कॉकटेल लाउंज : स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

पार्श्वभूमी:

मागे एकदा गविशी कॉकटेल्सवरती गप्पा मारताना कोकम सरबताचा विषय निघाला आणि त्यापासून काही कॉकटेल बनविता येईल का? असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हापासून कोकम सरबतापासून एक कॉकटेल करून बघायला पाहिजे असा किडा डोक्यात वळवळत होता. आता कॉकटेल लाउंजच्या ग्रीष्म लाउंजोत्सवचे औचित्य साधून काही प्रयोग करतना कोकमाचे सिरप दिसले आणि एकदम गवि डोळ्यापुढे आला. बाकी साहित्य धुंडाळल्यावर एक झक्कास प्रयोग करायचे ठरले. प्रयोग 'उन्नीस बीस' यशस्वी झाला. (उन्नीस बीस का ते कृतीत कळेल) नावासकट माझे इंप्रोवायझेशन आहे. आता नाव काय द्यावे असा विचार करतना विकीपिडीयावर कोकमाचे इंग्रजी नाव दिसले आणि ते एवढे भारदस्त होते की तेच वापरायचे ठरवले.

आता त्या नावात इंडीका असल्याने 'टाटा ब्रॅन्ड'ची आठवण होऊन तोंड कडू होईल पण हे स्पायसी कॉकटेल त्यावर लगेच उतारा ठरेल Smile

साहित्य:

प्रकार व्हाइट रम आणि कोकम रसरबत बेस्ड कॉकटेल
व्हाइट रम १ औस (३० मिली)
कोकमाचे सरबत १ ग्लास
स्वीट आणि सार सिरप १० मिली
चाट मसाला
कोथिंबीर
लिंबाचे काप
मडलर
बर्फ
ग्लास हायबॉल ग्लास

कृती:

सर्वप्रथम हायबॉल ग्लासमध्ये कोथिंबीर आणि लिंबाचे 1-2 काप घेऊन मडलरने किंचीत मडल करून घ्या.

'किंचीत' हे प्रमाण महत्वाचे आहे. माझे कॉकटेल 'उन्नीस बीस' होण्याचे कारण म्हणजे हे मडलिंग, जरा जास्त जोरात मडल केले आणि लिंबाच्या सालीचा कडसरपणा उतरला कॉकटेलमध्ये कारण त्या लिंबाच्या सालीतले ऑईल 'किंचीत' प्रमाणापेक्षा जास्त बाहेर पडले.

आता मडल करून झाल्यावर त्यात रम आणि स्वीट आणि सार सिरप ओतून घ्या.

आता ग्लासात कोकम सरबत टाकून ग्लास त्याने टॉपअप करा. टॉपअप करून झाल्यावर त्यात चिमूटभर चाट मसाला टाकून बार स्पूनने हलकेच मिक्स करून घ्या.

चला तर मग, स्पायसी गार्सिनिया इंडीका तयार आहे. Smile

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

आहा भारी दिसतय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा वा! हे तर त्या 'अपेया'शिवायही चांगलं लागेल.. Wink
ते स्वीट आणि सार सिरप मध्ये अल्कोहोल असतं का? भारतात मिळतं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ते स्वीट आणि सार सिरप मध्ये अल्कोहोल असतं का? भारतात मिळतं का?

स्वीट आणि सार सिरप मध्ये अल्कोहोल नसते आणि भारतात मिळते.

- (साकिया) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा वा.. आठवण ठेवल्याबद्दल धन्यवाद.

आनंद झाला. सीझन चालूच आहे, आणि तसेही कोकम सरबत सदैव मिळत असतेच. करुन पाहिले जाईल.

कोंकणात जाईन यंदा तेव्हा झाडावरचे ताजे काढून सरबत बनवता येतंय का पाहतो.

बाकी, अल्पअंदाजी ज्ञानाने कोकम सरबताशी मिसळणार्‍यांमधे वोडका किंवा टकीला असेल असं उगीचच वाटलं होतं. व्हाईट रमचा नंबर लागण्यामागे काही कारण? की ट्रायल करुन पाहिल्यावर रमने बाजी मारली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिसतंय झकास पण 'स्पायसी' या शब्दामुळे सुरूवातीला अंमळ धास्ती वाटली. मिरची, तिखट वगैरे नसल्यामुळे करून बघायला हरकत नाही.

सोकाजीची कॉकटेल मालिका काढली तर गविंना निर्माता बनवायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मराठमोळे कॉकटेल आवडले. लिंबू मडल करण्याऐवजी थेट पिळले तर चालणार नाही का... म्हणजे फक्त रस उतरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिंबू रसासाठी नाही तर त्याच्या सालीत असलेले तेल आणी त्या तेलाला असलेला सुगंध बाहेर काढण्यासाठी मडल करायचे असते.

- (साकिया) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्हाला कांदेपोह्यावर पिळण्यासाठी आणि लिंबूसरबतासाठी लिंबू वापरले जाते व त्याची उरलेली साले कुकर काळा पडू नये म्हणून भात करताना कुकरमध्ये टाकली जातात इतपतच माहिती असल्याने गडबड झाली. असो संधी मिळाल्यास केल्या व प्यायल्या जाईल. मात्र आता इथे कोकम सरबत शोधणे आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)
( आजकाल अनुपस्थित) गुरुजी मस्त आहे हो हे !!! करण्यात येईल लवकरच ... काही शंका ( तांत्रिक ) : कोकमाची आणि लिम्बाच्या सालीतील थोडीशी सावर चव असताना स्वीट अँड सावर सिरप ऐवजी शुगर सिरप टाकल्यास जास्त मजा येईल का ? ( करून बघायला पाहिजे ) तुमचा कॉकटेल लाउंज नावाचा ग्रंथ थोर आहे . लवकरच त्यात लिहिलेली प्रॅक्टिकल्स करण्यात येतील .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निरमम तत्त्वमसि

निरमम पेयांवर प्रयोग मी नेहमीच करत असतो.त्यानंतर एक कप गरम चा आवर्जून पितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0