राघवजी प्रकरणामुळे उपस्थित प्रश्न - कोणता बलात्कार 'नैसर्गिक'?

राघवजी या मध्य प्रदेशच्या माजी अर्थमंत्र्यांविरोधात त्यांच्या नोकराने केलेल्या तक्रारीनंतर त्यांना अटक झाली आणि भाजपमधील स्थान गमवावे लागले. या केसच्या निमित्ताने भारतीय दंडविधानातील बलात्काराविषयीच्या तरतुदींतील एक त्रुटी पुन्हा एकदा दृष्टीस येते आहे. How Can Rape Be ‘Natural’? या लेखात ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह विमेन्स असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन यांनी त्याविषयी लिहिलं आहे. न्यायमूर्ती वर्मा समितीनं केलेल्या शिफारशींमध्ये बलात्काराचा गुन्हा लिंगविशिष्ट न ठेवण्याची शिफारस होती, पण केंद्र सरकारनं ती स्वीकारली नाही. बलात्कारित महिलेला तिचे कपडे किंवा चारित्र्याबद्दल टीकाटिप्पणी सहन करावी लागते, तशीच पुरुषाला काय प्रकारची टिप्पणी सहन करावी लागते त्याचे काही मासलेदार नमुनेसुद्धा लेखात दिले आहेत.

या निमित्ताने एक जुना वाचनीय धागा - बलात्कारः (गैर)समज आणि तथ्ये

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

माहितगाराच्या पोतडीतून निघालेला आणखी एक वाचनीय दुवा!
लेखातील पुढिल प्रश्न मार्मिक आहेत आणि महत्त्वाचे देखील:

So, the rape of a man by a man is ‘unnatural’? Would that not imply that the rape of a woman by a man is ‘natural’?

यावर कोर्ट काय निकाल देईल हे पाहणे रोचक असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

So, the rape of a man by a man is ‘unnatural’? Would that not imply that the rape of a woman by a man is ‘natural’?

इथे ज्या पद्धतिने पुरुषाने पुरुषाचा बलात्कार केला आहे त्याच पद्धतिने पुरुषाने स्त्रीचा बलात्कार केला असता तरी ते "unnatural" (अनैसर्गिक पद्धतिने जबरदस्ती ठेवलेले लैंगिक संबंधच) ठरले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं शब्दांची सरमिसळ/गल्लत होते आहे.

बलात्काराची त्यातल्या त्यात सोपी व्याख्या "व्यक्तिच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध करणे याला बलात्कार असे म्हणतात" (*). तेव्हा बलात्कार हा नैसर्गिक अथवा अनैसर्गिक ह्या चर्चेच्या चौकटित बसत नाहि. त्यातला जो लैगिक संबंधाचा जो भाग आहे तो मात्र नैतिक/सांस्कृतीक/सामाजिक समजुतीनुसार नैसर्गिक अथवा अनैसर्गिक ह्या व्याख्येत बसतो. तेव्हा "अनैसर्गिक बलात्कार" म्हणजे "अनैसर्गिक पद्धतिने जबरद्स्ती केलेले/ठेवलेले लैंगिक संबंध" असे वाचणे/म्हणणे तांत्रिकदृष्ट्या बरोबर ठरेल.

(*) मराठी विकिपीडियावरुन साभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेव्हा "अनैसर्गिक बलात्कार" म्हणजे "अनैसर्गिक पद्धतिने जबरद्स्ती केलेले/ठेवलेले लैंगिक संबंध" असे वाचणे/म्हणणे तांत्रिकदृष्ट्या बरोबर ठरेल.

तुमचं म्हणणं जरी पटत असलं तरी ह्या केसमधे नेत्यांनी केलेल्या ट्वीटचा तसा अर्थ होत नाही असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

>> इथे ज्या पद्धतिने पुरुषाने पुरुषाचा बलात्कार केला आहे त्याच पद्धतिने पुरुषाने स्त्रीचा बलात्कार केला असता तरी ते "unnatural" (अनैसर्गिक पद्धतिने जबरदस्ती ठेवलेले लैंगिक संबंधच) ठरले असते. <<

बलात्काराविषयीच्या प्रचलित कायद्यात पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनीत तिच्या मर्जीविरुद्ध प्रवेशल्याचे सिद्ध झाले तर ती कृती बलात्कार होऊ शकते. (संदर्भ) म्हणजे योनीत इतर वस्तू बळजबरीने घातली किंवा गुदसंभोग केला तर तो बलात्कार होत नाही. दिल्ली बलात्कार प्रकरणाशी याचा संबंध असल्यामुळे बहुधा न्यायमूर्ती वर्मा यांची त्यासंबंधीची शिफारस स्त्रियांच्या संदर्भात लागू होईल - म्हणजे स्त्रीशी बळजबरीने असा संभोग केल्यास तो बलात्कार ठरेल; पण पुरुषाशी असा संभोग बलात्कार ठरणार नाही. (आणि बहुधा शिक्षेच्या तीव्रतेत त्यामुळे फरक पडेल.)

>> त्यातला जो लैगिक संबंधाचा जो भाग आहे तो मात्र नैतिक/सांस्कृतीक/सामाजिक समजुतीनुसार नैसर्गिक अथवा अनैसर्गिक ह्या व्याख्येत बसतो. तेव्हा "अनैसर्गिक बलात्कार" म्हणजे "अनैसर्गिक पद्धतिने जबरद्स्ती केलेले/ठेवलेले लैंगिक संबंध" असे वाचणे/म्हणणे तांत्रिकदृष्ट्या बरोबर ठरेल. <<

दुव्यातला लेख वाचलात तर हे लक्षात येईल की तुम्ही ज्याला 'अनैसर्गिक' म्हणता आहात ती कृती (गुदसंभोग) ३७७ कलमाखाली 'अनैसर्गिक लैंगिक संबंध' म्हणून शिक्षेला पात्र होती, पण तो बलात्कार नव्हता. म्हणजे सज्ञान व्यक्तींनी परस्परसंमतीने केलेली कृतीही गुन्हा ठरत होती. ते कलम आता राघवजींवर लावले आहे, पण दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने त्या कृतीतली (परस्परसंमतीनं घडली तर) अनैसर्गिकता काढली आहे. आणि प्रचलित कायद्यानुसार तो बलात्कार नव्हताच. त्यामुळे 'अनैसर्गिक बलात्कार' ही संकल्पना वरील कृतीसाठी तांत्रिकदृष्ट्या कायद्याच्या दृष्टीत बसत नसावी. म्हणून कायद्यात बदल गरजेचा आहे असे म्हणणे असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्या प्रकरणातून आपल्या माध्यमांचे समलैंगिकतेविषयीचे जे पूर्वग्रह दिसले त्याचं पृथक्करण करणारा एक लेख -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
माहितगार