"तीर्थरूप"

"उलटी अंबारी हाती येईल
आकाबाई आठवताना
कुबेर सुद्धा अपुरा पडेल
यांचे हट्ट पुरवताना

सायकल बीकल चालवायला
इथे काय लॉटरी लागली ?
एक चड्डी गांडीला एक दांडीला
तर यांची कोरी प्यांट फाटली.

सिनेमाला जाऊ म्हणतात
माज आला भडव्याना
शनिमहात्म्य वाचा म्हणतो
साडेसातीला जपताना

गाणगापुरची यात्रा आली
खाऊ तिथली तिखट शेव
अमिताभचा पिक्चर लागला
लगेच निघाले नवरदेव !

गावस्करच्या मॅचसाठी
तिकडे यांचा जीव जाईल
टीव्ही कसला बघतोस साल्या
परीक्षा तुझा बाप देईल ?"

आजारपणं अभ्यास बिभ्यास
कर्तव्यं पार सगळी पाडली
करवादून बोलले तरी
फी कधी नाही चुकली

पोराचे हट्ट पुरवताना
आज आठवतात तीर्थरूप
कडवटपणाच्या आठवणी
हसूं थोडे, आसू खूप !

तर्कटपणा कर्मठपणा
यात सारी वर्षे गेली
तीर्थरूपांच्या काळामधली
माणसेसुद्धा आता मेली.

क्वचित केव्हातरी जेव्हा
पोरावर हात उगारतो
तीर्थरूपांच्या सावलीचा
अंधार पुढे मागे होतो.

उगारलेला हात जरी
तसाच पटकन येतो खाली
"तीर्थरूपांचाच जीन पूल !"
डार्विन-मेंडेलला देतो गाली.

( निमित्त )

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाप असतांना आपले हट्ट नाकारणारे तेच तीर्थरूप त्यांच्या नातवंडांचे मात्र नेमके तेच हट्ट अगदी हौसेने पुरवतांना दिसतात...
विचारलं तर वर म्हणतात, "आता बाप तू! तू त्यांना शिस्त लावायची!! माझं काम फक्त लाड करायचं!!!"
बदमाष!!!!!
Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकूण कविता आवडली. कविता वाचताना विविध लेखकांच्या रचनांचा कवीच्या (!) शैलीवर कळत नकळत झालेला परिणाम / पडलेला प्रभाव पडताळून बघायला तर अजूनच मजा आली. 'मर्सिडीसचा तारा म्हणतो, बळवंतराव, होरा चुकला' पासून 'राघोबा रघुनाथ' पर्यंत. यातले काय कवीला अभिप्रेत आहे, काय नाही, हा वेगळा विषय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कविता (समजली तरीही) आवडली. विशेषतः शेवट.

आमचे जन्मदाते फादर तसे फारच उदारमतवादी असण्याचे दुष्परिणाम वेगळे सांगायची आवश्यकता नसावी. आता कोणात्याही "मालदार" मित्राला फादर, बापू इ. बनवून त्याची "इष्टेट" लाटण्याचा सदैव प्रयत्न सुरू असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कविता आवडली.

उगारलेला हात जरी
तसाच पटकन येतो खाली
"तीर्थरूपांचाच जीन पूल !"
डार्विन-मेंडेलला देतो गाली.

Atavism हो, दुसरं काय? Wink

रावसाहेबांनी दिलेल्या संदर्भांसोबतच [, ] एकुलत्या एक मुलाला रोज जेवताना "हे फुकट गिळायला मिळतंय", असं सुनावणारे आणि आजारी पडल्यावर ओल्या पंच्याने मारुतीला प्रदक्षिणा घालणारे भिकाजी जोशी आठवले.

बाकी आजकालचे प्रेमळ बाप पाहून नवीन पिढी मोठेपणी या अवीट स्मरणरंजनाला मुकणार, अशी भीती वाटत असतानाच सदरहू कविता वाचण्यात आली आणि ती शंका कायमची फिटली Wink -

[श्रेय(!)अव्हेर - अज्ञात फेसबुकीय कवी]

तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
.................................तो बाप असतो
...
कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो स्वतः फाटकं बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
....................................तो बाप असतो

स्वतः टपरा mobile वापरून,तुम्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
....................................तो बाप असतो

lovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो

"बाबा तुम्हाला काही समजत का? " अस ऐकल्यावर खूप रडतो
................तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो.

वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता लाईक करून शेयर पण करा.............
आणि वडिलांचे प्रेम जगाला कळू द्या..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या प्रतिसादातले संदर्भ इतक्या पटकन शोधून दिल्याबद्दल धन्यवाद, नंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मला आवडलेली दिलीप चित्रेंची एक कविता.याच विषयाशी संबंधीत म्हणून.

Father Returning Home

My father travels on the late evening train
Standing among silent commuters in the yellow light
Suburbs slide past his unseeing eyes
His shirt and pants are soggy and his black raincoat
Stained with mud and his bag stuffed with books
Is falling apart. His eyes dimmed by age
fade homeward through the humid monsoon night.
Now I can see him getting off the train
Like a word dropped from a long sentence.
He hurries across the length of the grey platform,
Crosses the railway line, enters the lane,
His chappals are sticky with mud, but he hurries onward.
Home again, I see him drinking weak tea,
Eating a stale chapati, reading a book.
He goes into the toilet to contemplate
Man's estrangement from a man-made world.
Coming out he trembles at the sink,
The cold water running over his brown hands,
A few droplets cling to the greying hairs on his wrists.
His sullen children have often refused to share
Jokes and secrets with him. He will now go to sleep
Listening to the static on the radio, dreaming
Of his ancestors and grandchildren, thinking
Of nomads entering a subcontinent through a narrow pass.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या कवितेवर आणखी एका फोरमवर काही वर्षांपूर्वी झालेली चर्चा : दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ही कविता पूर्वीही वाचली होती दोन्ही वेळा आवंढा दाटून आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता फारच छान आहे. कुटुंबापासून तुटलेपण अगदी समर्थपणे चितारले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दमलेल्या बाबाची प्रेरणास्त्रोत हीच कविता असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता मस्त आवडली. पिडांशी निरीक्षणाने सहमत आहे Wink आमच्या एका मित्रवर्यांशी या बाबतीत चर्चा झाली तिचा निष्कर्ष म्हणजे हा टिपिकल बाप शहरांतून तरी हद्दपार होत चालला आहे. गावाकडे अन लहान शहरांकडे अजून टिकून असेलही. पण ते वातावरण कितपत राहिलंय काय माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चान चान!

डाऊन वुइथ नॉस्टॅल्जिया लिहिणारे हेच का ते? असा प्रश्न पडला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली. किंचित विनोदी झालर असली तरी मौजमजा सदरात का आहे कळलं नाही.

तीर्थरूपांच्या सावलीचा
अंधार पुढे मागे होतो.

हे विशेष आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता मनापासून आलेली आहे हे कळतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान कविता. पिडाकाकांशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही