सचिनला शेवटचं अनुभवताना....

आणि देवा....पहिल्यांदा देवाच्या डोळ्यात पाणी बघितले...माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हत...आणि मला खात्री आहे, हा क्षण अनुभवणा-या कुणाच्याही ते थांबल असेल...कदाचित गालावर ते अश्रू दिसले नसतील....पण प्रत्येक मन पाझरलं असेल!

किती सविस्तर बोलला सचिन...किती व्यवस्थीत...किती मोठ्या मंचावर...किती सा-या लोकांबद्द्ल. तो बोलला त्यापेक्षा जास्त ऐकू आलं...समजल. त्याला मनभरून बोलू द्याव अस वाटत होतं...तसा तो बोलतही होता पण, त्यालाही कळत होतं आपल्याही समजत होतं...24 वर्षाच्या प्रवासावर 24 मिनीटात नसतं बोलता येत!

तरी...काळजाला हाथ घालणार त्याच वाक्य मला अधोरेखित करावस वाटतयं.

सचिन आपल्या यशस्वी प्रवासातल्या ख-या मानक-यांबद्द्ल तो बोलत असताना तो भाउ अजित बद्द्ल बोलू लागला, "काल रात्री जेव्हा मी फोनवरून त्याच्याशी बोललो तेव्हाही तो मी कसा आउट झालो ह्याचीच चिकित्सा करत होता...त्यालाही माहित होतं आणि मलाही की हे मी शेवटचच आउट झालो होतो..."

आणखी जास्त माझ्याकडूनही लिहिल जात नाहीये...!
सर्वांचे ह्या ऐतिहासीक क्षणांचे साक्षीदार असल्याबद्द्ल मन:पूर्वक अभिनंदन!!

Sachin we miss you....Sachin we miss you.....we love you!!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकर ह्यानी त्याच्या कामातून आणि एकूणच जगण्यातून सगळ्यांनाच एक आनंद दिला आहे. तो लोकप्रीयतेच्या शिखरावर असताना देखील त्याच्यातली विनयशीलता दिसत रहाते. सचिनच्या निवृत्तीच्या वेळी त्याचे असंख्य चाहते भावनाविवश होताना दिसतात कारण त्या प्रत्येकाला सचिन आपलाच सख्खा मित्र असल्यासारखा वाटतो.
ही टेस्ट मॅच प्रत्यक्ष बघून वानखेडे वरून घरी परतणार्‍या मैत्रिणीशी थोड्यावेळापूर्वीच बोलले. त्यामुळे एकूण प्रसिद्धी माध्यमांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रीया थोड्याफार प्रमाणात समजू शकले असे वाटते.
आता निवृत्ती नंतरच्या त्याच्या इनिंग मध्ये तो काय करतो यावर सगळ्यांचे डोळे लागलेले असतील. त्याला अनेक शुभेच्छा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला आठवतय आमच्या सोसायटीचे "स्टार" प्लेयर जेव्हा क्रिकेट खेळायला जमू आणि जेव्हा जेव्हा सचिनचा विषय निघे तेव्हा आम्ही सगळे त्याला 'सच्या' च म्हणायचो इतका तो जवळ होता, तो कधीच 'दूर' किंवा 'दूरचा' वाटला नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

असं वाटतय की आज काहीही मागितल तरी मिळेल देवाकडून.

"भारतरत्न सचिन!"

............!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

लेख फारच सेंटीमेंटल दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

सचिन मैदानावर ते निरोपाचे बोल बोलत होता...आणि मी डोळे मिटून ऐकत होतो आणि ते सगळ संपल्यावर कुठेतरी मन मोकळे करायचे होते म्हणून हा प्रपंच!

खुद्द अमिताभ बच्चनने देखील काय सुरेख प्रतिक्रिया दिली होती सचिनच्या निवृत्तीवर, "असं वाटतय की जगण्याच एक कारणच हरवलय!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

आता ऐसीवरसुद्धा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखाचे शीर्षक भयंकर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तसा भाषा म्हटले कि माझा घोळ हमखास होतो. मला ते 'सचिनला शेवटचे अनुभोगताना' असेच वाचायला होतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाही म्हणजे, आपण म्हणता तो भाग आहेच; पण शीर्षक एकाहून अधिक पातळींवर भयंकर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता प्रतिक्रियांच्या रॅलीज होण्यापेक्षा सुचवून द्या शीर्षक!
आभारी आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

जुना विनोद आठवला ही प्रतिक्रिया वाचून.(तुम्ही पुणेकर असलात तर आणखी मजा येईल) जसा आठवेल तसा इथे देतो. Laugh at your own risk!

एक मासेविक्रेता, आपल्या, पुण्यात नवीन थाटलेल्या दुकानावर पाटी लावत असतो. बाजूच्या रस्त्यावरून जाणारा एक 'पेंशनर पुणेकर' ते पाहून जरा थांबतो व पाटी वाचू लागतो. पाटीवर पुढील वाक्य लिहिलेले असते, "आमच्या येथे ताजे मासे मिळतील". आता पुणेरी व दुकानदार यांच्यात संवाद सुरू होतो.
पु.पे. : काय हो, केवढे मोठे वाक्य लिहिलेत पाटीवर. "आमच्या येथे ताजे मासे मिळतील". 'तुम्ही' मासे विकताय, 'तुमच' दुकान आहे, मग पुन्हा वर "आमच्या" अस वेगळं कशासाठी?
दु. :(थोडा विचार करून) हो बरोबर आहे तुमचं!
मग तो पाटीवरून "आमच्या" शब्द कमी करून पु.पे. कडे आनंदी नजरेने पाहतो.
पु.पे. : (अजूनही असमाधानी चेहरा करीत!) काय हो, तुम्हीच एकटे या पुण्यात "ताजे" मासे विकता की काय? बाकीचे सर्व शिळे पदार्थ विकतात, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
दु. : (ओशाळून!) नाही हो काका, तसे नाही!
"ताजे" हा शब्दही पाटीवरून खोडला जातो. आता तरी पु.पे. समाधानी असतील या (वेड्या) आशेने दु. पु.पे. कडे पाहतो. पण पु.पे. अजुनही जुनेच भाव चेह-यावर बाळगून असतात.
पु.पे. : मला सांगा हे माशाच दुकान आहे मग येथे का चितळेंच्या बाकरवड्या मिळणार आहेत. पुण्यातल्या माणसाला एवढीही अक्कल नाही असे वाटते का तुम्हाला?
दु. :(पुरता हैराण होउन) ठीक आहे!
मग "मासे" हा शब्द गायब होतो.
आता तरी पु.पे. च्या मनासारखे झाले असावे अशा (पुन्हा 'वेड्या') आशेने पु.पे. कडे पाहतो. पु.पे. आपल्या रस्त्याला चालू लागलेले असतात.
आणि पाटी अशी झालेली असते, "येथे मिळतील"
Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

आता दुकान जर "येथे" असेल तर माल येथेच मिळणार ना? का दुकान "येथे" टाकून माल "तेथे" विकला जातो?

सबब "येथे" हा शब्ददेखिल पाटीवरून काढून टाकावा!

*******

दुकान हे माल विकण्यासाठीच असते. तेव्हा तेथे काहीतरी मिळतेच (रद्दीचे दुकान असले तरी तिथे रद्दीच्या बदल्यात पैसे "मिळतातच").

सबब, "मिळतील" हा शब्ददेखिल काढून टाकावा!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छे.. काहीच न लिहीलेली पाटी ठेवणे हा अपव्यय आहे. काढून टाका ती..

की पुण्याचा आयकॉन म्हणून "पाटी" आवश्यक ?? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रैट्ट. रॅशनलगडावर अंधश्रद्धाळू मोगलांचे निशाण लागलेच कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उदारमतवादी गडावरून मोगली असोत वा इतर कोणती, निशाणं हटवली जात नाहीत म्हणून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निशाणे न हटवणे ही तथाकथित उदारमतवाद्यांची मक्तेदारी नव्हे. Smile असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मग हो कुणाची?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जुन्या काळी "गायीवर निबंध" अशा शीर्षकाचा एक विनोद वाचलेला होता. गरजूंकरता मूळ "क्लासिक्"चा हा दुवा :
http://comedy.rajiv.com/cow.htm

चांदणेसंदीप यांचा प्रस्तुत लेख व वरील दुव्यातील अजरामर मजकूर यांच्यावरून स्फूर्ती घेऊन अस्मादिकांनी लिहिलेला हा निबंध सचिनचरणी सादर अर्पण :

"The Sachin is a successful cricketer. Also he is homo sapien, and because he is
male, he play in men’s team,but will not do so when he is got retire. He is same like
God,sacred to Hindus and useful to man.But he has got 4 billion rupees altogether.
Two are forward and two are afterwards.

"His whole body can be utilised for use. More so the runs. What can it do?
Various Gillette , Feraris , Pepsis why and the batting and so forth.
Also he is useful to idle men, Facebook and mankind generally.

"His motion is fast only because he is not of asitudinious species. Also his
other motion is much useful to TV, BCCI, Reliance, Ambanis as well as making sentimental stupids out of everyone. Sachin is the only entity that extricates his feeding
after his retirement. Then afterwards he chew with his teeth whom are situated in
the inside of the mouth. He is incessantly in the meadows in the grass.

"His only attacking and defending organ is the bat, specially so when he is
child. This is done by knowing his head whereby he causes the weapons
to be paralleled to the ground of the earth and instantly proceed with great
velocity forwards.

"He has got pads also, but not like similar female species. He wears helmet that has holes on the
other end of the other side. This is done to frighten away the flies which
alight on his cohoa body whereupon he gives hit with it.

The palms of his feet are soft unto the touch. So the grasses head is not
crushed. At play time have poses by looking down on the ground and he shouts
his eyes like his relatives, the horse does not do so.

"This is the Sachin."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ज्याने कोणी लिहिलाय त्याला आमच्या "मुगावकर" सरांनी नापास करून तीन इयत्ता खाली ढकलला असता!(हं, आता जर तो तिसरीतलाच असेल तर...समजून घ्या!)
Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...

रमाबाई कुरसुंदीकर कोठे आहेत? ('त्या इथेच होत्या की उपक्रमवर'?)

त्या असत्या तर त्यांनी असा प्रतिसाद दिला असता:

"जाऊ दे हो चांदणेसंदीप. इथल्या नतद्रष्टांचं असंच असतं. कोठल्या गोष्टीला चांगलं म्हणणं ह्यांच्या रक्तातच नाही. प्रत्येक बाबीत खोडी काढायची त्यांची जुनी सवय आहे."

(सचिनच्या कोठल्याच मॅचला कधीच न गेलेली) रमाबाई कुरसुंदीकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या असत्या तर...

अरेरे! वाईट झाले. कळले नाही हो आम्हांस. ईश्वरेच्छा बलीयसि, दुसरे काय?

...त्यांनी असा प्रतिसाद दिला असता:

पण, पण... त्यांनी नेमका कसा प्रतिसाद दिला असता, हे आपणांस हो कसे ठाऊक?

===================================================================================
याचा नेमका अर्थ आम्हांस कोणी समजावू शकेल काय? आगाऊ धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बलीयसी=बलवान. हा त्या अर्थाचा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यासारखे अजून एक उदा. म्हणजे जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. एकाच अर्थाच्या पुल्लिंगी-स्त्रीलिंगी जोड्या अनुक्रमे गरीयान्-गरीयसी, बलीयान्-बलीयसी, पापीयान्-पापीयसी, महीयान्-महीयसी, इ.इ.

हा शब्द अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीत येतो- "इदं अथर्वशीर्षं अशिष्याय न देयम् । … यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान्भवति |"

हा शब्द कुठल्याश्या उपनिषदातल्या की गीतेतल्या एका फेमस श्लोकात येतो- "अणोरणीयान् महतो महीयान् आत्मा गुहायां निहितोऽस्य जन्तोः । तमक्रतुं पश्यति वीतशोको धातुः प्रसादान्महिमानमात्मनः ॥ (नेटवर पाहिले, श्वेताश्वतर नामक उपनिषदात येतो.) आत्मा हा अणूपेक्षाही लहान अन मोठ्यापेक्षाही मोठा आहे इ.इ.

संस्कृताळलेल्या म्हणजेच 'साधु' बांग्ला भाषेत एखादी स्त्री सुंदर आहे असे म्हणताना 'मोहीयोशी नारी' असे म्हणतात. त्याचा वरील महीयसीशी कितपत संबंध आहे ते माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद.

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.

हा आणखी एक न कळलेला मामला. म्हणजे, 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि' इथवर अडचण नाही. 'गरीयसी' (किंवा 'गरीयान्') म्हणजे नेमके काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतरही असे अनेक वन लायनर्स संस्कार वर्गात नाय तर घरातल्या ज्येष्ठांकडून सतत ऐकवून पकवले जाते.
त्यातले काही काही शब्द अंदाजाने समजतात, आख्ख्या वाक्याचा घंटा अर्थ लागत नाही.
"विद्या विनयेन शोभते".
म्हणजे विद्यावहिनी विनयभाउजींसोबत शोभून दिसते असे वाटले, तर नक्की काय चूक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाटण्यात चूक काहीच नाही. गीतेतही तत्त्वज्ञानाच्या नावाखाली खरे तर अनेक ऐतिहासिक हकीकती आणि तांत्रिक नुस्खे दडलेले आहेत ते ऐसीवरच मध्ये चर्चिल्या गेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गरीयसी म्हणजे श्रेष्ठ, सन्माननीय, वगैरे वगैरे. हिंदीतला 'गरिमा' हा शब्दही तादृश अर्थवाचक आहे. 'हमारी सम्मान और गरिमा हमें चाहिये' इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुनश्च धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजीप्रमाणेच संस्कृतमध्ये विशेषणांचे तर-तम भाव निर्माण करता येतात, जसे उच्च - उच्चतर - उच्चतम अथवा गुरु - गुरुतर - गुरुतम (नखाग्रांनी जेथे गुरुतर शिला भेदुनि करीं| भ्रमाने आहे रे गिरिकुहरी हा निद्रित हरी|| ह्या विषयी नियमोपनियमांचा बराच पसारा आहे पण त्या सर्वात येथे शिरत नाही.

'तर-तम'च्या व्यतिरिक्त गुणविशेषणांसाठी 'ईयस्-इष्ठ' लावूनहि तर-तमभाव दर्शविता येतो. त्यासाठीहि शब्दातील स्वरांच्या वृद्धि-लोपाबाबत नियम आहेत पण त्यातहि येथे शिरत नाही.

ह्या मार्गाने 'वृद्ध' पासून ज्यायान्-ज्येष्ठ, 'उरु' (मोठे) पासून वरीयस्-वरिष्ठ, 'युवन्' पासून कनीयस्-कनिष्ठ असे परिचित शब्द तयार होतात. त्याच मार्गाने 'गुरु' पासून गरीयस्-गरिष्ठ हे शब्द तयार होतात. 'अणोरणीयान्महतो महीयान्' (लहानाहून लहान आणि मोठ्याहून मोठा) हे वचन प्रसिद्धच आहे.

'गरीयस्' पासून पुल्लिंगी प्रथमा एकवचन 'गरीयान्' आणि स्त्रीलिंगी 'गरीयसी'.

'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' (माता आणि जन्मभूमि स्वर्गाहून अधिक मोठया आहेत) ह्या सुप्रसिद्ध उक्तीबद्दल 'उपक्रम'मध्ये दिलेल्या 'मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने' अशा शीर्षकाची एक मालिका मी लिहिली होती. त्यातील चौथ्या भागात ह्या उक्तीबद्दलचे लिखाण असे होते:

<जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
सुभाषित.

लक्ष्मणा, लंका स्वर्णमय असली तरी मला ती नको. माता आणि मातृभूमि स्वर्गाहूनहि श्रेष्ठ आहेत.

हा श्लोक रामायण युद्धकांडातील आहे अशी सार्वत्रिक समजूत असली तरी रामायणाच्या कोठल्याहि पाठात तो मिळत नाही. त्यामधील ’जन्मभूमि’ आणि तिचे ’पावित्र्य’ ह्या संकल्पना तर अगदी आधुनिक दिसतात. बंकिमचंद्रांच्या ’आनंदमठ’ ह्या कादंबरीत त्याचे मूळ आहे, पं. मदन मोहन मालवीयांच्या लिखाणात त्याचा उगम आहे ह्याहि समजुती टिकत नाहीत. गेल्या शंभरदीडशे वर्षात हा श्लोकार्ध निर्माण होऊन त्याने जनमानसाची पकड घेतली आहे, ती इतकी की आपल्या ’सत्यमेव जयते’सारखा हा श्लोकार्ध नेपाळच्या राष्ट्रीय चिह्नावरती लिहिण्यात आला आहे. ह्या सर्व बाबींची विस्तृत चर्चा येथे उपलब्ध आहे.>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा श्लोक रामायण युद्धकांडातील आहे अशी सार्वत्रिक समजूत असली तरी रामायणाच्या कोठल्याहि पाठात तो मिळत नाही. त्यामधील ’जन्मभूमि’ आणि तिचे ’पावित्र्य’ ह्या संकल्पना तर अगदी आधुनिक दिसतात. बंकिमचंद्रांच्या ’आनंदमठ’ ह्या कादंबरीत त्याचे मूळ आहे, पं. मदन मोहन मालवीयांच्या लिखाणात त्याचा उगम आहे ह्याहि समजुती टिकत नाहीत. गेल्या शंभरदीडशे वर्षात हा श्लोकार्ध निर्माण होऊन त्याने जनमानसाची पकड घेतली आहे, ती इतकी की आपल्या ’सत्यमेव जयते’सारखा हा श्लोकार्ध नेपाळच्या राष्ट्रीय चिह्नावरती लिहिण्यात आला आहे. ह्या सर्व बाबींची विस्तृत चर्चा येथे उपलब्ध आहे.>

हे बाकी रोचक आहे. इथे दुवा दिल्याबद्दल आभार!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तूर्तास एवढेच. (भविष्यकालीन प्लेसहोल्डर योजनेखाली राखीव.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'उरु' (मोठे) पासून वरीयस्-वरिष्ठ

हे सांगितल्याबद्दल आभार. मी 'वरे तिष्ठति इति स:' (वर राहतो तो) असा मराठमोळा समासविग्रह केला होता. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्कृताळलेल्या म्हणजेच 'साधु' बांग्ला भाषेत...

'साधुभाषा' म्हणजे 'संस्कृताळलेली' एवढेच म्हणता येईल का? नाही म्हणजे, 'संस्कृताळलेली' हा तिचा एक आनुषंगिक आस्पेक्ट आहेच, त्याबद्दल दुमत नाही. पण त्याहीपेक्षा, 'लिहिण्याची एक फॉर्मल पद्धत' असे तिचे वर्णन करणे अधिक सयुक्तिक होऊ नये काय? (म्हणजे, मराठीतसुद्धा बोलताना आपण 'त्याकता, अवलंले, करायचे' वगैरे म्हणतो, पण फॉर्मल लिहिताना 'त्याकरिता, अवलंबिले, करावयाचे' असे लिहिण्याची एक पद्धत आपल्याकडेही आहे, तद्वतच साधुभाषा हाही बंगालीतला तत्सम काहीसा प्रकार वाटत नाही काय? (म्हणजे, 'कलकाता'ऐवजी 'कलिकाता', 'करलाम'ऐवजी 'करिलाम', 'ता हले'ऐवजी 'ताहा हइले' वगैरे?)

बंगालीचे देवनागरीकरण करताना ('करिताना' ;-)) तूर्तास ते ध्वन्यनुकारी करण्याऐवजी एकास-एक संगतीने केले आहे. प्रत्यक्ष उच्चाराशी या देवनागरीकरणास काहीही देणेघेणे नाही, याची कल्पना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हण्णे बरोबरच आहे. इतकेच की साधु भाषेत आत्यंतिक संस्कृतीकरण असल्याने तसे म्हणालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"वन्दे मातरम्" तर संस्कृतपणाची हैट आहे.
"वन्दे मातरम् बंगाली भाषेत आहे" असे कुणी explicitly सांगेपर्यंत आम्ही पोरे त्याला संस्कृतमध्येच आहे असे समजत असू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जनगणमन तरी काय आहे मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो, 'जनगणमन' त्यातलाच प्रकार आहे. पण गंमत म्हणजे, 'सोनार बांगला'चे कर्तेही रवींद्रनाथच, परंतु ती रचना मात्र डौन-टू-अर्थ ('चलित'?) बंगालीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण वंदेमातरम म्हणण्याची हिंदुत्ववादी फ्याशन यायच्यापूर्वी जेवढं वंदेमातरम म्हटलं जायचं ते (.....सुखदां वरदां मातरम-वन्दे मातरम) संस्कृतातच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

संस्कृताळण्यावरून आठवले. बंगाली ही इतर भारतीय भाषांपेक्षा अधिक संस्कृताळलेली, असे आपण समजतो. पण हे संस्कृताळणे/तत्सम-प्रेफरन्स हे कदाचित कृत्रिम/लादलेले असावे काय?

म्हणजे, पाण्याला बंगालीत 'जल' (उच्चारी 'जोल') म्हणतात, हे आपल्याला साधारणतः ठाऊक असते / शिकविले जाते. परंतु बंगालीत पाण्याकरिता 'पानि' हादेखील वैध शब्द आहे, याची कल्पना (विशेषतः बिगर-बंगालीभाषकांस) कितपत असते? (मला नुकतेच कळले.) यात पुन्हा गंमत अशी, की 'जल' हा पर्याय अधिकतर प्रमाणात भारतात/पश्चिमबंगालात/हिंदूंमध्ये वापरला जातो, तर 'पानि' हा पर्याय अधिकतर प्रमाणात बांग्लादेशात/मुसलमानांत वापरला जातो म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्कृताळणे कृत्रिमच आहे. काये, संस्कृतप्राकृत-अपभ्रंश अन मग मराठी-हिंदी-पंजाबी या प्रवासातला नैसर्गिक कोर्स ऑफ अ‍ॅक्शन 'तद्भवाळणे' हा होता. पण पंडिती लिट्रेचरचा वरचष्मा झाला की ते 'तत्समाळायचे'. वेळोवेळी असे तत्समाळणेही होत आलेले आहे पण ते डेलिबरेट. सध्याचे संस्कृताळणे हे डेलिबरेटच आहे-ब्रिटिश काळात झालेले आहे.

बाकी, पानी हा वैध शब्द असला तरी तो मुसलमानच वापरतात शक्यतोवर अन जण्रली तो वापरला तर आपल्याकडे 'पानीलोनी' ची होते तशी संभावना तिकडे होते. अलीकडे बांगलादेशात पाबना इथे हिंदूंवर अत्याचार झाले त्यानंतर त्यांनी आपले वेगळेपण सोडून देण्याच्या ज्या विविध पायर्‍या अवलंबल्या त्यांत पाण्याला जॉल ऐवजी पानी म्हणणे सुरू केले असे वाचले होते.

अवांतरः काश्मीरमध्ये संस्कृतचा इतका वरचष्मा होता, की गझनीच्या महमूदानेही नाण्यांवर संस्कृत शब्द कोरविले आणि कैक मुस्लिम थडग्यांवरही संस्कृत मृत्युलेख होते म्हणे.
पहिल्यांदा समजले तेव्हा कळायचं बंद झालं होतं.

http://en.wikipedia.org/wiki/Ghaznavid_bilingual_coinage

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Some carry Islamic titles together with the portrayal of the Shaiva Bull, Nandi and the legend Shri samta deva.

गझनीचा महमूद 'संत-देव'! Biggrin

(मुहम्मद हा विष्णूचा अवतार? ;))

A dirham struck at Lahore carries a legend in the Sharda script and a rendering in colloquial Sanskrit of the Islamic Kalima.

'ला इलाहा इल्लल्ला मुहम्मद रसूलिल्ला' हे संस्कृतात म्हणा-ऐकायला कसे वाटेल, कल्पना करून पाहतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ला इलाहा इल्लल्ला मुहम्मद रसूलिल्ला' हे संस्कृतात म्हणा-ऐकायला कसे वाटेल, कल्पना करून पाहतोय

औरंगजेबाचा दादा दारा शुकोह याने अल्लोपनिषद नामक ग्रंथ रचला असल्याचे प्रसिद्ध आहे. तो ग्रंथ मात्र कधीच कुठे विकायला असलेला पाहिला नै किंवा लायब्रीतही नै पाहिला. एनीवे, नेटवर सापडलेले त्यातले पहिले पान इथे डकवत आहे. काहीसा फील येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोठा भाऊ लिहायचे राहिले वाटते. शिवाय दोघांचे व्यक्तित्व व इतिहास पाहता दारा शिकोहची ओळख करून द्यायला पर्यायी मार्ग काढायला हवा असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोठा भाऊ लिहायचे राहिले वाटते.

'दादा' बोले तो, मोठा भाऊच ना? (निदान मराठीत तरी?)

शिवाय दोघांचे व्यक्तित्व व इतिहास पाहता दारा शिकोहची ओळख करून द्यायला पर्यायी मार्ग काढायला हवा असे वाटले.

दारा शिकोहची हरकत नसेल, तर आज एवढ्या वर्षांपश्चात हरकत घेणारे तुम्ही-आम्ही कोण?

दारा शिकोहने आपल्या हयातीत 'आपला उल्लेख "औरंगजेबाचा दादा" असा करू नये' असे कोठे लिहिल्याचा अथवा सांगितल्याचा पुरावा आहे काय? तसे नसल्यास, या निषेधास काही पाया राहत नाही. (फक्त खुद्द दारा शिकोह अथवा त्याच्या वतीने त्याचे कायदेशीर वारसदारच काय तो या बाबतीत आक्षेप घेऊ शकतात. तुम्ही-आम्ही यांपैकी नेमक्या कोणत्या क्याटेगरीत मोडतो, खुद्द दारा शिकोह की त्याचे कायदेशीर वारसदार? की दारा शिकोहने या बाबतीत आपल्याला पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिलेली आहे? इन एनी केस, दारा शिकोहच्या मृत्यूनंतर आज इतकी शतके उलटून गेली असता, आक्षेप घेण्याचा स्टॅट्यूट ऑफ लिमिटेशन्स केव्हाच एक्सपायर झालेला आहे, असे वाटते; चूभूद्याघ्या. सबब, आज त्यास कोणीही काहीही म्हणावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तूर्तास एवढेच. (भविष्यकालीन प्लेसहोल्डर योजनेखाली राखीव.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गझनीची फौज १००% मुस्लिम सैन्याची होती हा मोट्झ्था गैरसमज आहे.
त्याच्यासोबत ११ मांडलिक हिंदु राजे होते.
मला वाटते अल् बेरुनी त्याच्या सैन्यासोअब्तच भारतात आला; संस्कृत त्यावेळची लिग्वा फ्रंका असावी भारतासंदर्भात; ती शिकला.
तेव्हा सांस्कृतिक अभिसरण वाढले.
पंचतंत्राचे फारसीमध्ये भाषांतर त्याच्यापूर्वी झाले होते की त्याच्या नंतर ते मात्र ठाउक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बाकी ते करताना-करिताना आवडले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करताना --करिताना --कतरिना असा प्रवास होत माझे चंचल मन एका सुबक बाहुलीच्या राज्यात प्रवेशले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बॅटधारी महारुद्रा पूर्णरनवान मारुती
रमेशी अंजलीनाथा रनदूता प्रभंजना ||१||
विक्रमानी तुझ्या देवा भरली सर्व दफ्तरे
एकहाती काढिली त्वा अख्तराची लक्तरे ||२||
कसोटी खेळसी जेव्हा, सारे विक्रम तोडिले
लारासी टाकिले मागे , रनासी तुलना नसे ||३||
एकदिवसीय सामन्यात बोलरां धडकी भरे
तयासी तुलना कोठे , पॉटींग कॅलिस धाकुटे ||४||
एक्सप्रेसची होते पॅसेंजर, स्पिनर सरळ होतसे
वॉर्न तो महा बिलंदर तुजला स्वप्नी पाहतसे ||५||
वकारे आपटून ऐसा तुजवर चेंडू सोडीला
नाकावर जाऊन बसता चेहरा रक्ते माखला ||६||
पुढचाच चेंडू झाला लॉंग ऑफला सीमापार
सर्वासी कळले तेव्हा हा जरा वेगळा प्रकार ||७||
वन डे चा तू राजा चॅरीटी करतो बरी
२०-२० व कसोटी धावयंत्र ते चालले ||८||
इतकी वर्षे खेळून तुझी भूक ना भागली
विराट अश्विन रैना मागती तुझी सावली ||९||
कधी पाठ वा कोपर दुखता माकडाहाती कोलीते
सचिन तो सर्वदा शांत त्याची बॅटच बोलते ||१०||
तोडले झोडले फोडले कधी सीमेपार भिरकाविले
सगळ्यांची केलीस शेळी, जे तुझ्यावर गुरकावले ||११||
कधी कठीणसमय येता घेशी हाती बॉल तू
मंदाविशी फटकेबाजा, देशी पटकन ब्रेक-थ्रू ||१२||
स्लीप-गली-कव्हरआदि शॉर्ट-लेग समस्तही
जाती सीमेपाशी आनंदे सचिन दर्शने ||१३||
जिंकविले किती सामने तरी एक इच्छा उरी
विश्वचषक जिंकून देवा तीही तू केली पूरी ||१४|
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी
दृढदेहो निसंदेहो धावसंख्या चंद्रकळागुणे ||१५||
फलंदाजी अग्रगण्यू मुम्बैकरांसि मंडणू
रनरूपी तू महात्मा शत शतकेधारी तू ||१६|

इति श्री ऋग्वेदकृतं संकटनिरसन नाम सचिनस्तोत्रं संपूर्णं |

- Forwardच्या कृपेने

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढकलपत्र नको, तुमच्या लेखणीतून येऊ द्या की काही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आमचे मित्रवर्य श्री.रा.रा. ऋग्वेद शेणई यांनी रचलेले हे स्तोत्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं