देखण्या घुबडाची निर्मम हत्या

१८ डिसेंबर २०१२ रोजी सकाळचाच सुमार होता. एकदमच कावळ्यांची काव काव ऐकू येऊ लागली. खिडकीतून पाहतो तर शेजारच्या सोसायटीत स्टिल्टमध्ये एक देखणे घुबड बसलेले. भोवती सात आठ कावळे, काव काव करत त्याची पिसे ओढत होते.

ह्या फोटो नंतर मी अनेक फोटो काढले. त्रस्त झालेले घुबड जागा बदलत उंच उडून जाण्याचा प्रयत्न करत होते. कावळे त्याची पिसे ओढत होते. अखेरीस मी व्हिडीओ शुटिंगच सुरू केले.

मी असाही विचार केला की, निर्मम हत्या पाहत असता, शुटिंग कसले करायचे दळभद्र्यासारखे! त्यापेक्षा त्याला वाचवायला काय हरकत आहे? मग तोही प्रयास केला. पण आपला हस्तक्षेप केवळ त्याला दूर दूर नेऊन सोडतो आहे असे समजून आल्यावर, आणि दूरवरच्या सोसायट्यांत त्याचा पाठलाग करणेही शक्य नसल्याने, घरातूनच कॅमेर्‍याचे साहाय्याने जिथवर शक्य होते तिथवर वेध घेतला. हस्तक्षेप शक्य होत नव्हता.

मला हेही नीटसे कळेना की कावळे त्यावर इतका कडाडून हल्ला का करत आहेत? रात्री कदाचित जेव्हा कावळ्यांना अंधारामुळे काही दिसत नाही, तेव्हा हा त्यांची अंडी खात असू शकेल.

काय असेल ते असो. मात्र जेव्हा ते घुबड गंभीररीत्या जखमी होऊन, कॅमेर्‍याच्या नजरेबाहेर पडले तेव्हा, त्यातील क्रूरतेपोटी मला शुटिंग सुरू ठेवणे शक्यच राहिलेले नव्हते.

जीवो जीवस्य जीवनम्‌ ! हा तर जीवनाचा नियमच आहे. सुंदर दिसणारे देखणे घुबड, कावळ्यांकरता कदाचित क्रूर शत्रूही ठरत असेल. मात्र कावळ्यांच्या क्रूर हल्ल्यात ते ठार झाले हेही तर सत्यच होते.

मला प्रश्न पडला की, सत्य नेहमीच मनोहर असते का? चांगले असते का?

.
http://nvgole.blogspot.com/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मग तोही प्रयास केला. पण आपला हस्तक्षेप केवळ त्याला दूर दूर नेऊन सोडतो आहे असे समजून आल्यावर, आणि दूरवरच्या सोसायट्यांत त्याचा पाठलाग करणेही शक्य नसल्याने, घरातूनच कॅमेर्‍याचे साहाय्याने जिथवर शक्य होते तिथवर वेध घेतला. हस्तक्षेप शक्य होत नव्हता.

हा भाग स्पष्ट झाला नाही. त्या घुबडाला वाचवण्याचा अजिबात प्रयत्न केला नसता तरी समजण्यासारखं होतं पण वरील हस्तक्षेपाचं स्वरुप कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्य नेहमीच मनोहर असते का?

सत्य बर्‍याचदा गैरसोयीचे पण असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad

हम्म..नाइलाज असतो बर्‍याच वेळेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शीर्षक वाचून मला एखादी आधुनिकोत्तर कविता अपेक्षित होती. अपेक्षांभंग झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रात दिसते आहे ते गव्हाणी घुबड आहे. 'बार्न आउल' असे इङ्ग्रजीत म्हणतात. याचे खाणे बहुतांशी उन्दीर-घुशी असते. कावळ्याञ्ची अण्डी खात असेल असे वाटत नाही. पिले जरूर खात असेल.

तुम्ही टिपलेल्या घटनेत सत्य काय आहे ? तर चार पाच एका जमातीचे जीव दुसर्‍या जमातीच्या एका जिवाच्या पाठी लागले आहेत आहेत आणि तिसर्‍या जमातीचा एक जीव ते पाहत आहे. घुबड 'सुन्दर' आहे, कावळे 'क्रूर' आहेत, हे झाले सत्याला तिसर्‍या जिवाने त्याच्या परीने दिलेले अर्थ. सत्य मनोहर, चाङ्गले, वाईट, कटू, इ. गोष्टीन्त कशाला पडायचे ते कळले नाही.
ते जसे असते तसे स्वीकारावे कारण ते सत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.

कावळे क्रूर असले वा नसले, किंवा चार्-पाच कावळ्यांनी (एका जमातीच्या पक्ष्यांनी) एका घुबडाला (दुसर्‍या जमातीच्या पक्ष्याला) डिवचून मारणं कितीही नैसर्गिक असलं तरी मला ते एक त्रयस्थ म्हणून बघवलं नसतं, त्याचे फोटो काढायचं तर दूरच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

पूर्ण वाढ झालेलं बार्न आउल तस कावळ्यापेक्षा मोठं असतं...हे लहान वाटतय...पिल्लू असावं. कावळे एकजूटीने घारी, गरूड, शिक्रा वगैरेंच्या मागे लागून त्यांना त्यांच्या 'राज्यातून' हुसकावून लावतात.तसच, नको तिथे, नको त्यावेळी दिसल्यास घुबडांनाही हुसकावत असावेत.
या प्रसंगात माणसांनीच या घुबडाला कावळ्यांच्या आधी पळवून लावले नाही हेच आश्चर्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक आणि ऋता यांच्याशी सहमत आहे. शिवाय यात "जीवो जीवस्य जीवनम्" असे काही नाही, असेही मत नोंदवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सत्य नेहमीच मनोहर असते का?

ते जसे असते तसे स्वीकारावे कारण ते सत्य आहे.

नेचर रेड इन टूथ ऍंड क्लॉ असं टेनिसनने म्हटलेलं आहेच. ही सृष्टी सिमेंट कॉंक्रीटच्या भिंतींपलिकडे आपल्या दृष्टीआड आपण ठेवलेली आहे. तिचं असं अचानक दर्शन झालं की काहीसं हादरून होण्याइतकी आपली मनोवृत्ती नाजूक झालेली आहे. सिद्धार्थाला दुःखाचं दर्शन झाल्यावर जसा हलवून टाकणारा अनुभव आला, तसं काहीसं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देखण्या घुबडाची निर्मम हत्या

समजा ते घुबड देखणे नसते, तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा ते घुबड देखणे नसते, तर?

हुशार कावळ्यांचे शौर्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि, तर्कतीर्थ, बॅटमन, अतिशहाणा, अमुक, अनामिक, ऋता, निले, राजेश, न'वी' बाजू व नगरीनिरंजन
सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

गवि,
त्या घुबडाला वाचवण्याचा अजिबात प्रयत्न केला नसता तरी समजण्यासारखं होतं पण वरील हस्तक्षेपाचं स्वरुप कळलं नाही.>>>>त्याला वाचवण्याकरता कावळ्यांना हाकलायला जावे तर घुबडच उडून दूर कुंपणावर जाऊन बसत असे! शेवटी तुम्हाला अभिप्रेत आहे तसेच घडून आले!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि, तर्कतीर्थ, बॅटमन, अतिशहाणा, अमुक, अनामिक, ऋता, निले, राजेश, न'वी' बाजू व नगरीनिरंजन

न'वी' बाजू नव्हे. 'न'वी बाजू.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0