ज्योतिष
* लेख अत्यंत विस्कळीत आहे.
ज्योतीषावर विश्वास नसणे ही एक गोष्ट झाली पण म्हणून ज्योतीषाला सर्रास जारणमारणाच्या रांगेत बसविणे, ज्योतिषात रस असणार्या लोकांना मनोरुग्णांच्या पंक्तीत बसविणे ही दुसरी. यात मनोरुग्ण असणे म्हणजे काही वाईट असे म्हणायचे नसून तसा ठपका लावणे हा निषेधाचा मुद्दा आहे. आपली श्रद्धा संपून दुसर्याची सुरु होते तिथे बरेचदा इनटॉलरन्स दिसून येतो तो गैर आहे. यामागे बरेचदा चांगलाच हेतू असतो की समाजाचे प्रबोधन करणे, अंधश्रद्धेचे निर्मूलन करणे वगैरे. पण ज्या गोष्तीचे निर्मूलन करायचे ती नक्की अंधश्रद्धाच आहे हे तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करुन अथवा तर्काच्या जोरावर पडताळून पाहीले का?
काही जण हा तर्क पुढे ठेवतात की मंगळ ग्रहावरील श्रद्धेमुळे कित्येक लोकांच्या आयुष्याची वाताहात लागली आहे म्हणून ज्योतिष वाईट. ही वाताहात ज्योतिषाविषयक अपुर्या, अर्धवट ज्ञानातून स्वतःच्या भयगंडातून लागली आहे की मूळ ज्योतिष या विषयामुळे? तसं तर असंही म्हणता येईल की "प्लास्टीक सर्जरीचा" अतिरेक होतो आहे ही विज्ञानाची चूक आहे. शेवटी विज्ञान काय किंवा ज्योतिष पर्यावरणाविषयी, एकमेकांसंबंधी ज्ञान वाढविणारी आपली टूल्स (तंत्रे) आहेत.
अजून एक आक्षेप हा असतो की ज्योतिषावर विश्वास ठेवणारे लोक कावीळ झालेल्या डोळ्यांनी बघतात. जजमेंटल असतात. जजमेंटल असण्यात काहीच गैर नाही. मैत्रीत, रोजच्या व्यवहारात नीरक्षीरविवेक हा हवाच. आओ जाओ घर तुम्हारा अशी लिबरल विचारसरणी काय कमाची? पण एक आहे - की मेष रास = धडक देण्याची जिद्द/वृत्ती असे सरसकटीकरण चूकीचेच. पण असे सरसकटीकरण करतं कोण - तर ज्योतिषाचे अर्धवट ज्ञान असलेले, अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले लोक. पण हे लोक = ज्योतिष का? नाही.
कालसर्पयोग आदि गल्लाभरुपणा निषेधार्हच. पण त्या वृत्तीचा निषेध म्हणून संपूर्ण ज्योतिषविद्येला नाव ठेवणेही चूकच.
अजून एक तर्क ह की जगतील एवढे सर्व लोक १२ राशीत कसे विभागता येतील? तर १२ राशी-१२ घरं- कुंडलीतीले ९ ग्रह -त्यांचे अंश- तेव्हाचे ९ ग्रह-त्यांचे अंश - तती व्यक्ती असलेल्या जागेचे अक्षांश रेखांश हे सर्व पहावे लागेल आणि समजा या सर्व काँबिनेशनमधून समजा जस्तीत जास्त १० मिलीअन विविध शक्यता झाल्या तरी जगातील लोकं त्या १० मिलीअन शक्यतांमध्ये कसे बसतील हा प्रश्न आहेच. ज्योतिष्यांनी "सेल्फ विल (इच्छाशक्ती)" कधी नाकारल्याचे आठवत नाही. तेव्हा इच्छाशक्तीने परीस्थितीत फरक घडून येऊही शकेल. मग प्रश्न आहे - जर इच्छाशक्तीच्या जोरावर परीस्थिती बदलता येते तर मग ज्योतिष विद्द्येला अर्थ काय राहीला? त्याला उत्तर असे की "फलज्योतिष" सारखे "एव्होल्युशनरी अॅस्ट्रॉलॉजी" आणि अन्य "हॉरोस्कोपिक", "होररी" वगैरे प्रकारही आहेत.
तरी हा प्रश्न राहतोच की १० मिलीअन शक्यता अन अगणित लोक तेव्हा कमीत कमी एखाददुसर्या पॅटर्नची पुनरावृत्ती होणारच म्हणून मग फलज्योतिष ही शाखा मोडीत काढायची का? पुनरावृत्ती झालेल्या त्या व्यक्तींचा कल/भविष्य/वागणूक अगदी समान असते का? असेलही किंवा नसेलही. नाही होत असा ठाम विदा आहे का? कोणी केलाय का अभ्यास? जोपर्यंत तसा नकारप्रवण (प्रूव्हींग निगेशन) अभ्यास होत नाही तोपर्यंत ज्योतिषाचा अभ्यास करणारे करत राहणार. पण म्हणजे ते मनोरुग्ण आहेत असे नाही.
परिचय
आपल्याला ज्योतिष विषयक प्रश्नांची चिकित्सा करावीशी वाटते ही आनंदाची गोष्ट आहे.
अधिक माहिती अस्मादिकांचे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद हे पुस्तक जरुर वाचावे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
नक्की वाचेन. मला ही लिंक हवी
नक्की वाचेन. मला ही लिंक हवी होतीच. पूर्वी आपण दिली होती पण दुर्लक्ष झाले होते. आता वाचेन.
घाटपांडेसाहेब तुम्ही लेखाच्या
घाटपांडेसाहेब तुम्ही लेखाच्या सुरवातीलाच आवाहन केले आहे की - सामान्य माणसाने चिकीत्सक दृष्टीने व ज्योतिषांनी अंतर्मुख होऊन वाचावे,.
तसेच वाचण्याचा प्रयत्न करेन.
कर्वे यांना चेहरा पाहून कुंडली मांडता येत व माझी त्यांनी मांडली होती. अर्थात त्यामुळे ज्योतिष सिद्ध होत नाही तर ज्योतिर्गणित सिद्ध होते.
ही अभ्यासपूर्ण लेखमाला डोळसपणे वाचेन. ती येथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
कर्वे यांना चेहरा पाहून
हे कर्वे म्हणजे राजाभाउ कर्वे च ना? या विषयी अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. माझ्या ज्योतिष प्रवासातील गुरुतुल्य स्नेही कै. माधव रिसबूड हे एकदा त्यांच्याकडे गेले होते. परंतु त्यांना तसा काही अनुभव आला नाही.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
मी भारतात असतानाच
मी भारतात असतानाच त्यांच्याबद्दल ऐकले होते, कुर्ल्याला का कुठे ते रहात होते वाटतं. तेव्हा मी फोन केलेला पण काही कारणाने अपॉईंटमेन्ट मिळाली नव्हती. आणि त्यानंतर २ की ३ महीन्यात तडकाफडकी नोकरी मिळून माझे अमेरीकेत येणे झाले.
कर्वे हे २००४ मध्ये असावे, अमेरीकेत आले होते. माझ्या कलीगनेच त्यांच्या रहाण्याची सोय केली होती. त्यांना भेटायची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला.
तिने स्वतः काही पैसे घेतले (चार्ज केले), कर्वे पैशाला हात लावत नाहीत असे सांगीतले. प्रत्यक्ष भेटीत, मी बदामाचा मोठा पुडा घेऊन गेले होते जो त्यांनी आनंदाने स्वीकार्ला. पत्रिका असल्यास आणावी असे सुचविले होते. मला माझी पत्रिका पाठ असल्याने मी ती कागदावर मांडून त्यांच्याकडे गेले. कर्वे यांनी मला माझ्या हातात पत्रिका धरुन ती डोळ्यासमोर धरावयास सांगीतली. आणि घडाघडा प्रत्येक स्थान व त्यात पडलेला ग्रह बोलून दाखविला. अगदी २ मिनीटात. अर्थात अंश वगैरे त्यांनी सांगीतले नाहीत फक्त कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे हे व लग्न इ सर्व सांगीतले.
नंतर मी त्यांना तेव्हाचा आमचा प्रेसींग इश्श्यू विचारला की "अमेरीकेत सेटल होणार की नाही?" त्यावर ते म्हणाले होय ४ वर्षे लागतील. पण अनुभव असा आला की सेटल = अप्लाय करुन, ग्रीन कार्ड मिळायला पुढील ७ वर्षे लागली.
कर्वे यांनी मला माझ्या हातात
तुमच्या मागे आरसा नव्हता याची तुम्हाला खात्री आहे का? कागदाच्या मागच्या बाजूला खुणा उमटत नाही हे तपासलं होतं का? तुम्ही चष्मा लावला होतात का?
'डोळ्यासमोर धरायला सांगितली' या शब्दांपोटी या शंका आल्या.
+१ आणि पातळ कागदातून मागचे
+१
आणि पातळ कागदातून मागचे वाचता पण येते.
हाहाहा. मागे आरसा होता का
हाहाहा. मागे आरसा होता का याची शहनिशा नाही केली पण अंतर बरच होतं.
माझ्या बर्याच मैत्रीणी
माझ्या बर्याच मैत्रीणी ब्रेकअप, लग्न, करीअर, पैसा यासंदर्भात ज्योतिष, नाडी, वास्तु, नवस, शुक्रवारचे व्रत वगैरे केलेल्या/करणार्या आहेत. त्यातल्या एकीला थोडा मानसीक प्रॉब्लेम म्हणता येउ शकेल, पण बाकीच्यांना नैराश्य, मनोरुग्ण म्हणण्यासारखं काही झालेलं नव्हतं (असं माझं मत बरंका
). गोँधळलेल्या, लो सेल्फएस्टीम वगैरे म्हणता येईल कदाचीत.
पत्रिकेवरुन भविष्य सांगता येतं यावर विश्वास नै. पण शुक्रवारचं व्रत केलेल्या दोघीँचं लग्न ठरलं खरं. योगायोग..
त्या व्रताची सांगता करायला बनवलेली तांदळाची खीर लै भारी होती आणि सत्यनारायण प्रसाद पण मस्त लागतो
सत्यनारायण प्रसाद पण मस्त
आजकाल साजुक तुपातला शिरा बनवतात का?
(लहानपणी, जेव्हा घरी एकटीला सोडून जाता येईल इतपत मोठी नव्हते तेव्हा सत्यनारायणाला जावं लागायचं. आणि मग डालडातला शिरा न खाण्यावरून आईशी माझं भांडण व्हायचं. हातात असलेल्या त्या गोष्टीला प्रसाद म्हणावं का डालडातला शिरा यावर ते भांडण घसरत असे. या प्रकारचे दोन-चार अनुभव आल्यावर त्या डालडावाल्या शिर्यातून माझी सुटका झाली.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आजकाल साजुक तुपातला शिरा
आजकाल साजुक तुपातला शिरा बनवतात का? >> हो बहुतेक. आणि बरेचजण प्रसादाला या म्हणुन पुर्ण जेवण खाऊ घालतात.
'फुकट आणि आयतं गिळायला मिळतं ते पौष्टीक आणि रुचकर असतं' असं म्हणुन खाते मी सगळं
लहानपणी नवरात्रीत (चैत्र की
लहानपणी नवरात्रीत (चैत्र की नेहमीची आठवत नाही) कुमारीकापूजनाला शेजारच्या भाटीयाभाभींकडे जायला मिळत असे. मी धरुन ९ मुली असायच्या. त्या बिचार्या सर्व मुलींचे पाय, स्वतःच्या हातांनी (प्रतिकात्मक रीत्या) धुवून, त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढून तांदूळ लावत. खाणं तर इतकं मस्त असे. आम्हाला खायचेच पडलेले असे. ते आठवले की नकळत भाटीया भाभींची आठवण प्रकर्षाने येते.
अरे हो त्या कुमारीकापुजनाला
अरे हो त्या कुमारीकापुजनाला मी पण जायचे पण मराठी लोक्सकडे. ते बहुतेक पाय नै धुवायचे पण पाया पडायचे. मला भीती वाटायची त्या रिचुअल्सची.
मला वाटतं एकंदरच लहान मुलांना हे सगळं आवडत नसावं. शेजारच्या १.५ वर्षाँच्या मुलीने बोरनहाण, हलव्याचे दागिने वगैरेला रडुन रडुन खूप गोँधळ घातलेला आणि चिडुन दागिने काढुन फेकुन दिलेले
डालड्यातला शिरा
साजूक तुपातला शिरा बेष्ट हे खरेच, पण डालड्यातल्या शिर्याला स्वतःचा म्हणून एक स्वाद असतो. तोही काही वाईट नसतो. (बीअरसारखी) त्याचीही चव लावून घ्यावी लागते.
अशा शिर्यात केळे किंवा अननस घातलेला असेल तर तो अधिक चविष्ट लागतो. विशेषतः दुसर्या दिवशी.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
खरंच साजूक तुपातला शिरा
खरंच साजूक तुपातला शिरा म्हणजे जीव की प्राण... पण तो शिरा असा तुपामधे थबथबलेला असला की मला जाम आवडायचा.. माझे काका (मावशीचे यजमान) श्रावणामधे अगदी नोकरीतून सुट्ट्या काढून सत्यनारायण पूजेच्या सुपार्या (ऑर्डर) घ्यायचे, मग दर दिवसाआड घरी प्रसाद असायचा.. तरी कधी कंटाळा आला नाही तेव्हा प्रसादाचा.. शिवाय कधी कधी मावशी प्रसादाच्या (शिर्याच्या) पोळ्या करायची... त्या खरपूस पापुद्र्याच्या शिर्याच्या पोळ्या म्हणजे मेजवानीच असायची
... लहानपण देगा देवा ...अजून दुसरं काय 
(शिवाय पुजेत आलेली सगळी चिल्लर काका आम्हा मुलांनाच द्यायचे .. त्यामुळे ज्याच्या घरी पुजा असायची त्याला 'सत्यनारायण' पावायचे की नाही माहिती नाही पण आम्हा मुलांना प्रत्येक पुजेत ते पावत असे
आमरस घातलेला शिराही झकास !!
आमरस घातलेला शिराही झकास !!
किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||
झालं का सुरू
झालं का पुन्हा सुरू!
-Nile
मनोरुग्ण वगैरे सरसकटीकरण
मनोरुग्ण वगैरे सरसकटीकरण केल्यावर सुरु होणारच ना!!!
ज्योतिष टक्केवारीत मार खातय
ज्योतिष टक्केवारीत मार खातय म्हणून तर प्रॉब्लेम आहे,आणि हो मानसशास्त्रा(ज्ञा)कडे जाणारे पण बहूतांश मनोरुग्णच असतात की.
मानसशास्त्रा(ज्ञा)कडे जाणारे
मानसशास्त्रा(ज्ञा)कडे जाणारे पण बहूतांश मनोरुग्णच असतात की.>> काय उचकवायचा पिलॅन आहे का? पण आम्हास आमच्या विषयाच्या मर्यादा आणि बलस्थाने माहीत असल्याने आम्ही चिथावले जात नाही.
डिटेलात पुढच्या भागात लिहिनच. त्या धाग्यावर अवांतर सुरु झालेच आहे, इथे नको.
बरं मनोरुग्ण नको म्हणायला, पण
बरं मनोरुग्ण नको म्हणायला, पण
"१० मिलीअन शक्यता अन अगणित लोक तेव्हा कमीत कमी एखाददुसर्या पॅटर्नची पुनरावृत्ती होणारच म्हणून मग फलज्योतिष ही शाखा मोडीत काढायची का?"
हे पुरेसं कारण नाहीये का?
अवांतरः तर्कावर पडताळून पाहण्याविषयी बोलताहात म्हणून
"जन्माच्या वेळच्या ग्रह-तार्यांच्या स्थितीवर एखाद्याचं भविष्य अवलंबून असणे" हे तर्काधातीत आहे का ?
बरं मनोरुग्ण नको म्हणायला, पण
वेल ... ज्योतिष त्यावरच आधारीत आहे. सो ....
अभ्यास करायला एक आयुष्य अपुरे आहे. या जन्मी, कळेलसे वाटत नाही.
ज्योतिषात रस असणार्या,
ज्योतिषात रस असणार्या, त्याआधारे निर्णय घेणार्यांना शिव्या न घालताही ज्योतिष नामक प्रकार हा स्यूडोसायन्स आहे हे सिद्ध करायला अवघड नाही. तसे लै वेळेस झाले आहे.
http://www.truthmagazine.com/archives/volume34/GOT034263.html
प्रॉपर रिसर्च पेपर्स ची लिंक यात नाहीये, पण जरा शोधाशोध केल्यास तेही सापडेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मनोरुग्ण
'मनोरुग्ण' या शब्दावरुन हा सगळा वाद सुरु आहे असे दिसते. मनोरुग्ण हा शब्द बराचसा सापेक्ष आहे, असे मला वाटते. प्रत्येकजण थोड्याफार प्रमाणात मनोरुग्णच असतो. तुमची फुटपट्टी तुम्ही कुठे लावता यावर सगळे अवलंबून आहे. अत्यंत उत्तम मानसिक आरोग्य आणि उन्माद (मॅनिया) यातही फार फरक नसतो. त्यामुळे मनोरुग्ण या शब्दाबाबत इतके हळवे होऊ नये. जगातील कित्येक अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तींना या ना त्या स्वरुपाच्या मानसिक अडचणींनी भंडावले होते. त्यामुळे काय समजा कुणीतरी 'ज्योतिषावर विश्वास ठेवणारे मनोरुग्ण, दारु पिणारे मनोरुग्ण, कर्मकांडे करणारे मनोरुग्ण..' असे जनरलायझेशन केले तर आपण मुंबईला एक भिकार म्हणणार्यांसमोर 'सात भिकार!' म्हणणार्या खर्या मुंबईकराप्रमाणे वागावे. फार झाले तर हे वाचावे. बोचर्या टीकेची सल कमी होईल...
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
Show me a sane man
"Show me a sane man and I will cure him for you." असे कार्ल युंग (Carl Jung) म्हणून गेला आहे.
(कार्ल युंग हा प्रसिद्ध मनोविकारतज्ञ, मानसोपचारतज्ञ. यानेच विश्लेषणात्मक मानसशास्त्राचा पाया रचला. )
एकच नसले तरी भुमिका सारखीच
बरीच चर्चा झाली आहे.
फलज्योतिषावर विश्वास ठेवणे वा न ठेवणे हा वेगळा मुद्दा झाला. मात्र ज्योतिषांचे अस्तित्त्व अमान्य करताच येत नाही कारण ते आहेतच, सर्वत्र, जगभर!
आता प्रश्न येतो जारण-मारण च्या रांगेत ज्योतिष बसवणे किंवा "मनोरुग्ण" आणि ज्योतिषाच्या संबंधाचा.
सर्वप्रथम मनोरुग्ण म्हणजे "वेडा" किंवा अज्ञानी नव्हे! असे माझे आत्तापर्यंतचे वाचन मला सांगते. भिती, निराशा, वैफल्य, आत्मकेंद्रीत स्वभाव, काळजी वगैरे भावनांवरील आपल्या मेंदुचा ताबा कमी होणे किंवा सुटणे म्हणजे सुद्धा मनोविकारच. तो जवळजवळ कोणत्या ना कोणत्या बाबतीत प्रत्येकालाच असतो.
ज्योतिषाकडे जेव्हा सामान्य व्यक्ती जाते ती भविष्य जाणून घ्यायच्या उद्देशाने जाते हे सत्य. पण ते भविष्य का जाणून घ्यायचं असतं? सामान्य व्यक्ती तिथे जाते त्यामागे केवळ आणि केवळ 'अनासक्त व निरपेक्ष' उत्सुकता हे कारण आहे असं जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर Lets agree to Disagree
मग या भावनांवरचा ताबा अल्प/स्वल्प/अत्यल्प प्रमाणात - प्रसंगी ज्याला संख्यांच्या बळावर अतिशय नैसर्गिक म्हणता यावे इतकेही* - सुटल्यावर ज्योतिषी आशा दाखवून, कधी कठोर बोलून वगैरे प्रकारे एकप्रमारचे समुपदेशन करतात (असे समुपदेशन जे समाजमान्य आहे. निराश व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला तर त्याला मनोरुग्ण समजले जाते, अश्यावेळी तोच ज्योतिषाकडे गेला तर तसे समजले जात नाही. असो.)
याच भावनांवरचा ताबा बराच सुटला की जारण-मारण करणार्यांना बोलावले जाते किंवा मनोरुग्णालयात दाखल केले जाते.
* संख्यात्मक पातळीवर जायचं तर** फल-ज्योतिषाला पूर्ण थोतांड समजणारे माझ्यासारखे इतके कमी आहेत की आम्हाला फल-ज्योतिष अमान्य करण्याचा मानसिक आजार आहे असा दावा करता यावा

** यावरून एक गंमत आठवली. माझ्याकडे एक पेपर आहे, ज्याच्यामते दावा व मागणी आहे की, "आनंदी राहणे" या मानसिक आजार समजले पाहिजे. कारण जगात स्वतःला आनंदी समजणारे लोक स्कीझोफ्रेमिया झाल्यापेक्षाही कमी आहेत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मग या भावनांवरचा ताबा
म्हणजे भावनांवर ताबा असेल तर ज्योतिषाकडे जाऊच शकत नाही असा काहीसा सूर दिसतोय इथे. हे सरसकटीकरण आहे आणि म्हणूनच चूक आहे. उत्सुकता हेही एक सबळ कारण त्यामागे असते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लेट्स अॅग्री टु डिसअॅग्री
मान्य आहे. आपल्या स्वकर्तृत्त्वावर विश्वास आणि भावनांवर ताबा असलेल्या व्यक्तींना स्वतःचे भविष्य जाणण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याचे दुसरे कारण मला दिसत नाही.
केवळ व निव्वळ उत्सुकतेसाठी स्वतःची पत्रिका का दाखवेल कोणी? आधीच म्हटलंय की:
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बारीक मुद्दा
उत्सुकता अनासक्त असते असा दावा नाहीच. मात्र उत्सुकता सापेक्ष असेल तर त्या माणसाचा स्वतःवर ताबा नाही हा निष्कर्ष फार-फेच्ड आहे. व्यक्तिगत प्रेफरन्सेसचा आरोप केल्यासारखे वाटते आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मात्र उत्सुकता सापेक्ष असेल
माणसाचा स्वतःवर ताबा नाही नव्हे त्याच्या एखाद्या भावनेवर ताबा नाही. उदा. भिती, निराशा, वैफल्य.. इ.इ.
आणि असा ताबा नसणे यात गैर/वाईट/अनैसर्गिक काही नाही असेही मला वाटते. आपल्या प्रत्येकाचाच कोणत्यातरी भावनेवर ताबा नसतो व त्या भावनेला आपला ताबा आपण घेऊ देतो.
अशा वेळी आपले समुपदेश साधारणतः आपल्या जवळची व्यक्ती जसे पालक, मित्र, पती/पत्नी, मुले वगैरे करतात. मात्र त्यानेही त्या भावना आपला ताबा घेताहेत असे आपल्याला जाणवले तर काही ज्योतिषासारख्या समुपदेशकाची मदत घेतात
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ओके फाईन. मग सापेक्ष उत्सुकता
ओके फाईन. मग सापेक्ष उत्सुकता असेल तर कुठल्या भावनेवर ताबा नाही असेही म्हणता येईल?
कुठल्या भावनेमुळे निर्माण होणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठपर्यंत जायचे हे व्यक्तिपरत्वे बदलते. मग तर शास्त्रज्ञांचा आपल्या उत्सुकतेवर ताबा नसल्याने ते शास्त्रज्ञ झाले असेही म्हणता येईल. भुकेवर आणि इतर इच्छांवर ताबा नसल्यानेच माणुस नोक्रीधंदा करतो, नैका
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कुठल्या भावनेमुळे निर्माण
सहमत आहे.
काहिजण भिती, राग, वैफल्य, निराशादी भावनांना स्वतःच काबुत ठेवतात, काही आपल्या सुहृदांची मदत घेतात, काही ज्योतिषाकडे समुपदेशनासाठी जातात तर काही मानसोपचारतज्ज्ञाकडे.
थोडक्यात ज्योतिषी हा केवळ एक समुपदेशक असतो, इतपत मान्य करता येईल का? का तितकाही लसावि निघत नाही?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ज्योतिषाचा रोल समुपदेशकाचा
ज्योतिषाचा रोल समुपदेशकाचा किती वेळेस असतो आणि कितीदा नाही? मुळात तो कुंडली वगैरे मांडून काही भविष्य इ. सांगतो. ते खरे आहे असे काहीजणांना वाटते म्हणून ते त्याच्याकडे जातात इतकेच. ज्योतिष्याला समुपदेशक म्हणणे म्हंजे त्याच्याकडे जाणार्यांबद्दल काहीसे जजमेंटल मत व्यक्त करणे आहे म्हणून माझा त्याला आक्षेप आहे. अंधश्रद्धाळू हे एक लेबल सोडले तर बाकीची लेबले जोतिष्याकडे जाणार्यांना लावता येतीलच असे सांगता येत नाही. अंधश्रद्धाळू असणे आणि भावनांवर काबू नसणे यांचाही परस्परसंबंध नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ओके
ओके आक्षेप पोचला. अन् या बाबतीत जजमेंटल असण्याचा आरोपही मान्य आहे परंतु त्याबद्द्ल खेद नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खेद असूदे वा नसूदे-तो एक
खेद असूदे वा नसूदे-तो एक वेगळाच विषय. मुद्दा इतकाच, की लावलेल्या लेबलची व्याप्ती अनावश्यकरीत्या व्यापक आहे आणि ते तथ्याला धरून नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आणि ते तथ्याला धरून
मुळात ज्योतिषात सारेच सापेक्ष असल्याने त्यात (ज्योतिषात) किती तथ्य आहे यावर इतके ठोस व ठाम वक्तव्य करण्यात फार हशील नसावे. काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुम्ही दोघे "मेष" का रे
तुम्ही दोघे "मेष" का रे मुलांनो
नाही, कोणीच हार जात नाहीये म्हणून विचारले. हाहाहा
नाही, कोणीच हार जात नाहीये
ते दोघे तेवढ्यापुरते रिकामटेकडे असण्याची शक्यता विचारात घेतली काय?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गल्ली चुकल्या गेली आहे.
पण ज्योतिषात किती तथ्य आहे यावर भाष्य इथे कोण करतंय?? तुमच्या प्रतिसादाची गल्ली चुकलीये
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अदिती, बॅटमॅन, अस्मिता,ऋषिकेश....
अदिती, बॅटमॅन, अस्मिता,ऋषिकेश, प्रकाश घाटपांडे ....
वरती सारिकातैंचा एक प्रतिसाद आहे. असेच काही चमत्कारिक अनुभव मी ऐकलेत.
माझा ज्योतिषावर विश्वास नसतो तेव्हाही असे काही( अतर्क्य अनुभव ) सांगणार्या जवळच्या व्यक्तींवर विश्वास असतो.
त्यामुळे तिढा कसा सोडवावा समजत नाही.
त्यामुळेच धाग्यावर किंवा एकूण विषयावरच गप्प बसलो होतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मन घाटपांडे सरांच्या लेखात
मन घाटपांडे सरांच्या लेखात हेच ते म्हणतात - माहीती "ऐकीव" असते. तुम्हाला अनुभव आला आहे का?
म्हणून मी माझा अनुभव सांगीतला. कर्वे यांच्या साईटवर मध्यंतरी जाऊन पाहीले होते. ते विश्वरुपदर्शी श्रीकृष्णाची उपासना करतात.
____________________
घाटपांडे सरांच्या एका प्रतिक्रियेला उपप्रतिक्रियाही मी दिली होती की मला एक चमत्कारीक अनुभव आला होता. ठाण्याला जाणार्या अति अति अति भरलेल्या ट्रेनमध्ये लेडीज डब्यत मी होते. दारापाशी खांब धरुन बाहेर बघत कशी बशी उभी होते. त्यादिवशी कोणीतरी त्या गर्दीत मरणार असे वाटत होते. अन थोड्या वेळाने कोणीतरी डोक्यावरुन क्लॉकवाइज हात फिरवायला सुरुवात केली. मी हात डोकयावर नेला की तो हात दूर व्हायचा. त्या बाईला कसा सुगावा लागायचा माहीत नाही. बरं मी ज्या हाताने खांब धरलेला तो ना सोडू शकत होते (नक्की कोणीतरी ढकललं असतं) ना मागे वळून नीट पाहू शकत होते. मागच्या बाईला मी सारखी सांगत होते - हाथ मत लगाओ अन ती म्हणत होती - "अरे बाई मै नही लगा रही हुं" खूप वेळ १० मिनीटे हा प्रकार चालला.
मला तो अनुभव बरोबर वाटत नाही. पुढे मला काही व्याधी लागली जी डोके/मन/मेंदू याशी संबंधित होती. वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे वाटेल पण मला तो प्रसंग विचित्र अन युनिक वाटतो.
____________
कितीही स्वतःची समजूत करुन घेतली की "पाकीट मारण्यासाठी कोणीतरी लक्ष विचलित करत होते" तरी पटत नाही. १० मिनीटे??? इतका वेळ एकाच गिर्हाइकावर लक्ष केंद्रित कोण करेल? एवढं वाटतं की जर मी खांबावरचा हात सोडला असता तर तो माझा शेवटचा दिवस ठरला असता.
खरं-खोटं बाजूला राहिलं. पण
खरं-खोटं बाजूला राहिलं. पण असले अनुभव ऐकायला मजा येते. या अनुभवांसाठी धागा काढा ना कुणीतरी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हरकत नाही. मला अनुभव येत नाही
हरकत नाही. मला अनुभव येत नाही तोपर्यंत माझे मत असेच राहील. आला कधी अनुभव तर कदाचित माझ्यापुरते बदलेल. पण मग रिप्रोड्यूसिबिलिटी का नाही या प्रश्नाचे उत्तर मिळावे असेही वाटते कैकदा.
मुळात रिप्रोड्यूसिबिलिटी नसणारे अनुभव तर्कातीतच असले पाहिजेत असे काही आहे का? तशा अनुभवांचा अॅनॅलिसिस करायचा तर प्रचलित तार्किक व्यवस्थेत काही बदल करणे अपेक्षित आहे का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हं...
हं... वर्तुळात कोन शोधू नयेत, कोनाकृतीत वक्र का दिसत नाहीत, असे म्हणू नये.
असो.
बायनरी थिंकिंग अलर्ट
बायनरी थिंकिंग अलर्ट
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माझा ज्योतिषावर विश्वास नसतो
अशा प्रकारच्या अनुभवांचं एक पूर्ण सांपल घेऊन त्यात खरं किती ठरलं, खोटं किती ठरलं याचं मोजमाप करता येईल. असं केलं आहे का?
त्यातून ज्योतिषात एकामुळे दुसरं झालं यातल्या दोन गोष्टींचा कार्यकारणभाव जोडता येत नाही त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं मला जमत नाही. कार्यकारणभावसुद्धा असा पाहिजे की ज्यात falsifiability ची शक्यता खुली आहे. कोणीतरी देव/सुप्रीम पावर आहे, त्याच्यामुळे होतं यावर विश्वास ठेवणं शक्य नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मुळात रिप्रोड्यूसिबिलिटी
ते(बरेचसे) मुळात अनुभव नाहीतच असे ऑर्ग्यानिक केमिस्ट्रीचा अभ्यास करणारी मंडळी सांगतात, काही आंतरजालीय चर्चांचा अनुभव गाठीला घेऊन सांगु इच्छितो की तर्कातीत हे सापेक्ष आहे, एलिअन असल्याबद्दल काही पुरावा आहे काय? मग त्याचा अभ्यास मानवाच्या भविष्यकालीन हितासाठी चालु आहेच न?
ते(बरेचसे) मुळात अनुभव नाहीतच
तर्कातीत गोष्टींचे अस्तित्व फॉर्मली सिद्ध करता येते हे गोडेलने दाखवूनच दिलेय. बाकी जालचर्चांचं सोडा
ऑरगॅनिक केमिस्ट्रीवाल्यांनी नक्की काय सिद्ध केलेय ते पहायला आवडेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ऑरगॅनिक केमिस्ट्रीवाल्यांनी
मेंदुमधील काही रसायनांच्या न/स्त्रवण्यामुळे अस्तित्वात नसलेल्या गोष्टी स्वच्छ दिसतात, ह्या रसायनांचा अभ्यास ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधे येतो असा आपला एक अंदाज आहे.
धन्यवाद
ओक्के. तशा प्रकारचे सर्वच अनुभव त्या कॅटेगिरीत येतात का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नाही, काही अनुभव आकलनाबाहेरचे
नाही, काही अनुभव आकलनाबाहेरचे असतात हे सत्य आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ही कर्वे यांची साईट -
ही कर्वे यांची साईट - http://www.yogikarveastrologer.com/index.htm
केवळ व निव्वळ उत्सुकतेसाठी
केवळ व निव्वळ उत्सुकतेसाठी स्वतःची पत्रिका का दाखवेल कोणी? >> स्वतःच्या भविष्याबद्दल उत्सुकता नसताना देखील, समोरच्याने विषय काढला तर मी माझी पत्रिका दाखवते. त्यांनी विचारलं 'काही प्रश्न आहेत का' तर 'नाही तुम्हीच सांगा तुम्हाला काय महत्वाच दिसतय/वाटतय ते' असं उत्तर देते. मला मौज वाटते त्यांच विश्लेषण ऐकायला
माझा ज्योतिषावर विश्वास नसतो तेव्हाही असे काही( अतर्क्य अनुभव ) सांगणार्या जवळच्या व्यक्तींवर विश्वास असतो. त्यामुळे तिढा कसा सोडवावा समजत नाही.>> तिढा सोडवायचा कशाला? राहुदे की तसाच. त्यांना हवं ते करु द्याव, आपण आपल्याला हवं ते करायचं. एकाच घरात फार काळ राहणार नसलो तर हे सहज शक्य आहे. मला खरतर ज्योतिषपेक्षा देवासाठीच्या रिच्युअल्स जास्त ओझं वाटतात.
अशा प्रकारच्या अनुभवांचं एक पूर्ण सांपल घेऊन त्यात खरं किती ठरलं, खोटं किती ठरलं याचं मोजमाप करता येईल. असं केलं आहे का? >> माझ्या लिमीटेड सांपलमधे 'खरं' खुप कमी बाबतीत ठरलय. आणि त्यामागे ग्रहतारे/भविष्यपेक्षा, योगायोग, हार न मानता प्रयत्न करत राहणे, हेच जास्त कारण वाटतं.
'बॉर्र' चा ट्रेनमधला अनुभव अतर्क्य आहे खरा. पण असं काही मी पहील्यांदाच ऐकतेय.
उम्म्म्म
एखाद्या संस्थळाची पत्रिका वैग्रे बनवता येणे शक्य आहे ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
होय
असू शकते. त्या संस्थळाचा जन्म कुठे, कधी झाला? यानुसार पत्रिका तयार करता येते. शहराची कुंडली असते, देशाची असते, पक्षाची असते मग संस्थळाची का असू नये? कंपन्यांची स्थापना कधी झाली यावरुन ही पत्रिका काढून त्यानुसार कंपनीत उमेदवारांची निवड करताना त्यांचीही पत्रिका पाहून ती आपल्या कंपनीला सूट आहे का? असा विचार करणारी शाखा ही आलेली आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
+१ 'इंग्रजांनी मुद्दाम अत्यंत
+१ 'इंग्रजांनी मुद्दाम अत्यंत वाईट मुहुर्त काढुन भारताला स्वातंत्र दिलं. त्यामुळेच आपल्या देशाला एवढा त्रास होतो.' अशी एक कमेँट ऐकलेली
बाकी तुमचं पुस्तक वाचतेय. खूप छान आहे. आवडलं.