" बया आज माझी नसे वात द्याया - " (विडंबन)

.
(चाल : प्रिया आज माझी नसे साथ द्याया -)

बया आज माझी नसे वात द्याया
असो बंद डोळे मिटो पापण्या या..

नको गाणी आता जरा झोपतो मी
सुरांची तिच्या आज ती हूल नाही
बयेवीण ना त्रास होईल आता..

किती छान म्हटले तरी त्रास होतो
जरी कान बंदी तरी बोल येतो
शिरा त्या गळ्याच्या फुगाव्या किती त्या..

न भांडी धुवाया, न कामा उशीर
कसा आज हातास येईल जोर
मुखी यातना रात्र जागेल गाया..

किती आठवू मी अशा भांडणांसी
पुरे लाटण्यावीण शब्दांस खाशी
कशाला उभी ती मनीं महामाया.. !
.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान !

अवांतर : "वात द्याया" हे "तोफेला बत्ती देणे" या अर्थी वाचलं . Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

विडंबन आवडलं. मात्र विडंबनांमध्ये त्रासदायक बायको, दारू हे विषय पुन्हापुन्हा येतात. एखादेवेळी
'यडा आज माझा नसे वात द्याया' असं बायकोच्या तोंडून आलेलं विडंबनगाण वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या इडंबनाची फेमिनिन व्हर्जन् सांगण्यासाठी फेमिनर्षभ अदिती यांस सुपारी दिल्या जात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0