श्वासात जपत होतो

श्वासात जपत होतो

तुझ्या नेहमीच्या तक्रारी
'मी तुला विसरलो होतो'
कसे सांगू आठवणी
मी श्वासात जपत होतो

एक श्वास बाहेरी
दुसरा परत येई
सान्ग एवढ्या व्यस्ततेत
विसरणे कसे शक्य होई?
लोकांच्यात मिसळूनी
मी तुझ्या जवळ होतो
कसे सांगू आठवणी
मी श्वासात जपत होतो

जागेपणी श्वास चालू
झोपेत ते उसासे
तुझ्या विरहात आठवणीन्चे
हे ठेचाळणे जरासे
उसाशातही श्वासांना
उसंत देत नव्हतो
कसे सांगू आठवणी
मी श्वासात जपत होतो

विसरून तुला जेव्हा
थांबतील श्वास माझे
तुझ्या सुपूर्त करीन
ते आठवणींचे ओझे
हे लिहितानाही सांग
दुसरे काय करत होतो?
कसे सांगू आठवणी
मी श्वासात जपत होतो

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही बायेनीचान्स 'मोकलाया दाहि दिश्या'ची ऐसीअक्षरीय आवृत्ती आहे काय?

(शीर्षक भयंकर आवडले!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात आणि यातही प्रयोग असले तरी या प्रयोगांची मिती निराळी आहे हे अमान्य करता येणार नाही. तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन नवनवीन प्रयोग होत आहे (धनंजयने याही दिवाळी अंकात एक केलाय) हे आश्वासक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शीर्षक मलाही भयङ्कर आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Very thanks!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

माझ्या संगणकावर "FOBB" लिहिलेला चौकोन आहे, तो बहुधा "र्‍हस्व वेलांटी" असावा. वगैरे.

(माझ्या संगणकावर फाँट गंडलेला आहे, गुप्तलिपी हेतुपुरस्सर काही ही शक्यता मनात ठेवली पाहिजे.)

बहुधा शीर्षक असे असावे : "श्वासात जपत होतो"

> तुझ्या नेहमीच्या तक्रारी
> 'मी तुला विसरलो होतो'
> (काय) सांगू? आठवणी
> मी श्वासात जपत होतो.
> ...
>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद धनंजयजी!

ही कविता मी माझ्या मोबाइल वरून टाकल्याने सगळी गडबड झालेली आहे!
मी याबद्द्ल माफी मागतो!

तुम्हा सर्वासाठी ही कविता परत पाठवीत आहे! आशा करतो आता व्यवस्थित येईल, आणि तुम्हा सर्वाच्या पसन्तीस उतरेल!

श्वासामध्ये जपत होतो

तुझ्या नेहमीच्या तक्रारी
मी तुला विसरलो होतो
कसे सांगू आठवणी मी
श्वासामध्ये जपत होतो

एक श्वास बाहेरी
दुसरा परत येई
सांग एवढ्या व्यस्ततेत
विसरणे कसे शक्य होई
लोकांच्यात मिसळुनी
मी तुझ्या जवळ होतो
कसे सांगू आठवणी मी
श्वासामध्ये जपत होतो

जागेपणी श्वास चालू
झोपेत ते उसासे
तुझ्या विरहात आठवणींचे
हे ठेचाळणे जरासे
उसाश्यातही श्वासांना
उसंत देत नव्हतो
कसे सांगू आठवणी मी
श्वासामध्ये जपत होतो

विसरून तुला जेव्हा
थांबतील श्वास माझे
तुझ्या सुपूर्त करीन
ते आठवणींचे ओझे
हे लिहितानाही सांग
दुसरे काय करत होतो
कसे सांगू आठवणी मी
श्वासामध्ये जपत होतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

आता मजा गेली. वरिजनलच चांगली होती.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेही चालेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...