गव्हाणी घुबडाच्या घरात.. समारोप..!! ..They are back..!!

"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.."

खिडकी खाडकन बंद करत एसी टेक्निशियन म्हणाला.

नवीन फ्लॅट भाड्याने घेतला. मालकांनी बराच कचरा मागे सोडला होता. शिंकत खोकत मी ते घर राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो.

एका बेडरुमच्या खिडकीत जुन्या विंडो एसीचं धूड चढवायचं होतं. ते काम करता करता असं दिसलं की सात अंडी खिडकीखालचा सज्जा की काय म्हणतात त्या वळचणीत पडलेल्या कचर्‍यात आणि डबरात पडलेली, की घातलेली म्हणा, दिसत होती.

घरटं वगैरे बांधण्याचे कष्ट घेतले नव्हते.

मुंबईत पेस्ट कंट्रोलचा विषय बनलेली कबुतरं माझ्याही आजूबाजूला पुरेशा संख्येने घुमत असल्याने त्यातलंच एक तिथे माझ्याआधी जागा बिनभाड्याने घेऊन बसलं आहे असं परिस्थितीजन्य पुराव्यावरुन दिसत होतं.

पण खिडकी मोकळी सोडली आणि जो काही प्रकार त्या अंड्यांवर येऊन बसला तो जरा अनपेक्षित होता.

तेच ते.. अपशकुनी, भयानक, रात्री संचार करणारं भुताळी घुबड...

मग घरात कामासाठी आलेल्या प्रत्येकाने, पक्षी प्लंबर, रंगारी, सुतार वगैरेंनी माझ्या पोराला भयंकर भयंकर कहाण्या सांगितल्या. सुरक्षिततेचे उपाय आणि शक्यतो ही बला मारुन टाका असं जनहितार्थ बजावूनच ते गेले.

आता मुळात म्हणजे हा पक्षी एकदम बिचाराच आहे.. अपशकुनी वगैरे तर जाऊदेच, लोक म्हणतात तसा खूंखार आणि आक्रमकही वाटला नाही. फोटो काढूया म्हणून मोबाईलचा कॅमेरा खिडकीबाहेर काढला तर चक्क घाबरुन उडाला आणि समोरच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. लक्ष मात्र प्राणपणाने अंड्यांकडे. खिडकी बंद केली की श्रीमती घुत्कर परत अंड्यांवर.

असं पुन्हापुन्हा झाल्यावर मग मात्र माझ्या लक्षात आलं की असे फोटो काढून त्याला उडवण्यात अर्थ नाही.

चारपाच दिवस असेच गेले. पण घुबडाला काही माझा भरोसा वाटेना. मग मी खिडकी उघडणं बंद केलं आणि गुप्तपणे त्याला कसं बघावं असा विचार करत बसलो.

घुबडाची जोडी आयुष्यभर, किमान सीझनपुरती एकनिष्ठ असते. त्यांची कोर्टशिप म्हणजे नराने मादीला घरट्याची जागा दाखवायची आणि उंदीरबिंदीर मारुन ऑफर करायचा. तिने तो घेतला आणि खाल्ला तर जमली जोडी. काश हमारा भी..

बरं.

तर मग त्याचं असंही आहे, की बरीचशी घुबडं आपल्या आयुष्यात एकदाही ब्रीडिंग करु शकत नाहीत. आणि जी घुबडं ते करु शकतात ती आयुष्यात एकदाच करु शकतात. त्यांचं आयुष्यच तितकं असतं. दोन तीन वर्षं. म्हणजे शरीराची क्षमता पंधरावीस वर्षं जगण्याची असूनही केवळ अत्यंत जास्त संख्येने असलेल्या संकटांमुळे आणि शत्रूंमुळे दोन वर्षंही जगायला मिळणं हे खूप ठरतं. कावळे आणि इतर पक्षी (शिकारी पक्षी) घुबडांची अंडी आणि पिल्लं खातात. माणसं हीसुद्धा मोठी शत्रूफळी.

आता आयुष्यात मिळून एकदा पिल्लं निर्माण करण्याची संधी त्याला मिळणार आणि त्यातही मी त्याची अंडी फेकून द्यायची हे काही बरोबर नव्हे.

अंडी घालताना ती दोनतीन दोनतीन दिवसाच्या अंतराने एकेक अशी घालतात. त्यामुळे अर्थातच पिल्लंही तशीच अंतरा अंतराने बाहेर येतात. शेवटचं पिल्लू बाहेर येईपर्यंत पहिलं चांगलंच मोठं झालेलं असतं. आणि त्यावेळी एकाच घरट्यात उतरंडीसारखी उंचीसे कतार म्हणावी अशी वेगवेगळ्या वयाची पिल्लं दिसतात.

त्यातली मोठी (अर्थात आधी जन्मलेली) एकदोन पिल्लं शक्तिमान असल्याने ती बापाने (हो बाप भरवतो सरपटणारे, धावणारे इत्यादि वेगळाले प्राणी मारुन. आई म्हणजे झेड सिक्युरिटीच्या ड्यूटीवर २४ तास) आणून दिलेलं अन्न बकाबका हिसकावतात. लहान पिल्लं जिवंत राहण्याची शक्यता नगण्य. अन्नपाण्याची ददात अगदीच नसेल तरच आठातली चारपाच जगतात.

मी दुकानात जाऊन एक वेबकॅम आणला. विशिष्ट रचना करुन तो खिडकीखाली लपवला. घुबड काही मूर्ख नसणार, त्याला नवीन वस्तू कळलीच असणार, पण त्याला हरकत दिसली नाही. कारण कॅमेरा काही फ्लॅश मारणं किंवा हालचाल करणं अशा गोष्टी करत नाही.

आता मोशन डिटेक्शन मोडमधे व्हिडीओज बनताहेत. मीही मोकळ्या वेळात समोर बसून लाईव्ह मॉनिटरिंग करतो आहे. प्रकार रोचक आहे. अधिक माहिती किंवा निबंध लिहीत नाही. व्हिडीओ WMV असल्याने ते इथे कसे द्यायचे कळत नाही. तोपर्यंत खूफिया कॅमेर्‍यातून येणार्‍या प्रतिमा आणि जे काही निरीक्षण नोंदवता येईल ते नोंदवत जाईन.

कालच कॅमेरा लपवला आहे. बघू काय होतं.. कोण जन्मतं आणि कोण जगतं.

नुसतीच अंडी. पक्षी नाहीच.

First

श्रीमती घुत्कर:

B

पहिला छोटू घुत्कर बाहेर आलेला आहे. कापसाचा थरथरता शुभ्र लालसर गोळा. वळवळ कम धडपड चालू आहे. बाकी सहाजण अभीतक अंडेमें.

म्हणजे शेवटी जगणारा लकी वन असण्याची याची शक्यता जास्त.

D

पहाटे घुबडं झोपतात असं म्हणायला हरकत नाही. पण अत्यंत सावध झोप.

E

अत्यंत तिखट कान असतात असं दिवसभरात दिसलं. दूरवरही कुठे खुट्ट झालं की दचकल्याप्रमाणे अंग काढून लगेच दक्ष पोझिशन घेते. फोडतेय कॅमेरा वाटतं:

F

बाकी सर्व लाईव्ह चालू आहे. काही वेगळं वाटलं की मधूनच अपडेट करीन.

आत्तापर्यंत दिसलेलं:

- एकच घुबड (लॉजिकली मादी) दिसली आहे. गेल्या पाच दिवसात अधूनमधून पाहात असतो तरी दोन घुबडं (नर आणि मादी) दिसले नाहीत. ही एकटी पडली आहे का अशी शंका आहे. व्हिडीओ कॅमेरा अर्थातच काय ते दाखवेलच यात शंका नाही.

- काल पहिलं पिल्लू जन्मल्यापासून मोशन डिटेक्ट व्हिडीओ आणि माझं मॉनिटरवर निरीक्षण यामधे पक्षी शांत आहे. पिसं साफ करतो. बसतो. झोपतो. रिलॅक्सही होतो. मधेच कावळा येतो मग घुबड त्याला पळवतं.

पण या सर्वामधे नवीन पिल्लाला खायला काहीही दिलेलं मी पाहिलं नाही. मध्यरात्री दिलं असेल तर माहीत नाही. पण वाचलेल्या माहितीनुसार दिवसातून दहावेळा तरी खाणं आणतात वडील. इथे मुळात वडीलच दिसत नाहीत.

काळानुसार उलगडा होईलच. व्हिडीओज जास्त रोचक असूनही इथे जोडता येत नाहीयेत.

बघत राहू..आत्ताच तर सुरुवात आहे.

सी यू सून.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (6 votes)

प्रतिक्रिया

यू आर अ‍ॅज वाईज अ‍ॅज अ‍ॅन औल. Smile
पुढे काय होते ते पहायचे आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सह्हीच! भारी आहे उपक्रम. पुढे काय होते ह्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

मस्त उपक्रम. कोणी खायला आणून देताना दिसलेलं नसलं तर पिलं जगताहेत कशी? जर वडील नसतील तर तुम्ही अन्न खायला देऊन तात्पुरते घुबडबाबा होणार का?

जर काही व्हि़डियो यूट्यूबवर अपलोडवता आले तर बघायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर वडील नसतील तर तुम्ही अन्न खायला देऊन तात्पुरते घुबडबाबा होणार का?

आणि झालात तरी तुमच्या आंजावरच्या आयडीवर काही फरक पडणार नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

खरंच मस्त.

पुढे काय होते ह्याची उत्सुकता आहे. +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

नॅशनल जिओग्राफीक सारखा प्रकार दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगदी हेच टंकायला आलो होतो!

- (शकुन-अपशकुन न मानणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हैला! रोचक!
इथे अपडेटवत रहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकदम नवीन हाय ह्ये आपल्याला. गवि, लगे रहो. कृपया कुठल्या तज्ञाला विचारुन ते यु ट्युबवर टाकता येईल का ते बघा ना. व्हिडिओ बघण्याची फार उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रांत असलेले घुबड 'गव्हाणी घुबड' आहे. इंग्रजीत 'बार्न आऊल'.

या घुबडाची खासियत म्हणजे भक्ष्य अख्खे गिळून टाकते आणि न पचलेला भाग मागच्या टोकाकडून बाहेर टाकण्याऐवजी तोंडातून ओकून टाकते. याच ओकलेल्या गोळ्यांमुळे हे घुबड काय काय खाते हे अभ्यासणे सोपे होते, असे वाचलेले आहे.

मागे एकदा नरेंद्र गोळेंनी 'ऐसी..'वर याच प्रकारच्या घुबडामागे कावळे मागे लागण्याची चित्रे दिली होती. त्यामुळे शहरी भागात या घुबडाने वसती करणे आजकाल शक्य होत आहे असे दिसते.
या दुव्याचा काही उपयोग झाला तर पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. मुंबईत बरीच गव्हाणी घुबडे आहेत. तसा राजरोस दिसणारा पक्षी नसला तरी अनकॉमन नक्कीच नाही. मुख्यतः रात्री उडत असल्याने दिसत नाही. पण मधेच कधीतरी संध्याकाळी किंवा पहाटेही अजिबात आवाज न करता केलेली ती खास फ्लाईट दिसते.

आउलचॅनेल आणि आउलपेजेस या वेबसाईट्स पाहतोच आहे हल्ली. धन्यु..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! भारीय की!
घुबडबाबा बनण्यासाठी +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! भारीय की!
घुबडबाबा बनण्यासाठी +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घुबडाचा एक एन्ट्री व्हिडिओ आणि कावळ्यांची पहिली चाहूल.

राग आला किंवा शिव्याशाप द्यायचे झाल्यास गळ्याखालच्या भागाची हालचाल करून घुबडीण काहीतरी पुटपुट करताना दिसते घुबडीण. या व्हिडिओमध्ये पहा:

आज दिवसभरात आणखी पिल्लू बाहेर आलेलं दिसलं नाही पण आहे ते जिवंत आहे इतकंच . बाकी अधुनमधून घुबडाची सर्वांगाची साफसफाई चालू आहे. पिल्लाच्या वरच घुबडीण बसत असूनही ते दबत कसं नाही कोण जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुखान्त होउ दे बॉ! नाही तर गविंच्या नावापायी धागा उघडून विकतचे दुखणे घेतले असे नको.
काही तरी फिक्सींग करा हो बिग बॉस! अपशकून, ट्रेजिडी नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्यता कमीच आहे पूर्ण सुखांताची. शुक्रवारी राजीव सानेंचा लेख लोकसत्तामधे आलेला होता. निसर्ग हा अजिबात "सम्यक" (अ‍ॅज वुई पर्सिव्ह) नसतो. सर्वात जास्त क्रूर भीषण (आपल्या दृष्टीने) घटना निसर्गातच घडतात. हे घुबड नसून मनुष्य असता तर सर्व सुखाचे होण्याची बरीच शक्यता असती.

कावळे आधीच घिरट्या घालायला लागले आहेत. चोवीस तास त्यांना हाकलणं शक्यही नाही आणि त्याला अर्थही नाही.

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपक्रम फारच आवडला, तुमच्या मुलाला आता त्या भयंकर भयंकर काल्पनिक कहाण्याऐवजी काहीतरी रोचक, माहितीपूर्ण आणि वास्तव चित्रकथा पहायला मिळेल. या कथेचा सुखान्त व्हावा असे सहज यांच्याप्रमाणे मलाही वाटतेय पण तसे होण्याच्या शक्यता निसर्गात फार कमी असतात हेही अर्थातच समजतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२२ ऑक्टो . सकाळ.
आत्ता पहिल्यांदाच भक्ष्य / अन्न पाहिलं . हा पहा उंदीर .

म्हणजे अन्नाची सोय होतेय. आता कोण आणतेय ते शोधणे आले. की पिल्लाची आईच डबल ड्यूटी करतेय ?

a

हुश्श...!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरूवात वाचूनच प्रश्न पडला होता, मोठी पिल्लं धाकट्यांना जगू देतात की ढकलून मारून टाकतात? तुमच्या कॅमेऱ्यातून दिसेल सगळं.

या कॅमेऱ्यातून टाईम लॅप्स व्हीडिओ बनवता आला तर पहा. सतत काहीतरी उत्कंठावर्धक प्रकार होत नसणार. १० मिनीटांच्या क्लिपमधूनही बरीच गंमत पहाता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुसरे पिल्लू बाहेर. सातपैकी पाच अजूनही अंड्यात. उंदीर गायब. सर्वांनी मिळून पोटात घातलेला दिसतो. ब्रेकफास्ट लंच डिनर..

आता बघू पुढे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.."
मग घरात कामासाठी आलेल्या प्रत्येकाने, पक्षी प्लंबर, रंगारी, सुतार वगैरेंनी माझ्या पोराला भयंकर भयंकर कहाण्या सांगितल्या. सुरक्षिततेचे उपाय आणि शक्यतो ही बला मारुन टाका असं जनहितार्थ बजावूनच ते गेले.

वैफल्य आणणारे विचार.(भाषा तर सोडूनच द्या!) सकल समाजाने वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टीकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगिकार (ही दाभोलकरांची भाषा!) करणे हे स्वप्न अद्याप किती दूर आहे हे अधोरेखित करणारे विचार.
घुबडाला अपशकुनी मानणार्‍यांनी हा विडिओ विशेषेकरुन पाहिला पाहिजे. जगात सर्वात अधिक उंदीर भारतात आहेत असे ऐकून आहे. (सर्वात जास्त क्षयरोगी, सर्वात जास्त हृदयविकाराचे रुग्ण आणि सर्वात जास्त प्रार्थनास्थळे! याप्रमाणे). धामणीसारखे साप आणि घुबडांसारखे प्राणी ही संख्या नियंत्रित करायला मदत करतात. अशा पक्षांना, प्राण्यांना अपशकुनी का म्हणायचे? अर्थात हा अडाणीपणा इतका सर्वदूर पसरलेला आहे की ज्याचे नाव ते. 'सकाळ' च्या सप्तरंग पुरवणीत एक शब्दकोडे येते. त्यात 'कासव' या शब्दाला 'उभयचर प्राणी' असे सूत्र दिलेले असते. कासव उभयचर नाही, तो पाण्यात राहाणारा,पण (व्हेलप्रमाणे) पाण्याबाहेर येऊन श्वसन करणारा जलचर आहे, हे ठाऊक असायला काही आईनस्टाईनची बुद्धिमत्ता नको. पण लक्षात कोण घेतो! काही महिन्यांपूर्वी झाडावर लपून बसलेल्या, घाबरलेल्या एका अस्वलाला जमावाने जाळून मारले होते तेंव्हासारखे मन व्याकुळ झाले.
हे वैफल्य दूर सारुन तुमच्या उपक्रमात रस घेतला. निसर्ग क्रूर आहे आणि निसर्गात शक्यतो ढवळाढवळ करु नये हे पक्के ठाऊक असूनही ('नॅशनल जिओग्राफिक' किंवा 'अ‍ॅनिमल प्लॅनेट' चे फोटोग्राफर ज्या तटस्थपणे चित्रण करतात तसे) आपण केवळ प्रेक्षक व्हावे हे मनाला बरे वाटले नाही. किमान ही घुबडबाळे कावळ्या-मुंग्यांच्या तावडीतून वाचावी आणि त्यातल्या एका-दोघांनी तरी रात्रीच्या अंधारात झेप घ्यावी, 'स्साला मार ही डालते थे तुरंत.." म्हणणार्‍या तथाकथित सुसंकृत लोकांशी त्यांचा आयुष्यात कधीही संबंध येऊ नये, असे वाटले. शक्य झाले तर आपण स्वतःही तसेच करावे असेही वाटले.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

"कासव उभयचर नसते." हे आपण खालीलपैकी कोणत्या प्रजातीबद्दल म्हणत आहात?
http://en.wikipedia.org/wiki/Turtle
http://en.wikipedia.org/wiki/Tortoise
कासव कुटुंबातील नक्की कोणता प्राणी?
चित्रात दिसणारे काही पाण्यात बहुतांश आयुष्यकाळ राहतात. त्यातही गोड्या पाण्याचे वेगळे, खार्‍या पाण्याचे वेगळे.
ह्यांचेच एक भाउबंद प्रामुख्याने जमिनीवर असते , अल्पकाळ पाण्यात.
तुम्ही कुणाबद्दल बोलताय?
.
"कासव उभयचर नाही" ठीक. पण मग कोणता सजीव "उभयचर" म्हणून सांगाल? एखादे उदाहरण?
.
पाचवी ते सातवीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात कासव उभयचर असल्याचे दिले होते हे पक्के, अगदि खात्रीने स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ऐला मला कासव सरीसृप आहे असे वाचल्याचे पक्के खात्रीने स्मरते. पोट जमिनीला टेकणारे, मगर प्रमाणे. उभयचर बेडुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या स्मृती आणि आकलनाने दगा दिलाय.
सॉरी मंडळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आँ? कासव आणि सरीसृप?????? कैपण हां.

अपडेट: तुमचे ब्रोब्र आहे. आता नेटवर चेकवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसाद आवडला संजोपराव. विषारी औषध खाल्लेले उंदीर हे घुबडांच्या मृत्यूचं मुख्य कारण आहे. त्यामुळे कितीही इच्छा असली तरी आसपासच्या एरियात रॅटकिल आणि तत्सम द्रव्यांचा वापर कितपत आहे त्यावर हे अवलंबून आहे. विशेषतः पिल्लांना हे विषारी अन्न पचणे शक्यच नाही.

आज सकाळी घरातून निघेपर्यंत शक्य तितकं पाहिलं पण एक पिल्लू मान खाली टाकून अजिबात न हलता बसलं होतं (व्हिडीओतही दिसतंय). त्याचं खरोखर काय झालं ते संध्याकाळी कळेल किंवा उद्या सकाळीच. कारण अंधार झाल्यावरच घरी पोहोचतो. आणि त्यावेळी माझ्या उत्सुकताशमनार्थ त्यांच्यावर प्रकाश टाकून डिस्टर्ब करायला नको वाटतं. आधीच ते घुबड सदैव दक्ष स्थितीत जागत असतं. डोळे मिटले तरी तीन सेकंदाच्या वर मिटलेले राहात नाहीत. भरपूर संघर्ष चालू आहे. कावळे टपलेले असतात. अशा वेळी निदान अंधारातही त्यांच्यावर झोत न टाकणं माझ्या हातात आहे.

ते पिल्लू जिवंत असावं आणि केवळ झोपलेलं असावं अशी उगीच भाबडी आशा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज एक नव्हे तर तीनतीन उंदीर शिकार करुन आणलेले दिसताहेत.

A

पुन्हा एकदा: रात्री व्हिडीओ अजूनतरी मिळत नसल्याने ही शिकार आईच करतेय की बापही जिवंत आहे याचा पुरावा नाही. नाईट व्हिजनची सोय केली पाहिजे. एरवी आपल्या उत्सुकताशमनार्थ त्यांच्यावर काळोखात टॉर्च मारणं मला पटत नाही.

इतक्या उंदरांचा स्टॉक का केला असावा? पुढच्या पिल्लांच्या अपेक्षेने का?

पहिल्या आणि दुसर्‍या पिल्लात ३ दिवसांचं अंतर होतं. रविवारी पहिलं, बुधवारी दुसरं, अशा क्रमाने साधारण शुक्रवार शनिवारी तिसरं यायला हवं. आज उरलेली पाच पिल्लं अजूनही अंड्यातच आहेत.

वाईट गोष्ट म्हणजे आज सकाळी एका पिल्लाची काहीच हालचाल दिसत नाहीये. खालील व्हिडीओ पहा.

पण ते जिवंत नाही असं इतक्यावरुन खात्रीने सांगता येणार नाही. ते हालचाल करेल अशी आशा. कार्यालयातून घरी गेलो की संध्याकाळी खात्री करुन सांगेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाईट व्हिजनची सोय केली पाहिजे. एरवी आपल्या उत्सुकताशमनार्थ त्यांच्यावर काळोखात टॉर्च मारणं मला पटत नाही.
........नाईट् विज़नची सोय खर्चिक/वेळ लागणारी असेल तर एक करून पाहू शकता. कॅमेरा उघडून त्यातला इन्फ्रारेड फिल्टर काढून टाका.
तो फिल्टर म्हणजे एक निळसर काचसदृश्य तुकडा असेल. तो एकतर थेट सेन्सर चिपच्या वर डकविला असेल किंवा पुढील भागात असलेल्या भिंगाच्या लगोलग पाठी.
साधारण कॅमेर्‍यातले सीसीडी १µm (१००० नॅनोमीटर) पर्यंत पाहू शकतात. पण इन्फ्रारेड फिल्टरमुळे ते ७००-७५० नॅनोमीटर पर्यंतच पाहू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय झाले त्या निपचिप पडलेल्या पिल्लाचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आज सकाळी सहा ते आठ हे दोन तास भरपूर नेटाने पाहिले. पण तेवढ्या वेळात घुबडाई एकदाच पिल्लांवरुन सरकल्या. तेही एक पिल्लू आणि अंडी दिसतील इतपत. एक पिल्लू दमदार हालचाल करत होते. दुसर्याचा क्लू नव्हता पण तिसरे अंडे उघडलेले दिसले. याचा अर्थ तिसरे पिल्लू बाहेर आले आहे.

जरा उठली असती जागेवरुन तर सर्व दिसले असते. सस्पेंस मनात घेऊन बाहेर पडावे लागलेय. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घुबडाई माझी लाडाची लाडाची ग
आवड तिला उंद्राची उंद्राची ग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणे लै आवडले होते.

अन असे काही तरी रचावे असा किडा आपलं घुबड घुत्कारत होतं, पण समस्यापूर्ती होत नव्हती. ती केल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आज सकाळपासून त्या काल निपचित पडलेल्या पिल्लाचे काय झाले ते बघायला बराच वेळ नेटाने निरीक्षण केलं. पण घुबडाई पिल्लांवर बसलेल्या हलायलाच तयार नव्हत्या. काही सेकंद उठल्या तेव्हा लक्षात आलेल्या गोष्टी:

१. तिसरे अंडे उघडले आहे. म्हणजे अजून एक (तिसरे) पिल्लू जन्मले आहे.
२. तेवढ्या हालचालीमधे एकच पिल्लू दिसले (व्हिडीओ पहा) ते दमदार हालचाली करत होते. बाकीची पिल्ले पंखाखाली असल्याने दिसली नाहीत. त्यामुळे त्या कालच्या पिल्लाच्या नशिबाविषयी मनात सस्पेन्स घेऊनच घरातून निघावे लागले.

फोटोंमधे.. (काहीजणांना घाण / किळसादि वाटू शकेल पण जे काही असेल ते लॉग करणे या उद्देशाने लिहीले पाहिजे.)

१. आज आणखी एक नवा उंदीर आणलेला दिसला.

A

२. घुबडांच्या पद्धतीप्रमाणे न पचलेल्या अन्नभागाला तोंडावाटे गोळीच्या स्वरुपात बाहेर टाकणे. या गोळ्यांना पॅलेट्स म्हणतात. पहाटे जरा अंधारात काढल्याने हे गुप्तहेर फोटो जास्त क्लिअर नाहीत. रात्री काहीतरी मारामारी झाली असावी कावळे / अन्य कोणाशी. कारण पिसे पडलेली दिसत होती (घुबडाची स्वतःची).

B

३. मधेच खाली झुकून पिल्लांना साफ करणे किंवा चोचीने स्पर्श करणे, खाजवणे यांपैकी एक चालू असतं.

C

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी वाटलेली काळजी खरी ठरली नाही. एक पिल्लू गेलं होतं असं वाटलं पण चार अंडी अक्षत दिसताहेत आणि तीन पिल्लंही तेव्हा सर्व जिवंत आहेत. माझा गैरसमज झाला..

शुक्रवारीच आणखी एक पिल्लू जन्मलं होतं. मला असं वाटलं की दोन नंबरचं पिल्लू जगण्याच्या झगड्यात बळी गेलं. पहिलं तिसरं आणि चौथं सध्या अस्तित्वात आहेत. पण तीनच जन्मली आहेत आणि तिन्ही जिवंत आहेत हे आता कळलं. नंबर १ आता मोठं झालं आहे. त्याचे डोळे उघडले आहेत. त्याने खाणंपिणं व्यवस्थित सुरु केलं आहे आणि त्याउपर आता अविर्भाव करुन शत्रूला (शत्रू = मी, कावळे इत्यादि) घाबरवणंही सुरु केलं आहे.

सोमवार सकाळचा व्हिडीओ:

आता एक विशेष गोष्ट. या व्हिडीओबाबत आणि त्यावेळच्या घटनेबाबत. मी आज पहिल्यांदाच फोटोच्या / व्हिडीओच्या मोहात पडून एक चूक केली. मी पहिल्यांदाच थेट कॅमेर्‍याने फोटो काढायला म्हणून खिडकी उघडली आणि हात बाहेर काढले. मला माहीत होतं की अशाने घुबडाई उडून जाते. पण तरीही मी ते केलं कारण तशीही शिकारीसाठी ती काहीकाळ पिल्लांना सोडून दूर जातेच असं मला वाटत होतं.

तशी ती खरंच उडून समोरच्या झाडावर जाऊन बसली. आणि त्यानंतर एक भयंकरच नाटक घडलं ज्यामुळे मला बर्‍यापैकी धक्का बसला.

जणूकाही घुबडाई तिथून बाहेर निघण्याची दिवसरात्र वाट पाहात असल्याप्रमाणे आजवर घराजवळ कधीही न दिसणारा कोतवाल (ब्लॅक ड्रोंगो) पक्षी तातडीने तिथे येऊन घुबडाच्या पिल्लांवर हल्ला करण्यासाठी घुसू लागला. मी त्याला हुसकावलं कारण चूक माझी होती.

तेवढ्यात सात आठ कावळ्यांचा एक झुंड आला. तोही टपून बसल्यासारखाच दिसत होता. त्यांनी टीमवर्क करुन पिल्लांना खायचंच असं टार्गेट ठेवल्याप्रमाणे काम विभागून घेतलं. दोन कावळे घुबडामागे लागून त्याला भेवडवून आणखी दूर घेऊन गेले. (आउट ऑफ साईट) बाकीचे तीनचार कावळे घरट्यामधे घुसायला लागले. मी बर्‍यापैकी सटपटलो कारण माझ्या एका कृतीने आता ती तिन्ही पिल्लं मरणार होती. मला एकदम टेन्शन आलं आणि मी त्या कावळ्यांना हुसकावत तिथेच उभा राहिलो.

आता आपत्ती अशी होती की मी तिथे हुसकत उभा असेपर्यंत घुबडही परत येणार नाही आणि मी हुसकणं थांबवून आत गेलो तर कावळे एक मिनिटही पिल्लांना जिवंत सोडणार नाहीत.

यातून मार्ग काढण्यासाठी मी खिडकीच्या लेव्हलखाली लपून कावळ्यांना आवाजाने हाकलत राहिलो. एकदोन मिनिटांनी ते घुबड कावळ्यांचा ससेमिरा चुकवून घरट्यात आलं. ते खूफिया कॅमेर्‍यात पाहून माय सोल फेल इन युटेन्सिल.

मग सर्व पूर्ववत झालं. आता स्वतःच्या उतावीळपणापायी असले प्रयोग करायचं नाही असा स्टोन टू ईअर.

Smile

आणखी एक व्हिडीओ. वरुन व्ह्यू असल्याने नीट दिसत नाही पण भक्ष्याचे लचके तोडणं (बहुधा पिल्लांना भरवण्यासाठी) चालू आहे. पिल्लांचे चर्प चर्प ऐकण्यासारखे आहे. व्हॉल्यूम वाढवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापरे. जर काही वेळात इतके हल्ले झाले तर त्या घुबडीणीला बाहेर निघणं अशक्यच असणार. पण म्हणजे उंदीर आणणारा कोई तो अलगहीच है आणि असा कोणीतरी आहे असं वाटून बरंही वाटलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कथा अजून संपलेली नाहीये हे माहीत आहे, तरीही या उपक्रमाबद्दल गविंचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. सर्वप्रथम भूतदया दाखवून या आईपिल्लांना संरक्षण देणं. दुसरं म्हणजे इतक्या संयमाने हे चित्रीकरण करणं. तिसरं म्हणजे या सर्व घटनांचा ऑंखो देखा हाल दाखवून लोकांनाही आपल्या उपक्रमात सामावून घेणं.

मला आणखीन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे इंटरनेट या माध्यमाचं वेगळेपण. एखाद्या वर्तमानपत्रात किंवा पुस्तकात याबाबत लेख वाचता येईल. टीव्हीवर कार्यक्रम पहायचा तर सगळ्या कथेचं संकलन करून भविष्यकाळात ती दाखवता येईल. म्हणजे 'असं झालं' इतपतच. 'हे प्रत्यक्ष घडतंय' याचं दररोज हळूवार उलगडणारं नाट्य समजावून घेण्यासाठी आणि त्यात गुंतून जाण्यासाठी या माध्यमाला पर्याय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो. लाईव्ह प्रकार पहायचा असेल तर या माध्यमाला पर्याय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
गविंनी चांगलं काम केलय.
त्यातही "पवित्र मानलं गेलं" म्हणून भूतदया दाखवली किंवा "कबुतरांना दाणे टाकून संपत्ती शतपट होणार" असला कसलाही मोह त्यात नाही.
"केवल ज्ञान" ह्या जैन संकल्पनेप्रमाणे त्यांनी "केवल कृती" केली आहे. स्वतःचा काही थेट फायदा बियदा वगैरे किंवा तथाकथित पुण्य पाहून नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सर्वांना थँक्स.. Smile

पिल्लं कशी आधी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या साईझची दिसताहेत ना? घुबडाच्या पिल्लांना काहीतरी शब्द काढला पाहिजे.. कॅट - किटन, डॉग - पपी, गाय - वासरु, घोडा - शिंगरु तसं.

बादवे, मला एक इमिनंट घटना काळजीत पाडते आहे. आवाजाबाबत अत्यंत सेन्सिटिव्ह असलेले हे पक्षी चारच दिवसात येणार्‍या दिवाळीच्या बाँब्स आणि कडकड वाजणार्‍या माळांना कसे सहन करणार? विशेषतः पिल्लं. एखादा अग्निबाण घरट्यात शिरु नये अशी इच्छा. अर्थात तशी शक्यता कमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुभ बोल नार्‍या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अरे म्हणजे अग्निबाण वगैरे शिरण्याशी शक्यता कमी आहे.. ती काळजी एवढी नाही..

आवाजाच्या पीडेविषयीच मुख्य म्हटलं आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालचा अपडेट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला मोशन डिटेक्ट ऑप्शनमधे तांत्रिक अडचण येतेय. माझा लॅपटॉप त्या ऑप्शनमधे तातडीने हँग होतो आणि गरम होत जातो. मोशन डिटेक्ट व्हिडीओज बनायचे बंद झाले. त्यामुळे कार्यालयात जाताना आपोआप कॅप्चर चालू ठेवणं शक्य नाही. दुसरा ऑप्शन - समोर बसून मॅन्युअली कॅप्चर करणं - कार्यालयामुळे जास्त वेळ शक्य नाही. त्यामुळे पहाटे उठून वेळ काढतो. पण तेवढ्यात काही घडले नाही की काहीच कळत नाही अपडेट. रात्री परत येतो तेव्हा अंधार..

आज घुबडीण जागची हललीच नाही त्यामुळे आज अपेक्षित असलेलं आणखी एक पिल्लू बाहेर आलं की नाही हेही कळलं नाही.

Sad

सुट्टीच्या दिवशीच जास्त इव्हेंट दिसतील.

आजचा कोणताही इव्हेन्ट नसलेला व्हिडीओ. पिल्ले पंखाखालीच:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म
झालंय काय की यामुळे दिवसभरात या घुबडाच्या पिल्लांचे विचार मनात येत असतात. अपडेट दिसला नाही तर काय झालं असेल हे समजत नाही.

तुम्ही ऑफीस/घर वगैरे व्याप सांभाळून हे करताय याचं कौतूक तर आहेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मलाही असच व्हायचं.
त्यावर उतारा म्हणून समजूत घालून घेण्यासाठी मी
"त्या घुबडाला(pun intended) मनोबांची काही पडलेली नाही. मग मनोबांना कशाला त्यांची काळजी लागून रहावी."
असे स्वतःला सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??!

पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं.. त्याच्या कुशीत झोपायला शिरतं. आईकडे जास्त जात नाही.

दादा हा ताईदेखील असू शकेल.. Smile

आणि उरलेलं तिसरं (मधलं.. म्हणजे २ नंबर) पिल्लू मात्र मम्माज बॉय आहे. ते कायम आईच्या पंखाखाली.

लहान्या आणि मोठ्याला पंखातून सुटका करुन मोकळ्यावर खेळायची हौस.. तर मधला मात्र आईच्या पदरात सदैव दडून.. बाहेर आला तरी नुसतं डोचकं बाहेर काढून अंदाज घेतो आणि आत दडतो.

थोडक्यात मोठा दादा आणि शेंडेफळ (आत्तापावेतोचं) यांचा कंपू झालेला दिसतो. व्हिडीओ नीट पाहिलेत तर मी काय म्हणतो कळेलच. एकदोनदा तर मला दादा (अर्थात त्याचं स्वतःचं हादडून झाल्यावरच बहुधा..) त्याच्या छोट्या दोस्ताला खायला मदत करतानाही भासला. आणखी निरीक्षणाने पक्कं सांगता येईल.

३१ ऑक्टोबर..

१. आधी बघा एक थोडा मोठा व्हिडीओ. यात आई आणि पोरं यांच्या दिनचर्येतला काही भाग.. शिकारीचे लचके, पोरांची मागणी, घुबडाईची स्वतःची साफसफाई... आणखीही काही दिसलं तर मला कळवा. हा व्हिडीओ फक्त थोडा जास्त वेळ तुम्हाला या घरात डोकावता यावं यासाठी.

२. हा व्हिडीओ दिवाळीत काय होईल याची झलक दाखवतो. शेवटपर्यंत पाहिला तर आधी एक सुतळी बॉंम्ब किंवा लक्ष्मीतोटा उडल्यावरची रिअ‍ॅक्शन.. थोडीशीच.. आणि नंतर फटाक्यांची माळ वाजल्यावर मात्र एकदम दचकून चला रे पंखांखाली.. मस्ती बास आता.. असा घुबडाईचा पोक्त इशारा..

३. बिग ब्रदर ईटिंग लंच.. डिस्टर्बन्स नको.. घुबडाईकडे चिर्र चिर्र अशा आवाजांनी मागणी केली जाते आणि ती आणलेल्या शिकारीचा एक लचका तोडून पिल्लांना देते. पिल्लं गुणी आहेत. आ करुन भरवण्याचा हट्ट न धरता आपापली हाताने जेवतात.. (लिटरली.. पिल्लांचे पंजे प्रचंड आहेत.. ते लचका पंजात पकडून किंवा पंजे त्यात रोवून त्यावर बसून चोचीने आपापले खातात.) माझी अशी समजूत होती की त्यांना चोचीत भरवावं लागत असेल. अर्थात मोठं झालेलं पिल्लू अशा रितीने खात असेल हीदेखील शक्यता आहेच.

४. बिग ब्रो झोपलाय. त्याचा छोटा चाहता त्याला ढोसकलतोय. त्याच्यावर चढायचा प्रयत्न करतोय. इतकावेळ ते दोघे एकमेकांशी काहीतरी ढकलाढकली करत होते. त्यानंतर मोठा भाऊ झोपला. तेव्हा लहान बाळ "माझ्याशी अजून खेळ ना रे.. " असं म्हटल्यासारखं मला वाटलं.

५. मला माझ्या वाट्याचा लचका दे अशी घुबडाईकडे बडादादाची तीव्र मागणी आणि लचका तोडून मिळाल्यावर संतोष पावून तो कोपर्‍यात नेणे. (कोपर्‍यात घेऊन निवांत खात बसण्याचा भाग व्हिडीओत आलेला नाही.)

पिल्लं घशातून कसलातरी वेगळाच सीर्र सीर्र अशा आवाज करतात. तो यातल्या बर्‍याचशा व्हिडीओजमधे ऐकायला मिळेलच. पण त्या आवाजाने त्यांची शांतताप्रेमी आई वैतागते आणि त्यांना पंखाखाली घेऊन आणि अर्रर्र किंवा तत्सम दबक्या आवाजात दामटते असं दिसलं. केवळ खाणं / भक्ष्य इतकाच इंटरेस्ट न राहता आता त्या पिल्लांना (निदान थोरल्याला) खेळण्यातही रस उत्पन्न झाला आहे असं वाटतंय. एक रंगीबेरंगी चिंधी मिळाली आहे त्यांना. ती फाडत बसतात.

बाकी अपडेट उद्या किंवा जसाजसा लाभेल तसा. साधारण कालक्रमानुसार आणखी एक पिल्लू उद्या यायलाच हवं.

भेटू..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा! आभार!
तिघेही सुखरूपच नव्हेत तर वाढत्या चंद्रकलेप्रमाणे का काय म्हंटात तसे वाढताहेतही हे बघून आणंद जाहला! बिग बॉस, बिग ब्रदर वगैरे रिअ‍ॅलिटीशोजच्या तोंडात मारेल इतका हा प्रकार रोचक आहे.

बाकी घुबडाई हा शब्द प्रचंड आवडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोज अपडेट बघितल्याशिवाय चैन पडत नाही.
गविंचे भले होवो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा येतीये अपडेटायला. आणि पिल्लांच्या बाळलीला पहायला. मला त्या घुबडाईच्या भुवया परेश रावळसारख्या वाटताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल आणि आजच्या दिवसातल्या काही प्रतिमा:

आज सकाळी (१ नोव्हें.).. तेजायला किती पिल्लं आहेत तेच कळत नाहीये. मॅगी नूडल्सप्रमाणे पसरलीत एकमेकांवर. कोणीतरी मोजून पहा हो. चौथं आलंय का ते..

A

२. कालच्या काही प्रतिमा (३१ ऑक्टो)

B

C

D

E

अर्थात कॅमेर्‍याची कपॅसिटी मर्यादित आहे आणि अ‍ॅक्सेसही अडचणीचा. त्यामुळे फोटोग्राफिक मूल्य येणारच नाही. फक्त काय चाललंय ते पाहता येईल धूसरपणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३ नोव्हेंबरचा अपडेट:

घुबडाईने घरट्याजवळ आलेल्या कावळ्याला दिलेला खतरनाक थ्रेट डिस्प्ले. पंख फुलवून भयंकर उग्र रूप दाखवून घुबडं शत्रूला पळवतात असं ऐकलं होतं. पण आज थेट पहायला मिळालं. आकार कमी करण्यासाठी क्रॉप केलेला व्हिडिओ इथे देतोय.

पिल्लं आणि अंडी यांबाबत गोंधळ होतो आहे. अजूनही चार अंडी दिसताहेत. आणि तीन पिल्लं. पण .. त्यातलं एक पिल्लू एकदमच लहान दिसतंय ..

आधीचे व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा की आधी दिसणारं लहान पिल्लू नक्कीच आणखी बरंच मोठं दिसायला हवं होतं एव्हाना .. पण आज दिसलेलं लहान पिल्लू हे एकदम नवजात दिसतंय.

आणखी एक. कालच पाच मजले खाली जमिनीवर फुटक्या अंड्याचे अवशेष मिळाले. म्हणजे एक तरी अंडं कमी व्हायला हवं होतं. .

दुसरी गोष्ट : दोन दिवसांआड एक पिल्लू अशा क्रमाने बाहेर येण्याचा क्रम असताना सहा दिवस उलटले तरी नवीन पिल्लू आलं नसेल हे पटत नाही.

म्हणजे निम्ननिर्दिष्टांपैकी काही शक्यता वाटतातः

अ. घुबडाई पहिलं पिल्लू बाहेर आल्यानंतरही अ‍ॅडिशनल अंडी देत राहते आहे की काय?
ब. परवापर्यंत सर्वात शेवटचं आणि किंचित आकार वाढलेलं पिल्लू गायब झालं आहे आणि आज किंवा काल रात्री अतिशय छोटं असं पिल्लू नुकतंच जन्माला आलं आहे. आणि नंतर घातलेल्या अंड्यांमुळे अक्षत अंड्यांची संख्या चारच राहिली आहे.

असं असेल तर आधी एक पिल्लू मेल्याची मला जी जवळजवळ खात्री झाली होती आणि नंतर दोन दिवसांच्या गॅपने पुन्हा तीन पिल्लं आणि चार अंडी असा हिशेब लागला तेव्हाही एक पिल्लू खरंच मेलं / कावळ्यांनी पळवलं असण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळीही ते पिल्लू जरासं मोठं झालेलं होतं आणि नंतर पाहता पुन्हा नवजात आकाराचं दिसलं होतं. पण तेव्हा मी दुर्लक्ष केलं.

एकूण जन्मू शकणार्‍या (जगू शकणार्‍या नव्हे) पिल्लांची संख्या अबाधित ठेवण्यासाठी घुबडीण प्रसंगोपात्त अधिकची अंडी घालतेय की काय? यात कितपत शास्त्रीय आधार आहे माहीत नाही, पण दिसतंय त्यावरुन मला असा निष्कर्ष काढण्याखेरीज पर्याय नाही.

बाकी..

घुबडाई जबरदस्त ताकदीने आणि जोरदार हालचालीने वरचेवर अंड्यांजवळ काहीतरी खणत राहते. हा प्रकार खूप वेळ चालतो. ती अंड्यातल्या पिल्लाला स्टिम्युलेट करते की पिल्लांसाठी भुसभुशीत मऊ जागा व्हावी म्हणून तिथे असलेल्या गोष्टींचा भुगा करते की तिथे किडे होऊ नयेत म्हणून काही करते ते कळत नाही.

घुबडाईची सक्काळी सक्काळी आणि नंतरही अनेकदा चालणारी सेल्फसफाई.. पीसनपीस लख्ख..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज सकाळी कॅमेरा ऑन करताच असं दिसलंय की सर्वात मोठं पिल्लू नाहीसं झालेलं आहे. अर्थातच कोणीतरी खाल्लेलं आहे. उर्वरित सर्व अंडी पळवलेली आहेत. फक्त दोन पिल्लं(मधलं आणि लहान)शिल्लक आहेत. पण सर्वात दुर्दैवाची आणि काळजीची गोष्ट अशी की त्यांना एक मिनिटही एकटं न सोडणारी त्यांची आई स्वतःच सकाळपासून तरी घरट्यात आलेली नाही किंवा आसपासही दिसलेली नाही.

घुबडाईला कोणी पकडलं किंवा मारलं असेल किंवा अन्य शत्रूंनी दूर हुसकावून लावताना झटापटीत जखमी झाली असेल तरच ती परत न येणं शक्य आहे. त्यामुळे या दोन पिल्लांचं भवितव्य अंधारात.

इथे प्रचंड फटाके, माळा, बॉम्ब वाजत होते. अग्निबाणही उंच उडून फुटत होते. त्या भीतीने पिल्लं सतत ओरडत होती. आवाजाच्या दहशतीने तर घुबडाई दूर गेली नसेल?

सोसायटीत फटाके उडवू नका कारण इथे घुबड आहे असं सांगितलं असतं तर बहुधा ते ताबडतोब हटवण्यासाठी बरेचजण प्रयत्नशील झाले असते. ते षटकर्णी करणं जास्त धोक्याचं होतं.

A

B

वाईट वाटतंय. कॅमेर्‍याने सर्व भाग स्कॅन केला आणि खात्री झाल्यावर मात्र दु:ख झालं.

कोणी मारली पिल्लं आणि अंडी ते कळायला मार्ग नाही. घुबडाई तरी यावी परत. आता उद्यापर्यंत प्रतीक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेरे!! Sad Sad Sad

अतर्क्य न झाले काही जरी अकस्मात
मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा

हेच खरं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरेरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्पमित्र असतात तसे कोणी पक्षीमित्र नसतात का? त्यांना बोलवुन, ती पिलं मोठी करुन नंतर निसर्गात सोडता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ. सतिश पांडे, जे पक्षितज्ञ आहेत आणि सध्या घुबडांवर विशेश अभ्यास करत आहेत, त्यांना गविंशी संपर्क साधावयाचा आहे. शक्यता आहे की ते उरलेल्या दोन पिल्लांसाठी काही करू शकतील. प्लीज गविंचा मोबाईल नंबर अथवा इमेल मिळू शकेल का? लवकरात लवकर ९३७११७९०९५ वर संपर्क साधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याशी इथे निरोपाद्वारे संपर्क करतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेरे! फारच वाईट बातमी...

गवि,

मी तुम्हाला इथे निरोप पाठविला होता. डॉ. सतिश पांडे, जे पक्षितज्ज्ञ आहेत आणि सध्या घुबडांवर विशेश अभ्यास करत आहेत, त्यांना तुमच्याशी संपर्क साधावयाचा आहे. आपला मोबाईल नंबर अथवा इमेल मिळू शकेल का?

धन्यवाद
प्राणिमात्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीवो जीवस्य जीवनम हे जरी खरे असले तरीही - अरेरे! वाईट झाले.
ती उरलेली दोन पिल्ले अजून जिवंत असावीत आणि घुबडीण परत येऊन त्यांचे संगोपन करेल अशी आशा आहे.
डॉ. सतिश पांडे यांच्या साहाय्याने काही चांगले होईल अशा आशेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ. सतीश पांडे यांच्याशी दूरध्वनीवर तपशीलवार चर्चा झाली त्यात त्यांनी असं सांगितलं की पिल्लं जन्मल्यावर काही काळाने घुबडीण पिल्लांना काहीकाळ एकटं सोडून बाहेर (शिकारीला) जाणं हे शक्य असतं. तेव्हा अजून वाट पहावी, घुबडीण परत येण्याची शक्यता आहे.

तसंच होवो.

(पिल्लं अजून फारच लहान आहेत त्यामुळे इतक्यात त्यांची आई अशी बाहेर जाईल का आणि तेही तासनतास अशी शंका मात्र मनातून पूर्ण जात नाही. - कारण आत्ताच घरुन खात्री करुन घेतली - अद्यापही घुबडीण परत आलेली नाही.) पण प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. पांडे यांनी ही शक्यता सांगितल्यावर जरा बरे वाटले.

बाकी निसर्ग जे करेल ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुश्श. जरा तरी आशेला जागा आहे म्हणायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्यायला........ असो Sad Sad Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काही आशादायक अपडेट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल दुपारी संध्याकाळी , आज मध्यरात्री, पहाटे आणि सकाळी अगदी निघताना ९ वाजेपर्यंत पुन्हा पुन्हा नीट पाहिलं.

पण घुबड मातापिता यांपैकी कोणीही एकदाही दिसले नाहीत. आजुबाजूला घुबडिणीची बसण्याची ठराविक जागा म्हणजे एकच मोठे झाड आहे. तेही नीट पाहिलं, तिथेही काही नाही.

मात्र त्यातल्यात्यात आशादायक म्हणायचं तर असं की काल रात्री त्यातलं मोठं पिल्लू एक खूप छोटा मांसाचा छोटा तुकडा खाताना दिसलं. तो आधीच्यातला उरलेला होता की घुबड पालकांपैकी कोणी नवीन आणून दिला होता ते कळणं शक्य नाही, पण याचा अर्थ काल रात्रीपर्यंत तरी त्याच्याकडे थोडं अन्न शिल्लक होतं. लहान पिल्लाला त्याने दिलं असेल का माहीत नाही. पण दोघे एकमेकांना चिकटून / कुशीत राहात आहेत. पहाटे काहीकाळ ते दोघे घरट्याच्या जागेच्या दोन टोकांना झोपले होते. पुन्हा एकत्र आले.

आज सकाळीही एक उंदराचा अवशेष म्हणावा असा भाग दिसला. मुळात तो खरंच उंदीर होता का आणि असला तर तो कालचाच होता की नवीन ते सांगणं कठीण आहे. पण अंधुकशी शक्यता अशी की तो काल रात्रीमधे त्यांच्या आईने / बापाने आणून दिलेला असावा.

एखादा पूर्ण आकाराचा मोठा उंदीर नव्याने आलेला दिसला तरच याविषयी १०० टक्के खात्री होईल.

मादीही पिल्लांना सोडून कधीनाकधी बाहेर पडते याची कल्पना आहे. पण माझ्या मनात असं होतं की सुरुवातीला थोडाथोडा वेळ ती दूर जात असेल आणि बराच वेळ पिल्लांपाशी बसत असेल. नंतर हळूहळू बाहेरचा कालावधी वाढवत असेल.

पण दोन दिवसाआधीपर्यंत एक मिनिटही बाहेर न पडणारी घुबड मादी आता सतत बाहेरच कशी राहात असेल असा प्रश्न अजून मनात आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या या स्रर्व रास्त प्रश्नांबरोबरच हाही प्रश्न आहेच की जर मोठे पिलू आणि उरलेली अंडी कोणाचे भक्ष्य ठरले असेल तर ही दोन्ही छोटी पिले आता कसलेही संरक्षण नसताना कालच्या दिवसात जिवंत राहिली आहेत तर त्यांना कोणीतरी संरक्षण पुरवते आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यातलं मोठं पिल्लू हे घाबरवण्याचा पवित्रा घेण्याइतपत मोठं झालं आहे असं वाटतं.

वर नोंदवलेली एक घटना वाचली तर दिसेल की मी एकदा कॅमेरा खिडकीबाहेर काढला तर घुबडाची मादी उडून गेली. ती उडून जाताना बर्‍याच पक्ष्यांनी ते पाहिलं आणि त्याचक्षणी, ती समोरच्या झाडावर बसलेली असूनही, तिच्यासमोर, तिथल्यातिथे ड्रोंगो आणि कावळे एकदम टीमवर्क केल्यासारखे घरट्यात घुसायला लागले. प्रचंड हल्लेखोर प्रवृत्तीने ते तिथे घुसत होते. मी त्यांना सतत हाकलून ती घुबडीण परत येईपर्यंत दोन मिनिटे थांबवून धरलं.

याचा अर्थ दृष्टिपथातही कुठे न बसता दूर अज्ञात स्थळी राहून अधेमधे क्षणभर एखादी चक्कर टाकून तेवढ्याने घुबड आईवडील आपल्या पिल्लांना संपूर्ण वेळ संरक्षण देऊ शकत असतील यावर प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने विश्वास ठेवणं कठीण जातंय.

ते जिवंत आहेत ते बहुधा त्या पिल्लाच्या थ्रेटनिंग डिस्प्लेमुळे किंवा त्यांच्या आईच्या अनुपस्थितीची अद्याप अन्य शत्रूंना जाणीव झालेली नसल्याने. (जागा खबदाडीत आहे त्यामुळे बाहेरुन कावळ्याला कळणार नाही की आत मादी आहे की नाही ते.)

असो .. काय ते काळानुसार स्पष्ट होईलच. उंदराचा क्लू आशादायक वाटतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच्या या फोटोत पिल्लांच्या बाजूला जे काळं दिसतंय तो जर उरलेला उंदीर असेल तर अन्नपुरवठा चालू / शिल्लक असल्याची धूसर शक्यता आहे.

A

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हं.... पण ज्यांच्या तोंडी मोठे पिलू आणि उरलेली अंडी पडली त्याला/त्यांना तर माहित असणार ना की इथे अजून भक्ष्य उपल्ब्ध आहे आणि तेही सह्जसाध्य . . .म्हणजे जर सगळ्यात मोठे पिलू त्या भक्षकाच्या तोंडी पडू शकले तर त्याच्याहून लहान पिल्लाचा काय पाड लागणार? तरिही जर दोन्ही छोटी पिले आता कसलेही संरक्षण नसताना कालच्या दिवसात जिवंत राहिली आहेत तर त्यांना कोणीतरी संरक्षण पुरवते आहे असे माझे विशफुल थिंकिंग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुड न्यूज.. सर्व वाट पाहणार्यांसाठी..

खात्रीपूर्वक एक नवी छोटी चिचुंद्री पिल्लाखाली दाबून ठेवलेली दिसली. पिल्लांवर आईबापांचे छत्र अद्याप आहे याचा स्पष्ट पुरावा.

हुशश.

मधल्या दोन दिवसांत माझे बोनलेस चिकन खाल्लनीत ... जाऊंदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या प्यारलल युनिवर्समधल्या एखाद्या बीळविहारीकृत एखादे वीडियोयुक्त चिचुंद्रीबुलेटिन/रिपोर्ताज कसे असावे, याबद्दल जबरदस्त कुतूहल लागून राहिले आहे.

('बिर्‍हाडी चिचुंद्रीच्या बिळात - ११ नोव्हेंबर - 'इन अ होल' - सारेच संपले - ब्याडलक'.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'फायर इन द होल' नामक घोषणा काही गेमाडपंथी लोकांच्या पीशींवर कायम ऐकू येते त्याचा संबंध इथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मधल्या दोन दिवसांत माझे बोनलेस चिकन खाल्लनीत ... जाऊंदे.

होऊ देत खर्च!
गवि, तुमच्याशी भेट होईल तेव्हा हवं तेवढं चिकन माझ्याकडून लागू...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या तरी सर्व ठीकठाक चाललेलं दिसतंय. दिवसाला एखादा तरी उंदीर घुबड आईबापांकडून येतो आहे. ते स्वतः मात्र समोर दिसत नाहीत.

एक पिल्लू बर्‍यापैकी मोठं दिसायला लागलेलं आहे. त्याच्या शुभ्र पंखांमधे काही करडी पिसं तयार व्हायला लागली आहेत. ते बराच वेळ आळसुटल्याप्रमाणे झोपूनच असतं. लहान पिल्लू मात्र उत्साही आहे आणि ते मोठ्याला वरचेवर ढुसण्या देत आणि चळवळ करत असतं.

मोठ्या पिल्लाच्या चक्क खांद्यावर / पाठीवर चढून घोडाघोडा केल्यागत बसण्याचा प्रकारही लहान पिल्लू बर्‍याचदा करतं. दादाही त्याला जरावेळ उचलून मग पाडून टाकतो.

व्हिडीओ बरेच मोठे झाल्याने एडिट करायला हवेत. ते करायला वेळ नसल्याने आज व्हिडीओ नाही.

@ नवी बाजू.. परिप्रेक्ष्य आवडले.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

A

B

C

उंदरांचा सप्लाय काल सकाळपासून न दिसल्याने आणि काल रात्री माझ्या चाहुलीनेच पिल्लांनी "खायला द्या" चा आक्रोश सुरु केल्याने आणखी चिकन पीसेस घातले. गोद्रेज रियलगुड झिंदाबाद. कदाचित आईबापांचे उंदीरही चालू असतीलच, आणि ते येताच तातडीने गट्टम करुन पुन्हा सर्व साफसूफ..

पण पुरवठा कमी झालाय असं वाटतं खरं. उंदीर सापडत नसतील कदाचित..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय मस्तं दिसतेय जोडगोळी!
गवि- तुमच्या ह्या उपक्रमाचं करावं तेव्ह्ढं कौतुक कमीच आहे. आणि ह्या अनुभवात आम्हा सगळ्यांना सामील केल्याबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

'चो च्वीट!' आणि तत्सम प्रतिक्रियांचे नेटवरील पीक पाहून उबग आला असला तरी तशाच प्रतिक्रिया टाकाव्या असा मोह पाडणारे फोटो आणि व्हिडिओही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो ना! दोन्ही 'गवि ज्युनियर' गोग्गोड आहेत.

===============================================================

म्हणजे, दोघेही टेक्निकली पुढेमागे होऊ घातलेले का होईना, पण एका अर्थाने 'गगनविहारी'च आहेत, म्हणून 'गवि'; आणि इथे (बोले तो, जालावर, झालेच तर 'ऐअ'वर) अगोदरच एक 'गवि' आहेत, म्हटल्यावर कन्फ्यूजन नको, म्हणून, आणि एवीतेवी या अगोदरच असलेल्या 'गविं'पेक्षा दोघेही वयाने लहान आहेत, म्हणूनही, 'ज्युनियर'. उगाच नसते गैरसमज नकोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी असेच.
(चि) गविंचे भले (मोठे) होवो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(चि) गविंचे भले (मोठे) होवो!

!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्लील, चावट, इ. नव्या श्रेणीची मागणी केली आहे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असे काही भले मोठे झाले तर लोक गगनविहारी न राहता गगनतलवारी होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगागागागागागागागागा ROFL ROFL ROFL

नाही मी बोलत आता Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक ही एकमेव श्रेणी थोडीफार जवळ जाणारी वाटतेय !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile घुबडबाबांचे पिल्लांतर्फे मनापासून आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा व्हिडीओ नेटाने शेवटपर्यंत पाहिलात तर सुरुवातीला पिलांच्या हालचाली, विशेषतः मोठ्या पिल्लाचं माणसाप्रमाणे पूर्ण उभं राहणं, यात खूप गंमत वाटेल, पण तसेच टिकून राहिलात तर साडेतीन मिनिटे ते चार मिनिटे या इंटर्वलमधे एकदा आणि सुमार सव्वाचार मिनिटे या जागी दुसर्‍यांदा, असा तो अत्यंत खास शत्रूला घाबरवण्यासाठी घेतलेला पवित्रा -अंग दबकून फुलवणे- दिसेल.

(अद्याप पंख नसल्याने तो अविर्भाव लिंबूटिंबू दिसतो..)

पण.. त्यासोबत येणारा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सापासारखा दीर्घ फूत्कार (स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्शशश..) हा खरोखर दचकवणारा असतो..कुकरची शिट्टी जितकी तीव्र असते तितका तीव्र ऐकू येतो जवळ असताना. या व्हिडीओत त्या अविर्भावासोबत तोही ऐकायला मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

a

b

c

e

F

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मानवी भावनांची तुलना ह्यांच्याशी करायची झाली; तर फोटोमधून एक निस्सिम निरागसता प्रतीत होते.
ही चिमुरडी त्यांच्या चिमखड्या भाषेत " आमाला खेलायला गार्डनला नेनाल का" असं चटकन् विचारतील असं वाटतं.
.
सम्यक निसर्ग ही भंकस असेलही. त्यात टोकाच्या आणि हिण्कस क्रौर्याचे दर्शनही होते.(अर्थात क्रौर्य ही पुन्हा मानवी भावनाच."जाणिवेत"ल्या जीवांसाठी)
पण ही जी like begets like वाली साखळी आहे ना, ती अतिशय लोभस आहे. निसर्गाची ती लोभस बाजू.( आता साला "लोभस" ही पण मानवी भावना.)
कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हेही फटू उत्तम. एक मजा म्हंजे पहिल्या फटूत घुबडांऐवजी मिनिएचर माकडे वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने