'उपक्रम' कोठे आहे?

गेले सुमारे १५ दिवस 'उपक्रम' mr.upakram.org हे संस्थळ मिळणे अशक्य झाले आहे. त्याच्या जागी 'The website you were trying to reach is temporarily unavailable.' असा संदेश http://host415.hostmonster.com/suspended.page/disabled.cgi/upakram.org ह्या URL खाली दिसत आहे.

येथील बरेच सदस्य तेथेहि सदस्य आहेत असे दिसते. संस्थळ उपलब्ध नसल्याचे कारण कोणी सांगू शकेल काय?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

त्याच्या देखरेखीचा खर्च उचलण्याइतपत ते लायकीचं राहिलं नसावं असं संस्थळचालकांचं मत झालं असावं अशी बातमी(खरी/खोटी)समजली. पण निदान आर्काइव्ह तरी करायची संधी द्यायला हवी होती, बरीच माहिती अमूल्य होती अशी भावना आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निदान आर्काइव्ह तरी करायची संधी द्यायला हवी होती, बरीच माहिती अमूल्य होती अशी भावना आहे.

+१ सहमत आहे.
माझ्यासारख्या ब्लॉग नसलेल्यांसाठी (आणि सगळॅ लेखन त्या त्या संकेतस्थळांवरच असणार्‍यांसाठी) हे मोठे नुकसान असेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुमारे एक वर्षापूर्वीपर्यंत हे संस्थळ चांगले चालले होते. गंभीर स्वरूपाचे लेखन आणि त्यावर चर्चा जोरात चालत असत. पण अलीकडे अलीकडे तेथील बरेच सदस्य निवृत्त झाल्यासारखे वाटत होते आणि त्यामुळे लेखन कमी - प्रतिक्रिया कमी - म्हणून पुनः लेखन कमी असे दुष्टचक्र सुरू झाले असे वाटते.

ह्याबाबत आपण काही सहकारी कृति करावी असे वाटते काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपक्रमावरचं लिखाण अजूनही वाचवता येईल असं वाटतं. असं असल्यास सहकारी कृती करावी. उपक्रमाबद्दल सहानुभूती असणार्‍या सगळ्यांना या धाग्यावर (आवश्यकता असल्यास व्यनिमधून) याबद्दल चर्चा करता येईल. अनेक चांगल्या लोकांचं, रोचक, संदर्भसंपृक्त लिखाण उपक्रमावर आहे ते सोडवता येण्यासारख्या अडचणींमुळे नष्ट होऊ नये.

यासंदर्भात जी काही मदत करता येणं शक्य आहे ती मी करायला तयार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी याच्याशी सहमत आहे.

उपक्रमावर माझा अनेक वर्षांपासूनचा वावर होता आणि अनेक नवनवीन विषय आणि माहिती यांनी समृद्ध असं ते दालन आहे.

माझा असाही अंदाज आहे की सध्याची स्थिती ही तात्कालिक, थोड्या काळापुरतीचीच आहे. थोड्या दिवसांतच स्थिती पूर्वपदाला येईल.

याबाबत काहीही मदत हवी असल्यास ती जमेल तशी करण्याची माझी तयारी आहे.

मी अरविंद कोल्हटकरांना अशी विनंती करतो की या संदर्भात त्यांनी पुढाकार घ्यावा. आमचं त्यांना निश्चितच सहकार्य असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

>>मी अरविंद कोल्हटकरांना अशी विनंती करतो की या संदर्भात त्यांनी पुढाकार घ्यावा. आमचं त्यांना निश्चितच सहकार्य असेल.<<
असेच. सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मिसळपाव' या संकेतस्थ्ळाबाबत सध्या हाच अनुभव आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटलं मीच बॅन झालो का काय पुन्हा! Wink

आशा आहे संस्थळ पुन्हा सुरू होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

कोणतेही संकेतस्थळ बंद पडू नये असे मनापासून वाटते. माझ्या तेलुगु रुममेटस होत्या त्यांना या फोरम्सचं इतकं नवल वाटायचं. त्यांच्या भाषेत असे फोरम्स नाहीत असे त्या सांगायच्या.

मुद्दा हाच की संकेतस्थळे बहुमूल्य वाटतात. समान शीलव्यसनेषु सख्यम उक्तीचा अनुभव येतो. जीवन समृद्ध बनते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संकेतस्थळ बंद पडू नये असेच मलापण वाटते. पण तुमच्या रुममेटनी काही मराठी संकेतस्थळं बघितली असती तर त्यांना "भीक नको पण कुत्रा आवर" असं झालं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा हे बाकी खरय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१०१००.

तेलुगुमध्ये नाही म्हणायला पुलिहोरादद्दोजनम.कॉम नामक एक साईट आहे. पण तिथे टीव्ही वगैरेच प्रकार जास्त चालतो. मिसळपाव.कॉम सारखे डिस्कशन चालत नाही. मी माझ्या बाँग मित्रांना विचारले. त्यांना माहिती नाही बांग्लामध्ये असे काही आहे किंवा नाही. मला स्वतःला फार कुतूहल आहे असे काही अन्य भाषांत असल्यास. तमिळमध्ये "करुतु फ्रेंड्स" नावाचा एक क्लोज्ड एफबी ग्रूप आहे. तिथे लोक इंग्लिशबरोबरच मुख्यत्वेकरून तमिळ लिपीत लिहितात. पण मिपा किंवा ऐसी जसे अंतर्बाह्य मराठी आहे तसे अंतर्बाह्य तमिळ रूप असलेल्या सायटी बघण्यात नाहीत. पण नक्की असाव्यात असा अंदाज आहे. तमिळचा जालवावर फार तगडा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असे चर्चात्मक फोरम केवळ मराठीत आहेत, हिंदीत सुद्धा नाहीत आणि याचा मला किंचितही अभिमान नाही. कारण माझ्यामते ही (आपलेच फोरम असणे) ही अभिमानाची गोष्ट नसून (दुसरे फोरमच नसणे ) ही तीव्र दु:खाची गोष्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अभिमान किंवा दु:ख बाळगण्याअगोदर अन्य भाषांच्या जालवावराबद्दल माहिती घेऊन विधान केल्यास बरे होईल. सारीका यांच्या तेलुगु रूममेट्सना तेलुगु फोरम्स माहिती नव्हती याचा अर्थ ती अस्तित्वात नाहीत असा होत नाही. मिपा काय किंवा ऐसी काय, किंवा या सर्वांचा बाप असलेले मायबोली काय, किती मराठी लोकांना माहिती आहेत अजूनही? पुणे-मुंबैच्या बाहेर अनिवासी मराठी सोडल्यास(यात भारताबाहेरचे अन महाराष्ट्राबाहेरचे पण भारतातले असे दोन्ही धरावे) यांची ओळख अजूनही खूप कमी आहे. तस्मात अन्य भाषांमध्येही असे प्रकार अस्तित्वात असण्याचा संभव बराच आहे. तमिळबद्दल बोलायचे झाले तर तमिळमन्त्रम.कॉम ही साईट असल्याचे प्रत्यक्ष माहितीच आहे, शिवाय गुजरातीत असे काही असल्याचे उडत उडत ऐकलेय. तस्मात अन्य भाषांत काही नाहीच, हे विधान फार चूक आहे. अन्य भारतीय भाषांबद्दल माहिती शक्यतोवर भारतात कुठेच फारशी नसते पण आपापल्या परिघात बर्‍यापैकी काड्या चालू असतात असे निरीक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मीमराठीचा मी ३-४ वर्षापासून सदस्य आहे. मायबोली मी त्याअगोदरपासून वाचतो. माझ्या कार्यालयातल्या उडिया, बंगाली, आसामी, पंजाबी, हिंदी भाषिक (राजस्थानी, मध्य प्रदेशी, उत्तर प्रदेशी, उत्तराखंडी, बिहारी, इ), काश्मिरी, मल्याळी, कन्नड, मणिपूरी, इ लोकांना ही साईट दाखवून अशी तुमची साईट आहे का असा प्रश्न गेल्या २-३ वर्षापासून विचारत आलो आहे. (दिल्लीत इतकी व्हरायटी आरामात मिळते.). मी स्वत: हिंदी आणि मणिपूरी (blog collection sites and thead collection sites (There is specific word for thread collection site like ऐसीअक्षरे) साईट्स ची सर्च २-३ महिन्याला एकदा करत असतो. माझा इतकाच अनुभव आहे. मराठी स्थळांची क्वालिटी, विशेषतः लेखनातलं गांभीर्य (कष्ट म्हणा) दुसर्‍या भाषेत त्याच्या २-३ टक्के सुद्धा आढळलं नाही. माझा अनुभव चुकीचा/अपुरा असेल तर मला आनंदच आहे. पण याची शक्यता कमी आहे कारण स्थानिक साहित्यात रस असणार्‍या व्यक्तिंकडून मी feedback घेतला आहे. पण सध्याला तरी हिंदीत धागा कलेक्शन स्थळ ('तसले' म्हणजे पोर्न सोडून)नाही याचं मला विशेष frustation आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओक्के. दक्षिणेत अ‍ॅट लीस्ट तमिळमध्ये काही सायटी आहेत, पण दर्जा इ. बद्दल बोलण्यासाठी ते वाचायला पाहिजे. तमिळ येत नसल्याने तुमच्या म्हणण्याचे खंडन किंवा मंडन तूर्त करता येत नाही. अजून इकडेतिकडे पाहतो आणि सांगतो.

अपडेटः http://www.amarblog.com/ ही बंगाली साईट सापडली. रूपडे अंतर्बाह्य बंगाली आहे. सदस्यनामे पाहता आपल्यासारखीच चमत्कारिक आहेत- उदा. डाक्तार आइजुद्दीन, काला जीन, बिक्रमपुरेर पोला, इ. लेखनाची वर्गवारी कोबिता, आन्तोर्जातिक, इतिहास, इ. सदरांखाली केलेली आहे. एका लेखाचा नमुना खाली पाहता येईलः

http://www.amarblog.com/doctor/posts/164408

लेखनासाठीचे परिश्रमही जाणवताहेत. एकुणात आपलाच वंगावतार दिसतोय असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तस्मात बंगालीत अशा सायटी आहेत. आमारब्लॉग बरोबरच शोबूजबांगला ही अजून एक वेबसाईट आहे. एका सदस्याची माहिती पाहता सदस्यत्वाचा कालावधी ५ वर्षे दिसला. तस्मात ही साईट खरेच जुनी दिसतेय. आत्ता ऐसीवर

"सध्या 2 सदस्य आणि 8 वाचक आलेले आहेत." तद्वतच तिथेही "বর্তমানে ৪৩ জন সদস্য এবং ৬৩৯ জন অতিথি জেগে আছেন।" (सध्या ४३ जण सदस्य व ६३९ पाहुणे जागे आहेत) असे लिहिलेले आहे.

काही लेखांवरून अन भाषेवरून ही साईट बांगलादेशी असावी असे वाटतेय. पाहूच काय ते.

मजा आली एकुणात. आता अजून कुठे असे काही मिळते का ते पाहू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुक्तसुनीत, अदिती यांनी मदत करण्याची आपली इच्छा दाखवलेली आहेच, माझाही त्याला दुजोरा आहे. आपण सगळे मिळून नक्की काय घडवून आणायचं आणि ते कसं घडवून आणायचं हे ठरवू. 'ऐसी अक्षरे' संस्थळाचा व त्यात उपलब्ध रिसोर्सेसचा त्यासाठी वापर करता आला तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीही 'मम' म्हणतो.
नाहीतरी माझे सर्वोत्तम लिखाण (!) उपक्रमावरच आहे! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ऐसिअक्षरेने (अनावधानानेच) त्याचा खरा लचका तोडला म्हणायला हरकत नाहि अशी बातमी(खरी/खोटी)समजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ड्रॅक्युला

या विषयावर इथे चर्चा करू नये असे माझे मत आहे.

[उपक्रमावरील लेखन नष्ट होण्याचा प्रश्न असेल तर ते त्या संस्थळाचे संचालक-संपादक किंवा मालक यांच्याशी व्यक्तिगत संपर्कातून केले जाऊ शकेल].

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सध्या असा मेसेज येतो आहे:
mr.upakram.org is currently under maintenance. We should be back shortly. Sorry for the inconvenience. Thank you for your patience.

अर्थात उपक्रम लवकर चालु होईल असे दिसते आहे. टीम उपक्रमला शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एखादं संकेतस्थळ तात्पुरतं उपलब्ध नसलं तरी त्यावरचं लिखाण गूगल कॅशमार्फत उपलब्ध होऊ शकतं.

१. गूगल साईट सर्च वापरा.
उदाहरणार्थ -

site:mr.upakram.org ऋषिकेश

असं शोधलं तर फक्त उपक्रमावरचे ऋषिकेशचे धागे/प्रतिसाद वगैरे सर्च रिझल्ट्समध्ये येतात.
२. त्यातला एखादा आपल्याला हवा असला, उदाहरणार्थ -

इंग्रजी शब्दांचे अर्थ आपल्या भाषेत | mr.upakram.org
mr.upakram.org/node/2581‎
24 juin 2010 - आभार. ऋषिकेश [24 Jun 2010 रोजी 08:34 वा.] वा सुविधा फारच उपयोगी वाटाली. विषेशतः माझ्यासारख्या इंग्रजी ...

तर mr.upakram.org/node/2581‎ ह्या दुव्याशेजारच्या त्रिकोणावर क्लिक करा. तिथे कॅशचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

३. मग हे पान उघडेलः
http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:o2v10ZG95oAJ:mr.upa...

मजकूर साठवायचा असला, तर तो तिथून कॉपी-पेस्ट करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोणत्याही मराठी संस्थळाचे बंद पडणे हे क्लेशदायक आहेच, शिवाय त्यावरच्या लेखनाचा बहुमूल्य ठेवा (प्रतिसादातल्या चर्चांचाही) नष्ट झाल्याने फारच नुकसान होते.
(निरनिराळ्या संस्थळांच्या विदागाराला अपघात होणे २००७ सालापासून सुरू आहे.) कधीकधी संस्थळाच्या चालकांनी कालमानपरत्वे त्या संस्थळाच्या संचालनातून अंग काढून घेतल्याने असे होते. संचालक/प्रशासकांचा तो मुख्य व्यवसाय नसल्याने हे होणे स्वाभाविक आहे. जोवर संस्थळातून आत्मतुष्टीपेक्षा काही अधिक मिळत नाही तोवर / किंवा प्रभारी संचालक-संपादकांना काही मोबदला मिळत नाही तोवर अशी संस्थळे कायमस्वरूपी चालत राहतील अशी अपेक्षा करणे चूक आहे. (कित्येक लोकांचे स्वत:चे ब्लॊगही ’पासवर्ड विसरल्याने’= कंटाळा आल्याने बंद पडतात.)

तेव्हा संस्थळे अशी बंद पडू नयेत यासाठी मूळ मालकांनी (त्यांना अंग काढून घ्यायचे असेल तर) इतर कोणी जबाबदारी घेण्यास उत्सुक आहे काय याची वेळच्यावेळी चाचपणी करावी आणि योग्य त्यावेळी त्या व्यक्तींकडे सूत्रे द्यावीत. हे एक सर्वसाधारण मत आहे.

उपक्रमाबाबत म्हणाल तर ’आस्तिक-नास्तिक’ वादाने त्या संस्थळाचे कंबरडे मोडले असे माझे (अर्थातच वादग्रस्त)मत खेदाने नमूद करतो. त्यावर माझ्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देणे नाही याची कृपया नोंद घ्यावी. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१००.
किंबहुना नास्तिक लोकांनी तेथील वाचक लेखक वर्गाचे एवढे प्रबोधन केले की मंडळी तेथे वावरण्यास घाबरु लागली असावीत असा संशय घेण्यास जागा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लवकरच परत येईल असे वाटते.
कारण येणारा मेसेज आता बदललेला आहे
ते एकमेव संस्थळ असे आहे की ज्याचे संपूर्ण आर्काईव्ह्ज (काही तुरळक धागे सोडल्यास) मी पहिल्यापासून डीटेल वाचून काढलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

+१.

अगदी तुमच्याइतके नसले तरी मीही ते बरेच डीटेलवार वाचले आहे अन्य स्थळांच्या तुलनेत. लै जब्रा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हरेक धागा माझाही वाचून झालाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वरील सर्वांचे अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील सर्वांकडे इतका मोकळा वेळ आहे याचा मला मनस्वी हेवा वाटतो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

हो ना रिकामचोट लेकाचे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिसळ पाव चा काय लोचा चालू आहे सध्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

दोन्ही स्थळे ऐसीअक्षरे ह्या स्थळामधे मर्ज होण्यासाठी रांगेत आहेत. थोडा अवधी द्यावा. तो पर्यंत 'मी' आतल्या खबरी पुरवतोच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चर्चा प्रस्तावक चर्चा मांडून पळून गेल्याने ह्या प्रस्तावाला भडकाऊ ही श्रेणी देण्यात यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिष्टर उपक्रम परत आलेले दिसतायत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओ mr. का मतबल मिष्टर नै, मर्‍हाटी ऐसा हय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

माहिती आहे हो. विनोदनिर्मितीचा क्षीण प्रयत्न म्हणा हवे तर.
अवांतर: आधी ते mr.upakram.org वाचून उपक्रम नावाचा मोठा समूह आहे आणि त्याचा मराठी एक उपविभाग आहे असे वाटून hi.upakram.org, te.upakram.org वगैरे पत्ते टाकून पाहिले होते. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपक्रमाच्या प्रशासनाला सूचना/विनंती करताना तेथील सदस्य उपक्रमपंत असा उल्लेख करताना दिसतात. तेव्हा मिस्टर उपक्रम चालेल असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उपक्रम उघडत नाहिये अजूनही.
कुणीतरी संजीवनी द्या रे त्यास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तांत्रिक अडचण आहे असे उपक्रमपंतांनी सांगितले आहे. पण ती एव्हाना दूर व्हायला हवी होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माहितीबद्दल आभार.
सुरु होणार आहे/ होउ शकते हे ऐकून बरे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फक्त खर्च इतकाच प्रश्न असेल तर मी तो खर्च करण्यास तयार आहे. कुणी नक्की सांगू शकेल का किती खर्च अपेक्षित आहे? शशांक जोशींचा संपर्क वगैरे तरी मिळू शकेल का?
उपक्रमाच्या बंद पडण्याने अनमोल माहिती 'हातातून गेली' आहे याबद्दल दुमत नसावे. माझ्यामते फक्त खर्च हा प्रश्न नसावा. उर्ध्वश्रेणीकरणात विदागाराचा काहीतरी प्रश्न निर्माण झाला असावा. आणि तो सोडवायला वेळ लागत असेल म्हणून ते पुढे ढकलले जात असेल... Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-निनाद

फक्त खर्च इतकाच प्रश्न असेल तर मी तो खर्च करण्यास तयार आहे.

फक्त खर्चाचा प्रश्न नसावा. आणि केवळ तेवढाच प्रश्न असेल तर अनेक लोक पुढे येतील याची खात्री आहे. उपक्रमावर नवीन काही आलं नाही, तरी आत्तापर्यंत जे लिखाण आलेलं आहे ते सर्वांनाच उपलब्ध रहावं यासाठी ते संस्थळ चालू ठेवण्याचा खर्च फार नाही इतकंच महत्त्वाचं.

शशांक जोशींशी संपर्क साधता येतो का ते बघतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त खर्चाचा प्रश्न नसावा. आणि केवळ तेवढाच प्रश्न असेल तर अनेक लोक पुढे येतील याची खात्री आहे. उपक्रमावर नवीन काही आलं नाही, तरी आत्तापर्यंत जे लिखाण आलेलं आहे ते सर्वांनाच उपलब्ध रहावं यासाठी ते संस्थळ चालू ठेवण्याचा खर्च फार नाही इतकंच महत्त्वाचं. +१ सहमत आहे राजेश

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-निनाद

उपक्रम वाचनमात्र स्वरूपात परत आलेले दिसतेय.
अवांतर: www.mr.upakram.org आणि mr.upakram.org साठी फाँट वेगवेगळा दिसतोय मला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे वाचा:
http://mr.upakram.org/node/3999

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-