चावडीवरच्या गप्पा – आडवा(टे)नी राजीनामा नाट्य

chawadee

“नमस्कार हो चिंतोपंत! कळली का बातमी?” बारामतीकर, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.

“कसली बातमी? लोहपुरुषातले लोह वितळत चालल्याचीच का?”, नारुतात्या हसू चेहेर्‍यावर आणत.

“नारुतात्या आणि बारामतीकर, तुम्हाला फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या कळताहेत हो! पण एवढ्यातच 2014 च्या निवडणुका जिंकल्याचा आनंद झाल्यासारखे आनंदित होऊ देऊ!”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.

“घारुअण्णा, तुमच्या भावना समजताहेत, अतिशय वाईट घटना, भाजपासाठी आणि ‘भाजपेयीं’साठी!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“चला, ह्या निमित्ताने तरी भाजपा - पार्टी विथ डिफरन्स ह्याचा अर्थ काय ते कळले!”, नारुतात्या पुन्हा पांचट विनोद करत.

“हो ना! इतर पक्षांपेक्षा तसूभरही कमी नसून, इतर पक्षांत आणि भाजपा मध्ये काही नाही डिफरन्स हे नक्कीच आता कळले तमाम भारतीय जनतेला.”, बारामतीकर.

“बारामतीकर, नारुतात्यांना कसला पोचच नाही हे ठाक आहे, पण तुम्ही सुद्धा?”, इति चिंतोपंत.

“चिंतोपंत, राहू द्या! अडवाणीजींनी यापुढे आपण पक्षाचे केवळ प्राथमिक सदस्य असणार आहोत असे म्हणत सगळ्या पदांचा राजीनामा देणे, हे ह्या लाखों हजार रुपयांचे घोटाळे करणार्‍यांच्या पक्षाच्या समर्थकांना कधी कळणार नाही. कसलाही हव्यास नसलेले निष्काम कर्मयोगी यांना काय समजणार?”, घारुअण्णा एकदम भावुक होत.

“निष्काम कर्मयोगी! ह्म्म्म”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“अहो डोंबलाचे निष्काम कर्मयोगी. एकेकाळी देश पेटवला होता ना ह्याच तुमच्या निष्काम कर्मयोग्याने, विसरलात का? राममंदिराच्या नावाखाली देशभर आयोजीत केलेली रथयात्रा हा सत्तेसाठी केलेला निष्काम कर्मयोग होता काय हो घारुअण्णा? आणि चिंतोपंत प्रत्येक वेळी ह्या नारुतात्याचा पोच काढण्याची काही गरज नाही!”, नारुतात्या .

“बरंsssबरंsss, तुम्ही जुन्याच मुळी उगाळत बसा! अहो वेळ काय घटना काय? तुम्ही बरळताय काय?”, घारुअण्णा रागाने.

“घारुअण्णा, तेच म्हणतो मी, अहो वेळ काय घटना काय? व्यक्ती कोण आणि निष्काम कर्मयोगी काय?”, इति बारामतीकर.

“बरें, निष्काम कर्मयोगी राहूदे पण देशासाठी आणि देशातील जनतेच्या भल्यासाठी लढणारा एक सच्चा देशभक्त तर आहेत ते!”, घारुअण्णा रागाने लाल होत.

“अहो पण त्यांचे मूळ गाव आणि जन्म पाकिस्तानात आहे ना, जन्माने पाकिस्तानीच आहेत ते?”, इति नारुतात्या.

“नारुतात्या तुम्ही गप्प बसा!”, घारुअण्णा रागात घुमसत.

“नारुतात्या, तुम्ही शांत बसा बरे जरा. पण घारुअण्णा, असा राजीनामा देण्याने भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत नाही का? ”, चिंतोपंत.

“शिंचा, कसला अंतर्गत कलह आता?”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.

“अहो घारुअण्णा, हा राजीनामा म्हणजे, नरेंद्र मोदींची भाजपच्या निवडणूक प्रचारसमिती प्रमुखपदी झालेली निवड लालकृष्ण अडवाणी यांना फार रुचली नसल्याचे द्योतक आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“मग त्यात काय चूक आहे? एवढ्या अनुभवी आणि ज्येष्ठं नेत्याला काही किंमत आहे की नाही?”, घारूअण्णा जरा तडकून.

“हे बघा, त्यांची किंमत त्यांचीच घालवली असे माझे मत आहे?”, बारामतीकर ठामपणे .

“नक्कीच, माझ्यालेखी त्यांची किंमत तेव्हाच शून्य झाली होती जेव्हा त्यांनी बाबरी पाडल्याचा जाहीर राष्ट्रीय निषेध व्यक्त केला होता.”, नारुतात्या घुश्शात.

“घ्याsss ह्यांची गाडी अजूनही तिथेच अडकली आहे?”, घारुअण्णा उद्विग्नतेने.

“अहो पण मोदींचा उदोउदो तुम्ही लोकांनीच चालवला होता ना? मग आता निवडणूकीची धूरा त्यांच्या सक्षम हातात दिली तर त्यात एवढे राजीनामा देण्यासारखे काय आहे?”, भुजबळकाका शांतपणे.

“देशातील लोकांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान झालेले बघायचे आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांनीही आता मोदींना आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांनी व्यक्त केली आहे. हा अनाठायी उपदेशही बहुदा त्यांना झोंबला असावा. संघाकडून नथीतून मारला गेलेला हा तीर असावा असा त्यांचा समज झाला असावा.”, बारामतीकर ठामपणे.

“नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हायला काहीच हरकत नसावी. 2014 निवडणूका आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मोदी हाच पर्याय उचित आहे. अडवाणीजींनी निदान आता तरी असे कृत्य करायला नको होते.”,चिंतोपंत खिन्नपणे.

“नाही चिंतोपंत, तोच तर कळीचा मुद्दा आहे ना! अडवाणींचे राजकारण राजकारण खेळून झाले असले तरीही, पंतप्रधान पदाचा असलेला सोस काही जात नाही हेच खरे आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो, आचरटपणा आहे हा सगळा. त्यांनी पाठवलेले राजीनाम्याचे पत्र वाचलेत का? पक्षाची सद्य स्थिती आणि पक्षाची दिशा यांची बऱ्याच दिवसांपासून ते सांगड घालण्याचा प्रयत्न करत होते म्हणे! तशी सांगड घालताना त्यांना साक्षात्कार झाली की भाजपा हा मुखर्जी आणि दीनदयाळ यांनी स्थापन केलेला आदर्श पक्ष राहिला नसून मतलबी लोकांची बजबजपुरी झाला आहे. बरें ही परिणती आताच व्हायचे कारण असावे? तर, मोदींची हवा बर्‍याच दिवसांपासून तयार होत होती. त्यामुळेच तर अडवाणींनी प्रकृती अस्वस्थाचे कारण देऊन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीलाही दांडी मारली होती. पण आता नरेंद्र मोदींचे भाजपच्या निवडणूक प्रचारसमितीच्या प्रमुखपदी झालेले शिक्कामोर्तब ह्यात त्यांना त्यांच्या पंतप्रधानपदी बसण्याच्या स्वप्नाचा चक्काचूर होताना दिसला असणार. त्याच एकमेव आशेवर तर त्यांनी इतके दिवस तग धरला होता. आदर्श पक्ष वैगरे सगळ्या बाजारगप्पाआहेत, खरा पोटशूळ आणि कळीचा मुद्दा ‘पंतप्रधानपद’ आहे आणि ते आता हातातून जाताना दिसते आहे.”

“मोदी हा उत्तम पर्याय आहे! त्यामुळे विसरा हे राजीनामा नाट्य. काय पटते आहे का? तर चहा मागवा चटकन!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

Smile छान
आता पुढिल बातम्या काहि असोत बहुदा NDA आपली निवडणूक अडवाणींच्या नेतृत्त्वाखाली लढणार आहे (आणि भाजपा मोदींच्या नेतृत्त्वाखाली), जर एकट्या भाजपाला १९०+ मिळाल्या तर मोदींच्या गळ्यात माळ नाहितर अडवाणी आहेतच.

जर अडवाणींनी राजीनामा मागे घेतला नाही आणि भाजपा १५० ते १७० च्या दरम्यान लटकली तर मात्र जेटलींचा नंबर लागेलसे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'असले म्हणजे शिरी बसते नसले म्हणजे स्वप्नी दिसते' आडवाणीशिवाय भा.ज.पा. सध्या अश्या अवस्थेत दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपणांस कदाचित 'धरले, तर चावते; सोडले, तर पळते' असे म्हणावयाचे असावे काय?

(मग स्पष्ट म्हणा की, राव!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त म्हंटलं कि त्याच अर्थाची अनवट जुनी म्हण चलनात आणुया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेवढीच आमच्या ज्ञानात भर.

(स्तुत्य उपक्रम. ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अडवाणींनी भाजपला दोन जागांवरून वर आणले. गांधीवादी समाजवाद (म्हणजे काय कोण जाणे?) टाकून दिला.
प्रखर हिंदुत्वाच्या मार्गाला लावले. त्याचमुळे भाजपला सत्तेची स्वप्ने पाहता आली. पण पूर्वी (१९९८) सत्ता मिळाली तेव्हाही उदार चेहरा हवा म्हणून त्यांना बाजूस राहून वाजपेयींच्या गळ्यात माळ पडली. आता पुन्हा मोदींच्या गळ्यात माळ पडली (भले अजून ती झाकली मूठ असो).

अर्थात देशाची हिंदू मुस्लिम अशी मानसिक फाळणी करणार्‍याबद्दल दु:ख नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मंदिर पाडून त्याबद्दल माफी मागणारे बरे का 'राजधर्म' विसरणारे बरे यात मत पहिल्याकडे जातं. पण ऐशी वर्षाच्या नेत्यापेक्षा पन्नाशीचा नेता यात मत "तरूण" व्यक्तीकडे जातंय.

रावणाची उरलेली तोंडं या प्रकरणाबद्दल काय काय म्हणत आहेत याबद्दल वायफळ कुतूहल आहे.

अर्थात देशाची हिंदू मुस्लिम अशी मानसिक फाळणी करणार्‍याबद्दल दु:ख नाही.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्थात देशाची हिंदू मुस्लिम अशी मानसिक फाळणी करणार्‍याबद्दल दु:ख नाही.

+२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्या काय म्हंतो सोकाजीनाना, तंबाखु डब्बल घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हा भाजप च्या डावपेचाचा एक भाग असावा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुंटा हलवून बळकट करावा, तसे निवृत्तीची भाषा करून राजकारणातले आपले स्थान पक्के करणे ही राजकारण्यांची जुनी खोड आहे. स्वतः आडवाणी हे आठ वर्षात तिसर्यांदा करताय. 'Eloquent Brush' ह्या आर. के. लक्ष्मण यांच्या निवडक व्यंगचित्रांच्या पुस्तकात नेहरूंनी राजीनाम्याचे भावनिक अस्त्र वापरून कॉग्रेस पक्षाला एकेकाळी असेच छळले होते यावर एक भन्नाट व्यंगचित्र पाहिल्याचे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उथळ आडात ,पाण्याचा खळखळाट Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अडवाणी हेच सर्व अनर्थाचे मूळ आहेत. त्यांनी रथयात्रा काढून धार्मिक उन्माद वाढवला. त्यामुळे बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यामुळेच दंगली व मुंबई बाँबस्फोट झाले. त्यानंतर 'कारसेवा' या राममंदिरासाठीच सुरु झाली. त्यामुळे गोध्राकांड झाले. मुख्य म्हणजे हिंदु - मुसलमानांत विनाकारण अविश्वास निर्माण झाला. अशा देशविघातक कृत्यांनी लोकसभेतल्या जागा वाढल्या तर ते काही भूषणावह नक्कीच नाही. एवढे सगळे करुनही ते सर्व चौकशांतून सुटले आणि उजळ माथ्याने वावरत आहेत. त्यांची खरी जागा तर तुरुंगात असली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>एवढे सगळे करुनही ते सर्व चौकशांतून सुटले आणि उजळ माथ्याने वावरत आहेत.

+१. ते गृहमंत्री असताना सीबीआयने त्यांना क्लीन चिट देऊन टाकली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते गृहमंत्री असताना सीबीआयने त्यांना क्लीन चिट देऊन टाकली.

२००४ पासून केंद्रात असलेल्या 'सेक्युलर' सरकारने याविषयी काय केले ते वाचायला आवडेल.तसेच 'राजधर्म विसरणार्‍यांविषयी' सुध्दा 'सेक्युलर' सरकारने गेल्या ९ वर्षात काय केले हे पण वाचायला आवडेल.

नाही इतरांनी काही प्रश्न विचारले तर १९९८ ते २००४ दरम्यान सत्तेत असलेल्या 'देशभक्तांच्या सरकारने' काय केले असे तुम्ही अनेकदा विचारल्याचे वाचले आहे म्हणून मुद्दामून हा प्रश्न विचारतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कदाचित ही केस आता टाइमबार झाली असेल. कल्पना नाही

तेच.'सेक्युलर' सरकारनेही याविषयी फारसे काही केले नाही हेच खरे. मग बोफोर्स प्रकरणी 'देशभक्तांच्या' सरकारने काय केले हा प्रश्न तुम्ही कसे विचारू शकता? तिथे तर क्वात्रोचीच्या प्रत्यर्पणासंदर्भात अर्जेंटिनामधील न्यायव्यवस्थेशी डिल करायचे होते.इथे भारतीय कायदा, भारतीय न्यायव्यवस्था, स्वतःचे सरकार, पिंजर्‍यातील पोपटही स्वतःच्या नियंत्रणात इतकी अनुकूल परिस्थिती असूनही सेक्युलर सरकारला फारसे काही करता आलेले दिसत नाही.मग अडवाणी जितके दोषी आहेत तितकेच हे सेक्युलर सरकार नाही का?पण काय करणार.आपला तो बाब्या आणि इतरांचे ते कार्टे.

बरं याच सेक्युलर सरकारने नरेंद्र मोदींच्या अमेरिका व्हिसा प्रकरणी म्हटले होते: संदर्भ-- the American Government has also been clearly informed that while we respect their sovereign right to grant or refuse visas to any person, we do not believe that it is appropriate to use allegations or anything less than due process to make a subjective judgment to question a constitutional authority in India. आणि असे असतानाही आपण स्वतः असे "सब्जेक्टिव्ह जजमेन्ट" वापरायचे याला दुटप्पीपणा सोडून काहीही म्हणता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

>>आपण स्वतः असे "सब्जेक्टिव्ह जजमेन्ट" वापरायचे याला दुटप्पीपणा सोडून काहीही म्हणता येणार नाही.

ओके. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>आपण स्वतः असे "सब्जेक्टिव्ह जजमेन्ट" वापरायचे याला दुटप्पीपणा सोडून काहीही म्हणता येणार नाही.

हे 'सेक्युलर' सरकारला उद्देशून आहे. तुम्हाला पर्सनली नाही Smile तुम्ही गैरसमज करणार नाही पण उगीच तसे वाटायला नको म्हणून ते स्पष्ट केलेले बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

.
.
.
.
एकूण काय? पोलादी पुरुष किंवा लोहपुरुष म्हटले जाणार्‍यांना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून बाहेर रहावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पोलाद गंजलय बहूतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मंजुलच्या मते भंगारात काढलंय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सध्याचं पोलाद गंजलं असेल पण तेव्हाचं तर गंजलं नव्हतं ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

महाराष्ट्र टाईम्समधे या बातमीवर एक भारी प्रतिक्रिया आहे, "लोहपुरुष वितळला."

अवांतर: पुन्हा कोणी संघ-भाजपाचा संबंध नाही असं म्हटल्यावर ही बातमी दाखवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इथेही घराणेशाही आडवी येतेय. Smile

एका पोलादी स्त्रीला पंतप्रधानपद मिळालं तर दुसर्‍या पोलादी स्त्रीला किंगमेकर होण्याचा मान मिळाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थत्तेचिच्या तो वरचा फोटो कोणाचा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे राम....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

...'रामाची सीता कोण? आई, की बहीण?' या सुप्रसिद्ध संपूर्णरामायणोत्तर प्रश्नाची या निमित्ताने आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरदार पटेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अर्थातच... अजून कोणाला पोलादी पुरुष म्हटल्याचं आठवत/ठाऊक नाही.

(उर्दू फारसी पोलादाचं भाषांतर लोह का केलं ते कळलेलं नाही. इस्पाती पुरुष म्हणायला हवं होतं. लोह पोलादापेक्षा कमजोर असतं).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

< इस्पाती पुरुष

नो मॉनिशा, इस्पात साउंड्स सो मच सरकारी इस्पितळ स्टाइल !!! लोह इज समथिंग व्हिच वी कॅन से ऑथेंटीक!
>माया साराभाई मोड ऑफ..

लोह, पोलाद आणि लोखंड मध्ये फरक काय ? खरच विचारतोय, मजा नाय.
स्टील आणि आयर्न अन अ‍ॅलॉय मध्ये असतो तसंच ना??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोखंड आणि लोह एकच.

पोलादातून कार्बनचे प्रमाण कमी केले की लोखंड मिळते. जेवढा कार्बन कमी तेवढे लोखंड लवचिक आणि कमजोर होत जाते. पण त्याचे जास्त पातळ पत्रे बनवता येतात. त्यांचे न फाटता अधिक खोल ड्रॉइंग होऊ शकते.


डीप ड्रॉइंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.