दुल्हेराजा....

गोविंदाचा दुल्हेराजा मी नक्की किती वेळेस पाहिला असेल ह्याचीही नोंद ठेवणं सोडून दिलय. हा चित्रपट म्हणजे जितेंद्रचा कसा "हिम्मतवाला" हा आयकॉनिक चित्रपट होता; "ब्रँड-जितेंद्र" हा दृढमूल कलडरणारा आणि ती क्याटेगरी ठसठशीत मांडणारा होता; तसाच "ब्रँड गोविंदा" स्पष्ट, लख्ख मांडणारा म्हणजे दुल्हेराजा.
.
दुल्हेराजा म्हणजे गोविंदा -रविना नायक - नायिका असा लक्षात राहण्यापेक्षाही चटकन आठवेल तो कादर खान- गोविंदा ह्यांची जुगलबंदी म्हणूनच. "अक्खियों से गोली मारे" हे हिट्ट गाणं असेलही; पण सोबतीलाच चित्रपटात धमाल येते "सुनो ससुरजी..." गाण्याच्या आधी आणि आसपासच्या वेळात ज्या काही उचापती आणि चढाओढ कादर खान - गोविंदा ह्यांच्यात चालते ;त्यावरून.
.
आख्ख्या चित्रपटात फारसे "पाहून अंगावर काटा आला", किंवा "विचार करायला लावणारा प्रसंग आहे" असे म्हणायला लावतील असे प्रसंग जवळपास नाहितच. पण "फुटलो", "हैट आहे साली." ,"ह्ही ह्ही ह्ही ....ओ ह्हो ह्हो ह्हो..ह्ये ह्ये ह्ये" असे करुन ठो ठो हसवणारे प्रसंग मात्र चिकार. किंबहुना अशा धमाल गोष्टींची मालिका म्हणजेच दोन अडिच तासाचा हा चित्रपट. विनोदाचं "टायमिंग" हा शब्द शिकायचा असेल तर हे अडीच तास तुमच्यासाठी वस्तुपाठ असतील.
मारामारीचा प्रसंग आहे?
.
दिवसभर फार काम झालय; आता बराच थकवा आलाय. डोक्याला फार ताण नकोय; चार घटका थोड्या हसत्या खेळत्या वातावरणात जाव्यात म्हणून वेळ घालवण्यासाठीचं औषध म्हणून टी व्ही वर "ये ढाबा गिरा के रहूंगा" म्हणणारा कादर खान दिसला तर च्यानल बदलू नकाच. पहाच्.दोन चार तासानी थकवा कुठल्याकुठं गेल्यासारखा वाटेल. एकदम हल्क्या फुलक्या मूडमध्ये तुम्ही आलेले असाल.
.
चित्रपटात दे दणादण अशी मारामारी नाही. जी आहे तीसुद्धा विनोदी बाजानच घेतलेली; एकूणात सगळ्या मूडला साजेशी. रिक्षावाल्याशी व्हिलन मोहनिश बहलचे भांडण झाल्यावर मोहनिशचे कौतुक करत करत त्याचा गेम घेणारा गोविंदा क्लास; तो प्रसंग लिहिणारा कादर खान सुप्पर क्लास.
.
कुठल्याही क्लायमॅक्सला हिरोइन्-पळ्वणं; किडनॅप वगैरे प्रथेनुसार ह्यातही आहे; पण इथे त्यानंतरची अपेक्षित दण्णादण्णी हिरो करीत बसत नाही. तो पुन्हा डोक्यानंच काम घेतो. लोकप्रिय होण्यासाठी अजून काय हवं? पिक्चर हिट्त आहेच. पण एरव्ही गोविंदा आणि गँगवर होनारा थिल्लरपणाचा किंवा ओंगळवाणेपणाचा आरोप इथे तितका प्रखर रहात नाही."सरकायल्यो खटिया जाडा लगे" गाण्याचा आणि शक्तीकपूरच्या गेंगाण्या आवाजातला "राजाबाबू आ गये" हया विचित्र सवयीच्या राजाबाबू किंवा तत्सम इतर चित्रपटांइतकं ह्यात ओंगळ्वाणेपणा नाही.आहे तो वेळ छान जाण्यासाथी निव्वळ विनोद.
ह्याला कुणी थिल्लर, बाष्कळ म्हणतही असेल. किंवा "उच्च दर्जा नसलेलं" असं म्हणतही असेल. पण भेळ खाताना आपण "मस्त लागतिये आंबट गोड, तिखट जाळ " म्हणत खातोच की. भेळेमध्ये पोषणमूल्यं आपण शोधत नाही.
.
कित्येक कलांमध्ये "अभिजात सादरीकरण", किंवा "अभिजात कला" असा काहीतरी प्रकार असतो. पण तसाच "लोककला " हाही प्रकार असतो. तो बहुसंख्यांशी घट्ट नाळ जोडून असतो.त्याच धर्तीवर कधी "अभिजात चित्रपट" अशी कधी यादी पुन्हा बनवायची झालिच तर त्यात दुल्हेराजा येणार नाहिच; तो "लोकचित्रपट" ह्या प्रकारात नक्कीच येइल लोककलांत सारच कसं रांगडं; ठसठशीत, ठाशीव असतं; सूचक,सौम्य असा बाज त्यात नसतो. तसाच मोकळेपणा अगदि कॅरेक्टारायझेशनपासून ते चित्रीकरणापर्यंत तुम्हाला ह्यात सापडेल.
.
गोविंदा डान्सर म्हणूनही चित्रपटात मानला जातो. पण रूढार्थानं त्याचं नृत्यकौशल्य,चापल्या,लवचिकता हृतिक-प्रभुदेवा ह्यांच्या जवळपासही जात नाही. तितकी चपळता त्याच्या नृत्यात दिसत नाही. मग तो काय किंवा "मेरे पिया गये रंगून " मध्ये रमून जाणारे मास्टर भगवान काय किंवा "छोरा गंगा किनारेवाला" मध्ये नाचणारा अमिताभ काय ह्यांचा पडद्यावरचा गाण्यातला वावर इतका जनप्रिय का ठरतो. कारण तेच :- ते जे करतात त्यात समरसून करताना दिसतात. गोविंदा ड्यान्स करताना स्वतः अगदि कम्फर्टेबल असतो. नृत्याचा तो आनंद घेतो. त्यामुळे ही मंडाळी फारशा शारिरिक कवायती नृत्यात करताना दिसली नाहित तरी ते पाहताना छान वाटते. ते गाण्याच्या लयीत जणू सामावून जातात. आम पब्लिकला त्यांच्या ह्याच गोष्टी जवळच्या वाटत असाव्यात.
.
तुम्ही अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर आवर्जून पहा. एकदा पाहिला असेल; तर पुन्हा एकदा पहा आणि मूड मस्त हल्का फुल्का करुन घ्या.

टिप :- दुल्हेराजा आणि राजाबाबू हे वेगळे चित्रपट आहेत. दुल्हेराजा गोविंदा- रवीनाचा तर गोविम्दा-करिश्माचा जोडिचा राजाबाबू.
--मनोबा

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मनोबा

दुल्हेराजा या चित्रपटाचे छानच रसग्रहण केले आहे तुम्ही.
मी पण एक दीड आठवड्यापूर्वी कुठल्याश्या चॅनेलवर हा चित्रपट पाहिलाय. एव्हरग्रीन या शब्दाचा अर्थ अशा चित्रपटांकडे पाहून कळतो.
नर्म विनोद आणि अफलातून टायमिंग आहे या चित्रपटात. कितीही वेळा पाहून कंटाळा नाही येत.
खूप मस्त रसग्रहण केलेय तुम्ही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त रसग्रहण रे मनोबा. गोविंदा-कादर खान ही जोडीच अफलातून आहे. काय हसायचो हे पिच्चर बघून....अजूनही तसेच हसतो म्हणा. डोक्याला त्रास नाही, एकदम निर्भेळ करमणूक. डोके अंमळ बाजूला ठेवले की काम झाले. असे पिच्चर कमीच असतात एकूण. बर्‍याच पिच्चरमध्ये डोके बाजूला ठेवले तरी बोअर होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पहायला हवा.
बादवे गोविँदा ला ड्यान्स च्या बाबतीत भगवानदादा, अमिताभसोबत टाकल्याबद्दल निषेध.
जाड झाल्यावर एवढा ग्रेस राहीला नसेल त्याच्या डान्स मधे, पण बारीक होता तेव्हा, निलम, सोनम, किमी, चंकी बरोबरचे त्याचे चित्रपट, मस्त डान्स करायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

बादवे गोविँदा ला ड्यान्स च्या बाबतीत भगवानदादा, अमिताभसोबत टाकल्याबद्दल निषेध.

प्रभुदेवा सारखा डान्सर नसेल. पण प्रभुदेवाकडून आपण अ‍ॅक्टिंगची अपेक्षा ठेवत नाही. गोविंदाकडून थोडीफार ठेवता येते.

जितेंद्रपेक्षा चांगला डान्सर होता गोविंदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सर्वात लक्षात राहणारा विनोद* म्हणजे कादर खान मॅनेजर प्रत्येक वेळी (फितूर) जॉनी लिव्हरला विचारतो, "तुम मेरी तरफसे हो या उसकी तरफसे?" तेव्हा जॉनी लिव्हर "आपकी तरफसे" असे तोंडाने म्हणतो आणि बोट मात्र गोविंदाच्या दिशेने दाखवतो.

*हा विनोद याच चित्रपटात आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जुन्या आठवणी उजळल्या हे वाचून. हा आणि असे बाकीचे गोविंदाचे पिच्चर आले तेव्हा मी कालिजात होतो.
'अखियोंसे गोली मारे', 'किसी डिस्को में जायें' वगैरे गाण्यांनी तेव्हा धुमाकूळ घातला होता. आमच्या 'खोली'वर टेपच्या डबड्यातून हीच गाणी अखंड वाहत असायची आणि आमचा एक डागदर होऊ घातलेला मित्र ही गाणी ऐकताना गोविंदास्टाईल नाचल्याशिवाय राहू शकत नसायचा.
विशेषतः किसी डिस्को में मधलं त्याचं ते 'उहू उहू' डोक्यात फिट्ट बसलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+११११११११११११११११.

विशेषतः किसी डिस्को में मधलं त्याचं ते ऊऽह् डोक्यात फिट्ट बसलं आहे.

उहू उहू ऐवजी ऊऽह् ऊऽह् असे वाचावे Wink "उहू उहू" ही हम आपके हैं कौनची स्पेशॅलिटी आहे. बाकी ते आमच्याही डोक्यात फिट्ट्ट बसलेय हेवेसांनल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किसी डिस्को में जायें हे माझंसुद्धा अगदी आवडतं गाणं! त्यावेळी शाळेत होते पण आताही हे गाणं ऐकलं की नाचल्याशिवाय रहावत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

गाणं मिळवलं. मोबाईलमध्ये साठवलं आहे. भेटशील तेव्हा हे गाणं वाजवेन. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किसी डिस्को में मधलं त्याचं ते 'उहू उहू' डोक्यात फिट्ट बसलं आहे.>>> माझ्याही Smile त्याशिवाय हे गाणे गुणगुणताच येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै भारी. मी दुल्हेराजा गोविंदा आणि रवीना टॅंडन पेक्षा जास्त वेळा पहिला आहे. साल गावाला जाताना बस मध्ये हाच पिक्चर लावायचे. प्रत्येक वेळा बघताना लै हसू येते. गोविंदा असरानि ची घेतो ते खुपच अफलातून आहे. गोविंदा च्या नाचाबाद्दल काय बोलायच. रितिक आणि शाहीद पेक्षा पण गोविंदा हा माझा आवडता डॅन्सर : ). जाता जाता एक अवांतर. या चित्रपटाचा दिग्दर्शक हर्मेश मल्होत्रा हा ऑस्कर ला जाणार्‍या भारतीय चित्रपट जी समिती निवडते त्यावर होता. त्याकाळात कसले कसले चित्रपट ऑस्कर साठी गेले असतील आपल्याकडून बघा : ) पण दुल्हेराजा खुल्लम खुल्ला प्यार करे असले चित्रपट रिलीस झाआल्यावर त्याच्याविरुद्ध मीडीया ने लै बोंबाबोंब केली की असला माणूस कसा ऑस्कर ला जाणारा चित्रपट कसा निवडू शकतो म्हणून. मग मल्होत्रा साहेबाना जाव लागल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

पुर्ण चित्रपटभर जबर टायमिंग असलेला गोबिंदाचा हा एकमेव चित्रपट असावा, मराठीत असंच लक्ष्मीकांतच जबरदस्त टायमिंग असलेलं नाटक आठवतं ते 'शांतेच कार्ट चालू आहे'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोविंदाचे चित्रपट ही माझी आवड नसली तरी त्याच्या नृत्यकौशल्याबद्द्ल आदर आहे.

गोविंदा डान्सर म्हणूनही चित्रपटात मानला जातो. पण रूढार्थानं त्याचं नृत्यकौशल्य,चापल्या,लवचिकता हृतिक-प्रभुदेवा ह्यांच्या जवळपासही जात नाही. तितकी चपळता त्याच्या नृत्यात दिसत नाही. मग तो काय किंवा "मेरे पिया गये रंगून " मध्ये रमून जाणारे मास्टर भगवान काय किंवा "छोरा गंगा किनारेवाला" मध्ये नाचणारा अमिताभ काय ह्यांचा पडद्यावरचा गाण्यातला वावर इतका जनप्रिय का ठरतो. कारण तेच :- ते जे करतात त्यात समरसून करताना दिसतात. गोविंदा ड्यान्स करताना स्वतः अगदि कम्फर्टेबल असतो. नृत्याचा तो आनंद घेतो. त्यामुळे ही मंडाळी फारशा शारिरिक कवायती नृत्यात करताना दिसली नाहित तरी ते पाहताना छान वाटते. ते गाण्याच्या लयीत जणू सामावून जातात. आम पब्लिकला त्यांच्या ह्याच गोष्टी जवळच्या वाटत असाव्यात.

या परिच्छेदातील "गोविंदा ड्यान्स करताना स्वतः अगदि कम्फर्टेबल असतो. नृत्याचा तो आनंद घेतो." या ओळी सोडल्यास संपूर्ण परिच्छेदाशी असहमत. गाण्याची जाण असल्यामुळे लय आणि ताल त्याच्या अंगात भिनलेले आहेत. दुर्दैवाने, केवळ लोकप्रियतेच्या आहारी जाऊन, किंवा तशाच प्रकारचे चित्रपट मिळाले म्हणून, त्याचे नृत्यकौशल्या फारसे दिसून आले नाही. माझ्या माहितीप्रमाणे, त्याने डिस्कोसारख्या काही नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण घेतले आहे. नुकतेच पाहिलेले त्याचे हे 'भेळपुरी' नृत्य. भेळपुरी येवढ्याचकरता की यात, डिस्को, रोबोटिक्स, मूनवॉक आणि बॉलिवूड असे अनेक प्रकार एकत्रित केले आहेत. यात त्याच्याबरोबर नाचणार्‍या इतर मुली व्यवसायाने नर्तिका/नृत्यदिग्दर्शिका आहेत, त्याच्यापेक्षा वयाने बर्‍याच लहान आहेत, पण त्यांच्या तोडीचे गोविंदा नाचला आहे. चेहर्‍यावरच्या भावांचा विचार केल्यास, तो या मुलींच्या अनेक पावले पुढे आहे.
https://www.youtube.com/watch?v=8bFWE1pS3EE

भगवान आणि अमिताभ यांच्या नृत्यचापल्याशी गोविंदाची तुलना करणे अन्यायकारक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रभुदेवा किम्वा हृतिक किम्वा हल्लीच्या DID मध्ये येणार्‍या पब्लिकच्या मानानं त्याच्या शारिरीक कवायती तितक्या दिसत नाहित. असे आम्ही म्हणतो तेव्हा गोविंदाला ड्यान्स येत नाही असे आमचे म्हणणे नाही. लय आणि ताल त्याच्या अंगात चांगल्यापैकी भिनले आहेत हे मान्य आहे. उलट त्यामुळेच ड्यान्स करताना त्यात तो शोभून दिसतो; विजोड्,बोजड विचित्र वाटत नाही.(विजोड बोजड ड्यान्स चा नमुना पहायचे असल्यास अभिषेक बच्चन, राज बब्बर ह्यांची काही गाणी पहावीत. ताल भिनला नसल्याने ते त्यात अवघडल्यासारखे वाटतात. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गोविंदाला ड्यान्स येत नाही असे आमचे म्हणणे नाही

तर मग ठिक. गोविंदाचे नृत्य अवघडलेले वाटत नाही, कारण नृत्य हा त्याचा स्व-भाव आहे. माझ्या मते अमिताभ बच्चन यांनाही मी अभिषेक बच्चन यांच्याच यादीत बसवेन. कदाचित त्यांचे नृत्य एव्हाना 'घालून घालून किंचीत सैल झालेले असेल'..पण असो. भगवानदादांची ती एक प्रसिद्ध स्टेप सोडली, तर फारसे काही माहिती नाही त्यांच्याबद्द्ल. तेव्हा त्याबाबतीत आपला पास.
वरील उदाहरणातील रोबोटिक्स आयसोलेशन्स प्रभुदेवा, हृतिक किंवा 'डान्स इंडिया डान्स' मध्यल्या नर्तकांनी कदाचित अधिक चांगली(क्रिस्प) केली असती, पण गोविंदाच्या बॉलिवूडी नाचाची सर इतरांच्या बॉलिवूडी नाचाला आली नसती, हे ही खरंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रभुदेवा, हृतिक किंवा 'डान्स इंडिया डान्स' मध्यल्या नर्तकांनी कदाचित अधिक चांगली(क्रिस्प) केली असती, पण गोविंदाच्या बॉलिवूडी नाचाची सर इतरांच्या बॉलिवूडी नाचाला आली नसती

प्रभुदेवा आणि हृतिकची कॉपी सामान्यांना मारता येणं शक्य नाही. हे दोघे नाच करतात तेव्हा "ही फार कठीण गोष्ट आहे" असं वाटत रहातं. गोविंदा नाचताना "हे तुलाही जमेल गं/रे" असा नाचतो. अजिबात नाचता न येणार्‍या माझ्यासारख्यांना असं हृतिक आणि प्रभुदेवाचा नाच पाहून वाटत नाही. (माधुरीकडे बघूनही असं वाटत नाही.)

अमिताभ आणि अभिषेक या यादीत कृपया बॉबी देओलला बसवू नये. 'गुप्त'मधले त्याचे नाच पाहून चिक्कार करमणूक झाली होती. उदा हे गाणं पहा. अमिताभ, अभिषेक त्या ही बाबतीत अंमळ कमीच पडतात.

गोविंदाच्या कोणत्या पिच्चरमधे काय होतं आता काहीही आठवत नाही. त्या काळात डोकं बाजूला काढायचे असे बरेच पिच्चर पाहिले होते. कादर खान - गोविंदाचा हॉटेलच्या जागेवरून मारामारी असणारा पिच्चर दुल्हेराजा का? तेव्हा पुरेपूर करमणूक झाली होती. अलिकडच्या काळात परत बघितला नाही, पण बघितला तर चिक्कार करमणूक होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दीवाना मस्ताना आणि साजन चले ससुराल हे दोन चित्रपट दुल्हेराजापेक्षा जास्त चांगले असावेत असे वाटते. अर्थात साजन चले ससुरालमध्ये थोडा मेलोड्रामाही आहे. दीवाना मस्ताना आऊट अँड आऊट कॉमेडी होता. दुल्हेराजाला काही स्टोरीच नव्हती. उगीच विनोद दाखवायचे म्हणून त्याच्या आजाबाजूला एक अपहरण वगैरे काहीतरी अतर्क्य गोष्ट रचली होती असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दीवाना मस्ताना कहर आहे. म्हणजे तो इतका भन्नाट बनलाय की त्यातल्या कुठल्याच पात्रात इतर कुणाचीच कल्पनाही करणं जमू नये. अनिल कपूरऐवजी किम्वा गोविंदा किम्वा जॉनी लिव्हराइवजी त्या त्या भूमिकेत इतर कुणी कल्पून पहा.(फॉर द्याट म्याटर जॅकी श्रॉफ, शाहरुख आणि इतर अजून कुणी... शक्यच नाही.)
ते ते काम त्यात अत्युत्तम झालेलं आहे. त्यातली कथा अपेक्षित अंगानं जात राहते.(बिनडोक गोविंदाची सतत चलाख अनिल कपूर- जॉनी लिव्हर ह्यांच्यावर होणारी सरशी.) पण आख्खा चित्रपटात कधीच घड्याळ पहावसं वाटत नाही. "किती वेळ झाला सुरु होउन" असं वाटत नाही.
साजन चले ससुराल तुकड्या तुकडयत आवडला.म्हणजे तो सर्व पिक्चरच आवडला असं नाही म्हणू शकत.
हां पण एक गोष्ट नक्कीच; ह्या सर्वात गोविंदाचा जो विनोदी प्रसंगातील वावर आहे; तो विसरुच शकत नाही.
(अनिल कपूरही हाही माझा अत्यंत आवडता कलाकार(स्टार नव्हे.).(कुठल्याही खानांहून अधिकच. पण तो विषय इथे अप्रस्तुत ठरेल.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गोविँदा चा हिरो नं १ चांगला होता, बावर्ची वरुन उचलेला. साजन चले ससुराल ठिक.
खूप पूर्वी पाहीलेत त्यामुळे नक्की आठवत नाही, पण बहुतेक दुलारा नाव होतं, तो थ्रिलर पण छान होता. आणि शोला और शबनम पण चांगला होता.
रविना आणि राणी सोबत त्याने चित्रपट केले ते बोअर होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

९० च्या दशकातले डेविड धवन-गोविंदा- वाशू भग्नानि (निर्माता)-आनंद-मिलिंद (संगीत दिग्दर्शक )- समीर (गाणी)- कादर खान-शक्ति कपूर हे कॉंबिनेशन असणारे चित्रपट मनोरंजनाची हमी देणारे होते. भले लोक त्याना गल्लाभरु चित्रपट म्हणोत. दीवाना-मस्ताना तर कहर होता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

मजा आली वाचताना, आणि प्रतिक्रियाही Smile दुल्हेराजा पाहिला आहे, पण तेव्हा एकापाठोपाठ एक अशाच टाईपचे गोविंदाचे चित्रपट पाहिल्याने डोक्यात गोंधळ जाला आहे. आता पुन्हा बघायला पाहिजे. राजा बाबू, साजन चले ससुराल, कुली नं १ हे तिन्ही फुल टाईमपास होते. शाहरूख ने राजा बाबू ला 'घटिया' म्हंटल्यावर कुली नं १ की साजन चले मधल्या एका गाण्यात त्याला प्रत्युत्तर असलेले कडवे होते ('तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू' मधे). तेही जबरी उत्तर होते.

करिश्मा आधी जरा मड्डम छाप होती, पण गोविंदाच्या चित्रपटांत तिचे देशी-करण मस्त जमले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंतोतत

रसग्रहण फक्कड जमलेय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

शाहरूख ने राजा बाबू ला 'घटिया' म्हंटल्यावर कुली नं १ की साजन चले मधल्या एका गाण्यात त्याला प्रत्युत्तर असलेले कडवे होते ('तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू' मधे). तेही जबरी उत्तर होते.

हे माहित नव्हतं. त्यात 'सरकाईल्यों खटिया' गाणं घटिया असण्याचा उल्लेख आहे. बाजीगर, सर्कस सिरीयलवर आणि शाहरूख खानला नाचता न येण्याबद्दल संदर्भ आता सापडला, समजला. इथे आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्व वाचकांचे आभार.
दुल्हेराजा अवश्य पहावा असं पुनश्च सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars