माध्यमांची अविश्वासार्हता, सनसनाटीची खाज, की आणखी काही?

काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'राहुल गांधी योग्य पर्याय: डॉ. सेन' ही बातमी वाचली. बातमीतला निवडक मजकूर :

>>मला राहुल गांधीचे व्यक्तीमत्व आवडते. ते माझ्याच कॉलेजमधून शिकले आहेत. मला त्यांच्याशी बोलताना कायमच आनंद वाटतो. राहुल हे लोकशाही विचारांमध्ये विश्वास ठेवतात. एक नागरिक म्हणून मला कायमच त्यांच्यावर गर्व आहे, असे सेन यांनी 'एनडीटिव्ही' या वृत्तवाहिनीवरून सांगितले. परंतु एक पंतप्रधान म्हणून त्यांच्यासाठी मतदान करण्यावर मी अद्याप विचार केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.<<

ह्यातलं वाईट मराठी खटकलं तरी त्याकडे मी दुर्लक्ष केलं. NDTVचा उल्लेख होता म्हणून त्यांच्या संकेतस्थळावर शोधलं. सेन ह्यांनी दिलेल्या मुलाखतीविषयीचा Don't regret remarks on Narendra Modi: Amartya Sen to NDTV after Bharat Ratna controversy हा दुवा तिथे मिळाला. दुव्यावर राहुलविषयीचं हे उद्धृत दिसलं -

>> >> "Do I like Rahul Gandhi? Yes...He is from my college. When I talk to him, I enjoy it. As a believer in democracy and as a proud citizen, we don't think of voting for a PM that way," Mr Sen said. << <<

वाचताक्षणीच लक्षात आलं की हे म.टा.च्या बातमीचं मूळ होतं. पण आणखी एक गोंधळ लक्षात आला. “As a believer in democracy and as a proud citizen, we don't think of voting for a PM that way.” ह्या वाक्याचा अर्थ 'राहुल हे लोकशाही विचारांमध्ये विश्वास ठेवतात. एक नागरिक म्हणून मला कायमच त्यांच्यावर गर्व आहे.' असा म.टा.मध्ये लावला गेला होता. खरं पाहता इंग्रजीमध्ये वाक्याचा कर्ता 'राहुल' नाही, तर 'we' आहे. म्हणजे सेन स्वत:विषयी आणि लोकशाही विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या आणि भारताचे नागरिक असण्याचा गर्व बाळगणाऱ्या त्यांच्यासारख्या इतरांविषयी काही विधान करत आहेत. हे विधान काय आहे? तर “we don't think of voting for a PM that way.” आधीच्या वाक्याचा (व्यक्ती म्हणून राहुल मला आवडतो, त्याच्याशी गप्पा मारायला आवडतात) संदर्भ घेतला, तर लक्षात येईल की सेन इथे असं म्हणताहेत की व्यक्ती म्हणून राहुल आवडला, तरी पंतप्रधानपदाकरता असा विचार ते करत नाहीत, म्हणजे व्यक्तिगत आवडनिवड बाजूला ठेवतात. आणि हे असं का? तर लोकशाहीवर विश्वास ठेवणारे भारताचे नागरिक असल्याचा गर्व बाळगणारे ह्या नात्यानं ते असं म्हणताहेत. म्हणजे म.टा.ला सेन ह्यांचं इंग्रजी झेपलं नाही असं दिसतं.

मग मला 'दिव्य मराठी'तला ह्याविषयीच्या बातमीचा दुवा मिळाला - देशाचे नेतृत्व करण्‍यास राहुल सक्षम, मोदी प्रभावहीन; नोबेलविजेते अमर्त्य सेन यांचे मत

त्यातलं हे उद्धृत पाहा -

>> राहुल गांधी यांचे व्यक्तीमत्व मला आवडते. राहूल यांचा लोकशाही विचारांवर विश्वास आहे. एक भारतीय नागरिक म्हणून मला त्यांच्यावर गर्व आहे. राहूल यांनी माझ्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. देशाचे नेतृत्व करण्यासाठी ते सक्षम असल्याचेही सेन यांनी सांगितले <<

इथेदेखील पुन्हा तीच चूक. ह्याचा अर्थ नक्की काय समजायचा? दोन्ही वृत्तपत्रांचा स्रोत एकच आहे आणि तो वाईट भाषांतरकार आहे, की आणखी काही? माध्यमं अविश्वासार्ह आहेत; त्यांना सनसनाटी मथळे आवडतात वगैरे सगळं म्हणायला मलाही आवडतं. पण त्यांच्या स्रोतांचं इंग्रजी उदाहरणार्थ वाईट वगैरे आहे म्हणून ती चुकीच्या बातम्या देतात हे एक थोरच. असो.

field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

http://www.ndtv.com/article/india/don-t-regret-narendra-modi-comments-am...
इथे सेनांनी नक्की काय म्हटले आहे ते कळते.

NDTV: The pride in being Indian, the interpretation also the remark and I know there have been different interpretations of this, but the interpretation has been that this is part again of a set political bias, that by saying this against Narendra Modi would mean that you would support Rahul Gandhi as the Prime Minister. Would you support Rahul Gandhi as Prime Minister?

Amartya Sen: I have been asked that question earlier. First of all I have not expressed a view on that. Have I decided who do I want to be my Prime Minister? I have not. Do I think as a voter; you know we don't have absentee ballots, so if I happen to get here on time would I be voting for a Prime Minister? No. We don't, we vote for a constituency candidate. My MP used to be member of the Communist Party until he was expelled from it, namely the former speaker Somnath Chatterjee, that's the level at which we face the choice. If Rahul Gandhi was in my constituency would I vote for him? That is not the same question as Prime Minister. Do I know Rahul Gandhi? Yes I do. Do I like him? Yes I do. Do I think he is a good product of my college, Trinity College, Cambridge? I happen to be a Master there. I have not been prevented from being there due to my Indian nationality. When I talk with him I enjoy it. When I chatted with him, I asked him if he was interested in politics? He said he wasn't. So, we didn't discuss politics. We discussed his career, what he might pursue, his interest in economic development that he had that time, which he probably still has. So that is a completely different question. You can't suddenly pick up some name and ask me that. The fact that the newspapers think this is a pro Rahul statement, if Rahul and Modi are the only alternatives, in that case by attacking Narendra Modi you must be pursuing the cause of Rahul, I can see that, but it seems to be such limited vision. As a believer in democracy and as a proud citizen of a democratic nation of India, I don't think we think of it that way. There are lots of alternatives in front of us. Rahul may well be a good alternative or may well be an excellent alternative, but I haven't made a view on that yet. I don't have to decide on that and if I decide on it, it'll be on the basis of much more discussion, to use a phrase by John Stuart Mill's idea, namely, 'democracy is government by discussion'. There is a lot of discussion to take place and I like having these discussions, as a citizen it is my duty to listen to these discussions.

बाय द वे, आपल्या उतार्‍यात जिथे सेनांनीच इंग्रजी नीट वापरली नाही तर मराठी वृत्तपत्रे त्याचे 'तंतोतंत' नीट भाषांतर कसे करणार? As a believer in democracy and as a proud citizen, we don't think of voting for a PM that way. चा अर्थ आपण लिहिला आहे तसा काढायचा असेल तर As believers in democracy and as proud citizens, we don't think of voting for a PM that way. असे बोलायला पाहिजे होते. As च्या पूर्वी But असता तर बरे झाले असते. आणि that च्या जागी this. But as believers in democracy and as proud citizens, we don't think of voting for a PM this way. म्हणजे तुम्ही काय लिहिले ते.

जिथे ९५% लोक फक्त जात पाहून मत देतात तिथे असा सरसकट we पण चूक आहे. 'आम्ही सारे भारतीय प्रत्यक्ष संबंध (शी बोललेले असणे), इ इ गोष्टींना महत्त्व देत नाही' असे त्यांना म्हणायचे असेल तर ते कोणत्या जगात जगात जगतात देवच जाणो.

माध्यमांच्या डोक्यात 'मोदी वि राजीव' आहे. 'मला मोदी नको' व 'राजीव उत्तम पर्याय ठरू शकतो' अशी विधाने सेनांनी केली आहेत. तेव्हा या बातम्या अशा न मांडणे वास्तवापासून दूर असेल.

"राहूल यांचा लोकशाही विचारांवर विश्वास आहे. एक भारतीय नागरिक म्हणून मला त्यांच्यावर गर्व आहे." ही दोन्ही पेपरांतील वाक्ये (भाषांतरे) चूक आहेत, पण सेन ज्या मार्दवाने बोलले आहेत 'त्याने राहूल यांचा लोकशाही विचारांवर विश्वास नाही' असा अर्थ कोणालाच अपेक्षित नसावा. 'गर्व' संबंधित वाक्य मात्र आपण म्हणता तसे दिशाभूल करणारे आहे. पण तरीही...त्यात काही सनसनी नाही.

मटा च्या बातमीत मला 'व्यक्तिमत्व'ची वेलांटी चूक आहे हे दिसले. कुठेही सुधारणा अनंत करता येतील, पण वाईट म्हणावंसं अजून त्या मराठीत काय काय आहे ते कळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

याच अर्थाची वाक्य बर्‍या मराठीत मी (मी व्यावसायिक भाषांतरकार नाही) अशी लिहेन:

मला राहुल गांधींचे व्यक्तिमत्त्व आवडते. ते माझ्याच कॉलेजमधे शिकले आहेत. त्यांच्याशी बोलणं आनंददायक असतं. राहुल यांचा लोकशाही विचारांवर विश्वास आहे. एक नागरिक म्हणून मला नेहेमीच त्यांचा अभिमान वाटेल, असे सेन यांनी 'एनडीटीव्ही' या वृत्तवाहिनीवर म्हटले. परंतु पंतप्रधान म्हणून त्यांना मत देण्याचा मी अद्याप विचार केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(गर्व आणि अभिमान या दोन शब्दांमधला घोळ मटाने घालावा यात काहीही आश्चर्य नाही. भाषांतरकारही तितपतच असावेत याचं आश्चर्य वाटणं लवकरच बंद होईल अशी आशा आहे.)

---

"Do I think he is a good product of my college, Trinity College, Cambridge?" असा प्रश्न स्वतः उपस्थित करून त्यावर मत मात्र मांडलेलं दिसत नाही. काय समजायचं ते समजलं.

जिथे ९५% लोक फक्त जात पाहून मत देतात तिथे असा सरसकट we पण चूक आहे.

सेनांनी कोणत्या we यांना एका गटात मोजलं ते म्हटलेलं आहेच, a believer in democracy and as a proud citizen of a democratic nation of India. जातीपातींकडे पाहून मतदान करणार्‍यांना लोकशाहीवर विश्वास असणारे कसं म्हणणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपण मटाच्या मराठीत बर्‍याच चूका काढल्या आहेत. त्या दुर्दैवी आहेत हे मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जातीपातींकडे पाहून मतदान करणार्‍यांना लोकशाहीवर विश्वास असणारे कसं म्हणणार?
असं आपण, मी, सेन, पत्रकार, राहूल म्हणणार नाहीत. पण 'तुम्ही जात पाहता म्हणून तुम्ही लोकशाहीवादी नाही' असं बहुसंख्य भारतीयांना म्हणालो तर त्यांना ते स्वीकार्य नसेल. जास्तीत जास्त लोक जात हा लोकशाहीचा अविभाज्य घटक मानतात. भ्रष्ट म्हणून कर्नाटकचे भाजप सरकार तोंडावर आपटले. १२० च्या जागी ४० जागाही मिळाल्या नाहीत. पण जो माणूस या भ्रष्टाचाराचा चेहरा होता, त्याला (एकट्याला) कर्नाटकात १०% मते मिळाली. तो कसाही निघाला तरी हे लोक त्याच्या जातीचे म्हणून त्यालाच मत देणार होते.
'तुम्ही लोकशाहीवादी नाहीत' असं या मतदारांना आपण पटवू शकू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे असं मत अमर्त्य सेनांचं आहे. त्यांच्या मताशी असहमत असण्याची मुभा सगळ्यांनाच आहे; हे मत अप्रामाणिक आहे असं मला तरी वाटत नाही. ९५%-५% हे आकडे सेनांनी मांडलेले नाहीतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>पण जो माणूस या भ्रष्टाचाराचा चेहरा होता, त्याला (एकट्याला) कर्नाटकात १०% मते मिळाली. तो कसाही निघाला तरी हे लोक त्याच्या जातीचे म्हणून त्यालाच मत देणार होते.

तिसरा भाग अगदी खरा असल्याची खात्री नाही. म्हणजे त्याच्या जातीच्या लोकांनी त्याची साथ केली हे खरे आहे. पण त्यामागे "तो कसाही असला" पेक्षा तो आपला माणूस आहे आणि त्याला त्याच्या भ्रष्टाचाराचा पुरेपूर फायदा करून घेणार्‍यांनी अंगाशी आल्यावर वार्‍यावर सोडले ही भावनासुद्धा असू शकते.

विचारप्रक्रिया अशी असेल.
-येडियुरप्पाची भाजपने खूप काळ पाठराखण केली. अगदी नाइलाज झाल्यावरच हाकलले. - म्हणून भ्रष्टाचारविरोधी* लोकांनी भाजपला घालवले.
-येडियुरप्पाचा फायदा करून घेऊन शेवटी भाजपने त्याला वार्‍यावर सोडले - म्हणून येडीयुरप्पाच्या लोकांनी त्याची पाठराखण केली. ही पाठराखण केली नसती तर आज मोदी पुन्हा येडियुरप्पाशी तडजोडीस तयार होऊ घातले आहेत ते झाले नसते.

*भ्रष्टाचारविरोधी लोक हा फारच डायसी शब्द आहे याची जाणीव आहे. कदाचित भाजप भ्रष्टाचारी (येडीच्या भ्रष्टाचारात भाजप सहभागी नाही) नाही अशी भाबडी समजूत असलेले लोक यात मोडत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माध्यमांचा मूळ प्रॉब्लेम हा आहे की मोदी वि राहुल अशी लढत त्यांनी स्वतःच ठरवली* आहे. त्यामुळे ही किंवा ती बाजू मांडणे अपरिहार्य आहे.

*हमने जो सुन लिया उसने कहा भी नही- अशी खरे तर माध्यमांची गत आहे. रेसमध्ये धावतच नसलेल्या** व्यक्तीला 'तो किती मागे राहिला पहा' असे म्हणण्यासारखे आहे.

**रेसमध्ये न धावताच मेडल घ्यायला जाणार नाही असे ठाम विधान करणे कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माध्यमांचा मूळ प्रॉब्लेम हा आहे की मोदी वि राहुल अशी लढत त्यांनी स्वतःच ठरवली* आहे. त्यामुळे ही किंवा ती बाजू मांडणे अपरिहार्य आहे.

राजकारणाचा अभ्यास असणार्‍या लोकांनी (नितिन, ऋषिकेश इ) त्यांना कोणकोण लोक पंतप्रधानपदाचे दावेदार वाटतात, आणि ते का याबद्दल लिहावं अशी विनंती. पुन्हापुन्हा सांगितल्यामुळे मलाही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक होणार असं वाटायला लागलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक खरे की, १९८९ पासून ते आजतागायत सलग २४ वर्षे गांधी घराण्यापैकी कोणीही पंतप्रधान पदावर नाही. तरीदेखिल, भारतीय राजकारणावरील त्या घराण्याचा प्रभाव नाहिसा वा कमी झाल्याचे दिसत नाही.

तात्पर्य - राजकारणावरील आपला प्रभाव वाढविण्यासाठी (वा किमान आहे तसा ठेवण्यासाठीदेखिल) आपण पंतप्रधान (वा अन्य कोणत्याही घटनात्मक पदावर) असण्याची आवश्यकता नाही, हे राहुल यांना पुरते ठाऊक आहे (असावे).

मग मोदी वि. राहुल गांधी अशी आभासी लढत ठेवण्यामागे कुणाला रस असावा, हे पाहणे रोचक ठरावे!

एक शक्यता अशी आहे की, आमच्या तेजतर्रार नेत्यापुढे तो कसा अगदीच निष्प्रभ आहे, हे सतत दाखविण्याची काहींची राजकीय गरज (वा अपरिहार्यता) असू शकते! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्यास माहिती नाही आवड नक्की आहे. Smile
माझ्यामते पंतप्रधान पदाचे दावेदार बरेच आहे पण ही लढत दोन व्यक्तीमत्त्वांमध्ये नाही. पुढील पंतप्रधान काँग्रेसचा नसेल असा (आणि इतपतच) सध्यातरी* कयास आहे.

* येत्या काहि महिन्यात काँग्रेस पक्षाकडून काय पावले उचलली जातात त्यावर हे मत बदलूही शकेल.

मागे एका लेखात चार शक्यता दिल्या होत्या, त्यापैकी प्रत्येक शक्यतेसाठी वेगळे पंतप्रधानपदी बसु शकतात:

शक्यता १: मतदार स्थानिक राजकारण + राष्ट्रीय कल असा दोन्हीचा विचार करून मतदान करतील. कोणत्याही पक्षासाठी किंवा विरुद्ध अशी राष्ट्रव्यापी लाट नाही.

तिसर्‍या आधाडीतील एक नेता. मायावतींचा किमान बाहेरून पाठिंबा आवश्यक त्यामुळे त्या आणि मुलायम बाद, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, फारूक अब्दुल्ला, जयललिता किंवा शरद पवार यांपैकी एक उरले (चंद्राबाबू, देवेगौडा, चौटाला, अजित सिंह, लालू, गोगोई आदी नेत्यांना संधी नाही असे माझे मत आहे) . त्यात डाव्यांची मदत आवश्यक झाल्यास ममता बाद, राजदची मदत आवश्यक झाल्यास नितीश बाद, फारूख अब्दुल्लांकडे अतिशय कमी जागा त्यात त्यांची मनी पॉवर तितकी जास्त नसल्याने त्यांची शक्यता कमी. त्यामुळे अंतीम निवड नवीन पटनायक, जयललिता व शरद पवारांमध्ये होईल. त्यात जयललिता यावेळी ३०+ गेल्या तर त्यांना रोखणे कठीण जावे. नैतर नवीन पटनायक किंवा शरद पवारांना 'चानस' मिळू शकतो.
यात जर मायावतींनी मोठी मजल मारली व समाजवादी २०च्या खाली गेली तर त्यांची शक्यता सर्वाधिक होते. थोडक्यात नक्की नेता आता सांगता येणार नाही Smile

२. काँग्रेस विरोधी राष्ट्रव्यापी लाट मात्र भाजपासाठी राष्ट्रव्यापी लाट नाही.

राजनाथ सिंह यांची शक्यता सर्वाधिक. नैतर मग जेटली, स्वराज, अडवाणी (उतरत्या क्रमाने) आहेतच. तेही नाही जमले तर मायावती किंवा जयललिता यांची शक्यता वाढते.

३. काँग्रेस विरोधी राष्ट्रव्यापी लाट शिवाय भाजपासाठी ध्रुवीकरण घडून काहि प्रमाणात राष्ट्रव्यापी लाट.

मोदी यांची शक्यता. नैतर मग जेटली, राजनाथ सिंह, स्वराज, अडवाणी (उतरत्या क्रमाने) आहेतच.

४. काँग्रेस व भाजपा दोघेही आपापल्या मतदारांचे ध्रुवीकरण करू शकले मात्र काँग्रेसविरोधी राष्ट्रीय भावना.

पुन्हा शक्यता २ प्रमाणेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>राजकारणाचा अभ्यास असणार्‍या लोकांनी (नितिन, ऋषिकेश इ)

कसचं कसचं Wink अभ्यास वगैरे काही नाही.

>>कोणकोण लोक पंतप्रधानपदाचे दावेदार वाटतात

भारतातल्या लोकशाही प्रणालीत "पंतप्रधानपदाचे दावेदार" असं काही असत नाही. पक्ष आणि त्याचे मतदारसंघातील उमेदवार हेच खरे. त्यातही मुख्यत्वे पक्षाची धोरणे काय आहेत हे महत्वाचे असते. व्यक्ती मुळीच महत्त्वाची नाही. [सध्या मनमोहनसिंग यांच्याबद्दल जे मत अर्थशास्त्रीय वर्तुळात व्यक्त होतात ती पाहता व्यक्ती महत्त्वाची नाही पक्ष महत्त्वाचा ही बाब अधोरेखित होते आहे. मनमोहनसिंग कितीही अर्थशास्त्री असले तरी त्यांना पक्षाचीच धोरणे पुढे न्यावी लागणार]. निवडणुकीच्या राजकारणात व्यक्ती पक्षापेक्षा महत्त्वाची अशी परिस्थिती अपवादात्मक असते. त्यासाठी व्यक्ती आपल्यामागे पक्षाला फरपटत नेऊ शकते अशी त्या व्यक्तीची ताकद हवी.

अशी ताकत आजतागायत फक्त इंदिरा गांधींकडे होती असे वाटते. नेहरूंनी पक्षाला आपल्या मताकडे वळवले पण त्यात 'फरपटवणे' कमी होते. एकूणच स्वातंत्र्यलढ्यातला कन्सेन्सस त्यांच्या पथ्यावर होता.

*९८च्या निवडणुकीत बाजपेयींनी 'मी संघाच्या धोरणांना मुरड घालण्यास भाग पाडेन असा विश्वास मतदार आणि सहयोगी पक्षांमध्ये निर्माण केला होता.*

मुद्दा असा की काँग्रेसने समजा मनमोहनसिंग किंवा श्री. क्षयज्ञ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले तर काय फरक पडतो? त्यांना काँग्रेसचीच धोरणे चालवायची आहेत. आणि त्या काँग्रेसच्या धोरणांना अनुसरूनच लोक मते देणार आहेत किंवा देणार नाहीत.

आणखी एक उदाहरण.... सध्या सुखवस्तू मध्यमवर्गाचा फूड सिक्युरिटी बिलाला विरोध आहे. हेच सुखवस्तू मध्यमवर्गीय मुख्यत्वे मोदींचे चाहते आहेत. पण मोदी ज्या भाजप पक्षाचे आहेत त्या भाजपचा मात्र या बिलाला पाठिंबा आहे. आता मोदी भाजपच्या या विषयातील धोरणात बदल करू शकतात का? बहुधा नाही. तसे त्यांच्या पाठिराख्यांना वाटत असण्याची शक्यता मात्र आहे.

बाकी मोदी पंतप्रधान नसतील तर भाजप ग्रोथ गव्हर्नन्स ही धोरणे ठेवणार नाही का?

अगदी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न करायचा तर फेसबुकवरून राहुल गांधीची टर उडवणारे लोक उद्या गांधी फॅमिलीने काँग्रेस आणि राजकारण सोडून संन्यास घेतला तर उद्यापासून काँग्रेस पक्षाला पाठिंबा/मत देणार आहेत काय? नाही. या लोकांचा काँग्रेसविरोध गांधी फॅमिलीशी संबंधित नाहीच. तो काँग्रेस चालवत असलेल्या धोरणांमुळे आहे. "भारतीय राजकारणातले जे जे काही नकोसे-अनैतिक आहे त्याचे काँग्रेस प्रतिनिधित्व करते" असे त्यांचे मत असू शकते. असे मत असणे फेअर आहे. त्या आधारे काँग्रेस हटवण्याची गरज त्यांना वाटू शकते. ती गरज मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार की आणखी कोणी यावर अवलंबून नाही. तशीच ती काँग्रेसतर्फे राहुल पंतप्रधान होणार की सिब्बल की चिदंबरम यावरही अवलंबून नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

व्यक्तिम'त्त्व'! असं असायला हवं ना? की नवीन मराठी शुद्धलेखनाच्या नियमानुसार 'त्व' असायला हवं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

सामान्य भाषिकाला 'त्व' आणि 'त्त्व' ह्यांमधील उच्चाराचा फरक जाणवत नाही. (जसा त्याला 'कवि' आणि 'कवी' ह्यातील फरकहि जाणवत नाही.) त्यामागे काही व्याकरण आहे असल्या निरुपयोगी विचाराशी त्याचे काही देणेघेणे नाही. लोकशाही पद्धतीत अभिजनांच्या असल्या फाटेफोडीला स्थान नाही. बहुमत झिंदाबाद.

'व्यक्तिमत्व' हे बरोबर. खरे पाहता 'व्यक्तीमत्व' असेच लिहायला हवे कारण 'व्यक्ति' हा कालबाह्य उच्चार बहुसंख्यांना मान्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मटा काय किंवा कोणताही छापिल वा इलेक्ट्रॉनिक मिडीया काय, त्यांच्या सनसनाटीकडे बघताना आधी हसु होते आणि त्या हसण्याचे रुपांतर आधी रागात आणि मग 'कीव' करण्यात झाले आहे.

या माध्यमांची (आणि त्यात लिहिले/बोबलेले सगळे सगळे खरेच/योग्यच आहे असे मानणार्‍यांचीही) कीव करावी तेवढी थोडीच आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> आपल्या उतार्‍यात जिथे सेनांनीच इंग्रजी नीट वापरली नाही तर मराठी वृत्तपत्रे त्याचे 'तंतोतंत' नीट भाषांतर कसे करणार? <<

एक दुरुस्ती - सेन ह्यांच्या वक्तव्याचं वार्तांकन एनडीटीव्हीनं केलं. त्यामुळे इंग्रजी कुणाचं चुकलं ते नक्की सांगता येत नाही. परंतु तो मुद्दा नाही. त्या वाक्याचं भाषांतर करताना राहुल गांधींना एका भागाचा कर्ता (लोकशाही विचारांवर विश्वास) आणि सेन ह्यांना उरलेल्या भागाचा कर्ता (मला त्यांच्यावर गर्व) मानून करणं हे भयंकरच अतार्किक आणि म्हणून हास्यास्पद वाटतं.

>> सेन ज्या मार्दवाने बोलले आहेत 'त्याने राहूल यांचा लोकशाही विचारांवर विश्वास नाही' असा अर्थ कोणालाच अपेक्षित नसावा. 'गर्व' संबंधित वाक्य मात्र आपण म्हणता तसे दिशाभूल करणारे आहे. पण तरीही...त्यात काही सनसनी नाही. <<

राहुल ह्यांच्याविषयी जे व्यक्तिगत वाटतं त्याचा असा अर्थ काढणं ('राहूल यांचा लोकशाही विचारांवर विश्वास नाही असा अर्थ कोणालाच अपेक्षित नसावा' असा अर्थ) हे विनोदी वाटलं. कारण ते तर्कशास्त्र असं दिसतं -
१. मला क्ष व्यक्तीविषयी जिव्हाळा वाटतो.
२. माझा लोकशाही विचारांवर विश्वास आहे.
३. म्हणून क्ष व्यक्तीचा लोकशाही विचारांवर विश्वास नाही असा अर्थ अपेक्षित नाही.

>> 'तुम्ही जात पाहता म्हणून तुम्ही लोकशाहीवादी नाही' असं बहुसंख्य भारतीयांना म्हणालो तर त्यांना ते स्वीकार्य नसेल. जास्तीत जास्त लोक जात हा लोकशाहीचा अविभाज्य घटक मानतात. <<

पुष्कळ लोकांना एखादी गोष्ट खरी वाटू लागली म्हणजे ती खरी होते असा नियम नाही.

>> या माध्यमांची (आणि त्यात लिहिले/बोबलेले सगळे सगळे खरेच/योग्यच आहे असे मानणार्‍यांचीही) कीव करावी तेवढी थोडीच आहे <<

हे खरं असलं, तरी वरचं बहुसंख्यांविषयीचं उद्धृत वाचलं तर हे लक्षात येईल, की खोट्या गोष्टी पुन्हापुन्हा ठासून मांडल्या तर त्या खोट्या असूनही लोकांना त्या खऱ्या वाटण्याची शक्यता वाढते. म्हणून त्याविषयी बोंब ठोकणं गरजेचं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे खरं असलं, तरी वरचं बहुसंख्यांविषयीचं उद्धृत वाचलं तर हे लक्षात येईल, की खोट्या गोष्टी पुन्हापुन्हा ठासून मांडल्या तर त्या खोट्या असूनही लोकांना त्या खऱ्या वाटण्याची शक्यता वाढते. म्हणून त्याविषयी बोंब ठोकणं गरजेचं वाटतं.

गोष्टी वाईट आहेत असे म्हणून आवाज उठवणे वेगळे आणि 'आम्ही' गोष्टी वाईट करतो याची जाणच न ठेवता 'आमच्याबद्दल' सरसकट 'आमची' मूल्ये फार उच्च आहेत असे दाखवणारे विधान करणे वेगळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एक दुरुस्ती - सेन ह्यांच्या वक्तव्याचं वार्तांकन एनडीटीव्हीनं केलं. त्यामुळे इंग्रजी कुणाचं चुकलं ते नक्की सांगता येत नाही.
मी दिलेल्या लिंकमधे आपण सेनांना बोलताना ऐकू शकता. त्यात एनडीटीवीचा काहीही संबंध नाही. इंग्रजी कुणाचं चुकलं ते नक्की सांगता येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुद्दा तो नाहीच. पुढचा प्रतिसाद वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या लेखनाच्या शीर्षकातील खाज हा शब्द संपादित करण्यात यावा ही विनंती. या शब्दाने लेखक किंवा चर्चा करणारे पुन्हा त्याच (ज्यांत माध्यमे आहेत) पटडीतले आहेत असे सूचित होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> मग मला 'दिव्य मराठी'तला ह्याविषयीच्या बातमीचा दुवा मिळाला - देशाचे नेतृत्व करण्‍यास राहुल सक्षम, मोदी प्रभावहीन; नोबेलविजेते अमर्त्य सेन यांचे मत <<

आजच्या 'दिव्य मराठी'तला 'धीरोदात्त सेन' हा अग्रलेख अमर्त्य सेन ह्यांची स्तुती करतो आहे. ही पश्चातबुद्धी म्हणावी का, ते मात्र सांगता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

http://www.business-standard.com/article/beyond-business/sen-dreze-s-unc...

(एक अनिश्चित वैभव - भारत आणि त्याचे विरोधाभास) या सेनांच्या पुस्तकाचा बिझनेस स्टँडर्ड ने चांगलाच समाचार घेतला आहे. दोन निवृत्तांची निरर्थक बडबड ते पुस्तक वाचायची गरज नाही असे कॉमेंटस दिले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसादाचं प्रयोजन कळलं नाही. माध्यमांचं वार्तांकन काय जातकुळीचं आणि दर्जाचं आहे ह्याविषयी हा धागा होता. उदाहरणार्थ, 'दिव्य मराठी'नं आपल्या बेजबाबदार बातमीविषयी दिलगिरी व्यक्त केली असं माझ्या तरी वाचनात नाही, पण त्या पार्श्वभूमीवर संपादकीयात एकदम अशी कोलांटउडी घेतली हे मला गंमतीशीर वाटलं. (आणि संपादक 'ऐसी अक्षरे' वाचतात की काय, अशी शंकाही आली!) म्हणून ह्या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी मी वरचा प्रतिसाद दिला होता. ह्या धाग्यात सेन ह्यांच्या पुस्तकाच्या दर्जाविषयी चर्चा (मला तरी) अपेक्षित नव्हती. उपरोल्लेखित परीक्षणात बिझनेस स्टॅन्डर्डची बौद्धिक दिवाळखोरी दिसते असं काही तुम्हाला म्हणायचं आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मटा, दिव्य मराठी, लोकसत्ता, सकाळ यांच्याबाबत (यांच्यासारख्या प्रांतिक आणि हिन्दी) बोलतानाच सह्सा लोकांना खाज आणि सनसनीची आठवण होते. बीबीसी सारखे काही अपवाद वगळले तर ही खाज जगद्व्यापी आहे. या चर्चेत तिचं हे रुप पुढे येताना दिसत नाही.

बीएसची बौद्धिक दिवाळखोरी आहे असं मला म्हणायचं नाही पण तो अजून चांगली भाषा वापरू शकता असता आणि तेच म्हणणे मांडू शकला असता. गूगलन्यूज मधे वर्ल्ड न्यूज पाहायला गेले तर पुन्हा तेच. जगातली सगळी मोठी वृत्तपत्रे काहीतरी सनसनीदायक सांगण्यासाठी आतूर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>मटा, दिव्य मराठी, लोकसत्ता, सकाळ यांच्याबाबत (यांच्यासारख्या प्रांतिक आणि हिन्दी) बोलतानाच सह्सा लोकांना खाज आणि सनसनीची आठवण होते. बीबीसी सारखे काही अपवाद वगळले तर ही खाज जगद्व्यापी आहे.<<

बीबीसीच्या पूर्वग्रहांविषयी आरोप झालेले आहेत आणि लोकांनी त्या संदर्भात पुरावेदेखील दिलेले आहेत. उदा : हे पाहा. ह्या दुव्यात दिलेल्या लेखासारखा मुद्देसूद उहापोह मराठीमध्ये घातला जाताना क्वचितच दिसतो. त्यापेक्षा शेरेबाजी पुष्कळ चालते. म्हणून असा उहापोह करणं गरजेचं वाटतं. शिवाय, हे संकेतस्थळ मराठी असल्याकारणानं इथे मराठी माध्यमांविषयीची चर्चा होणं स्वाभाविक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||