नेति नेति चा एक्सरसाइज

रेल्वे स्टेशन वर रात्री
रेल्वेला यायला अजून अर्धा तास असताना
कुठल्याशा कॅफेत केव्हाच पिउन संपलेल्या कॉफीच्या कागदी कपासमोर
थकलेल्या मनाच्या पुराण्या सवयी जाग्या होतात
त्यातलीच एक
नेति नेति च्या एक्सरसाइज ची

समोरचा कागदी कप…तू आहेस ?
नेति नेति

काचेच्या शो रूम मधले काळे चष्मे…तू आहेस ?
नेति नेति

खालची जमीन , जाहिराती मधली अर्धनग्न स्त्री ?
नेति नेति

मधूनच थंड हवेची झुळूक सोडणारं
भकास ट्यूब लाईट असणारं वरचं फाल्स सीलिंग ?
नेति नेति

इस्त्री केलेले लोखंडी रूळ ?
मागून धावणाऱ्या लोखंडी गाड्या ? त्यांची गति ?
नेति नेति

हवा ? कॉफीतले पाणी ? दूध ?
नेति नेति

जाकीट, पाकिट , कपडे, बूट ? बुटाची लेस ?
नेति नेति

जाहिरात पाहणारा ? डोळा ? नजर ? सुकणारा गळा ?
कॅफेतलं संगीत ऐकणारा ? कान? केस ? हृदय , कागद , पेन , शाई ?
बोटे ? श्वास ?
येणारा … जाणारा …

नेति नेति
नेति ने ….

नेति….
…ति
…. ती
भीती

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

नेति नेतिचा ठरवून मानसिक व्यायाम करण्याची कल्पना आवडली. न-अस्तित्वाची आठवण करून देण्याची गरज पडते. आणि त्या आठवणीने भीती वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0