कवितास्पर्धा

नुकताच सुट्टीवर गेलेलो असताना तेथील सृष्टिसौंदर्य पाहून आपण एक कवितास्पर्धा भरवावी असा विचार मनात आला; तेव्हा सदस्यांनी आपल्या कविता पाठवाव्यात ही विनंती. कविता पाठवण्याची मुदत ग्रिमवेळेनुसार (अर्थात, ग्रीनिच मीन टाईम) रविवार, चौदा एप्रिलच्या रात्री ११:५९ पर्यंत असेल. कृपया कविता मला 'व्यनि' करून पाठवाव्यात, इथे धाग्यावर प्रतिक्रिया म्हणून पाठवू नयेत. मुदत संपल्यानंतर मला सर्वात आवडलेल्या व उत्तेजनार्थ वाटलेल्या कविता मी इथे देईन. स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे:

(१) कविता २० शब्दांपेक्षा लहान किंवा १०० शब्दांपेक्षा मोठी नसावी. छंदाचे किंवा वृत्ताचे बंधन नाही. एका व्यक्तीला दोनपेक्षा जास्त कविता पाठवता येणार नाहीत.

(२) खालील अाठ शब्द पाहा:

धुंद, हलकेच, अनामिक, एकाकी, कवडसे, पाऊलखुणा, कातरवेळ, हुरहूर

तुमच्या कवितेत यांपैकी कोणतेतरी चार शब्द आले पाहिजेत. (चारपेक्षा जास्त किंवा कमी चालणार नाहीत.) शब्द थोडेफार बदललेले चालतील (उदा. धुंदावलेले, पाऊलखुणांना..)

(३) अभिव्यक्तीचा नवेपणा अाणि अनुभवाचा ताजेपणा कवितेत शक्य तितका कमी असावा; थोडक्यात कविता जास्तीतजास्त निकृष्ट असावी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

अट क्रमांक तीन अत्यंत आवडली. त्यामुळं स्पर्धेत उतरण्यासाठी अवकाश तयार झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.
पण ही अट घालायची गरज वाटली या दुर्दम्य आशावादाला सलाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाठवली
(पहिली कविता बाद, कारण अट नीट वाचली नव्हती - ८ही शब्द वापरले होते. ती खोडून नवी पाठवली, तर चालेल ना?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(माझ्या कवितेकरिता शंका विचारण्यात उशीर झाला, तरी, लोकांकरिता विचारतो...)
वृत्तबद्ध लिहायचे निवडून मग भरपूर वृत्तभंग केल्यास कविता वाचताना खूप खटकेल. पण "वृत्त वापरलेच नाही" असे म्हटले तर... या प्रकारच्या निकृष्टपणाची श्रेणी कशी ठरवावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांदणे, वसंत, गंध, वेडं मन, साद आणि आभाळ हे शब्द नसल्याने प्रचंड निराशा झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांदणे, वसंत, गंध, वेडं मन, साद आणि आभाळ हे शब्द नसल्याने प्रचंड निराशा झाली.

निराशा कोणाची? तुझी का काही 'नामवंत''यशवंत'-'गुणवंतां'ची?
आंतरजालावरच्या कवितांचं तुझं दांडगं वाचन मात्र या प्रतिसादात दिसलं... Wink
(यातले काही शब्द नेमके आहेत. गंध, वेडं मन, साद आणि आभाळ. चांदणे हा शब्द समग्र कवींसाठीच राखीव.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निराशा कोणाची? तुझी का काही 'नामवंत''यशवंत'-'गुणवंतां'ची?

नेणीवेच्या चाहुलीचा स्पर्श ज्यांना खुणावतो, ते सारेच यात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाणीव हा शब्द या प्रतिसादात नसल्याने तो विचारात घेतलेला नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निवडलेले चार शब्द वापरून कविता केली पाहिजे असे आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ही माझी कविता नाही. मी केवळ ताजमहालाला माझ्या विटा लावलेल्या आहेत ( कंपल्सरी वापरावयाच्या शब्दांच्या)
त्यामुळे ही माझी एंट्री नाही. पण केवळ निर्मल आनंदाकरता शेअर करतो आहे.

वापरलेले शब्द : हलकेच एकाकी धुंद अनामिक

निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध हलके एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज एकाकी पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
धुंद ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा अनामिक मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा

मूळ प्रेरणा (कृपया मूळ धाग्यावरचे प्रतिसाद वाचायला विसरू नये)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

बक्षीस काय आहे? ते कळल्याखेरीज आम्ही आमची प्रतिभा वाया (उतू) घालवणार नाही. क्.लो.अ्. हे वि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येन्ट्री पाठवली आहे.

नै हा फक्त बाकीच्या स्पर्धकांना इशारा होता! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"वांझोटी" चे काय झाले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हे ़कवितेचे शिर्षक असायला हरकत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

आत्तापर्यंत काही उत्तम एंट्र्या आल्या आहेत. आणखी येऊद्यात…

टीप: माझ्या मते अट क्रमांक (२) चा अर्थ स्पष्ट आहे. यादीतल्या आठपैकी चार शब्द कवितेत यायला हवेत, पण यादीत समावेश नसलेल्या शब्दांच्या वापरावर काहीच बंधन नाही. उदाहरणार्थ, 'मनबावरी' किंवा 'पहाटवारा' कितीही वेळा आले तरी चालतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

अभिव्यक्तीचा नवेपणा अाणि अनुभवाचा ताजेपणा कवितेत शक्य तितका कमी असावा; थोडक्यात कविता जास्तीतजास्त निकृष्ट असावी.

सगळे नवकवी जमून आता तुमच्या घरावर त्यांच्या कवितेच्या जाडजूड वह्यांचा मारा करणार आहेत! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>>सगळे नवकवी जमून आता तुमच्या घरावर...
नवकवींची सुद्धा हल्ली युनियन असते बरं का!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीच स्पर्धा जिंकेन याची खात्री आहे. त्यामुळे कविता पाठवणार नाही. क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुमार रचना सोपी असते - घिसाडघाई केली की पुरे. पण हेतुपुरस्सर निकृष्ट रचना कठिण आहे.

तुमच्या कौशल्यामुळे तुमची खात्री योग्यच आहे. पण तरी लिहाच, म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकाग्रहास्तव आत्तापर्यंत आलेल्या (चार) एंट्र्या कवींची नावे जाहीर न करता खाली देतो आहे; अर्थात संबंधित कवींनी आपापली नावे जाहीर करायला माझी काहीच हरकत नाही. यापैकी काही उत्कृष्ट निकृष्ट आहेत, तर काहींत माझ्या मते अजून निकृष्ट बनण्याचं अनरिअलाइज्ड पोटेंशियल आहे.

कातरवेळी पाऊलखुणा

अलगद पसरे गाढ धुके -

धुक्यामध्ये झालो एकाकी

किती अनामिक आठवणींचे

तरी उसासे उरले बाकी

कुंद हवेच्या दुलईमध्ये

मनात भरली आशा भोळी

पुसटपुसट पाऊलखुणाही

दिसत राहिल्या कातरवेळी

वसंताचं चांदणं

वसंताचं चांदणं आभाळात पसरलंय

इवल्या-इवल्या कवडशांपरी आहे ते भरपूर

वेड्या मनाला हलकेच साद ते घालतंय

त्याच्या धुंद गंधाने वाढली आहे हुरहूर

नदीतीरावर कातरवेळी
एक अनामिक लागे हुरहूर
त्यांतच टिटवी जागे करते
आठवणींचे भग्न खंडहर|
दुरून दिसते ओली हिरवळ
असते शेवाळ्याचे मृगजळ
एकाकी या त्रस्त जीवाला
मनीं सारखी एकच तळमळ |
नदी कधीची खुणवत होती
जलमय होण्या विनवत होती
भयकंपित मी, हरता तो क्षण
उदास जगतो, उगाच ते पण||

धुंद आम्ही दोघे

कुंद ही हवा

छंद हा असा

वेड लावे जीवा

एकाकी नसताना

दुचाकी वरती

तीचीच प्रीती

बिलगायची पाठी

पाऊलखूणा त्या उमटता

मनावरती चरा

उमटतो जरा

आठवांचा (अासवांचा? -जचि)

हुरहुर ती उरते

कुंद हवेतील दुचाकी वरती खोल खोल चरा देत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

कॉलिंग चिंजं गुर्जी! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

धनंजयचा शेवटचा नंबर असणार. (स्वगतः मला पहिला नंबर देत होता ना!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या चारपैकी माझा पहिला आणि चवथा नंबर (माझ्या मते).

परंतु या चारपैकी माझी बाळे कोणती? हे मी अजून सांगणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितास्पर्धेची मुदत संपेपर्यंत एकूण आठ कवींच्या नऊ एंट्र्या आल्या आहेत. सर्व कवींने मन:पूर्वक आभार! थोड्या दिवसांतच (म्हणजे बहुतेक या वीकेंडला) माझ्या वैयक्तिक विरसग्रहणासह सर्व कविता प्रकाशित केल्या जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)