झिम्मा

झिम्मा हे विजया मेहता यांचे आत्मचरित्र वाचले .
शेवटी मात्र मनात तरळत राहतो तो बाईनी सांगितलेला पिकासो चा कोट . ''सर्व कला म्हणजे धादांत खोटेपणा आहे , जी अंतिम सत्याकडे घेऊन जाते ''.
बाईनी नाट्य ,कला क्षेत्रात भरपूर , जबरदस्त काम केलंय . विजु जयवंत असल्याचा पार्ट जरा कंटाळवाणा वाटतो . विजु खोटे झाल्यापासून मात्र वाचायला मजा येते. सर्वच नाटकांची छान सखोल माहिती मिळते . रंगायन चळवळीचा इतिहास कळतो .
तेंडूलकर आणि एलकुंचवार असे नाटककार आणि त्यांना न्याय देणाऱ्या बाई हे कॉम्बो उत्तम आहे .
आपण त्या काळात ही उत्तमोत्तम नाटक पाहायला नव्हतो याची खंत वाटते. पुस्तकामध्ये खाजगी आयुष्यावरही फोकस चांगला आहे .
स्त्रीला कुठेही काही सिरिअस काम करायच असेल तर घरचा पाठींबा किती आवश्यक आहे . बाई त्याबाबतीत फारच नशीबवान . आधी दुर्गा खोटे आणि नंतर बापायजी यांचा सक्रिय आणि सकारात्मक पाठींबा त्यांना मिळाला . वैधव्याच संकट , तीन मुलं होऊनही त्यांच्या कामात कुठेही अडथळा आला नाही हे विशेष .
एकूणच मराठी रंगभूमीचा महत्वाचा इतिहास हे पुस्तक सांगते . आणि एका मनस्वी कलाकाराचा आयुष्यपट उलगडते .
स्वतः मधील कलेच्या प्रेमात असा , स्वतःच्या नाही हा महत्वाचा धडाही देते .
http://www.bookganga.com/eBooks/Book/4826573620612812716.htm?Book=Zimma

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लवकर वाचायलाच हवे, धन्यवाद माहिती बद्दल.

प्रसाद ह्यांनी ही 'झिम्मा' चा छान परिचय करून दिला होता - http://www.aisiakshare.com/node/1974

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0