[महाराष्ट्र टाईम्स] "अश्लील चाळे"

आजच्या मटामध्ये शेवटच्या पानावर "एएसआय मध्ये तिरंदाजांचे अश्लील चाळे" अशा मथळ्याखाली एक बातमी दिली आहे. (http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Fixing-Baiting-P...)

नेटवरची बातमी आणि छापील आवृत्तीमधील बातमी यामध्ये मजकुरात असलेली तफावत अशी की छापील आवृत्तीमध्ये "अश्लील चाळे" असा शब्दप्रयोग आहे.

"वैचारिक बेशिस्तीची सुरुवात शाब्दिक बेशिस्तीपासुन होते" असे एक राजीव साने यांचे विधान नुकतेच वाचले होते. ही बातमी मला त्यासंदर्भात अत्यंत नमुनेदार वाटते.

मला पडलेले प्रश्न असे -

० बातमीवरून जे सत्य पुढे आले आहे त्यावरून हा बलात्कार नसून परस्पर सहमतीने केलेली कामक्रीडा आहे. केवळ ते "सापडले" म्हणून त्यांच्या वर्तनाला "अश्लील" ठरवणे कितपत योग्य आहे.
० खेळाडुंमध्ये पोषक आहार, व्यायाम आणि एकंदर extrovert nature यामुळे libido जास्त असतो. अशा परिस्थितीत परस्पर सहमतीने केलेली कामक्रीडा ही दंडनीय कशी?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

पण दुव्याची बातमी वाचली तर प्रकरण आक्षेपार्ह स्थिती व शिस्तपालन याच्या संदर्भात असल्याने अश्लिलतेचा मुद्दा तसा गऊण ठरतोसे वाटतय.

ही जी कारवाई आहे, ही दोन बाबींमुळे घडलेली असू शकते:

१. सेक्स करताना पकडले गेले म्हणून.
२. प्रॅक्टिस च्या वेळेला प्रॅक्टिस न करता भलतच काहीतरी करत राहिले म्हणून.

नं १ च्या बाबतीत मला असे म्हणायचे आहे की दोन २१ वर्षांच्या वरील लोकांना परस्पर सहमतीने सेक्स करण्यात काहीच गैर नाही. यासाठी

" खेळाडुंमध्ये पोषक आहार, व्यायाम आणि एकंदर extrovert nature यामुळे libido जास्त असतो."

हे जस्टीफिकेशन द्यायची काय गरज आहे? (तरीही मला हे मान्य आहे, कारण की ऑलिम्पिक्स नगरी मध्ये ईतक्या प्रचंड प्रमाणावर सेक्स होत असतो की निरोध मशिन्स मधले निरोध कमी पडतात. पण पुन्हा एकदा त्यात गैर काहीच नाही)

नं २ च्या बाबतीत मला असे म्हणायचे आहे, कि समजा ते सेक्स च्या ऐवजी पत्ते खेळताना पकडले गेले असते तर अशाच प्रकारची कारवाई झाली असती का? माझ्यामते तरी नाही.

मग हे सगळं का? कारण भारतीय लोक या बाबतीत प्रचंड हिप्पोक्रिट्स आहेत. मी ती बातमी वाचून पाहीली, प्रतिक्रिया वाचल्या आणि बाकी ठिकाणी देखील बातमीची सत्यता तपासून पाहिण्यासाठी शोध करून पाहीला. एकंदरच या सर्व ठिकाणी अत्यंत सेन्शेशनलीस्ट प्रकारे बातम्या देण्यात आल्या अहेत जसे की

१. "क्रिडाजगतात खळबळ"
२. "ढवळून निघाले"
३. "शॉकिंग"
४. "चान्स मिलाला तर zअवाzअवी सुरु. . . सगळे लिंग पिसाट आहेत. zअवादे"
५. "अहो नारकर ,,नेमबजिच्या सरावाकारिता आले होते ते दोघे,गेमबाजीच्या नाही आणि शेवटी परप्रांतीयाच ते दाखवलि त्यानी आपली जात अशा लोकाना महाराष्ट्राबाहेर हाकला,वीकृत श्रीशांत सारखे आहेत दोघे आता जा झारखण्ड ला आणि कॅरी ऑन करा :)"
६. "महाशय, त्याना काही सरकारी खर्चावर हनीमून करायला बोलावले नव्हते. त्यासाठी स्वतः खर्च करूं जरूर जावे. कोणीही चौकाशि करणार नाहीत. "
७. "भारतीय संस्कृति किती लयाला जात आहे. बॉलीवुड वर बंदी घातलि पाहीजे. भारताचे ख्रीशचनीकरण करण्याचा जो डाव आहे त्याचेच परिणाम सावध व्हा"

या सर्वांमधून आपला या विषयाकडील द्रुष्टिकोन किती फ्लॉड आहे ते कळते.

हे सर्व लिहिणार्या "पवित्र" लोकांना जर का हे कळले की त्यांच्या आई बाबांनी देखील कधी काळी सेक्स केला होता म्हणून ते आज एक्झिस्ट करतात तर त्या बिचार्यांना किती शॉक बसेल, त्यांचे आंतर विश्व किती ढवळून निघेल याची कल्पनाच करवत नाही.

समजा ते सेक्स च्या ऐवजी पत्ते खेळताना पकडले गेले असते तर अशाच प्रकारची कारवाई झाली असती का?
हे वाक्य महत्त्वाचे आहे. मला वाटते या सगळ्या मुद्द्यांचे सार याच वाक्यात आहे.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

१. 'अश्लील'ची व्याख्या काय?
२. "नियमांच्या 'रेंज'बाहेर जाऊन केलेल्या" क्रीडेला दंडनीय म्हणता येऊ का नये?

ही वृत्तपत्रीय भाषा टुकार आहे, पण नियमबाह्य वर्तनाबद्दल शिक्षेस पात्र होणं गैर वाटत नाही.

नियमबाह्य वर्तनाबद्दल शिक्षेस पात्र होणं गैर वाटत नाही.

+१. पण नियमांमध्ये खेळाडूंनी आपापसात लैंगिक संबंध ठेवू नयेत असा नियम आहे काय? तसा नियम असला तरी त्याचे जस्टिफिकेशन देणे अवघडच आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"निसर्गाचे नियम श्रेष्ठ असतात. निसर्गाला माणसाचे नियम कळत नाहीत. तो त्याच्या नियमाप्रमाणे वागतो." हा माझा सिद्धांत परत एकदा ख्ररा ठरला.

"वैचारिक बेशिस्तीची सुरुवात शाब्दिक बेशिस्तीपासुन होते" असे एक राजीव साने यांचे विधान नुकतेच वाचले होते.

वैचारिक बेशिस्तीची सुरुवात महाराष्ट्र टाईम्स वाचण्यापासून होते.
- काळा मठ्ठ बैल अंधारातला यांचे एक विधान

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

वैचारिक बेशिस्तीची सुरुवात महाराष्ट्र टाईम्स वाचण्यापासून होते.

ROFL

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता ह्या घटनेपायी त्यांना स्पर्धांमधून खेळायला बंदी आणली आहे आणि त्यामुळे आलेल्या नैराश्याने/शरमेने त्यांनी हॉस्टेलमध्ये स्वतःचे बरेवाईट करण्याचा प्रयत्न केला तर ?
(त्या बातमीत, अलिकडेच अशा शिबिरात एकीने आत्महत्या केल्यामुळे 'तपासण्या' चालू असल्याचे लिहिले आहे. म्हणून हा प्रश्न पडला.)

गोगोल यांच्या प्रतिसादाशी सहमत.

आणि "अश्लील चाळे" हा मथळा लक्षवेधून घेण्यासाठी दिलेला दिसतो...आणि आक्षेपार्ह नक्कीच.

त्यांनी रुममधे काहीही करावं ! रोज ड्रग टेस्ट करा पण ते नाही.
आपल्याकडे सगळ्यांच्या पर्सनल गोष्टी दुनियेला माहीतच असाव्यात असा नियम आहे जणु !