लिनक्स आणि ओपन-सोर्स सॉफ्ट्वेअरचे भारतातील प्रणेते अतुल चिटणीस यांचे निधन


लिनक्स आणि ओपन-सोर्स सॉफ्ट्वेअरचे भारतातील प्रणेते अतुल चिटणीस यांचे कर्करोगाने अवघ्या ५१व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाची नोंद भारतातील आणि परदेशातील ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या वापरकर्त्यांनी आणि संगणकक्षेत्रातल्या तज्ज्ञांनी घेतली आहे. 'लिनक्स' ह्या खुल्या संगणकप्रणालीशी भारतीयांचा परिचय करण्याचे मोठे काम त्यांनी 'पीसीक्वेस्ट' ह्या मासिकाद्वारे आणि इतर माध्यमांद्वारे केले. लिनक्स आणि द्रुपलसारख्या ओपन-सोर्स सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या 'ऐसी अक्षरे' ह्या मराठी संकेतस्थळातर्फे श्री. चिटणीस यांना आदरांजली.
'हिंदू'मधील मृत्यूलेख

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आदरांजली!
हिंदुमधील लेख माहितीपूर्ण आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विनम्र आदरांजली.

यांच्याबद्दल वट्ट माहिती नव्हते, ते या निमित्ताने कळाले. बहुत धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विनम्र आदरांजली.
'वट्ट' हा अरभाट शब्द आठवून दिल्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला अतुल चिटणीस माहित होते .. त्यांच्या बरोबर बरेच वेळा ट्विटर वर संवाद झाला आहे .. "हि वॉज अ ट्रु टेकि " .. अजुन एक लिंक !

http://www.nextbigwhat.com/atul-chitnis-obituary-297/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

दोन्ही मृत्युलेख आवडले.

गेली काही वर्ष सातत्याने फक्त लिनक्स वापरत असूनही मला त्या प्रणालीच्या आतली फार माहिती नाही; अतुल चिटणीस यांच्याबद्दलही आधी माहिती नव्हती. गेल्या आठेक वर्षांच्या काळात लिनक्स इनस्टॉल करणं, वापरणं किती सोपं झालं आहे याचा अनुभव आहेच. किरण जोन्नालगड्डा यांच्या लेखामुळे लिनक्स सोपं होण्यामागचा थोडा इतिहासही समजला.

चिटणीस यांना आदरांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साधारण १९९२-९३पासून लिनक्स किंवा कोणत्यातरी प्रकारची युनिक्स वापरत असल्यामुळे आणि नेटस्केप वगैरे यायच्या आधी विदेश संचार निगमच्या कृपेनं बुलेटिन बोर्ड वगैरेवर बागडलो असल्यामुळे किरण जोन्नालगड्डा यांचा लेख आणि अतुल चिटणीस यांचं कर्तृत्व भिडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||