आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...

ती त्याची असणं काय अन नसणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...

तिने लहरती नादान बट
लाजेपरी कानाआड अडकवणं काय...
तिच्या सोज्वळ अदावर
त्याचं ते घायाळून जाणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...

धुंद बोलक्या नजरेने
तिने त्याला मुकं करणं काय...
स्पर्शाने बहरलेले स्पर्श
त्याने हृदयात जपणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...

रातभर जागत्या वेड्या गप्पांनी
त्याने स्वप्नांचा ठिसूळ महाल बांधणं काय...
अन नश्वर वचनांचे झूठे पाढे
तिने घश्याला कोरड पडेतो घोकणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...

प्रेमाच्या एकेक निशाणीला
त्या वेड्याने जीवापाड जपणं काय...
अन त्या बहरलेल्या प्रेमबागेला
तिने निष्ठुरतेने पायंदळी तुडवणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...

मनातली तिची निर्वात रिक्तता
आजही त्याला सलणं काय...
कानात मुरलेला तिचा स्वर
एकाकी घोळक्यात चाचपडणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...

असला जरी तिच्या सहवासाचा अभाव
त्याने पुन्हा जगायला शिकणं काय...
अन शिवलेल्या जखमा दाबून धरून
आयुष्यात सफल आगेकूच करणं काय...
आता सारंच कसं...

ती त्याची असणं काय अन नसणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...

- सुमित

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

धन्यवाद जाई...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

कविता आवडली. मात्र काहीशी पारंपारिक संकल्पनांनी भरलेली आहे. ती आणि तो यांचं नातं, आणि ते तुटणं थोडी क्लिशेड झालेलं आहे. त्यांची व्यक्तिमत्वं कवितेतून डोकावली असती तर अधिक आवडली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या suggestion वर नक्कीच विचार करेन आणि काही बदल करता आला तर जरुर करेन... Smile
धन्यवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."