'आमची शाळा'

'आमची शाळा' हे माधुरी पुरंदरे यांचे सर्वांगसुंदर पुस्तक आहे .
ते वाचून प्रत्येकाला आपण परत शाळेत जावे असे वाटू लागेल . इतकी गोगोड चित्रं आणि सुंदर छपाई मराठी पुस्तकात बघून खूप बरं वाटतं .
त्याबद्दल जोस्ना प्रकाशनाचेही आभारच मानायला हवेत .
'आमची शाळा' छोटुश पुस्तक आहे . लहान मुलांना ते आवडेलच पण मूलपण जपलेल्या मोठ्ठ्या माणसांनाही आवडेल . आपण सगळेच शाळेत गेलेलो असतो . छोट्या शाळेच्या सगळ्या सगळ्या आठवणी जाग्या होतील हे पुस्तक बघून . यातली मुलं म्हणजे आपणच तर होतो . मोठ्ठ होण्याच्या निबरट नादात ते विसलेलेलं सगळं आठवेल .
सगळ्यांनी आपल्या छोट्या शाळेत जे जे केलं असेल ते ते सगळं यात भेटतं . शाळेत जाण्याच्या पूर्वतयारीपासून ते शाळेचं वर्ष संपेपर्यंत . अगदी रडारडी पासून शू शी पर्यंत , मित्र मैत्रिणी जमवाण्यापासून ते ग्यादरिंग मध्ये धोतर सुटण्यापर्यंत सगळीच धमाल. वाढत जाण्याचा फार महत्वाचा टप्पा असते ही छोटी शाळा .
माधुरी पुरंदरे यांची कमाल आहे . ही शाळा त्यांनी जिवंत केलीय . इतका निरागसपणा जपून तो प्रत्येक चित्रात उतरवणे किती कठीण आणि छान काम आहे . त्यासाठी मनात , कलेत खोलवर कोवळेपणा ,निरागसपणा जपलेला असायला हवा .
मोठ्ठ्या माणसांची पुस्तकं - पिकासो आणि व्हान गॉघ लिहिणाऱ्या या लेखिकेने मराठी लहान मुलांसाठी किती सुंदर आणि महत्वाचं काम करून ठेवले आहे . 'आमची शाळा' हे त्यातलंच एक गोंडस बाळ .
http://www.bookganga.com/eBooks/Book/5398142588935102317.htm?Book=Amchi-...

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet