सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ३)

सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग १)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग २)

श्लाफ्लीने आपल्या पहिल्या पत्रात लेन्स्कीचा सगळा डेटा मागितला हे आधी लिहिलेलंच आहे. त्या पत्रात 'आम्हाला काहीतरी संशय निर्माण झालेला आहे, आणि आम्हाला हा विदा तपासून बघण्याचा हक्क आहे, आणि तुम्ही तो देणं हे तुमचं कर्तव्य आहे.' हा अधिकारवाणीचा स्वर लावला होता. त्याला लेन्स्कीने अत्यंत नम्र उत्तर दिलं. त्याचं हे जवळपास शब्दशः भाषांतर [वाक्यांची रचना किंचित बदललेली आहे, काही ठिकाणी कंसांत अधिक माहिती पुरवलेली आहे]

"प्रिय श्री. श्लाफ्ली,

मी तुम्हाला अशी सूचना करेन की तुम्ही मूळ पेपर वाचावेत. बहुतेक महाविद्यालयांत ते मिळतील अगर डाउनलोड करून वाचता येतील. माझ्या स्वतःच्या वेबसाइटवरही ते आहेत, पहा - पब्लिकेशन क्र. १८०. तुम्ही मांडलेल्या तीन मुद्द्यांना थोडक्यात उत्तर खालीलप्रमाणे.

१. '...तुमचा दावा असा की तुमच्या अभ्यासात तुम्हाला इ. कोलाय बॅक्टेरियात उत्क्रांतीच्या दृष्टीने फायदेशीर म्यूटेशन दिसून आलं.' आम्ही (मी, माझा ग्रुप आणि इतर कॉलॅबोरेटर्स) हे फायदेशीर म्यूटेशन नक्की काय व कसं आहे हे समजावून सांगणारे अनेक पेपर्स प्रसिद्ध केलेले आहेत. त्यात आम्ही ते कुठचं म्यूटेशन, तसंच फक्त एका जीनने वेगळे असणारे जीव तयार करण्याची पद्धत, त्यांची स्पर्धा व त्यातून त्या म्यूटेशनमुळे त्या जिवांना फायदा कसा होतो हे बारकाव्याने समजावून सांगितलेलं आहे. पहा माझ्या वेबसाइटवरच्या संदर्भांपैकी पेपर क्र. १२२, १४०, १५५, १६६, १७८. तुम्हाला त्यांतून दिसून येईल की आम्ही त्यात नक्की कुठचा जीन बदलला याबाबत काहीच दावा केलेला नाही. मात्र आम्हाला अनेक बदललेले क्लोन असे सापडले आहेत ज्यांच्यात आनुवंशिक बदल (जे बदल पुढच्या पिढीत जाऊ शकतात असे) झालेले आहेत. या बदलांचा (सायट्रेट पचवण्याची शक्ती) त्या जिवांना त्यांच्या सायट्रेटयुक्त वातावरणात जगण्यासाठी निश्चितच फायदा आहे.

२. 'विशेषकरून, ३१५०० व्या पिढीच्या आसपास तुम्हाला सायट्रेट पचवण्याची शक्ती तुमच्या एका इ. कॉलायच्या कल्चरमध्ये आढळली, जी सर्वसाधारण इ. कोलायमध्ये दिसून येत नाही, त्याविषयी आम्हाला रस आहे.' आमच्या पेपरमध्ये तुम्हाला या दाव्याला पुष्टी देणारा सर्व विदा तसंच आमच्या प्रयोगाच्या पद्धती हे दोन्ही सापडतील. वेगवेगळे शारीरिक आणि जनुकीय मार्कर वापरून आम्ही त्या पेपरमध्ये हेही सिद्ध करतो की तो Cit+ म्यूटंट खरोखरच मुळात वापरलेल्या इ. कोलाय पासून निर्माण झालेला आहे.

३. 'तुमच्या कल्चर्सपैकी एकात २०,००० व्या पिढीच्या सुमाराला ३ नवीन आणि उपयुक्त प्रथिनं निर्माण झालेली दिसली, हा मुद्दाही आम्हाला विवाद्य वाटतो' आम्ही असा कुठचाच दावा त्या पेपरमध्ये केलेला नाही. आम्ही हे दाखवतो, की २०,००० व्या पिढीच्या सुमारच्या काही इ. कोलायच्या गुणसूत्रसंचात सायट्रेट पचवू शकणाऱ्या जीवांना जन्म देऊ शकण्याची संभाव्यता निर्माण झाली होती. अशा 'अधिक संभाव्य' गुणसूत्रसंचा धारण करणाऱ्यापासून प्रत्यक्ष Cit+ म्यूटंट तयार होण्याच्या प्रक्रियेवरून खात्रीपूर्वक सांगता आलं नाही असं लक्षात येतं अजून दोन म्यूटेशन्सची गरज होती. किंबहुना, पहिल्या Cit+ म्यूटंटची सायट्रेट पचवण्याची शक्ती कमी होती. नंतरच्या पिढ्यांत ती वाढलेली दिसली. यावरून किमान अजून एक म्यूटेशन झालं आहे असा अंदाज बांधता येतो. हे सर्व मुद्दे व त्यांना आधार देणारा विदा आम्ही आमच्या पेपरमध्ये मांडलेला आहे."

तूर्तास या पत्रातल्या तांत्रिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. मात्र हे वाचून लक्षात येतं की 'कृपया आमचे पेपर आधी वाचा.' हे लान्स्की सांगतो. अर्थातच श्लाफ्लीने ते वाचले नव्हते हे क्रमांक ३ मध्ये मांडलेल्या मुद्द्यावरून दिसून येतंच. म्हणजे श्लाफ्लीचा एकतर अभ्यासाचा अधिकार नाही, त्याने ते पेपर वाचण्याचे आणि संपूर्ण प्रयोग समजावून घेण्याचे कष्ट घेतले नाहीत, आणि नक्की काय आक्षेप आहेत याबद्दल अवाक्षरही तो काढत नाही. नुसतंच 'आम्हाला काही संशय निर्माण झाले आहेत' किंवा 'आम्हाला यात विशेष रस आहे'. आणि वर उद्दामपणे 'मला तो विदा तपासण्याचा हक्क आहे, तुमची तो देण्याची जबाबदारी आहे, तेव्हा पाठवून द्या' असं तो सांगतो. असं असतानाही लेन्स्कीने ज्या नम्रपणे उत्तर दिलं तो कौतुकास्पद आहे. श्लाफ्लीने 'मी ही पत्रं आणि तुमचा प्रतिसाद आमच्या वेबसाइटवर डकवणार आहे' असं सांगितल्याचाही परिणाम असेल. जे काय असेल ते.

असं पत्र आल्यावर श्लाफ्लीने काय करावं? त्याने अधिकच उद्दामपणे अधिकार गाजवणारं पत्र पाठवलं. [वाचनीयतेसाठी काही संदर्भ मी गाळलेले आहेत]

"प्रिय प्रोफेसर लेन्स्की,

ही माझी दुसरी मागणी आहे - तुमच्या [संदर्भ] पेपरमध्ये प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षांसाठी जो मूलभूत विदा तुम्ही वापरलात तो मला पाठवण्याची.

तुमचं काम टॅक्स्पेयरच्या पैशांनी पार पडलेलं आहे. आणि PNAS च्या म्हणण्याप्रमाणे त्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करणारे लेखक हे त्यामागचा विदा उपलब्ध करून देतील. मला तो विदा स्वतःला तपासून पहायला आवडेल, तसंच इतर तज्ञांना व माझ्या विद्यार्थ्यांसाठी तो उपलब्ध करून देण्यासाठी तो हवा आहे. इतरांनीही या विद्याची मागणी केलेली आहे, आणि तुमच्या वेबसाइटवर तो प्रसिद्ध करायला काहीच हरकत नाही.

जर विदा प्रचंड मोठा असेल तर मी विशेषकरून जो विदा तुमच्या पीअर रिव्ह्युअर्ससाठी उपलब्ध होता तो मला पाठवावा. आणि मला तुम्ही पेपरात प्रसिद्ध केलेले ग्राफ किंवा सारांश नकोत, तर तुमचा मूळ विदा हवा आहे. तुम्ही अनेक ठिकाणी 'विदा दाखवलेला नाही' असं म्हटलं आहे.

हे दुसरं पत्र असल्याने तुम्ही मला हा मूळचा विदा माझ्या स्वतंत्र रिव्ह्यूसाठी देणार आहात की नाही याबाबत तुमच्याकडून मला स्पष्ट उत्तर हवं आहे. या केसमध्ये निर्माण तुमचं उत्तर किंवा त्या उत्तराचा अभाव हा माझ्या वेबसाइटवर पोस्ट केला जाईल.

ऍंडी श्लाफ्ली, B.S.E., J.D.
www.conservapedia.com
cc: PNAS, New Scientist publications "

२००८ साली जेव्हा हा पत्रव्यवहार झाला तेव्हा लेन्स्कीचा प्रयोग गेली वीस वर्षं चालू होता. श्लाफ्लीने त्याचे पेपर्स वगैरे वाचण्याच्या फंदात न पडता, आपला हक्क दाखवत संपूर्ण गेल्या वीस वर्षांचा विदा पाठवायला सांगितला. ही खास वकिली खेळी असते. त्याला नावही आहे - संशोधनाच्या ढिगाखाली गाडणं (burying the opponent in discovery). तुमच्या खटल्यात तथाकथित अभ्यासासाठी प्रतिस्पर्ध्याकडून प्रचंड मोठा कागदपत्रांचा साठा मागवायचा. एवढे कागदपत्र गोळा करणं प्रचंड वेळखाऊ आणि खर्चिक पडतं. तुम्हाला मोठ्ठा ढीग असणं फायद्याचंच ठरतं. कारण इतक्या कागदांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही तुमच्या क्लायंटला भरपूर तासांचं बिल लावू शकता. म्हणजे प्रक्रिया न्याय्य रहाण्यासाठी वकिलांना जी मुभा दिलेली असते तिचा प्रचंड गैरफायदा घेऊन सगळ्यांचाच वेळ फुकट घालवायचा. यात आशा अशी असते की जर समोरच्याला हा खर्च परवडणारा नसेल, तर तो कोर्टाबाहेर सेटल करायला तयार होईल. खरोखरच योग्य पद्धतीने चालली तर तुम्ही हरू शकाल अशी ती केस असेल तर सेटल करणं हे तुमच्या फायद्याचंच आहे.

लेन्स्कीच्या प्रयोगात नक्की काय होतं इतकं महत्त्वाचं?
(क्रमशः)

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

ऐला हा श्लाफ्ली फारच डोकेबाज आहे

लेन्स्कीच्या पोतडीत काय लपलय याची ऊत्सुकता आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

+१.

लैच हरामखोर आहे हा श्लाफ्ली, अर्थात तितकाच चलाखपण.

लेन्स्की काय करेल याची उत्सुकता ताणून धरण्यात घासूगुर्जी मस्त यशस्वी ठरलेत.

गुर्जी, आता लै ताणू नगासा. सपाष्ट इस्कटून सांगा येकाच भागात काय त्ये Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हम्म रोचक आहे. वाचतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या भागात काहीच घडलं नाही असं काहीसं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेखमाला लिहिताना मोठ्ठे भाग लिहिणं कधी कधी अंगावर येतं आणि मग लेखन थंडावतं, म्हणून हा छोट्या हप्त्यांचा प्रयोग करून बघितला. त्यामुळे वाचकांची थोडी गैरसोय होते आहे हे लक्षात येतं आहे. पुढच्यावेळी लेखनाची सोय आणि परिणामकारकता या दोन्हीचा अधिक चांगला सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला पिच्छा पुरवतोय हा पठ्ठ्या. पु भा प्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रोचक आहे.. लेखनाची लांबी वाढवावी या सुचनेशी सहमती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इंटरेस्टींग केस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile