"विविध भारती"...

काल असंच Radio Channels बदलतांना (चुकून) "विविध भारती" लागलं,
आणि त्यातल्या निवेदकाचं (RJ) निवेदन ऐकतांना आधी थोडं हसू आलं...

Radio चा शोधलागल्यापासून आजपावेतो किती बदल झालाय,
कितीतरी नव-नवीन Channels आल्यात, आणि त्यातले RJs फूल धमाल करत,
मस्ती करत निवेदन करत असतात...
पण "विविध भारती" मधले निवेदक काय खाऊन निवेदन करीत असावेत, देव जाणे...
ह्यांना बहुधा Special Training मिळत असावी,
"विविध भारती" मध्ये Slow Motion मध्ये आणि धीर-गंभीर स्वरात बोलण्याची...
किंवा अश्याप्रकारे बोलणाऱ्यांनाच भरती करण्यास Special Quota असावा तिथे...
मला खरंच आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय कि, इतकी वर्ष झाली, सारं जग बदललं,
तरी ह्यांच्या बोलण्याच्या "त्या" Typical Tone मध्ये आजही काडीमात्र बदल झालेला नाहीये...

पण काहीही असो, चुकून का असेना, "विविध भारती" लागलं कि लहानपणी
ज्या दिवशी "Radio" हा शब्द पहिल्यांदा ऐकला अथवा समजला होता,
त्या दिवसाची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही...
आणि कानात लगेच एक वाक्य ऐकू येतं -
"भाईयों और बहनों, 'आपकी फ़रमाइश' मे आप सब का स्वागत है..."
आणि त्या गाण्याची फ़रमाइश करणाऱ्यांची लागलेली रीघ आठवते...
"चिंटू, पिंटू, बबलू, तबलु,........."
अशी किमान २०-२५ नावांची चांगली भली-मोठी यादीच आठवते...
आणि हे सगळं आठवल्यावर कुणी जर दिलखुलास हसलं नाही तर शप्पथच...
बस्स, असंच काहीसं झालं माझ्याही सोबत काल...

- सुमित

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा तो टिपिकल आवाज अमीन सयानींचा होता.
नंतरचे अनेकांनी वैट्ट कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे पण या सम हाच! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो... तो आवज अमीन सयानींचाच होता...
आणि आजही कुठेतरी त्यांच्या बोलण्याच्या style ची copy केली जातेय, ह्याचाशी मी सहमत आहे.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

बाकी कै नै पण त्यातला तो टिपिकल दुपारचे कार्यक्रम सुरु व्हायच्या वेळेसचा जो आवाज होता, बहुतेक बासरीची धून होती ती डोक्यात फिट्त बसलीये.भन्नाट होती.
अमीन सयानी हे फक्त नाव ऐकत आलोय. परवाच राजेश खन्ना ह्यांचा देहांत झाल्यावर त्यांच्याबद्दल बोलणार्‍या नेक सेलिब्रिटिंपैकी एक म्हणून हे दिसलेले. सध्या काय करतात ठाउक नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विविधभारती फक्त मेट्रो किँवा शहरी लोकांपुरते नाही. त्यामुळे त्यांना फार बदल नको वाटत असेल. त्यांचे चाहते पुर्वी पोस्टकार्डाने फरमाईश करत आता sms ने करतात.
सखी सहेली वगैरेमधे फोन करणार्यांवरुन कळतं की लहान लहान गावातील, खेड्यातील लोकांना याच अजुनही आकर्षण, उत्सुकता आहे आणि त्यांच्याशी बोलताना RJs ची सॉफ्ट, एनकरेजीँग टोनच हवी.
अवांतर: लेख वाचुन तनु वेडस् मनुची सुरुवात आठवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेड्यातच कशाला, शहरातील लोकानासुधा अशाच साध्या भाषेचे आकर्षण असेलच की, किमान मला तरी आहे. माझ्या कॉलेज जीवनात विविधभारतीनेच माझे सन्गीत विश्व व्यापले होते. आज सुधा इन्ग्लिश आणि हिन्दि यान्चि सरमिसळ ऐकण्याऐवजी साधी सरळ हिन्दि भाषाच कानाला बरी वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजूनही आकाशवाणीवर जयमाला किंवा आप की फरमाईश या कार्यक्रमात तीच गावे ऐकली तरी खूप छान वाटते आणि हसूही येते
जसे भाटापारा... जलपाईगुडी... तिनसुकिया.... इ..इ... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी खरंय... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

"पंखा रोड से राकेश सेठी और पिंटू दीवाना..." हे असेच एक बर्‍याच वेळा ऐकून डोक्यात राहिलेले Smile झुमरीतलैय्या तर लोकप्रिय झालेच. आमच्या शेजारच्या एका कुटुंबातील एक जण व त्याच्या काही मित्रांच्या फर्माईश चे गाणे जेव्हा लागणार होते (आकाशवाणीतील ओळखीमुळे त्यांना ते आधीच कळाले बहुधा) त्या दिवशी तो कार्यक्रम चालू होण्याच्या बर्‍याच आधीपासून केवळ आपले नाव ऐकायला तो व त्याचे नाव ऐकायला आमच्यासारखे इतर बसून होतो ते आठवले Smile

अ व ब केन्द्रातील निवेदक सध्याच्या उथळ वाटणार्‍या निवेदकांपेक्षा जास्त माहितगार असावेत असे केवळ त्यांच्या गंभीर टोनवरून वाटत असे Smile
नुसते गाण्याचे संगीत कोणाचे आहे हे सांगायला "और संगीत से सजाया है...", "मौसीकार है...", "संगीत निर्देशक..." वगैरे असंख्य पद्धती!

मात्र जाम डोक्यात जात असे ती दूरदर्शन वर चालू मॅच चा स्कोर सांगायची पद्धत. खर्‍या क्रिकेटप्रेमीला नुसते "भारत ३३० ला चार" व त्यापुढे (पूर्वी) सुनील किंवा (नंतर) सचिन अजून आहे का ही दुसरी महत्त्वाची माहिती सांगितली तरी बास असे, तेथे "आता भारत व इंग्लंड यांच्यात मुंबई येथे चालू असलेल्या तिसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवसाच्या उपाहारानंतरच्या खेळाचे थेट प्रक्षेपण आता आम्ही दाखवत आहोत...". तोपर्यंत कॅमेरा निवेदिकेवरच. लेको आधी तिकडे मैदानावर न्या की, आणि मग लावा पाल्हाळ (मग त्यात एखादी मुंबईची लोकल अमुक स्टेशन पर्यंत जलद असून कोणकोणत्या स्टेशनवरच थांबेल वगैरे घुसडले तरी कोणाला कळणार आहे)! मग तीन चार वेगवेगळे भूमितीतील आकार स्क्रीनवर पुढे मागे होणार आणि मग कोठे शेवटी मॅच दिसणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा... Smile
लहानपणी "झुमरितलैया" हे नाव ऐकले की हसू अनावर व्हायचे... असे गाव देखील असावे हे खरंच वाटत नव्हते... Smile
आणि हो, Radio वर आपलं नाव येण ही तेव्हा खरंच खूप कौतुकाची गोष्ट होती...
(तशी काहीप्रमाणात आजही आहे...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

कितीतरी नव-नवीन Channels आल्यात, आणि त्यातले RJs फूल धमाल करत,
मस्ती करत निवेदन करत असतात... पण "विविध भारती" मधले निवेदक काय खाऊन >>> हे काही बरोबर नाही. विविध भारती वर शांतपणे निवेदन करत असतील पण त्यांना गाण्यांची माहिती असते. गीतकार कोण आहे, संगीत्कार कोण आहे त्यांना माहिती असते. फाल्तू पणा नसतो. आणि कुठलाही अभिनिवेश नसतो.
vividh bhaarati is has a class which these mashroomed radio channels cant have. रेडिओ सिटी थोडे बरे असते, ते पण रविवारी जास्त. हल्ली रेडीओ सिटी वर पण अमिन सायानी चा प्रोग्रम असतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कृपया माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका...
I do agree that "Vividh Bharati" has it's own class & flavour...
My article is more about it's "Uniqueness", that it has carried with itself, and since so long...
मला "विविध भारती" च्या दर्ज्याबद्दल देखील मुळीच शंका नाहीये...
मी आधी म्हटल्याप्रमाणे, आपल्यापैकी बहुसंख्य मंडळी "विविध भारती" ऐकतच लहानाची मोठी झालीयेत... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

वेगवेगळ्या रेडिओ स्टेशन्सच्या दणदणाटी कोलाहलात विविधभारतीचा ठेहेराव हवाहवासा वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेख आवडला
आकाशवाणी ऐकते तेव्हा कधी कधी असा फील येतो

वरती म्हटल्याप्रमाणे रेडीओ सिटीवर अमीन सयानीचा हल्ली प्रोग्रँम असतो
तसच बिग एफ एम वरही नीलेश मिश्रा नावाचा आरजे चांगल्या हिँदीत यादशहरसे नावाचा कार्यक्रम करतो
हिँदी शब्दासाठी जरुर ऐकावा असा आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

धन्यवाद जाई... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."