आभार प्रदर्शन

बर्‍याचशा समारंभात, शेवटी एक 'गोग्गोड' असा आभारप्रदर्शनाचा औपचारिक कार्यक्रम असतो. आता वय झाले की जुन्या आठवणी येणारच. अशा आठवणी उगाळत असताना एक विचार चमकून गेला की, आपला शेवट जवळ आला आहे अशी कल्पना केली तर मी देवाचे आणि इतरांचे आभार कसे मानीन? आणि तेही औपचारिक नव्हे तर मनापासून.

१. सर्वप्रथम, या जगांत मनुष्यप्राणी म्हणून जन्माला घातल्याबद्दल आभार.

२. त्यानंतर, एका चांगल्या, मध्यमवर्गीय घरांत, साधे जीवन आणि उच्च विचार करण्याची संवय लावल्याबद्दल त्या स्वर्गस्थ मातापित्यांचे आभार.

३. मुलगा किंवा मुलगी यांत काहीच फरक नाही असे सरकारी पातळीवर जरी सांगत असले तरी, मुलगा म्हणून जन्म मिळाल्याने जे विशेष फायदे मिळाले आणि लग्न होईपर्यंत, घरांत ज्या कामचुकारपणा करण्याच्या संधी मिळाल्या त्याबद्दल आई-वडीलांचे आणि भावंडांचे आभार.

४. माझा जन्म झाला तेंव्हा आपल्या देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते त्यामुळे सर्व लोकांमधे एक विशेष उत्साह होता. काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी होती. त्यामुळे त्या कालखंडात, उत्तम संगीत, उत्तम साहित्य, उत्तम कला आणि उच्च मूल्ये असलेली अनेक नाटके व सिनेमे बघण्याचे भाग्य लाभले. श्रीपाद डांगे, आचार्य अत्रे अशा अनेक वक्त्यांची उत्कृष्ट भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. तर अशा भारलेल्या कालखंडात आयुष्याचा उमेदीचा काळ व्यतीत करायला मिळाला म्हणून आभार.

६. संगीताचा कान मिळाला नसता तर किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो? लता-आशा यांच्या गाण्यांनी मनामधे एक न्यूनतम मानक निश्चित करुन टाकले. त्या मापदंडाने मोजूनच इतरांची पातळी ठरवता येऊ लागली. त्यावेळचे अजरामर संगीतकार, रफी, किशोर आणि तलत यांनी त्या आनंदात भरच टाकली. शास्त्रीय संगीतात तर, ज्यांचे नुसते नांव काढले तरी आदराने कान धरावे, अशा दिग्गजांना, याचि देही याचि डोळा बघण्याचा आणि त्यांच्या मैफिलीत डुंबण्याचा जो आनंद मिळाला त्याबद्दल खास आभार.

७. यश अपयशाचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतातच. पण अशा प्रसंगी, डोके खांद्यावर आणि पाय जमिनीवर ठेवण्याची बुद्धी दिल्याबद्दल आभार.

८. आत्मसंतुष्ट वृत्ती हा दोष असेल कदाचित, पण त्यामुळेच आहे त्यांत समाधानी राहून, या जगातल्या शर्यतीत भाग न घेता , त्याकडे अलिप्तपणे पहाण्याची दृष्टी दिल्याबद्दल आभार.

९. आयुष्याच्या विविध वळणांवर भेटलेल्या आणि चांगले-वाईट, उत्कट्-मातकट अनुभव देणार्‍या सर्व द्विपाद, चतुष्पाद, षटपाद, अष्टपाद व बहुपाद आणि सरपटणार्‍या प्राण्यांचे आभार.

१०. आणि सरतेशेवटी, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपले विचार जालावर मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी मिळाल्यामुळे, सर्व मराठी संकेतस्थळांचे विशेष आभार.

टीपः वरील विचारांचे मनसोक्त विच्छेदन व्हावे,त्याची विडंबने पाडावीत किंवा त्यांत मौलिक भर पडावी असे वाटत असल्याने सदर धागा 'मौजमजा' या प्रकारात घातला आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

छान Smile आभारप्रदर्शन आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभारप्रदर्शन आवडलं.

>>मध्यमवर्गीय घरांत, साधे जीवन आणि उच्च विचार करण्याची संवय लावल्याबद्दल त्या स्वर्गस्थ मातापित्यांचे आभार.

कॉलिंग मनोबा.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>मध्यमवर्गीय घरांत, साधे जीवन आणि उच्च विचार करण्याची संवय लावल्याबद्दल त्या स्वर्गस्थ मातापित्यांचे आभार.
+१
हेच बोल्तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यादी गोड-गोड आहे. मी काही बदल केले असते/करतो(माझ्यापुरते)

-शेवट जवळ आला आहे "हे चांगलं वाटत नसल्यास" किंवा "चांगल वाटत असल्यास" मी त्याप्रमाणे जबाबदार घटकांचे आभार मानेन/मानतो.

-नुकतेच स्वातंत्र मिळाल्यामुळे मिळालेल्या फायद्यांबद्द्ल (पहाटे (न) उठून मोर्चे (न) काढून जेलात वगैरे (न) जाणे, कपडे न जाळावे लागणे, देशासाठी वाटत नसताना करावा लागणारा त्याग वगैरे, साहेब बरा होता वगैरे म्हणायची सोय, किंवा त्याच्याबरोबर त्याच्या देशात जाऊन(व्हिसाशिवाय) तिथेच स्थायिक होण्याची सोय) तसेच तोट्यांबद्दल (बोंब मारायला व्यवस्थाच उरली नाही, परत स्वातंत्र्य-सैनिकाचा कोटा मिळाला नाही, जेलमधे जावे लागल्यास कौतुकापेक्षा जोडे खावे लागणे, फुकाचे स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल उरी गिल्ट बाळगावा लागणे) सायबाचे आणि स्वकियांचे आभार मानेन/मानतो.

-याची देही-याची डोळा काही लोकांना पहाण्याचे भाग्य (लालबहाद्दूर शास्त्री, यशवंतराव चव्हाण, पुलं, अत्रे, रफी, किशोर, अमिताभ, गेला बाजार सिल्क स्मिता(खरी-खरी) जी काय "ब्रम्ह" म्हणून वाटतात ती सगळी) किंवा दूर्भाग्य (कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहिये, कळलं की टाकतो) लाभले/लाभले नाही यासाठी जबाबदार घटकांचे आभार मानेन/मानतो.

-शिक्षक 'शिकवण्या'वर पेक्षा 'शिकवण्यावर' भर देत असल्याने त्यांचे आभार मानेन/मानतो.

- इथे फार लिहावं लागत असल्याने आभार न मानता इथेच थांबतो.

मुलगा म्हणून जन्म मिळाल्याने जे विशेष फायदे मिळाले आणि लग्न होईपर्यंत,

बायद्वे ह्यापुढे काय झालं असावं की पुढे कौटूंबिक आभारच मानले गेले नाहीत? (ह.घ्या वगैरे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर आभार्प्रदर्शन टवाळीस प्रवॄत्त करु पहात आहे Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टवाळी वेलकम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिसादकांचे आभार राहिले ना हो, तिमाजी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टवाळी पूर्ण झाल्यावर प्रतिसादकांचे आभार मानण्यात येतील.

अवांतरः तिमाजी, तिमाजीपंत, तिमाजीअप्पा हे ऐकण्यापेक्षा मी ति(लोत्त)मा नांव का नाही घेतले ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपला शेवट जवळ आला आहे अशी कल्पना केली तर मी देवाचे आणि इतरांचे आभार कसे मानीन?

एकदा चित्रगुप्तासमोर ऑडिटला बसून झाले, की मग (ब्यालन्स कसाही असो) आभारप्रदर्शनाचे वगैरे पार विसरून जाईल.

सबब, चिंता नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा! म्हंजे इतक्या लोकांनी तुमच्यावर उपकार केलेत तर! बापरे मग तुम्ही काय केलंय! Wink (ह. घ्यालच)

बाकी तुम्ही देवाचे आभार मानताय म्हंजे देव मानता असे वाटतं... मग शेवटी तोच सगळ्याचा कर्ता करविता आहे, त्याच्या मर्जीबाहेर पानही हालत नाही वैगे वगैरे पाठ असेलच Wink तेव्हा इतक्या जणांचे कशाला आभार मानताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण त्याची मर्जी आपल्याला अनुकूल असल्याचे दाखवणार्‍या लोकांचे आभार मानले तर झालंच की Wink सर्वदेव/लोक नमस्कारः केशवं प्रतिगच्छति वैग्रे वैग्रे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हंजे इतक्या लोकांनी तुमच्यावर उपकार केलेत तर! बापरे मग तुम्ही काय केलंय!

हो ना, माझ्यावर अनेकांनी अनंत उपकार केले आहेत. पण, इतर आपल्यावर करतात ते उपकार आणि आपण इतरांना करतो ती मदत अशी माझी व्याख्या आहे. पुन्हा ही मदत देखील बोलून दाखवली तर त्याचे महत्व शून्य होते म्हणतात.

बाकी तुम्ही देवाचे आभार मानताय म्हंजे देव मानता असे वाटतं.

हा मोठा गहन प्रश्न आहे. कोणीतरी अज्ञात शक्तीने मला या जगांत आणून टाकलंय. त्याला खूष करण्यासाठी मी आत्तापर्यंत कधीच काही केलेले नाही आणि करणारही नाही.आता सोईसाठी आपण त्याला देव म्हणू या. देव मानणार्‍यांच्या थिअरी प्रमाणे हे मदत्/उपकार करणारे लोकही देवानेच पाठवलेले असतात. 'देव' दिसत नाही. तरी त्याचे उपकार मानले. मग या दिसणार्‍या दयाळु लोकांचे उपकार मानायला कसला संकोच?

माझ्या एका कवितेत मी माझ्या कुटुंबाचे वर्णन असे केले आहे, ' दर्शन जरी ना कधी राऊळी, भगवंताची कृपा आगळी|

सगळं हलके हलकेच चालू आहे बरं का!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आमच्या मांजराचे आभार मानते. तिने आमचं घर पकडून आम्हाला उपकृत करायचं ठरवल्यापासून, आपण जे काही करतो ते इतरांवर उपकारच असतात, अशा पद्धतीचा विचार करायला मी शिकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही कोणती संस्कृती? आपल्यात असं कै नस्तं! असे आभार बिभार मानून आपल्याच लोकांना परके नाही करायचे.

उलट आभार न मानून, लोकांनाच बुचकळ्यात टाकायचे की 'आपण नीट वागलो होती की नाही ह्या व्यक्तीबरोबर!' Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टवाळी करुन उपकार करण्यात येत आहे . :-B
उपकार नामा …………….
१ सर्वप्रथम या जगांत आम्ही स्त्रीजन्माला येउन पुरुषजातीवर उपकार केलेले आहेत . :love:
२ . थोडेफार संस्कार चुलीत घालूनही पुरेशा वाममार्गाला न जाता आप्तांवर उपकार केलेले आहेत . Sad
३ .उत्तम साहित्य , संगीत , सिनेमा आदींचा कलांचा यथेच्छ आस्वाद घेऊन त्याचीच अतोनात टवाळी
करून फाजील मित्रपरिवारावर उपकार केलेत . Blum 3
४ . यश , अपयशाच्या प्रसंगात लाथाळी करून , अहंकाराने उन्मत्त होऊन नेत्र दिपवत उपकार केले आहेत . Fool
५ . उद्धटपणा , अहंकार आणि टवाळी यातच समाधान मानून सर्वच गोष्टीत नाक खुपसुन उपकार केले आहेत . J)
६ . प्रतिदिन उर्मट , मोकाट व्यक्त होऊन जालावर संचार करताना मराठी संकेतस्थळावर उपकार केले आहेत . ;;)
७ . अमरत्व प्राप्त करून अखिल मानव जातीवर उपकार केले आहेत . :D>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार प्रदर्शन आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars