वैदिक धर्माचे शास्त्रीय अधिष्ठान किंवा वेदांत विज्ञान कसे आले : एक शोध

जे जे वैदिक आहे ते पूर्णपणे शास्त्रीय आहे आणि म्हणुनच वैदिकधर्म हा एकच धर्म असा आहे की ज्याला पूर्णपणे शास्त्रीय अधिष्ठान आहे. हा महत्त्वाचा साक्षात्कार आत्ताच आम्हाला झाला. केवळ "शहाणे करून सोडावे सकळ जन" हे आमचे ब्रीद असल्यानेच हा स्टेटस-पोस्ट-प्रपञ्च...

संस्कृत मध्ये असलेला विद्‍ हा धातु वेद या शब्दाच्या मुळाशी आहे, हे सर्वाना ठाऊक आहे. पण विद्‍ आणि वेद यांना जोडणारी महत्त्वाची आर्ष संकल्पना म्हणजे विदा (डेटा) होय. वैदिक हा शब्द विदा पासून निर्माण होतो, जसे निसर्ग-नैसर्गिक. सांगायचे तात्पर्य असे की निसर्ग अगोदर असल्याशिवाय नैसर्गिक ही कल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही त्याप्रमाणेच विदा अस्तित्वात असल्याशिवाय वैदिक, वेदादि संकल्पना निर्माण होऊ शकत नाहीत. विदा म्हणजे आमच्या रानटी ऋषीपूर्वजांनी केलेल्या इंद्रियगम्य निरीक्षणातून जी माहिती गोळा केली ती. विदा अस्तित्वात असल्याशिवाय वेद रचणे आणि वेदांत विज्ञान मांडणे केवळ अशक्य आहे असे आमचे आग्रहाचे मत आहे. विदा साठविण्याची कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नसल्याने हे विदाजन्य म्हणजेच वैदिक ज्ञान आमच्या ऋषीपूर्वजांनी मौखिकपद्धतीने जतन आणि संक्रमण करण्याचा उद्योग आरंभिला. कोणत्याही विद्यातून एखादा आलेख, त्यात लपलेले गणिती सूत्र जेव्हा विद्वान/शास्त्रज्ञ बाहेर काढतात (आणि शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध करतात) तेव्हा विद्याचे महत्त्व तसे संपुष्टातच येते. तद्वतच आमच्या ऋषीपूर्वजांनी गोळा केलेल्या विद्यातून जे ज्ञानकण वेचले, ते सूक्तांच्या रूपाने ग्रथित केल्यावर आमचे ऋषीपूर्वज विदा नष्ट करते झाले. त्यांनी शोधलेल्या जटा-घनपाठादि कल्पना वापरून जर विदा जर जतन केला गेला असता, तर हजारो वर्षे टिकून राहिलेल्या वैदिक परंपरेने दक्षिणेच्या रुपाने केव्हढा मोठा आर्थिक भार मधल्या काळातल्या आश्रयदात्या राजवटींवर टाकला गेला असता, याची कल्पनाच केलेली बरी. मुख्य म्हणजे ऋक्सामयजुर्वेदादि शाखांचे अध्ययन/पठण करणार्‍या ब्राह्मणांप्रमाणे कदाचित विदापठण करणारी ब्राह्मणांची एक (किंवा अधिक) शाखा निर्माण झाली असती.

आज विदापठण अस्तित्वात नसले तरी वेदकाळात विदापठण अस्तित्वात असावे आणि अग्निचयना सारखा विदाचयन असा एखादा विधी वेदकालात अस्तित्वात असावा (जो पुढे वर दिलेल्या कारणांमुळे नाहिसा झाला) असे आमचे आणि आमच्यासारख्या अनेक इंडॉलॉजिस्टांचे मत आहे. विदाचयनाच्या वेळी सूक्त रचयिते ऋषि होमात आज्याची आहुती देत आणि विद्यातील संगती शोधायचा प्रयत्न करत. ही संगती सापडल्यावर त्यांनी जी सूक्ते रचली ती म्हणजे आजचे वेद आणि वेदांतील विज्ञान होय.

असो. सनातन प्रभात सारख्या संस्था, प. वि. वर्तकांसारखे पुण्यश्लोक द्रष्टे हे वेदांतले अमूल्य विज्ञान लोकांना सांगायचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची जी निंदा-नालस्ती केली जाते ते बघुन आम्ही व्यथित होतो. पण भविष्यात या भारतवर्षात एक दिवस असा नक्की उगवेल की घराघरात वैदिक-आज्याचा(*) ज्ञानदीप घराघरात पेटेल आणि "विदा दाखवा" अशा सारख्या आरोळ्या ठोकणार्‍या श्री. घासकडवी आणि इतर जालकंटकांची तोंडे कायमची बंद होतील अशी आशा करुयात...

* विदारुपी तुपाचा

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

एकच मारलाय पण जोरात मारलाय! ROFL

-(जालकंटक) ऋ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझं नाव घेऊन लेखन केलंय म्हणून मी सांगतो, की मनातल्या मनात खरं तर माझं तोंड बंद होईल की काय अशी मला कायम भीती वाटते. न जाणो ती वैदिक सूत्रं द्वयर्थी असतील तर? म्हणजे संस्कृत भाषेच्या एका पातळीवर एक अर्थ - ज्यात ज्ञानकण आहेत, आणि दुसऱ्याच कुठल्यातरी भाषेत त्यामागे दडलेला विदाही त्यातच साठवून ठेवला असेल अशीही शक्यता आहे. किंवा तिसऱ्याच भाषेत वाचली तर त्यातून आलेख मिळेल, चौथ्या भाषेत वाचली तर त्यातून रेफरन्सेस मिळतील. असे वेगवेगळ्या भाषांमधली अनेक आख्खी जर्नल्स एका तीन ओळीच्या श्लोकात साठवून ठेवली जाऊ शकतात. किंवा कदाचित त्या सूत्रांत विशिष्ट महाप्रचंड संख्येचा कुठलातरी दुसरा महाप्रचंड घात केल्यावर तयार होणारी अब्जावधी अंकांची संख्या मिळू शकेल. ती संख्या म्हणजे आख्खी लायब्ररी असू शकेल. इतकं गहन, खोलवर ज्ञान त्यात दडलेलं असू शकेल.

एक उदाहरणच देतो. निव्वळ अग्नि हा शब्द वापरूनच त्या काळच्या लोकांनी भारत अग्नि क्षेपणास्त्र पाठवणार हे ताडलेलं होतं. किंबहुना वेदात जर अग्नि हा शब्दच नसता तर त्या क्षेपणास्त्रांना अग्नि हे नाव पडलं असतं का? यावरून ते सिद्धच होतं.

त्यामुळे सनातन.ऑर्ग वगैरे ठिकाणी जे लिहिलेलं असतं, ते मी मुकाट्याने वाचतो. त्यांच्याकडे विदा मागण्याचं धाडस करत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर्कतीर्थ यांचं बरोबर आहे. घासकडवींसारखे विद्रट लोक आमच्या वेदविज्ञानाकडे विदा मागतात म्हणजे काय? स्टीफन हॉकिंगकडे मल्टीव्हर्स - अनेक विश्व सिद्धांताचा विदा मागता का तुम्ही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा "विद्रट" ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...'विदरफुसके' नाही म्हणाल्या ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ 'विद्रट' या एका शब्दाच्या क-ह-र चपखल वापराकरिता मार्मिक श्रेणी देण्यात आली आहे. टाळ्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वेद म्हणजे विज्ञान मानणारे ते एक टोक आणि वेद म्हणजे मूर्खपणा म्हणणारे हे एक टोक. दोघेही एकाच पातळीचे अंधश्रद्ध. असो. चालू द्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेद म्हणजे विज्ञान मानणारे ते एक टोक आणि वेद म्हणजे मूर्खपणा म्हणणारे हे एक टोक. दोघेही एकाच पातळीचे अंधश्रद्ध. असो. चालू द्या...

वेदांचे काम हे सत्याचे दर्शन करवून देणे हे आहे. विज्ञानाचे काम वास्तविकतेची उकल करवून देणे हे आहे. दोन्ही गोष्टी टोकावरच आहेत मात्र ती टोके वेगवेगळी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी लिहीलय. आवडलं Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॉर्र...............

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

संदर्भ ठाऊक नसल्याने पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

शीर्षकातील 'वेदांत विज्ञान कसे आले' या वाक्याचा वेदांमध्ये विज्ञान कसे आले असा घ्यायचा आहे की "वेदान्त विज्ञान" कसे आले असा घ्यायचा आहे?

लेख आवडला हे वे सां न ल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जुन्या मराठीत अनेकवचनी शब्दांवर अनुस्वार द्यायची पद्धत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला वाटलं वेद वदणारे 'कोकणस्थ' उच्चार आहेत का काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अनेक वेद? कसली म्हणून धड माहिती नाही तुम्हाला. एकच वेद, जावेद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जावेद नि नावेद :

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एक स्वतःच्या अस्तित्त्वावर शंका घेणारा वेद आहे ना ... ना-वेद. याच्या बाबतीत fallacy येते, त्यामुळे त्याच्या तार्किक चर्चेत न पडता फक्त जावेदच मोजावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो नावेद नसून नाविद हाये. उगा अपभरम्श करून नैवेद म्हनाल उद्याच्याला आन वाटाल सग्ळ्यास्नी खिरापतीगत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दांभिक वैदिकांनो, तुमचं कुटील डाव मी केव्हाच ओळखला आहे. हे सगळे मूळचे शैवधर्मी असलेले मुस्लीम आहेत.(संदर्भ: मक्का हे शिवमंदिर होतं. माझा ब्लॉग पहा : हवेतल्याहवेत इतिहास@ ब्लॉगस्पॉट.कॉम ) अल्लाहच्या बंद्यांना आणि सुट्ट्यांना वैदिक धर्मात घेऊन बाटवू नका..!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

'वेदवाक्य हेच प्रमाण' असं न मानणारे आणि तत्त्वज्ञान त्यावेळीही होतं .कपिलमुनी आणि त्यांचा सांख्ययोग त्यापैकी एक . बुध्दाने त्यातील ऐंशी टक्के भाग धम्मात घेतला .देव आहे असं वेद ,इसा ,आणि मुस्लिम मानतात तर अव्यक्त गोष्टीतून व्यक्त गोष्ट होऊ शकत नाही असं सांख्ययोग म्हणतो .विज्ञानही हेच आहे .आणि जर काही व्यक्त गोष्टींतून ( जसे पंच महा भूते ) सृष्टी (=व्यक्त) कोणी करत असेल ( शक्य आहे)तर ते करणारा 'देव' म्हणता येणार नाही कारण त्याच्याही आधी पंच महा भूते आहेत हे मान्य करायला हवे . आणखी बरीच मते मांडण्यात आली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो भूताने धरलं का तुम्हाला?
पंच जर भुते असती, तर आयपीएलला फिक्सिंग झालंच कसं असतं?

>>

देव आहे असं वेद ,इसा ,आणि मुस्लिम मानतात तर अव्यक्त गोष्टीतून व्यक्त गोष्ट होऊ शकत नाही असं सांख्ययोग म्हणतो .विज्ञानही हेच आहे

<<
ह्या काय कल्ला नाय बा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-