होतकरू फेस्बुकीसाठी विद्वता-प्रसिद्धी-तंत्र: (प्रथमच गाईड-रूपात)

विद्वान म्हणवून घेण्यासाठी सनातन विसाव्या शतकापर्येंत ज्ञानार्जन आणि इतर पारंपारिक परिश्रम घेणे अपरिहार्य होते. एकविसाव्या शतकातील पुरोगामी भासमान विश्वातही विद्वान म्हणवून घेणे ही देखील वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अनेक विद्वानांना महा सामाजिक जालावर नावारूपाला आणल्यानंतर "फाटे कोचिंग क्लासेस"ने आपल्या अथक संशोधनातून गरीब होतकरू विद्वानांसाठी ही अभिनव कार्यपद्धती विकसित केली आहे. गरजूंनी तिचा लाभ घ्यावा आणि आपआपल्या विद्वत्तेचे चाँद फेसबुक वर कलेकलेने वृद्धिंगत करावे. भांडवल म्हणून एक फेसबुक अकाऊंट असणे आणि चार-दोन मित्र असणे आवश्यक आहे.
१. शक्य असेल त्या, दिसेल त्या प्रत्येक ग्रुपवर सदस्यत्व घ्यावे. दिसेल ते, सुचेल ते प्रत्येक पेज लाइकावे. निरुद्द्योगी आडमिन हे प्रत्येक फेसबुकी ग्रुपचे वैशिष्ट्य. काही ग्रुप वरील आडमिन हे वाट्टेल त्याला आत प्रवेश देतात. अशा ग्रुपवर जाणे श्रेयस्कर. पण काही ग्रुप वरील खमक्या आडमिनना बाहेर कोणी हिंग लावून विचारत नसल्या कारणाने ते सरळ कोणाला आत येऊ देत नाहीत. अशा ठिकाणी वशिला लावण्याचा प्रयत्न करावा. नाहीच जमले तर आडमिनला साईबाबांचे सात फोटो आणि आरती घालून संदेश पाठवावे. तीन दिवसात नक्की प्रवेश मिळतो.
२. एकदा प्रवेश झाला की ग्रुपवर असलेल्या प्रत्येक सदस्यास फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी. कोणाला आणि किती याला मर्यादा नाही. "पीपल यू मे नो" चे भाषांतर "तुमच्या फेसबुक मैत्रीसाठीच जन्म घेतलेली माणसे" असे होते हे होतकरूंनी विसरू नये. फेसबुक ने तुमची ती शक्ति ब्लॉक केल्यास फेक अकाऊंट उघडून ट्राय मारावा. यासाठी भिंतीवर दोन फुट चढून चार फूट पडणार्‍या पालीची चिकाटी ठेवणे आवश्यक आहे.
३. रिक्वेस्ट धाडल्यानंतर अक्सेप्ट करणार्‍या प्रत्येकास संदेश पाठवावे. याला विषयाचे आणि तार्किकतेचे बंधन नाही. आदरार्थी संबोधन आणि "अबाऊट" सदरातील माहिती विसरू नये. इंग्लिश जमत नसल्यास हरकत नाही, "टाकून" बसावे. मग हिब्रू भाषेतील संवादसुद्धा अवघड नाही.
४. प्रत्येक चर्चेत काही ना काही मत व्यक्त करावे. ते करत असताना आपले ज्ञान, वय, संदर्भ आणि कर्तृत्व याचा अजिबात गंड बाळगू नये. जरूर पडल्यास स्फूर्तीसाठी नवाकाळ, वार्ताहर, संध्यानंद वगैरे पेपर जवळ बाळगावे.
५. दिलेले मत हे ब्रह्मवाक्य किंवा काळ्या पाषाणावरची पांढरी रेघ किंवा तत्सम पक्की गोष्ट समजावी आणि विश्लेषण, तर्क, माहिती, किंवा सामान्य ज्ञान यांपैकी काहीही विचार न करता ते रेटावे. अशाने काही कायमचे शत्रू आणि बरेच कायमस्वरूपी मित्र भेटतात.
६. मित्रांची प्रत्येक पोस्ट लाइकावी आणि प्रत्येक मताशी सहमत व्हावे. त्यांची खाजवली तर ते आपली खाजवणार असा सरल व्यवहार आहे. विसरू नका, येथे प्रत्येकजण एक प्रकारचा "सर" आहे आणि या "सरां"ची सर कशालाच नाही. इंग्लंडच्या राणीची तमा न बाळगता १५० वर्षाच्या पारतंत्र्याला स्मरून प्रत्येकास आदरार्थी "सर" बनवावे.
७. आपले मत भारतीय राज्यघटनेची आगामी दुरूस्ती किंवा पुढील युनो मधील ठराव यामध्ये घालण्याच्या लायकीचे मानावे. कॉमेंट कॉपी करून प्रत्येक ग्रुपवर, आपल्या भिंतीवर आणि जमल्यास प्रत्येक पेजवर घालावी. यातून नवे मित्र भेटतात आणि जुन्यांची निष्ठा तपासता येते.
८. उगवते कवी आणि लेखकु यांमध्ये आपली प्रसिद्धी वाढवणे सोयीचे आणि सोपे. खास करून होतकरू, टुकार आणि असंबद्ध वाक्ये कविता किंवा लेख म्हणून लिहिणार्‍यांना प्रोत्साहन दिल्यास आपला कायमचा मित्रवर्ग वाढतो. "वा! क्या बात!" "बढिया" "सुंदर काव्य" "प्रतिभेची प्रगाढ खोली" असे शब्दसमूह नोंदवणे महत्त्वाचे.
९. फेसबुकवर असणार्‍या प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीस येन केन प्रकारेण मित्र बनवावे. यासाठी होतकरू कवी-लेखकू मंडळीचा उपयोग खास होतो. त्यांच्या फ्रेंड लिस्टांत अशी प्रसिद्ध मंडळी ऐसपैस पहुडलेली आढळतील. बहुतांशी प्रसिद्ध व्यक्ति अधिक लोकसंपर्कासाठी येईल ती रिक्वेष्ट विचार न करता अॅक्सेप्ट करत असल्याने त्याचाही फायदा मिळतो.
१०. आपले मत वादावर आरुढ करावे. नेहमी लोकप्रिय पण लवचिक भूमिका घ्यावी. यासाठी मित्र यादीतील प्रसिद्ध व्यक्तीशी सहमत होणे महत्त्वाचे. कोणत्याही कट्टर"वादी" मंडळींशी प्रसिद्ध व्यक्ति असहमत असतात. त्यांना पाठिंबा दिल्यास त्याचा फायदा त्यांच्या शिष्यत्व (अथवा चमचा) रूपाने मिळतो आणि त्यांची खाजवल्याने आपली विचारनौका आपोआप दोन हात वर तरंगू लागते. आपण त्यांचा आभासी विश्वातील डावा अथवा उजवा हात असल्याप्रमाणे वागावे.
११. एकदा का आपल्या शिडात मित्रसंख्या आणि लाइकचि हवा भरली की कमीत कमी तीन ब्लॉग, चार पेजेस (एक स्वत:च्या नावाचे, एक स्वत:च्या ब्लॉगच्या नावाचे आणि दोन इतर कुठल्याही नावाची), आणि निदान पाच फेक आयडी उघडावे. एकदाच लिहिलेला मजकूर कालांतराने प्रत्येक ठिकाणी टाकावा. प्रत्येक प्रसिद्ध/मित्र व्यक्तीस त्यात ट्यागण्यास विसरू नये.
१२. फेक आयडीचा उपयोग आपल्या मतांना पुष्टी देण्यास आणि आपले स्टेट्स/पोष्टी लाइकण्यास करावा. यामुळे आपल्या मतांना लोकप्रियतेचा आभास निर्माण करता येतो. "वा सर! काय मोलाची माहिती दिलीत!" "सहमत" वगैरे मजकूर थोडे बदल करून वापरावा. आपल्या मित्र यादीतील आपल्यासारख्याच होतकरू फेसबुकी विद्वानांनाही याचा कॉपी-पेस्ट करताना फायदा होतो हेही लक्षात ठेवावे.

या रेसिपीचा उपयोग केल्यास काही आठवड्यातच आपण आपोआप एक "प्रसिद्ध व्यक्ति" म्हणून फेसबुकावर प्रसिद्ध झाल्याचे आढळून येईल. अधिकाधिक पोष्टी मारून आणि मित्रपरिवार वाढवून आपले वजन उत्तरोत्तर वाढवत ठेवणे महत्त्वाचे.

नव्या विद्वत्तेला हार्दिक शुभेच्छा!

आपले सर,
मच्छिंद्र फाटे

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

फार मोलाची माहिती दिलीत फाटे सर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सर' 'आपली' 'पोस्ट' 'लाईक' 'केली' आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

कोठे कोठे आहेत?
क्रुप्या हि माहिती गर्जूंसाठी द्यावी..

धन्यवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकावर कसे वावरावे? या बाबतीत जे घोर अज्ञान पसरून राहिलेलं आहे त्यावर ज्ञानाचे हे मौलिक किरण टाकल्याबद्दल धन्यवाद.

सर, मला काही प्रश्न आहेत. (मी तुमची शिकवणी मनावर घेतली आहे हे लक्षात आलं असेलच)

1. फेसबुकावर फेमस होणं आणि सामान्य जीवनात फेमस होणं यात नक्की फरक काय?
2. वेगवेगळ्या कंपूंमध्ये वेगवेगळ्या आयडींनी मातब्बर होणं याबद्दल आपलं काय मत आहे?
3. दोन एकमेकांविरुद्धच्या कंपूंमध्ये सामील झाल्याने आपुलाच वाद आपणांसि अशी परिस्थिती निर्माण होते का? तसा प्रसंग आल्यास काय करावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हा ठिगळ्या अर्धविराम कधीपासून झाला सर?"

मित्रांची प्रत्येक पोस्ट लाइकावी आणि प्रत्येक मताशी सहमत व्हावे.

उगाच धुंडाळत बसले असता अर्बन डिक्शनरीवर हे रत्न सापडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पन समद्यात भारी परकार जॅक निकोलसन बाबाचा , टेरिटरी मार्क करायचा, वूल्फ मधला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फॅडफॅड लिहायचे क्लासेस घ्याल का सर ? :-B तुमचे नाव मच्छिंद्र आहे की सच्छिद्र ? :-S
फार गाळीव माहिती दिलीत म्हणून विचारले हो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0