सर्वात "मका " भाकरी करा !

एकेदिवशी अखंड बडबड करून आणि फिदीफिदी हसून चंपाचे सर्व दात ठणकू लागले. तिने घराजवळचा एक दंतवैद्य गाठला. दंतवैद्य अगदी गोजिरवाणा ससा होता. त्याने गोग्गोड बोलून हिची दातखीळ बसवली. जबड्याला प्रथमच विश्रांती मिळाल्याने दात दुखायचे तर थांबलेच शिवाय शांतता म्हणजे काय याचा अनोखा अनुभव आला. चंपा गोजिरवाण्या सशावर लट्टू झाली अन् लटिकेच त्याला भेटू लागली. ससा मक्याच्या पीठाचा छुपा एजंट होता. गळाला लागलेल्या पेशंटला सर्वात "मका"चे सर्वेश्वरत्व जे जे जगी जगते तयांसाठी कसे आवश्यक आहे ते पटवून पाच किलोचं पाकीट त्याच्याकडे अलगद सरकवण्यात तो यशस्वी होत असे. मंत्रमुग्ध चंपाने त्याला पर्स उघडून पैसे कधी दिले अन मक्याचे पाकीट कधी घेतले ते तिला कळलेच नाही. ती तरंगतच घरी आली. तेंव्हापासून तिच्या हाताच्या मक्याच्या सागवानी भाकऱ्या खाऊन खाऊन तिच्या कुटुंबियांना चणे खावे लोखंडाचे म्हणजे काय असतं ते कळलं. ते सगळे आपोआप गोजिरवाण्या सशाचे भक्त पेशंट झाले. सशाने लुब्ध चंपाला संधी साधून मक्याच्या पीठाचा प्रचारक नेमले.

एकदा ससा गावाला गेला होता. मक्याचे पीठ संपले होते. चंपाला करमेना, काही सुचेना. सुग्रण चंपी मोठ्या हौसेने एका किराणा दुकानातून मक्याचं पीठ घेऊन आली. दुसऱ्या दिवशी सक्काळीच तिने त्या पिठाच्या भक्कम, दातखन्डा, सागवानी भाकऱ्या करायला घेतल्या. पीठ जुने असल्याने त्या टणक, गुळगुळीत व्हायच्या ऐवजी चक्क भूकंपात तडा गेलेल्या भुईवाणी दिसू लागल्या. शिवाय ठिसूळ असल्याने दातखण्डा व्हायची शक्यता मावळली. अशाने तिच्या पार्टनर दंतवैद्याची प्रॅक्टिस जोमाने कशी चालणार? तिला डिप्रेशन आले. तिची अन सशाची निवांत ऍमवे साखळी सुरु होती. हिने इष्टमित्रांना नवतीच्या मक्याच्या भाकऱ्या खिलवायच्या आणि त्याने त्या खादाड, दातपडक्या सावजांना मासिक नवीन, शुभ्र कवळ्या बनवून द्यायच्या. कमिशन म्हणून चंपाला १० किलो मक्याचं पीठ आणि हिच्या घरच्या सगळ्या लोकांच्या मासिक कवळ्या फुक्क्क्काट!

तिची आहारात- अज्ञ एनाराय मैत्रीण, चिक्कीच्या, शेजारी एक व्हिएतनामी डॉक्टर ट्रान, केंटकीत रहायचा. तो एकदा भारतात आला असता चंपाकडे जेवायला आला होता. रातोरात सू - प्रसिध्द होण्यासाठी सुगरण चंपाला असे सावज शोधूनही सापडले नसते. व्हिएतनामी पाहुणा डॉ. ट्रान फक्त सूप, नुडल्स, भात आणि शिजवून मेण झालेले मांस खात असल्याने त्याचे दात शोभेचेच होते. हिने त्याला मक्याच्या वाळक्या, वात्त्त्तड, भाकऱ्या लोणी चोपडून, चमकावून दिल्या. चंपीच्या पाककौशल्याने त्याचे डोळे दिपले. त्याच प्रखर प्रकाशात त्याने भाकरीचा पहिला घास तोडताच त्याचे समोरचे चार दात ताटात आले. ते पाहून तिच्या मुलांच्या हसून हसून कवळ्या निसटून पडल्या. चंपू ट्रानला म्हणे "डोण्ट वरी! ससा बसवून देईल". नंतरचा अर्धा तास ट्रानने तोच घास चघळायचा व्यर्थ प्रयत्न केला. सगळे दात निघाले, लाळनिर्मिती बंद झाली तरी घास दमटसुद्धा झाला नाही. असं वाटलं की अन्नपाण्याविना डॉ. ट्रानने तिथेच प्राण सोडला. चंपीने उगीच व्हेंटीलेटर लावून त्याची रवानगी थेट केंटकीला विश्व कु-ख्यात, आहार-अज्ञ सौ. चिक्की गावजेवणघालूनचमर यांच्याकडे केली. चिक्कीने "मक्याचा बिनसाखरेचा गोग्गोड शिरा करू का बे त्राण?" असे त्याच्या कानात कुजबुजताच तो तात्काळ उठून जीव मुठीत धरून विएतनामकडे पळत सुटला. तेंव्हापासून दातखंडा मका भाकरीची जनकी म्हणून चंपाचे नाव त्रिखंडात गाजते आहे.

तिला एका चोंबड्या च्यानेल चिचुंद्रीने विचारले सुद्धा की, "महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा तांदळाच्या भाकऱ्या करायची प्रथा असताना तुम्ही चक दे फट्टे, पंजाबी मक्याचा मुका कसा काय घेतला हो चंपाताई??"

चंपा टप्पोरा माईक तोंडात खुपसून सर्वज्ञाच्या थाटात म्हणे, "व्हिएतनाम युद्ध जिंकण्याचा सोप्पा उपाय मक्याची भाकरी हाच आहे हे डॉ. ट्रानच्या उदाहरणावरुन ओबामाला मी सिद्ध करून दाखवले. त्याने प्रयोग म्हणून मला टाईम मशीनने भूतकाळात पाठवले आणि मी एकटीनेच सर्व व्हिएतनामी सैन्याला दाती मक्याच्या भाकरीरुपी तृण धरायला लावले." ओबामाने चंपाला कॉर्न ग्लोब पुरस्कार देऊन तिचा सत्कार केला. एकदा का अमेरिकेने शिक्का मारला की जगभर सर्वत्र पुरस्काराचे पेव फुटते त्यामुळे तिला आशियातील मकासेसे पुरस्कार मिळाला. लाजेकाजेस्तव भारताने तिला कॉर्नलक्ष्मी देऊन बोळवण केली.

बॉस्निया-सर्बिया , इस्रायल-पॅलेस्टाईन, अफगाण-तालिबान अश्या अनेक भिज्जत घोंगड्या जागतिक समस्यांवर चंपाशी लटिकेच चर्चा करायला आता जगभरातून युद्धखोर नेते मंडळी येऊ लागली. मक्याची भाकरी हे लिथल अॅग्रो वेपन म्हणून कसे वापरायचे हे जाणून घ्यायला रीघ लागली. भेटायला येणाऱ्या नेते लोकांना 'थ्रू प्रॉपर चॅनल' येणे अनिवार्य असायचे. आधी ससा क्लिनिक मध्ये जाऊन मक्याच्या दणकट भाकऱ्या खाऊन जुने पिवळे दात पाडायचे. नंतर सश्याकडून शुभ्र कवळी बसवून घेतली की मगच चंपेचे दर्शन होत असे. चंपीची लहर असेल तर ती सल्ले द्यायची नाहीतर ढोंगी नेत्यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून द्यायची. अनेक मान्यवर पाहुण्यांना आपले ढुंगण चोळत, शुभ्र नवी कवळी कडकडत चालता, चालताच खजील मोक्ष मिळायचा. अशातर्‍हेने बहुतेक युद्धखोर लबाड नेते मोक्षधामी गेल्याने समस्त तणावग्रस्त सैनिकांनी एकमेकांना आनंदाने चमत्कारी मक्याच्या भाकऱ्या खिलवून जगातली तमाम युद्धे संपल्याचे जाहीर केले. तेव्हा युद्धभूमींवर सर्वत्र दातांचा अतोनात खच पडला आणि भयंकर शांतता माजली.

सर्वात्मका शांततेश्वरा!

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

हा हा! हे नक्की काय आहे? हसु येत रहातं इतकं मात्र खरं

गोजिरवाणा ससा, टप्पोरा माईक वगैरे मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इस्राएल-पॅलेस्टाईन सीमेवर भूसुरुंग नसतील तितके पंचेस या लेखात भरलेले आहेत ROFL ROFL

मस्तच Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फारच कॉर्नी ब्वॉ Smile
पहिला परिच्छेद वाचून 'गंमत जंमत'मधल्या मिसेस फराळे आणि त्यांचा 'पुष्पदंत' आठवला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुष्पदंत झकास आहे . Biggrin
तुमचे शीर्षक गीत मजेशीर आहे . Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सखुबै _/\_
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेशीर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

न-कथाही रंगवून सांगण्याच्या कौशल्याला सलाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

न-कथाही रंगवून सांगण्याच्या कौशल्याला सलाम.

पुण्यात किती काळ राहिलात म्हणे आपण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात कशाला रहावे शाण्या Smile लोकांनी ? मला तर पुणेकरांचा J) लक्तरे तोयबा करून सोडण्याचा
छंद आहे ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लक्तरे तोयबा की लक्तर-ए-होयबा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विद्वत्ताप्रचूर लेखनात सखूताईंचा हातखंडा आहे. मी सखूताईंना जाहीर विनंती करतो - ऐसी अक्षरे वर त्यांनी 'सखूताईंचा सल्ला' असं सदर सुरू करावं. त्यात वाचकांच्या प्रश्नांना (आणि वाचकांचे प्रश्न आले नाही तर सखूताईंनीच निवडलेल्या प्रश्नांना) त्यांनी उत्तरं द्यावी. ती वाचून जगभरात ज्ञानाचे दीप प्रज्वलित होऊन डोळे दिपून जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम भारी विनंती. घासकडवींशी सहमत (ए, कोण तो खुसखुसतोय?).
सखुताईंना पहिला प्रश्न: या राजेश घासकडवींचं काय करावं बरं? उठसूट वाद घालत बसतात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माननीय राजेश घासकडवी येताक्षणी ROFL हशा आणि :D> टाळ्यांचा एकच कडकडाट करावा . ते त्वरित
निनादसागरात गटांगळ्या खाऊ लागतील :tired: आणि वाद घालायचे विसरून जातील .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! करून पाहतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सखुबाईंना आग्रहाची मागणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोर स्टेटसवंती / जंती लोकांची अगम्य स्टेटसे वाचून बुद्धीमांद्य आलेले आहे .
त्यांना मनातल्या मनातच विचारलेल्या कुशंका उदाहरणार्थ सादर करू काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोरामोठ्यांची स्टेटसं पाहून सखूताईंच्या मनात उमटलेले मनतरंग बघायला मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सखूताईचा सल्ला की सखूताईचा कल्ला? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चमत्कारिक पण धमाल....
"गोग्गोड ससा"....
"इस्राइल -पॅलेस्टाइन" हे कैच्या कैच आणि भारिच.
एकाच वेळी विचित्र आणि आवडण्यासारखं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सध्या उसंत सखू यांच्या लेखांना छान म्हणण्याची फॅशन आहे इकडे.. त्यामुळे चान चान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||