श्रावण मोडक

कळवण्यास अत्यंत दु:ख होते आहे की मराठी संकेतस्थळांवरील जुने आणि लोकप्रिय लेखक व सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रावण मोडक यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'ऐसी अक्षरे'साठी ते एखाद्या कुटुंबियाप्रमाणे होते. 'ऐसी अक्षरे' परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली.

श्रावण मोडक यांचे लिखाणः
मिसळपाव
मनोगत
ऐसी अक्षरे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

श्रावण मोडक यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्यांच्या कुटुंबीयांना आणि निकटवर्तीयांना या प्रसंगी धीर मिळो अशी इच्छा व्यक्त करतो. त्यांच्या लिखाणाद्वारे ते आपल्या सर्वांमधे आहेत आणि राहातील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

फार दु:खद बातमी.

मोडक यांच्या जवळच्या मित्रांनी मोडक यांच्या कार्याविषयी, त्यात आम्हाला काही करता येण्यासारखे असेल तर जरुर सांगावे ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दु:खद बातमी.काही करता येण्यासारखे असेल तर जरुर सांगावे ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत दु:खद घटना कळली तेव्हा विश्वासच बसला नाही. एक क्षण मेंदूने विचार केला की खर आहे का हे? आपण असे करु श्रामोंनाच विचारु. आणि लगेचच भानावर आलो. दु:ख व्यक्त करायला शब्द पुरेसे नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अगदी खरंय काका. घराजवळच त्यांचं ऑफिस असल्याने पटकन जाता-येता काहि विचारायची, निरोप/वस्तु देवघेव करायची सोय होती असे वाटायचे.
मात्र त्यापेक्षा अधिक असा एक वैचारिक आधार जवळ होता असे आता जाणवते आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्रद्धांजली. कालच त्यांना आलेल्या हार्ट अॅटॅकबद्दल बातमी समजली होती. डॉक्टरांनी 'प्रार्थना करा' असं सांगितल्याचंही कळलं. तेव्हापासूनच मनात घालमेल झाली होती. पण मनात एक आशा होती.
अजून बरंच लिहायचं आहे. विशेषतः त्यांच्या लेखनाबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रद्धांजली!
विश्वासच बसत नाहिये. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सादर आदरांजली! माझा-त्यांचा परिचय नसला तरी जालावर त्यांचे लिखाण वाचले आहे. उत्पलकडून त्यांच्याविषयी क्वचित ऐकलेही होते.
अभिवादन ! परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशान्ती प्रदान करो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

कालच त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याची बातमी समजली होती, तरी एक आशा होती.
आताच्या ह्या बातमीने शेवटी जीवन अत्यंत अन्सर्टन आहे हे पुन्हा अतिशय तीव्रतेने जाणवलं!

दु:ख व्यक्त करायला शब्द पुरेसे नाहीत हेच खरं.

भावपूर्ण श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धक्कादायक!
श्रद्धांजली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोडकांबरोबरच्या अनेक भेटींचा कॅलिडोस्कोप मनात फिरतो आहे. वळचणीचे पाणी आढ्यांस गेले.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अविश्वसनीय आणि अत्यंत दु:खद बातमी! त्यांच्याशी ओळख नसली तरी त्यांच्या लेखनातून त्यांची ओळख होतीच. भावपूर्ण श्रद्धांजली!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

देवा.. फार दु:खद बातमी. श्रद्धांजली..

---

जालावरच्या कितीतरी लोकांशी माझा फक्त खरडवह्या, विरोप, मेलामेली इतपतच संपर्क असतो. कट्टे नि प्रत्यक्ष भेटींचं मला वावडं आहे. भेटायचा काहीतरी अनाकलनीय संकोच वाटतो, होता होईतो प्रत्यक्ष भेटी पुढे ढकलल्या जातात माझ्याकडून.
मोडकांशीही असाच जालीय परिचय होता. माफक मस्कर्‍या चालत. त्यांच्या मार्मिक, अभ्यासू, समतोल प्रतिक्रियांबद्दल तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण त्यांच्या लिहिण्यात एक प्रकारचा प्रसन्न खवचटपणा असे. एखाद्या प्रश्नाच्या अनेक बाजू माहीत असलेला जुना-जाणता अनुभवी माणूस, नव्यानं मैदानात उतरलेल्या, 'फुरफुरणार्‍या' ताज्या दमाच्या गड्याकडे जशा सहनशील समजूतदारपणानं पाहील, तशा प्रकारचं काहीतरी असे त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये. त्यातून तो खवचटपणा येत असावा. त्याचं हसूही येई, नि धाकही वाटे. मिपावर धम्यानं लिहिलं आहे, सॉक्रेटीससारखे प्रश्न विचारून समोरच्या माणसाच्या बोलण्यातली विसंगती दाखवून द्यायची त्यांची सवय होती. त्यांच्या लिहिण्यातूनही ही खास सवय लक्षात आल्यावाचून राहत नसे. मुद्रितशोधनाच्या कामाच्या निमित्तानं त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क झाला. काही फोनही. त्यांच्या कामाला वेळेची घट्ट चौकट होती. माझ्याकडे मात्र उपलब्ध वेळ फार कमी. मग अमुक एक काम वेळेत करून देण्याबद्दल सौम्य निगोसिएशन्स होत. त्यांच्या घाईचं दडपण यायला लागलं मला. त्यांनी ते अचूक ताडलं असावं. 'काहीही घाई न करता, दडपण न घेता काम कर, नि प्लीज, मोकळेपणानं बोल...' असं हक्कानं सुनावलं.
तशी काही व्याख्या न करताच मित्रवर्तुळात मोडकांना गृहीत धरायला लागले होते मी. या माणसाला एकदा भेटायला हवं... असं कधी नव्हे ते माझ्या डोक्यात येई. पाठोपाठ 'काय घाई आहे... आता होईलच भेट...' असा आळसही. काल जंतूंचा धागा पाहिला, तरी अर्धं सेकंद माझ्या डोक्यात हेच, की नेहमीप्रमाणे एकमेकांची खेचाखेची करण्याचे काहीतरी पालथे धंदे असणार.
असली बातमी वाचून 'धक्काच बसला' ही सार्वत्रिक प्रतिक्रिया असते. माझीही ती झालीच. पण पाठोपाठ एक खूणगाठही - लिहिणं-वाचणं नि जालीय साधनांनी संपर्क ठेवणं ठीकच. पण माणसाला प्रत्यक्ष पाहण्याची, ऐकण्याची, अनुभवण्याची जागा दुसरं काहीही घेऊ शकत नाही. तेव्हा भेटा-बिटायचे संकोच अनाठायी. आपल्याकडे वेळ किती आहे कुणास ठाऊक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अविश्वसनिय आणि धक्कादायक!
भावपूर्ण श्रद्धांजली...

- (सुन्न झालेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही आणि आता राहूनच गेली म्हणायची.

विचारपूर्ण आणि मॅच्युअर प्रतिसाद असायचे त्यांचे. अगदी नुकताच त्यांच्याशी प्रतिसादरुप संवाद झाला होता.. आणि असंच इतरही अनेकांना जाणवलं असेल.

त्यांना सद्गती लाभो..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अविश्वसनीय बातमी. त्यांना भेटायची फार इच्छा होती. मात्र आता भेट होणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दु:खद बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धक्कादायक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रामोंशी कधीच बोलणं झालं नाही - ना खवत ना व्यनित. पण आज सारखा आवंढा दाटून येतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धक्काच बसला . परिचयाचे नसले तरी लेखनातुन , प्रतिसादातुन परिचय होता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रद्धांजलि...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये मी अदितिला भेटायला तिच्या घरी गेलेले तेव्हा शेवटची १५ मिनिटे श्रामोंची भेट झाली होती. ती अदितिची आणि माझी शेवटची भेट आणि श्रामोंची नी माझी पहिली भेट. तेव्हापासून दीड वर्षाच्या आत ते दोघेही गेले. काय बोलावे कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक-दोनदाच भेट झाली असली तरी अगदी जवळचा मित्र हरपल्यासारखे वाटते. काय बोलावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी सौहार्द निर्माण करणारी आणि जपणारी मोडकांसारखी माणसे विरळा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्यक्ष भेट कधी झाली नसतानाही, अत्यंत उदास वाटत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

सेम हीयर. दिवस अतिशय उदास चालला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या इनबॉक्स मधले वरुन तिसरे इमेल / फेसबुक नोटीफिकेशन -Shravan Modak mentioned you on Facebook

श्रामो , आपल्या पैकी बरेच जण त्यांना श्रामो याच नावाने संबोधित करतो.

सरकारी धोरणे, आदिवासी लोकांचे प्रश्न, आंदोलने, डावी विचारसरणी असे धागाविषय आले की लगेच मी श्रामो यांचा प्रतिसाद वाचायला/शोधायला उत्सुक. त्यांच्या डाव्या बाजूला झुकलेल्या मतांमुळे किंवा माझ्या मनात खटकलेल्या / नकोश्या वाटणाऱ्या विचारसरणीमुळे थोडा बहुत मी कायमच श्रामो यांच्या पेक्षा जरा वेगळ्या मताचा होतोच पण श्रामो काय म्हणतायत, त्यांची माहिती काय याबाबत कुतूहल कायम असायचे.

दोन वेळेला ग्रुप/ कट्या मधे त्यांना भेटायचा योग आला. एकदम शांत, सज्जन, हुशार, मुद्देसूद इसम ही जालावरची ओळख अगदी प्रत्यक्षातही डिट्टो निघाली. पत्रकारिता, लेखक, संगीत कंपनी (राहुल देशपांडे सीडी ), आय टी कंपनी, भाषांतरसंबधी काम, देशातील करपलेले , होरपळलेले भूभाग, लोकं, आंदोलन यांचा मागोवा घेता घेता, कविता, संगीत या धाग्यात अर्थवाही रसग्रहण करणारा रसीक अशी सर्व ओळख जालावर होत गेली.

माझ्या माहिती प्रमाणे श्रामो "सिंगल" (मराठीत अविवाहित??) होते. गम्मत म्हणजे फेसबुकवर एकदा रिलेशनशिप स्टेटस त्यांनी अपडेट केले होते की बहुदा फेसबुकाचे सेटिंग करताना गडबड झाली होती कल्पना नाही पण त्यांच्या एका दोन मित्रांनी लाईक केले होते. मी आपली नोंद घेतली होती. खरे काय ते त्यांना व त्यांच्या जवळच्या मित्रांना ठावूक. तरी 'सिंगल' श्रामो हे कायम गोतावळ्यात सापडलेले/ रमलेले दिसले. त्यांची खरडवही पाहिली तर किती लोकांशी त्यांचा संबध आला होता ते दिसेल पण हा इसम जालावर जितका दिसला ते हिमनगाचे टोक. बाकी भला मोठा भाग त्यांनी महाराष्ट्र नव्हे तर देशभर व्यापला असणार हे त्यांचे लेखन वाचणारा जाणून आहे. मराठी आंतरजालावर फार मोजकी लोक आहेत ज्यांनी अनेक लोकांवर प्रभाव टाकला आहे त्यातले श्रामो हे अग्रणी असावेत! लोक जमवण्याची ही त्यांची चुंबकशक्ती काही औरच. अनेक पुतणे, पुतण्या जमवलेले हे काका. एकदा सहज खरडवह्यातुन दंगा करायच्या दिवसात, त्यांना विचारले होते की मग इस्टेट (पुस्तके) पुतण्यांना (धमु, नायल्या) की पुतणींना(स्वाती, आदिती), तेव्हाचा तो थट्टेतला प्रश्न आज फार क्रूर वाटतोय. भले काही वर्षापूर्वी असेच अचानक कोणत्या धाग्यात / प्रतिसादात स्वताच्या अंजीओप्लास्टी, स्वता कोणाला न कळवता अ‍ॅडमिट होणे हा गुगली टाकला होता. पण पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे श्रामो मोड मधे उर्फ सतत कार्यमग्न. तब्येतीची काही वाच्यता नव्हती, त्यानंतरची ही एक्झीट फार शॉकिंग आहे.

मागल्या एक दोन वर्षात भेट झाली नाही व तसेच प्रतिसादात मतभिन्नता होती त्यामुळे आता परत ते भेटणार नाहीत ही रुखरुख कायम रहाणार, संवाद अर्धवट राहीला आहे. श्रामो यांना अजुन जाणून घ्यायलाच हवे आहे....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय बोलाव? अशी लोक लवकर का जातात? वैचारिक एकटे पण? वेगळ्या विचारान मुळे आलेल सामाजिक एकांत? का? का? वेगळ असण्याची एवढी मोठी किंमत? भीती वाटत आहे वेगळ असण्याची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

काय बोलाव? अशी लोक लवकर का जातात? वैचारिक एकटे पण? वेगळ्या विचारान मुळे आलेल सामाजिक एकांत? का? का? वेगळ असण्याची एवढी मोठी किंमत? भीती वाटत आहे वेगळ असण्याची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार वाईट वाटलं हे वाचून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रावणशी गेले दोन वर्ष संपर्क फक्त सायबरस्पेसमधे होता. पण त्याआधी प्रत्यक्षात, मित्र म्हणून श्रावण खूप वेळा भेटले.

त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल अनेकांना माहिती आहेच. लिखाणातूनही थोडी कल्पना यावी. श्रावणचं मिसळपाववर केलेलं लिखाण इथे उपलब्ध आहे. मनोगतावर केलेलं लिखाण इथे उपलब्ध आहे. ऐसी अक्षरेवरचं लिखाण.

ऐसी अक्षरेच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी लेखन मागवल्यावर, श्रावणचा खिळे हा लेख सगळ्यात पहिले आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यान्चे लेखन एकत्र उपलब्ध करुन दिल्यबद्दल धन्यवाद अदिति .
त्यान्च्या लेखनातुन त्यान्चा परिचय होइल .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी आंतरजालावरील ज्यांच्याबद्दल "एकदा भेटलं पाहिजे" असं वाटावं असा माणूस गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खुपच दुखःद बातमी. सगळं किती पटकन आणि आकस्मितपणे संपू शकतं याची पुन्हा एकदा जाणीव झाली. भावपूर्ण श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी अदिति (संपदा) आणि आता श्रामो. गंभीर विषय असो वा थट्टा-मस्करी, ज्यांच्याशी कुठल्याही विषयावर मनमोकळेपणाने गप्पा मारता येत; असे दोन बुद्धिमान आणि सहृदय स्नेही गेल्या सहा महिन्यांत अकाली काळाच्या पडद्याआड गेले. काय बोलावं काही सुचत नाही. श्रामोंना विनम्र श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज सकाळी ऐसी उघडले, ही दु:खद बातमी वाचली आणि अचानक 'पोकळी' या शब्दाचा अर्थ अगदी स्पष्ट झाला. जी जागा दुसरे कोणीच भरून काढू शकत नाही अशी एक जागा! त्या व्यक्तीच्या खास, लक्षात रहाण्यासारख्या स्वभाववैशिष्टयांनी, गुणांनी, दृष्टीकोनांनी, अनुभवांनी समृद्ध झालेली आणि आता रिकामी झालेली एक जागा...खास जागा. श्रावणच्या कुटुंबियांच्या हृदयात, मित्रपरिवारामध्ये, ऐसीवर आणि इतरत्र निर्माण झालेल्या या पोकळीबद्दल शोक आणि त्यांना श्रद्धांजली.
शेतकर्यांच्या आत्महत्येच्या धाग्यात त्यांची तळमऴ, त्यांची मला सहसा न दिसलेली बाजू (मराठी संस्थळांवरील माझ्या नवखेपणामुळे) समोर आली होती आणि कधीतरी त्यांच्याशी त्यातल्या काही मुद्द्यांवर बोलावं असं वाटून गेलं होतं...राहून गेलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रामोंशी मराठी संस्थळांवर आल्यानंतर लगेचच ओळख झाली. वेगवेगळ्या धाग्यांमुळे संपर्क वाढला पुढे मी मराठीवर चॅटमुळे जवळीक निर्माण झाली, नंतर फोनवरही काही वेळा बोलणे झाले. श्रामोंना तेव्हा गमतीने गुरुजी म्हणायला आम्ही सुरूवात केली, तुमच्या पुस्तकांच्या इस्टेटीचा वारस मी आहे असे म्हणण्याइतका आपलेपणा आमच्यात निर्माण झाला होता. सहा महिन्यांपूर्वी भारतात जायच्या आधी त्यांना मेसेज करून पुण्यात भेटायची इच्छा मी बोललो होतो. दुर्दैवाने पुण्यात फारसे रहायला जमले नाही आणि भेट राहिली ती कायमचीच, त्याची बोच मात्र राहील. श्रामोंच्या जाण्याने मी, आणि इथल्या अनेकांनी एक जवळची व्यक्ती गमावली आहे...

श्रामोंना विनम्र श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

'बातमी : श्रावण मोडक आणि लेखक चिंतातुर जंतू' अशी सांगड पाहिल्यावर का कुणास ठाऊक, काही गंभीर असावे असे वाटून गेले.
दुर्दैवाने तसेच निघाले. त्यांच्या एका प्रतिसादावर मी एकदाच प्रतिसाद दिला होता, तेवढाच काय तो झालेला माझा त्यांचा संवाद. पण तरीही त्यावेळी, 'छ्या: मालक' असे ते जे म्हणून गेले, ते आता वेगळ्या तर्‍हेने कायम ल़क्षात राहील.
बातमी वाचल्यापासून एक चुटपुट लागून राहिली आहे.
विनम्र __/\__.

(कृपया '३_१४ विक्षिप्त अदिती' यांच्या प्रतिसादातील श्रामोंचे लिखाण मूळ धाग्यास जोडावे ही व्यवस्थापकांना विनंती.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दु:खद बातमी. त्यांची प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही, पण भेटायची इच्छा होती. श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत दु:खद बातमी.
काल सकाळी कलकत्त्यात ऋतुपर्ण घोष या बंगाली दिग्दर्शकाच्या अचानक हृदयविकाराने झालेल्या निधनाची बातमी ऐकली. ते फक्त ४९ वर्षाचे होते. त्यांचे सिनेमे मी पाहिले होते, आणि अलिकडेच भेटही झाली होती. अजून भेटून बोलायची इच्छा होती. आज ऐसी वर आल्यावर ही धक्कादायक बातमी वाचली. श्रामोंचेही लेखन जालावर गेले काही वर्षं वाचत आले आहे; पुण्याला जाऊन एकदा भेटायची, त्यांच्या कामाबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा होती.
सगळे राहिलेच. श्रावण मोडकांना विनम्र श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दु:खद बातमी.
हृत्पूर्वक आदरांजली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दु:खद बातमी. आयडीच्या नावाचा धागा बघून थोड्या संभ्रमातच धागा उघडला. वाचून अतिशय वाईट वाटलं. सामाजिक प्रश्नांवर मार्मिकपणे लिहिणारे म्हणून कायम लक्षात राहतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केसु कडून चॅटवर कळाले होते की श्रामोना अ‍ॅडमिट केले असून क्रिटिकल आहेत... धक्का बसलाच पण अजूनही काही होईल अशी आशा होती पण ... Sad
दोन तीन वेळा त्यांची भेट झाली होती, पुन्हा भेटायला हवे होते...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भेट होता होता राहिलीच ! अभिजीत वैद्य आणि श्रोमो ठरल्या वेळी आले. आणि मी दुर्दैवी जाता आले नाही. ही रुख रुख कायम राहणार. प्रत्यक्ष भेटी आधीच मैत्र जुळले हेच समाधान. तुमच्याकडून खूप जाणून शिकून घेणं मात्र राहिलं श्रामो. श्रध्दांजली. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रद्धांजली!
देव त्यांच्या आत्म्यास शांति देवो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

धागा वर आलाच आहे तर पहिल्या पानावरच्या अनेकदा बदलणार्‍या 'श्रावण'सरी अतिशय नेमक्या आहेत हे नमूद करतो. कल्पना आवडली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!