वण्णियार-दलित संघर्ष आणि जातीपातीचं राजकारण

भारतातली जातीपातीची समीकरणं आणि त्यामागचे सामाजिक-राजकीय घटक किती गुंतागुंतीचे असू शकतात त्याचं एक उदाहरण सदानंद मेनन यांच्या भाषणाबद्दलच्या ह्या वृत्तांकनात सापडेल. त्याचंच ताजं उदाहरण म्हणून दक्षिणेत सध्या गाजत असलेल्या इलवरासन प्रकरणाकडे पाहता येईल. गेले काही महिने हे प्रकरण दक्षिणेत गाजत होतं. वण्णियार ह्या अतिमागास जातीतल्या एका तरुणीनं इलवरासन ह्या दलित तरुणाशी विवाह केल्याचं निमित्त झालं. तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. मग धर्मपुरी ह्या गावात दलित घरांवर हल्ले झाले. अखेर वण्णियार मुलगी आपल्या आईकडे रहायला गेली. ४ जुलैला इलवरासनचा मृतदेह सापडला. ती आत्महत्या आहे की खून ह्यावर उहापोह चालू आहे. पट्टली मक्कल काची ह्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वासाठीच्या लढ्यामुळे ह्या सर्व घटनांना राजकीय रंग आलेला आहे. ह्या प्रकरणाविषयी अधिक माहिती देणारे काही दुवे :

'हिंदू'मधलं इंटरअ‍ॅक्टिव्ह ग्राफिक ('हिंदू'तल्या ह्या विषयावरच्या अनेक लेखांचे दुवे इथे मिळतील.)
माजी केंद्रीय मंत्री रामादोस आणि त्यांच्या पीएमके पक्षाचा संबंध 'काफिला'मधल्या ह्या लेखात आणि 'आउटलुक'मधल्या 'How Real-Life Tamil Love Stories End' ह्या लेखात उलगडून दाखवला आहे.
हिदुत्वाविरोधात उभे राहणारे उदारमतवादी ह्या प्रकरणाकडे फारसं लक्ष का देत नाहीत असा सवाल करणारा 'हिंदू'मधला एक लेख - No pink chaddis for PMK.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

नो पिंक चड्डीज फॉर पीएमके हा लेख लैच आवडला. हिंदूसारख्या कट्टर डाव्या पत्राकडून असे काहीतरी वाचायला मिळेल अशी वट्ट अपेक्षा नव्हती. या अपेक्षाभंगामुळे खूष झालो आहे.

बाकी घटनेबद्दल काय बोलू????? असोच. Sad Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिंदू हे 'कट्टर डावे वृत्तपत्र'????... असो. कदाचित तुमच्याही हाती शिक्के असावेत, ते गळून पडतील तेव्हा तुमचे मत कदाचित वेगळे असेल. पण ते ही असो.
रच्याकने तुम्हाला आवडलेला लेख हा 'ओपन-एडिशन' मधला आहे, तेव्हा त्यातील दृष्टिकोन वृत्तपत्राच्या अधिकृत/अनधिकृत तत्त्वप्रणालीशी सुसंगत असेलच असे नाही. आणि लेखकही 'हिंदू'च्या नेहमीच्या स्तंभलेखकांपैकी नव्हे. आणि हिंदू मधे असे परस्परविरोधी भूमिका असलेले लेख एकाच वेळी मी वाचले आहेत, अनेकदा. तेव्हा मला आश्चर्य वाटले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

आणि लेखकही 'हिंदू'च्या नेहमीच्या स्तंभलेखकांपैकी नव्हे.

तरीच Wink

आणि हिंदू मधे असे परस्परविरोधी भूमिका असलेले लेख एकाच वेळी मी वाचले आहेत, अनेकदा. तेव्हा मला आश्चर्य वाटले नाही.

तुमच्याइतकं माझं हिंदूचं वाचन नाही. परस्परविरोधी म्हणावेत असे लेख कधीतरी वाचलेत, पण जास्त नाही. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं