अलीकडे काय पाहिलंत? -७
याआधीचे भाग: १ । २ । ३ । ४ । ५ । ६
विनोद खन्नाचा फ्रेंच डुप्लिकेट जेरार्द दिपार्दिउ याची मुख्य भूमिका असलेला 'लुलु' नामक चित्रपट पाहिला. चित्रपटाचं नाव जरी जेरार्दच्या पात्राचं नाव असलं तरीही त्यात मुख्य पात्र त्याची मैत्रिण नेलीचं असावं असं वाटलं.
जाहिरातक्षेत्रात काम करणार्या नेलीने तिच्याच क्षेत्रातल्या माणसाशी लग्न केलं आहे; पण या बूर्ज्वा नवर्याबरोबर ती फार आनंदात नाही. तिची लैंगिक भूक त्याच्याकडून भागत नाही म्हणून ती लुलुकडे आकर्षित होते. कष्टकरी वर्गातला, बेरोजगार लुलुशी तिचं नातं शारीरिक पातळीवर सुरू होतं. हे काही फार दिवस टिकणार नाही असं आधी नवर्याला वाटत असतं. उलट, डोक्याने किंचित बालबुद्धी पण प्रामाणिक लुलुच्या ती प्रेमातही पडते. तिला जे हवं असतं ते त्याच्याकडून मिळतं, त्याबदल्यात त्याला पोसायला तिला अडचण वाटत नाही. ती त्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, पण या नात्यात ती स्वतःच बदलते. दोन पुरुषांमधे (नवरा आणि प्रियकर) स्वतःची ओढाताण होते आहे हे लक्षात आल्यावर ती नवर्याच्याच ऑफिसात असणारी नोकरीही सोडते. दोघांनाही मूल हवं असतं, पण उत्पन्न नाही म्हणून ती गर्भपात करून घेते. त्यांच्यात भांडणही होतात.
चित्रपटाची गोष्ट फार महान नाही, पण त्यातला साधेपणा आणि सूचक सादरीकरण आवडलं. जेरार्द दिपादिउ (मला फार आकर्षक वाटला नाही तरीही) अभिनेता म्हणून आवडला.
प्रतिक्रिया
जेरार्द दिपार्दिउ - त्याचा
जेरार्द दिपार्दिउ - त्याचा फोटू पाहिल्यावर ओळखीचा चेहरा वाटला, म्हणजे वरवर चित्रपटांमधून झळकणारा. विकी केल्यावर लक्षात आलं की अरे हा तर 'लाईफ ऑफ पाय' मधे होता.. जहाजामधला 'कूक', ज्याच्याबरोबर पाय चे वडील मारामारी करतात.
( पण त्याची तुलना विनोद खन्नाशी केलेली काही पटली नाही म्हणजे जर त्याच्या दिसण्याच्या बाबतीत ती केली असेल तर, मला तर बुवा फारच फरक दिसला. )
न्युयॉर्कर
न्यूयॉर्कर मधला एक लेख नुकताच वाचनात आला.
ह्या लेखाचे वर्णन मी एक चांगला लेख कसा असावा याचे उदाहरण म्हणुन घेईन. आपल्यापैकी बरेच जण सोशल मिडीया मधुन भिरभिरणाऱ्या अर्ध्या-कच्या-विपर्यास्त-अनर्थ केलेल्या मेनस्ट्रीम मिडीया मधील लेखांचे दुवे नेहमीच वाचत असतो. त्या पार्श्वभूमीवर हा एक रोचक लेख. या लेखाची वैशिष्टे सांगायची तर आटोपशीर असूनही बरेच काही सांगून जाणारा. लेख चीन बद्दल आहे[एकाधिकारशाही देशात सत्तेबाहेरील समाज हा मेंढ्यांचा कळप असतो व सरकार मेंढपाळ/मायबाप. नेहमीच सर्व सरकारी माध्यमे, केंद्रे सरकारी धोरणे जनतेच्या गळी उतरवत असतात.] , लेख चीन मधे घडणार्या करंट इव्हेन्ट्स वर आहे, चीनच्या संस्कृतीबद्दल जरासे बोलणारा आहे, चीन सरकारच्या पॉलिसी बद्दल, बदलत्या सामाजिक स्थितीवर, थिअरी मधे समाज-देशाकरता उत्तम वाटणार्या पॉलिसीचा प्रत्यक्ष मानवी नात्यावर-आयुष्यावर होणारा परिणाम भाष्य करणारा आहे, ओघवती सफाईदार इंग्रजी भाषा असलेला आहे, मोजक्या रोचक लेखांचे दुवे देणारा आहे, सरकार-सामान्यमाणूस-बुद्धीजीवी यांची मते तसेच परिस्थिती काय हे दाखवून देणारा पण जेमतेम ५ ते ६ परिच्छेदाचा! उगा विनोदी नाही की गरजेपेक्षा जास्त गंभीर, अभ्यासू आकडेवारीतला नाही, तर्क कर्कश्य नाही की आक्रस्ताळी नाही. असे लेख वाचायला मजा येते. अशा लेखातून परदेश-त्याची संस्कृती अजुन छान कळते. अर्थात जसे आर्ट फिल्म बघायला जाताना मनाची एक विशिष्ट बैठक/ तयारी असावी लागते तसेच जरासे असे वाचन करताना गरजेचे असेलही. कारण बरेचदा कौतुक केलेले परीक्षण वाचून अपेक्षेने सिनेमा पाह्यल्यावर आपल्याला तस्साच्या तस्सा अनुभव येईलच असे नाही. त्याप्रमाणे हे मत वाचून हा लेख वाचणाऱ्याला हे सगळे असे जाणवेल असे नाही यातही वेगळे मत असेलही. ह्या लेखिकेबद्दल मला जास्त माहिती नाही पण हा लेख एक लेख म्हणून पौष्टिक वाटला.
जाताजाता: वूडी अॅलनचा मॅनहॅटन नावाचा एक कृष्णधवल सिनेमा पाहीला. न्युयॉर्क्/मॅनहॅटनचा नेपथ्य म्हणून फार वापर इतका छान की जणू सिनेमातील एक जीवंत कलाकार.
Orange Is New The Black
नेटफ्लिक्सची एक नविन सिरीज, Orange Is The New Black पाहिली.
The animals, the animals
Trapped, trapped, trapped 'till the cage is full
The cage is full
Stay awake
In the dark, count mistakes
The light was off but now it's on
Searching the ground for a bitter song
The sun is out, the day is new
And everyone is waiting, waiting on you
And you've got time
And you've got time...
एक सुंदर गोरी (व्हाईट) ब्लाँड मध्यमवर्गीय 'टेकन' अशी (थोडक्यात माझ्यासारख्या उमद्या, होतकरू आणि कर्तबगार तरूणाची गर्लफ्रेंड शोभेल अशी) 'पायपर च्यापमन' तिच्या, हार्मोन्स गोंधळ घालतात त्या वयात (म्हणजे नवतारूण्यात, we all have been there! Well, you all! I might still be going through it) केलेल्या चुकीमुळे १५ महिन्यांसाठी जेलमध्ये जाते. तिच्या शिक्षेआधीच्या, जेलबाहेरील आणि जेलमधल्या एकंदरीत आयुष्यावर बेतेलेली ही सिरीज बघण्यासारखी आहे. पायपर कर्मन या बाईची स्वानुभावर बेतलेल्या पुस्तकावर आधारीत मालिका गेल्याच महिन्यात नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाली.
नात्यांमधली गुंतागुंत, जेलमधल्या भयानक आयुष्याला, सामान्य मनुष्याच्या जीवनाचे अपरिहार्य अंग असलेली, राग-लोभ-मत्सर इत्यादीची जोडलेली झालर, अशक्य तरीही वास्तवाशी घट्ट जोडलेली व्यक्तीमत्त्व वगैरे गोष्टी तुमच्यातल्या मध्यमवर्गीय मनाला हादरवून टाकतात. होमोसेक्शुअॅलिटी, ट्रान्सजेंडर, सेक्स चेंज, ड्रग्ज, कट्टर धार्मिक, जेलमधील रेप, राजकारण, स्मगलिंग, भ्रष्टाचार, अत्याचार वगैरे गोष्टींचं चित्रण फारच परिणामकारक आहे. प्रत्येकाच्या आयुष्याची "आई झवली" आहे, त्यातून मार्ग काढायचा प्रत्येकजण प्रयत्न करतोय. कधी ते प्रयत्न त्या दलदलीत अजूनच खोल नेताहेत तर कधी बाहेर निघण्याची आशा दाखवताहेत. जेलमध्ये असलेल्यांच आयुष्य जवळजवळ थांबलेलं आहे, बाहेरच्या आयुष्यात मिळणार्या सहजसोप्या गोष्टी इथे दुर्मिळ आहेत, आणि अशा 'किरकोळ' गोष्टी मिळवण्यासाठी कधी काय किंमत चुकवावी लागेल काय माहित! काहींनी ठरवून गुन्हे केलेत, काही परिस्थितीला बळी पडलेत, काहींचे स्वभाव त्यांन नडलेत तर काहींचे अज्ञान.
कलाकारांनी त्यांचे रोल छान केलेत. जेलमधी व्यक्तीमत्वं फुलवताना ती ती व्यक्ती जेलमध्ये कशी आली याची गोष्ट फ्लॅशबॅकमध्ये टप्प्या टप्प्याने आणि प्रभावीपणे चित्रीत केली आहे. प्रोटॅगॉनिस्टचा रोल केलेली टेलर शिलिंगला बर्यापैकी, जेलमधील काही गंभीर प्रसंग सोडले तर एरवी तीचा अभिनय चांगला आहे. विशेषतः हॉट, ब्लाँड लेस्बियनच रोल तिला उत्तम जमला आहे. (हे कदाचित वीशफुल थिंकिंग असु शकेल. हॉट ब्लाँड लेस्बियन कोणाला आवडत नाही सांगा?) तिची "अकम्प्लीस" असलेली अलेक्स, इंटरनॅशनल ड्रग्ज डीलर, हुशार धूर्त वगैरे लॉरा प्रेपनने चांगली वठवली आहे.
डिस्क्लेमरः सलग, १३ तासांत, ही सिरीज पाहून संपवल्यास स्वतःलाच 'करेक्शन फसिलीटी' मध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते.
-Nile
सहमत
सहमत आहे. शिवाय हे चित्रण करताना कुठेही पोझ किंवा अगदी वादग्रस्त मुद्द्यांवरही भूमिका घेऊन काही एक भाष्य करण्याच्या फंदात दिग्दर्शक सुदैवाने पडलेला नाही.
तंतोतंत. मुख्य कलाकारांबरोबरच इतर कलाकारांची निवडही नेमकी. जेसन बिग्जचं पात्र 'अमेरिकन पाय' मधल्या त्याच्या भूमिकेच्या वळणाने जातंय की काय, असं आधी वाटून गेलं; पण तो धोकाही टाळलेला दिसतो. पहिल्या काही भागांत वर्तमानातून फ्लॅशबॅकमध्ये जाताना वापरलेल्या काही क्लृप्त्या किंचित ढोबळ होतात, पण ते अगदीच क्षणिक.
थोडे अवांतर -
१. टीव्हीवर जर ही मालिका नेहमीच्या पद्धतीने दाखवली गेली असती, तर रेटिंगच्या गर्तेत रुतून एक तर दिग्दर्शकाला काही तडजोडी करणं भाग पडलं असतं किंवा कदाचित पहिल्या सीझननंतर खेळ आटोपला असता. नेटफ्लिक्ससारख्या अपारंपारिक माध्यमामुळे अशा वेगळ्या विषयावरच्या मालिका रेटिंगच्या कचाट्यातून सुटल्या आहेत, असं निरीक्षण एनपीआरवरच्या एका चर्चेत नोंदवलं गेलं होतं; ते ही मालिका पाहून पटतं. बिंज वॉचिंगच्या काही तथाकथित तोट्यांपेक्षा अशा स्वरूपाच्या निराळ्या मालिका आपल्या सोयीप्रमाणे पाहता येणे, हा एक मोठा फायदा आहे.
२. वर्णभेदाचं वास्तव आणि त्याने पडलेले गट-तट हे अगदी ओघाने मालिकेत येतं. वर्णभेदाच्या ढोबळ अन्यायापेक्षाही मध्यमवर्गीय श्वेतवर्णीयांना उपलब्ध असणार्या सुधारण्याच्या अनेक संधी आणि त्याच वेळी गरीब, कौटुंबिक पाठबळ नसणार्या कृष्णवर्णीयांना तुरुंगापेक्षाही खडतर वाटणारं बाहेरचं जग; हा फरकही सहजपणे समोर येतो. योगायोगाने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'फ्रूटवेल स्टेशन' या चित्रपटातला एक प्रसंगही हा फरक नेमकेपणे दाखवून जातो. (त्या संदर्भातला हा लेखही वाचनीय).
+१
स्लेटमधील तोटे म्हणजे "कॅल्क्युलेटर्सने मेंदुचे नुकसान होणार" टाईप वाटले.
फ्रुटवेल स्टेशन पहायचा आहे, ट्रेलर आवडला होता. स्पॉयलर्स नको म्हणून त्याबाबत काही वाचत नाही.
सिरीजच्या सुरुवातीला 'गुड ओल्ड ज्यु' फॅमिलीवर बेतलेले विनोद आऊट ऑफ प्लेस वाटले होते, पण नंतर त्या कुटुंबाचे संवाद, पायपरचा भाऊ, पायपरची आई आणि पायपरची वस्तुस्थिती यातील विचित्र कनेक्शन कथेमध्ये एक प्रकारचा डार्क ह्युमर निर्माण करते असं वाटतं. पायपरचे जेलबाहेरील एकंदरीत सर्वच आप्त पायपरच्या वस्तुस्थितीपासून तुटक वाटतात, तर आतले सर्व अगदी त्या विरुद्ध. एकप्रकारे 'तुझी एकटीचीच परिक्षा आहे', जुनी पायपर आता मेली आहे (जेलमुळे पुर्वीचं आयुष्य संपलं आहे) वगैरे यातून जाणवत राहते.
शक्य आहे. विशेषतः चॅनल एक्झीक्युटीव्ह लोकांची मर्जी सुद्धा. नुकतंच 'फायरफ्लाय' पायलट दाखवण्या आधीच फॉक्स चॅनेलच्या लोकांनी शो कसा संपवला हे वाचले.
-Nile
आयर्टन सेन्ना
आयर्टन सेन्ना ह्या ब्राझिलीयन रेसरच्या आयुष्यावर आधारीत ’सेन्ना’ ही डॉक्युमेटंरी पाहिली. खुप आवडली. सेन्नाने तीनवेळा ग्रां.पी. विश्ववीजेतेपद भुषवले होते. वयाच्या ३४ व्या वर्षी त्याचा अपघाती मृत्यु झाला.
एपिलोग नावाची ११ मिनिटांची
एपिलोग नावाची ११ मिनिटांची अमेझिंग जर्मन शोर्ट फिल्म बघितली .
एंड ऑफ रिलेशनशिप असा विषय रोमांचक पद्धतीने मांडला आहे . यु ट्युब वर
उपलब्ध आहे . अधिक माहिती न देता फिल्म अवश्य बघावी असे मला वाटते .
सध्या मी कैच्याकै टाईमपास
सध्या मी कैच्याकै टाईमपास शिण्मे पाहतेय. आशिकी२, हम तुम, जिँदगी ना मिलेगी दोबारा, नमस्ते लंडन, माय नेम इज खान...
To be or not to be
कालच उन्हात पिळून निघण्याच्या कंटाळ्यावर उतारा म्हणून मेल ब्रूक्सचा To be or not to be पाहिला. भडकमकर मास्तरांनी या चित्रपटाबद्दल लिहीलं आहे. हा दुवा मास्तरांनी न लिहीलेले अनेक काळे विनोदही या चित्रपटात आहेत हे पुन्हा एकदा पहाताना जाणवलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१
मी देखिल हा सिनेमा कालच पाहिला आणि मजा आली.
सेम पिंच?
तुम्हा दोघींच्याही रिस्पेक्टिव डाव्या खांद्यांवर तीळ आहेत/नाहीयेत का हो?
(मी कसे ओळखले?)
बाएं कंधे पे तिल ?
तुम्ही 'अंगूर' पाहिला आहेत का हो ?
(मी कसे ओळखले?)
आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या ...
तुम्हाला दोघांना इमेल, चॅट, गूगल हँगाऊट वगैरे गोष्टी माहित असतील अशी अपेक्षा आहे. माहित असतील तर अंगूर, उजव्या खांद्यावर तीळ नसणं, इ, इ.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ऐला!
कोणाच्या उजव्या खांद्यावर तीळ आहे/नाही हे हल्ली ईमेल/चॅट/गूगल हँगाऊट (हे जे काही असेल ते)/फेसबुकवरून कळते?
स्टेटस अपडेट होते काय?
गार्बो लाफ्स!
अर्न्स्ट ल्युबिशचा मूळ 'टु बी ऑर नॉट टु बी' आणि ग्रेटा गार्बोला घेऊन त्यानं केलेला आणि बिली वाइल्डर सहलेखक असलेला 'निनोच्का'सुद्धा पाहा अशी शिफारस.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
निनोच्का
'निनोच्का' पाहिला. फारच आवडला. भगवंतास्टीक.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मेल् ब्रूक्स् आणि इतर..
अतिश्शय भन्नाट चित्रपट.
मेल ब्रूक्स् तर तळपलाच आहे चित्रपटभर. त्याचाच 'सायलेण्ट् मूव्ही' हा १९७६ चा आणि 'ड्रॅक्युला - डेड् अॅण्ड् लव्हिङ्ग इट्' (१९९५) हे अवश्य पाहवेत. टू बी ची सर नसली तरी यडपटपणासाठी पाहण्याजोगे आहेत. 'सायलेण्ट् मूव्ही' मध्ये एका प्रसंगात चक्क मार्सेल् मार्सू आहे आणि त्याचा प्रसंग थोरच. 'ड्रॅक्युला..' मध्ये ड्रॅक्युलाच्या भुमिकेत लेस्ली नेल्सन् आहे म्हणजे एकूणच काय धमाल असेल त्याची कल्पना यावी.
'टू बी...' मधल्या 'आना ब्रॉन्स्की'ची भुमिका करणार्या 'अॅन् बॅङ्क्रॉफ्ट्' हिने 'मिरॅकल् वर्कर्' या चित्रपटात 'अॅनी सुलिवान्' ची म्हणजेच हेलन केलरच्या शिक्षिकेची भुमिका केली आहे. हा चित्रपट अवश्य पाहवा असे सुचवेन. कृष्ण-धवल माध्यम हा चित्रपट अधिक तीव्र गडद करते, असे मला वाटते. या चित्रपटावरून मराठीत 'किमयागार' हे नाटक आले होते. मुग्धा गडकरी हिने हेलन केलरची तर भक्ती बर्वे यांनी अॅनीची कामे केली होती. हे नाटक देखील गाजले होते. (भन्सालीचा 'ब्लॅक' बाजूसच ठेवूयात).
प्रपोजल
काल 'प्रपोजल' नाटक पाहिले.
याच्या नेपथ्याबद्दल अनेकदा चर्चा झाली आहे. त्याबतीत ज्या अपेक्षेने गेलो होतो ती पूर्ण झाली. कथावस्तु व संवाद ठिक. त्याहून अधिक प्रकाश, ध्वनी, नेपथ्य आदी तांत्रिक माध्यमे भाव खाऊन जातात.
आस्ताद काळे व अदिती सारंगधर दोघांचाही अभिनय आवडला. विशेषतः अदितीचा मध्यंतर-पूर्व अभिनय! आस्ताद क्वचित कर्कश्य वाटतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कश्मकश
कश्मकश हा ऋतुपर्णो घोषचा सिनेमा आज पाहिला.
त्यातल्या बायकांनी नेसलेल्या बंगाली साड्या सुंदर आहेत.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
अॅटॅक्स ऑफ २६/११ पाहिला.
अॅटॅक्स ऑफ २६/११ पाहिला. अंगावर आला. अर्थात त्यातील लहान मुलाला मारण्याच्या प्रसंगामुळे जास्त! बाकी बरेचसे बारकावे आणि माहिती त्यांना टाकता आली असती पण त्यापेक्षा नाना चे कसाबला ५/७ मिनिटाचे लेक्चर टाकण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. सगळा सिनेमा कसाब ह्या पात्राभोवती आणि नाना लांबलचक लेक्चर छान देतो याच्या भोवती जास्त उभा केलाय.
शिवाय चित्रपटामध्ये जितकी माणसे मारलेली दाखवली ती बघून मी हबकले मग शेवटी गूगलले तेव्हा कळले फक्त १६६ लोक (पोलिस आणि अतिरेकी पकडून) मरण पावले. (अर्थात याला "फक्त" हे संबोधन वापरणे चुकीचे आहे, गेलेला प्रत्येक माणूस त्याच्या कुटुंबियाचे अवघे विश्व असू शकतो. पण चित्रपटात ऑबेरॉय ट्रायडेन्ट,नरीमन हाऊस, ताज मधील लॉबी सोडता इतर भागातील हत्याकांड घेतले नाहीये, या अर्थाने "फक्त") चित्रपट बघताना लिओपार्ड कॅफे, ताज आणि सी.एस.टी. येथेच किमान ४०० लोक मरण पावले असं दिसलं, हा बटबटीत पणा झाला.
पण एक म्हणावे लागेल, ज्या इराद्याने अतिरेक्यांनी अशा वेचून वेचून ठिकाणी हल्ला केला, "आपण कुठेही पूर्णपणे सुरक्षित नाही" ही भावना लोकांच्या मनात रूजवण्यात ते नक्कीच यशस्वी झाले. चित्रपट बघताना तोच संदेश इतका खोल शिरला की नंतर दोन दिवस मी जिथे जिथे गर्दीच्या ठिकाणी गेले, तिथे हे ठिकाण आणि इथली माणसे अगदी स्वतःला पकडून किती व्हल्नरेबल (मराठी प्रतिशब्द?) आहोत हे जाणवत राहिले.
दुसर्या दिवशी "द श्वशांक रिडेम्पशन" पाहिला. भारी आहे. शेवट काय असेल याचा अंदाज येऊन सुद्धा शेवटपर्यंत पाहावासा वाटला."अॅटॅक्स ऑफ २६/११" वर उतारा म्हणून मस्त वाटला.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
७२ मैल
'७२ मैल' हा चित्रपट पाहिला. आयुष्याच्या एका अवघड वळणावर असलेल्या कथानायकाला प्रवासात भेटलेल्या पात्रांच्या माध्यमातून रखरखीत आयुष्य कसं असतं ते पाहायला मिळतं आणि त्यातून तो अंतर्मुख आणि प्रगल्भ होतो अशी खास 'रोड मूव्ही'ची कथा आहे. कथेचा जीव तसा छोटा आहे. ती सादर करताना कथेतले अनेक घटक फार मेलोड्रॅमॅटिक व्हायची शक्यता होती. तशी ती करण्याचा मोह टाळून दीड तासांत एक सरळ, साधी आणि नेटकी गोष्ट समोर ठेवण्यासाठी दिग्दर्शक आणि नटांना गुण द्यायला हवेत. चित्रपट प्रचंड प्रमाणात उत्कृष्ट वगैरे नसला, तरी 'दुनियादारी'च्या बटबटीतपणाच्या पार्श्वभूमीवर तो अधिक बरा वाटला. अर्थात, 'दुनियादारी'इतका '७२ मैल' चालणं शक्य नाही हेसुद्धा उघड आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
७२ मैल-एक प्रवास पाहिला.
७२ मैल-एक प्रवास पाहिला.
पाहूनही दीडेक आठवडा झालाय.
एकूणात "कसा वाटला?" ह्या प्रश्नाला संक्षिप्त उत्तर म्हणजे "नक्कीच पहावा असा." किंवा "लक्षात रहावा असा" असं देइन.
थोडं अधिक सांगायचं तर काही भाग कमी करता आला असता.
उदा:- जिथे तिथे तत्वज्ञान ऐकवायची जरुरी नव्हती. प्रसंग स्वतःच खूप काही बोलून जाण्याइतके प्रखर आहेत. त्याचे संवादात वर्णन करीत दाहकता कमी होते. तान्ह्या मुलाच्या प्रेताला त्या बाळाची आई माती देत आहे हा प्रसंग आहे. त्याच वेळी त्या तान्ह्या बाळाची भावंडे टोमॅटॉ शोधीत संवेदनशून्य वाटावेत असे भटकताहेत असे दृश्य. हे इतकेच आणि एवढेच पुरेसे होते. त्यात लागलिच राधाक्का ह्या पात्राने "जीवन वाईट आहे. पोटाची भूक भयंकर आहे. आतड्याच्या माणसापेक्षा भूक जवळची" वगैरे वगैरे ऐकवल्याने प्रसंग फार उलगडतो असेही होत नाही, दाहकताही वआदह्त नाही, कथेला कलाटाणीही मिलत नाही किंवा कथा नीट माम्डण्याच्या हिशेबानी काही मदतही होत नाही. तो डायलॉग उडवूप्न नुसताच कॅमेरा हा एकदा प्रेतावर आणि एकदा बागडणार्या पोरींवर फिरवला तरी अधिक परिणामकारक संदेश पोचत नाही का?(उलट एखादा टोमॅटॉ चुकून प्रेताच्या अंगावर पडतो, आणि ती पोरे तो टोमॅटो सहज उचलून झोळित टाकतात असेही दाखवण्यास वाव होता.)
असेच इतर अजून एक दोन प्रसंगात आहे.
पण म्हणून टोटलात चित्रपटाचे कौतुक कमी होत नाही. "एक उत्तम मांडणी" हाच निष्कर्ष चित्रपटाबद्दल येतो हे खरेच.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
७२ मैल-एक प्रवास
अशोक व्हटकरांची ही कादंबरी कित्येक वर्षांपूर्वी वाचली होती आणि मग बराच वेळ झोप आली नव्हती. अशा अस्वस्थ करणार्या कलाकृतींवर आधारित चित्रपट, नाटके बघण्यात मोठा अपेक्षाभंग होण्याची शक्यता असते. तो धोका पत्करुन हा चित्रपट पाहिला. कादंबरीने जितके अस्वस्थ केले होते तितकेच, काकणभर जास्तच या चित्रपटाने केले. ज्या काळातली ही कथा आहे त्या काळात समाजातला हा वर्ग असा, पिचलेला, भरडलेला होता. त्यातल्या त्यात बायकांची अवस्था तर जनावराच्या पातळीवरची होती. दारिद्र्य, अडाणीपणा, रोगराई, अंधश्रद्धा याखाली अगदी चिमटून कसेबसे जगत राहाणे आणि एक दिवस असेच उपेक्षित मरुन जाणे असे त्यांचे निरर्थक, बिनपिळ्याचे आयुष्य असे. आजही काही प्रमाणात काही ठिकाणी अशी आयुष्ये बघायला मिळतात. शोषण तर अशा स्त्रियांच्या पाचवीलाच पुजलेले असे. अशा बर्याच बायका अगदी जवळून बघितल्याने (आणि काही आजही बघत असल्याने) या चित्रपटाने खोलवर ढवळून टाकल्यासारखे झाले. स्मिता तांबेच्या अभिनायाबद्दल, तिने या चित्रपटातल्या भूमिकेसाठी केलेल्या तयारीबद्दल बरेच लिहिले गेले आहे. तिला या भूमिकेबद्दल शंभर मार्क द्यायला हवेत. चिन्मय संत आणि चिन्मय कांबळी या बालकलाकारांचेही विशेष कौतुक करायला हवे. अशा चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद लिहिणे हे मोठे आव्हान असते. या बाबतीत पटकथा आणि संवादलेखकाने बाजी मारली आहे. बोर्डिंग स्कूलमधले सुरवातीचे काही प्रसंग सोडले तर या चित्रपटातील संवाद कुठेही उबवलेले वाटत नाहीत. 'व्हयमाल्या' वगैरे अगली लेखनातूनही कालबाह्य झालेल्या शिव्यांपासून हताश होऊन, पूर्ण खचून देवाला दिलेल्या तळतळाटापर्यंत हे संवाद अस्सल वाटतात. या चित्रपटाच्या संगीताचा आणि प्रकाशयोजनेचाही मुद्दाम उल्लेख करायला हवा. एकूण 'कैरी', 'राधी', 'तुती' अशा कथा वाचल्यानंतर जी मनाची अवस्था होते, तशी काहीशी हा चित्रपट बघून झाली.
चित्रपट अर्धे-अधिक भरलेले होते हे बघून हायसे वाटले. बाकी तीनही स्क्रीन्सवरचे 'दुनियादारी', 'टाईम प्लीज' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' हाऊसफुल होते. एकूण समाजाबद्दलचा तिटकारा वाढीस लागण्यास अशा गोष्टी मदत करतात असे वाटले. तेही एकूण बरेच, असेही वाटले.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
स्पॅनिश चित्रपट
नुकताच 'La Flaqueza Del Bolchevique' हा स्पॅनिश चित्रपट पाहिला. लॉरेंझो सिल्व्हा च्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट त्यातील उत्कट अभिनयामुळे आणि सुंदर डायरेक्शन मुळे लक्षात राहिला. एका उद्योजकाची रस्त्यात एका गाडीशी टक्कर होते. त्यातून त्याचे त्या लेडी ड्रायव्हरशी भांडण होते. ती त्याच्याविरुद्ध तक्रार करते म्हणून तो तिला त्रास द्यायला लागतो. पण नंतर तिच्या मारिया या लहान बहिणीला बघितल्यावर, तिच्या प्रेमात पडतो. मारिया इतकी निरागस असते की त्यामुळे त्याच्या स्वभावात देखील फरक पडतो. शेवट मात्र दु;खद आहे.
लुईस तोसर याने त्या उद्योजकाचे संयत काम केले आहे. आणि मारिया वलवर्दे(उच्चार माहित नाही), हिने मारिया इतकी छान रंगवली आहे की आपणही तिच्या प्रेमात पडतो.
जरुर बघावा.
'साहेब, बीवी और गँगस्टर
'साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्नस' पाहीला. मस्त आहे! फक्त १३५मिनीटांऐवजी नीट एडीटीँग करुन १२०वर आणायला हवा होता. मध्यंतरांनंतर २ मिनीट अडखळ्यासारखं वाटतं. आणि ते गोडसे तैँच आयटम साँगपण उगाचच कैच्याकै... पण ही लै भारी फ्रँचाइजी आहे. साहेब आणि बीवी दोन्ही पात्रंच जबरदस्त आहेत.
(No subject)
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
चला...
चला, ऑल इज नॉट यट लॉस्ट!
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
+१
अजूनही आहेत काही आशा पुढच्या पिढीत -
फक्त गल्ला न पकडता
फक्त गल्ला न पकडता तिकीटविक्री आणि सर्वात जास्त % नफा कमवणार्या चित्रपटांची यादी कुठे मिळेल?
भाग मिल्खा भाग पाहिला. तीन
भाग मिल्खा भाग पाहिला. तीन दिवस एक एक तास असा पाहिल्याने बरा वाटला. खेळाचा भाग छान आहे. पर्सनल लाइफ उगाच घुसडलय. सोनम, तूप वगैरे पुर्ण अनावश्यक वाटलं. आणि गाणी कशाला हवीच असतात असल्या चित्रपटात कळत नाही. दिव्या दत्ता आणि फरहान ने खूप छान अभिनय केलाय. फरहान अगदी जेन्युन वाटतो. दिसतोपण बराचसा मिल्खासारखा. आणि मला त्याचा सर्दी झालेला आवाजपण आवडतो.
मद्रास कॅफे
'विकी डोनर' फेम सुजीत सरकार दिग्दर्शित आणि जॉन अब्राहम निर्मित 'मद्रास कॅफे' पाहिला. बरा वाटला. प्रेक्षकांना विचार करायला वेळ द्यायचा नाही हे तंत्र सरकारने चांगले सांभाळले आहे. या निमित्ताने आता विस्मरणात गेलेले श्रीलंकेतले यादवी युद्ध, एलटीटीई असले सगळे आठवले आणि शहारलो. एकीकडे चित्रपटात पार्श्वभूमीवर दिसणारा श्रीलंकेतला नयनरम्य निसर्ग डोळ्यांना सुखावत राहातो, दुसरीकडे स्फोट आणि रक्तपात याने मन विषण्ण होते. हिंसाचार हल्ली अंगावर येतो. पण यात चित्रपटाचा संबंध नसावा.
हिंदीतले 'नामचिन सितारे' हल्ली चांगल्या निर्मितीत (काही मराठीतही) उतरले आहेत, हे मला सुचिन्ह वाटते ('कशाला? कशाला तो 'चेन्नई एक्सप्रेसची उल्लेख?) अमिताभ बच्चनचा 'विहीर' अक्षय कुमारचा '७२ मैल-एक प्रवास' ही काही ठळक उदाहरणे आठवतात.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
हिंदीतले 'नामचिन सितारे'
कंसातल्या मराठीबद्दल विशेष +१.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नामचिन सितारे
हे अवतरणचिन्हांत आहे यातच या विधानाची खुबी आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
पोपट
आजच 'पोपट' पाहिला. 'मद्रास कॅफे' प्रमाणेच या विषयालाही खूप उशीर झाला असला तरी चित्रपटाची कल्पना मला आवडली. तरुणाईचा उत्साह कौतुकास्पद आहे. अतुल कुलकर्णी नेहमीप्रमाणे उत्तम.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आयबीएल
विकांताला "आयबीएल" ला गेलो होतो.
३०० रुपयात अत्यंत उच्च दर्जाच्या खेळाडूंमधील ५ मॅचेस बघणे म्हनजे पर्वणी होती.
पी कश्यपला ज्या प्रकारे हरवले ते लाजवाब होते.
बालेवाडीतील सोय-सुविधा सुयोग्य होत्या. एकूणात माहौल जमवण्यात आयोजक यशस्वी ठरले आहेत असे वाटले.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
The Purple Rose of Cairo
The Purple Rose of Cairo हा वूडी अॅलनचा चित्रपट पाहिला.
१९२९-३० च्या सुमारास, जेव्हा पाश्चात्य जगात मंदी आलेली होती त्या काळात ही गोष्ट घडते. (चित्रपट १९८५ सालातला आहे.) सेसिलिया (मिया फॅरो) ही तरूण मुलगी बेरोजगार, मारकुट्या, जुगारी, बेवड्या नवर्याला पोसत कसंतरी करून तग धरून आहे. संकटांमुळे खचून दारू पिण्याचा मार्ग काही लोक आजमावतात, तर सेसिलिया हॉलिवूडी सिनेमे पाहून वास्तव विसरू पहाते. त्याच चित्रपटगृहात पाचव्यांदा 'द पर्पल रोज ऑफ कैरो' नामक चित्रपट पहाताना अचानक चित्रपटातलं हँडसम पात्र, टॉम बॅक्स्टर, तिच्याशी बोलायला लागतो. आणि अचानक स्क्रीनमधून बाहेर येऊन तिच्याबरोबर निघून जातो. चित्रपटातल्या पात्रांना काय करावं हे समजत नाही. त्या चित्रपटगृहातला या चित्रपटाचा खेळ सुरू रहातो, पण पैश्यांचं गणित बोंबलतं.
एकीकडे टॉम बॅक्स्टर आणि सेसिलियाला एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागतं. टॉम परीकथेतला असला तरीही त्याचं हळूवार, प्रेमळ, नात्याचा ओलावा असणारं आणि विशेषतः तिला समजून घेण्याचं वर्तन तिला फारच आवडतं. तिच्या नवर्याकडून तिला हे काहीच मिळालेलं नसतं.
दुसरीकडे चित्रपटाच्या नफ्याची गणितं चुकल्यामुळे निर्माता आणि आत्ता कधी नव्हे तो चांगला ब्रेक मिळालेला अभिनेता, गिल शेफर्ड, ज्याने चित्रपटात टॉमचं काम केलेलं आहे ते अस्वस्थ होऊन न्यू जर्सीत येतात. गिल आणि सेसिलिया एकमेकांना भेटतात. गिलसुद्धा सेसिलियाला फार प्रेमाने, आदराने वागवतो. टॉमच्या चांगल्या वर्तनामुळे, आधीच नवर्यापासून दुरावलेली सेसिलिया त्याचं घर सोडून देते. आता वेगळाच पेच निर्माण होतो, तिने परिकथेतल्या, आदर्श टॉमबरोबर आयुष्य घालवावं का वास्तवातल्या पण काही दोष असणार्या गिलला निवडावं?
क्रूर वास्तवापासून लांब जाण्यासाठी म्हणून परिकथांची, फँटसीची निवड करावीशी वाटत नाही. सेसिलिया वास्तवाचीच निवड करते आणि वास्तवाचे चटके तिला बसतात. हे वास्तव विसरण्यासाठी ती पुन्हा परीकथा-चित्रपटांचाच आधार घेते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
'नेक्रोपोलिस'
रविवारी सुदर्शनला 'नेक्रोपोलिस' हा महेश एलकुंचवारांच्या याच नावाच्या लेखाच्या नाट्य-सादरीकरणाचा प्रयोग पाहिला.
अतिशय प्रभावी प्रकाशयोजना, आत्मविश्वासपूर्ण अभिनय आणि (अर्थातच) दमदार लेखन या त्रयींमुळे प्रयोग अतिशय आवडला.
श्री मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केलेला हा प्रयोग माझ्यासाठी पूर्णपणे नाविन्याने भरलेला होता. एखाद्या इतक्या ताकदीच्या ललित लेखाचं म्हटलं तर अभिवाचन आणि म्हटलं तर नाट्य सादरीकरण इतक्या प्रभावीपणे उतरू शकतं हे पाहणं आनंददायक तर होतंच पण काहिसे चकीत करणारे होते.
इथे मोहित टाकळकर यांनी पूर्वी लिहिलेले एक लहानसे (खरंतर जाहिरातवजा
) मनोगत वाचता येईल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मोहित टाकळकर
'नेक्रोपोलिस'च्या माहितीबद्दल आभार. मोहितचे नवे काही काम रंगमंचावर आले आहे ही बातमी माझ्यासाठी आनंददायक आहे.
मोहित अतिशय गुणी आणि विविधांगी दिग्दर्शक आहे. त्याची पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजनेवरची हुकुमत पाहायची असेल तर प्रसिद्ध पर्शियन आणि सुफी कवी 'जलालुद्दीन रुमी'च्या रचनांवर आधारित 'तू' हे नाटक आवर्जून पाहावे. काही वर्षांपूर्वी आले होते. फार प्रयोग झाले नाहीत.
तो एक उत्तम अभिनेताही आहे. चेखॉवच्या लेखनावर आधारित 'मनोमीलन' नावाचे नाटक किरण यज्ञोपवित यांनी६-७ वर्षांपूर्वी लिहीले होते. त्याचे काही प्रयोग पायोगिक रंगभूमीवर झाले होते, त्यावेळी मी एक प्रयोग पाहिला होता. त्यात मोहितने प्रमुख भुमिका केली होती. शशांक शेंडे यांनी साकारलेल्या एक नंबर खंग्री पाटलाला तोंड देणारा सरळमार्गी बुळा अशी मोहितची भुमिका होती. भ न्ना ट हसविणारे नाटक होते.
मला वाटते त्याच नावाने ते व्यावसायिक रंगभूमीवरही आले आहे. त्यात कोण कोण होते/आहेत माहीत नाही.
(आणि हो... मोहितनेच सचिन कुंडकलरच्या 'कोबाल्ट ब्लू' चे मुखपृष्ठ केले आहे.)
दुसरी कलाकृती
मोहितची मी ही पाहिलेली दुसरी कलाकृती. काही वर्षांपूर्वी 'चारशे कोटी विसरभोळे' सुदर्शनलाच पाहिले होते. त्यावेळी मला ते अजिबातच झेपले नव्हते (अर्थात माझ्या तत्कालीन (खरंतर तत्कालीनच का आताच्याही) वयाची, समजेची, वकुबाची मर्यादा मान्य आहेच).
त्यामुळे जरा बिचकतच प्रयोगाला गेलो होतो ते केवळ एलकुंचवारांच्या नावामुळे. पण सगळे काही फर्मास जमून आले आहे. वर दिलेल्या लेखाच्या दुव्यावर म्हटल्याप्रमाणे मोहितने अनावश्यक दिग्दर्शन टाळून लेखनातील मर्म नेमके समोर आणले आहे असे वाटले.
आता मोहितची दुसरी कलाकृती पहायला माझी हरकत नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मोहित टाकळकरचं नवीन काम
'नेक्रोपोलिस' मी पाहिलं त्याला वर्षभराहून अधिक काळ लोटला आहे. होजे सारामागो ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या पोर्तुगीज लेखकाच्या 'एलेफंट्स जर्नी'वर आधारित 'गजब कहानी' हे त्याचं नाटक 'नेक्रोपोलिस'च्या आधी म्हणजे २०११मध्ये आलं होतं. मध्यंतरी त्यानं 'अ ब्राइट डे' नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला. तो काही आंतरराष्ट्रीय महोत्सवांत दाखवला गेला. ह्या वर्षीची त्याची ताजी कलाकृती म्हणजे गिरीश कार्नाडांच्या ताज्या नाटकाचा 'उणे पुरे शहर एक' हा नाट्याविष्कार. विनोद दोशी महोत्सवात त्याचा पुण्यातला शुभारंभाचा प्रयोग झाला.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद चिंजं.
भारताबाहेर आल्यापासून मराठी नाटकांत काय नवे आहे याच्या बातम्या नीट आणि लवकर कळत नाहीत. त्यामुळे या कलाकृतींच्या माहितीवद्दल अनेक आभार.
उणे पुरे शहर एक कालच पाहिले.
उणे पुरे शहर एक कालच पाहिले. काही झेपल नाही. अगोदरच या क्षेत्रातील काही कळत नाही त्यातून ही असली नाटक. संपूर्ण प्रयोगात नाटकाचे नाव नाही लेखकाचे नाही कलाकारांचे नाही. मध्यंतर दहा मिनिटे एवढीच अनाउन्समेंट. बाकी एक वाक्य नाही. एफटी आय आय छाप प्रेक्शक होते. यांच काय कळत नाही ब्वॉ पुरुष असून बायकांसारख्या केसांची पोनी टेल सारख काहीतरी मानेवर लोंबकाळत असत. डबीतून पाळलेल्या उवा घेउन यांच्या केसात सोडाव्यात असा विकृत विचार मनात डोकावतो. बाकी नाटकात झोपडपट्टी वातावरण मात्र चांगल क्याच केलय.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
उणे पुरे शहर एक कालच
कुठे?
व्यावसायिक नाटक आहे का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुड. सध्या नाटकमहोत्सव चालु आहे ना!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
नेक्रोपोलीसचा शुभारंभाचा
नेक्रोपोलीसचा शुभारंभाचा प्रयोग पाहून भारावून गेले होते . अगदी नेटका प्रयोग .
नॅरेटर , सर्वसाक्षी मी , आणि विविध अनुभवांचे कोलाज . माणसाला मृत्युच्या सावलीत कब्रिस्तानात
सतत पछाडणारा अपराधबोध !! पश्चाताप ......अत्यंत आवश्यक तेवढेच चपखल मधुर पार्श्वसंगीत .
अल्लाच्या आळवणीचे आर्त सूर अन कधी नुसते आलाप तर कधी सोसाट्याच्या वार्याचा दुरून आवाज ,
एका कलाकाराने छेडलेले बासरीचे सूर .......कधी वाळलेल्या पानांची चुरचुर .
नेपथ्य म्हणजे मधोमध एक कबर आणि आजूबाजूला वाळलेला पाला पाचोळा .............
प्रयोगानंतर मृत्योर्मा अमृतमगमय ऐवजी आम्ही नाईलाजाने नश्वर जगात परतलो .
मार्मिक
मार्मिक श्रेणी देऊन पुरेसे न वाटल्याने हा प्रतिसाद
अगदी म्हंजे अगदीच मार्मिक!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
म्युझियम अवर्स - Museum Hours
जेम कोहेन या दिग्दर्शकाचा Museum Hours नामक चित्रपट पाहिला.
पैशांची चणचण असणारी, माँट्रीआलची मध्यमवयीन अॅन कोमात असणार्या बहिणीसाठी व्हिएनाला येते. वेळ घालवण्यासाठी ती तिथल्या Kunsthistorisches (उच्चार करण्याचे दोन प्रयत्न अर्ध्यातच सोडून दिले) या कलासंग्रहालयात येते. तिथे तिची ओळख योहान या तिथल्या प्रेमळ आणि हुशार गार्डशी होते. योहान एकेकाळी रॉक बँड्सचा मॅनेजर म्हणून बाहेरच्या देशांमधे वगैरे फिरलेला आहे. आता काही काम करावं म्हणून तो कलादालनात काम करतो. "I had my share of loud," आधीच्या आणि आताच्या आयुष्याबद्दल बोलताना तो म्हणतो, "So now I have my share of quiet."
योहान आणि अॅनची ओळख आणि पुढे मैत्रीही होते. अॅनच्या जोडीने व्हिएनातल्या स्वस्तात करता येतील अशा अनेक टूरिस्टिक गोष्टी योहान करतो, पहातो. दालनातली चित्रं पहाताना नव्याने काहीतरी सापडत रहातं, तसंच त्याचंच शहर व्हिएना त्याला अॅनमुळे पुन्हा दिसत रहातं. योहान समलैंगिक आहे, त्यामुळे या मैत्रीत लैंगिकता नाही.
आपल्याला चित्रपटात दिसणारं व्हिएना हे काही गोड, रोमँटीक, फार टूरीस्टिक वाटेल असं नाही. हिवाळ्याचे दिवस, बहुदा ख्रिसमस होऊन गेला आहे त्यामुळे रोषणाई नाही, हिमवृष्टी किंवा पाऊस पडतो आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश नाहीच, आणि जुन्या, सुंदर चर्च-कथिड्रलसमोर कोकाकोलाचा राक्षसी आकाराचा बिलबोर्ड, छोट्याशा नदीप्रवाहाशेजारी दिसणारी राक्षसी आकाराची, उपयोग नसणारी इंडस्ट्रियल इमारत हे असं काही आहे. ब्रॉयगलचं The Peasant Wedding किंवा रेम्ब्राँची काळपट सेल्फपोर्ट्रेट्स आणि इतर काही जुन्या चित्रांबद्दल होणारी चर्चा आणि आताचं व्हिएना, अॅन-योहानचं आयुष्य यांच्यातलं साधर्म्य दिसायला लागतं.
पुढे काय होणार याची कल्पना करणं कठीण नाही. त्यांची मैत्री उलगडत जाणं सुरेख आहे. ब्रॉयगलच्या चित्रांसारखं सामान्य माणसाचं आयुष्य केंद्रस्थानी धरलेले असले तरी या चित्रपटातले चेहरे भेसूर नाहीत; उलट नर्मविनोदी आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मालिका 'प्रधानमंत्री'
शेखर कपूर ह्यांचे दिग्दर्शन आणि निवेदन असलेली 'प्रधानमंत्री' नावाची मालिका जुलईपासून ABP News Channel येथे दर शनिवारी रात्री १० वाजता दाखविण्यात येते. आत्तापर्यंत ८ भाग दाखवून झाले असून मी ते सर्व यूट्यूबवरून पाहिले. http://abpnews.newsbullet.in/pradhanmantri/ येथेहि ते उपलब्ध आहेत.
स्वातंत्र्याच्या पुढेमागे मालिका सुरू होते आणि आत्तापर्यंत इंदिरा गांधी शास्त्रींनंतर पंतप्रधान बनल्या इतपत मालिका पोहोचली आहे. संस्थानांचे विलीनीकरण, काश्मीर-जुनागढ-हैदराबाद ह्या प्रकरणांचा इतिहास, हिंदु कोड बिल, भारत-चीन आणि भारत-पाक युद्धे, शास्त्रींचे निधन आणि इंदिरा गांधींचा उदय अशा त्या त्या काळतील महत्त्वाच्या विषयांवर कपूर ह्यांचे निवेदन, मधूनमधून जुने फूटेज आणि जुने फोटो-वर्तमानपत्रे ह्यांचे दर्शन आणि काही प्रमाणात नटांच्या माध्यमातून घटनेचे दर्शन अशा मार्गाने भारताच्या स्वातन्त्र्योत्तर काळाचा आढावा घेणे असा ह्या मालिकेचा हेतु आहे. सर्व इतिहासाची ह्यातून चांगली उजळणी होते आणि एकेकाळी ज्यांची नावे नेहमी वर्तमानपत्रात नेहमी वाचायला मिळत पण जे आता बहुतेक विस्मृतप्राय झालेले आहेत अशा अनेकांची नावे आणि चेहरे डोळ्यासमोर येतात - उदा. व्हीपी मेनन आणि कृष्ण मेनन, काश्मीरचे पंतप्रधान पंडित काक, काकासाहेब गाडगीळ, ह.वि. पाटसकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, कुलदीप नय्यर, कामराज, शंकरराव देव, जन. चौधरी-थापर-थिमय्या-कौल आणि असे अनेक अन्य.
मालिकेत एकूण २३ भाग होणार आहेत. प्रत्येक भाग सुमारे ४२-४३ मिनिटांचा असतो.
ABP News Channel आनंद बझार पत्रिकेशी संलग्न आहे.
इतर काहीतरी शोधताना हा
इतर काहीतरी शोधताना हा प्रतिसाद सापडला. आणि किती गंमत वाटली हे सांगू शकत नाही.
(कोल्हटकरांनी लिहिलंय म्हणजे मालिकेत दाखवलेला इतिहास अगदीच ह्यॅह्यॅह्यॅ नसणार. पण तरीही मला मालिकेचं सादरीकरण अजिबात आवडलं नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उळ्ळागड्डी
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती 'उळ्ळागड्डी' ही एकांकिका पाहिली. उत्तराखंड प्रलयावर आधारित या एकांकिकेतल्या तांत्रिक बाबी विस्मयचकित करणार्या आहेत. साक्षात प्रलय, पूर, पुरातला विध्वंस, पुरात वाहात चाललेल्या अनेक गोष्टी (त्यात वाहात आलेले एक प्रेतही!) हे सगळे या तरुण कलाकारांनी रंगमंचावर आणले. या पुरात उभे असलेले एक झाड आणि त्या झाडावर अडकलेला एक मराठी माणूस आणि आणि एक लहान कानडी मुलगी यांची जगण्याची धडपड असा काहीसा या एकांकिकेचा विषय आहे. हे दोघे जवळजवळ पूर्णवेळ त्या झाडावरच्या तुटक्या फांद्यांवर कसेबसे तोल सावरत एकमेकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही त्या माणसाला कानडीचा एक शब्दही कळत नाही आणि त्या मुलीला मराठीचा. असले काही रंगमंचावर याआधी मी तरी पाहिलेले नव्हते. या सगळ्या प्रलयात तो माणूस आणि ती मुलगी यांच्यात फुलत जाणारे नाते या लोकांनी अत्यंत उत्तमरीत्या सादर केले. या महाविद्यालयाची 'पुरुषोत्तम' मधली ही पहिलीच एंट्री हे कळाल्यावर तर या लोकांना दोनदा शाबासकी द्यावीशी वाटते.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
कांदा?
नाटकाच्या शीर्षकाचा संबंध नाटकाच्या कथेशी कसा लावला? कांद्याप्रमाणे उलगडत जाणारे नाते असे काहीसे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उळ्ळागड्डी
भिजल्या, भुकेल्या दोघांना खायला काही मिळत नाही. पाण्यातून वाहून येणारा एक अर्धवट सडका कांदा ते दोघे खातात असा कथाभाग आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
ओह अच्छा. धन्यवाद!
ओह अच्छा. धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अवांतर
उदगीरला उळागड्डे आडनाव पाहायला मिळते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उळागड्डे
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात हे नाव अगदी सहजी बघायला मिळते. उळागड्डे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
रोचक आहे. प्रेक्षकांना कानडी
रोचक आहे.
प्रेक्षकांना कानडी संवाद समजण्याची काय सोय केली आहे? न कळल्यास काही फरक पडेल का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नाही
प्रेक्षकांना कानडी संवाद समजण्याची काय सोय केली आहे? न कळल्यास काही फरक पडेल का?
तशी काही सोय नाही. पण तो मराठी माणूस ते संवाद समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यातून प्रेक्षकांना बरेचसे कळते. उरलेले कळाले नाही तरी फार फरक पडत नाही. जिथे शक्य असेल तिथे जाऊन तात्काळ पाहावी अशी ही एकांकिका आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
सोय केली आहे तर!
प्रत्येक संवाद म्हटला जात असताना, त्या संवादाचे भाषांतर केलेल्या पाट्या घेऊन काही माणसे स्टेजवरून रांगत१ जातात. भाषांतरे अचाटच२ असतात म्हणा!
काय फरक पडणार? तसेही, नाटक नाही पाहिले, तरीही काय फरक पडतो? इथे त्याबद्दल लिहून भाव खाता येत नाही, याव्यतिरिक्त?
=====================================================================================
१ म्हणून, 'सब'टायटल्स.
२ तशी प्रथाच आहे. त्या प्रथेनुसार, उदाहरणादाखल, 'हे, दिस फ्रेंडशिप' आणि 'व्हेन द ट्रेन लीव्ज़ द स्टेशन, इट रीचेस इट्स डेस्टिनेशन' असली सबटायटले असलेली 'शोले'ची प्रत पाहण्यात आलेली आहे.३
३ ही असली सबटायटले हीच 'गूगल ट्रान्सलेटर'मागील प्रेरणा असण्याबाबत ऐकिवात आहे. (चूभूद्याघ्या.)
एकांकिका पाहिली नाही.. पण या
एकांकिका पाहिली नाही.. पण या एकांकिकेने पुरुषोत्तम (सर्वोत्कृष्ट एकांकिका) आणि जयराम (सर्वोत्कृष्ट प्रायोगीक एकांकिका) असे दोन्ही करंडक मिळवले आहेत. पुरुषोत्तमच्या इतिहासात असं घडण्याची ही फक्त तिसरी वेळ. शिवाय दिग्दर्शन, लेखन आणि अभिनयाची ही बरीच बक्षिसे मिळवली आहेत.
हम्म
नशीब लागते त्याला.(म्हणजे असे प्रयोग पहायला...)
इजिप्शियन सिनेमा
याकोबियन बिल्डिंग हा फार गुंतागुंतीचा इजिप्शियन सिनेमा पाहिला .सेक्स , भ्रष्टाचार अन हिंसा . शिवाय संवाद फार होते .वाचता वाचता थकून जायला होते .पार्श्वसंगीत कर्कश्श होते .त्यातल्या गायिकेने इतके मृदुल ,मधाळ स्वर छेडले की तात्पुरता असीम शांतीचा अनुभव आला. एरवी फार कोलाहल आहे सिनेमात .अप्रतिम देखण्या स्त्रीया अन मट्ठ ,कुरूप ,सेक्स स्टार्वड पुरुष ( एखाद दोघे अपवादात्मक देखणे सोडल्यास ) यांची रेलचेल होती .
सत्याग्रह (घरीच डाऊनलोडवून)
सत्याग्रह (घरीच डाऊनलोडवून) पाहिला.
अपेक्षेप्रमाणे अत्यंत गोंधळलेला चित्रपट होताच पण पहिल्यांदाच बघताना ढळढळीत जाणवणार्या तपशीलातील चुकाही बर्याच अधिक होत्या
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सहमत
प्रकाश झा यांचे चित्रपट घरीच डाउनलोडवुन बघितलेले बरे.... :bigsmile:
मी तर म्हणेन,हा चित्रपट बघण्याचेही कष्ट घेतले नाहीत तरी चालेलच...
प्रकाशभोंनी प्रत्येक
प्रकाशभोंनी प्रत्येक विचारधारेचा* एकएक प्रतिनिधी घेऊन त्यांच्यात कलगी-तुर्रा लाउन दिलाय
* विचारधारा म्हणजे त्यांना समजली तशी विचारधारा
जी मंत्रीजी
यस मिनिस्टरचा हिंदी रिमेक 'जी मंत्रीजी'चे डॉउनलोड किंवा सीडी व्हर्जन कुठे मिळेल ह्याबद्दल कुणास अधिक माहिती आहे काय?
"गुलाल बाधा "
मुजरा नृत्याच्या गाण्यात नेहेमी ," इश्क , प्यार , शराब , साकी , मयखाना " असल्या शब्दांची लयलूट असते . गुलाल (2009 )या अनुराग कश्यपच्या सिनेमात , " राणाजी म्हारे " संबोधनाने सुरु झालेला मुजरा विविध जागतिक घटनांची चटकदार गुंफण करत , आपल्या दिलोदिमाग वर राज्य करू लागतो . पियुष मिश्राच्या अनोख्या शब्दविभ्रमाची आणि त्याच्या धम्माल संगीताची आपल्यावर भानामती सुरु होते .
राणाजी म्हारे गुस्सेमे आये ,ऐसो बलखाये ,
अगिया बरसाये ,घबराये मारो चैन
जैसे दूर देसके टावरमें घुस जाये रे एरोप्लेन ............
जैसे सरे आम इराकमें जाके जम गये अंकल सॅम.........
जैसे बिसलेरी कि बोतल पिके बन गये जंटलमेन......
जैसे बिना बात अफगाणिस्तानका ,बज गया भैया बेंड .
या सिनेमात अनेकदा लोकप्रिय गाण्यांचा पार्श्वसंगीतात हुशारीने केलेला वापर हसवतानाच थक्क करतो. जबरदस्त कथा , अप्रतिम अभिनय ,अफलातून संगीत आणि भयाण हिंसा आपल्याला खिळवून ठेवते. के.के.मेनन १०० % राजपूत शोभला आहे . भरपूर पात्रे असूनही ती वैशिष्ट्यांसह ठळकपणे लक्ष वेधून घेतात . पियुष मिश्रा आणि त्याच्यासोबतचे अर्धनारी सारखे पात्र आणि कधीही,कुठेही प्रकट होणारी रामलीलेतली पात्रे , हे सगळे एक अदभुत रसायन जमले आहे . एकदा पाहून सर्व सूक्ष्म गोष्टींचे आकलन झाले नाही . उपहास आणि नाट्य ओतप्रोत भरलेले संवाद ऐकताना काही निसटले तर नाही ना असे वाटले .
राणाजीला पुन्हा एकदा भेटेन म्हणते .
सहमत आहे.
'गुलाल' ने बरेच दिवस झपाटले होते.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
शेरलॉक होम्स बीबीसी मालीका
शेरलॉक होम्स बीबीसी मालीका २०१० संपवत आणली आहे.
एकविसाव्या शतकामधला, मोबाईल वापरणारा, स्वतःची वेबसाईट असलेला, ब्लॉग लिहीणारा शेरलॉक होम्स आणी डॉ. वॉट्सन ही कल्पनाच भन्नाट आहे.
सगळेच भाग अफलातून जमलेत, डॉयलच्या मूळ कथेतील काही सुत्रे, शब्द, घटना वापरून संपूर्ण नवीन विश्व उभं केलंय, सगळा शेरलॉक होम्स आधि कित्येक वेळा वाचून व ऐकूनही, उत्कंठा वाढत रहाते, आणि काही 'हाउंड' मधे तर अक्षरशः फाटते...
माझ्यासारख्या होम्सवेड्याला तर स्मार्ट, मॉडर्न, बुद्धीमान, मोबाईल इंटरनेट वापरणारा आणी तितकाच एक्सेन्ट्रीक, सायकोपॅथ होम्स म्हणजे पर्वणीच. प्रत्येक क्षणी पटतं की होम्स आत्ता असता तर अगदी नक्की असाच वागला असता. मोबाईलवरून एखाद्याचा व्यवसाय ओळखला असता, बकींगहॅम पॅलेसमधे बेडशीट गुंडाळून गेला असता...
नॉट सायकोपॅथ, हाय फंक्शनिंग
नॉट सायकोपॅथ, हाय फंक्शनिंग सोश्योपॅथ. डू युअर होमवर्क, अॅण्डरसन.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
डी-डे पाहिला युट्युबवर. ठीक
डी-डे पाहिला युट्युबवर. ठीक आहे. अभिनय बरा केलाय सगळ्यांनी. हुमा, अर्जुन मस्त दिसतात. चित्रपटात एकही गाणं नव्हत हे जास्त छान. पार्श्वसंगीत पण कमीतकमी असेल तर अजुन छान होइल. खरंच काय गरज आहे पार्श्वसंगीताची? शैतान मधल्या 'खोया खोया चांद' प्रमाणे संगीत वापरले तर मस्त, पण या डी-डे मधे सुरुवातीला हॉटेलच्या बेसमेँट पार्किँगमधल्या गोळीबाराच्या वेळच्या पार्श्वसंगीताने डोकं फिरल.
"चित्रपटात एकही गाणं नव्हत"
आँ? मी किमान तीन गाणी पाहिल्याचे आठवतेय!
पैकी "अलविदा" हे सुखविंदर,निखिल डिसोझा आणि श्रुती हसन ने गायलेले गाणे आणि त्याच्या चित्रिकरणात वापरलेली फ्लॅश्बॅक सदृश पद्धत फार म्हणजे फारच आवडली.
डाऊनलोड करून कंटाळा येईपर्यंत ऐकतेय आता मी ते गाणे! तुम्ही ऐकले/पाहिले नसेल तर पाहाच/ऐकाच!!!
शिवाय श्रुती हसन बरी दिसलीये,अभिनय पण बरा केलाय, शिवाय ती गाते वगैरे कळल्यावर तिचा पहिला पिक्चर (तोच तो - लक नावाचा भयाण चित्रपट) पाहिल्यावर जितकी "ढ" वाटली होती तितकी नाहिये असे मत झाले.(शेवटी कमल हसनची पोरगी आहे)
आणि ती इम्रान ची बायको झालेली जी कोण आहे, फारच गोड दिसते, छोटीशी भूमिका पण छान केलीये (परवाच सर्फ एक्सेल ची जाहिरात पाहितान तिला ओळखले त्यात!)
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
तुम्ही चित्रपटगृहात पाहिला
तुम्ही चित्रपटगृहात पाहिला का? मी युट्युबवर पाहिला त्या पायरेटेड कॉपीमधे तरी नव्हती गाणी. तरी म्हणलं हिँदी कमर्शिअल सिनेमात गाणी कशी काय नाहीत
शोधते आता युट्युबवर.
बाकी श्रुती आणि इमरानची बायको गोड दिसल्यात याच्याशी सहमत.
मी सहसा घरी सीडी आणून पाहते.
मी सहसा घरी सीडी आणून पाहते. सीडी चा दर्जा खूपच चांगला होता बहुदा वरिजनल वरून केलेली कॉपी होती.
मी "अलविदा" गाणे जे म्हणतेय ते श्रुतीच्या खूनानंतर आहे ज्यात अर्जुन परत तिथेच जातो आणि तिथल्या सगळ्या गोष्टी पाहून तिचा मॄत्यू कसा झाला असेल ते फ्लॅशबॅक मध्ये प्रत्यक्ष तिथे असल्यासारखे पाहतो.
ही घ्या लिंक!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
अलविदा आणि इक घडी...
चित्रपट बघुन आल्यापासुन ही च दोन गाणी खुप वेळा ऐकली... इक घडी मधला आवाज छान वाटला...
शिवाय श्रुती हसन बरी दिसलीये,अभिनय पण बरा केलाय, शिवाय ती गाते वगैरे कळल्यावर तिचा पहिला पिक्चर (तोच तो - लक नावाचा भयाण चित्रपट) पाहिल्यावर जितकी "ढ" वाटली होती तितकी नाहिये असे मत झाले.(शेवटी कमल हसनची पोरगी आहे)

पण पटले...
'जॉन डे' पाहिला. कुणी पैसे
'जॉन डे' पाहिला. कुणी पैसे दिले तरी पाहू नका, असा कळकळीचा सल्ला. बाकी आपलं आपलं नशीब.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ठीक आहे, ठरले तर मग!
तुम्ही पैसे द्या. मग मी नाही पाहत.
(अर्धे पैसे आत्ता, उरलेले काम झाल्यावर.)
डील!
ग्रँडमस्ती नामक पिच्चरचे
ग्रँडमस्ती नामक पिच्चरचे ट्रेलर (दुर्दैवाने)पाहिले. ते पाहिल्यावर शीर्षकाच्या नावाबद्दल आलेली एक लघुशंका खरी ठरली. उगा लाजेकाजेस्तव पिच्चराच्या नावात एक र घातलाय झालं. असो, अज्जीच न पाहायच्या लिष्टेत अजून एका पिच्चरची भर पडली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अगदी हेच्च! मी तर म्हणतो
अगदी हेच्च! मी तर म्हणतो पिच्चरची टॅगलाईन असायला हवी "ग्रँडमस्ती, विथ अ सायलेंट आर".
-अनामिक
‘ग्रॅण्ड मस्ती’
‘ग्रॅण्ड मस्ती’ पाहताना वृद्धाचा मृत्यू
क्राइम पेट्रोल
अलिकडेच 'क्राइम पेट्रोल' ही मालिका पाहण्यात आली. अनुप सोनी या सूत्रधाराचे पंधरा-वीस कोनातून चालता चालता केलेले निवेदन सोडल्यास मला पाहिलेले जवळजवळ सर्व भाग आवडले. मालिकेचे लेखन-संवाद यात सुधारणेला बराच वाव असला तरी गुन्ह्यांच्या जागा, गुन्हेगार, विक्टिम्स, पोलिस तपास यांचे इतके वास्तव चित्रण टिव्हीवर क्वचितच पाहिले आहे. लेखनातला सरधोपटपणा आणि वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण यामुळे दक्षता वगैरे नियतकालिके आठवली.
पॅरानॉइया
पॅरानॉइया पाहिला, आजिबात पाहू नका असे सुचवावेसे वाटत आहे
अर्धा स्क्रिनप्ले आयन रॅन्ड कडून आणि अर्धा जॉर्ज ऑरवेल कडून लिहून घेतल्या सारखा वाटला
नारबाची वाडी
वर्तमानपत्रांतील परीक्षणे ही पैसे देऊन लिहून घेतली जातात या अंदाजाला पुष्टी देणारा चित्रपट. पुढेमागे टीव्हीवर जरी लागला तरी घराबाहेर पडा; एखाद्या शांत ठिकाणी फिरायला जा.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
अगदी अगदी. विकतचे दुखणे का
अगदी अगदी.
विकतचे दुखणे का घ्या?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
शटर नामक हॉलीवुडी भूतपट
शटर नामक हॉलीवुडी भूतपट पाहिला. मित्रांनी लै सांगितले होते, फाडून दरवाजा होईल इ.इ. पण तितके कै झाले नाही. द कंज्यूरिंग बरोबर तुल्यबळ वाटला. एक उत्तम भयपट.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लंचबॉक्स
'लंचबॉक्स' ह्या बहुचर्चित सिनेमानं जबरदस्त अपेक्षाभंग केला. गंगाधर गाडगीळ किंवा अरविंद गोखले ह्यांनी १९४५-५०च्या सुमाराला रुजवलेल्या महानगरी नवकथेचा ऐवज असलेलं हे कथानक आहे. त्यामुळे मराठी वाचकाला ह्यात नवीन काही नाही. कथेला कादंबरी करण्याचा किंवा एकांकिकेला नाटक करण्याचा अट्टहास जसा मारक ठरतो, तसंच इथे झालंय. एवढ्याशा ऐवजातून १०० मिनिटांचा सिनेमा ताणण्यात पटकथाकार आणि दिग्दर्शक रितेश बात्रा ह्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. इर्फान आणि नवाजुद्दीन एकत्र म्हणजे आजचा ISI ब्रॅन्डच म्हणता येईल. निम्रत कौर एक प्रकारची स्मिता पाटील प्रथेची न-अभिनय करणारी न-अभिनेत्री आहे. लिलेट दुबे, भारती आचरेकरचा आवाज वगैरे फोडणीला आहेतच. शिवाय मुंबईचे डबेवाले, इराण्याचं हॉटेल, लोकल वगैरे गोष्टी एक्झॉटिक पद्धतीनं वापरल्या आहेत. परदेशी तंत्रज्ञांमुळे ध्वनी, प्रकाश, छायालेखन वगैरे गोष्टी कान वगैरेसारख्या महोत्सवात दाखवायच्या सिनेमाला साजेशा आहेत. पण ऑस्करसाठी तर हे अजिबातच उपयोगी नाही. शिवाय, ह्या सर्वांना एकत्र आणूनदेखील पटकथेतला पातळ ऐवज भरून काढणं अशक्य आहे. त्यामुळे अनुराग कश्यप, करण जोहर आणि त्यांचे महानगरी ट्वीट फॉलोअर्स ह्यांचा त्रागा पूर्णतः अस्थानी आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
स्मिता पाटील
निम्रत कौर एक प्रकारची स्मिता पाटील प्रथेची न-अभिनय करणारी न-अभिनेत्री आहे>>>>
ह्या वाक्याचा नेमका अर्थ काय? माझ्या मराठीच्या ज्ञानाप्रमाणे त्याचा साधा अर्थ असा होतो की स्मिता पाटीलला अभिनय येत नव्हता... असं काही म्हणायचं आहे का आपल्याला?
लंचबॉक्स
या चित्रपटाबद्दल टोरांटो फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने काही स्तुतिपर वाक्यं ऐकली होती. तेव्हा हा लंचबॉक्स पौष्टिक असावा असे वाटत होते. प्रतिसाद वाचून लंचबॉक्सात लोणचे-चटण्याच जास्त असल्याचे समजले.
'लंचबॉक्स' मला आवडला.
'लंचबॉक्स' मला आवडला.
चिंजंचं मत त्यांच्या जागी योग्य, आवश्यक नि उपकारकच. (ह.घ्या. मुळातच त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात नि त्या पुरवून घेण्याची त्यांना सवयही आहे. त्यामुळे एखाद्या पोट भरलेल्या माणसानं चांगल्या जमलेल्या पदार्थाला 'उंह, त्यात काय मोठंसं! बरा झालाय झालं, पण 'ती' मजा नाही!' असं उडवून लावावं, त्या चालीवर मी त्यांचं मत वाचलं.
पण मला मात्र 'लंचबॉक्स' आवडला.
मस्त तब्बेतीत चालणारी, संथ गोष्ट आहे. पुनरावृत्ती वाटू शकतील, अशी दृश्यं खूप आहेत. पण मला ती एखाद्या संथ लयीतल्या कवितेच्या कडव्यांसारखी वाटली. त्या कडव्यांतून कविता पुढे वाहतच असते, तसा भास होतो. माणसं काळी वा पांढरी नसून राखाडी असणं, 'आणि ते सुखानं नांदू लागले'छाप उत्तराचा आग्रह नसणं, गोष्ट सांगताना अनावश्यक संवादांचा मोह टाळणं - हेही फार आवडलं. बाकी लोकल्स, इराणी, डबेवाले यांना वातावरणनिर्मितीसाठी वापरणं, इरफान-नवाजुद्दिन या दोन सध्याच्या अफलातून अभिनेत्यांना समोरासमोर काम करताना पाहायची संधी देणं, निम्रत कौरसारखी (न-)अभिनेत्री(!) वापरणं - यांची नवलाई वा अप्रूप नसो बापडं कुणाला - पण आपली काय त्याबद्दल तक्रार नाही. असली तर खुशीच!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
यग्जाक्टली!!! आपलेदेखील हेच्च
यग्जाक्टली!!! आपलेदेखील हेच्च मत आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मेघना भुस्कुटे ह्यांच्या ह्या
मेघना भुस्कुटे ह्यांच्या ह्या खालच्या प्रतिसादाला +१०००००००००००००
पाने