पिसाटाची झडपसंस्कृती


पिसाटाची झडप
संस्कृती गडप
रक्ताळले पार
अंधारात

हातात टाळ
गळ्यात माळ
कडोमाची अॅड
रानोमाळ

विट्यालाही नाद
लागला सीडीचा
त्याचेही दार
बंद आता

अभगाचा गळा
डोल्बीने चिरला
गावही रंगला
दाडीयात

देहाच्या वराती
बोळात सजल्या
नासवल्या पोरी
रातोराती

भगार जगणे
भगारली रात
वासनेचे गीत
गिधाडे गाती

पिसाटले थवे
बोकाळल्या झुडी
माणुसकीची मुंडी
मुळगळली

- जयप्रभू कांबळे

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

वाचनीय, अनुस्वार वगैरे मराठी लेखनाच्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिले तर आस्वाद अधिक उत्तम होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर स्वागत. कवितेच्या नावात अर्क छान उतरला आहे. संस्कृतीचा बाजार, आणि बाजार हीच संस्कृती होण्याची व्यथा छान व्यक्त झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेमक्या शब्दात प्रभावी कविता. आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

छान... कविता आवडली...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

खूप प्रभावी आणि छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0