आणखी एक टायटॅनिक

मागच्या वर्षीची गोष्ट आहे, जानेवारीचा दुसरा पंधरवडा.. मुळचा मुंबईचा रहिवासी असलेला केविन रिबेलो समुद्रात अर्धवट बुडालेल्या अजस्त्र धुडाकडे आशेने बघत बसला होता...कोणत्याही क्षणी रेस्क्यू टीम आपल्या भावाला , रसेल ला घेऊन येईल या आशेत गेला आठवडा तसाच काढला होता.”या क्रुझ असाइनमेंट मधून चांगले पैसे मिळतील, थोड्याच वेळचा प्रश्न आहे” असे त्याच्या भावाचे क्रुझवर जाण्याच्या आधीचे शब्द त्याला आठवत असावेत...रेस्क्यू टीमला आता कोणी जिवंत असण्याची शक्यता वाटत नव्हती...
दुसरीकडे सर्वत्र अपघाताच्या बातम्या टी.व्ही. वर चालू होत्या..कॅप्टनला कॅप्टन कॉवर्ड असे विशेषण बहाल करून इज्जतीचा पंचनामा सर्व मिडीयाने चालवला होता..तो गर्लफ्रेंड बरोबर डेटिंग करत होता,त्याच्या सॅम्पल्स मध्ये कोकेन सापडले, असे अनेक आरोप त्याच्यावर लावले जात होते...

थोडे मागे जाऊन बघू नेमके काय झालेलं ....
घटनांची सुरुवात झाली १३ जानेवारीला .. इटली मधल्या कोस्टा क्रुझेसच्या मालकीची , कोस्टा कॉन्कोर्डीया हि बोट प्रवासी आणि क्रु धरून साधारण चार हजार लोकांना घेऊन टूर वर निघाली ..
जहाजाच्या एकंदर विस्तार बघितला तर ,तीनशे मीटर लांबी आणि ५० मीटर उंची चे १७ डेक , पाण्याखालील खोली २६ फूट आणि वजन ११५ हज्जार टन (टायटॅनि़कच्या तिप्पट )..जगातले २६ क्रमांकाचे मोठे आणि इटली मधील प्रथम क्रमांकाचे मोठे होते.५ रेस्टॉरंट,४ स्वीमिंग पुल्स , १५०० केबिन्स,१३ बार आणि जॉगिंग ट्रॅक अश्या सुखसुविधा असलेले हे जहाज म्हणजे पाण्यावरचे लहानसे शहरच होते.

तर शुक्रवारच्या दिवशी जहाज ७ दिवसाच्या सफरीवर निघाले,रोमच्या सिव्हीटावेक्का पोर्ट वरून निघून बार्सिलोना, पल्मा, बलेर्मो आणि इतर काही बेटाची भेट घेऊन परतायचे असा नेहमीचाच मार्ग होता.

जहाजाचा कॅप्टन फ्रान्सिस्को स्किटीनोला अनेक वर्षांचा समुद्राचा अनुभव होता .इटलीमधील अमाल्फी कोस्टल एरियामध्ये वाढलेल्या स्किटीनोला समुद्राचे आणि साहसाचे वेड होते. अनपेक्षित घटना घडत असताना नियमांच्या बाहेर जाऊन निर्णय घेण्यास त्याला आनंद वाटत असे. तो कोस्टाचा कॅप्टन झाल्या झाल्या घडलेली एक घटना फार बोलकी आहे.नांगर पडलेल्या अवस्थेत जहाज मार्सेलीच्या किनाऱ्यावर होते..प्रचंड वाऱ्यामुळे ६० नॉट पर्यंत वेगवान लाटा उसळत होत्या.अश्या वेळेस जहाजचे ५६०० अश्वशक्तीचे इंजिन्स संपूर्ण ताकदीने वापरत त्याने जहाजावरचा कंट्रोल चेक केला होता. समुद्राचे त्याला काडी इतके पण भय नव्हते..
त्याचे काही सहकर्मचारी त्याला डेअर डेव्हीलच म्हणत…
2002 मध्ये कोस्टा क्रुझमध्ये लागताना सेकंड ऑफिसर आणि नंतर २००६ मध्ये बांधल्या गेलेल्या कोऱ्या करकरीत कोस्टाचा कॉन्कोर्डीयाचा कॅप्टन अशी त्याची बढती झालेली होती.गेली ७ वर्षे तो कोस्टा कॉन्कोर्डीयाचा कॅप्टन होता. या जहाजावर अजून एक अनुभवी कॅप्टन, प्रवासी म्हणून उपस्थित होता ,रोबर्तो बॉस्को ...
जहाजावर विविध देशांमधले लोकं होते क्रु मेम्बर्समध्ये रसेल रिबेलो-भारतीय , डॉमनिका सेमोर्टन-मोल्डोवा ,प्रवाशानमध्ये कोरियन ,अमेरिकन, इटली,असे जगभरातून आलेले प्रवासी होते...
टायटॅनि़कच्या जमान्यापासून शिपिंग इंडस्ट्री ही वाहतूकीसाठी म्हणण्यापेक्षा करमणूक म्हणून बघितली गेली आहे . टायटॅनि़कच्या केबिन्स बनवताना करताना तत्कालीन प्रसिद्ध हॉटेल रिट्सच्या खोल्यांना समोर ठेवले गेले होते. करमणुकीची नेहमीची सर्व साधने असतात आणि त्यातूनही पर्यटकांना थ्रील म्हणून जहाजाचा मार्ग प्रवाशांना बसल्या जागी वेगवेगळी बेटे दिसावीत म्हणून मुख्य समुद्रातून न ठेवता साधारण जमीन दिसेल अश्या पद्धतीने ठेवला जातो. कारण मुख्य समुद्राचा देखावा म्हणजे क्षितिज समांतर समुद्ररेषा इतकाच असतो त्याने पर्यटक लगेच कंटाळतात. बसल्याजागी कोणतेही कष्ट न घेता वेगवेगळ्या सुंदर जागा बघायच्या असल्या तर सिनेमा ही पहिली जागा आणि क्रुझ शिप्स ही दुसरी….
सफरीचा पहिलाच दिवस असल्याने पर्यटक बोटीला अजून सरावत होते.इकडे तिकडे फिरत फोटो काढणे, सहप्रवाशांच्या ओळखी करून घेणे..नेहमीचेच वातावरण ...बहुतांश लोकांनी संपूर्ण जहाज अजून बघितले पण नव्हते..पहिल्या रात्रीच्या रॉयल डिनरसाठी तयार होऊन लोकं रेस्तराँमध्ये पोहोचलेले होते...ओपन थेटरमध्ये असलेल्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला जात होता...
जहाजाचा पहिला टप्पा होता सीव्हेटावेक्का ते बार्सिलोना...जाताना जींन्यूट्री, नंतर जीलीओच्या किनाऱ्याला दर्शन द्यायचे आणि पुढे जायचे ...दोन्हीही लहानशी बेटे आहेत..कदाचित एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण एका नजरेत बघता येतील इतकी छोटीशी..एखादा विशेष दिवस असला तर बोलायलाच नको ...अप्रतिम वातावरण ,संपूर्ण जागेत पसरलेला आनंद-ज्याचा भाग होणे कोणाला पण आवडेल..अशाच एका दिवशी जहाजाच्या प्रवाशांना दाखवायला म्हणून जहाज किनाऱ्याच्या अगदी जवळून नेलेलं. जहाजाचा रूट मेन्यूअल मोडमध्ये करून ..

तर या टप्प्यावरून जाण्याची कोस्टा कॉन्कोर्डीया ची ही पहिलीच वेळ नव्हती.१४ ऑगस्टला तिने बेटाच्या काही अंतरावरून हा टप्पा घेतला होता .त्या नंतर याच जहाजाच्या दोन भावंडानी कोस्टा पॅसिफिका आणि कोस्टा आलेग्रा ,)किनाऱ्याच्या मैलभर अंतरावरून फेरी घेतली होती.या वेळेला जिलिओ च्या मेयरकडून कॅप्टनला सांगण्यात आले होते की किनाऱ्याजवळून जहाज जात असतानाचे दृश्य फार सुंदर असते.
जिलिओ जवळ आल्यानंतर पुन्हाएकदा बोट किनाऱ्याच्या जवळून न्यावी ,आणि बेटावर असलेल्या रिटायर्ड कॅप्टनला कडक सॅल्युट ठोकावा अशा विचाराने स्किटीनोने जी.पी.एस नी नेव्हिगेट करत असलेली ऑटोमेटीक सिस्टीम बंद करून कंट्रोल्स पूर्णपणे आपल्या हातात घेतले. आणि नजरेच्या अंदाजावरून जहाजाची दिशा ठरवण्यास सुरुवात केली. समुद्री भाषेत याला फ्लाय बाय म्हणतात. फ्लाय बाय किंवा सेल बाय करण्याचे कारण म्हणजे प्रवाशांना पाण्यातून किनार्याचे वेगळे रूप दाखवणे.. आणि किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये जहाज बद्दल उत्सुकता निर्माण करून जाहिरात करणे.

कॅप्टन, फर्स्ट ऑफिसर, सेकंड ऑफिसर डेक वर होते.त्यांनी जीलीओच्या रहिवासी असलेल्या पोलोम्बोला आवर्जून सांगितले की आम्ही तुमच्यासाठी (सन्मानार्थ) सायरन वाजवू .. पोलोम्बो हा ४५ वर्षांचा समुद्रावरचा अनुभव असलेला रिटायर्ड कॅप्टन होता, आणि स्किटीनोने त्याच्या हाताखाली फर्स्ट ऑफिसर म्हणून काम बघितले होते.
समुद्र शांत होता...आल्हाददायक म्हणावा असा वारा,निवांत दिवस म्हणता यावा....१५ नॉटसच्या वेगाने जहाज पुढे जात होते ,बेटा पासून अर्धा मैल अंतरावर आल्यानंतर बोटीची दिशा बदलून तिला जास्त खोल पाण्यात नेण्यासाठी वळवण्यास सुरुवात केली .. पण या अवजड बोटीसाठी हा वेग बराच जास्त होता.
जहाज सुरक्षित असण्यासाठी लागणारी पाण्याची खोली फक्त २६ फुट होती,या मुळे जहाज खरे तर किनाऱ्याच्या बरच जवळ नेता येऊ शकते..वळवायला सुरुवात केल्यानंतर सुद्धा जहाज किनाऱ्याच्या जवळ येत होते..अंतर असावे २०० यार्डाच्या आसपास ..
पण वळवतानाचा वेग बराच जास्त होता...१५ नॉटस आणि हजार टनाचा प्रचंड इनर्शिया... किनाऱ्यापासून ६०० फुट अंतरावर असताना एका ग्रॅनाईटच्या खडकाला जहाजाचा पुढचा भाग ओलांडून गेला ,पण आकृतीमध्ये दिसत असलेल्याप्रमाणे अर्धवट वळण घेत असताना, मागच्या भागाची डावी बाजू एखादा बियरचा कॅन उघडावा त्या प्रमाणे उघडली गेली (स्थानिक वेळ-९.४६ मिनिटे ).
तळाला ५६ मीटर लांबीचे भगदाड पडले .. किनाऱ्यावरील प्रत्यक्षदर्शीन् नुसार जहाज नेहमी बऱ्याच कमी अंतरावरून जात होते. पाताळामधून आल्यासारखा खोल खर्जातला आवाज किनाऱ्यावर सुद्धा ऐकू गेला होता ...पुढचे काही तास प्रवाशांना आयुष्यभर पुरणारे अनुभव देणार होते....
क्रमशः

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

थरारक वर्णन आहे मन्दार
सुरुवात जबरदस्त आवडली

पुढील भाग लवकर टाका
नकाशांमुळे तुमच्या लेखाला एक वेगळेच वजन प्राप्त झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आँ, कुठाय नकाशा? पुन्हा हाईट विड्थ ट्यॅग विसर्लेले दिसताय्त. आय. ई. ९ आयायायय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा

विसुनाना म्हणूनच आम्ही ऑफिसातल्या कामासाठीच आय.ई. ब्राऊजर वापरतो Wink
डेव्हलपर जाम वैतागतात इश्यू फिक्स करायला... कारण ते फायरफॉक्स वापरतात Blum 3

जालीय भ्रमणासाठी क्रोम व फायरफॉक्स ला पर्याय नाही Smile
आय.ई. मध्ये इमेजेस आहेत हेच कळत नाही व लेखाचे सौंदर्य डागाळते.

अवांतरः तुमची आय.ई.९ ची फजिती मी स्वतः अनुभवून पाहिली. काय विचित्र दिसते हो त्यात.लेख एवढा रंगीत चित्रे आणि नकाशांनी बहरलेला आणि दिसते फक्त टेक्स्ट Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत रोचक थरारक लेख!
पण ते क्रमशः नाही आवडत अशा लेखांना. पुढचा भाग लवकर येउद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थरारक आणि खिळवून ठेवणार वर्णन

पुभाप्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

छान सुरूवात. फोटो आणि नकाशे दिल्यामुळे चित्र डोळ्यासमोर उभं रहायला मदत झाली. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादक महोदय,तेवढे इमेजचे ट्यॅग दुरुस्त करा हो. थँक्यू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डन.. अजून कोणते चित्र रहिले आहे काय?
माझाही जुना ब्राऊझर असल्याने चित्रे पाहिली नव्हती. आता लेख पुन्हा वाचला. अधिक कळला आणि आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वान्चे मनापासून धन्यवाद Smile
आधी कधी काही लिहिलें नसल्याने काहीसा दबकतच धागा काढला पण प्रतिसाद बघून खूप बरे वाटले ..
पुढच्या वेळेला फोटो निट टाकायचे बघतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0