवेगाने कोसळताना तुजप्राणांशी खोल भिडावे

स्पर्शामधल्या स्फुल्लिंगांनी तेजवताना श्वाससमाधी
कायेचे कायेशी बंधन वादळातले काहूर व्हावे

दान नव्हे जे दिले घेतले अथवा देवापुढे ठेवले
समरसतेच्या आलापांनी प्रेमतराणे निखरून यावे

शांतवणारी बेचैनी ही अर्ध्या मिटल्या डोळ्यांमधली
क्षणाक्षणाने विस्कटताना कणाकणाने उजळून जावे

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

वेगळ्या कल्पनांची गेय आणि लयबद्ध मांडणी छान आहे.
'शांतवणारी बेचैनी' समजू शकली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वप्रथम ऐसीअक्षरेवर स्वागत!

रचना, लय, कल्पना आवडली
श्री. अजित वर म्हणतात तसे मी ही 'शांतवणारी बेचैनी'ला अडखळलो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ, अजित, प्रतिक्रियेबद्दल आभार.

शांतवणारी बेचैनी म्हणजे ..शांत झालो असे वाटतानाच पुन्हा बेचैन होणे, एका अस्वस्थतेतून पुन्हा शांत होणे, या दोन्हीचा न संपणारा खेळ ई... म्हणूनच 'अर्धे मिटले डोळे..'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार! मला "शांतवणारी बेचैनी" अशी बेचैनी जी आल्यावरच शांत वाटते असा काहिसा अर्थ वाटत होता. अशी बेचैनी असते हे खर आहे पण ती या कवितेत बसत नव्हती.. वरील अर्थ ठिक बसतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमची कविता अतिशय तरल आणि लयबद्ध आहे. शांतवणारी बेचैनी चे विश्लेषणही आवडले आणि पटले सुद्धा.
लिहित रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अमेय,

अतिशय भावपूर्ण कविता. मनापासून आवडली.
दुसरे कडवे जास्तच टच् करुन गेले

केसांवरल्या जलबिंदूसम तीळ खुणेशी थांबून खाली
आवेगाने कोसळताना तुजप्राणांशी खोल भिडावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली. गेयता आहे अन उत्कटतादेखील.
___
खरं तर ही वाचनखूण साठवायची इच्छा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0