सर्पट पंजरीका ..............

सांजवेळी फोनची रिंग वाजली. चमेलीने रिसीवर उचलून हेलो म्हटले. पलीकडून हॅलो ऐवजी "जय जय रघुवीर समर्थ "अशी गर्जना ऐकून ती दचकली. नवऱ्याच्या गावाचे सुप्रसिद्ध सर्पमित्र नागोबा फुसे उद्या सक्काळी ५ वाजता एक लग्नकार्यात हजेरी लावण्यास सदेह येऊन ठेपत असल्याची पूर्वसूचना त्यांनी फुत्कारून दिली. तिचे डोकेच फिरले. आधीच सर्दी खोकल्याने तिच्या डोक्याची वाट लागली होती त्यात सासरचे पाहुणे नेमके अनिवार्य असल्यागत तेंव्हाच का टपकतात तिला कळेनासेच झाले. तिच्या नवऱ्याचा चंदूचा मोबाईल नंबर असून ते तिलाच का सांगतात याचाही उगीच राग येऊ लागला. इतक्यात चंदूचा फोन आला. त्याला ऑफिसमधून यायला उशीर होणार होता. मग तिने सूडाने शब्दांचे विषारी बाण लगेच त्याच्यावर सोडले. त्याने नेहमीप्रमाणे त्वरित तुपात अन साखरेत घोळून तेच तिच्याकडे अलगद परतवले. आपण गरम गुलाबजाम बनून पाकात बुडतोय असे तिला वाटले.

तिने परगावी शिकत असलेल्या लेकाला फोन करून, "आपल्याकडे उद्या विचित्र पाहुणे सर्पमित्र येत असल्याने मी आजपासून बाबावरच फुत्कारत बसणार आहे", म्हणून फुस्सकन हसली. तिचा लेक, "पाहुणे गेल्यानंतर तू बाबाचा सूड घ्यायला विसरू नकोस" अशी फूस लावू लागला. पाहुणे गेल्यावर बाबाला बदडून काढेन असे ती म्हणाली. लेक म्हणाला, " आधी पाहुण्यांनाच बदडून काढ" मग ते दोघेही फिसकारत बसले. मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा, मै नागीन तू सपेरा …. असली गाणी मनात पुंगी घालू लागली. तिचे डोळे घारे असल्याने श्रीदेवीसारख्या लेन्सेस लावायची गरज नव्हती. पण … ती तर नागिण नव्हती, पण नागोबा मात्र सर्पमित्र होता. ओम फट स्वाहा !

तिने रात्री झोपण्यापूर्वी उदार हृदयाने सर्व जगाला माफ केले अन नवर्‍याला म्हणाली, "सर्पमित्राची सोय आपण वारुळात करूया गडे फुस्स." अन त्याच्याशी बोलताना ती सारखी फुस्स फुस्स फिस्स फिस्स करू लागली. स्वप्नात तिला वारूळ, गारुडी, नाग दिसले अन पुंगी ऐकू येऊ लागली. झोपेतच तिचे 'मन डोले मेरा तन डोले' झाले अन इतक्यात झालीच बाई सकाळ...

पहाटेचे ५ वाजले होते तरी डोअर बेल ऐकल्यावर नवरा चित्त्याच्या चपळाईने दार उघडायला गेला. त्याच्या गावचा पावना आला होता नं!! दार उघडले अन् "जय जय रघुवीर समर्थ"अशी भक्कम आरोळी घरात शिरली. बुटकी, स्थूल आकृती, काळा रापलेला वर्ण, टक्कल अन् अतिशय केसाळ जरा विचित्रच असलेले हात. पायात मोठ्ठा शंकरपाळा ठेवल्यागत रिकामे चौकट अंतर असल्याने तुरुतुरु डोलकर चाल होती. लोंबकळणाऱ्या लांब केसाळ हातामुळे ओरांगउटानचे मानवात रुपांतर झालेय अन् उगा शर्ट पँट घालून मानवाचा पूर्वज घरात येऊन बसलाय असे वाटत होते.

नागोबा दरडावल्यासारखे बोलत होते. "मी आता प्राणायाम करतो तुम्ही फिरायला जाऊन या" म्हणे. त्यांची आज्ञा पाळून परतल्यावर नागोबा मनमुराद घरभर सर्पटू लागले. घराची, टापटीप, स्वच्छतेची तारीफ करू लागले. सारखे चमेली, चमेलीच करू लागले. ते चंदू, चंदू का नव्हते करत याचीच तिला चिंता वाटू लागली कारण याआधी ती फक्त एकदाच तर भेटली होती त्यांना !

नवरा पोळ्या करत होता आणि ती भाजी, पोहे कॉफी वगैरे. ते सरळ ओट्याजवळ येउन दोघांच्या मध्ये फणा काढून डोलू लागले. खरे म्हणजे नवरा पोळ्या करताना ओट्याजवळ कर्फ्यू लावण्यात येतो. कोणी जवळ फिरकले तरी त्याचा भडका उडत असतो पण आज त्याच्या वाणीतून मध ठिपकत होता.

भरपूर पुस्तके पाहून नागोबा पुन्हा डोलू लागले. चमेलीच्या मित्राचे पुस्तक वरच होते अन त्याने "चमेली अन् इतर विद्वतजनांना" ते भेट दिले होते. नागोबा म्हणे, "वा वा चमेली तू विद्वान आहेस", तर ती म्हणे," मी नव्हे इतर विद्वान आहेत असे मित्र म्हणतोय." नागोबा उवाच, "कोण आहे गं तो?" ती म्हणे," माझा मित्र आहे." नागोबांची उत्सुकता शिगेला पोचली मित्र (!) ते फाजील चौकशीचे प्राथमिक खोदकाम करू लागले. तिला माहिती देताना उकळ्या फुटू लागूनसुद्धा फारसे तिखट मीठ न लावताच थोडक्यात सांगितली. नागोबा मात्र गारूड झाल्यागत तेच पुस्तक चाळू लागले.

नागोबा आंघोळ करून, कात टाकून आले अन तिला पावडर मागितली. ती अन नवरा दोघेही पावडर वगैरे लावत नसल्याने तिने कुठून तरी एक डब्बा शोधून दिला. तुम्ही दोघेही गोरे (!) आहात नं म्हणून लागत नसेल पावडर असे ते पावडर चोपडून म्हणे. देवघरात लुडबुड करून उदबत्ती शोधून लावली अन ती केळ्यात टोचून त्या धुरांची वलये लपेटून जप फिसकारू लागले. नाश्ता झाल्यावर चंदूने त्यांना लग्नकार्याला सोडले. त्यांचे तिथले काम ४ वाजेपर्यंत संपणार होते, ते चमेलीला म्हणे, "तू ४ पर्यंत ऑफिसातून आलीस तर मी ४ वाजता येईन." तिच्या अंगातून भीतीची एक लहर दौडत गेली ती म्हणे," नाही मी ५. ३० पर्यंत येईन." चंदूने त्यांना खुशाल घराची किल्ली दिली. तिला हुश्श झाले. संध्याकाळी तिने नणंदेला नागोबाला भेटायला बोलावले होते. नवरा लवकर येतो म्हणूनही कधी लवकर घरी येत नसेच. ती घरी आली तर सर्पमित्र येऊन ठेपलेले होतेच. त्यांना दुध लाह्यांऐवजी कॉफी बिस्किटे देऊन ती चहा पीत संवाद करायचा क्षीण प्रयत्न करू लागली. त्यांच्यात एक चमत्कारिक अवघडलेपणा जाणवत होता. पुन्हा एकदा नागोबा तिच्या मित्राच्या पुस्तकावर सर्पटले अन मलपृष्ठावरचे प्रश्न बालिश आहेत म्हणे! तिने शांतपणे नागोबाला आराम करायचा सल्ला दिला. त्यांनी थोडावेळ झोपायचा प्रयत्न केला. मग पिसाळून वेताळागत पुन्हा त्याच पुस्तकाच्या मानगुटीवर डोलत बसले.

चमेली चातकासारखी नणंदेची अन नवर्‍याची वाट पाहू लागली. चिटपाखरू फिरकेना. तिने टीव्ही लावला. अन स्वयंपाक करू लागली. शेवटी कंटाळून नवऱ्याला "त्वरित घरी ये" असा फोन केला. ढीगभर पुस्तके चिवडून नागोबा विचारू लागले तुझ्याकडे वाचायला बेस्ट पुस्तक कोणतं आहे? तिचे डोकेच फिरले. तिने पेडगावला जात, "म्हणजे ऐतिहासिक का?" विचारले. ते मित्राविषयी फाजील कोरीव खोदकाम करू लागले; "हा तुझ्या ओळखीचा आहे का? त्याचा फोन नंबर आहे का? मग लाव नं त्याला फोन; मला त्याच्या पुस्तकातले अमुकतमुक खूप आवडले आहे. मी बोलतो त्यांच्याशी." तिला बरेच वाटले तिने मित्राला फोन लावला अन् त्यांचा अफलातून संवाद ऐकत बसली. तिच्या विक्षिप्त मित्राने नागोबाला, नुकताच एक सर्पमित्र साप चावून मेल्याचे विजयानंदाने सांगितले. त्यांनी खजील हसून सर्पमित्र फाजील उत्साहाने कशा चुका करतात व मरतात असे गरळ ओकले.

नंतर मित्राला पुस्तक प्रकरण रंगवून सांगितले तर तो म्हणाला, "माझ्या पुस्तकाचा उपयोग तू पाहुणे पळविण्यासाठी करतेस हे काय बरोबर नाहीये." सर्पमित्राला आपल्या पुस्तकाने अस्वस्थ केले यामुळे मित्र मनोमन सुखावला मात्र नक्कीच!

शेवटी एकदाचा चंदू आला आणि ते तिघेही जेवले. नागोबांनी स्वयंपाक चविष्ट झालाय असे म्हणत थोड्याच वेळात शरीरातून जिथून जिथून आवाज काढणे शक्य आहे तिथून मनसोक्त आवाज काढले. वाह क्या दाद है! जय जय नागोबा समर्थ!! पुंडोबा महाराज कि जय!!

इतका विद्वान सर्पमित्र पाहुणा आला असूनही त्यांचे परखड विचार अन वक्रोक्तीपूर्ण वक्तृत्व शैलीची किंचित झलक चंदू आणि चमेलीला थोडावेळ कशीबशी ऐकायला मिळाली. त्यात नागोबांचे फारसे लक्ष नव्हते. प्रापंचिक चिंतेत ते मग्न होते १०/ १२ दिवसांनी नागकन्येचे लग्न होणार होते. रात्री १० वाजता चंदूने त्यांना गावाच्या बस मध्ये बसवून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा सुखरूप वारुळात पोहोचल्याचा अन आदरातिथ्याने भारावून (!) गेल्याचा अन पुन्हा त्याचा लाभ घायला यायचा विचार असल्याचे सांगितले.

जय जय रघुवीर समर्थ!
नागनाथ महाराज कि जय!!

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

खि खि!
लेखनशैली जबरदस्त आहे! अजुन येउद्यात..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंदु, चमेली आणि सर्पमित्र ... छान आहेत.

कथेचे शिर्षक देखील अगदी चपखल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

ठ्ठो! मस्त!
लेखिकेचे नाव वाचुन लेख लगेच उघडला त्याचे सार्थक झाले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>> नागोबा मात्र गारूड झाल्यागत तेच पुस्तक चाळू लागले.
>>> नागोबा आंघोळ करून, कात टाकून आले अन तिला पावडर मागितली.
>>> त्यांचे परखड विचार अन वक्रोक्तीपूर्ण वक्तृत्व शैलीची किंचित झलक चंदू आणि चमेलीला थोडावेळ कशीबशी ऐकायला मिळाली.
Smile

लेख मस्तच. 'वक्रोक्तीपूर्ण' विशेष आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिस्क्लास लेख!

'पसंत सखू' या ब्याटम्यानदत्त नामाभिधानाशीही सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पसंत सखू!!!!

तुमचे लेख लैच पसंतीस उतरले आहेती. आमुचेकडोन शाल-श्रीफल अन (गॉथमच्या मॅडिसन चौकातील) उद्यानातल्या रमण्यात दक्षिणा तुम्हाला Smile

ब्रूसाजी बिन थॉमसाजी भट गॉथमकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'पसंत सखू' हे नामकरण आवडलं.

या पाहुण्यांनी हे वाचलं तर कुठून मला अशी फूस लावली असं म्हणतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"फूस लावणे" आवडल्या गेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छे छे ! हे कय भलतच , बॅटमॅन कडुन शाल आणि श्रीफळ ?? शीर्षासनात
लटकण्याची विद्या तरी द्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो ते लटकणे वगैरे स्पायडरमॅन, आम्ही नै कै Smile आमच्याकडे सुपरपॉवर नाही कंचीबी तरी आमी सुपरहीरो अन जस्टिस लीगचे सर्वेसर्वा हौत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन उलटं टांगण्याची प्रॅक्टिस करत असतो हे मी माझ्या स्वत्ताच्या चक्षुर्वैसत्यम डोळ्यांनी बघितलं आहे, लय जुन्या काळी बॅटमॅन शिण्मा आला होता त्यात.

आमच्याकडे सुपरपॉवर नाही कंचीबी तरी आमी सुपरहीरो अन जस्टिस लीगचे सर्वेसर्वा हौत

हा हा, टेक्निकल स्किल्स नसलेल्याला म्यानेजर करतात, त्यातलीच ही गत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म अस्तील, जुण्या पिच्चरमध्ये अस्तील, पण नोलानाचार्यांच्या संहितेत तस्लं कै नै.

हा हा, टेक्निकल स्किल्स नसलेल्याला म्यानेजर करतात, त्यातलीच ही गत.

जोर्दार असहमत. जस्टिस लीगमध्ये बॅटमॅन आपला पूर्ण टेक्निकल सपोर्ट देत असतो, अख्खे स्पेस स्टेशन, एक विमान अन अजून लै कायबाय देत असतो. बाकीचे लोक निस्ते दांडगे अन नंगे असतात.ही इज द ब्रेन बिहैंड दि लीग- वे आउट्टा दि यूज्वल लीग Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक जुनाच विनोद आहे "सुपरमॅनला सुपर होण्यासाठी कपडे काढावे लागतात, बॅटमॅनला सुपर होण्यासाठी कपडे घालावे लागतात".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दंडवत.
मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सर्पमित्राचे वर्णन वाचून , संस्थळावरीलच एक व्यक्तिमत्व कसे दिसत असेल याची कल्पना केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नागोबा आंघोळ करून, कात टाकून आले अन तिला पावडर मागितली.

हे वाचून खूर्चीवरून पडलो!! तुमच्याकडे असेच वन्यजीव येत राहोत. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

Wink सावळे आणि काळे लोक पावडर चोपडुन ममीमधे रुपान्तरीत का होतात काय कळत नाय . Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ममी नाय हो.. आम्ही त्येन्ला 'खारा दाणा' म्हण्तो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सखूबाई, तुम्ही कधीतरी ऑफिशियल रूपककथा लिहा. मस्त जमून येईल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला फकस्त काफी मन्दी च्या मारी भिस्कुट बुचकाळुन खायाले जमते . Blum 3
ओफिशियल रुपक कथा म्हन्जे काय प्रकर्ण हाय ब्वा ? :-S

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना दुध लाह्यांऐवजी कॉफी बिस्किटे देऊन ती चहा पीत संवाद करायचा क्षीण प्रयत्न करू लागली.

असली बरीच भन्नाट वाक्यं पुन्हा शोधून कॉपी पेस्ट करण्याचा कंटाळा आल्याने उद्धृत करत नाहीये.

तुम्हाला अशीच माणसं, प्रसंग भेटत राहोत, आणि त्यांचं तुम्ही अशाच चमत्कृतीपूर्ण भाषेत त्यांची वर्णनं द्यावीत ही लेखाबादप्रमाणेच सदीच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0