तुम्ही नियमितपणे काय वाचता?

'ऐसी'च्या संस्कृतीप्रमाणे ऐसीकर आपल्या म्हणण्याच्या पुष्टीदाखल यथार्थ दुवे देत असतात ही गोष्ट खरी. पण ते वाचताना प्रश्न पडतो की, ही मंडळी इतकी माहिती चाळून पचवत असतील आणि हवी तेव्हा चपखलपणे काढून देऊ शकत असतील, तर हे लोक नियमितपणे वाचतात तरी काय नि किती? ते कुतूहल शमवण्याकरता हा धागा.

उत्पलच्या धाग्यात त्यानं म्हटल्याप्रमाणे जालावरचं महाभारत एकेकदा पहायला, आपल्या वाचनाचं कुरण निवडायला नि त्यावर काहीएक म्हणणं तयार व्हायला वेळ जातो, तोवर हे दुवे महापुरात हरवूनही गेलेले असतात. तसे ते जाऊन नयेत, एका ठिकाणी सापडावेत, म्हणूनही.

इथे काही विवक्षित बातम्या किंवा विशिष्ट लेख अपेक्षित नाहीत. तर नियमितपणे चाळली जातात अशी संस्थळं, वृत्तपत्रं, एकाद्या लेखकाचा ब्लॉग किंवा वृत्तपत्रीय सदर - आणि त्याची वैशिष्ट्यं मिळाली तर बरं होईल.

('सध्या काय वाचताय?'पेक्षा हे थोडं निराळं आहे. पण संपादकांच्या मते ते त्याच धाग्यात जाणं योग्य असेल, तर आपली काही हरकत नाही.)

***

मी नियमितपणे एवढं एक वृत्तपत्र आणि हे संस्थळ चाळते (वाचणं लांब राहिलं!). तेच मला पुरून उरतं.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

माझं वाचनः-
सकाळ (फ्यामिली डॉक्टर , सप्तरंग पुरवण्याम्सकट, प्रॉपर्टी वाली पुरवणी मात्र वाचत नाही )
मटा चाळतो वरवर
लोकसत्ता (मुख्य पेपर प्लस चतुरंग वाचतो. प्रॉपर्टी वाले आर्टिअकल फेकून देतो)
मिपा
ऐसी
उपक्रम (सध्या बंड पडलय)
मीमराठी डॉट नेट (सध्या बंड पडलय)
ह्या साइटस वरील जवळजवळ हरेक लेख, चर्चा, प्रतिसाद वाचला जातो.
कविता, पाकृ आजवर एकदाही वाचले नाहित. झेपत नाहित.
खरडींची देवघेव करत बसणे जमत नाही; कधीमधी वर्ष दोन वर्षातून एखादे वेळेस अचानक जमतील तित्क्या स्वतःच्या आणि इतरांच्या खरदी उचकून पाहतो.
.
.
लोकप्रभा
इ विवेक(हे संघाचे असले, तरी "ई ई ई " करण्याइतके वाईट नाही. कित्येकदा चाम्गले माहितीपूर्ण लेख्,चर्चा देउन जाते. विचार करण्यास उद्युक्त करते.)
टाइम्स ऑफ इंदिया पुणे एडिशन
इकॉनॉमिक टाइम्स
इकॉनॉमिस्ट
थॉमस काइट (टॉम कायिट) ह्याचा डेटाबेस संबंधी ब्लॉग, प्रश्नोत्तरे
कधी कधी :-
इंडियन एक्स्प्रेस मधील लेख (ओपिनियन मध्ये येतात ते.)
फायनान्शिअल एक्ष्प्रेस्
हिंदु मधील लेख (झोप लागते वाचून, पण जमतील तितके वाचतो)
स्वामिनॉक्स सारख्या वस्तू शोधूशोधून वाचतो
मागे एकदा अपनापैसा डॉट कॉमचे हर्ष रुंगठा ह्यांचे अर्थविषय्क सोपे, सुटसुटित पण सामान्य व्यक्तीला कामाला येतील असे लेख वाचण्याचे व्यसन लागले होते.
.
सर्व देशांच्या ऑफिशिअल , सरकारी वेबसाइट्स वाचत बसण्याचे मागे व्यसन लागले होते.
प्रत्येक देश स्वतःला काय , कसे रिप्रेझेंट करु पाहतो, हे पाहून मौज वाटली.
.
ह्याशिवाय ह्या अनुषंगाने चर्चेतून वगैरे अनेकानेक इतर दुवे मिळतात, ते वाचून काढतो.
.

(मिपावरील क्लिंटन आणि इथले राजेश घासकडवी, ननि आणि अरुण जोशी ह्यांच्या चर्चांमधील, त्यांनी दिलेल्या दुव्यांमधील आकडेवारी झेपत नाही.
मी ते दुवे क्लिक करतो. आकडेमोड व्हेरिफाय न करता नुसताच लेखकाचे निरिक्षण, निष्कर्ष वाचून मोकळा होतो.)
मी मराठी डॉट नेटवर गब्बर सिन्ग हे व्यक्तिस्वातंत्र्य, टोकाचा भांडवल्वाद ह्याबद्दलच्या अजब गजब लिंका तोंडावर मारत असतात. त्यांच्या लिंका आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून कधी कधी रमताराम ह्यांनी दिलेले दुवे हे ही वाचून काढतो.
थत्त्यांनी इतरांना केलेल्या खरडीतूनही बर्‍याच चाम्गल्या लिंका मिळाल्यात.
.
.
.
आणि खरं तर ...........
मी काही एक नियमित वाचेनच असे नाही. त्या त्या काळात जे जे आवडतं ते झपाटून गेल्यासारखा वाचतो.
म्हणजे स्वामिनॉमिक्स हे दर वीकांतास येणारं सदर एकेकाळी इतकं आवडलं की १९८९ पासून ते थेट २००६ पर्यंतचं सगळं एका दमात वाचून काढलं.
नंतर त्याची कैक वेळेस पारायणं केली.
अत्र्यांची नाटकंही अशी आवडली तेव्हा अगदि भ्रमाचा भोपळा पासून ते तो मी नव्हेच असं काहीही वाचून काढलं होतं.
मग ते भूत उतरलं अन् गूढ गोश्टींचं आकर्षण वाटायला लागलं.
तेव्हा मतकरी आणि धारप ह्यांचं जे दिसेल ते पिसाटासारखं वाचलं.
एकाएकी मग एकदम त्यात शैथिल्य आलं. वाचावसं वाटेना.
मग स्वामी विवेकानंद , परमहंस , गोंदवलेकर महाराज ह्या मंडळींची अगम्य बडबड वाचून काधली. आज नाहीतर उद्या समजेल ह्या आशेवर वाचत होतो.
शेवट टाळक्यात काहीच शिरेना म्हणून ते ही सोडून दिले.
.
.
तर सांगायचे म्हणजे एकदा काही हाताला लागले, की मी ते सरळ मुळापासून उपटून खातो.
नंतर ते सोडून देतो, पुन्हा तिकडे वळूनही पहत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भारी! दुवेही दिलेत तर... निदान अगदी सर्वज्ञात नसलेल्या स्थळांचे तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१. टाईम्स ऑफ इंडिया मला भयंकर भंकस वाटते. हेडलाईन वाचून बातमीचा अर्थ कळत नाही. पण बायकोने तोच पेपर लावला आहे. सकाळ सकाळी ती दिल्ली टाइम्स वाचते. मी त्यातले फक्त फोटो पाहतो. ते फार प्रेक्षणीय असतात.
२. बिझनेस स्टँडर्ड आणि हिंदू बिझनेस लाइन मी लावले आहेत. त्यांच्यातले मथळे वाचतो. आतलं मी अगोदर कुठेतरी मथळा म्हणून वाचलेलं असतं.
३. गूगल न्यूज मधे आपल्याला हवा तो विषय निवडून त्यावरील सर्व बातम्या मिळवता येतात. त्यातही भारतीय आणि बाहेरच्या असे दोन प्रकार करता येतात. मी transport, infrastructure, e-governance, economics, government, banking, GPS, AFCS, असे माझ्या कामाचे विषय त्यात अ‍ॅड करतो आणि ते वाचतो. Personalize your google news म्हणून एक उजव्या बाजूला वरती गिअरचे चाक दिसते. ते क्लिक करून कामाचे विषय अ‍ॅड करा. हा बातमी वाचयचा सर्वात सुकर मार्ग आहे.
४.मी ऐसी वाचतो. एकतर ते कधीच डाऊन नसते (बहुतेक माझ्या उमाळ्याचे हेच कारण आहे) आणि इथल्या लेखनाचा दर्जा फार उच्च असतो. अजून इथे मला (म्हणजे मी) विरोध करायला चिक्कार आधुनिक विचारसरणीचे लोक आहेत. मज्जा येते.
५. ऑफिसच्या कामाचे वाचन जीवघेणे आहे. रोज किमान १५० नवी पाने वाचावी लागतात.
हे सोडून मी काहीच वाचत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चांगला प्रश्न विचारला आहे.

खरं तर उपक्रम किंवा इतर संस्थळावरच्या चर्चा वाचून हाच प्रश्न पडायचा. जालावर पडीक रहायची सवय लागल्यावर उगीचच माहिती गोळा करायची सवय लागली. खरं तर तेव्हाच ते कळत असतं कि हे अनावश्यक आहे. पण कुठेतरी चर्चेत उतरायचं म्हणून दुवे शोधायचे, वाचन करायचं, रेफरन्सेस गोळा करायचे.. त्यापेक्षा हे माझं क्षेत्र नाही किंवा मला यातली अल्पशी माहीती आहे असं म्हणता येणं महत्वाचं. डोळ्याचीही वाट लागते ते वेगळंच. या म्हणण्याचा अर्थ इतकाच कि त्या क्षेत्रातल्या जाणकारांकडून माहिती घेणे हा अनेक अर्थांनी राजमार्ग आहे.

आपल्या वाचनाचं कुरण निवडायला नि त्यावर काहीएक म्हणणं तयार व्हायला वेळ जातो, हे वाक्य आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

मी नियमितपणे ऐसी अक्षरे, मिसळपाव, उठाठेव(फेसबुक) इतकंच वाचतो. पार्श्वभूमीला काही अधूनमधून अललित पुस्तकं वाचत असतो. पण माझं बहुतेक वाचन हे एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी होतं. त्यामुळे मूळ चर्चाप्रस्तावात लिहिल्याप्रमाणे माझ्याकडे अमुकतमुक विषयावर विदा तयार नसतो. बहुतेक वेळा मी त्यासाठी म्हणून वाचन करतो. उदाहरणच द्यायचं झालं तर भारताची प्रगती या विषयावर अनेकांचे अतिरेकी नकारात्मक विचार पाहून मला त्यावर विश्वास बसला नव्हता. म्हणून वेगवेगळ्या अंगांबद्दल अभ्यास केला. त्यातून जे सापडत गेलं ते मांडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हो, मागे एकदा तुकाराम डॉट ऑर्ग चे खूळ डोक्यात बसले होते. तेव्हा तेच वाचत सुटलो होतो.
तिथे काही अनवट, अल्पपरिचित रचना सापडल्या त्या "आँ?! हे काय हो तुकोबा? " (http://www.aisiakshare.com/node/1612) ह्या धाग्यातही मांडल्या होत्या.
मागे एकदा सनातन प्रबहत वाचले होते. सतत काही काळ.
मग काही इतिहासाला वाहिलेले सरांचे ब्लॉग. बरा वेळ जायचा Wink
कधी कधी संभाजी ब्रिगेडचे ब्लॉग वाचतो.
(कधी विषय निघालाच बोलताना, तर "संभाजी ब्रिगेडबद्दल मी इतरांकडून काय ऐकलय" ह्यापेक्षा "संभाजी ब्रिगेडच्या लिखाणात अमुक अमुक असल्यानं मला ते पटतं/पटत नाही" हे सांगायला बरं पडतं.
मुळात असं कुणाला तरी सांगण्यासाथी म्हणून काही वाचावच कशाला; हा प्रश्न रास्त आहे. "केवळ खाज म्हणून" हे त्याचे एकमेव उत्तर आहे.
शतरंज के खिलाडी मधील दोघे रिकामटेकडे तथाकथित उच्चभ्रू कसे प्रसंगी कामध्म्दा सोडून बुद्धीबळच खेळतात नि स्वतःला कमकुवत करुन घेतात, तद्वतच काहिसे. )
खापरे डॉट ऑर्ग मधील खट्टा मीठा ब्लॉग खरोखरच सुंदर, संदर्भयुक्त अभिनिवेशविरहित माहिती द्यायचा. पण तोही मागच्या दोन चार वर्षात बंद पडल्यासारखा वाटतो.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'खट्टामीठा' म्हणजे विसोबा खेचरांचा (जालावर दोन विसोबा खेचर होते.) ना? हो... तो बंद पडला. Sad

मी अधूनमधून 'इंडिया टुगेदर' (http://www.indiatogether.com) चाळते, कधी 'इन्फोचेन्ज इंडिया' (http://infochangeindia.org). या दोन्ही संस्थळांचा शोध 'अनुभव'च्या अंकातून लागला होता.

'मनोगत'वर जाते ती फक्त 'चौकस' यांचं लेखन वाचण्यापुरती.

किरण लिमयांचा 'शब्दवेल' हा ब्लॉग, राजचा 'Random Thoughts', श्रद्धा भोवडचा 'शब्दपट' , उत्पल यांचा 'mind without measure', निरनिराळ्या सिनेमांची नि सिरियल्सची चीरफाड (पंचनामा / विच्छेदन / तपशीलवार रसग्रहण... काय वाट्टेल ते म्हणा!) करणारा mkhey.wordpress.com हा ब्लॉग (हा बरेच दिवसांत चाळला नाही, कारण 'शेरलॉक'चा तिसरा सीझन लांबतच गेला. :(), मुख्यत्वे गणेश मतकरींचं लेखन देणारा सिनेमा पॅरॅदिसोचा 'आपला सिनेमास्कोप'... असे काही ब्लॉग्स नियमितपणे पाहते.

इथे कुणी ब्लॉग वाचत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सध्या खरं सांगायचं तर अतिगंभीर वाचनाचा कंटाळा येतो. एकेकाळी खूप म्हणजे खूपच वाचन केलं. त्याला कुठलीच शिस्त नव्हती. या चर्चेचा फायदा हाच झाला कि काय वाचायला हवंय हे लेखिकेने कुठेही न सांगता खूप छान सुचवलंय. ब्लॉग्ज वाचायचा भयंकर कंटाळा होता. विशेषतः वर्तमानपत्रातले सदर लिहील्याप्रमाणे असलेले ब्लॉग्ज टाळतो. चित्रकलेसंबंधी अनेक ब्लॉज्ग मध्यंतरी वाचायचो. पेन्सिले स्केचेसच्या वेबसाईटस आणि ब्लॉग्जसुद्धा वाचले होते. सात आठ वर्षांपूर्वी संगीत विषयक वेबसाईटस नियमित पाहत असे. त्यातून काहीच उपयोग झाला नाही. जे काम गुरूचे ते नेटगुरूकडून होईलच असं नाही इतकं कळालं. आपल्या कामाचं वाचणं यात सांगण्यासारख काय ते म्हणा.. संध्या बरंचसं वाचन बंद आहे आणि मनोरंजन होईल असं किंवा मग चालू घडामोडी, देश, विदेश, संदेहचर्चा वगैरे वगैरे चालू असतं. लिखाण करताना काही अडलं तर मात्र भरपूर वाचन करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

लोकांनी आम्ही (आ.ए.) काय लिहतो तेव्हढेच वाचले तरी पुरे आहे. इतर वाचायची काही गरज नाही. (असे आमचे काहीही न वाचता झालेले ठाम आणि अचूक मत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तुम्ही ऐ अ न वाचून कसे चालेल?
तुम्ही वाचाल तर ऐसी वाचेल.
म्हणूनच तुमच्यापुरती नवी म्हण लागू करावी म्हणतोयः-
वाचाल तर वाचेल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भाषा फारच संदिग्ध आहे. मंजे नाईलने लिहिलेले तेवढेच इतरांनी वाचलेले पुरेसे आहे असे नाईलचे मत आहे असं काही म्हणायचं आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझे संपृक्त आणि संपन्न लेखन वाचत रहा, तुमच्या सगळ्या संदिग्धता दूर होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कशाने संपृक्त आणि कशाने संपन्न?

(निळेनिरक्षर खवचट) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही वाचतो इतकेच काय ते खरे. नियमित म्हणजे डेली असेल तर मिपा, ऐसी, मुक्तपीठ आणि फेबुवरचे काही अन्य ग्रूप्स इतकेच.

बाकी अलीकडे 'होऊ दे खर्च' ह्याही नवीन ठिकाणाची भर पडली आहे. उर्वरित वाचन लहर आल्यावरच कहर केल्यापैकी होते.

चर्चेत राहण्यासाठी(च) अमुक वाचन हा प्रकार मला विचित्र वाटतो. नै म्हणजे चवीपुरते तसे वाचन करतो पण जास्त कै नै.

मार्कोव्हियन दारुड्याप्रमाणे वाटेल ते वाचत जायचो, पण ते अलीकडे च्यानेलाईझ झालंय.

शेल्डन पोलॉक अन मंडळींचे पेपर्स, एमआयटीचे क्लासिक्स आर्काईव्ह, स्कॉट आरॉन्सनचा ब्लॉग, अन प्राचीन इतिहासाशी संबंधित जे जे काही मिळेल ते सर्व. ऑनलैन, ऑफलैन, पेपर-रिसर्चवाला अन मुक्तपीठवाला दोन्हीही, पुस्तक, इ.इ. काही वर्ज्य नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ठराविक गोष्टी वाचतेच त्यात गार्डीयन चाळते आणि त्यांचा स्त्रीविषयक विभाग पहाते. फेसबुकवर ठराविक लोक चांगल्या पोस्ट्स शेअर करतात; अशा लोकांवर स्टॉकींग करण्याची चांगली सोय आहे. त्यातून काय वाट्टेल त्या न्यूजसाईटवरच्या गोष्टी सापडतात. बाकी उल्लेखनीय फार वाचन नाही.

एक रेघ, शब्दवेल आणि Random Thoughts अधूनमधून पहाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नियमितपणे ऐसीअक्षरेचा 'ट्रॅकर' वाचतो. त्यामुळे एक नम्रविनंती - उजवीकडे जिथे दिवाळीअंकाचे मुखपृष्ठ आहे त्याच जागेवर इतरवेळेस मुख्यपानावरचे चित्र छोटेखानी आकारात असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नियमीत या सदरात बर्‍याच कमी गोष्टी येतात. बहुदा यादी ऐसीअक्षरेला संपेल पण बर्‍यापैकी फ्रिक्वेन्सीने वाच्तो ते:

मिडीया
-- वृतपत्र (कागदी): रोज DNA, विकांताला लोकसत्ता आणि DNA
-- वृत्तपत्र (आंजा) व मिडीया/ देशी: TOI (बहुतांश वेळा रोज),The hindu (बहुतांश वेळा रोज), मटा(२ दिवसांआड), लोकसत्ता(दिवसाआड), दिव्य भास्कर (आठवड्यातून १-२दा), पुढारी (आथवड्यातून एकदा), CNN-IBN (बहुतांश वेळा रोज), रेडिफ लाईव्ह न्यूज (रोज - एकीकडे सतत अपडेट होत असतात)
-- वृत्तपत्र (आंजा) व इतर मिडीया/ विदेशी: BBC (एक दिवसाआड), BBC हिंदी(एक दिवसाआड), NYT(आठवड्यातून १-२दा), Dawn(१दिवसाआड), China Daily(२ दिवसांआड)

इतरः
हिमाल साउथेसिअन
राज्यसभा व लोकसभेचे कामकाज
ईण्डिया वोट्स (इथे वाचायसारखं काही नाही पण निवडणूकांसंबंधीत विदा शोधायला यासारखी साईट नाही.)
पीआरएस रिसर्च

अजून आठवल्या तर देतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!