अलीकडे काय पाहिलंत? -६
याआधीचे भाग: १ । २ । ३ । ४ । ५
जाफर पनाहीचा 'ऑफसाईड' पाहून त्याच्याबद्दल उत्सुकता होती. त्याचा 'द मिरर' पाहिला. ही सगळी गोष्ट गजबजलेल्या तेहरानमधली. प्राथमिक शाळेतली एक मुलगी शाळा सुटल्यावर आईची वाट पहाते आहे इथे चित्रपट सुरू होतो. आईला तिथे यायला उशीर होतो. डावा हात मोडल्यामुळे हाताला प्लास्टर, हात गळ्यात अडकवलेला, खास इराणी पद्धतीने रूमालाने डोकं झाकलंय, छोटीशी, गोड मुलगी आणि या सगळ्याला विसंगत असं तिचं भलंथोरलं दप्तर. नक्की कोणती बस पकडायची, कोणत्या स्टॉपवरून पकडायची, घरचा पत्ता असं काहीही तिला नीट सांगता येत नाही; खाणाखुणा, या दिशेने जायचं, मग डावीकडे, अशा प्रकारे तिला पत्ता सांगता येतोय. पण रस्ता एकटीने ओलांडण्याची भीती वाटते.
शाळेतली एक शिक्षिका हिला ओळखीच्या एकाबरोबर बस स्टॉपवर पाठवते. तो माणूस आणि शिक्षिका यांचा आपसातला कंटाळवाणा होत जाणारा संवाद ही मुलगी ऐकते आणि स्वतःची सोय शक्यतोवर लावून घेते. पुढे बसमधे चढते, तिथेही आजूबाजूच्या स्त्रिया, गाणी म्हणणारे भिकारी असं काय काय तिच्या कानावर पडत रहातं. आयुष्याला गांजलेली एक म्हातारी, एक 'भविष्य' सांगणारी आणि तिच्या बसमधल्या गिर्हाईक, असं सामान्यांचं आयुष्य ऐकत ऐकत ती भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचते. एक भला बस ड्रायव्हर तिच्याकडून वर्णनं ऐकून तिला योग्य बसमधे बसवून देतो; आता ही आपल्या इप्सित स्टॉपवर पोहोचणार आणि तिथून घरी जाणार असं काही वाटत असतं ...
मधेच ही मुलगी वैतागते. हातातलं प्लास्टर उतरवते आणि "मला नाही करायचं तुमच्या पिक्चरमधे काम!" असं म्हणत सत्याग्रह सुरू करते. हिला कसंही करून आजचा सीन पूर्ण करायला लावायचं या प्रयत्नात दिग्दर्शक जाफर पनाही दिसतो. एकाच्या हातात कॅमेरा, एकाकडे आवाज रेकॉर्ड करण्याची उपकरणं, एकाकडे आणखी काही ... आत्तापर्यंत घाबरत घाबरत घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात असणारी मिना, हिचं नाव इथे समजतं, आता "मी माझी माझी एकटी घरी जाणार" असं म्हणायला लागते. तिच्या कपड्यांना लावलेला मायक्रोफोन तसाच राहू देतात आणि छोट्या कारमधून तिचा पाठलाग सुरू होतो. मिना घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात असताना ती सामान्य इराणी लोकांचे आणखी संवाद ऐकत जाते.
चित्रपट काय, प्रत्यक्षात काय-काय घडतंय यातली सीमारेखा अस्पष्ट होत जाते. हे सगळं ठरवून, स्क्रिप्टमधेच ठेवलेलं आहे का नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. या उत्तराची आवश्यकताही नाही. सामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यात धर्म, अणूऊर्जा असे काही प्रश्न येत नाहीत. कोणा स्त्री-पुरुषांचा पारंपरिक मूल्य आणि आधुनिक लिंगसमानता याबद्दल चालणारा वाद, "नशीब तुझं, तुझा नवरा सोबत असता तर बघून घेतलं असतं" असं वैतागलेल्या टॅक्सी ड्रायव्हरचं वाक्य आणि त्याच्याच जोडीला म्हातारीचं गांजलेपण सगळं लहान मुलीच्या दृष्टीकोनातून दाखवण्यामुळे जाफर पनाही (बहुदा) सेन्सॉरच्या कचाट्यात न अडकता सांगू शकला. दुसरीतल्या मुलीने तिची चादोर नाकारण्यावरही आक्षेप घेणं कठीण झालं असावं.
या लहान मुलीने फारच सुरेख काम केलंय आणि लेखन, संकलन, दिग्दर्शनाचं जाफर पनाहीनेही! या मुलीचा ड्यँबिसपणा फारच आवडला.
![]() |
![]() |
कायदेभंग केला म्हणून इस्लामिक रिपब्लिक ऑफ इरानमधे जाफर पनाही स्वतःच्याच घरी नजरकैदेत आहे. डिसेंबर २०३० पर्यंत चित्रपट बनवण्यावर त्याच्यावर बंदी घातलेली आहे. (बातमी)
प्रतिक्रिया
कथा कुठची आणि प्रत्यक्ष काय
कथा कुठची आणि प्रत्यक्ष काय याचा संभ्रम पाडण्याचं तंत्र इथे वापरलेलं दिसतं आहे. जी काही कथा वाचली त्यावरून असं वाटतं की हे त्यांनी बरोब्बर उलटं करण्याचा प्रयत्न केला आहे की काय? म्हणजे असहाय, काहीशी अपंग, भांबावलेली, अशी प्रत्यक्षातली इराणी स्त्री तिच्या कल्पनेत स्वतंत्र होते, स्वतः बस चालवून आपल्याला हवं तिथे जाण्याचा प्रयत्न करते....
स्वतः बस चालवून आपल्याला हवं
एवढ्या लहान मुलीने बस चालवणं कोणत्याही देशात 'बातमीयोग्य' असेल.
नाही. तो भला ड्रायव्हर तिला घराच्या दिशेने जाणार्या बसमधे बसवून देतो ते ड्रायव्हरच्या शेजारीच; तेव्हाचा हा फोटो आहे. या बसेसमधे स्त्रियांची जागा मागच्या बाजूला आणि पुरुषांची पुढच्या बाजूला. या छोट्या मुलीलाही तिथे चढू देत नाहीत. पुरुषांच्या भागात प्रचंड गर्दी असली तरीही त्यांनी मागच्या या भागात यायचं नाही. स्त्रियांनीही पुढे जायचं नाही. मिनाला पुढच्या भागात ड्रायव्हर बसवून देऊ शकतो कारण ती लहान आहे, खपून जाईल; कदाचित इराणी सेन्सॉर बोर्डासमोरही खपून जाईल.
क्रूमधल्या एकीला ती 'सत्याग्रह' का सुरू केला याचं कारण सांगते, "मला हे नेहेमी रडायला लावतात, मी रडी, तक्रारखोर आहे असं सगळ्यांना वाटेल. सगळे माझी टर उडवतील." आणि पुढे एकटीच घरी जात असताना लोक तिला विचारतात, "तू रस्ता चुकली आहेस का?". तेव्हा ती ठामपणे "नाही, मी रस्ता नाही चुकलेले. मला फक्त त्या अशा-अशा दिसणार्या चौकाचं नाव सांगा." असं उत्तर देते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा सिनेमा
हा सिनेमा एका चॅनेलवर दोन तुकड्यांत पाहिला. एकदा मधूनच पाहिल्यामुळे, नांव लक्षांत ठेवून पुढच्या वेळेस आधीचा चुकलेला भाग पाहिला. फारच आवडला होता. त्या मुलीचे काम अप्रतिम आहे. तिचे डोळे फारच बोलके आहेत.
परीक्षण आवडलं.
परीक्षण आवडलं.
जॉन ग्रिशम
जॉन ग्रिशमचे पेलिकन ब्रीफ, द रेनमेकर वगैरे पुस्तके वाचली, पुस्तकं जबरदस्त आवडली म्हणून त्यावरील शिणेमे पहिले, पण पुस्तकं न वाचता शिनेमा कळणार नाही, अन् वाचलेलं असलं तर फार प्रेडिक्टेबल होतो असं वाटलं. जॉन ग्रिशमसाठी प्रेफरन्स पुस्तकच .
आत्ताच मिस्टर अॅन्ड मिसेस अय्यर हा एक कमाल पिक्चर पहिला, मधले काही सीन तर आमीर इतके अंगावर येतात.
संपूर्ण सिनेमा एका प्रवासाचे चित्रण आहे, कुठे तरी खुट्ट होतं, दंगल होते आणि त्यात होणाऱ्या बस मधल्या काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया हे मुख्य अंग., बहुदा या ऐसीअक्षरेच्याच सदस्यांने फार सुंदर परीक्षण नेट वर इथे लिहिलेलं आहे. यातली अजून एक बाप गोष्ट म्हणजे झाकीरभाईंनी दिलेलं म्युझिक.
नेमकं काय ते समजलं नाही.
नेमकं काय ते समजलं नाही. कोणत्या पिच्चरच्या सेटवरची कथा आहे का?
http://shilpasview.blogspot.com
शाळा सुटल्यावर आईची वाट
शाळा सुटल्यावर आईची वाट पहाणारी छोटीशी गोड ,मुलगी मीना हिची कथेतल्या वास्तवाचा आभास असणारी थक्क करून सोडणारी नर्म विनोदी फिल्म .कथा आणि वास्तव यामध्ये असणारा संघर्ष अतिशय खुमासदार रंगवला आहे .सिनेमा अनपेक्षित ट्विस्ट मुळे जबरदस्त पकड घेतो .तुम्ही मला मार्ग दाखवा मी स्वतः तिथे जाईन असा चिमुकल्या मीनाचा निर्धार पाहून हसता हसताच तिची काळजीही वाटू लागते . मीनाचा अप्रतिम अभिनय आणि जफर पनाहीची कथा सादरीकरणाची विलक्षण अफलातून शैली
पाहून आपण थक्क होण्याच्या पलीकडे जातो .ऑफसाईड आणि क्रिमझन गोल्ड नंतर मला लाभलेले पनाहीच्या खजिन्यातले हे तिसरे बहुमोल रत्न !
क्रिम्सन गोल्ड मला नीट उमगला
क्रिम्सन गोल्ड मला नीट उमगला नाही. त्याबद्दल तपशीलवार लिही.
---
शिल्पा, हेच तर. सेट कुठे संपतो आणि वास्तव कुठे सुरु होतं यातली स्पष्ट वाटणारी रेघ धूसर होत जाते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
"अपॉकॅलिप्स नाऊ"
अनेक कलाकृतींबद्दल आपण ऐकलेले असते परंतु त्या पहाण्याचा योग जेव्हा यायचा तेव्हा येतो. "अपॉकॅलिप्स नाऊ"चा उल्लेख या सदरात करणे अपरिहार्य आहे. हा सिनेमा काल पाहिला.
<स्पॉईलर अलर्ट सुरवात>
सिनेमाचं आशयसूत्र व्हिएतनामच्या युद्धाशी निगडित आहे ही बाब, सिनेमाच्या ऐतिहासिक स्थानामुळे, त्याच्या लोकप्रियतेमुळे बर्याच जणांना ठाऊक असावी.
कर्नल कर्ट्झ (मार्लन ब्रांडो) नावाच्या , उत्तम कामगिरी करणार्या अधिकार्याला वेड लागलेले आहे. व्हिएतनामच्या एका भागाला त्याने आपल्या ताब्यात घेतलं आहे आणि स्वतःचं राज्य असल्यासारखं तो तिथे वागतो आहे. त्याच्या या "शासना"चं स्वरूप रक्तलांच्छित आहे. तिथल्या ग्रामीण भागातले लोक आदिम काळातल्या एखाद्या हिंस्त्र, शासक परंतु सर्वशक्तिमान देवाप्रमाणे त्याला वागवत आहेत. परिस्थितीचा जटिलपणा लक्षांत घेतां, कर्नल कर्ट्झला संपवण्याची कामगिरी कॅप्टन विलर्डवर (मार्टीन शीन) सोपवलेली आहे. विलर्डचा हा प्रवास कसा घडतो ? या दरम्यान तो कायकाय पहातो ? कर्टझच्या अधिक्षेत्राखाली तो पोचल्यावर काय घडते ? कर्ट्झ हाच मुळी काय प्रकार आहे ? हे त्या चित्रपटाचे स्वरूप.
<स्पॉईलर अलर्ट अखेर>
काही कृतींच्या आस्वादाची प्रक्रिया अनेक धाग्यांची बनलेली असते. प्रस्तुत सिनेमा पाहताना याचा अनुभव मला आला. व्हिएतनाम युद्धावर काही चित्रपट पाहिले होते, युद्धाबद्दल वाचलंही होतं. सिनेमा ज्या "हार्ट ऑफ डार्कनेस" या कादंबरीवर बनलेला आहे तिच्या लेखकाच्या "लॉर्ड जिम" नावाच्या कादंबरीचं वाचन केलेलं होतं.
सिनेमाची ट्रीटमेंट एखाद्या कवितेप्रमाणे आहे असं मला वाटलं. विलर्डचा एकंदर व्हिएतनामच्या प्रकाराकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा प्रस्तुत कामगिरीच्याही आधीच एखाद्या दु:स्वप्नाप्रमाणे आहे. चित्रपट विलर्ड्च्या दृष्टिकोनातून उलगडतो. अगदी पहिल्या फ्रेमपासून, विलर्डच्या प्रथमपुरुषी निवेदनाच्या पार्श्वभूमीवर तो घडतो. व्हिएतनाम युद्धाशी निगडित असलेली जवळजवळ प्रत्येक व्यक्ती त्याबद्दल बोलताना एखाद्या नरभक्षक श्वापदाबद्दल गावाकडचे लोक बोलतात तसं बोलताना दिसतात. प्रत्यक्ष कामगिरीच्या दरम्यान विलर्ड जे पहातो ते दर्शन क्रौर्याचं, एका अपरिहार्य अजस्त्र चक्राला बांधल्या गेलेल्या लोकांच्या वर्तनाचं आहे. "सकाळी सकाळी मला नापामचा वास अतिशय आवडतो. हा वास म्हणजे जणू युद्धातल्या विजयाचा वास आहे" असं म्हणणार्या , खेड्यांमधल्या वस्त्यांवर बाँबवर्षाव करताना वॅग्नेरचं संगीत लावणार्या अधिकार्याच्या भूमिकेत रॉबर्ट डुवाल सदैव स्मरणांत राहील.
मार्लन ब्रांडोची भूमिका कदाचित वीस मिनिटांपेक्षा अधिक नसावी. स्क्रीन टाईम आणि भूमिकेचं महत्त्व, या संदर्भात "सायलेन्स ऑफ द लँब्ज" या सिनेमाची आठवण मला आली. त्या सिनेमात ज्योडी फोस्टरची भूमिका अथपासून इतिपर्यंत आहे. अँथनी हॉपकिन्स फक्त वीसेक मिनिटांकरताच येतो. इथेही तसंच. सिनेमा अथपासून इतिपर्यंत मार्टीन शीनच्या दृष्टीकोनातला. ब्रँडो जेमतेम वीस मिनिटांपुरताच. पण टीएस इलियटच्या कविता वाचणारा, माणसाच्या "अंधार्या अंतरहृदया"चं दर्शन घडवणारा कर्ट्झ ही हॉलिवूडच्या इतिहासातलीच नव्हे तर एकंदर चित्रपट-इतिहासामधली उल्लेखनीय व्यक्तिरेखा बनलेली आहे.
एकोणीसाव्या शतकातली महत्त्वाची कादंबरी विसाव्या शतकातल्या एका महत्त्वाच्या चित्रपटाची प्रेरणा बनते तेव्हा नक्की काय होतं ? कर्नल कर्ट्झचं क्रौर्य आणि व्हिएतनाम संदर्भातलं अमेरिकन युद्धयंत्रणेचं क्रौर्य यात फरक काय ? शेवटी युद्धाचा अर्थ काय ? शासनव्यवस्थेचा अर्थ काय ? माणसामधल्या क्रौर्याचा उगम कुठे आहे ? त्याचा अर्थ काय ? अशा निरनिराळ्या धाग्यांनी विणलं गेलेलं वस्त्र म्हणजे "अपॉकॅलिप्स नाऊ" : एक अनुभव.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
माहितीबद्दल धन्यवाद
या चित्रपटाबद्दल अधूनमधून उल्लेख वाचले होते, पण नीट माहिती नव्हती. बघणार नक्कीच. नुकताच गॉडफादर पुन्हा बघितल्याने ब्रॅण्डो व रॉबर्ट डुवाल, तसेच सध्या सतत वेस्ट विंग बघत असल्याने मार्टीन शीन चे आणखी चित्रपट पाहण्यात इंटरेस्ट आहे.
अपॉकॅलिप्स नाऊ
पहिल्यांदा बघितल्यावर अजिबात नाही आवडला. दुसर्यांदा बघताना मात्र खूप आवडला. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी वाजणारं 'दि एंड' हे गाणं अगदी चपखल आणि अंगावर येणारं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
फॉर नो गुड रीझन
बोलोन्यामध्ये गेले दहा दिवस 'बायोग्राफिल्म फेस्टिवल' चालू होता. यात काल 'फॉर नो गुड रीझन' ही राल्फ स्टेडमॅन या चित्रकारावरची फिल्म पाहिली. प्रामुख्याने व्यंगचित्रकार म्हणून हा चित्रकार नावाजलेला आहे. फिल्म मुख्यत्त्वे या चित्रकाराच्या करियरचा आणि त्या अनुषंगाने त्याच्या व्यक्तिगत आयुष्याचा मागोवा घेते. जॉनी डेप यात मुलाखतकाराच्या भुमिकेत वावरतो. त्याचा रोल फार प्रभावी वाटला नाही...पण तसाही चित्रकार या फिल्मचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे ते ठीकच.
फिल्म अतिशय संतुलित रितीने चित्रकाराच्या व्यावसायिक आयुष्यातले टप्पे समोर ठेवते.त्याच्या चित्राची निर्मिती कशी होते तेही तो दाखवतो. तो भाग अप्रतीम वाटला- थक्क व्हायला होतं तो जे रिकाम्या कागदावर तयार करतो विविध तंत्र वापरून. गाणी, संवाद, आणि या चित्रकाराच्या कलाकृती यांना वापरून एक उकृष्ट बायोग्राफी तयार केलेली आहे. मिळाल्यास जरूर पहा. चित्रांची मजा मोठ्या पडद्यावर अधिक येईल.
फोर लायन (२०१०)हा ब्रिटिश
फोर लायन (२०१०)हा ब्रिटिश डार्क कॉमेडी असलेला अफलातून सिनेमा पाहिला आणि क्रिस मॉरिस या दिग्दर्शकाच्या पहिल्याच सिनेमासाठी त्याला सलाम ठोकला . जन्माने ब्रिटीश
पण मूळ पाकिस्तानी असलेले चार बावळट तरुण आणि त्यांच्या मुजाहिदीन बनून घातपात करून जिहाद करण्याचे प्रयत्न पाहून कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि
त्याने हागून भरला दरबार ही म्हण आठवली . बॉम्ब तयार करणे ,त्याच्या चाचण्या घेणे ,प्रत्यक्ष पाकिस्तानात ट्रेनिंगला जाणे असे कहर प्रसंग पाहून हसू फुटतं पण अंगावर काटा येतो . बॉम्बस्फोट कुठे करायचा ही चर्चा अद्वितीय आहे . चित्रपटाच्या शेवटी पेटा ला खिजवणारी एक पाटी येते,
"one sheep was blown up in the making of this film ."
Most loud bangs are not bombs , they are scooters backfiring !! असे एक आय विटनेस म्हणतो .
पोलिस खुशाल इनोसंट माणसांना उडवतात तेंव्हा टीव्हीच्या हेड्लाइन्स ऐकून विषाद गडद होत जातो . खळबळजनक सिनेमा आहे .
"ट्रू ग्रिट"
२०१० साली आलेला कोएन बंधू दिग्दर्शित "ट्रू ग्रिट".
साठच्या उत्तरार्धात आलेल्या, जॉन वेनने केलेल्या प्रमुख भूमिकेने गाजलेल्या वेस्टर्नपटाचा रिमेक. इथे ही भूमिका जेफ ब्रिजेसने केलेली आहे. वेस्टर्नपटांमधे आढळणारे जेंडर-रोल्स, तत्कालीन मूल्ये, जिसकी-लाठी-उसका-बल (किंवा खरे तर जिसकी बंदूक) या सार्याबरोबरच (जेंडर रोल्सना तडा देणारं) चौदा वर्षांच्या मुलीचं काम, तिच्या डोळ्यातली जिद्द, धाडस या सर्व गोष्टींमुळे चित्रपट रोचक बनला आहे. जेफ ब्रिजेसचे जे जे म्हणून सिनेमे मी पाहिले त्या सर्वांमधे त्याचं काम नेहमीच आवडत आलेलं आहे. ही तर मध्यवर्ती भूमिका. जेफराव नेहमीप्रमाणे भाव खाऊन गेलेले आहेत. मॅट डीमन या दुसर्या आवडत्या नटाला आलेली दुय्यम भूमिकाही त्याने निभावलेली आहे. सिनेमा काही "अनफरगिव्हन्" सारखा, किंवा "नो कंट्री फॉर ओल्ड मेन्" इतका वेस्टर्नपटाचं सौंदर्यशास्त्र उकलून दाखवणारा खचितच नव्हे. एक रंजक पद्धतीने सादर केलेली रंजक कथा. ब्रिजेसच्या चाहत्यांना किंवा वेस्टर्नपट पहाणार्यांना आवडेल असा.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
'मॅरथॉन बॉय'
'मॅरथॉन बॉय'
(माहितीपट [९८ मि.], २०११ मध्ये प्रदर्शित, एच्. बी. ओ. निर्मिती [२०१०])
कल्पना करा, की एक मुलगा रोज ७ तास नेमाने, न थांबता धावण्याचा सराव करतो. ३० मैल सलग धावत तोडू शकतो.
.... आणि त्याचे वय आहे केवळ ३ वर्षे !
त्याची ही अनन्यसाधारण क्षमता पाहून एक ज्युदो प्रशि़क्षक त्याला ऑलिंपिक मॅरथॉन धावपटू बनविण्याचा ध्यास घेतो.
वयाच्या चवथ्या वर्षी तो मुलगा एकूण ४८ मॅरथॉन स्पर्धा धावून पूर्ण करतो.
त्यातली एक, ६५ किमि. ची मॅरथॉन तो पुरी ते भुवनेश्वर अशी जवळपास ७ तासात पूर्ण करतो आणि 'इतके अंतर तोडणारा सर्वात लहान धावपटू' या विश्वविक्रमाने एका रात्रीत प्रसिद्धीस येतो !
पण त्या मॅरथॉन दरम्यान जे घडते, त्यानंतर सुरू होते ते चाईल्ड वेल्फेअर कमिटी, राज्य सरकार विरुद्ध तो प्रशिक्षक असे युद्ध. मग कालांतराने त्या मुलाची आईदेखील त्यात सामिल होते, तेंव्हा ते अधिकाधिक गुंतागुंतीचे होत जाते आणि त्याचे अधिकाधिक भीषण कंगोरे सामोरे येत जातात. या मुलाचा वय वर्षे ३ ते ८ हा पाच वर्षांचा सलग प्रवास आणि त्याच्या धावण्याभोवती वेटोळे घालून बसलेल्या ओरिसातल्या अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, गुन्हेगारी आणि प्रसिद्धीयंत्रणा यांचे एकमेकांवर कुरघोडी करणारे, दिङ्मूढ आणि नि:शब्द करून टाकणारे चित्रण.
सत्य काय आहे, कुणाची बाजू बरोबर/चूक याचे आपले भान घडणार्या घटनांनी क्षणोक्षणी बदलत जाते. घडले ते खरोखरच घडून गेले का, असा अविश्वास मनात ठेवून जाणारा हा चक्रावून टाकणारा चकवा ५ वर्षे नेटाने चित्रित करणार्या 'Gemma Atwal'ला दंडवत.
(हा मजकूर वाचणार्यांना विनंती : हा माहितीपट पाहण्यापूर्वी यासंबंधी कसलाही वृत्तपत्रीय/यू-ट्यूबीय/गूगलीय शोध घेऊ नये. माहितीपट पाहिल्यानंतर जे काही शोधायचे ते शोधा.)
ही फिल्म/यावरचा रिपोर्ट टी
ही फिल्म/यावरचा रिपोर्ट टी व्हीवर पाहिला होता...हा छोटा मुलगा डांबरी रस्त्यावरून कडक उन्हात धावतोय, तंद्रीत असल्यासारखा, ते आठवतय.
बुधिया सिंग - बॉर्न टू रन
वर उल्लेखलेल्या 'मॅरथॉन बॉय' या माहितीपटातल्या सत्यकथेवर 'बुधिया सिंग - बॉर्न टू रन' हा हिंदी चित्रपट ५ ऑगस्ट २०१६ रोजी प्रदर्शित होतो आहे.
लेखन/दिग्दर्शन : सौमेंद्र पाधी
कलाकार : मनोज वाजपेयी (बिरांची दास), मयुर पाटोळे (बुधिया सिंग)
बुधिया ही चाईल्ड
बुधिया ही चाईल्ड एक्सप्लॉयटेशनची क्लासिक केस धरावी का या (एक्सप्लॉयटेशनच्या) निमित्ताआड एखाद्याचे टॅलेंट दडपण्याचा प्रयत्न? असा प्रश्न गेली अनेक वर्ष रुंझी घालतोय. एखाद्याचे हिरोकरण करताना त्या बाजूवरही हा चित्रपट प्रकाश टाकेल अशी (वृथा?) आशा करतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"द किड्स आर ऑल राईट"
२०१० सालचा "द किड्स आर ऑल राईट".
<स्पॉईलर अलर्ट सुरवात>
कॅलिफोर्नियातल्या लॉस एंजल्सच्या आसपास रहाणारं दोन समलैंगिक स्त्रिया आणि त्यांच्या दोन टीनएजर मुलांचं कुटुंब. दोन आईंपैकी एक निक (अॅनेट बेनिंग) यशस्वी , व्यावसायिकदृष्ट्या व्यग्र असणारी एक डॉक्टर. दुसरी ज्यूल्स (जुलियान मूर), व्यावसायिक दृष्ट्या वेगवेगळे प्रयत्न करून पाहिलेली, सध्या घरीच असलेली. एकमेकींच्या प्रेमाबरोबरच हे एकमेकांबद्दलचे, एकमेकांच्या आयुष्यातल्या यशापयशासंदर्भातले तिढेही. टीनएज मुलांना, ज्याच्या स्पर्म्समुळे आपण जन्मलो त्यांना भेटायची इच्छा होते. दोन्ही मुलांकरताचा स्पर्म डोनर एकच आहे - पॉल . एक जण एका आईचा मुलगा. दुसरी दुसर्या आईची. पॉलची ही भूमिका मार्क रफेलोने केलेली आहे. पॉल अजूनही अविवाहित, अधूनमधून डेटींग करणारा एक पंचेचाळीशीचा, आता स्वतःचं एक बर्यापैकी रेस्टॉरंट चालवणारा माणूस. त्याचं "स्वातंत्र्य" त्याच्या (काहीशा महागड्या) मोटरबाईकद्वारे व्यक्त होतं.
तर ही मुलं पॉलशी संपर्क प्रस्थापित करतात. दोन्ही मुलांना कमीअधिक फरकाने तो "ओके" प्रकारचा इसम वाटतो. या गोष्टीचा पत्ता दोन्ही आईंना लागतो. आपली मुलं एखाद्या सिंगल माणसाबरोबर मिसळत आहेत, तो कसा असेल ? चांगला माणूस असला तरी मुलं त्याच्याकडे ओढली तर जात नाहीत ना ? या प्रकारच्या विचारांनी ग्रस्त असलेल्या या दोन्ही माता पॉलला जेवायला बोलावतात. एकमेकांबद्दल सावधपणे, काहीसं चाचरत बोलताना ह्ळुहळू एकमेकाला चाचपून पाहिलं जातं. बोलताबोलता ज्यूल्स ही बागकाम व्यावसायिक बनण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब संभाषणात येते. पॉल आपल्या स्वतःच्या घरात हे काम करायचं असल्याचं सांगतो आणि ते करण्याची ऑफर ज्यूल्सला देतो. ज्यूल्स काहीशा अनिश्चितीने ती स्वीकारते.
पुढे पॉल-ज्यूल्स आणि मग निक- आणि मग मुलं यांच्यामधे काहीशी गुंतागुंत होते. एक छोटं वादळ येऊन जातं. यातून ते कुटुंब कसं जातं ? ते सारं चित्रपटाच्या उत्तरार्धात.
<स्पॉईलर अलर्ट शेवट>
पात्रांची चित्रणं, घटना, संवाद यामधे कमालीचा जिवंतपणा आहे. कुठल्याही प्रसंगात/संवादात/फ्रेममधे मला आक्रस्ताळेपणा किंवा उथळपणा - सोपे स्टीरिओटाईप्स दिसले नाहीत. समलैंगिकता, समलैंगिकांची दशकानुदशकं टिकलेली लग्नं, सरोगसीद्वारे झालेली मुलं, त्या मुलांचं कुतुहल, हे विषय लॉस एंजल्सच्या आजच्या काळातल्या संदर्भात अतिशय नैसर्गिक रीत्या रुळलेले आहेत. कुठेही याबद्दल "हे काहीतरी विचित्र आहे" असं कुणाला जाणवत नाही.
मात्र इतक्या उदारमतवादी, आधुनिक काळातसुद्धा माणसामाणसांमधले संबंध, "लग्न" या संस्थेतलं लैंगिक संबंधांच्या संदर्भातलं विश्वासाचं महत्त्व - किंवा त्याची अपरिहार्यता याबद्दलचं काहीतरी नवं भान हा सिनेमा देतो. ज्यूलियान मूरचा आपल्या स्वतःच्या लैंगिकतेच्या संदर्भात झालेला संभ्रम, या संभ्रमातून निर्माण झालेली गुंतागुंत किमान मला तरी काहीतरी मूलभूत सांगून गेली.
सिनेमामधला विनोद सूक्ष्म आहे. छोट्याशा प्रसंगांमधून, एखाद्या उद्गारामधून, एखाद्या कटाक्षामधून फुलणारा आहे. हा सिनेमा मी एकदा नव्हे तर दोनदा पाहिला. त्यातलं बारक्या बारक्या गोष्टींमधलं मर्म किंवा सौंदर्य अनुभवायला. आणि हो - ज्यूलियान मूरला - तिच्या व्यक्तिरेखेला आणि खुद्द "ती"लाच - काही विशिष्ट प्रसंगात पहाण्याकरता, याचीही कबुली देतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
चांगला परिचय
हा माझाही आवडता चित्रपट आहे. हार्ड डिस्कवर संग्रही ठेवलेला आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"बूच कॅसिडी अँड द सनडान्स किड्"
१९६९ सालचा "बूच कॅसिडी अँड द सनडान्स किड्".
जुने, गाजलेले सिनेमे पहायला घेताना मी खोलवर कुठेतरी अनिश्चित मनःस्थितीमधे असतो याची कबुली देतो. उत्तम कथा, व्यक्तिरेखा, प्रसंग, कलेच्या आणि आस्वादाच्या संदर्भात काहीतरी नवं आकलन होण्याच्या सार्या शक्यता, या गोष्टी आशा पल्लवित करणार्या वगैरे असतातच. परंतु गेल्या दोन-तीन दशकांमधल्या सिनेमाच्या ज्या इस्थेटिकला आपण सरावलेलो आहोत त्या अत्याधुनिक तंत्राला, ग्लॉसीपणाला - थोडक्यात दृष्यात्मक फास्ट्फूड सवयीला - आपण बाजूला ठेवूनच पुढे जाणार असतो, तशी अटकळ आपण बांधतो. बर्याचदा ही अटकळ, ही स्वतःपुरती बांधलेली खूणगाठ बरोबर ठरते. पंचवीस वर्षांच्या आधीचे सिनेमे बघताना एकप्रकारे मी दृष्यात्मकतेच्या गुळगुळीत अपेक्षांना नाही म्हण्टलं तरी थोऽडं खाली आणलेलं असतंच.
१९६९ सालचा "बूच कॅसिडी अँड द सनडान्स किड्" या सिनेमाने म्हणताम्हणता या माझ्या ठोकताळ्यांना -पर्यायाने मला - धोबीपछाड घातलं याची मी आनंदाने कबुली देतो. सिनेमा जुना आहे, पॉल न्यूमन आणि रॉबट रेडफोर्ड या दोघांच्या कारकीर्दीत मानाचं स्थान मिळून गेलेला एक "वेस्टर्न् क्लासिक" आहे. या सर्व संदर्भांमुळे त्याचं कथानक आणि अन्य गोष्टी देण्यात काही हशील वाटत नाही. इतकंच सांगतो की, १९६९ साली आलेला हा सिनेमा अथपासून इतिपर्यंत देखणा आहे. आणि त्या देखणेपणामधे फार मोठा वाटा पॉल न्यूमनचा आहे. खरे तर अमुक एक नट अमुक एका सिनेमामधे फार्फार आवडला हे म्हणणं म्हणजे काही मार्मिक सांगणं नव्हे. इथल्या रेडफोर्ड्च्या चहात्यांवरही मी अन्याय करत असेन. चित्रपटातले संवाद नर्मविनोदी "वन लायनर्स" - थोडक्यांत उत्तम वेस्टर्नपटांमधले असावेत तसे आहेत.
बाकी, हा सिनेमा पॉल न्यूमनकरता मी पुन्हा पाहीन इतकं म्हणतो आणि रजा घेतो
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
'बूच कॅसिडी....' - मार्मिक शेवट
या चित्रपटाचा शेवट अतिशय मार्मिक आहे. ज्या दृश्यावर कॅमेरा स्थिर होऊन चित्रपट संपतो, त्यातून 'या दोघांचे नक्की काय होते ?', असा प्रश्न आणि एक शक्यता प्रेक्षकांच्या मनात राखून ठेवली जाते. आणि माझ्यामते, तीच हे दोघे दंतकथा बनून गेल्याचे द्योतक आहे.
शेवट
>>>> 'या दोघांचे नक्की काय होते ?', असा प्रश्न आणि एक शक्यता प्रेक्षकांच्या मनात राखून ठेवली जाते. <<<<<
इथे असहमती नोंदवावीशी वाटते.
<स्पॉईलर अलर्ट>
माझ्या मते चित्रपटाचा शेवट अगदी सुस्पष्ट आहे. सिनेमाच्या शेवटी दोघेही जखमी झालेले आहेत. दोघांकडच्या बंदुकीतल्या गोळ्या संपलेल्या आहेत. दोघेही एका अपुर्याशा आडोशाला पडलेले असताना बाहेर शेपन्नास पोलीस बंदूका रोखून चहूबाजूनी जमा झालेले आहेत - जे त्यांना ठाऊक नाही. शेवटचा संवाद असा : (प्रस्तुत संवादातला "लेफोर्स" म्हणजे ज्या पोलीस अधिकार्याला दोघेही टरकून असतात तो)
Butch Cassidy: Ready? OK, when we get outside and we get to the horses, whatever happens, just remember one thing... hey, wait a minute.
Sundance Kid: What?
Butch Cassidy: You didn't see Lefors out there, did you?
Sundance Kid: Lefors? No.
Butch Cassidy: Oh, good. For a moment there I thought we were in trouble.
असं म्हणून दोघे बाहेर पडतात. फ्रेम फ्रीज होते. पोलिसांच्या गोळ्यांच्या वर्षावाचे आवाज होतात.
माझ्या मते शेवट काय होतो ते पुरेसं स्पष्ट आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
'बूच कॅसिडी....' - शेवट - २
होय. तुम्ही दिले आहेत तसेच सारे चित्रपटात घडते आणि त्यावरून प्रत्यक्षात पुढे काय होणार हे बहुतांशी प्रेक्षकांकडून गृहित धरले जाते, ठरवून टाकले जाते.
परंतु, माझ्याबाबत तसे घडले नाही. त्याला कारण आहे. या दोघांवर असा काही चित्रपट आहे हे माहित होण्याआधी, वेगळ्या संदर्भात या दोघांबद्दलची माहिती वाचनात आली होती. त्यामुळे चित्रपटाचा शेवट पाहताना जे प्रत्यक्षात घडले ते आणि त्याभोवतीची संदिग्धता ही प्रेक्षकांना कशी सांगायची याबाबत दिग्दर्शकाने निवडलेला मार्ग (दृश्य स्तब्ध करणे आणि केवळ आवाज ऐकविणे) पाहून मला दिग्दर्शकाचे कौतुक वाटले होते. तुमच्या-माझ्या दृष्टिकोनात आणि अर्थान्वयात फरक पडण्याचे कारण हेच की 'कुणालाच, खरे काय घडले ते १००% माहीत नसावे' ही गोष्ट चित्रपट पाहताना तुम्हाला माहीत नव्हती पण मला माहीत होती. कुठलीही सत्य गोष्ट सांगताना, सांगणारा नकळत आपले असे काही मिसळत जातो आणि मग सत्यापासून फारकत घेऊन एक रोमांचक दंतकथा जन्माला येते (जी. एं. च्या शब्दांत सांगायचे तर 'मिशांत दोन लिंबे ठेवू शकणारा, तोच आमच्यासाठी खरा तानाजी !'). बूच आणि सनडान्स ही जोडगोळीदेखील, वास्तवात असलेली आणि उपलब्ध गोष्टींत असलेली, अशी दोन पायांनी चालत असलेली दाखविली गेली आहे. इतके दिवस सराईतपणे गुंगारा देणारे आणि केवळ लेफोर्सला टरकणारे असे हे दोघे, दहा काय शंभर शिपाई आणलेत तरी हातावर तुरी देऊन निसटून गेले असतील असे वाटायला लावणारे त्यांचे संवाद आहेत. नेहमीचाच सावधपणा आणि सुटून जाण्याचा आत्मविश्वास या दोघांच्या शेवटच्या संवादांतही दिसतो.
आता http://en.wikipedia.org/wiki/Butch_Cassidy मधून घेतलेली खालील माहिती वाचून मग पुन्हा तोच शेवट, तेच संवाद आठवा. बघा मतात काही फरक पडतो का ते . . . (खालील माहितीत : Longabaugh = सनडान्स् किड् )
स्पॉयलर अलर्ट सुरू
(The facts surrounding Butch Cassidy's death are uncertain. On November 3, 1908, near San Vicente in southern Bolivia, a courier for the Aramayo Franke and Cia Silver Mine was conveying his company's payroll, worth about 15,000 Bolivian pesos, by mule when he was attacked and robbed by two masked American bandits who were believed to be Cassidy and Longabaugh. The bandits then proceeded to the small mining town of San Vicente where they lodged in a small boarding house owned by a local resident miner named Bonifacio Casasola. When Casasola became suspicious of his two foreign lodgers, as well as a mule they had in their possession which was from the Aramayo Mine, identifiable from the mine company logo on the mule's left flank, Casasola left his house and notified a nearby telegraph officer who notified a small Bolivian Army cavalry unit stationed nearby, which was the Abaroa Regiment. The unit dispatched three soldiers, under the command of Captain Justa Concha, to San Vicente where they notified the local authorities. On the evening of November 6, the lodging house was surrounded by three soldiers, the police chief, the local mayor and some of his officials, who intended to arrest the Aramayo robbers.
When the three soldiers approached the house the bandits opened fire, killing one of the soldiers and wounding another. A gunfight then ensued. At around 2 a.m., during a lull in the firing, the police and soldiers heard a man screaming from inside the house. Soon, a single shot was heard from inside the house, whereupon the screaming stopped. Minutes later, another shot was heard.
The standoff continued as locals kept the place surrounded until the next morning when, cautiously entering, they found two dead bodies, both with numerous bullet wounds to the arms and legs. One of the men had a bullet wound in the forehead and the other had a bullet hole in the temple. The local police report speculated that, judging from the positions of the bodies, one bandit had probably shot his fatally wounded partner-in-crime to put him out of his misery, just before killing himself with his final bullet.
In the following investigation by the Tupiza police, the bandits were identified as the men who robbed the Aramayo payroll transport, but the Bolivian authorities didn't know their real names, nor could they positively identify them. The bodies were buried at the small San Vicente cemetery, where they were buried close to the grave of a German miner named Gustav Zimmer. Although attempts have been made to find their unmarked graves, notably by the American forensic anthropologist Clyde Snow and his researchers in 1991, no remains with DNA matching the living relatives of Cassidy and Longabaugh have yet been discovered.
----------------------------------
Claims of post-1908 survival
----------------------------------
However, there were claims, such as by Cassidy's sister Lula Parker Betenson, that he returned alive to the United States and lived in anonymity for years. In her biography Butch Cassidy, My Brother, Betenson cites several instances of people familiar with Cassidy who encountered him long after 1908, and she relates a detailed impromptu "family reunion" of Butch, their brother Mark, their father Maxi, and Lula, in 1925.
In 1974 or 1975, Red Fenwick, a columnist at The Denver Post, told writer Ivan Goldman, then a reporter at the Post, that he was acquainted with Cassidy's physician. Fenwick said she was a person of absolute integrity. She told Fenwick that she had continued to treat Cassidy for many years after he supposedly was killed in Bolivia.)
स्पॉयलर अलर्ट समाप्त.
एकूणात, वास्तव आणि दंतकथा हे वेगळे काढणे मुष्किल होते.
तरीही प्रश्न उरतो, की हे सारे माहित नसते तर मी तुमच्यासारखाच विचार केला असता का ? तर याला उत्तर कदाचित समांतर विश्वातल्या मी, ज्याने चित्रपट कुठल्याही पूर्वामाहितीशिवाय पाहिला आहे, तोच देऊ शकेल :). 'ऐसी… ' वरील इतरजण ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे, ते कौल देऊ शकतील. तुम्ही दिलेल्या संवाद आणि दृश्य तपशीलांतून त्या दोघांविषयी संदिग्धता उरतेच, असे दिग्दर्शकाला सूचित करायचे आहे, असेच मला वाटते.
शेवट
आणि पूर्ण चित्रपटभर ग्लोरिफाय केलेली त्यांची व्यक्तिचित्रे (शेवटी ते चोरच होते!), शेकडो पोलिसांच्या माऱ्याने रक्तबंबाळ झालेली दाखवण्यापेक्षा, शॉट गोठवून आणि प्रखर प्रकाशांत ती दोघेही शेवटी कशी कायमची फ्री झाली हे दाखवून दिग्दर्शकाने कलात्मक शेवट साधला आहे.
जय अर्जुन सिंग
साधारण याच विषयाच्या जवळपास जाणारे, जय अर्जुन सिंग या ब्लॉगर-पत्रकाराचे हे दोन लेखही वाचनीय आहेत.
रशियन आर्क
मध्यंतरी(२-३ वर्षं झाली) "रशियन आर्क" नावाचा सरीयल सिनेमा पाहीला आणि स्वप्नवत अवस्थेची (वास्तवात घेता येईल तितकी) अनुभूती घेतली. एक आत्मा पेंटीग्ज पहात वेगवेगळ्या खोल्यांतून फिरतो. पेंटींग्ज अतिशय सुंदर आहेत. हा आत्मा , प्रेक्षकाला काही काही सांगत/बोलत बोलत एका खोलीतून दुसर्या खोलीत जात रहातो. त्याचा आवाजही खोल/गूढ/संथ आहे. खोलीतील काही जण त्याला पाहू शकतात तर काही जणांना त्याच्या अस्तित्वाची कल्पनाही येत नाही.एकंदर वेगळाच अनुभव देणारा सिनेमा वाटला.
काल टीव्हीवर फॉक्स पाहिला. आज
काल टीव्हीवर फॉक्स पाहिला. आज नेट्वर शोधत होतो, तो हॉलिवूडचा फॉक्स शोधत होतो. १५-१६ प्रकारे शोधून त्याची लिंक सापडली नाही. एक सगळे हिंदी अभिनेते असलेला भारतात शूट झालेला फॉक्स पिक्चर आहे. तोच येतो प्रत्येक साईटीवर. याच नावाचं प्रॉडक्शन हाउस आणि अभिनेते/त्या असल्याने सगळ्या सर्च फेल होतात. कुणी लिंक देऊ शकेल?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
इथे आहे का?
http://www.imdb.com/find?q=fox&s=tt
-Nile
फास्ट अँड फ्युरियस - ६
फास्ट अँड फ्युरियस -६ पाहिला. आधीच्या भागाच्या तुलनेत जरा लांबलचक आणि सपक वाटला. काही दृश्ये काढून टाकली असती तरी चालले असते. कारवाल्यांनी रणगाडे आणि विमानवाल्यांचाही पराभव करावा हे फारच मजेशीर. एकंदरीत डोके बाजूला ठेवून बघायची ऍक्शन फिल्म असल्याने ती तशीच पाहिली आणि माफक मजा आली.
कालपासून माँक या मालिकेचे भाग पाहण्यास सुरुवात केली. जबरदस्त मालिका दिसते आहे. शनिवार रविवारची आतुरतेने वाट पाहत आहे. तेव्हा अधिक भाग पाहता येतील. बहुदा याच लेखमालेत यापूर्वी या मालिकेचा उल्लेख झाल्याने त्याबाबत कळले होते.
फारएण्ड यांची मोहोब्बते ची
फारएण्ड यांची मोहोब्बते ची समीक्षा वाचुन म्हणलं 'छ्या आपण उगाच घाबरत होतो अशा चित्रपटांना त्यांच्या पद्धतीने पाहुन बघु जमतय का'. उत्साहाने चालु केला 'कभी अलवीदा ना कहना'. सुरुवातीलाच पानं आणि वारा
एक तास टिकला उत्साह, पण नंतर महाबोअर झालं. शारुक लै डोक्यात गेला. रानी सारखी रडत असते. प्रीतीचं क्याराक्टर, डायलॉग आवडले. पण 'इस घरमे मर्द मै हु' म्हणताना भुतासारखी दिसते. 'तुमही देखो ना' गाण्यात रंग छान वाटले. शारुक, रानीबद्दल दया, कणव वगैरे वाटवी अशा अपेक्षेने करण ने हा चित्रपट बनवला असेल तर साफ फसलाय. जाउदेत...
८x१० तस्वीर आणि चॉकलेट देखील पाहीले. दोन्ही ठीकठाक. नै पाहीले तरी चालतील असे.
>>उत्साहाने चालु केला 'कभी
त्याऐवजी क्लोजर पहा असे सुचवतो, कअनाकपेक्षा बराच उजवा आहे.
रोचक वाटतोय. एटलिस्ट यातली
रोचक वाटतोय. एटलिस्ट यातली नाती बनण्यातुटण्या मागची कारणे मला एक्सेप्टेबल वाटतायत. एकीला दुःखी रहायची सवय आणि दुसरीला खोटं बोलायची
आत्ता हेडलाईन्स टुडे वर नागरी
आत्ता हेडलाईन्स टुडे वर नागरी ऊड्डाण मंत्री अजित सिंग यांची मुलाखत/चर्चा (श्रवणाधिकार कार्यक्रम) चालू आहे. ती चविष्टपणे ऐकतोय. त्यातला एक अंदाजे संवाद -
एक श्रोता - आपण वाणिज्यिक विषयांवर बरीच चर्चा कली. मला सुरक्षा विषयावर एक प्रश्न विचारायचा आहे. अरुणाचलचे मुख्यमंत्री ज्याप्रकारे मेले, ज्याप्रकारे १०-१५ मिनिटे वाचवण्याकरिता त्यांच्या कॉप्टरचा मार्ग बदलला गेला आणि अजून इतरत्र तीन अपघात झाले ते पाहता आपण याविषयात हलगर्जी करतो आहोत असे वाटते...इ इ'
मी (माझ्या घरी, मनात) - कॉकपीटमधे स्टाफनी लफडी केली, autopilot mode मधे प्लेन दक्षिण ध्रुवाकडे (स्वारी, गोव्यापलिकडे) चालले होते.
ते पण बरं का...
मंत्री - आमचा व्याप इतका जास्त आहे की ....प्रश्न इतका गंभीर आहे कि ...
प्रश्नकर्ता - पण हे पाहायला सरकारमधे कोणीतरी हवं ना?
मंत्री - अहो, आमच्याकडे इतका स्टाफच नाही कि सुरक्षिततेची इतकी यंत्रणा आम्ही सर्वत्र ...
प्रश्नकर्ता - मग हे तर फार्च धोकादायक आहे.
मंत्री - आहे, काय करणार?
दुसरा श्रोता - (महदाश्चर्याने) म्हणजे हे सगळं रामभरोसे चालतं?
मंत्री - अहो, आपला पूर्ण देशच रामभरोसे चालतो.
मग मंत्र्यांनी एक अशोभनीय असं हास्य केलं. विकट. राक्षसी.
आपल्या देशाचं काहीच होऊ शकत नाही याबद्दल मंत्री (अधिकृतरित्या, चारचौघात) जसे कंव्हिंस झाले होते ते पाहून मनात...
आता -
१. खरोखरच भारत रामभरोसे चालतो का?
२. देश रामभरोसे चालू शकतो का?
३. हे सर्वांना माहित आहे का?
४. हे सर्वांना मान्य आहे का?
काहीही असो. Work stress आणि कसलातरी Conflict (याला organizational behaviour मधे योग्य तो शब्द होता, विसरलो, ज्याचा साधारण अर्थ आपली नोकरी, इ, आपला स्वार्थ साधून देत असली तरी, समाजाच्या एकूण हितात काही बाधा तरी आणत नाही ना असा अपराधीपणा असणे) यावर उपाय म्हणून ते हसणं अवश्य ऐकावं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सध्या आदि शंकराचार्य हा
सध्या आदि शंकराचार्य हा पिच्चर पुन्हा एकदा पाहतो आहे. संस्कृत डायलॉग्स ऐकायला सुरुवातीला कृत्रिम वाटतात, पण नंतर सवय होते. दाक्षिणात्य वळणाचे उच्चार ऐकायला नंतर मजा येते खरी. नेहमी पुस्तकांतून वाचलेले कैक प्रसंग पहिल्यांदा पिच्चरमध्ये पाहून धन्य झालो. शंकराचार्य-मंडनमिश्र वाद, कुमारिलभट्टांशी झालेला संवाद, डुकृञ-करणे ची उत्पत्ती, बर्याचवेळेस उद्भवणारे वाद-विवाद आणि नचिकेतकथेचे कूडिअट्टम हे सगळे अतिशय सुंदरपणे दाखवले आहे. पण मंडनमिश्रांशी झालेला वाद अजून नेमक्या डीटेल्समध्ये दाखवायला पाहिजे होता. मंडनमिश्रांची पत्नी उभया भारती हिच्याशी वाद तर दाखवलाच नाही. रैक्व अन सत्यकाम जाबाल यांनाही पडद्यावर पहिल्यांदाच पाहिले
पिच्चर अजून बराच संहत करता आला असता असे आता पुन्हा एकदा पाहिल्यावर वाटते. पण जे केलेय तेही काही कमी नाही. परिश्रम तर घेतलेले निर्विवाद जाणवतात-मुख्य म्हंजे तत्कालीन वातावरणाचा फील एकदम नेमकेपणाने देण्याचे काम दिग्दर्शक जी व्ही ऐयर यांनी फार उत्तमपणे पार पाडलेय-त्याबद्दल त्यांना १०१/१०० मार्क दिलेच पाहिजेत.
त्यातले नचिकेतकथेचे कूडिअट्टम सध्या पुन्हापुन्हा पाहतोय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
झाब्रिस्की पॉइंट
काल 'झाब्रिस्की पॉइंट' हा चित्रपट बोलोन्यातल्या मुख्य चौकात मोठ्या पडद्यावर पाहिला. चित्रपट अगदी कंटाळवाणा वाटला. खुल्या जागेत, चंद्र तारे बघत, वारा वहात असताना तिथे बसायला मस्त वाटत होतं म्हणून केवळ पूर्णवेळ पाहिला....नाहितर उत्सुकता वाढेल असं त्यात काहीही नव्हतं. नाही म्हणायला अमेरिकेतल्या वाळवंटाची दृश्य (तीही किती बघणार?) आणि स्फोटाची स्लो मोशन मधली दृश्य चांगली होती.
विकीवर लिहिलय त्यात हा 'कल्ट' चित्रपट वगैरे झालाय, त्यामुळे असे चित्रपट फारसे रूचत नाहीत मला हे परत कळलं.
बोलोन्यात तीस जुलै पर्यंत रोज पियाझ्झा माज्जोरे मध्ये मोठ्या पडद्यावर चित्रपट दाखवले जाणार आहेत (दर वर्षीप्रमाणेच). जुलैमध्ये ओळीनी ४ दिवस जॅक निकोलसनचे चित्रपट आहेत. 'द लास्ट डिटेल', 'चायनाटाऊन', 'वन फ्लु ओव्हर द कक्कूज नेस्ट' आणि 'अबाऊट श्मिड्ट' हे दाखवणार आहेत. शेवटचे दोन पाहिलेले आणि अतिशय आवडलेले आहेत, बाकी पाहिलेले नाहीत.हे सगळेच चित्रपट पहाण्याचं ठरवलं आहे.
'मेरी अॅन्ड् मॅक्स्'
साल १९७६.
मेरी डेझी डिंकल् - वयवर्षे ८. राहणार ऑस्ट्रेलिया. 'नॉबलेट्स्' कार्टून, चॉकलेट, कन्डेन्स्ड् मिल्क् आवडणारी. एक कोंबडा आणि एक अॅगोराफोबिया असलेला शेजारी आणि समोर राहणारा एक तोतरा ग्रीक मुलगा हे तिचे विश्व. वडील चहाच्या कंपनीत पिशव्यांना धागे जोडणारे, फावल्या वेळात पेंढा भरलेले पक्षी बनविणारे आणि तिच्यापासून तुटक. आई क्लेप्टोमेनियॅक्, कायम शेरी पिऊन डुगुडुगू हलणारी आणि क्रिकेट समालोचन ऐकणारी. अश्या वातावरणात वाढणारी मेरी, ही जगाबद्दल वयसुलभ प्रश्न असलेली आणि स्वत:ची अशी स्वप्ने असलेली एक मुलगी.
मेरीच्या आईने, मेरीचा जन्म एक अपघात होता, असे तिला सांगितलेले असते, तर तिच्या आजोबांनी तिला त्याउलट 'मुले कारणपरत्वे असतात आणि वडिलांना ती बियर ग्लासच्या तळाशी सापडतात' असे सांगितलेले असते (!).
एक दिवस तिचे अमेरिकेबद्दलचे कुतुहल चाळवते. अमेरिकेतले जग तिच्याभोवतालसारखेच असेल का ? तिथले लोक कसे असतील , असे प्रश्न तिला पडू लागतात. शेवटी ती अमेरिकेतल्याच एखाद्या माणसाला पत्र लिहून विचारायचे ठरविते. कर्मधर्मसंयोगाने, ती पत्ता उचलते तो मॅक्स् हॉरविट्झ् चा...
मॅक्स् हॉरविट्झ् - वयवर्षे ४४. राहणार न्यू यॉर्क्. चंबूत ठेवलेला मासा 'हेन्री', आईन्श्टाईन/न्यूटन/हॉकिंग अशी नावे असलेल्या गोगलगायी, बिस्किट नावाचा पोपट, हॅलटोसिस नावाची मांजर असे याचे सोबती. 'नॉबलेट्स्' कार्टून पाहत कायम चॉकलेट हॉटडॉग खाणारा, मित्र नसलेला आणि जगाबद्दल, भोवतालच्या माणसांबद्दल तर्कशुद्ध प्रश्न असलेला आणि उत्तरे न सापडल्याने गोंधळलेला, एकलकोंडा माणूस.
तर मेरी, 'अमेरिकेत मुले कशी निपजतात ?' असा प्रश्न विचारणारे एक पत्र त्याला पाठविते. तिथून मग सुरू होतो तो दोन दशके चालणार्या पत्रांचा कधी सुरळीत, कधी ठेचाळत, कधी वरखाली होत जाणारा अद्भुत प्रवास.
या पत्रमैत्रीचे काय होते ? मेरी, मॅक्स् चे, त्यांना पडणार्या प्रश्नांचे, त्यांच्या जगाबद्दलच्या कल्पनांचे, मैत्रीबद्दलच्या संकल्पनांचे काय होते ? गोष्टे कुठे संपते ?
सत्यघटनांवर आधारित 'मेरी अॅन्ड् मॅक्स्' हा एक दृष्ट लागण्याजोगा क्ले-अॅनिमेशन चित्रपट.
क्ले-अॅनिमेशन मध्ये 'वॉलेस् अॅन्ड ग्रॉमिट्', 'चिकन् रन्' सारखे उत्तम पण सारख्या शैलीचे चित्रपट येऊन गेलेत. 'मेरी अॅन्ड् मॅक्स्' मध्ये क्ले-अॅनिमेशनच्या या शैलीत इतके जबरदस्त तपशील असलेले काम मी आजवर पाहिलेले नाही. पात्रांची चेहरेपट्टी, त्यांचे आकार, भावभावना दाखविण्याचे तंत्र, घराभोवतालच्या उभ्या केलेल्या गोष्टी.. सगळे गुंतवून टाकणारे ! एखादी गोष्ट क्ले-तंत्राचा वापर करून कशी सांगावी याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण. चित्रपटाचे पार्श्वसंगीत, रंगसंगती ह्या अतिशय जमेच्या बाबी. आणि या सगळ्या तांत्रिक बाबींतून हाती अलगद शिल्लक राहते ती मैत्रीची गोष्ट !
एकूण, चुकवू नये असा हा चित्रपट. (९२ मिनिटे, २००९, ऑस्ट्रेलिया)
"किंबहुना सर्वसुखी" साहेबांनी
"किंबहुना सर्वसुखी" साहेबांनी लिंक शेअर केल्यामुळे राजा हरिश्चन्द्र हा पयला पयला इण्ड्यन शिणेमा पाहतोय मधूनमधून. मण्डळीन्नी लाभ घ्यावा.
http://www.youtube.com/watch?v=Y6FuYf7r46Y
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
"द ४०० ब्लोज्"
१९५९ सालचा, फ्रान्स्वा त्रुफोंचा , "द ४०० ब्लोज्".
गाजलेला सिनेमा म्हणून पाह्यला घेतला तेव्हा त्याच्या विषयाबद्दल नीटशी माहिती नव्हती. मराठीत हा सिनेमा काढायचा तर "एक अत्रंगी कार्टे" या शीर्षकाने - किंवा सतीश वाघमार्यांच्या शब्दांत "एक इदरकल्याणी कार्टे" - असा काढता येईल. चौदा वर्षांच्या मुलाने गाजवलेले प्रताप, त्याची शाळेतून रिमांड होममधे झालेली रवानगी, त्याच्या कौटुंबिक आघाडीवरचा आनंदीआनंद असं चित्रपटाचं स्वरूप.
सिनेमा पहाताना अनेक ठिकाणी खळखळून हसलो, अनेक ठिकाणी अंतर्मुख झालो. मध्यवर्ती भूमिका असलेल्या मुलाने ( नटाचं नाव : Jean-Pierre Léaud) केलेलं काम अविस्मरणीय आहे. चौदा वर्षांच्या मुलांचं जग निर्भरपणे चित्रित केलेलं आहे. या निमित्ताने पॅरीसचं, त्या काळातल्या फ्रेंच रहाणीमानाचं, शैलीचं चित्रण मजेशीर वाटलं. सिनेमा पाहून झाल्यानंतर माझ्या आठ वर्षीय मुलालाही आवडेल असं वाटलं म्हणून त्याच्याबरोबर पहायला घेतला, आणि पालकत्वासंदर्भातला अंदाज बरोबर ठरल्याचे क्वचितच मिळणारे समाधान मिळाले
सिनेमाचं नाव "द ४०० ब्लोज्" का, ते समजलं नाही. ते कुणीतरी सांगावे
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
'४०० ब्लोज्' का ?
सिनेमाचं नाव "द ४०० ब्लोज्" का, ते समजलं नाही.
विकीवरून -
The English title is a straight translation of the French but misses its meaning, as the French title refers to the expression "faire les quatre cents coups", which means "to raise hell". On the first American prints, subtitler and dubber Noelle Gilmore gave the film the title 'Wild Oats', but the distributor did not like that title and reverted it to The 400 Blows, which led some to think the film covered the topic of corporal punishment.
----
आणखी एका ठिकाणाहून मिळालेली माहिती :
Many expressions can't be translated literally between French and English, but the French expression 'faire les quatre cents coups' is one that makes virtually no sense at all - you can't even guess as to what it means figuratively. I think it's partly the definite article les ("the") that makes it so difficult, as if there are 400 specific tricks that one must do in order to claim that you've lived a truly wild life.
Also, the word coup has numerous meanings; in faire les quatre cents coups, it's in the sense of un mauvais coup - "a dirty or mean trick." Unfortunately, the title of the François Truffaut's film Les Quatre Cents Coups was poorly translated as "The 400 Blows" in English. "400 Tricks" would have been a little better, but I think the best translation would have been something more figurative like "Raising Hell" or "The Wild One."
सर्चिंग फॉर सुगरमॅन
काही पुस्तके, सिनेमे, डॉक्युमेंटरीज यातील कथामूल्यच इतके प्रभावी असते की कलात्मक दृष्टीकोन (पुस्तकांच्या बाबतीत साहित्यमूल्य) , तांत्रिक बाबी, निर्मितीमूल्ये वगैरे गोष्टी साफ विसरूनही प्रभावी कथेमुळेच भारावून जायला होतं आणि विचारांना चालाना मिळते. ('फुल टिल्ट' हे पुस्तक वाचताना माझे असेच झाले होते, १९९६५मधे सायकलीवरून आयर्लंड ते भारत असा प्रवास करणार्या स्त्रीचे अनुभवच इतके रोमांचक आहेत की त्यापुढे इतर गोष्टी दुय्यम ठराव्यात). 'सर्चिंग फॉर सुगरमॅन' ही अशीच डॉक्युमेंटरी आहे. अॅकॅडेमी, बाफ्टा आणि डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका यांनी गौरवलेली डॉक्युमेंटरी आणि अगदी 'आवर्जून पहा' अशी माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाची सुचवणी यावर हा सिनेमा पहाणार असाल तर पुढील परिच्छेद वाचू नका असे सांगावासे वाटते कारण फार काही माहिती नसल्याने त्यातील कथेचे प्रभावीपण फार जाणवते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
रहस्यभेद सुरू:
आणि आपण 'काय' ऐकतो आणि 'का' ऐकतो हा प्रश्न स्वतःला विचारावासा वाटला, कोणीच न ओळखल्याशिवाय विझून गेलेल्या प्रतिभांबद्दल शोक वाटला, सांगितले गेलेले सत्य हे सत्य न मानता स्वतः सत्याचा पाठपुरावा करणार्या सामान्य माणसांबद्दल (रसिकांबद्दल) कौतुकाने मन भरून आले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रॉड्रीगेजच्या संगिताचे माप त्यांनी माझ्या पदरात टाकल्याबद्दल अपार कृतज्ञता वाटली. अवश्य पहावी अशी डॉक्युमेंटरी! तृटी शोधायच्या तर शोधता येतीलच आणि काही मलाही जाणवल्या होत्या, पण त्याबद्दल काही लिहिण्याइतक्या त्या मला महत्वाच्या वाटल्या नाहीत आणि तो माझा प्रांतही नव्हे.
सत्तरीच्या दशकात 'सिक्स्टो रॉड्रीगेज' नावाच्या साधारण कामगार म्हणून काम करणार्या एका संगितकाराला एका अमेरिकन संगित कंपनीने ब्रेक दिला आणि त्याचे दोन आल्बम्सही प्रसिद्ध झाले. रस्त्यावरच्या, कष्टकरी आयुष्याबद्दल फार धारधार, वास्तववादी कविता, एस्टॅब्लिशमेंटवर बोचरी टीका आणि मंतरून टाकणारा आवाज ही रॉड्रीगेजची खास वैशिष्ट्ये होती पण का कोण जाणे त्याला अजिबातच व्यावसायिक यश मिळाले नाही. संगित कंपनीने त्याचे कॉन्ट्रॅक्ट मोडले आणि रॉड्रीगेज आपल्या अंगमेहनीतीच्या कामाकडे आणि गरीबीकडे परतला. पण इथून पुढे सुरू झाला एक अद्भूत प्रवास...त्याला ज्याची अजिबात कल्पना नव्हती. कोणीतरी दक्षिण अफ्रिकेला गेलेले असताना त्याच्या संगिताची कॅसेट घेऊन गेले, तिथे एका माणसाकडून दुसर्याकडे असे होत हे संगित फारच लोकप्रिय होत गेले...त्यावेळी द. अफ्रिकेत 'अपार्थेड सरकाराविरुद्ध' युद्ध पुकारलेल्या तरूणांसाठी, तरूण संगितकारांसाठी रॉड्रिगेजचे संगित म्हणजे अभिव्यक्तीची नवीन भाषा ठरला. त्याची लोकप्रियता तिथे इतकी वाढली की तिथे तो 'रोलिंग स्टोन्स' किंवा 'एल्विस प्रेस्ली' हून अधिक लोकप्रिय झाला पण कोणालाच त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्याच्या नावाभोवती रहस्याचे एवढे मोठे वलय होते की, त्याने आपल्या एका कार्यक्रमाच्या शेवटी स्टेजवर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली अशी अफवा पसरली आणि त्यावरच बरयाच लोकांनी विश्वास ठेवला. त्याचे एक गाणे 'सुगरमॅन' हे इतके लोकप्रिय झाले होते की रॉड्रिगेजला सुगरमॅन म्हणूनच संबोधले जायचे. त्याच्या एका पंख्याला मात्र रॉड्रिगेजचे नक्की काय झाले याबद्दल फारच कुतुहल होते. त्याच कुतुहलापोटी नव्वदीच्या दशकात त्याने एका बातमीदाराच्या सहाय्याने शोधमोहीम उभारली, ज्याच्या अखेरीस त्याला प्रत्यक्ष ' सुगरमॅन' भेटला. डिमॉलिशन कामगार म्हणून काम करणार्या रॉड्रिगेजला मात्र आपल्या लोकप्रियतेची तसूमात्रही कल्पना नव्हती. यानंतर, जवळजवळ तीस वर्षे मृत समजला गेलेला रॉड्रीगेज द.अफ्रिकेत परतला...पुन्हा गायला लागला. हे सर्व झाले तरी अमेरिकेत आणि इतर देशांत कोणालाच रॉड्रिगेजबद्दल फारशी माहिती नव्हती. २०१२मध्ये 'सर्चिंग फॉर सुगरमॅन प्रदर्शित झाल्यावर सिक्स्टो रॉड्रिगेज पुन्हा प्रकाशात आला आणि आता तो देशविदेशात कार्यक्रम करायला लागला आहे.
रहस्यभेद संपला
डॉक्युमेंटरी पाहून मनात भावना आणि विचार दोन्हींची भाऊगर्दी झाली
मॅन ऑफ स्टिल
काल मॅन ऑफ स्टिल पाहिला.
हल्ली ३डी चित्रपट काढायचे या तत्त्वाला धरून हा ही ३डी काढला आहे. बरेच प्रसंग चांगले चितारले असले तरी "खास-३डी साठी" असे प्रसंग जाणवले नाहीत
बाकी, चित्रपटाबद्दल, नेटका वेगवान चित्रपण. अर्थातच सेव्ह द वर्ल्ड छापाचा आणि + अमेरिकन नजरेतून आलेला. मात्र सुपरमॅनचा पुन्हा झालेला श्रीगणेशा ताकदीचा झाला आहे. चित्रपटाने घेतलेल्या व राखलेल्या वेगामूळे शेवट अधिकच लांबलेला वाटला.
पात्रांची अॅक्टिंग, कास्टिंग, लोकेशन्स ठिक
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
महेश भट चा
महेश भट चा सेमीअटोबायोग्राफीकल अर्थ पाहिला. चित्रपट ठीक आहे. शेवट आवडला. स्मिता पाटील ग्लेमरस नाही वाटत. आणि मला तर ती अभिनयासाठीपण फार आवडत नाही. शबाना सोबत असेल तर अजुनच झाकोळुन जाते. स्मिताऐवजी रेखा जास्त चांगली वाटली असती परवीन बाबी प्ले करायला. राज किरणच पात्र मला तरी अनावश्यक वाटलं. (अवांतर: काही दिवसांपुर्वी दिप्ती नवलने याला शोधायचा प्रयत्न केलेला. अमेरीकात ट्याक्सी चालक म्हणुन काम करत होता म्हणे)
परवीन बाबी, सिझोफ्रेनिया वगैरेबद्दल वाचताना १५ पार्क अवेन्यु बद्दल कळालं. तोदेखील युट्युब वर मिळाला म्हणुन पाहीला. अत्यंत अवघड विषय छान हाताळलाय. शबाना, कोकणा, वाहीदा यांचा अभिनय _/\_. शेवट मलातरी पटला नाही कंफ्युजीँग वाटला.
स्मिता पाटील ग्लेमरस नाही
स्मिता पाटील ग्लेमरस नाही वाटत. आणि मला तर ती अभिनयासाठीपण फार आवडत नाही
:O
:O
:O
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
कोणता चित्रपट पाहु तिचा सांग?
एक 'उंबरठा' बघ. तोही बघून
एक 'उंबरठा' बघ. तोही बघून तुझं मत नाही बदललं, तर व्यर्थ! मग 'जैत रे जैत', 'मिर्चमसाला' बघूनसुद्धा काही उपयोग नाही व्हायचा!
अवांतरः शबाना चांगलीच नटी आहे. पण स्मिता ती स्मिता. उगाच तुलना करायचं काम नाही!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+१. फक्त आणि केवळ स्मिता पाटीलच
स्मिता ती स्मिताच! जैत रे जैत आणि मिर्चमसाला मधली स्मिता तर फक्त आणि केवळ स्मिता पाटीलच!
'सर्चिंग फॉर सुगरमॅन' आणि 'झाब्रिस्की पॉइन्ट'
'सर्चिंग फॉर सुगरमॅन' मलाही आवडला होता.
'झाब्रिस्की पॉइन्ट' मला आवडलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. '६८च्या काळातली विद्यार्थी चळवळ माहीत असेल आणि तिच्याशी जवळीकदेखील वाटत असेल, तर ते चित्रपट आवडण्यासाठी पूरक असावं असा माझा अंदाज आहे. शिवाय, 'पिन्क फ्लॉइड' 'डायर स्ट्रेट्स' वगैरे धाटणीचं संगीत (आणि त्यातली आन्ग्स्ट) तुमच्या हृदयात आधीपासून घर करून असेल, तर तेदेखील पूरक ठरेल. ह्या अटींची पूर्तता झाली, तर हा चित्रपट रोमॅन्टिक वाटेल (म्हणजे 'रोमान्स' असलेला नव्हे). चित्रपटामध्ये एका अनोख्या दृश्यसंवेदनेचं दर्शन होतं. चित्रपटातल्या अनेक चौकटींची दृश्यरचना माझ्या मनात कित्येक वर्षांपासून घर करून आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
"चिल्ड्रन ऑफ हेवन"
इराणी दिग्दर्शक मजिद मजिदीचा "चिल्ड्रन ऑफ हेवन".
सिनेमा अतिशय आवडला. त्याबद्दल लिहायला घेणार इतक्यात त्याबद्दल लिहिलेल्या एका जुन्या मराठी लेखाची आठवण आली. म्हण्टलं वेगळं काही लिहायच्या ऐवजी त्या लेखाची लिंकच द्यावी. याचे लेखक ऐसीअक्षरेवरही आहेत. : लेखाचा दुवा
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
अली...
...तूर्तास मक्केस गेलाय. सबब अलीकडे जाणेयेणे बंद आहे. त्यामुळे अलीकडे काहीही पाहिलेले नाही.
२०१२
२०१२ २०११ मधे पाहिला असता तर खूप घाबरावून गेला असता. सुदैवाने मी २०१३ मधे पाहिला तरिही मला मधे मधे अंगाला एक दोनदा चिमट्या घेऊन पहाव्या लागल्या, 'म्हणजे त्या विशेष जहाजात आपण नव्हतो तर आपण मागे कसे?' चेक (तपासणी) करायला. हॉलिवूड वाल्यानी जगबुडीचे चित्रपट काढून अगदी कहर माजवून टाकलाय. पण ही थीम (कल्पनाविषय) मला अत्यंत प्रिय आहे. अशा थीमच्या निमित्ताने अभूतपूर्व असे अॅनिमेशन (जिवंतीकरण) पाहायले मिळते. रिवाइंड करायची (प्रतिकूर्मीकरण्)सोय असती तर चित्रपट पूर्ण करायला ५-६ तास लागले असते. साधारणतः जगबुडीच्या चित्रपटात ५०-६० सामान्य लोक मरतात, १-२ अत्यंत महत्त्वाची भूमिका करणारी पात्रे मरतात, सर्वात महत्त्वाचे हिरो हिरॉइन मरता मरता वाचतात, पण चित्रपट अशाच रेशोने (गुणोत्तर )चालतो. या चित्रपटात मात्र असले बदलून घेतलेले प्रमाणच खरे आकर्षण होते. 'काळात परत जाऊन' हिरो नेहमीचे प्रमाण साधेल अशी शेवटपर्यंत आशा होती पण छ्या! अशा चित्रपटांत अजून एक अलिखित नियम असतो. तो म्हणजे कोणतातरी एक नैसर्गिक नियम धाब्यावर बसवला जातो आणि ते आपल्याला शेवटपर्यंत ' नैसर्गिक' आहे असे गृहित धरुन चित्रपट पाहावा लागतो. असले चित्रपट पाहताना डोके बाजूला ठेवून बघायचे पण तरीही काही ठिकाणी भयंकरच गंमत आली. हसू आवरता आवरेना.
थीम अशी कि माया संस्कृतीत सांगीतल्या प्रमाणे २०१२ ला जग बुडणार. मग तिच्यातून वाचण्यासाठी सगळे राष्ट्रप्रमुख आणि करोड्पती एक महान जहाज (पाण्यातले) बनवतात आणि चीनमधे हिमालयात ठेवतात. हा प्रकार इतर जगापासून लपवलेला.
आता मला हसू आलेले प्रसंगः
१. जहाज केव्हा बुडणार हे अगदी सेकंदापासून मोजलेलं. ३-४ वर्षांचं प्लॅनिंग. आणि जगबूडीच्या '५०-६० मिनिटापूर्वी' जिराफ, हत्ती, गेंडा , इ प्राणी हिमालयाच्या शिखरांवरुन हेलिकॉप्टरने 'पॅक करुन' दोरीने लटकाउन पुढच्या जगात कंटीन्यू करण्यासाठी चालवलेले.
२. जहाजावरचा खल अधिकारी कमित कमी लोक जहाजावर घेऊ इच्छितो. तिथे हिरोला त्याच्या सतनाम नावाच्या भारतीय आठवण येते. तोही एक भावी सहप्रवाशी असतो. हिरो जेव्हा 'सॅटनाम' ला फोन करतो तेव्हा तो त्याच्या बायको सोबत हिमालयाच्या एका शिखरावर वाट पाहत असतो. सुज्ञ प्रेक्षकाच्या लक्षात यावे कि सॅटनाम ची बायको 'तिथे' साडी चोळी घालून वाट पाहत असते.
३. प्रलय होतो तेव्हा पाण्याची पातळी २९००० ह फूट होते? हे पाणी येतं कुठून? चार दिवसानी म्हणे ते 'ओसरलं', हो चक्क ओसरलं, आणि पुन्हा खंड वर आले. पाणी कुठे ओसरलं देव जाणो.
४. ह्या शिपचा जो चिफ असतो त्याला एव्हरेस्ट २९००० फूट आहे, हिमालयात , याची कल्पना नसते.
पिच्चर मधे असे उरलेले योगायोग असले की बघायला खूप मजा येते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
जबरी!
आवडले वर्णन
ह्या शिपचा जो चिफ असतो त्याला एव्हरेस्ट २९००० फूट आहे, हिमालयात , याची कल्पना नसते.>>> असेच अजून एक - टायटॅनिक एरव्ही एकदम चांगला चित्रपट आहे, पण त्याच्यातही त्या कप्तानाला जहाजावर किती लोक आहेत ते माहीत नसते :). नवीन जहाज, त्याची पहिलाच मोठा प्रवास, अटलांटिक पार करणार वगैरे असले तरी.
टायटॅनिक अतिशय उत्कृष्ट होता.
टायटॅनिक अतिशय उत्कृष्ट होता. मला वाटतं कि किती लोक जलसमाधी घेणार हे प्रेक्षकांना कळण्यासाठी तो संवाद मुद्दाम पेरला असावा. तो इतरत्र पेरला असता तर लोकांनी त्याकडे लक्ष दिले नसते आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांना तो आकडा (किती बरे?) माहितच झाला नसता/विसरले असते. ही जागा तो आकडा देण्याची परफेक्ट जागा होती. त्या चित्रपटाची हाताळणी इतकी सुबक आणि परिणामकारक झाली आहे कि अगदी ठरवून पाहिला तरी एखादा खट्याळ प्रेक्षक कुठे 'असा' हसू शकत नाही.
२०१२ मधे त्या महान जहाजामधून पर्वत शिखराचे ते जे 'चित्र' दिसत होते ते जर कोणत्याही काँगो देशातल्या कोणत्याही जिल्ह्यातल्या मुलाला दाखवले असते तर तो उद्गारला असता - 'माउंट एव्हरेस्ट!!' इतके ते टिपिकल होते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
टायटॅनिक
च्या चांगल्या असण्याबद्दल दुमत नाहीच. फक्त हा संवाद पाहताना मला "याला हे कसे माहीत नसेल" अशीच शंका आली. चित्रपटातील पात्रांना त्या प्रसंगात 'कॉमन नॉलेज' असणारी माहिती प्रेक्षकांना मिळावी म्हणून असे संवाद फार कौशल्याने पेरावे लागतात (आणि बरेचसे पटकथालेखक यात गोची करतातच). हा मला तसा (कौशल्याने पेरलेला) वाटला नाही.
मात्र यातील जबरी आवडलेला एक संवाद म्हणजे ती खत्रुड ब्रिटिश बाई म्हणते "are the lifeboats being seated according to the class" तो
मनु-माशाची गोष्ट (वजा
मनु-माशाची गोष्ट (वजा मत्सावतार) जरा अॅनिमेशन टाकून रंगवायचा व्यर्थ प्रयत्न आहे हो हा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मदर नेचर इज ए सिरियल किलर. शी इज अ बिच.
"वर्ल्ड वॉर झी" नामक तद्दन हॉलिवूडी डिझॅस्टरपट पाहिला. चित्रीकरण, तांत्रिक बाजू आणि ग्राफिक्स वगैरे नेहमीप्रमाणेच प्रोफेशनली उत्कृष्ट. जगावर "नैसर्गिक" आपत्ती येते आणि अमेरिकन हिरो काहीतरी युगत करून जगाला वाचवतो ही नेहमीची घासून गुळगुळीत झालेली कथा. फक्त यावेळी इंडिया नामक "ब्लॅकहोल" मध्ये मदर नेचरने जन्माला घातलेला एक विषाणू आणि त्याची लागण झाली की १२ सेकंदात रेबीड होणारी माणसं असं संकट आहे. त्यातल्या एका बालीश डॉक्टरच्या तोंडी वरील संवाद आहे.
माणसाने सगळी खबरदारी घेतली पाहिजे आणि युद्धाच्या तयारीत राहिलं पाहिजे नाहीतर निसर्ग माणसाचा खात्मा करायला टपलाच आहे असा डोमेस्टिकेटेड माणसांचा खराखुरा निराशावादी विचार प्रकर्षाने दिसतो.
शिवाय "ये जवानी है दिवानी" नामक जाहिरातपट पाहिला. प्रत्येक प्रसंगात वेगवेगळ्या आणि भलत्याच प्रवृत्तीने वागणारी पात्रे आणि सुखान्तच हवा म्हणून मुख्य प्रश्नच कार्पेट खाली ढकलून कै च्या कै चॉकलेटी शेवट. सगळ्यात खटकलेली गोष्ट म्हणजे दारूचे केलेले उदात्तीकरण. प्रत्येक प्रसंगाआड मुख्य पात्रांपैकी कोणी ना कोणी दारू ढोसताना दाखवले आहेच वर त्याबद्दल कॉलेजातली पोरं जशी आत्मप्रौढीने बोलतात तसे संवाद. चित्रपट संपला तेव्हा अक्षरश: दारूची चव जाणवत होती तोंडात. बाकी मेक माय ट्रीपची जाहिरात वगैरेबद्दल न बोललेलंच बरं. आता "आयुष्य जगायचं" म्हणजे एकदा तरी पॅरिस, स्वित्झर्लंडला जाऊन यायचं, अमेरिकेला जाऊन यायचं, प्रेमात पडायचं वगैरेंच्या यादीत हिमालयात एकतरी ट्रेक करून यायचा याची भर पडली.
"वर्ल्ड वॉर झ" बद्दल सहमत!
"वर्ल्ड वॉर झ" बद्दल सहमत! डॉक्टर मेल्यावर ब्रॅड पिट स्वतः ज्या काही काड्या करतो ते पाहण्याचीसुद्धा सवय झालीये आता. नाही म्हणायला झाँबींची झोंबाझोंबी बाकी आवडली. इस्राएलच्या सीमारेषेबाहेरची मारामारीही आवडली. पण तेवढं सोडल्यास कैपण आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इस्त्राएलच्या भिंतीवरच्या
इस्त्राएलच्या भिंतीवरच्या मारामारीचा प्रसंग मलाही आवडला. विशेषतः त्यापूर्वी इतकी संकटाची वेळ असताना आणि लष्कराची माणसं कामात गुंतलेली असताना लाऊडस्पीकरवर भजनं म्हणणार्यांची प्रवृत्ती फार छान टिपली आहे.
शिवाय फ्यामिलीचा उदो-उदोही आहेच.
तो एक प्रसंग आणि दुसरा हिरोची बायको त्याला फोन लावते आणि ऐन अंधारात सायकलवरून ते गुपचूप विमानाकडे जाताना फोनची घंटी वाजते तो एक.
प्रसंग काहीही असो, नवरा कोणत्याही कामात असो, बायकांची काळजी महत्वाची.
अशा दोन-चार प्रसंगांतून माणसांच्या प्रवृत्ती छान टिपल्या आहेत. शिवाय जोपर्यंत संकट प्रत्यक्ष येत नाही तोवर आपल्याला काही होणार नाही असे समजण्याच्या वृत्तीवरचे इस्त्राएली माणसाचे भाष्यही मार्मिक आहे.
भजनवाला शीन अन फोन रिंग वाला
भजनवाला शीन अन फोन रिंग वाला शीन जबरे एकदम>>+११११११११११११११११११११११.
एकुणात मोजक्या प्रसंगांतून छान स्वभाव टिपलेत काहीवेळेस.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माणसाने सगळी खबरदारी घेतली
माणसाने सगळी खबरदारी घेतली पाहिजे आणि युद्धाच्या तयारीत राहिलं पाहिजे नाहीतर निसर्ग माणसाचा खात्मा करायला टपलाच आहे हे वाक्य एव्हढं भारी आहे कि आता ४-५ दिवस तरी डोक्यात घोळत राहणार. 'प्राकृतिक आपदेत जिवितहानी होऊ शकते' चं हे व्हर्जन डोकं गुंगवणारं आहे. असा माणूस जीवनात अजून कशाकशाला सामोरे जाताना कोणकोणते प्रत्येक पारंपारिक विचाराचे कोणते व्हर्जन बनवत असेल हाही विचार रंजक आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
एक थी डायन पाहिला
एक थी डायन पाहिला युट्युबवर.

मध्यंतराच्या आधी भट्टी चांगली जमलीय. नंतर अर्धा तास भरकटलाय आणि शेवटी शेवटी तर विनोदी झालाय. काय ते सळसळणार्या वेण्या, झिँजा उपटणे वगैरे मज्जा आली
हुमा खूप सुंदर आहे पण वजन कमी करायला पाहीजे, फारच जाड आहे. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, डर्टी पिक्चर, शांघाय वगैरेपासून इमरान आवडायला लागला. त्याचा पहीला चित्रपट 'फुटपाथ' थिएटरमधे पाहिलेला. सुनिल शेट्टीची नक्कल करतोय वाटलेलं. १० वर्षात चांगलाच सुधारलाय. मी त्याचा मर्डरशिवाय इतर कोणता भट्टकंपु चित्रपट पाहिलादेखील नाही म्हणा. त्यामुळे खरंच सुधारलाय की आधीपासुनच चांगला होता पण चांगले रोल मिळाले नाहीत काय माहीत. डायन मधेपण चांगलं काम केलय त्याने. लहान बोबोच काम करणारा मुलगापण आवडला, अफ्रो केस. कोकणा, कल्की नेहमीप्रमाणेच छान. तो मानसोपचारतज्ञ म्हणजे कहानीमधला बॉब बिस्वास आहे का? त्याला पाहिलाय आधी कुठेतरी.
वळवळणारी पांढरीपाल आठवत राहणार यिक्स्
हरे राम!
आत्ताच टीव्हीवर एक थी डायन पाहिला. पहिल्या अर्ध्या भागात एक मस्त सायको-थ्रिलर पाहायला मिळेल असे वाटले होते, पण दुसरा भाग पाहून डोके फिरले.
दुसर्या अर्ध्या भागात कोंकणा इम्रान हाश्मीला "तुम हम में से ही एक हो" असं सांगते तो प्रसंग पाहून पडद्यामागे एकता कपूर विशाल भारद्वाजलाही चित्रपटाचा शेवट ठरवताना असंच म्हणाली असावी असे वाटले. आर्ट(!?) इमिटेट्स लाईफ याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
हा हा खरंय डोकं फिरवून घेणे
हा हा खरंय डोकं फिरवून घेणे किँवा हसणे हे दोनच पर्याय आहेत मध्यंतरानंतर. माझा मुड चांगला असावा त्यादिवशी म्हणुन हसुन घेतलं. कोकणाच्या वडिलांनी लिहीलेल्या लघुकथेवर बनवलेला आहे चित्रपट...
बादवे एकताचे काही चित्रपट खरंच चांगले आहेत. चित्रपट निर्माती म्हणुन बरीय ती. आणि दुरदर्शन वरच्या साबणमालिकांना कितीही नावं ठेवली तरी एवढ्या प्रेक्षकांना इतका काळ उल्लु बनवणं जमलं तिला.
रोमा चित्ता आपेर्ता
१९४५ सालातला 'रोमा चित्ता आपेर्ता' हा इटालियन चित्रपट पाहिला. चित्रपटाची गोष्ट काल्पनिक आहे पण तिला दुसर्या महायुद्धत रोम जर्मन (नाझी) सैन्याच्या ताब्यात असतानाच्या काळाची पार्श्वभूमी आहे. इटालियन्सच्या दृष्टिकोनातून त्यावेळच्या परिस्थितीची जाणीव चित्रपटातून झाली. चित्रपट आवडला.
चित्रपट पाहायला बरोबर एक इटालियन आणि एक जर्मन असा योगायोग !
आना मान्यानी!
आना मान्यानी अतिशय आवडते. केवळ तिच्यासाठी लक्षात राहिलेला चित्रपट.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
युट्युबवर झोये ट्राईबवर उत्तम
युट्युबवर झोये ट्राईबवर उत्तम डॉक्युमेंटरी आहे.
http://www.youtube.com/watch?v=9SW0jzXTS6A
http://shilpasview.blogspot.com
COEP चं, खास आपल्यासाठी
COEP चं, खास आपल्यासाठी (२००८चं असावं ) हे छोटास नाटक पहिलं. गेल्या दोन तीन वर्षात मराठीमध्ये इतकं छान काही पाहिलेलं नव्हतं म्हणीन इतकं आवडलं. वैभव तत्ववादी आणि गायत्री साठे दोनही विद्यार्थीकलाकारांनी झक्कास कामं केली आहेत.
आपण मध्यमवर्गीय आपण छोट्या छोट्या गोष्टीतला/गोष्टीमध्ये आनंद शोधत राहतो, मोठं असं कधी काही करतच नाही. आणि जे करत नाही त्यावर आपण का बोलावे. असं म्हणून काहीतरी मोठं करायचं ठरवतात. अन् ते मोठं काहीतरी करताना झक्कास विनोद घडत जातात.
डिस्नीचा अर्जुन हा पिच्चर
डिस्नीचा अर्जुन हा पिच्चर बर्याच दिवसांनी पाहिला. टेकिंग मस्त आहे. गाणी मात्र नस्ती तरी चाललं असतं-काही गरज नव्हती. उत्तरगोग्रहणाच्या वेळच्या फायटी बघून मजा आली. पण अजून विस्ताराने दाखवायला पाहिजे होतं. किरातार्जुनीयवाला प्रसंगही जब्रीच!
अन हे झाल्यावर चिरपरिचित गुंडा पाहतोय. मज्जानी लाईफ!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भाग मिल्खा भाग
काल "भाग मिल्खा भाग" बघावा लागला!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बरा आहे.
अनिच्छेने पाहिलेल्या चित्रपटाबद्दल काहीच प्रतिक्रिया नाही? मी 'लूटेरा' बघायचा म्हणून गेलो तर तिथे लूटेरा जाऊन 'भाग...' लागला होती.मग तोच पाहिला.
अगदीच रद्दड नाही. लो-बजेट डॉक्यूमेंटरी सारखा वाटला.
(अवांतर- जावेदच्या पोराने 'बावडी' कमावलेली आहे, तो बापाच्या मानाने कमी तोतरा बोलतो.इ.इ.)
नै आवडला
मला नै आवडला . अगदी फक्त आड्य्न्सला डोळ्यासमोर ठेऊन काढलेला व्यवसायपट वाटला. मिल्खासिंग नावालाच, त्याच्या आयुष्यातील "खपणार्या" गोष्टींचे भडक चित्रीकरण, सुमार संवाद, पिरीयड फिल्मचे भान न बाळगणारा चित्रपट वाटला.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रचंड रटाळ!!! संपता संपत नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तू तर माझ्याही पुढे गेलीस
नाना, आम्ही तर 'लुटेरा' आणि 'भामिभा' दोन्ही बघीतले. रे. टिळकांच्या भाषेत 'तू तर माझ्याही पुढे गेलीस!'
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
इथे लोक चित्रपटांबद्दल लिहित
इथे लोक चित्रपटांबद्दल लिहित आहेत पण आम्ही मात्र अजुनही टिव्ही सिरिज मधुन बाहेर पडत नाहीएत
गेल्या काही दिवसात काहि सिरिजचे सिझन्स च्या सिझन्स आम्ही एका पाठोपाठ संपवले. त्यातल्या काहींची नावे
१. हाउस ऑफ कार्ड्स
२. गेम ऑफ थ्रोन्स
३. सुट्स
तिन्ही मालिकांमध्ये एक समान सूत्र आहे:सत्ता! मग तिच्यासाठीचे शह, कटशह, मात, सर्वकाही. तरीही प्रत्येक मालिका वेगळी आहे.
४. द न्युजरुम: या बाबत जास्त काही बोलत नाही फक्त यु ट्युबचा खालील दुवा हे या मालिकेचे पहिले आठ मिनिट आहेत.
http://www.youtube.com/watch?v=1zqOYBabXmA
अजुन एक दुवा
http://www.youtube.com/watch?v=59T0jz2m3u4
कोठे पाहिले ते ही लिहा
हाउस ऑफ कार्ड्स (अमेरिकन व्हर्जन) नेटफ्लिक्स वर स्ट्रीमिंग वर आहे, आणि पाहिली आहे. बाकी कोठे उपलब्ध आहेत?
पॅसिफिक रिम पाहिला. जबरी आहे!
पॅसिफिक रिम पाहिला. जबरी आहे! थ्रीडी अॅक्शनपॅक्ड आहेच-पण इण्टर्न्याशनल प्रेझेन्स म्हंजे वट्ट आम्रिकन्स असे नै दाखवले ते आवडले. शिवाय एलियन्स बाहेरून न येता पृथ्वीच्याच पोटातून येतात अन बरीच वर्षे त्यांचा काँटॅक्ट सस्टेन्ड असतो हेही एक वैशिष्ट्य. एकुणात पैसा वसूल!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कोण जिंकलं?
एलियन्स जिंकले का? तरच सिनेमा पाहू म्हणतो. च्यायला दरवेळेला एलिअन्सच हारतात. तेच ते पाहून कंटाळा आला.
-Nile
नो नो नो नो!
तसे चित्रपट पहायचे असतील तर तु "त्यांच्या" ग्रहावर जा बाबा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हे सही आहे
हे सही आहे
ती इसापनीतीतील गोष्ट आठवली. एक माणूस व एक सिंह कोठेतरी जात असतात, तर एका ठिकाणी एक माणूस सिंहाला मारून त्याच्या अंगावर बसलेला आहे असे चित्र दिसते. ते दाखवून तो माणूस सिंहाला म्हणतो बघ याने सिद्ध होते की माणूस सिंहापेक्षा प्रबळ आहे वगैरे वगैरे. तेव्हा सिंह म्हणतो सिंहांना चित्रे काढता येत असती तर उलटे दिसले असते 
रिलेटीव्हीटी, रिलेटीव्हीटी!
त्यांच्या ग्रहावर गेलो, अन ते ही तुमच्यासारखेच स्वतःच्याच प्रेमात गुरफटलेले असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही एलियन्स अन तुम्ही नेहमीच हरणार. पुन्हा वांदा तोच की हो!
हुशार लोकांच्या ग्रहाचा शोध सुरू आहे, तो लागला कि निघालो आम्ही.
-Nile
नै, एलियन्स नै जिंकले. पण
नै, एलियन्स नै जिंकले. पण फायटिंग मस्त आहे. तरीही शेवटी आयर्न मॅन आणि हल्क या दोघांनीच ते परतवून लावले असते असे वाटत राहते
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ट्रेलर
ट्रेलर पाहून फायटिंगचा अंदाज आला होता. एलियन्स म्हणजे ग्लोरीफाईड क्रिटर्स दाखवले की सायन्स फिक्शन म्हणून लाज काढतात राव, असं वाटतं. अगदीच काही नाही तर टीव्हीच्या रंगांची टेश्ट घेण्याकरता पाहू, फायटिंग वेळचं ग्राफिक्स बरं वाटलं.
-Nile
"अली : फिअर ईट्स द सोल"
१९७४ सालचा, फासबाईंडर या जर्मन दिग्दर्शकाचा "अली : फिअर ईट्स द सोल".
<कथासूत्र सुरवात>
१९७० च्या दशकातला पश्चिम जर्मनी. एका मोठ्या शहरातल्या एका उपनगरामधलं एका आडबाजूचं काहीसं यथातथा रेस्टॉरंट. संध्याकाळी तिकडे तीन चार लोकांची तुरळक गर्दी आहे. त्यातले सगळेच आफ्रिकेतून/आशियातून आलेल्या वंशाचे. पाऊस लागला आहे. आणि एक किंचित जाडगेलीशी वाटेल अशी साठीची जर्मन बाई येते. रेस्टॉरंटच्या नेहमीच्या गर्दीत ती वेगळी आहे हे लगेच जाणवतं. रेस्टॉरंट मधले लोक तिच्याकडे नुसते पहात असतात. त्या घोळक्यातला एक चाळीशीचा, दणकट , काळ्या वर्णाचा , आफ्रिकेतून आलेला माणूस - अली - तिच्याजवळ जाऊन मृदुतेनं , साधेपणाने बोलतो. दोघांचं सूत जुळतं. दोघे ती रात्र त्या बाईच्या घरी घालवतात.
अली मोरोक्कोहून आलेला, इतर बॅचलर्स बरोबर रहाणारा बिल्डींग काँट्रॅक्टर आहे. बाई एकटी राहाणारी. एका कारखान्यात सफाईकामगार आहे. दोघे जेमतेम एखादा आठवडा एकत्र राहायला लागल्यानंतर बाईच्या बिल्डींगमधे रहाणार्यांमधे कुजबुज सुरू होते. बिल्डींगचा अधिकारी "पोटभाडेकरू चालणार नाहीत" असं सांगायला आल्याच्या प्रसंगी, दोघानी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे कळतं.
बाईच्या काम करण्याच्या ठिकाणच्या लोकांच्या बोलण्यावरून, बिल्डींगमधल्या माणसांच्या बोलण्यातून, कोपर्यावरच्या दुकानदाराच्या बोलण्यातून, "शुद्ध जर्मन वंशाच्या" , "बाहेरच्या" लोकांबद्दलची मतं व्यक्त होताना दिसतात. काळ्या माणसाबरोबरच्या तिच्या लग्नाची बातमी समजल्यानंतर या सर्व लोकांच्या वागण्यात जो फरक निर्माण होतो त्याचं चित्रण मार्मिक आहे. खुद्द त्या बाईच्या कुटुंबातल्या लोकांच्या प्रतिक्रिया टोकाच्या असतात.
एकमेकांबद्दल सहानुभूती असणार्या, एकमेकांची गरज भागवण्याकरता , एकाकीपणामधे साथ देणार्या दोन व्यक्तींच्या संबंधांवर या सर्व सामाजिक परिस्थितीचा ताण कसा पडतो, याचं चित्रण म्हणजे हा सिनेमा.
<कथासूत्र शेवट>
१९७० च्या दशकामधेही "शुद्ध जर्मन वंशा"बद्दलचे विचार समाजातल्या साध्यासुध्या लोकांमधेही कसे जागे होते याचं दर्शन या सिनेमाने घडवलं. ज्या "मिनिमालिस्ट" शैलीचा प्रभाव नंतरच्या दशकातल्या चित्रपटांव पडला तो मिनिमालिझम या चित्रपटाचा अवकाश व्यापतो.
हा सिनेमा पहायच्या काही दिवस आधीच मी युजीन ओ'नीलचं "लाँग डेज जर्नी इन्टू नाईट" हे नाटक सिनेस्वरूपात पाहात होतो. नाटक महत्त्वाचं आणि कलाकारही मोठे. पण या नाटकात कुठेही कुणीही मला विराम घेताना दिसेनात. ते मला फार खटकत होतं. प्रस्तुत जर्मन सिनेमामधल्या वातावरणातल्या, संभाषणांदरम्यानच्या "शांतते"च्या वापराच्या पार्श्वभूमीवर मला ही बाब अधिकाधिक खटकली. या जर्मन सिनेमामधे कुठेही लांबलचक संवाद नाहीत. एकमेकांना विद्ध करण्याचे क्षण एकमेकांकडे पहाण्याच्या अर्थपूर्ण दृष्टादृष्टीतून प्रतीत होतात. अर्थसंपन्न अनुभव देतात.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
द लास्ट डिटेल
'द लास्ट डिटेल' हा चित्रपट पाहिला. खूपच आवडला.
सामान्यपणे मला संवादांमध्ये शिव्यांचा भरणा असेल तर चित्रपट पहावत नाहीत. पण हा चित्रपट अपवाद म्हणावा लागेल.
चित्रपट सुरू होतो तो नेव्हीतल्या दोघांवर (जॅक निकोलसन आणि ओटिस यंग ) नेव्हीतल्याच एका कैद्याला (रँडी क्वेड) जेल मध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी येऊन पडते तिथून. हे दोघे म्हणजे 'पोचलेले' आहेत आणि कैदी अगदी नुकताच सज्ञान झालेला असा पोरगेलासा. त्याची एका क्षुल्लक गुन्ह्यासाठी झालेली आठ वर्षांची शिक्षा सुरू व्हायच्या आधी त्याला थोडी दुनिया दाखवू आणि आहे तो वेळ मजेत घालवून देऊ हा जॅक निकोलसनचा दृष्टिकोन, तर ओटिस यंगचा - आपण आणि आपला जॉब, कशाला भानगडी कराव्या असा, पण मनात कैद्यासाठी ओलावा आहेच. हे दोघे त्याला घेऊन जातात त्या प्रवासात कायकाय होतं ते म्हणजे हा चित्रपट. इंग्रजीत सबटायटल्स असती तर आणखीन चांगला अगदी लास्ट डिटेल पर्यंत स्मजला असता- ते परत बघीन तेव्हा.
सगळ्यांचा अभिनय उत्कृष्ट आहे आणि संवादही उत्तम. जरूर पहावा. यूट्यूबवर उपलब्ध आहे.
चितगाँग
चितगाँग पाहिला. अतिशय आवडला.
प.बंगालात डाव्यांनी इतके वर्षे राहाण्यामागची पार्श्वभूमी, पूर्वपुण्याई याची अधिक प्रकर्षाने जाणीव झाली.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
Aranyaka (1994)
एन.एफ.डी.सी.चा 'आरण्यक'१९९४ पाहिला. जंगलातलं कॅमेरावर्क सुंदर आहे. सुरुवातीला संथ चाललेला चित्रपट शेवटला भयानक सत्य उभे करतो. नवनी परिहार छान दिसते.
मोहन गोखलेही आहे.
कंग फू हसल
बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा पाहिला. जबरदस्त आहे हे मत पुन्हा अधोरेखित झालं. एक तरल कार्टूनी स्टाइल, किंचित गोग्गोड पण अगदी चवीपुरता, चिमूटभर रोमान्स, परत परत बघाव्याशा वाटणाऱ्या मारामाऱ्या, आणि कृत्रिम बटबटीतपणाने रंगवलेल्या व्यक्तिरेखा... यामुळे दोन तास धमाल येते. कंग फू सिनेमांमध्ये असणाऱ्या वाघाचा पंजा स्टाइल, माकडाची शेपटी स्टाइल, साप स्टाइल वगैरे सगळ्या गोष्टींची खिल्ली उडवलेली आहे. गंमत म्हणजे टिपिकल कंग फू सिनेमाचा फॉर्म्युला वापरत वापरतच त्या फॉर्म्युलाची जागोजाग चेष्टा केलेली आहे.
ज्या चाळीत सगळेजण रहात असतात ती तर भारतात शोभावी अशी आहे. महा वचवच करणारी चाळीची मालकीण, तिचा रंगेल नवरा, स्वतःला कंग फू अजिबात न येणारा यडपट हिरो, त्याचा झोपाळू मित्र सगळं रसायन फक्कड जमलं आहे. त्यांच्यावर काही गैरसमजाने चालून येणारी ऍक्स गॅंग तर हिंदी सिनेमात निश्चित शोभून दिसेल.
या सिनेमाला अनेक अवार्ड्सदेखील मिळालेले आहेत. संगीत, ऍक्शन सीक्वेन्सेस वगैरे फारच छान आहे. निखळ करमणूक हवी असेल तर जरूर बघा, तुमचे दोन तास सत्कारणी लागतील याची खात्री आहे. सिनेमाविषयी माहिती इथे मिळेल.
शाओलिन् सॉकर्
याच चित्रपटातली बहुतेक सगळी मंडळी असलेला २००१ सालचा 'शाओलिन् सॉकर्' पाहिला आहेत का ? कदाचित अधिक आवडेल तुम्हाला.
हीच टीम आहे म्हणून अपेक्षेने
हीच टीम आहे म्हणून अपेक्षेने कालच बघितला. करमणूक आहे, पण तितका आवडला नाही. हसलमध्ये जी कंग फू मास्टरगिरीची चढती भाजणी आहे ती यात नाही. रोमान्सही कृत्रिम वाटला. एकंदरीतच भट्टी जमली नसल्याचं जाणवत राहिलं. कदाचित हसल शी तुलना होत राहिल्यामुळे असेल.
'द आर्टिस्ट' हा ऑस्कर विजेता
'द आर्टिस्ट' हा ऑस्कर विजेता चित्रपट पाहिला. ठीक वाटला पण अगदी खूप आवडला नाही. आजच्या काळातला कृष्णधवल आणि मूक पट म्हणून या चित्रपटाने लक्ष वेधून घेतलं असणार.
त्यातला कुत्रा मस्त आहे.
'द आर्टिस्ट'चा शेवट - अवांतर
या चित्रपटाच्या शेवटाबद्दल मला कुतुहल लागून राहते. असाच शेवट का करावासा वाटला असावा ?
(पुढील मजकूर शेवटाबद्दल असल्याने पांढरा केला आहे.)
त्या कलाकाराचा बोलपटांना असलेला विरोध पाहता, तिने केलेली युक्ती म्हणजे त्याला न बोलताही बोलपटांत काम मिळावे, करता यावे. परंतु हे मला कमकुवत वाटले. उदा. त्याला पुढच्या कुठल्याही बोलपटांत काम करायचे असल्यास त्या बोलपटांत नाच असलाच पाहिजे, नाहितर त्याला वाव नाही. आता केवळ अश्या चित्रपटांमुळे त्याला एक उत्तम नर्तक / कलाकार म्हणून प्रतिष्ठा मिळेल पण तशी (अभिनेता / स्टार म्हणून नसलेली) प्रतिष्ठा त्याला चालेल का / अपेक्षित होती का ?
मला वाटले होते, की त्याऐवजी, त्याला पूर्वीचीच 'एक उत्कृष्ट अभिनेता / स्टार' म्हणून प्रतिष्ठा मिळवून द्यावयाची असेल तर अधिक उजवा मार्ग म्हणजे त्याचे पूर्वीचेच सारे मूकपट बोलपटांत रूपांतरीत (डब्) करून प्रदर्शित करावे. जर ते लोकांना आवडले, तर तर संवाद असो वा नसो; त्याचे चित्रपट, हे त्याचे म्हणून राहतील. जर लोकांना आवडले नाहीत, तर त्याला त्याचा पराभव स्वीकारावा लागेल, जे 'आर्टिस्ट्' या नांवाला जोडून आलेल्या गोष्टींत सामावलेले आहे, वा अधिक सयुक्तिक आहे. मग चित्रपट त्याच्या शोकांतिकेत समाप्त झाला तरी शेवट कमकुवत ठरत नाही. असो.
पाने