श्रावण मोडक स्मृती : एकत्र जमू या!

(हे असलं कधी श्रावणच्या संदर्भात लिहीन याची कल्पनाही केली नव्हती! Sad )

***

श्रावण गेला. सत्य बलवान असते आणि ते स्वीकारणे भागच असते. गेल्या काही वर्षात तो सगळ्यांनाच माहित झाला. पण तो त्या ओळखीच्याही बाहेर खूप होता. किंबहुना, त्याच्यासारखा हरहुन्नरी, चतुरस्त्र, लोकसंग्रह असणारा माणूस असा कोणत्याही एका पैलूत सामावू शकत नाही. सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत, लेखक, पत्रकार, अभ्यासक, विद्यार्थी, कलाप्रेमी, साहित्यप्रेमी, माणूस, मित्र... हे सगळे आपल्याला त्याच्यात दिसत होतेच.

या आपल्या मित्राचं हे बहुपेडी व्यक्तित्व साजरं करण्यासाठी आपण सगळे मिळून एक छोटासा कार्यक्रम करत आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप गप्पांचं असेल. सगळे मिळून बसू, आपल्याला दिसलेला, भावलेला श्रावण याबद्दल एकमेकांना सांगू. आपल्या या असाधारण मित्राला हीच खरी श्रद्धांजली.

तारीख : सोमवार, दिनांक, ३ जून २०१३
स्थळ : रावसाहेब पटवर्धन विद्यालयाचं अंगण, साने गुरुजी स्मारक, दांडेकर पूल परिसर, सिंहगड रस्ता, पर्वती, पुणे ३०.
वेळ : संध्याकाळी ६ वाजता.

पुण्याच्या बाहेरील मित्रमैत्रिणींनीसुद्धा या कार्यक्रमाला यायचे जमवावे अशी मनोमन इच्छा आहे. मुंबईतील काही जणांशी बोलणे झाले आहे. तिथून काही लोक येत आहेत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

(हे असलं कधी श्रावणच्या संदर्भात लिहीन याची कल्पनाही केली नव्हती!

अगदी हेच मनात आल.
मनातला श्रावण जागवू या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

श्रावण 'आंदोलन'साठीही लिखाण करत. त्यांच्या कंपनीने हे संस्थळ उभारल्याचं दिसत आहे. तिथलं श्रावणचं लिखाण एकत्रित रूपात उपलब्ध करून देता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेटका व चोख कार्यक्रम. बिपीन व सहकार्‍यांचे कौतुक व आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा