स्कूलबस नियमावली

राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या स्कूलबस नियमावलीबद्दलच्या जीआरने खळबळ उडवून दिली आहे. हा जीआर शालेय शिक्षण खात्याने काढला आहे. पण त्या खात्याच्या मंत्र्याला त्याबद्दल माहीतीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जीआर मधल्या तरतुदी जाचक असल्याचे सांगत मुख्याध्यापकांच्या संघाने आणि शाळाचालकांनी शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=U35Ri
रिक्षा, व्हॅन या वाहतुकीवर बंदी घालून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत थेट मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल या अटीमुळे ते संतप्त झाले आहेत. बस कशा असाव्यात, किती जुन्या असू नयेत हे देखील मुख्याध्यापकांनीच पाहून घ्यायचे आहे.

सामान्य माणसाचं याबाबत काय म्हणणं आहे ?
एकीकडे गणवेश खरेदी, वह्या पुस्तके खरेदी याबाबत शाळा नको इतकं लक्ष घालतात. विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती केली जाते. डोनेशनची सक्ती केली जाते. ब-याचशा शाळा तर राजकीय कार्यकर्ते, मंत्री यांच्याच असतात. त्यांना स्वस्तातला किंवा राखीव भूखंड मिळतो. जे सामान्य माणसाला कधीच शक्य नाही. शाळेची मान्यता हा देखील असाच आकलनापलिकडचा विषय आहे. इतकी दिव्यं लीलया पार पाडणा-या शाळा व्यवस्थापनाला स्कूल बस मॅनेज करणे इतकं अवघड आहे का शासनाचा जीआर येथे वाचा .

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

म्हातारी मेल्याचं दु:ख पण काळ सोकावतो. आपल्यावर बंधने येतील, आपल्याला अडचण होईल असा कोणताही नियम / प्रसंग आला कि कांगावा करणे आवश्यक असते. पुढे मागे त्याचा फायदा होतो. सर्व फर्माने गुपचुप ऐकली तर आपले महत्त्व राहत नाही हे सगळ्यांना माहित आहे. असे विरोध अशा रणनितीचा भाग असतात. त्यात दम असो वा नसो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला भारतातल्या स्कूलबसेसचा अनुभव नाही. त्यामुळे सद्य परिस्थितीबद्दल मला काहीच बोलता येत नाही. स्कूलबस - किंवा मुलांना शाळेत ने आण करणारं वाहन - यावर काही दर्जात्मक नियम असावेत का, याचं उत्तर होकारार्थी देईन. हे नियम कोणी तयार करायचे, आणि कोणी अमलात आणायचे याबद्दल मात्र कल्पना नाही.

याचा खर्च किती होणार आणि कोण करणार याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे का? विचारायचं कारण असं की सरकार मुलांना जे दुपारचं जेवण पुरवते त्यासाठी होणाऱ्या खर्चाशी तुलना करता यावा इतका वाहतुकीचा खर्च येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांची मुलं शाळेत आहेत आणि ज्या मुलांच्या पालकांना मुलाला शाळेत सोडण्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी अतिशय ज्वलंत प्रश्न आहे हा. खेड्यात काहीच वर्षांपूर्वी दहा पंधरा किमी पर्यंतच्या शाळेत मुलं पायी जात असत. हल्ली हे चित्र बदलत चाललं आहे. शाळा आता गावोगावी दिसू लागल्या आहेत. तरी देखील धरणातून बोटवाहतून करून जाताना विद्यार्थ्यांचा मृत्यू अशा बातम्या वाचतोच आपण. पावसाळ्यात ओढा ओलांडताना मुलं वाहून गेल्याच्या बातम्या आजही असतात. पण अजून तरी मागास भागातील खेड्यापाड्यांतून शाळेला जाण्यासाठी रिक्षा किंवा व्हॅन अशा वाहनाची कल्पना रुजलेली नाही. जिथे एसटी आहे तिथं मुलं एसटीने जातात. टमटम आहेत. पण खास शाळेच्या वाहतुकीसाठी नाही.

शालेय मुलांची वाहतूक हा प्रकार शहरी आणि निमशहरी भागात जास्त आहे. त्याची स्थिती भयंकर आहे. रिक्षात कोंबलेली मुलं असुरक्षित असतात. मध्यंतरी पीएमटीच्या धडकेत पुण्यात झालेल्या अपघातात काही मुलं दगावली होती. कोल्हापुरात एक मुलगी रिक्षातून पडून तीन किमी फरफटत गेली तरी चालकाला पत्ता नव्हता. व्हॅन मधे काही ठिकाणी कमी मुलं घेतात पण शुल्क अव्वाच्या सव्वा आकारतात. इतर ठिकाणी सर्रास मुलं मेंढरासारखी कोंबली जातात. पालक असहाय्य आहेत. या वाहतुकीला कसलेच निर्बंध नाहीत. रिक्षा फक्त तीन प्रवाशांसाठी असताना पंधरा मुलं कुठल्या न्यायाने नेऊ दिली जातात ? परिवहन खात्याचे अधिकारी जसे काही असहाय्य आहेत अशा अविर्भावात कारवाईपासून दूर असतात.

नियमावलीची चर्चा गेली काही वर्षं सुरू आहे. वाहनचालकांना जबाबदार धरले कि ते संपाची धमकी देतात. मुख्याध्यापकांना जबाबदार धरले कि त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण वर पाहीलय. अशा परिस्थितीत मुलांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचवायचं कसं हा पालकांचा प्रश्न आहे.

खर्च तर पालकच देतात. ज्या शाळेच्या स्वतःच्या बसेस आहेत त्या शालेय शुल्कासोबत बसचं शुल्क आकारतात. याच कारणासाठी मी माझ्या मुलांची शाळा बदलून जिथे बसची सोय आहे तिथ प्रवेश घेतला. खूप फरक पडतो या गोष्टीमुळं. आधीच्या शाळेत रहदारीच्या वेळेत मुलाला शाळेत सोडणे हे दिव्यच होतं. रिक्षाचा अनुभव अतिशय वाईट आणि शाळा एका गल्लीत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

धन्यवाद.

रिक्षावाले दहा दहा मुलं कोंबतात असं म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकणं मला बरोबर वाटत नाही. दहा मुलं कोंबलेल्या रिक्षातून प्रवास मुलं करतात याची जबाबदारी पालकांची असते. प्रत्येक पालकाला पर्याय असतो. रिक्षावाल्याशी 'रास्त' दराने केवळ चारच मुलांना न्यायचे पैसे देऊन त्याच्याबरोबर करार करणं शक्य असतं. पण हा पर्याय महागाचा पडतो. 'व्हॅन मधे काही ठिकाणी कमी मुलं घेतात पण शुल्क अव्वाच्या सव्वा आकारतात.' असं तुम्हीच म्हटलेलं आहे. त्यामुळे पालक खर्च वाचवण्यासाठी हा धोका पत्करायला तयार होतात. या नियमांद्वारे सर्वच पालकांना धोका कमी करायला भाग पडणार आहेे. ते स्तुत्यच आहे. मात्र त्यासाठी जो अतिरिक्त खर्च होईल तो करायला प्रत्येक पालक तयार आहे का? धोकाही नकोय आणि खर्चही अधिक करण्याची तयारी नाही हा तिढा कसा सोडवायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे समजून घेण्यासाठी एकदा विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या रिक्षावाल्याशी किंवा व्हॅनवाल्याशी बोलून पहावे लागेल. खालील गोष्टी आपोआपच लक्षात येतील
.
१. दर ठरवणे , करार करणे, अटी घालणे हे काहीच तुमच्या हातात नसतं.
२. २५ मिनिटाच्या अंतराला दीड तासापेक्षा जास्त वेळ लागतो. कारण रि़क्षावाला कशा रकारे रूट ठरवतो यावर तुमचा कंट्रोल नसतो.
३. कमी भाड्याने एखादा नवीन रिक्षावाला ठरवला तर बाकीचे रिक्षावाले त्याला धंदा करू देत नाहीत
४. या संदर्भात कुठलीही नियमावली नसल्याने तक्रारीचा प्रश्नच येत नव्हता. म्हणूनच नियमावलीची गरज होती.
५. काही ठिकाणी व्हॅन आले कमी मुलं घेतात ते व्हॅन वाले आपल्या एरियात असले पाहीजेत. सुदैवाने एकाच इमारतीमधील मुलं एकाच शाळेत असणं वगैरे. त्यांनी व्हॅनवाल्याला ठरवून घेतलेलं शक्य झालेलं आहे. नेमक्या याच कारणाअभावी इतरांना एकत्र येऊन वाहतू़क ठरवणं शक्य होत नसल्याने शाळेने पुढाकारा घ्यावा अशी पालकांची मागणी होती.
६. कमी भाडं हा मुद्दा नाही. पण प्रत्येकाला परवडलं पाहीजे हे ही पहावं लागतं ज्या दरात रिक्षावाले दहापेक्षा जास्त मुलांना कोंबून नेतात तो अव्वाच्या सव्वा असाच आहे. सध्याचा लेटेस्ट दर मला माहीत नाही, कारण शाळा बदलल्याने आणि शाळेचीच बस असल्याने मी सुखी आहे. पण या सर्वांतून गेलेलो असल्याने इतरांना काय जाचातून जावे लागते त्याची कल्पना आहे. माणूस मुलांसाठी काहीही करायला तयार असतो. रिक्षावाल्याला बेनेफिट ऑफ डाउट देण्याआधी कुठलेही पालक स्वतःहून मुलांचा जीव धोक्यात घालतील का हा विचार देखील करायला हवा.
७. या सर्वांमधे कुठलाच लेखी करार वगैरे होत नसतो. हा सगळा कारभार भगवान भरोसे असतो. या संदर्भात काही सूचना असू शकतात. पण त्याआधी रिक्षेवाल्याशी त्या संदर्भात बोलून घ्यावं असं मी सुचवेन.
८. बरेच पालक खूप विचार करत नाहीत. परिवहन खात्याची नियमावली असू शकते, या प्रकारची वाहतूक बेकायदेशीर असू शकते याबद्दलच ते अनभिज्ञ असतात. जे चाललय ,जसं चाललय त्यात जास्त विचार करावा असं त्यांना वाटत नाही. म्हणूनच अशा पॅरलल व्यवस्था उभ्या राहतात. वास्तविक रिक्षाला मीटर टाकून फक्त तीन प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. त्यांचं परमिट देखील त्यासाटीच असतं. शालेय वाहतूक हा धंदा फोफावेपर्यंत ते असंच चाललं होतं. त्यावर काही कागरिकांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केल्याने शालेय वाहतूकच नियमित करण्यात आली. मूळ कायद्यात बदल केले आहेत किंवा कसे याबद्दल कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

तुमचा रोख लक्षात येतो आहे, पण माझा मुद्दा जास्त सर्वसाधारण आहे. एक रिक्षावाला जी पोरं कोंबून नेतो, तेवढीच सुरक्षित नेण्यासाठी व्हॅन किंवा बस लागेल. त्यासाठी खर्च जास्त लागेल. 'कितीही पैसे पडले तरी सुरक्षा माझ्यासाठी इतकी महत्त्वाची आहे की मी त्यासाठी तडजोड करणार नाही' असं सध्या पालक असं म्हणतात का? तसं म्हणत असते तर रिक्षावाले असं करताना दिसलेच नसते.

'कमी भाड्याने एखादा नवीन रिक्षावाला ठरवला तर बाकीचे रिक्षावाले त्याला धंदा करू देत नाहीत' नव्हे, जास्त भाडं दरडोई घेऊन कमी मुलं नेणारा रिक्षावाला ठरवण्याची गरज आहे. त्यासाठी अर्थातच प्रत्येक पालकाला जास्त खर्च येईल.

माझं म्हणणं इतकंच आहे की लो रिस्क हाय कॉस्ट आणि हाय रिस्क लो कॉस्ट यात बरेच पालक दुसरा पर्याय निवडत आहेत. जर लो रिस्क सक्तीची केली तर खर्च वाढेल. तो देण्याची तयारी नसताना किंवा क्षमता नसताना या नियमांची अंमलबजावणी कितपत होईल हा प्रश्नच आहे.

अजून एक पर्याय आहे तो म्हणजे कार असलेल्या चार ते पाच पालकांनी एकत्र येऊन मुलांची ने-आणीच्या कामाचं वाटप करणं. किंवा कार आहे आणि जे घरी आहेत अशांवर महिन्याचे पैसे देऊन जबाबदारी सोपवणं. हा पर्याय अर्थातच अनेकांनी तपासून पाहिला असेलच.

सहज चौकशी - दर मुलामागे दर महिन्याचे रिक्षावाला सर्वसाधारणपणे किती पैसे घेतो? अचूक आकडा नसला तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक रिक्षावाला जी पोरं कोंबून नेतो, तेवढीच सुरक्षित नेण्यासाठी व्हॅन किंवा बस लागेल. त्यासाठी खर्च जास्त लागेल. >>> नाही लागत हेच तर सांगतोय. जितकी मुलं रिक्षेवाला कोंबतो त्या प्रमाणात भाडं अव्वाच्या सव्वा आहे हेच सांगतोय. १५ मुलं रिक्षात म्हणजे काय याचा विचार करावा. हे पालक नक्कीच सांगत नाहीत करायला. तसंच हे जोपर्यंत तुम्ही रिक्षेवाल्याशी बोलणार नाही तोपर्यंत इथे लक्षात येणार नाही. इथं मा़झ्या विधानात विसंगती पकडून काहीच फायदा होणार नाही. मी फक्त काय चालतंय ते नमूद अरतोय इतकंच.

'कितीही पैसे पडले तरी सुरक्षा माझ्यासाठी इतकी महत्त्वाची आहे की मी त्यासाठी तडजोड करणार नाही' असं सध्या पालक असं म्हणतात का? तसं म्हणत असते तर रिक्षावाले असं करताना दिसलेच नसते.>>> रिक्षा गल्लीबोळातून घरापर्यंत येते. बस येत नाही. तसंच बस अनेक शाळांतून आजही नाही. उलट रिक्षेवाल्यांसाठी रांग लावायला सांगितली जाते. हे एक प्रकारे मान्यता देण्यासारखंच आहे. मुलांना सोडवायला आलेल्या पालकांची रिक्षेवाल्याशी इथंच गाठ पडते आणि त्याला नवं गि-हाईक मिळतं.

'कमी भाड्याने एखादा नवीन रिक्षावाला ठरवला तर बाकीचे रिक्षावाले त्याला धंदा करू देत नाहीत' नव्हे, जास्त भाडं दरडोई घेऊन कमी मुलं नेणारा रिक्षावाला ठरवण्याची गरज आहे. त्यासाठी अर्थातच प्रत्येक पालकाला जास्त खर्च येईल. >> तुम्ही काहीही भाडं ठरवा. खाली सांगितल्याप्रमाणे रिक्षावाला मुलं मिळाली कि कोंबतोच. तक्रार केलीत तर नका पाठवू रिक्षात असं उत्तर मिळतं.

माझं म्हणणं इतकंच आहे की लो रिस्क हाय कॉस्ट आणि हाय रिस्क लो कॉस्ट यात बरेच पालक दुसरा पर्याय निवडत आहेत. जर लो रिस्क सक्तीची केली तर खर्च वाढेल. तो देण्याची तयारी नसताना किंवा क्षमता नसताना या नियमांची अंमलबजावणी कितपत होईल हा प्रश्नच आहे. >> ग्राउंड रिअ‍ॅलिटी काय आहे हे पाहील्ञाश्वाय कुठलंच विधान कसोटीला उतरणार नाही. ही सर्व पोपटपंची ठरेल.

अजून एक पर्याय आहे तो म्हणजे कार असलेल्या चार ते पाच पालकांनी एकत्र येऊन मुलांची ने-आणीच्या कामाचं वाटप करणं. किंवा कार आहे आणि जे घरी आहेत अशांवर महिन्याचे पैसे देऊन जबाबदारी सोपवणं. हा पर्याय अर्थातच अनेकांनी तपासून पाहिला असेलच. >> कुठल्या पालकांना असा वेळ असतो. दहा वर्षांपूर्वी हाऊसवाईफ आणायच्या मुलांना. पण आताची रहदारी इतकी धोकादायक झालेली आहे कि भीती वाटते. त्यातून पावसाळ्यात तारांबळ उडते.

सहज चौकशी - दर मुलामागे दर महिन्याचे रिक्षावाला सर्वसाधारणपणे किती पैसे घेतो? अचूक आकडा नसला तरी चालेल. >>> मी आधीच म्हटलंय आता रिक्षाचे दर काय आहेत याबद्दल कल्पना नाही. माझी मुलं बसनेच ये जा करतात. या अंतरासाठी (३.५ किमी) रिक्षावाला महिना दोन हजार रुपये घेतो (१५ मुलं - सीएनजी रिक्षा) असं ऐकून आहे. तर शाळा बारा ते पंधरा हजार रुपये वर्षाकाठी घेते. (महिना एक हजाराच्या आसपास). यात बसने वाहतूक, अटेंडंट, इमर्जन्सी मधे फोनची व्यवस्था हे सगळं आलं. खरं तर रिक्षावाल्याने या सुविधा न देता महिना दोन हजार (पैसे बारा महिन्याचे घेतात) न घेता सातशे ते आठशे घेतले पाहीजेत. दोन हजारात त्याने फक्त तीनच मुलं सोडायला हवीत. आम्ही पालक म्हणतो पाच मुलं आरामात बसतात. आणखी एखादं मूल घेतलं तरी हरकत नाही. कुणीच नियमावर बोट ठेवत नाही. पण १५ मुलं कोंबल्यावर धाकधूक होणार नाही का ? इथं रिक्षावाल्याची मजबुरू वगैरे सगळं साफ खोटं आहे. पालकांना ऑप्शन नाही इतकंच. पालकांना एकत्र येता आलं तर आपोआपच प्रश्न सुटतील. बस वाहतूक पेट्रोल रिक्षापेक्षा तुलनेने स्वस्त असल्याने शाळा आणखी कमी दरात ती करू शकते. पण सीएनजी वर चालणा-या रिक्षाने पेट्रोलच्या हिशेबाने दर आकारण्याचं प्रयोजन काय हे कळत नाही.

सर्वात महत्वाचा मुद्दा : मी बारा हजार रुपये एका मुलाचे देतो. दोन मुलांचे तीस हजार होतात. मी एकटा कमावणारा आहे. असे कित्येक पालक आहेत. काहींचं हातावर पोट असतं. प्रत्येकाचं उत्पन्न काही आयटीवाल्यांसारखं नाही. महिना १५०००/ पासून कमावणारे लोक आहेत. शाळेची फी परवडते हेच खूप आहे. पुढेही शाळेचे खर्च बंद होत नाहीत. हे पालक लोक स्वस्तातला ऑप्शन पाहत असतील तर त्यांना दोष कसा देता येईल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

प्रश्नाचं गांभीर्य थोडं लक्षात येतं आहे. पालकांना दोष देण्याचा प्रयत्न नव्हता. मुद्दा कॉस्ट-रिस्क चा मांडत होतो. पण थत्तेंच्या प्रतिसादावरून हा हाय कॉस्ट हाय रिस्क ऑप्शन दिसतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>सहज चौकशी - दर मुलामागे दर महिन्याचे रिक्षावाला सर्वसाधारणपणे किती पैसे घेतो? अचूक आकडा नसला तरी चालेल.

(हैदराबादेत) माझ्या दुसर्‍या वर्गात असलेल्या मुलीचा "अ‍ॅटोअंकल" १००० रुपये महिना "अ‍ॅटोफीस" घेतो. अंतरः सहा किमी. अ‍ॅटोमध्ये अकरा विद्यार्थी आहेत. वर्षाचे अकरा हजार रुपये लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नियमावली वाचून, नियम स्वागतार्हच वाटत आहेत. परिवहन समिती तर नक्कीच असायला हवी.
मी स्वतः स्कूल-बसने काही वर्षे गेले आहे. पण अगदी लहान नव्हते त्यामुळे ऐनवेळी बस आलीच नाही तरी स्टॉपवरचे मिळून रिक्षाने वगैरे गेल्याचे आठवते.पण वाहन चालक आणि एकूण बसवाल्यांना कुणाचा अंकुश होता असे वाटत नाही. या नियमांनी तो येईल असे वाटते.मुख्याध्यापकांची बाजू खरतर मला कळली नाही.
जर एखादा कंत्राटदार नियमांप्रमाणे सेवा देत नसेल तर त्याचं कंत्राट रद्द करण्याव्यतिरिक्त मुख्याध्यापक आणि परिवहन समिती काही करू शकतात का-पुढे तक्रार करायची त्यांनी तर कुणाकडे? की कंत्राट थांबवणे हीच पुरेशी कारवाई आहे?मुळात शाळेशी केलेल्या करारात कंत्राट अमुक इतक्या कालावधीच्या आधी थांबवता येणार नाही असे असेल तर काय करावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>व्हॅन मधे काही ठिकाणी कमी मुलं घेतात पण शुल्क अव्वाच्या सव्वा आकारतात. इतर ठिकाणी सर्रास मुलं मेंढरासारखी कोंबली जातात. पालक असहाय्य आहेत. या वाहतुकीला कसलेच निर्बंध नाहीत. रिक्षा फक्त तीन प्रवाशांसाठी असताना पंधरा मुलं कुठल्या न्यायाने नेऊ दिली जातात ? परिवहन खात्याचे अधिकारी जसे काही असहाय्य आहेत अशा अविर्भावात कारवाईपासून दूर असतात.

पहिलं वाक्य हेच पुढच्या सर्व वाक्यांचं उत्तर आहे ना?
परिवहन खात्याचे अधिकारी असहाय्य असण्यापेक्षा पालकांच्या ऐपतीची अपरिहार्यता ते जाणून असतात म्हणून कारवाई करत नाहीत.

तेवढेच अंतर नॉर्मल रिक्षाने जाण्यासाठीचे भाडे भागिले रिक्षातील मुले + रिलाएबिलिटी (नेण्यास रिक्षा नक्की येणार) चार्जेस + शाळेच्या वेळेला उशीर होऊ नये म्हणून दोन्ही वेळेस आधी सुमारे अर्धातास सामान्य धंदा थांबवणे याची कॉस्ट एवढा चार्ज रोज द्यायला हवा. [ट्रिपवरील पहिल्या मुलाला घेण्यासाठी रिक्षावाल्या काकांना त्यांच्या घरून रिकामी रिक्षा घेऊन जावी लागत असेल त्याचा खर्च इथे धरला नाही. तो निदान ५०% वेळा धरायला हवा. शिवाय तेवढे अंतर जाण्यास सामान्यतः रिक्षाला जेवढा वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ शाळेत पोचवण्याच्या रिक्षाला लागतो तो ऑपॉर्चुनिटी लॉस सुद्धा धरायला हवा.

रिक्षावाले यापेक्षा (वरील सर्व फॅक्टर लक्षात घेतल्यावर) जास्त घेत असतील तर पालकांनी तक्रार करण्यापेक्षा दुसर्‍या रिक्षावाल्यांशी बोलणी करून पर्याय उभा केला पाहिजे.

लोकलमध्ये कोंबलेले प्रवासी असतात कारण ठाणे ते दादर (२५ किमी) साडेतीन रुपयांमध्ये फक्त कोंबलेल्या स्थितीतच जाता येईल.

[भारतात लोक भाडे कमी अपेक्षितात आणि सेवा जागतिक दर्जाची अपेक्षितात].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

परिवहन खात्याचे अधिकारी असहाय्य असण्यापेक्षा पालकांच्या ऐपतीची अपरिहार्यता ते जाणून असतात म्हणून कारवाई करत नाहीत. >>

हप्तेबंद माणूस काय लक्ष देणार ? आता जवळपास सगळ्या रिक्षा आणि व्हॅन्स सीएनजीवर आहेत. रिक्षांना तर अनुदान देखील आहे. मग त्यांना कमी पैशात किमान कम्फर्टेबल होईल अशा पद्धतीने मुलं सोडणं अशक्य आहे का ? ते जितके पैसे घेतात त्यात एका मुलाला महिनाभर कारने सोडणे आणि कारने आणणे शक्य होते. समजा सोसायटीतल्या दोन तीन मुलांना कारमध्ये घेतलं तर खर्च विभागला जाऊ शकतो. पण मुख्य मुद्दा पालकांना नसलेला वेळ हा आहे. त्याचा गैरफायदा किती घेऊ द्यावा हा प्रश्न आहे. रिक्षाचालकाला आपला वेळ देऊन, घरखर्च, पेट्रोलखर्च, रिक्षाची शिफ्ट हे जाऊन नफा मिळायला हवा याबद्दल कुणाचीच ना नाही. पण तो नफा माफक असावा आणि मुलं मर्यादीत असावीत असा तोडगा निघणे अशक्य नाही. पालकांनी मागे मुलं मर्यादीत असतील म्हणून भाडं वाढवून दिलं होतं. पण कुठलाही रिक्षावाला नंतर जास्तीची मुलं घेतोच. हा अप्रामाणिकपणा नाही का ?

व्हॅनवाले तर मुलांना घेऊन गॅस भरण्यासाठी पेट्रोल पंपावर रांग लावतात. मुलं सोडून येऊन नंतर गॅस भरावा असं त्यांच्या डोक्यातही येत नाही. मुलांचा वेळ जातो, स्टॉपवर आया वाट बघत बसतात. पण नाईलाज असतो. हे गृहीत धरणं आहे. बसने खर्च खूपच कमी येतो तसंच सुरक्षितता असते म्हणून थोडे पैसे जास्त गेले तर पालक मागेपुढे पाहत नाहीत. पालक घासाघीस करताहेत असं दृश्य कुठंच नाही. त्यांच्या हातात काहीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

>>रिक्षांना तर अनुदान देखील आहे.

काय म्हणता? कोण देतं अनुदान?

>> पालकांनी मागे मुलं मर्यादीत असतील म्हणून भाडं वाढवून दिलं होतं. पण कुठलाही रिक्षावाला नंतर जास्तीची मुलं घेतोच. हा अप्रामाणिकपणा नाही का ?

हा अप्रामाणिकपणा आहे हे मान्य. पण त्यावर त्या रिक्षावाल्याला जाब विचारायला हवा होता. त्यांच्या युनियनकडे तक्रार करता आली असती. करार लेखी असता तर पोलीसांत तक्रार करता आली असती. (यातील काही करण्याचा विचार पालकांनी केला असेल असे वाटत नाही).

"मुलांच्या भल्यासाठी" पालकांकडे "वेळ नसेल" तर मग जे चाललंय ते ठीकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रिक्षांना एलपीजी / सीएनजी कीट बसवण्यासाठी १५०००/- रु पुणे मनपा कडून अनुदान मिळतं. केंद्र सरकारच्या एका समितीने केलेल्या शिफारशीप्रमाणे १५ वर्षे झालेल्या रिक्षा बंद करायला सांगितलं होतं. पण जर त्या ग्रीन फ्युएल वर असतील तर त्यांना पुन्हा परवाना मिळायला हरकत नाही असं सांगितलं होतं. त्यावर आंदोलन झालं आणि चक्क अनुदानावर तोडपाणी झालं.

थत्तेचाचा तुम्हाला माहीत नाही का हे ?

त्यावर त्या रिक्षावाल्याला जाब विचारायला हवा होता. >>
त्यांच्या युनियनकडे तक्रार करता आली असती. करार लेखी असता तर पोलीसांत तक्रार करता आली असती. (यातील काही करण्याचा विचार पालकांनी केला असेल असे वाटत नाही). >>>

वरील सर्व विधानांवरून तुम्ही पुण्याचे नाहीत हे लक्षात आलं. Wink

"मुलांच्या भल्यासाठी" पालकांकडे "वेळ नसेल" तर मग जे चाललंय ते ठीकच आहे.>>>
थत्तेचाचा, आई वडील दोघं नोकरीला नसतील तर मुलांची फी भरता येणार आहे का ? सध्या दोन मुलांचा नर्सरीचा खर्च वर्षाला लाखापर्यंत जातो. या फिया भरायला घरात बसून चालेल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

वेळ नसेल म्हणजे रिक्षावाल्यांशी भांडणे वगैरे हो, पक्षी प्रश्न तडीस नेणे यासाठी...... आईने घरी राहून मुलांना शाळेत पोचवणे यासाठी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दर एक दोन वर्षांनी पुन्हा नव्याने हा प्रश्न येतो असे दिसते. सरकार काहीतरी जाहीर करते, मग शाळाचे अधिकारी हे आपल्याला माहीत नव्हते, अधिकृतरीत्या दिले गेले नाही ई. म्हणतात. थोडीफार चर्चा होते आणि मग सगळे पुन्हा थंड पडते. मागे तर एकदा सरकारने (पालिकेने) शाळेला पाठवलेली अधिकृत पत्रे सुद्धा आमच्याकडे आलेली नाहीत असे शाळावाले म्हणत होते.
त्यात मीडियावाले सुद्धा बातम्या नीट न देऊन आणखी गोंधळ निर्माण करतात.
स्कूल बस बद्दलचे बरेच सरकारी नियम शाळांच्या स्कूलबस करिता होते. खाजगी नाही. यावेळचे काय आहे ते या बातमीतून क्लिअर होत नाही. जर खाजगी वाहतूक बंद करायची असेल तर ती अशी अचानक शालेय वर्षाच्या मधे बंद करून पर्यायी व्यवस्था उभारण्याची मुदत कशी देणार शाळांना? त्यातून शाळांना जो खर्च येइल त्यातील काही भाग तरी पालकांना उचलावा लागेल, त्याबद्दल पालकांना विश्वासात घ्यावे लागेल. हे नवीन काम शाळेचे लोक करणार. आपल्याला अचानक महिना (उदा:) ५०० रू जास्त द्यावे लागतील कळाल्यावर ज्या अफाट प्रतिक्रिया येतात त्या मुत्सद्दीपणे हाताळायचे कौशल्य त्यांना कोण शिकवणार? Smile
सरकार ज्या पद्धतीने काम करते त्यावरून असे वाटते की एकतर हे असे होणार आहे याची कल्पना शाळांना दिली गेली असणार व त्याकडे दुर्लक्ष झाले असणार (मागची काही वर्षे जे चालले आहे त्यावरून सरकार कोणत्या तरी पॉईंटला मागे हटेल असेच बहुतेकांना वाटले असणार), किंवा १ डिसेंबर तारीख ही केवळ वाटाघाटींकरिता प्रेशर टाकण्यासाठी दिली गेली असावे - म्हणजे निदान पुढच्या कोणत्यातरी तारखेवर एकमत होईल.

पुण्यात तरी पूर्वी अगदी इन्फॉर्मल पद्धतीने सुरू झालेली ही व्यवस्था, वाहतूक व त्यातून निर्माण होणारे धोके, मुलांना अनोळखी लोकांच्या हातात सोपवण्याबद्दलची पालकांची काळजी व त्यातली सरकारची जबाबदारी यामुळे विकसित देशांप्रमाणे "फॉर्मल" होण्याकडे ही वाटचाल आहे. कधीतरी त्यासाठी शाळेने जास्त जबाबदार्‍या घेणे व पालकांनी जास्त पैसे खर्च करणे असे होणे अपरिहार्य दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या व्यवस्थेचे सरकारीकरणच का करू नये? कोणत्याही शाळांमधे मुलांना पोहोचविण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्याचे शुल्क पालकांकडून व शाळांकडून घ्यावे. ही कल्पना एकदम अचूक नसणारच, जशी डोक्यात आली तशीच लिहीतो आहे:
१. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, त्याखालोखाल यात ज्या लोकांची उपजीविका आहे त्याला
२. यातून नफा मिळण्याची फारशी शक्यता नसणे
३. पालकांच्या अर्थिक स्थितीनुसार मुलांना मिळणार्‍या संरक्षणात तफावत असू नये हे तत्त्व
४. सगळ्या शाळा व सगळी मुले एकत्र केल्याने व्यवस्थेत होणरे ऑप्टिमायझेशन
५. वाहतुकीतही होउ शकणारी सुधारणा. शाळेत मुलांना सोडायला येणार्‍या गाड्यांच्या संख्येत घट.
हे सगळे ही व्यवस्था सरकारने चालवावी या पुष्टी देतात. विरोधी मते ही नक्कीच असतील - अकार्यक्षमता, पैसे माफीसाठी काढलेल्या पळवाटा ई. इतरांचे मतही वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>या अंतरासाठी (३.५ किमी) रिक्षावाला महिना दोन हजार रुपये घेतो (१५ मुलं - सीएनजी रिक्षा) असं ऐकून आहे. तर शाळा बारा ते पंधरा हजार रुपये वर्षाकाठी घेते. (महिना एक हजाराच्या आसपास).

पुणं फ़ारच महागडं शहर* आहे असं लक्षात आलेलं आहे.
माझी नववीतली मुलगी (ठाण्यात) सुमारे २.७-२.८ किमी अंतरावरच्या शाळेत जाते. सकाळी एकदा क्लास असतो तेव्हा जाणे येणे आणि दुपारची शाळा असते त्यासाठी जाणे येणे. ती व्हॅन/ट्रॅक्स + बस (शाळेची नाही. व्हॅनवाल्याकडेच मिनीबस सुद्धा आहे). आम्ही यासाठी महिन्याचे एक हजार रुपये देतो (रोज दोन ट्रिप सहा दिवस शाळा). जेव्हा दोन ट्रिप करत नसे तेव्हा सहाशे रुपये देत होतो. रिक्षावाले यापेक्षा बरेच कमी घेत असतील. [शाळेचे गॅदरिंग असते तेव्हा तीन चार दिवस ते येत नाहीत कारण प्रत्येक मुलाच्या वेळेची निश्चिती नसते. आणि मे महिन्यात पूर्ण सुट्टी असते तरी बारा महिन्याचे पूर्ण पैसे देतो].

*मागे दोन वर्षांमागे पुण्यात जनरल प्रॅक्टिशनर (सर्दी पडसे ताप) एका वेळचे १५० रु किमान घेतो असे कुठल्याश्या चर्चेच्या निमित्ताने कळले होते. तेव्हा आमचा जीपी ३० रु घेत असे. आज ५० रुपये घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपल्या पाल्यासा शाळेत कसे पाठवायचे याचा निर्णय पूर्वपणे पालकांचा हवा. शाळेच्या आवाराबाहेरील कोणत्याही गोष्टीला मुख्याध्यापकांना/शाळेला जबाबदार ठेवणे गैर वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि जबाबदारीही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१
होय जबाबदारीही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी स्वतः पीएमटीच्या दोन दोन बसेस बदलून १५ किमी च्या शाळेत गेलेलो आहे. अर्थात त्या वेळी असलेली मर्यादीत रहदारी आणि वाहनचालकांमधील माणुसकी आता पुण्यात दुर्मिळ होत चालली आहे. लहान मूल रस्ता ओलांडू शकतं का ? लहान मुलाला घेऊन रस्ता ओलांडणा-याला शिवीगाळ करत कट मारून पुढे जाणारे वाहनचालक आहेत. या परिस्थितीत सुरक्षित वाहतुकीसाठी पालकांनी स्वतःची वाहतूक व्यवस्था उभारा असे सांगणे म्हणजे शाळा शिकवण्यासाठी स्वतःची शाळा काढा असे सांगणे आहे. खरं तर ज्यांना शक्य आहे ते स्वतःच शाळेत मुलांना सोडतातच. पण आजच्या परिस्थितीत मुलांना शाळेत सोडणे प्रत्येकाला का शक्य नाही हे वर आलेलं आहे.

मुख्याध्यापकांचा मुद्दा वरकरणी बरोबर वाटत असला तरी शाळेबाहरेचे गणवेश खरेदी, वह्या पुस्तके खरेदी, स्टेशनरी यासाठी ठराविक दुकानं नेमून देताना ही कामं मुख्याध्यापकांची नाहीत हे त्यांच्या कसं लक्षात येत नाही ? सरकारने शालेय शिक्षण, उच्च शिक्षण यातून अंग काढून घेतले आहे. त्याची भलावणही झाली. आता त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. पीएमटी कडून शालेय बाहतुकीसाठी कंत्राटी बसेस मिळतात. हा सुरक्षित पर्याय आहे. पण शाळाचालक उत्साही असल्याचं दिसून येत नाही. या प्रकारच्या कंत्राटातही कंटक्टर / अटेण्डंट पीएमटीचा नसतो. बस सुस्थितीत असणे, पर्यायी बस सोडणे या गोष्टी पीएमटी पाहते. विद्यार्थ्यांची संख्या, ते घरी पोहोचले कि नाही, योग्य व्यक्तीकडे सोपवले गेले कि नाही, शाळेतून त्यांना आणले कि नाही यासाठी शाळा किंवा पालक यापैकी एकाने जबाबदारी घ्यावी लागते. मुख्याध्यापकांना जबाबदार धरले म्हणजे त्यांना जास्त काम करावे लागते असे नाही. आमच्या शाळेत अटेण्डण्ट आणि ड्रायव्हर आहेत. मुलांचे पालक बसस्टॉपवर असतील तरच मुलांना उतरवले जाते नाहीतर पुन्हा शाळेत नेऊन फोन केला जातो. आता जे मुख्याध्यापक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत ते ग्रामीण भागातले आहेत. वर सांगितल्याप्रमाणे त्यांना हा निर्णय लागूच होत नाही. पण त्यांना पुढे करून शहरी भागातल्या खासगी शाळांचे चालकच हे आंदोलन घडवून आणताहेत अशी शंका घ्यायला जागा आहे. या शाळा कुणाच्या आहेत हे सांगण्याची गरज नसावी.

सरकारने ही जबाबदारी घेणं हे सर्वात योग्य राहील. पण सरकार सगळ्याच गोष्टीतून अंग काढून घेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

पालक आपापल्या पाल्याची जबाबदारी का घेऊ शकत नाहित / इच्छित नाहीत? हे समजले नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पालक आपापल्या पाल्याची जबाबदारी का घेऊ शकत नाहित >> पालकांच्या अडचणींबाबतचे विविध मुद्दे वर आलेले आहेत. त्यातून काहीच समजत नाहीये का ? नेमकं काय उत्तर अपेक्षित आहे हे लक्षात येत नाहीये. माझ्या मते पालकांच्या अडचणी विस्तृतपणे आलेल्या आहेत. त्या चुकीच्या असतील तर तसं सांगणे.

/ इच्छित नाहीत? असं म्हणणं योग्य आहे का ?

मला वाटतं पालकांनी काय करायला हवं किंवा जबाबदारी घ्यायची म्हणजे काय याबद्दलच्या तुमच्या कल्पना स्पष्ट झाल्या म्हणजे दोन्ही बाजूंना काय म्हणायचं आहे हे लक्षात यायला मदत होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

पालकांनी स्वतःची वाहतूक व्यवस्था उभारायला सांगत नाहिये. मात्र आपल्या पाल्याला कोणत्या मार्गाने शाळेत पोचवायचे याचा निर्णय आणि त्याची जबाबदारी फक्त पालकांवर येते. शाळेने दिलेली खाजगी स्कूलबस किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सरकरी बसेस किंवा राज्य परिवहनाच्या बसेस किंवा रिक्षा किंवा स्वतःच्या मोटरीने सोडणे किंवा टॅक्सी किंवा पायी जाणे किंवा इतरही काही पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या पाल्याला शाळेत कसे पाठवायचे याचे स्वातंत्र्य पालकांना आहे. तर मग त्या निर्णयाची जबाबदारी फक्त आणि फक्त पालकांचीच नाही का?

जर शाळेने स्कुलबसने येण्याची सक्ती केली तर ती जबाबदारी शाळेची पक्षी मुख्याध्यापकांची ठरावी.

जर शाळेत स्कूलबसने पाठवायचा निर्णय पालकांचा आहे तर जबाबदारीही त्यांचीच असली पाहिजे. जरत्या मार्गावर विश्वास नसेल तर
अ. स्वतः शाळेत सोडून यावे.
ब. जवळच्या शाळेत पाल्याला घालावे जेणे करून त्याचा तो जाऊ शकेल
क. परवडत असल्यास शाळेत सोडायला दुसरी व्यक्ती लावावी (त्या व्यक्तीला जबाबदारी द्यावी)
ड. आपल्याला जो मार्ग योग्य वाटतो तो 'आपल्या' जबाबदारीवर अवलंबावा (जसे रिक्षा, ट्याक्सी)

स्कूलबसेस शाळा देत नाही. ती फक्त अ‍ॅडिशनल सोय असते. जर याची जबाबदारी शाळेवर टाकली तर भविष्यात शाळेने ही सोय बंद केल्यास आश्चर्य वाटणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अ. स्वतः शाळेत सोडून यावे.>> ज्यांना शक्य आहे ते सोडतातच. ज्यांना शक्य नाही त्यांच्या काय अडचणी आहेत हे वर आलेलं आहे. त्या बाबतीत संवेदनशीलता बाळगायआ हवी. स्वतः त्यातून गेल्यावर काही गोष्टी ध्यानात येतात.

ब. जवळच्या शाळेत पाल्याला घालावे जेणे करून त्याचा तो जाऊ शकेल >> जवळच्या किंवा हव्या त्या शाळेत प्रवेश मिळणे सहज सोपे आहे का ? किंवा हव्या त्या शाळेजवळ घर घेणे हे देखील ? पुण्यात घर घेणं हे सर्वांच्याच आवाक्यात आहे का ?

क. परवडत असल्यास शाळेत सोडायला दुसरी व्यक्ती लावावी (त्या व्यक्तीला जबाबदारी द्यावी) >> ज्यांना शक्य आहे ते करतच असतील. पुन्हा परवडणे हा मुद्दा आहेच इथं.

ड. आपल्याला जो मार्ग योग्य वाटतो तो 'आपल्या' जबाबदारीवर अवलंबावा (जसे रिक्षा, ट्याक्सी) >>> हे चालूच आहे ना. सध्या मुलं शाळेत जायची कुठं थांबली आहेत. जे काही चालू आहे त्यात दाद मागण्यासाठी नियमावली आवश्यक आहे. त्यात काय समस्या आहेत याची चर्चा वर केली आहे. जे सध्या पुण्यात नाहीत किंवा ज्यांची मुलं शाळेत नाहीत त्यांना कदाचित हा विषय समजत नाहीये असं दिसतंय. मुंबईत बहुतांश शाळेत स्कूल बसेस आहेत असं आताच ऐकलं. काही ठिकाणी गैरप्रकार झाले होते त्याची दखल यात घेण्यात आलेली आहे.

अशी नियमावली गेली चार वर्षे बनते आहे. त्यात मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात आलेले आहे. त्याला अंतिम स्वरूप आले नव्हते इतकेच. म्हणजेच मुख्याध्यापकांसाठी हा नियम अनपेक्षित नाही. अनेक बैठका, चर्चा होऊन मसुदा बनलेला होता. नियम बनण्यात काय अडसर आले याच्या बातम्यांच्या लिंक्स खालील दुव्यावर उपलब्ध आहेत.

http://online3.esakal.com/SearchResult.aspx?q=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9...

मुख्याध्यापकांवर अन्याय करावा असं वाटत नाही. नवल याचंच वाटतं कि अनेक शैक्षणिक / अशैक्षणिक सक्तीच्या खरेदीमधे शाळा सक्ती करत असताना बसेस मधून का अंग काढून घेते याचं उत्तर अशा शाळांच्या मुख्याध्यापकांनीच द्यायचंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

स्वतंत्र प्रतिसाद देतोय. वर दिलेल्या लिंकमधे एकत्रित सर्च रिझल्ट आहे.

१. ८ फेब्रु २०१० रोजी नियमावली मंजुरीसाठी परिवहन कडे पाठवली गेली.
त्यात
"

स्कूल बसला होणारे अपघात आणि विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक याला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने नियमावली तयार केली आहे. त्यामुळे स्कूल बसमधून होणाऱ्या वाहतुकीला आता स्कूल बसचालकासह शाळांनाही जबाबदार धरले जाणार आहे

." असा स्पष्ट उल्लेख आहे.
मंजुरीपूर्वी सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. -
मसुदा
http://www.esakal.com/esakal/20110926/5040658183206760451.htm

२. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ठरली धंद्यापुढे गौण - १ डिसें २०११
बातमीचं शीर्षकच बोलकं आहे.
-http://www.esakal.com/esakal/20111201/5068050068661037693.htm

३.http://online3.esakal.com/SearchResult.aspx?q=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9...
निर्णय होण्यास विलंब - ५ जाने २०१२

मोजक्या बातम्यांवरून लक्षात येतं कि २००९ च्या ही आधीपासून हा विषय सुरू आहे. मुख्याध्यापकांना काही म्हणायचे होते तर आताच का ? त्या वेळी त्यांचं म्हणणं मांडता येत होतंच कि. इतर बातम्या आधीच्या प्रतिसादातल्या दुव्यावरून पहाव्यात.

४.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

बाकी सगळं चर्चायोग्य/ग्राह्य समजू.
त्याआधी माझा एकच साधा प्रश्न आहे, जे निर्णय शाळा किंवा मुख्याध्यापक घेत नाहीत (किंवा इतरांना घेणे भाग पाडत नाहीत) त्या निर्णयाची जबाबदारी शाळेची/मुख्याध्यापकांची कशी? व ती त्यांनी का घ्यावी?

इथे शाळेत स्कूलबसने पाठवणे हा निर्णय पालक घेताहेत मग त्याच्या भल्या-बुर्‍या परिणामांची जबाबदारी पालकांव्यतिरिक्त इतर कोणीही का घ्यावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जे निर्णय शाळा किंवा मुख्याध्यापक घेत नाहीत (किंवा इतरांना घेणे भाग पाडत नाहीत) त्या निर्णयाची जबाबदारी शाळेची/मुख्याध्यापकांची कशी? व ती त्यांनी का घ्यावी?

मुख्याध्यापकांना पूर्णपणे जबाबदार धरणं मला मान्य नाही. पण शाळेने पुढाकार घेतला तर काही गोष्टी सोप्या होऊ शकतात.

शाळेतल्या मुलांपैकी कोण कुठे रहातो हे शाळेला माहित असतं. प्रत्येक पालकाला माहित नसतं. कोण कोण बसची सुविधा न वापरता स्वतंत्र येऊ शकेल हे शाळेला माहित करून घेता येतं. कोणाला ही सुविधा हवी आहे याचा अंदाज घेता येतो. यानुसार किती बसेस लागतील, बसचा मार्ग काय असावा, विशिष्ट वयाखालच्या मुलांना बसस्थानकावर उतरवून घ्यायला पालक आलेले नसतील तर मुलांना शाळेत परत आणणं, पालकांशी संपर्क साधणं, वगैरे गोष्टी शाळाच ठरवू शकते. एका पालकाची रिक्षावाला जशी अडवणूक करू शकतो तशी आख्ख्या शाळेची अडवणूक करणं कठीण जातं - त्यामुळे बसचं कॉंट्रॅक्ट किफायती पडू शकतं. शिवाय शाळापातळीवर जर बसेसची हाताळणी झाली तर विशिष्ट दर्जा राखणं हे शाळातपासणीच्या प्रस्थापित व्यवस्थेतून शक्य होतं. बससाठी शाळेला जे शुल्क द्यायचं ते राजरोस कायदेशीरपणे रिसिटीसकट दिलं जातं. यापुढची पायरी म्हणजे आसपासच्या शाळाही कदाचित बस सर्व्हिस भागीदारीत घेऊ शकतील (ही आपली माझी कल्पना आहे, प्रत्यक्षात करता येईल की नाही कल्पना नाही) असे अनेक फायदे आहेत.

वर जे हिशोब वाचले त्यावरून एका वेळी दहा मुलांना शाळेत पोचवण्यासाठी रिक्षावाला सगळ्यांकडून मिळून २०० ते ४०० रुपये घेतो. त्या तासाभरासाठी तेवढ्या किमतीत एक व्हॅन शाळेला सहज भाड्याने घेता येईल. कुठच्या मार्गावर किती मुलं आहेत त्यानुसार व्हॅन की बस असंही ठरवून अधिक ऑप्टिमायझेशन करता येईल.

या सगळ्यासाठी शाळेचा पुढाकार आवश्यक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेचा पुढाकार, शाळेकडून मदत वगैरे मुळे फायदा होईल याबद्दल सहमत आहेच. पण तरी त्या मदतीचा लाभ घेण्याचा निर्णय पालकांचाच असल्याने त्यासंबंधीत फायदे/तोट्याची जबाबदारी पालकांचीच असेल - असली पाहिजे.

आधी म्हटल्याप्रमाणे जर शाळेने बस कंपल्सरी केली किंवा शाळा अश्या जागी अहे जिथे जाण्यास शाळेच्या बसवाचून पर्याय नाही तर मग शाळेला जबाबदारी घ्यायला लावणे योग्य ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरकरणी मुख्याध्यापकांची जबाबदारी नाही हे मत कुणाचंही होऊ शकेल. माझंही होतं. पण वर म्हटल्याप्रमाणे ज्या कारणासाठी जबाबदारी झटकली जाते त्याच कारणांसाठी इतर गोष्टीत सक्ती करताना मुख्याध्यापकांना कर्तव्ये आणि हक्काची जाणीव होत नाही. पालकांची जबाबदारी आहे हे मान्य. ती पालकांनी कुठं झटकलीये ? पण वर दिलेल्या परिस्थितीत आणि कायद्याच्या अभावी त्यांना संरक्षण नको का ? एकीकडे रिक्षावाले भीक घालेना एकीकडे सरकार ऐकून घेईना अशा परिस्थितीत जाणते अजाणतेपणी मुलं काळजावर दगड ठेवून व्यवस्थेला शरण जात असुरक्षित वाहतुकीच्या हवाली करणे हा मुख्य मुद्दा समजून घेतला तर आपोआपच पुढच्या गोष्टी समजू शकतील.

केवळ मुलं शाळेत सोडण्यासाठी एकाने घरी बसणं हे देखील अन्यायकारक वाटतं. तसं असेल तर एकाच्या पगारात भागेल इतकं शालेय शुल्क आणि वाहतुकीचा खर्च असेल याकडे सरकारने लक्ष दिलं पाहीजे. ( सरकारने अंग झटकत राहणं हा एक वेगळ्या धाग्याचा विषय आहे). पुण्यासारख्या ठिकाणी सायकलवर मुलांना शाळेत पाठवणे केव्हांच बंद झालेलं आहे. ज्या गृहीणी मुलांना शाळेत सोडत होत्या त्यांनाही ते असुरक्षित वाटू लागलेलं आहे. हे मुद्दे आधीच वारंवार वर येऊन गेलेले आहेत. ही परिस्थिती सुधारणे पालकांच्या हाताबाहेरचे आहे. वाहतूक आणि वाहतूक व्यवस्था सुधारणे ज्यांच्या हाती आहे त्यांनीच हे करायचे आहे. या पार्र्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी जे धोरण तयार झालं त्यात मुख्याध्यापकांना जबाबदार धरणारा मसुदा २००९ च्या आसपास बनला ज्याची लिंक वर दिलेली आहे. निरनिराळ्या कारणांनी तो जीआर लांबणीवर पडत गेला. पण या संपूर्ण कालावधीत मुख्याध्यापकांनी कधीच हा आमच्यावर अन्याय असल्याचं म्हटलेलं नाही. आता जीआर आल्यानंतर त्यांनी दहावी आणि बारावी च्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याची धमकी देऊन सरकारला झुकायला लावलेले आहे. आताही त्यांचीबाजू पटली म्हणून जीआर मागे घेतला गेला असं झालेलं दिसत नाही.

जर सर्वमान्य तोडगा निघण्यासाठी सूचना वगैरे आल्यास या चर्चेत पुन्हा भाग घेईन. सध्यातरी यापेक्षा वेगळे मुद्दे येण्याची शक्यता नसल्याने हे शेवटचे पोस्ट. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

आपल्या पाल्याकरिता पालकांनी * आतली शाळा निवडावी -
* ५ किमीच्या (कमाल अंतर) (पाल्य आठवी इयत्ता +++)
* ३ किमीच्या (कमाल अंतर) (पाल्य पाचवी ते आठवी इयत्तेत)
* १ किमीच्या (कमाल अंतर) (पाल्य ---- पाचवी इयत्ता)

वरील पर्यायात शक्यतो भाड्याच्या वाहनप्रवासाची गरज पडणार नाहीच. लहान पाल्यांना त्यांचे आई / वडील / आजी / आजोबा / घरातील नोकर / शेजारी यांच्यापैकी कुणीही (किंवा आलटून पालटून सर्वच) चालत अथवा दुचाकीवर सोडू शकतील. मोठे पाल्य सायकलने स्वतः शाळेत जाऊ शकतील अशी अंतरांची निवड केली आहे.

यापेक्षा जास्त अंतरावरील शाळा निवडणे व्यवहार्य नाहीच. येण्याजाण्यातील वेळ वजा जाता अभ्यासाला वेळ कसा मिळणार?

दर्जेदार शाळा घरापासून लांब अंतरावर असतात ही सबब मान्य करता येण्यासारखी नाहीच. शेवटी जर शिकवणी वर्गाचा आधार घेणार आहातच तर मग शाळेचा दर्जा काय पाहाता? अगदी मनपा / जिप च्या शाळा देखील चालून जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com