मास्लोचा पिरेमिड

मास्लोचा पिरेमिड माणसाच्या गरजांची उतरन्ड दाखवतो. जशा एकावर एक रचालेल्या विटा. प्रत्येक विटेची गरज खालची वीट. आधी जिवंत राहण्यासाठीच्या गरजा. मग प्रेम-बिम, सामाजिक गरज. त्यावर बनतात मान्यता, प्रतिष्ठा, प्रसिद्धी. आणि शेवटी म्हणे आत्मभान येत. त्यामुळे म्हणे बहुतेक जण खालच्या विटा बनून राहतात. कारण त्यांना वरची पायरी गाठताच येत नाही कधी. आणि जसजसे माणसाला काही मिळत जाते तस तसे म्हणे त्याला आणखी हवे. अस अगदी शेवट होई पर्येन्त तो पायर्‍या चढायचा प्रयत्न करत राहतो. पण शेवटी अत्युच्च बिंदू सुद्धा एक त्रिकोण आहे, आतल्या आत. त्यात रुतत जाणे, आकसत जाणे हा आपल्या जीवनाचा ध्येयवाद असतो म्हणे. सुटका नाहीच. नुसती धडपड.

वास्तव जगात हा पिरमिड उलटा आहे, अस मला नेहमी वाटे. प्रत्येक माणसाची गरज खालचा माणूस. एका माणसावर पोसणारे दहा. त्यावर शंभर. त्यावर असेच अनंत. मग वरचा दारू पितो आणि खालचा त्यासाठी रक्त ओकतो. असे रक्त ओकत जगाणारे असंख्य. आणि तेच शंभर सगळ्यांवर इथून तिथून बसलेत. पण हा पिरेमिड उलटा आहे. कारण वरच्याच्या गरजा अनंत. खालच्याला गरजा काय हेच माहीत नाही. आज श्वास थांबला नाही हे त्याच मरण. मास्लोचा पिरेमिड. त्रिकोणी साच्याचा.

नंतर पुन्हा एकदा विचार करताना हा एक चौरस असावा अशी शंका आली. कारण गरजांच अभिसरण, खालची गरज न भागता वरची तेवढी भागून जाते. मग खालचा तृप्त आणि वरचा उपाशी. मग वरचा लांडगा बनतो आणि खालच्या आणि मधल्या आणि वरच्या सगळ्याच नरड्या फाडू लागतो. रक्ताच्या ओहोळात तोंड लपवतो आणि गरजा भागवतो. मास्लोचा पिरेमिड. त्रिकोणी साच्याचा. चौकोनी गरजांचा.

आज खिडकीबाहेरच जग पाहतो तेव्हा तस काही नसून ते एक मोठ्ठ वर्तुळ आहे हे जाणवत राहत. स्वत:त केंद्रित वर्तुळ. गरागर फिरणार. केंद्रातला उद्रेक आणि परीघाची लवचिकता मधल्या गरजा अनंत बाजूंना वाढवत सुटली आहे. आणि मी माझ्या भोवतीच फेर धरलाय. माणसावर, माणासाखाली, माणसाच्या बाजूला अनंत गरजा. आणि मध्यावर मी. कधी एक भागवतोय, कधी दुसरी. आणि त्रिज्येच्या बाहेर जाण्यासाठी गोल होतोय. आणि पुन्हा स्वत:त ओढला जातोय. मास्लोचा पिरेमिड. त्रिकोणी साच्याचा. चौकोनी गरजांचा. अनंत त्रिज्येचा. शून्य मितीचा.

मास्लोचा पिरेमिड. खिडकीबाहेरच्या जगाचा.
खिडकीएवढाच.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र मस्तच आहे, पण माझी एक लहानशी तक्रार अशी की तो शब्द 'arseholes' असा असायला हवा होता. पक्ष्यांपक्ष्यांत गाढव कुठून येणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ती त्या शब्दाची (पक्षी: 'ass' ही 'arse'ची) अमेरिकन आवृत्ती आहे.

या अमेरिकन आवृत्तीचा उपयुक्त भाग असा, की 'गेला गाढवाच्या ***' या सामान्य मराठी वाक्प्रचाराच्या इंग्रजी तर्जुम्याकरिता काहीशी रोचक शक्यता यातून निर्माण होते.


तळटीपा:

आता हा पक्षी कोठून आला, ते विचारू नये. 'आकाशातून!' असे उत्तर मिळेल. थोडक्यात, मला कल्पना नाही.

तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला एवढी शिंपल गोष्ट माहीत असू नये? (- पु.ल.!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खवचट ही नवीन श्रेणी बनवल्याबद्दल संमंचे आभार!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नेसेसिटी , कम्फर्ट आणि लक्झुरी यांच्या व्याख्या सापेक्ष आहेत राव . याचे कॉलम करुन संगणकात नोंदी करत असताना
माझ्या :-B बेटर हाफनी ( मी बेस्ट हाफ आहे हे वे.सां.न.ल. Smile ) केस कापणे हा आयटम " लक्झुरी " या शीर्षका
अंतर्गत नोंदवला होता ते पाहून मी इतकी दचकले नंतर हसून पुरेवाट झाली . हे त्याने गंभीरपणे केले होते :O .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपयुक्त संकल्पनांविषयी काव्यात्म भाषेत बोलण्याचा प्रयत्न चांगला आहे. मात्र असं करताना तथ्याला धक्का बसू शकतो. एकाच चित्राकडे विविध दृष्टिकोनांतून बघताना त्याचे वेगवेगळे प्रतीत होणारे आकार सांगण्याच्या प्रयत्नात हे तीनही आकार एकाच गोष्टीचे आहेत असा भास होतो. तो हे चित्र समृद्ध करण्यासाठी पोषक वाटला नाही.

मॉस्लोच्या पिरॅमिडचा आकार हा एका विशिष्ट कारणासाठी आहे. पायाभूत गरजा (श्वास, भूक, तहान इत्यादी) इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्या पूर्ण होण्यासाठी वरच्या सर्व गरजा सोडायला सर्वसाधारण माणूस तयार होतो. त्या पूर्ण झाल्या की मगच वरच्या गरजांचा विचार करता येतो. त्याने मांडलेला पिरॅमिड हा प्रत्येक माणसासाठी तोच असेल असं नाही. काही गोष्टी किंचित वरखाली होऊ शकतात. मात्र समाजाच्या गरजांचा विचार करताना या स्वरूपाची मांडणी उपयुक्त ठरते.

माणसांच्या गरजा आणि त्यांमधून मिळणारे आनंद यांकडे झीरो सम गेम असल्याप्रमाणे पहाण्याची जुन्या काळची प्रथा आहे. एकाचं वर्तुळ विस्तारलं की इतरांची आकुंचित होणार हे गृहितक तितकंसं बरोबर नाही. या त्रिकोणाच्या पायऱ्या जसजशा वर चढत जातो तसतशा गरजा या अमूर्त बनतात. खालच्या पायऱ्यांवरची वर्तुळं एखाद्या लोखंडी चकतीप्रमाणे कठीण, एकमेकांवर आक्रमण करणारी असतात. पण समृद्धीचा परिसर वाढला की ही आक्रमणं, टकरा नाहीशा होतात. पुढच्या वर्तुळांचा विस्तार हा मुलायम, आणि इतरांच्या वर्तुळांना सामावणारा असतो. एकमेकांच्या वर्तुळांत ती सुखदपणे सामावू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars