आम्ही अमेरिकावासी

आता एनआरआय लोकान्च्या मानसिकतेची चर्चा सुरुच झालीय तर आमचीही त्यात थोडी भर!

इतकी वर्षे अमेरिकेत रहायल्यानंतर आपण अमेरिकन झाल्याचं तिला वाटलं तर त्यात नवल कसलं! नाहीतरी भाजी खरेदी करण्यासाठी, रस्त्यावर भाजी विकत बसलेल्या लोकांना विसरुन, मोठ्या 'ग्रोसरी स्टोअर्स' मध्ये जायची तिला आत सवय झाली होती; फोडणीसाठी लागणार्या जिर्याला क्युमिन सीड्स म्हणायचं आता तिच्या जिभेवर बसलं होतं. एवढंच काय तर वाहतुकीसाठी कार सोडून दुसरे वहान असु शकते हे ही ती पूर्णपणे विसरली होती. वडील अतिशय कर्मठ असल्यानं, भारतात तिला कधी जीन्स ही घालायला मिळाली नव्हती; पण इथे 'उन्हाळ्यात तर मी जीन्स मी घालूच शकत नाही. किती उकडंत ना!' असं म्हणत कॉटनची हाफ पॅंट घालण्यापर्यंत तिची मजल गेली होती. जेवताना ताटात भाजी पोळी वरण भात या सगळ्या गोष्टी आता क्वचितच दिसू लागल्या होत्या. "आमच्या पिलाला अमेरिकन पदार्थच जास्त आवडतात, त्यामुळं आम्हीही तेच जास्त खातो" म्हणत ताटात पास्ता, सॅलेड सारखे पदार्थ पडत होते. दुकानात गेल्यानंतर भरमसाठ खरेदी करुन, त्या गोष्टी "आपल्याला आवडल्या नाहीत" या एकाच सबबीवर परत करणं हे सौभाग्य नसून तो आपला हक्कच आहे असं ती समजू लागली होती. अशा कितीतरी अमेरिकन लकबी तिनं आत्मसात केल्या होत्या. मग तिनं स्वत:ला अमेरिकन म्हणवून घेतलं म्हणून काय बिघडलं!

सुरुवातीला ज्या गोष्टीसाठी तिला भारताची आठवण यायची त्याच गोष्टीसाठी आजकाल तिला अमेरिका आवडत होती. दोन-तीन वर्षांनी होणारी भारताची फेरी, तिचं भारताबद्दलचं प्रेम वाढवण्याऐवजी कमीच करत होती. कसलं ते पोल्युशन! दंगा, गोंधळ, बेशिस्तपणा आणि त्या उंचच उंच इमारती! तिला तर अगदी गुदमरून जायचं. रस्ता रिकामा असला तरी रिक्षावाल्याचा एक हात सतत हॉर्नवर! का तर म्हणे मधेच कुणी टपकु नये! त्याचंही बरोबरच आहे म्हणा, नाहीतर भारतात रस्त्यावर फक्त माणसंच असतील असं नाही. गाई गुरांनाही रस्ता ओलांडायचा असतोच की! पुण्यात तर रस्त्यावर एकाही बाईचं तुम्हाला तोंड बघायला मिळणार नाही! नाही हो, मनाई वगैरे काही नाही. पण रस्त्यावर पोल्युशनच इतकं आहे की त्यांना सगळं तोंड एखाद्या दरोडेखोरासारखं रुमालानं गुंडाळावं लागतं! कुणी परदेशी आला, तर इथे सगळे अतिरेकी बिनबोभाट रस्त्यावर काय हिंडताहेत असं वाटेल त्याला! त्यामुळं अमेरिकेतलं शिस्तशीर आयुष्य चांगलच मानवलं होतं तिला. मरणाची धावपळ नाही, बिनकामाचे हॉर्नस नाहीत; आणि दररोज दुप्पट वाढत जाणारी महागाई नाही.

भारतातल्या महागाईबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे! पाच सहा रुपयाला मिळणार्या वडापावची किंमत पन्नास साठ रुपये झाली होती. लार्ज (म्हणजे अमेरिकेतला स्मॉल) साईजचा पिझ्झा पाचशे रुपयाला! तिच्या पिलाच्या नाश्त्यासाठी सिरीयल आणायला ती आधुनिक मार्केट मधे गेली, आणि त्याची किंमत बघुन तिला शॉकच बसला. एवढ्याशा सिरीयल ला २०० रुपये! सिरीयल, पिझ्झा या गोष्टी इथं अन्न, वस्त्र, निवार्यासारख्या गरजेच्या झाल्या होत्या. त्यांची ती लक्झरी किंमत बघून तिला धक्काच बसला. कपड्यांच्या खरेदीसारखी, बायकांची अत्यंत आवडती गोष्टही आजकाल डोकेदुखीची झाली होती. अमेरिकेतल्या गोर्या मेमलाही लाजवतील, अशा तोकड्या टी-शर्टच्या किंमती मात्र लांबलचक होत्या. तिच्या पिलासाठी एखादा चांगला शरारा घेण्यासाठी ती पुण्यात लक्ष्मी रोडवर गेली, तर तो माणूस दोन हजाराखाली काही दाखवायलाच तयार नाही! "अहो हजारापर्यंतचे नाहीत का?" असं आवंढा गिळून तिने दुकानदाराला विचारलं; आणि ज्या वहिनीबरोबर ती शॉपिंगला आली होती, तिच्याकडे वळून ती म्हणाली, "एव्हडे महागडे घेऊन काय करायचं? बघितलं तर दोन-तीनदा घालेल ती तिथे!" दुकानातून निघताना त्याच वहिनीनं तिच्या मुलीसाठी जेव्हा साडेचार हजाराचा घागरा उचलला, तेव्हा तिचं तोंड बघण्यासारखं झालं होतं! भारतात आपल्यापेक्षा जास्त कमवायला लागलेत की काय? तिच्या मनात आलं. पण सेल आणि क्लिअरन्सची सवय झालेल्या तिच्या अमेरिकन मनाला रिटेल किंमत द्यायची सवय कुठे राहिली होती?

एकदा तर गंमतच झाली. मराठी नाटकांच्या सीडीज आणायला ती एका दुकानात गेली. तिला हव्या त्या सीडीज मिळाल्याने खुश होउन, बिलाकडे न बघता तिनं त्या खरेदी करुन टाकल्या. आणि दुकानाच्या बाहेर पाऊल टाकताच तिच्या लक्षात आलं, की तिच्या बोसच्या डीव्हीडी प्लेअरवर या सीडीज चालणार ही नाहीत कदाचीत! ती पटकन दुकानात शिरली, आणि त्यांना तिनं तो प्रॉब्लम सांगितला.
"मला डीव्हीडीज दाखवा बघू" ती म्हणाली. त्यांनी तिच्यासमोर चार-पाच डीव्हीडीज टाकल्या.
"एव्हढ्याच!"
"बाई, हे सीडीजचं दुकान आहे, डीव्हीडीचं नाही" पुढचा माणूस उर्मट्पणे म्हणाला. तिला त्यातली एकही पसंद पडली नाही. नकारार्थी मान हलवुन, "मला ह्या सीडीज रिटर्न करायच्या आहेत" असं तिनं त्यांना सांगितले.
"आम्ही एकदा विकलेला माल परत घेत नाही" चेहर्यावरची रेषाही न हलवता त्यानं दुकानाबाहेर लावलेल्या पाटीकडे हात केला. पाटीवर दुकानाच्या भल्यामोठ्या नावाखाली बारीक अक्षरात ते वाक्य लिहलं होतं.
"अहो, मी आत्ता दोन सेकंदापूर्वीच घेतल्यात ह्या. याला मी हातही नाही लावला. आणि तुम्हाला त्या माघारी घ्यायला काय प्रोब्लेम आहे?" तिला ते कळेना.
"आमचा नियम आहे मॅडम" तो पून्हा निर्विकार चेहर्यानं म्हणाला.
"पण माझ्याकडे बोसचा डीव्हीडी आहे आणि त्याच्यावर या नाही चालणार. मला या अमेरिकेला घेऊन जायच्यात" अमेरिकेचं नाव ऐकुन तरी तो नरम येईल म्हणून तिनं मुद्दाम सांगितलं.
"तुम्ही अमेरिकेला घेऊन जा, नाहीतर फ़ॉरेनला घेऊन जा, सगळ्या डीव्हीडी प्लेअर वर या चालणार म्हणजे चालणार." अमेरिका फ़ॉरेनमधे नसून, जणू पलीकडच्या गल्लीतच असल्यासारखी तो म्हणाला.
"तुम्हाला काही माहीताय का बोसच्या डीव्हीडी प्लेअरबद्दल? तो भारतात मिळतही नाही. मला माहीताय या नाही चालणार त्या!" ती वैतागून म्हणाली. त्यानं खांदे उडवले. तिला संताप आला. दिवसाढवळ्या ग्राहकांना लुबाडायचं चाललयं! अमेरिकेत वॉलमार्ट मधे 'वापरलेल्या' गोष्टीही तिने किती ताठ मानेने रिटर्न केल्या होत्या!
"हा तर सरळसरळ अन्याय आहे! तुमच्या मॅनेजरला बोलवा बघु." तिनं मागणी केली. दुकानात काम करणारी दोन मुलं यावर खुऽऽ करुन हसली. त्या माणसालाही काय बोलावं ते कळेना. त्याच्या आख्ख्या कारकिर्दीत हा प्रश्न बहुतेक त्याला पहिल्यांदा विचारला गेला असावा.
"मीच मॅनेजर आहे" तो म्हणाला.
"मग मला मालकांना भेटायचंय." या गोष्टीचा आज निकाल लावायचाच असं तिनं ठरवलेलं.
"तो ही मीच." तो निर्ल्लजपणे म्हणाला. परत ती दोन मुलं हसली.
घरी येऊन तणतणत तिनं ही गोष्ट घरच्यांना सांगितली. पण त्यांनी तिलाच वेड्यात काढलं. "विकलेल्या गोष्टी परत घ्यायला लागल्यावर त्याचं दिवाळंच निघायचं!" तिच्या भावानं दुकानदाराची बाजु घेऊन तिची टर उडवली. "पण आमच्या अमेरिकेत तर.." हे तिचं वाक्य अर्ध्यावरच सोडत, आश्चर्यानं त्या लोकांकडे ती पहात राहीली. जर यांनाच काही वाटत नाही , तर दुकानदार कशाला त्याचे नियम बदलेल? अमेरिकेत या गोष्टी किती सहज, सोप्या वाटतात!

त्यामुळं प्रत्येक वेळी भारताची फेरी झाल्यानंतर आपण पक्के अमेरिकन होत चालल्याची तिची जास्तीत जास्त खात्री पटत चालली होती. तिच्या नवर्याच्या मते ती जरा जास्तच अमेरिकन बनत चालली होती. जिथे गरज नव्हती तिथेही ती अमेरिकन पद्धतीनं विचार करत होती. त्याचं उदहरणच द्यायचं झालं तर; एक दिवस तिची चार वर्षांची मुलगी, जिला लाडाने ते 'पिलु' म्हणत, मॉंटेसरीतुन येताना एक स्पॅनेश बार्बी घेऊन आली.
"कुणी दिली ही बाहुली तुला?" तिनं पिलाला विचारलं.
"गॅब्रियलनं." ती लाजत म्हणाली.
"and he said, I am his girlfriend." हाताला झाका देत लाजत डोळ्यांच्या कोपर्यातून इकडेतिकडे बघत तिनं सांगितलं. ही दोघेही नवराबायको हसायला लागली. इकडे पिलू सोफ्यावर "I am a girlfriend. I am a girlfriend." म्हणून नाचत होतं.
"नक्की गर्लफ़्रेंड म्हणजे काय गं?" पोरीच्या मनात नक्की काय आहे हे काढण्यासाठी तिनं विचारलं.
"म्हणजे...you know he is my boyfriend and I am his girlfriend." चार वर्षांच्या मुलीच्या बुद्धीनं तिनं उत्तर दिलं.
"ठीक आहे. उद्या शाळेत गेल्यावर मी रिटर्न करुन टाकेन.' हसत ती नवर्याला म्हणाली.
"No. I don't want to return it. He gave it to me. It's my present." पिलानं इवलासा चेहरा केला.
"ठिक आहे ठेऊयात मग." तिचा नवरा म्हणाला.
"असं कसं ठेऊयात?" अचानक गंभीर होत तिनं विचारलं. "आपण ठेऊन घेतल्यानंतर, त्या गोष्टीला मान्यता दिल्यासारखं होईल. पून्हा कधीतरी ते पार्टीसाठी, गॅब्रियलच्या गर्लफ्रेंडला घेऊन जायला आले, तर तु काय करशील?"
"इतक्या लहान वयात तसं काही असेल इथे?" शंकीत नजरेनं नवर्यानं विचारलं.
"आपल्याला काय माहीत? असेलही कदाचित."
"नक्की काय झालं पिला सांगशील?" तिनं परत पिलाला विचारलं.
“he said I like you and you are my girlfriend” नाचत ती म्हणाली.
"सगळ्यांसमोर?"
"No. Nobody was there. They were inside the classroom"
"उद्या शाळेत गेल्यावर तिच्या टिचरला विचारतेच." तिचं डोकंच फिरलं. पोरीला सरळ सरळ एकट्या मुलाबरोबर बाहेर सोडतायत म्हणजे! लहान असली म्हणून काय झालं!

दुसर्या दिवशी शाळेत गेल्यानंतर तिला कळलं की ते प्रपोजल वगैरे काही नव्हते. खेळण्यांच्या दुकानात गॅब्रियलनं वडिलांकडून हट्ट करून ती बाहुली पिलासाठी खरेदी केली होती. शाळेत गॅब्रियलला पिलु बरीच मदत करत असतं म्हणे! त्याच्या वडिलांनीही कौतुकाने ती घेऊन दिली. आणि इतर मुलांसमोर देऊन रडारडी नको म्हणून शिक्षिकेने त्यांना कॉरिडॉर मधे पाठवलं होतं. तिथे काय झाले ते कुणालाच माहीत नव्हतं. "तु उगाच बाऊ करतेस." म्हणत नवर्याने तो जोक सगळ्यांना सांगितला होता. पण त्याला काय माहित, आपलं पिलु कधी ना कधी डेटिंग करायला लागणार आहे, या विचाराने त्या रात्री तिला झोप लागली नव्हती.

तशी ती स्वत:ला अमेरिकन मानत असल्याने, डेटिंगला तिचा उघड उघड विरोध नव्हता. "ड्रगच्या आहारी जाण्यापेक्षा एखाद्या मुलाबरोबर पिक्चरला गेली तर काय वाईट आहे" असं ती मैत्रिणींसमोर अगदी अमेरिकनांसारखं बोलायचीही. नाहीतरी खरे अमेरिकन्स आपला मुलगा सोळा वर्षांचा झाला तरी त्याला गर्लफ्रेंड नाही हे आनंदाने न घेता, काही प्रोब्लेम तर नाही पोरात, असाच विचार करतात. पण तिच्या मनात मात्र, "आईवडिलांच्या डोळ्यापुढे कुणा मुलाचा हात धरुन जायची हिंम्मतच कशी होते या सोळा-सतरा वर्षांच्या कार्ट्यांची?" असंच काहीतरी चाललेलं असायचं.

एकदा तिच्या गोर्या सहकार्याने त्याच्या सहा वर्षाच्या गर्लफ़्रेंड बरोबर ब्रेकप झाल्यावर, दोन महिन्यात दुसर्या मुलीबरोबर डेटिंग सुरु केलं हे ऐकून "सहा वर्षाचा संबंध तुटल्यावर, सहा महिनेही डेटिंग सुरु करायला तुला वाट बघता नाही आली?" (मनात - लाज वाटत नाही?) असं सगळ्यांसमोर खडसावून विचारून, तिनं त्याला कावराबावरा करून टाकला होता. आणि त्याच सहकार्याला, त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडची ओळख करून देताना, भेटल्यानंतर तिच्या ओठांचं चुंबन घेऊन 'हाय हनी' आणि निघताना परत तिच्या ओठांचं चुंबन घेऊन 'बाय हनी. आय लव्ह यु' म्हणताना तिने पाहीले होते. एवढं सगळ्या लोकांच्यात चुंबन घेऊन दर्शवलेलं प्रेम, दोन महिन्यात आटलं कसं तिला प्रश्न पडला. पण मग ती अपेक्षेनं तिच्या दुसर्या सहकार्याकडे बघायची. त्याची बायको त्याची हायस्कूल स्वीटहार्ट होती, आणि दहा वर्षाच्या लग्नानंतर आणि दोन मुलांनंतरही त्याचं लग्न टिकून होतं. ते दर वर्षी आठवडाभर कुठेतरी फिरायला जायचे. लग्नाची अनिव्हर्सरी, बायकोचा बर्थडे साजरा करायला तो नेहमी रजा टाकायचा. ऑफिसमधे नेहमी त्याच्या तोंडात त्याच्या बायकोचं आणि मुलांचं नाव असायचं. कधी कधी त्यांच्याबाबतीत तो जास्तच माहीती पुरवतो असं तिला वाटायचं. पण एकंदरीत हे अगदी आदर्श अमेरिकन जोडपं! असं तिला वाटायचं. पण त्यानेही एकदा तिचा भ्रमनिरास केला. त्याचं काय झालं, एकदा रेस्टॉरंट्मधे ते दुपारी जेवायला गेले होते. तिचा आदर्श सहकारी, ' त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आलाय, तेव्हा बायकोला काहीतरी घेतलं पाहिजे' असं बोलत होता.
“अरे शेजारीच व्हिक्टोरिया सिक्रेटचं दुकान आहे, तिथे जाऊन काहीतरी बघ.” आणखी एका सहकार्याने हसत सुचवलं.
“हो, पण माझ्या बायकोला ते बसायला पाहिजे ना?” तिच्या आदर्श सहकार्याने जोक केला. नंतर तिच्याकडे पाहुन म्हणतो कसा,
“नाहीतर आपण बीनाला ट्राय करायला लावू या”
what the heck!
तिचा चेहरा पाहून कुणी हसायचं धाडस केलं नाही.
“yaa sure! if she is as petite as me!” असं ताडकन बोलून ती तिथून उठली.
घरी येऊन तिनं नवर्याला हा किस्सा सांगितला, तर हसुन म्हणतो कसा, "सहज चेष्टेत बोलला असेल, एवढं मनाला लावून नाही घ्यायचं." अरे मनाला लावुन कसं नाही घ्यायचं? मी बाई आहे म्हणून काहीही बोलायचं म्हणजे?

मग तिच्या नवर्यानं तिला त्याच्या लेडी मॅनेजरच्या किस्स्याची आठवण करून दिली. तिनं म्हणे भर मिटींगमधे "माझ्या पार्श्वभागावर एक टॅट्यू आहे" असं जाहीर केलं होतं. शी! असलं कसं बोलू शकतात ते पब्लिकमधे! आणि तिला अजून मीटिंगमधे फटाक्यासारख्या उडणार्या 'फ..' शब्दाचीही नीट सवय झाली नव्हती! भारतात कुणी असं काही बोललं तर काय कहर उडेल असं तिला वाटलं.

दुसर्या दिवशीही ऑफ़िसला जाताना ती मनातनं धुसफ़ुसत होती. त्याचवेळी रेडिओवर एक सनसनाट बातमी लागली होती. कुणा जज्जने, त्याच्या ड्रायक्लिनरला म्हणे ६५ मिलियन डॉलर्सला 'सु' केले होते(आता हा 'सु' म्हणजे लहान बाळाची 'सु' नसून 'खटला' या अर्थाने घ्यायचा बरं!). कारण काय म्हणे, तर कोटाबरोबर तो त्याची पँट द्यायला विसरला होता. आता बिना पँटीचा तो जज्ज कोट घालणार कसा! कुठेतरी गहाळ झालेली पँट एकदाची शोधून आणून त्याने जज्जसाहेबांना दिली. पण जज्जसाहेबांच्या मते ती त्याची पँटच नव्हती. मग केलं 'सु' त्याला. अकराशे-बाराशे डॉलरच्या पँटसाठी, पासष्ट मिलियन डॉलरचा फ़ाईन! अहो, मग त्याने दुकानाबाहेर 'सॅटिसफॅक्शन गॅरंटिड' चा बोर्ड लावायचा कशाला? सॅटिसफॅक्शन नाही ते नाही आणि वर मनस्ताप किती झाला त्या जज्जला! त्याच्याकडे त्या सुटाशिवाय आणखी पन्नास-साठ सुट होते; पण त्याला तोच सुट घालायचा होता हे त्या उद्दाम ड्रायक्लिनरला कळलं कसं नव्हतं? सगळेच न्युज चॅनल त्या बातमीवर तुटून पडले होते. “Is it a joke?” ती गाडी चालवताना विचार करत होती. अमेरिकेत बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मग करण्याचं स्वातंत्र्य का असु नये? नाहीतरी कुणीही दहा-पंधरा वर्षांचा मुलगा बंदुक खरेदी करुन, शाळेतल्या निरपराध मुलांना मारतोच आहे ना? पण अमेरिकन लोक पूर्वांपार बंदुक वापरत आली आहेत. त्यांची ही महान संस्कृती ते बदलणार कशी? आजकालची मुलंच अशी बेबंद होत चाललीत त्याला ते तरी काय करणार?

त्या दिवशी ऑफिसमधे गेल्यागेल्या ती त्या सहकार्याकडे गेली. आणि त्याला रेडिओवरचा किस्सा सांगून, काल तो जे काही बोलला त्याच्यासाठी 'I can sue you. right?' अशी शांत आवाजात विचारणा केली. त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. एखादी बाजी मारल्यासारखी ती त्याच्या क्युबिकल मधून बाहेर पडली. खरी अमेरिकन झाल्याचा आनंद तिच्या चेहर्यावर पसरला होता!

आणि एकदाची ती वेळ आली होती.

अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला जेव्हा ती 'ओथ सेरिमनी' ला चालली होती, तेव्हा तिचा आनंद ओसंडून वहात होता. आता थोड्याच वेळात ती कायद्याने अमेरिकन होणार होती. तिथे आलेल्या शेकडो लोकांच्या चेहर्यावर आशेचे भाव बघून तिलाही समाधान वाटत होते. तिने शपथ घेतली, ' I hearby declare, on oath, that I absolutely and entirely renounce and adjure...' त्या वाक्यांचा अर्थ जाणवून तिच्या पोटात गोळा आला. अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला, भारताचं नागरिकत्व सोडायची काय गरज आहे? नंतर अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरू झालं होतं. तिचे ओठ हलत होते, पण त्यात 'जन गन मन..' म्हणतानाची भावना नव्हती. दोन्ही डोळ्यातून धारा लागल्या होत्या. शाळेत 'भारत माझा देश आहे' म्हणताना तिला कुठे माहित होतं की एकदिवस ती त्या देशाला सोडणार आहे! कुणी जन्म दिलेल्या आईला सोडू शकतं? आणि 'वन्दे मातरम' चे नारे देऊन लाखो लोकांच्या प्राणाहुतीने स्वतंत्र झालेल्या तिच्या देशाला तिने असेच सोडून दिले होते!
समारंभानंतर बाकीचे लोक आनंदाने बेहोश होउन एकमेकांचे फोटो काढत होते. तिचं शरीर हुंदक्यांनी गदगदत होते आणि अश्रूंनी चिंब झालेला आपला चेहरा, तिनं नवर्याच्या कुशीत लपवला होता.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (5 votes)

प्रतिक्रिया

पहील्यांदा वाचून भावनाविवश झाले अन काय गमावलय याचा एक मोठ्ठा उतारा लिहीला. लिहीता लिहीता नाण्याची दुसरी बाजूही खुणावू लागली. नाण्याला दोन्ही बाजू आहेत हेच खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या सोनुलीची अजिबात इच्छा नसतांना सुद्धा तिला आडवं पाडून, नाक दाबून तिचं तोंड उघडून, तिच्या घशात स्वतःचं नागरिकत्व ओतते म्हणजे काय?
|(\(
-पिवळा डांबिस
येनारनाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो ते काय ते "एफवण, जेवण, हेचवण, हेचवण ... " प्रकारांपेक्षा एकदाच काय ते विषाचे घोट घेतले असतील त्यांनी! Wink

एकदा तिच्या गोर्या सहकार्याने त्याच्या सहा वर्षाच्या गर्लफ़्रेंड बरोबर ब्रेकप झाल्यावर, ...

तसा माझ्या भावाच्या बायकोचाही सहाएक वर्षांचा बॉयफ्रेंड आहे. मी त्याला सोडलं तेव्हा त्याने हिच्याशी संबंध वाढवले. जळ्ळी मेली पुरुषांची जात!

“नाहीतर आपण बीनाला ट्राय करायला लावू या”

या नॉन-जोकवर चिडण्याचं कारण समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<<तसा माझ्या भावाच्या बायकोचाही सहाएक वर्षांचा बॉयफ्रेंड आहे. मी त्याला सोडलं तेव्हा त्याने हिच्याशी संबंध वाढवले. जळ्ळी मेली पुरुषांची जात!>>

अगदी पटलं! Wink

<<या नॉन-जोकवर चिडण्याचं कारण समजलं नाही.>>

चिडणार नाहीतर काय? ते बीनाला व्हिक्टोरिया सिक्रेट मधले कपडे ट्राय करायला लावत होते! ती एका प्रकारे लैंगिक हॅरॅसमेंटच नव्हती काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती एका प्रकारे लैंगिक हॅरॅसमेंटच नव्हती काय?

तो विनोदबुद्धीचा अभाव वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असू शकतं! पण असल्या पांचट विनोदाला नेहमी स्त्रियांनाच टारगेट करणारे पाहण्यात आले नाही वाटतं? आणि तशा बीनाच्या प्रतिक्रियाही जरा "ओवर द टॉप" च आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<<आमच्या सोनुलीची अजिबात इच्छा नसतांना..>>

अजाबात खोटं! इथे सरळ लिहिलेय ते वाचा << अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला जेव्हा ती 'ओथ सेरिमनी' ला चालली होती, तेव्हा तिचा आनंद ओसंडून वहात होता.>>

<< सुद्धा तिला आडवं पाडून, नाक दाबून तिचं तोंड उघडून, तिच्या घशात स्वतःचं नागरिकत्व ओतते म्हणजे काय>>

हे बाकी खरंय. प्रयत्न करूनही लोकांना ज्या अमरिकेत यायला व्हिसा मिळत नाही, ती सोनुलीच्या एवढी मागे लागतेय असं तुम्ही म्हणत असाल तर ते अगदी १०० टक्के सत्य आहे Fool !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>हे बाकी खरंय. प्रयत्न करूनही लोकांना ज्या अमरिकेत यायला व्हिसा मिळत नाही,
जर लायकी असेल आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रं जवळ असतील तर केवळ ५ मिनिटांत अमेरिकेचा व्हिसा अप्रूव्ह होतो अशी माहिती आहे....

>>ती सोनुलीच्या एवढी मागे लागतेय असं तुम्ही म्हणत असाल तर ते अगदी १०० टक्के सत्य आहे
आपल्या ज्ञानाबद्दल अतीव आदर व्यक्त करतो....
असो, पहिला डाव देवाचा!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा परिच्छेद पुर्ता अँटीक्लायमॅक्स आहे. बात कुच जमी न्हाय!

(गॉथमात राहून देव, देश अन धर्म-प्रंप्रा जपणारे) बॅटंभट गॉथमकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गेल्या आठवड्याचीच टर्की गरम केली
कालच्या भाताला फोडणी घातली
परवाच्या पावाचेच सँडविच केले
कालची लाल भोपळ्याची भाजी कणीक मळताना तीत घालून पराठे करुन टाकले
झाला बाई सैपाक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

खर तर हे उलटं झालं. खरं असं हाय...

महिन्यापूर्वी स्वयंपाक केला
फ्रीझर मध्ये ठेऊन दिला
ऐसिवरच्या मेजवानीला
त्यातलाच एक पदार्थ काढला.
नंतर खूपच दया आली (अर्थात ऐसीकरांची Blum 3 )
म्हणून सगळा स्वयंपाकच डीफ़्रॉष्ट करून टाकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्'!

आता सगळे जगच जर व्यासांनी (त्यांच्या काळात!) उष्टे करून ठेवले असेल, तर मग (त्या जगाचा भाग असलेला) हा (किंवा अन्य कोणताही) स्वयंपाक ('सैपाक') किती शिळा असेल, ते पहा विचार करून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा परिच्छेद सोडुन लेख खुसखुशीत वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उर्वरित लेखाकडे तूर्तास दुर्लक्ष करू, (तसाही त्याचा समाचार इतरांनी अतिशय सक्षमपणे घेतलेलाच आहे,) पण...

अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला जेव्हा ती 'ओथ सेरिमनी' ला चालली होती, तेव्हा तिचा आनंद ओसंडून वहात होता. आता थोड्याच वेळात ती कायद्याने अमेरिकन होणार होती. तिथे आलेल्या शेकडो लोकांच्या चेहर्यावर आशेचे भाव बघून तिलाही समाधान वाटत होते. तिने शपथ घेतली, ' I hearby declare, on oath, that I absolutely and entirely renounce and adjure...' त्या वाक्यांचा अर्थ जाणवून तिच्या पोटात गोळा आला. अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला, भारताचं नागरिकत्व सोडायची काय गरज आहे?

अमेरिकन नागरिकत्वग्रहणाच्या शपथविधीचे (परंपरेने चालत आलेले) शब्द काहीही असोत, परंतु अमेरिकेचे नागरिकत्व घेताना भारताचे नागरिकत्व (किंवा एकंदरीतच आपले जे काही मूळचे नागरिकत्व असेल ते) कायम ठेवण्याकरिता अमेरिकन कायदा आड येत नाही.

भारतीय कायदा मात्र असे करण्याच्या आड येतो. एखाद्या भारतीय नागरिकाने अन्य एखाद्या राष्ट्राचे नागरिकत्व घेतल्यावर (१) भारतीय दूतावासास तसे रीतसर कळवून व अर्ज करून भारतीय नागरिकत्वाचा त्वरित त्याग न करणे, आणि (२) चालू भारतीय पासपोर्ट भारतीय दूतावासाकरवी त्वरित रद्द न करवून घेणे आणि/किंवा तो प्रवासासाठी वापरणे, हा भारतीय कायद्यान्वये दंडनीय गुन्हा आहे, आणि त्याकरिता दंड आणि/किंवा तुरुंगवास या दोन्हींची तरतूद भारतीय कायद्यात आहे. त्यामुळे, अमेरिकन (किंवा अन्य कोठचेही) नागरिकत्व घेताना भारतीय नागरिकत्व सोडायची जी गरज पडते, त्याला नागरिकत्वासंबंधीचा भारतीय कायदा जबाबदार आहे. उलटपक्षी, अमेरिकन नागरिकत्व घेण्यापूर्वी तुमच्याकडे समजा पंचवीस भिन्न राष्ट्रांचे नागरिकत्व जरी असले, आणि अमेरिकन नागरिकत्व स्वीकारल्यानंतर त्या पंचवीसपैकी एकाचाही जरी तुम्ही त्याग केला नाहीत, एवढेच नव्हे, तर त्या इतर सर्व देशांत त्यात्या देशाच्या नागरिकत्वाचे हक्क जरी बजावलेत, तरी (बहुतांश परिस्थितींत) त्याने अमेरिकन कायद्याचे उल्लंघन होत नाही, किंवा तुमचे अमेरिकन नागरिकत्व त्या कारणास्तव तुमच्या इच्छेविरुद्ध हिरावून घेतले जाऊ शकत नाही.

सबब, प्रस्तुत कुरबूर (मराठीत: क्रिब) ही चुकीच्या झाडाखाली उभे राहून वर पाहून भुंकणे (मराठीत: बार्किंग अप द राँग ट्री) आहे, एवढेच अतिशय नम्रपणे सुचवू इच्छितो.

=============================================================
तळटीपा:

समजा तुम्ही अमेरिकेचे/च्या नागरिक आहात आणि त्याचबरोबर अन्यही एखाद्या देशाचे/च्या नागरिक आहात. अशा परिस्थितीत,

(१) तुम्ही अमेरिकन नागरिक असताना इतरही देशांचे नागरिकत्व तुमच्याकडे असेल, आणि असे नागरिकत्व तुम्ही स्वेच्छेने स्वीकारले नसेल/जन्माधिष्ठित असेल/त्या अन्य देशांच्या कायद्यान्वये तुम्ही काहीही न करता तुम्हाला आपोआप प्राप्त झाले असेल, तर त्या कारणाकरिता तुमचे अमेरिकन नागरिकत्व हिरावून घेतले जाऊ शकत नाही.

(२) अमेरिकन पासपोर्टाबरोबरच अमेरिकेव्यतिरिक्त एखाद्या देशाचा पासपोर्टसुद्धा बाळगणे हा गुन्हा अथवा उल्लंघन होत नाही, आणि निव्वळ त्या कारणाकरिता आणि तुमच्या इच्छेविरुद्ध तुमचे अमेरिकन नागरिकत्व हिरावून घेतले जाऊ शकत नाही. (अपवादः तुम्ही कितीही देशांचे वैध पासपोर्ट जवळ बाळगा. तुम्ही जर अमेरिकन नागरिक असाल, तर अमेरिकेत प्रवेश करण्याकरिता वा अमेरिकेतून बाहेर पडण्याकरिता, अमेरिकन प्रवेश/निकासपत्तनावर (मराठीत: पोर्ट ऑफ एंट्री/एक्झिट) अमेरिकन पासपोर्टाव्यतिरिक्त अन्य पासपोर्ट वापरणे हे कायद्याचे उल्लंघन होते. इतर देशांत प्रवेश करताना वा इतर देशांतून बाहेर पडताना मात्र तेथील प्रवेश/निकासपत्तनांवर कोणत्या देशाचा पासपोर्ट वापरावा, याबाबात अमेरिकन नागरिक म्हणून तुमच्यावर अमेरिकन कायद्याचे कोणतेही बंधन येत नाही.)

(३) तुमच्या अमेरिकेव्यतिरिक्त अन्य नागरिकत्वाच्या देशांत मतदान केल्याने तुमचे अमेरिकन नागरिकत्व तुमच्या इच्छेविरुद्ध हिरावून घेतले जाऊ शकत नाही.

(४) तुमच्या अमेरिकेव्यतिरिक्त अन्य नागरिकत्वाच्या देशांतील सरकारांत महत्त्वाचे आणि धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार्‍या पदांव्यतिरिक्त अन्य एखादे क्षुल्लक पद भूषवल्याने तुमचे अमेरिकन नागरिकत्व तुमच्या इच्छेविरुद्ध सहसा हिरावून घेतले जाऊ शकत नाही.

(५) जोपर्यंत तुमचा/चे अमेरिकेव्यतिरिक्त अन्य नागरिकत्वाचा/चे देश आणि अमेरिका यांच्यात युद्ध अथवा युद्धसदृश परिस्थिती नाही, तोपर्यंत त्या अन्य देशांच्या लष्करी सेवेत भरती असण्याच्या (वा होण्याच्या) कारणाकरिता तुमचे अमेरिकन नागरिकत्व तुमच्या इच्छेविरुद्ध हिरावून घेतले जाऊ शकत नाही.

(६) फार कशाला, अमेरिकन नागरिक असताना अथवा अमेरिकन नागरिकत्व मिळाल्यानंतर तुम्ही स्वेच्छेने अन्य देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज करून असे नागरिकत्व जरी स्वीकारलेत, तरी त्या कारणाकरिता आणि तुमच्या इच्छेविरुद्ध तुमचे अमेरिकन नागरिकत्व हिरावून घेतले जाऊ शकत नाही.

वरील मधील (१) या सदराखाली मोडणार्‍या परिस्थितींत, तुमचे अमेरिकनेतर नागरिकत्व तुम्ही जाणूनबुजून मिळवले नसल्याकारणाने तुमचे अमेरिकन नागरिकत्व धोक्यात येत नाही. (२) ते (५) या सदरांखाली मोडणार्‍या परिस्थितींत तुमचे अमेरिकनेतर नागरिकत्वाचे अधिकार तुम्ही जरी जाणूनबुजून बजावले असले, अथवा (६) या सदराखाली मोडणार्‍या परिस्थितींत तुमचे अमेरिकनेतर नागरिकत्व जरी तुम्ही जाणूनबुजून स्वीकारले असले, तरी तसे करण्यामागे तुमचा अमेरिकन नागरिकत्वाचा स्वखुशीने जाणूनबुजून त्याग करण्याचा हेतू जोपर्यंत नाही, तोपर्यंत तुमचे अमेरिकन नागरिकत्व हिरावून घेतले जाऊ शकत नाही. (यात, 'तुमचा हेतू तसा नव्हता' हे सिद्ध करणे ही तुमची जबाबदारी नसून, 'तुमचा हेतू तसा होता' हे सिद्ध करणे ही सरकारची जबबदारी आहे; किंबहुना, अशा परिस्थितीत 'तुमचा हेतू तसा नव्हता' असेच सरकारकरवी प्राथमिकतः गृहीत धरले जाते.)

थोडक्यात, एखादी राष्ट्रद्रोहात्मक कृती, अमेरिकेविरुद्ध युद्धात भाग घेणे आणि अन्य देशांच्या सरकारांत महत्त्वाचे आणि धोरणात्मक निर्णय घेऊ शकणारे एखादे पद भूषवणे यांसारखे काही तुरळक (आणि गंभीर) अपवाद वगळल्यास, तुमचे अमेरिकन नागरिकत्व हे बहुतांश परिस्थितींत तुम्ही स्वतः होऊन, स्वेच्छेने आणि जाणीवपूर्वकरीत्या रीतसर अर्ज करून त्याग केल्याखेरीज (आणि असा अर्ज हा अमेरिकेबाहेरील एखाद्या अमेरिकन वकिलातीने स्वीकारल्याखेरीज) रद्द होऊ शकत नाही. (अधिक माहितीकरिता हा दुवा आणि विशेषतः त्यातील Administrative Standard of Evidence हा परिच्छेद वाचावा.)

अमेरिकन नागरिकाने अमेरिकेत प्रवेश करताना अथवा अमेरिकेबाहेर पडताना, अमेरिकन प्रवेश/निकासपत्तनावर बिगर-अमेरिकन पासपोर्टचा वापर करणे हा दंडनीय अपराध असावा, परंतु अमेरिकन नागरिकत्व रद्द होण्याकरिता बहुधा पुरेसा नसावा.

भारतीय नागरिकत्वाचे तसे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली माहिती. धन्यवाद. पण 'फ़ॅक्ट रिमेन्स' अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला तिला भारताचं नागरिकत्व सोडावं लागलं आणि त्याचं तिला वाईट वाटणं साहजिक होतं. सगळेच एन आर आय लोक या अनुभवातून जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप चांगली माहिती. एक शंका. परदेशात (माझ्या हा नियम सर्व देशांना एकच असावा) किती दिवस राहिल्यास nri स्टॅटस मिळते. अगोदर मी सहा महिने असं वाचलं होतं. आणि वरील प्रकारे नागरिकत्व मिळाल्यावर भारतीय nri राहणार नाही, तो 'भारतीय मूळ्/मूल असलेला' विदेशी म्हटला जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही वाचलेली माहिती बरोबर आहे. सहा महिने दुसर्या देशात राहिल्यानंतर nri स्टॅटस मिळते. आणि दुसर्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर ते 'पी आय ओ" असे होते. आणखी माहीती इथे मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<आणि दुसर्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर ते 'पी आय ओ" असे होते.>

हेहि तितकेसे बरोबर नाही.

दुसर्‍या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यावर भारतात परत येण्यावर - छोटया वा लांब मुक्कामासाठी - तसेच भारतात उत्पन्न मिळवणारे काही कार्य करण्याबाबत अशी अनेक बंधने निर्माण होतात, जी सर्व परकीय देशांच्या नागरिकांना लागू असतात. एकेकाळचा भारतीय नागरिक आता परकीय नागरिक झालेला असतो.

भारतीय मूळ असणार्‍यांसाठी अशी पुष्कळशी बंधने कमी करण्याचा मार्ग म्हणजे PIO (Person of Indian Origin) हा दर्जा मिळविणे. भारतीय गृहमन्त्रालयाच्या अखत्यारीतील हा प्रश्न असून तो मिळविण्यासाठी खास अर्ज करावा लागतो आणि त्याच्या निकालाला ३-४ महिने लागू शकतात. तो आपोआप 'होत' नाही.

ह्यालाच काही लोक स्वैर पद्धतीने Dual Citizenship असे म्हणतात पण ते खरे नाही. PIO ला Citizenship मिळत नाही, केवळ भारतात येण्याजाण्याबद्दल इ. काही निर्बंध कमी होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> दुसर्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर ते 'पी आय ओ" असे होते.
ही माहिती अर्धवट आहे.
"पी आय ओ" म्हणजे Person of Indian Origin - यात २० वर्षांचा व्हिसा मिळतो.
"ओ सी आय" म्हणजे Overseas Citizenship of India - यात आयुष्यभर वापरायचा व्हिसा मिळतो.
दोन्हीसाठी रीतसर अर्ज करावा लागतो.
"ओ सी आय" असेल तर नागरिकत्वाचे "बहुतेक" सर्व अधिकार मिळतात, फक्त निवडणूकीला उभे रहाता येत नाही आणि शेतकी जमीन खरेदी करता येत नाही. (पण तांत्रिकद्रुष्ट्या "ओ सी आय" म्हणजे दुहेरी नागरिकत्व नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ओ सी आय" असेल तर नागरिकत्वाचे "बहुतेक" सर्व अधिकार मिळतात, फक्त निवडणूकीला उभे रहाता येत नाही आणि शेतकी जमीन खरेदी करता येत नाही. (पण तांत्रिकद्रुष्ट्या "ओ सी आय" म्हणजे दुहेरी नागरिकत्व नाही.)

ओसीआय म्हणजे केवळ तांत्रिकदृष्ट्याच नव्हे, तर कोणत्याही प्रकारे दुहेरी नागरिकत्व नव्हे, हे खुद्द भारत सरकारने अनेक ठिकाणी अनेक निवेदने करून पुरेसे स्पष्ट केलेले आहे.

वर आपण उल्लेख केलेल्या मर्यादांव्यतिरिक्त, ओसीआयधारकास भारतीय पासपोर्ट मिळवण्याचा वा बाळगण्याचा अधिकार नाही, भारतीय निवडणुकांत मतदानाचा अधिकार नाही आणि (अपवादात्मक परिस्थितीत विशेष परवानगीशिवाय) भारतीय सरकारी नोकरी करण्याचा अधिकार नाही. शिवाय, भारतातील काही सुरक्षित/प्रवेशनियंत्रित स्थळी प्रवास/पर्यटन करण्यासाठी भारतीय नागरिकांना जेथे परवाना लागत नाही (किंवा लागलाच, तर 'इनर लाइन परमिट'सारखा मिळविण्यास तुलनेने अधिक सोपा परवाना घेऊन भागते), तेथे ओसीआयधारकांना (इतर परकीय नागरिकांप्रमाणेच) प्रोटेक्टेड एरिया परमिट / रिस्ट्रिक्टेड एरिया परमिट मिळवावे लागते. (शिवाय, भारतेतर सरकारांच्या दृष्टिकोनातून पहायचे झाले, तर भारताबाहेर नेपाळ किंवा भूतानसारख्या देशांमध्ये भारतीय नागरिकांस जेथे व्हिसामुक्त प्रवेश आहे आणि - विशेषतः भूतानच्या बाबतीत - मुक्तसंचारावर अथवा किमान खर्चाबाबत कोणतेही निर्बंध नाहीत, तेथे ओसीआयधारकांस भारतीयेतर नागरिकांस लागू पडणारे सर्व निर्बंध लागू होतात. ओसीआय कार्ड हे भारतीय नागरिकत्वाचे द्योतक नव्हे, आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे कागदपत्र तर नव्हेच नव्हे.)

याव्यतिरिक्त, जन्माने भारतीय असलेल्या नागरिकांना सामान्यतः भारतीय घटनेशी निष्ठेची शपथ घ्यावी लागत नसली, तरी भारतीय पासपोर्ट आवेदनाच्या प्रसंगी तशी शपथ घेणे बंधनकारक असते. नागरिकीकरणाने भारतीय नागरिक होऊ पाहणार्‍यांसही तशी शपथ घेणे बंधनकारक असते. ओसीआयधारकांस (इतर परकीय व्हिसाआवेदकांप्रमाणेच) असे कोणतेही बंधन नाही.

थोडक्यात सांगायचे तर, (नावात भलेही 'सिटिझनशिप' हा शब्द असला, तरी) ओसीआय हे कोणत्याही प्रकारे भारतीय नागरिकत्व नव्हे, तर केवळ एका प्रकारचे 'ग्लोरिफाइड व्हिसा स्टेटस' आहे. (किंबहुना, ओसीआयधारकांना भारतात येण्यासाठी व्हिसा लागतो. फक्त, हा व्हिसा अमर्यादित काळासाठी वैध असतो, त्यावर भारतातील रहिवासाच्या काळासंबंधी कोणतीही बंधने नसतात, आणि पर्यटन, शिक्षण, खाजगी क्षेत्रातील नोकरी, रिटायरमेंट वा सामान्य रहिवास अशा अनेक कारणांसाठी तो वैध असतो, इतकेच.)
=================================
अवांतर:

कायद्याने सज्ञान नसलेल्या बालकांसाठी ओसीआयची स्वतंत्र तरतूद नाही. मात्र, अशा बालकाच्या पालकांपैकी किमान एक जण जर ओसीआयच्या आवेदनास पात्र असेल, तर संबंधित पालकाच्या स्वतःच्या ओसीआय आवेदनात अशा बालकाचा समावेश केला जाऊ शकतो, आणि अशा प्रकारे त्या बालकास ओसीआय मिळू शकते.

प्रत्यक्षात याचा एक चमत्कारिक परिणाम दृष्टीस येतो. कसा, ते पाहू.

केस 'अ': समजा, एका मुलाचा जन्म अमेरिकेत झाला. म्हणजेच, हे मूल जन्माने अमेरिकन नागरिक आहे, म्हणजे पर्यायाने भारतीय नागरिक नाही.

आता समजा, या मुलाचे दोन्ही पालक भारतीय नागरिक नाहीत, परंतु किमान एक तरी पालक (भारतवंशीय असल्याकारणाने आणि इतर तरतुदी पूर्ण करीत असल्यामुळे) ओसीआय आवेदनास पात्र आहे. अशा परिस्थितीत तो/ती ओसीआयआवेदनपात्र पालक आपल्या आवेदनात या मुलाचा समावेश करू शकतो/ते.

म्हणजेच, या परिस्थितीत हे मूल ओसीआय मिळविण्यास पात्र आहे.

केस 'ब': समजा, दुसर्‍या एका मुलाचा जन्म अमेरिकेत झाला. म्हणजेच, हे मूल जन्माने अमेरिकन नागरिक आहे, म्हणजे पर्यायाने भारतीय नागरिक नाही.

आता समजा, या मुलाच्या पालकांपैकी एक जण भारतीय नागरिक आहे, परंतु दुसरा/री नाही. येथे परिस्थिती किंचित चमत्कारिक होऊ लागते.

- या मुलाचा/ची भारतीय नागरिक नसणारा/री पालक जर भारतवंशीय असेल, आणि ओसीआयच्या पात्रतेचे इतर निकष पूर्ण करीत असेल, तर तो/ती आपल्या आवेदनात या मुलाचा समावेश करू शकतो/ते, आणि अशा तर्‍हेने हे मूल ओसीआय मिळवण्यास पात्र ठरते.

- उलटपक्षी, या मुलाचा/ची भारतीय नागरिक नसणारा/री पालक जर भारतवंशीय नसेल, आणि/किंवा ओसीआयच्या पात्रतेचे इतर निकष पूर्ण करीत नसेल, तर त्या परिस्थितीत या मुलाचा/ची दुसरा/री पालक भारतीय नागरिक असूनही हे मूल ओसीआय मिळविण्यास पात्र ठरत नाही. कारण, भारतीय नागरिक असलेले पालक हे भारतीय नागरिक असल्याकारणाने (म्हणजेच विदेशी नागरिक नसल्याकारणाने) ओसीआयसाठी पात्र नाही (आणि म्हणून स्वतः स्वतःसाठी आवेदन करू शकत नाही, आणि मुळात आवेदन करू शकत नसल्यामुळे आपल्या आवेदनात मुलाचा समावेश करू शकत नाही), आणि दुसरे पालक हे भारतीय नागरिक नसले, तरी भारतवंशीय नसल्यामुळे किंव अन्य तरतुदी पूर्ण करत नसल्यामुळे स्वतःसाठी - आणि म्हणून स्वतःबरोबर मुलासाठी - आवेदन करू शकत नाही.

केस 'क': ही तर्कास पूर्णपणे सोडून जाणारी केस.

समजा, तिसर्‍या एका मुलाचा जन्म अमेरिकेत झाला. म्हणजेच, हे मूल जन्माने अमेरिकन नागरिक आहे, म्हणजे पर्यायाने भारतीय नागरिक नाही.

आता समजा, या मुलाचे दोन्ही पालक भारतीय नागरिक आहेत.

(१) अशा परिस्थितीत, हे मूल ओसीआयसाठी पात्र नाही.

भारतीय नागरिक असल्याकारणाने, म्हणजेच विदेशी नागरिक नसल्याकारणाने, या मुलाचे दोन्ही पालक स्वतःसाठी ओसीआय आवेदन करण्यास पात्र नाहीत, आणि त्यामुळे (म्हणजे मुळात स्वतःसाठी आवेदन करू शकत नसल्यामुळे) मुलास आपल्या आवेदनात समाविष्ट करू शकत नाहीत. त्यामुळे या मुलास ओसीआय मिळू शकत नाही.

(२अ) मात्र, अशा मुलाच्या किमान एका पालकाने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारून भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला, तर मग मात्र ते पालक ताबडतोब आवेदनपात्र होते, आणि पर्यायाने आपल्या आवेदनात आपल्या मुलास समाविष्ट करू शकते.
(२ब) त्यापुढची गंमत म्हणजे, समजा या मुलाचे दोन्ही पालक जरी कायमचे भारतीय नागरिक राहिले, तरी हेच मूल पुढे कायद्याने सज्ञान झाल्यावर 'आपले पालक भारतीय नागरिक आहेत' या नेमक्या आधारावर ओसीआय मिळवू शकते. मात्र, कायद्याने सज्ञान झाल्यावर; तोवर नाही.

या सर्वाचा अर्थ काय? तर:

(१) कायद्याने सज्ञान व्यक्तीस ओसीआय मिळविण्याकरिता 'पालक भारतीय नागरिक आहेत' हा आधार होऊ शकतो.
(२) उलटपक्षी, कायद्याने सज्ञान नसलेल्या व्यक्तीस हा आधार होऊ शकत नाही, तर 'आपल्या किमान एका पालकाने आपले भारतीय नागरिकत्व गमावले' हा आधार असावा लागतो.

म्हणजे, यातून भारत सरकार अनिवासी भारतीयांना नेमका काय संदेश पाठवते? की 'तुमचे मूल जर भारतीय नागरिक नसेल, आणि त्याच्यासाठी ओसीआयची सुविधा जर तुम्हाला हवी असेल, तर शक्य तितक्या लवकर तुमचे भारतीय नागरिकत्व गमवा' म्हणून?
=================================
अतिअवांतर:

(१) हा असा वरकरणी कोठल्याही तर्कास धरून असल्याचे न भासणारा नियम करण्यामागे नेमका काय विचार असू शकेल, असा प्रश्न बरेच दिवस भेडसावत होता. नंतर मागे एकदा कधीतरी जालावर असेच बागडत असताना, ही ओसीआय योजना अस्तित्वात आणणारे मूळ विधेयक दृष्टीस पडले. (दुवा तूर्तास सापडत नाही.) त्या विधेयकाखालील 'एल. के. अडवानी' अशी स्वाक्षरी वाचून सर्व उलगडा झाला.

(२) या नियमातील ही त्रुटी दूर करून, दोन्ही पालक भारतीय असणार्‍या आणि कायद्याने सज्ञान नसणार्‍या अभारतीय मुलांस ओसीआय देता येण्याची तरतूद असणारे एक विधेयक तूर्तास संसदेत विचाराधीन आहे, असे जालसंचारातून कळते. (दुवा १, दुवा २.) याच विधेयकात, या योजनेचे नाव बदलून आणि तत्संबंधीच्या कायद्यातील 'ओव्हरसीज़ सिटिझन ऑफ इंडिया'च्या सर्व उल्लेखांच्या ठिकाणी 'ओव्हरसीज़ इंडियन कार्डहोल्डर' असा बदल करून, प्रकरण सत्याच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्नही आहे, असे दिसते. या विधेयकाचे पुढे काय होते, ते पाहावयाचे.

(३) अडवानीकृत मूळ विधेयकातून पारित झालेल्या कायद्यात, ओसीआयआवेदकांस भारताच्या घटनेशी एकनिष्ठेची शपथ घेणे बंधनकारक असण्याची तरतूद होती. मात्र, ओसीआयधारक हे कोणत्याही प्रकारे भारतीय नागरिक नसल्याने अथवा त्यांनी कोणत्याही प्रकारे भारतीय नागरिक असणे हे अपेक्षित नसल्याकारणाने, किंबहुना, ओसीआयआवेदक आणि सामान्य परकीय व्हिसाआवेदक यांच्यात अर्थाअर्थी काहीही फरक नसल्याकारणाने, आणि सामान्य परकीय व्हिसाआवेदकांस अशी कोणतीही तरतूद लागू नसल्याने (आणि तशी ती लागू असण्याचे काही कारणही नसल्याने), ही तरतूद कोणत्याही तर्कास धरून नव्हती. पुढे मनमोहनसिंहांचे सरकार आल्यानंतर या कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या, त्यात ही तरतूद हटविण्यात आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण 'फ़ॅक्ट रिमेन्स' अमेरिकेचं नागरिकत्व घ्यायला तिला भारताचं नागरिकत्व सोडावं लागलं

बरोबर. पण याला अमेरिका जबाबदार नसून भारतीय कायदा जबाबदार आहे, एवढेच मांडायचे आहे.

(ती उदा. ब्रिटिश किंवा कनेडियन नागरिक असती, तर तिला आपले ब्रिटिश अथवा कनेडियन नागरिकत्व न गमावता अमेरिकन नागरिकत्व घेता आले असते. कारण, अमेरिकेप्रमाणेच, ब्रिटन आणि कॅनडाचे नागरिकत्वाचे कायदेही दुहेरी नागरिकत्वाच्या आड येत नाहीत. भारताचे कायदे मात्र आड येतात, आणि म्हणून भारतीय नागरिकांना अमेरिकन किंवा अन्य कोठलेही नागरिकत्व स्वीकारताना आपले भारतीय नागरिकत्व गमवावे लागते.)

आणि त्याचं तिला वाईट वाटणं साहजिक होतं.

'साहजिक' वगैरे माहीत नाही, पण शक्य आहे.

सगळेच एन आर आय लोक या अनुभवातून जातात.

हे थोडेसे सरसकट विधान होत नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं तुमचंच सगळं खरं! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

NRI Status ह्या वारंवार वापरल्या जाणार्‍या शब्दांमागे बराच गोंधळ लपलेला आहे आणि तो अशामुळे निर्माण झाला आहे की FEMA (Foreign Exchange Management Act) आणि Income Tax Act, 1961 ह्या दोन्ही कायद्यांमध्ये ह्या आणि अशा संकल्पनांचे विवरण आहे. ते दोन्ही अगदी सारखे नाही. थोडक्यात सांगायचे तर आयकर कायद्यात नागरिकत्वाचा संबंध येत नाही. तेथे भारतातील 'रेसिडन्स' हा कळीचा मुद्दा असतो. नागरिक नसलेली व्यक्ति भारतात करआकारणीसाठी 'रेसिडेंट' असू शकते. FEMA खाली NRI ठरण्यासाठी तो व्यक्ति नागरिक अथवा 'भारतीय मूळ' असणारी असावी लागते. ह्यामुळे कोठल्या कायद्याखालील NRI बाबत आपण बोलत आहोत हे आधी ठरवावे लागते.

सध्या ह्यावर आणखी लिहीत नाही. जालावर अनेक ठिकाणी असा फरक स्पष्ट करणारी माहिती सापडेल. उदा. हे संस्थळ आणि हे संस्थळ पहा. ते वाचून काही शंका उरल्यास विचारा. मला माहीत आहे ते सांगेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण समोर आणलेलं distinstion फार उपयुक्त आहे. परवा माझा एक एनाराय मित्र इथली प्रॉपर्टी विकून तिकडे डॉलर घेऊन जाणार होता. त्याला मार्गदर्शन करताना जी रिसर्च करायला लागली त्यात फार माथापच्ची झाली. त्यातली ही एक फाईल मला कामाची वाटली.

अरे, इथे पीडीएफ फाईल डकवता येत नाहीय. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

परवा माझा एक एनाराय मित्र इथली प्रॉपर्टी विकून तिकडे डॉलर घेऊन जाणार होता. त्याला मार्गदर्शन करताना जी रिसर्च करायला लागली त्यात फार माथापच्ची झाली. त्यातली ही एक फाईल मला कामाची वाटली.

ती फाइल येथे डकवू शकल्यास, तसेच या संदर्भात काही माहिती येथे लिहू शकल्यास ते उपयुक्त ठरावे, असे वाटते.

(पीडीएफ फाइल येथे डकवण्यासाठी बहुधा ती एखाद्या बाह्य संकेतस्थळावर ऊर्ध्वभारित (मराठीत: 'अपलोड') करून तिचा दुवा येथे डकवावा लागेल, असे वाटते.)

(अवांतर: संपादनमंडळास सूचना: एखाद्या प्रतिसादास देण्याच्या श्रेणींच्या यादीत 'उपयुक्त' अशी काही श्रेणी दाखल करता येईल काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://docs.google.com/file/d/0B0F5ZCsTvPP2bDh0NF9hSlMwNG8/edit?usp=sha...
इथे ही फाईल आहे. सीएक्लब वरुन साभार. तीत खरेदी, विक्री, भेट, वारसा आणि एनारय, पीआयओ, परदेशी असे काँबो हाताळले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दुवा येथे डकवल्याबद्दल आभारी आहे. माहिती निश्चित उपयुक्त ठरेल, अशी खात्री आहे. सवडीने वाचेनच.

तूर्तास ही पोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ऊर्ध्वभारित'ऐवजी 'चढवणे' असं साधं क्रियापदही वापरता येईल की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एकूण भारतीय नागरीकत्व सोडून अमेरिकन नागरीकत्व घेणं हा फारच अंत:करण हेलावून टाकणारा प्रकार दिसतो. इथे (म्हणजे कॅनडामध्ये) मात्र कॅनडाचं नागरीकत्व घेताना इतकं वाईट कुणाला वाटल्याचं फारसं ऐकलेलं नाही. एकतर कॅनडा अाणि भारत यांचं युद्ध झालं तर तुम्ही काय कराल असे प्रश्न कुणी अाधी विचारत नाही.

अर्थात हळव्या मनाला घरं पाडतील असे प्रकार नाहीतच असं नाही; उदाहरणार्थ, शपथ घेताना

I swear (or affirm) that I will be faithful and bear true allegiance to Her Majesty Queen Elizabeth the Second, Queen of Canada, Her Heirs and Successors, ...

असं म्हणावं लागतं. अर्थात इंग्लंडच्या राजघराण्यातले एकेक अवतार पाहता, त्यांच्याशी अापण 'एकनिष्ठ राहण्याची' शपथ घेतो अाहोत, या प्रकार गांभीर्याने घेणं फार अवघड अाहे. अाता ही केट नावाची जी स्त्री अाहे, तिला जो कुणी मुलगा किंवा मुलगी होणार अाहे, त्याच्याशी किंवा तिच्याशी अात्ताच मी तांत्रिकदृष्ट्या एकनिष्ठ अाहे. पण म्हणून या प्रकरणात काही स्वारस्य दाखवलं पाहिजे, असं कुणाचंच काही बंधन नाही. एवढंच नव्हे, तर तुम्हाला जर राजघराण्यात रस असेल, तर काही सामाजिक वर्तुळांत ती गोष्ट लाजेकाजेस्तव लपवून ठेवावी लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

एकूण भारतीय नागरीकत्व सोडून अमेरिकन नागरीकत्व घेणं हा फारच अंत:करण हेलावून टाकणारा प्रकार दिसतो.

कल्पना नाही. अंतःकरण नावाची चीज नसल्याकारणाने (आणि 'हेलावणे' म्हणजे नेमके काय, , याची निश्चित कल्पना आजतागायत नसल्याकारणाने), शपथविधी पार पाडूनसुद्धा याविषयी प्रथमहस्त अनुभवाचा दावा करू शकत नाही, त्यामुळे सांगू शकत नाही. परंतु अंतःकरण असणारांना असे काही होत असण्याची शक्यता नाकारण्याचे काही कारण मला वरकरणी तरी दिसत नाही.

कदाचित अंतःकरण असणारांजवळ चौकशी करून याबाबत काही विश्वासार्ह माहिती मिळवता येईल, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

एकतर कॅनडा अाणि भारत यांचं युद्ध झालं तर तुम्ही काय कराल असे प्रश्न कुणी अाधी विचारत नाही.

तसेच पहायला गेले, तर 'अमेरिका आणि भारत यांचे युद्ध झाले, तर तुम्ही काय कराल' असा प्रश्न अमेरिकेतही कोणी कधी विचारल्याचे आठवत नाही. (नागरिकीकरणाच्या अर्जावर तर नाहीच नाही, परंतु अन्यथाही कधी विचारले गेल्याचे स्मरणात नाही.) हं, आता 'कधी कायद्याने तसे बंधनकारक झाल्यास, गरजप्रसंगी अमेरिकेच्या वतीने तुम्ही (१) हाती शस्त्र धरावयास, (२) सैन्यात युद्धेतर कर्तव्ये बजावण्यास आणि (३) 'राष्ट्रीय महत्त्वाची कामे' करण्यास तयार आहात काय' असा एक प्रश्न जरूर विचारला जातो, परंतु तो भारतविशिष्ट (किंवा मूळ नागरिकत्वाचा देश-विशिष्ट) नाही. मूळ नागरिकत्वाच्या देशाशी युद्ध वगैरे त्यात अध्याहृत नाही; निदान थेट अध्याहृत नाही.

I swear (or affirm) that I will be faithful and bear true allegiance to Her Majesty Queen Elizabeth the Second, Queen of Canada, Her Heirs and Successors, ...

येथे, कॅनडाच्या राजपदाचे (आणि म्हणूनच कॅनडाचे) व्यक्तीकरण एवढ्याच मर्यादित अर्थाने एलिझाबेथ राणी (रानी रूपमती), आणि म्हणूनच कॅनडाच्या राजपदाशी (आणि पर्यायाने कॅनडाशी) निष्ठा एवढ्याच मर्यादित आणि प्रातिनिधिक अर्थाने राणी, तिचे वारस आणि पश्चात-सूरी यांच्याशी निष्ठा अपेक्षित असावी, असा अंदाज आहे. अन्यथा, रानी रूपमतीच्या (तूर्तास होऊ घातलेल्या) पणत्वाच्या (अथवा पणतीच्या) मळलेल्या लंगोटास (अर्थातच प्रस्तुत पणत्वाच्या अथवा पणतीच्या जन्मापासून पुढे) कुर्निसात करणे हे त्यातून बहुधा अपेक्षित नसावे.


तळटीपा:

मराठीत 'हेला' म्हणजे 'रेडा', याची कल्पना आहे. परंतु त्यातून 'हेलावण्या'च्या अर्थाबद्दल काही अंदाज लागत नाही.

'हेलावण्या'प्रमाणेच, 'भडभडणे' या अशाच आणखी एका शब्दाचा निश्चित अर्थही आजतागायत कळू शकलेला नाही. तर ते एक असो.

चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती फालतू लेख. का लिहीला आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशाखा

http://www.theatlanticwire.com/entertainment/2013/09/first-indian-americ...
निना दावूलूरी भारतीय वंशाची पहिली मिस अमेरिका झाली आहे. वंशहिनतावादी (रेसिस्ट) टोणे मारणारे लोक अमेरिकेत ज्या संख्येने आहेत ते पाहून 'भारत विसरलेल्या पण भारतीय वंशाच्या माणसाला' उणे वाटायची बरीच शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छे छे! उलट या रेसिस्ट कमेंटा वाचुन भारतीय आणि अमेरिकन जन्तेच्या मानसिकतेत कमालीचे साधर्म्य बघता मिस अमेरिकाची निवड अचुक वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वंशहिनतावादी (रेसिस्ट) टोणे मारणारे लोक अमेरिकेत ज्या संख्येने आहेत ते पाहून 'भारत विसरलेल्या पण भारतीय वंशाच्या माणसाला' उणे वाटायची बरीच शक्यता आहे.

'रोज मरे, त्यास कोण रडे' या उक्तीस अनुसरून, असे काही वाटण्याबद्दल साशंक आहे.

(उलटपक्षी, असे टोमणे मारण्यामागील प्रेरणा ही उणे वाटण्यातून येत असावी, असे मानावयास जागा असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.)

तरीही, व्यक्त केलेल्या कळवळ्याबद्दल अशीलमंडळ ब्यारिष्टरसाहेबांचे शतशः ऋणी आहे.
=====================================================================================================

या शब्दाचा अर्थ आपापल्या गरजेप्रमाणे नि सोयीप्रमाणे हवा तसा लावून घ्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0